Saturday, 14 July 2018

तृतीयस्थान (पराक्रम स्थान) The third house (House of Communication)


जन्म कुंडलीतील तृतीय स्थानाला सहजस्थान किंवा पराक्रमस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून त्या व्यक्तीचं मानसिक धैर्य, शौर्य, सहोदर सौख्य (लहान भावंड), छोटे प्रवास अशा गोष्टींचा अभ्यास करता येतो. मुख्यतः शौर्य व पराक्रमाशी या स्थानाचा संबंध असल्याने सैन्यात असणाऱ्या व्यक्ती, पोलीस, गुप्तहेर अशा व्यक्तींच्या कामाबद्दलचा अभ्यास या स्थानावरून करता येईल. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होईल ते पाहू. 

पराक्रम म्हणजे केवळ सैन्यात गाजवलेला पराक्रम असेच नव्हे तर कोणताही ठाम निर्णय घेऊन किंवा समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन केलेली चांगली कामगिरी सुद्धा असू शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक स्तरावर मोठे निर्णय घेऊन त्यावर ठाम राहून कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आपण पाहतो त्यांच्या कुंडलीत तृतीयस्थान प्रभावी असते. तृतीयस्थान आणि त्यासंबंधित ग्रह जास्त बलवान असतील तर बहुधा स्वभावात बंडखोरी असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ठामपणे आणि निडरपणे काही निर्णय घ्यायचे असतील तेव्हा तृतीय स्थानाचा विचार करावा. सैन्य, पोलीस दल, गुप्तहेर खातं अशा ठिकाणी काम करताना धैर्य आणि निडरपणा अंगी असावा लागतो. म्हणून अशा क्षेत्रांत काम करण्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर या स्थानाचा विचार करावा. 

आपल्या भावंडांशी आपले संबंध कसे राहतील हा विचार करताना तृतीय स्थानावरून याची उत्तरं नक्की मिळतील. भावंडांपासून दूर राहणं, वाद विवाद, अबोला यामुळे अनेकदा घरातील वातावरण गढूळ होतं. मुख्यतः सख्ख्या भावंडांबद्दल जास्त माहिती या स्थानावरून मिळते. पण चुलत - मामे  भावंड, दूरच्या नात्यातील भावंड यांचीही माहिती सखोल अभ्यासाने मिळते. याचा विचार करून केवळ घरगुती बाबीच नव्हे तर आर्थिक बाबतीतही मदत होऊ शकेल. जेव्हा दोन भावंडं एकत्र व्यवसाय सुरु करतात तेव्हा या स्थानाचा अभ्यास केल्यास संभाव्य परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. एकत्र व्यवसाय, संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती, स्थावर जंगम मालमत्तेची कागदपत्रं अशा कायदेशीर गोष्टींत या स्थानाचा विचार करून पाऊल उभे टाकल्यास अडचणी कमी होतील. इतकंच नाही तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत धाकट्या भावंडाचं सौख्य नसेल तर त्याच्या कुंडलीवरून धाकट्या भावंडांचा मृत्यू किंवा धाकटे भावंड नसणं किंवा त्या व्यक्तीच्या जन्मानंतर मातेचा वारंवार गर्भपात होणं ह्या कारणांचा मागोवा सुद्धा घेता येऊ शकेल. अशा वेळी पालकांना दुसरी संतती हवी असल्यास योग्य ते वैद्यकीय मार्ग किंवा संतती दत्तक घेणं याचे निर्णय वेळीच घेता येतील.   

तृतीय स्थानाचा अंमल हा कान आणि गळ्यावर असतो. कानाची दुखणी (विशेषतः उजवा कान), बहिरेपणा अशा प्रकारच्या रोगांमध्ये या स्थानाच्या अभ्यासावरून मदत मिळू शकेल. अगदी लहान मुलांना जेव्हा कानाची दुखणी होतात तेव्हा त्यांना ते सांगणं शक्य नसतं किंवा कधीकधी मोठ्या व्यक्तींनाही चांगलं निदान होत नसेल पण कानासंबंधी काही त्रास असतील तर या स्थानाच्या अभ्यासावरून मदत घेता येऊ शकेल.     

या स्थानावरून जवळचे प्रवास उदा: पत्र व्यवहार, जवळच्या ठिकाणी केलेले प्रवास, सहली, स्थानिक बस वा ट्रेन ने केलेले प्रवास इत्यादींचा अभ्यास करता येतो. याचा सखोल विचार करता केवळ प्रवास नव्हे तर प्रवासात येऊ शकणाऱ्या अडचणी, घडणारे अपघात, प्रवासात काही वस्तू हरवल्यास त्याचा शोध घेणं, पत्र व्यवहाराचे उत्तर अपेक्षित असल्यास त्यासंबंधीच्या कामांचे अंदाज अशा अनेक गोष्टींचा अभ्यास या स्थानावरून करता येईल. मात्र दूरचे प्रवास, परदेशातील प्रवास याचा अभ्यास या स्थानावरून करता येत नाही. 

अशा प्रकारे तृतीय स्थानावरून समजू शकणाऱ्या गोष्टींचा विचार करून आयुष्यातील काही निर्णय घेताना नक्कीच मार्गदर्शन मिळू शकेल. तसेच भावंडांमधील वाद विवाद कमी करता आल्यास अनेक कुटुंबांना मानसिक सौख्य लाभण्यास मदत होईल.       

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

       ===============================================================
      
The third house in the Janm kundli is also known as Sahajasthana or Parakramasthana (Heroism). This house shows one's mental strength, heroism, relations with siblings (younger sibling), small travels etc. As this house deals with the heroism or bravery, it is very important for the people working in police department, army or as a detective or spy. Now lets see how practically this can be useful.

Heroism is not just bravery in army, but it can be any outstanding and firm behaviour or any achievement by rebellious performance. So the third house in the Janm kundlis of people who need to take a firm decision while working at a higher level or public sector, is very strong. The people who have a strong third house or powerful planets related to third house are mostly rebellious. When a person needs a strong or courageous behaviour for taking decisions, then the third house should be taken into consideration. Such behaviour is mostly required in departments like police, spy industry, army etc. So When a question regarding these fields is asked the study of the third house is very important. 

The third house can also provide information regarding the relations with siblings, especially the younger ones. That is why this house is also known as house of communication. The separation from siblings, clashes between the siblings or siblings not on speaking terms many times pollutes the environment at home. The study of this house can help in sorting out these personal issues. Mainly this house governs the younger siblings, but a detailed study can also provide information about the relations with cousins. This can not only help in personal relations with siblings or cousins but can also help in financial matters. When two siblings start a business together or run a family business, the study of this house can definitely make them alert for the possible upcoming risks or dangers. Business partnerships in siblings, ancestral property matters, papers of land or properties on joint names of siblings and many more legal matters can be sorted with the study of this house to avoid any problems in future. Not only this but in personal matters like death of a sibling, no younger siblings or still birth of younger siblings are some of the complications which can be studied and the reasons behind these events can be found out using the third house. In such cases when parents want a second child they can go for intensive medication or take a decision for adoption with the help of the study of the third house of their first child. 

The third house governs ear and neck portion of the body. So problems regarding ear (right ear), infections, deafness etc can be studied from this house. When infants have such problems it becomes difficult to diagnose or even grown up people do not get proper diagnose of ear ailments. In such cases the study of third house can be definitely useful. 

This house also governs small travels like local trips, picnics, tours, trains or bus travels, or postal deals. So in detail study not only planning of small trips but any problems occurred while travelling like small accidents, lost materials jewellery, important papers or expected official letters can also be studied using this house. Importantly long distance travels can not be studied from the third house. 

In this way the study of the third house can help to take many important decisions in life. Also if the misunderstandings between the siblings are reduced, it can help to maintain relationships in the families.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                   ======================================================

Saturday, 7 July 2018

द्वितीयस्थान (धन स्थान) The second house (Wealth house)


जन्मकुंडलीतील द्वितीय स्थानाला धनस्थान किंवा कुटुंबस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून त्या व्यक्तीची आर्थिक बाजू कशी असेल, दागदागिने, स्थावर / जंगम मालमत्ता आणि यामुळे मिळणारं भौतिक सुख किती असेल हे प्रामुख्यानं समजून घेता येतं. या भौतिक सुखांचा उपभोग किती घेता येईल याचा विचार या स्थानावरून केला जातो. म्हणूनच इंग्रजीत या स्थानाला House of possessions असंही म्हणतात. याखेरीज या स्थानावरून वाणी, दृष्टी, कुटुंब सौख्य याचाही विचार केला जातो. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींशी असणारे संबंध कसे असतील किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळेल का अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना धनस्थानाचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. कोणत्याही विशिष्ट नात्याचा अभ्यास मात्र या स्थानावरून करता येत नाही. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते पाहू.  


एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती म्हणजे केवळ त्या व्यक्तीनं कमावलेलं धनच नाही तर मिळणारी वडिलोपार्जित संपत्ती किंवा दत्तक विधानातून वा सासरकडून मिळणारी संपत्ती किंवा अगदी लॉटरी, सट्टा बाजारातून अचानक मिळणारी संपत्ती सुद्धा असू शकते. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात मिळवलेली संपत्ती आणि त्याची योग्य प्रकारे केलेली गुंतवणूक हा भागही या स्थानाच्या अभ्यासात येतो. म्हणूनच गुंतवणूक करताना कशा प्रकारे आणि कुठल्या ठिकाणी करावी यासाठी या स्थानावरून मार्गदर्शन घेता येऊ शकेल. जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तो कशा प्रकारचा असावा आणि किती गुंतवणूक करावी याचा अभ्यास धनस्थानावरून करता येऊ शकेल. यामुळे नुकसान आणि फसवणूक यापासून दूर राहता येऊ शकेल. बऱ्याचदा खालावलेली आर्थिक परिस्थिती ही चुकीचे निर्णय आणि योग्य नियमनाचा अभाव यामुळे होते. अशा वेळी आर्थिक सल्लागाराबरोबर ज्योतिष शास्त्राच्या मार्गदर्शनाने योग्य मार्ग काढण्यास मदत मिळू शकेल.    

कुंडलीतील दुसऱ्या स्थानाचा अंमल डोळे, जीभ, दात, गाल, हनुवटी या अवयांवर असतो. याचा विचार करता वाणीतील दोष, तोतरेपणा, डोळ्यातील दोष, दंतविकार अशा अनेक शारीरिक व्याधींमध्ये उपचारासाठी किंवा निदान होत नसेल तर त्यासाठीही या स्थानाचा अभ्यास मदतगार ठरू शकतो. 

हे स्थान वाणी आणि आर्थिक स्थिती दोहोंचे कारक स्थान असल्यामुळे याचा एकत्रित विचार केला तर ज्यांचे अर्थार्जन वाणीच्या साहाय्याने होते त्यांनी या स्थानाचा जरूर विचार करावा. उदाहरणार्थ गायक, निवेदक, सल्लागार, शिक्षक, दूरध्वनी वरील कामे करणारे (रिसेप्शनिस्ट), मेडिकल रेप्रेसेंटेटिव्ह, जाहिरात विभागातील व्यक्ती अशा अनेक क्षेत्रात जिथे बोलणे किंवा वक्तृत्व कला महत्त्वाची आहे अशा व्यक्तींना या स्थानावरून चांगले मार्दर्शन मिळू शकेल. किंवा ह्या क्षेत्रांत जम बसेल की नाही याचाही विचार आधीच करता येईल व त्यानुसार निर्णय घेता येतील. 

आर्थिक गोष्टींमुळे होणारे वाद, कोर्ट कचेऱ्या अनेकांच्या घरात होत असतात. अशा वेळी आर्थिक व कायदेशीर सल्ला महत्त्वाचा आहेच परंतु जर जन्म कुंडलीमधून एकूण आर्थिक स्थिती व संभाव्य धोके यांचा अंदाज आला तर वेळीच काही निर्णय घेता येऊ शकतील. तसंच कुटुंबातील व्यक्तींशी आपले संबंध कसे असतील याचा अंदाज आला तर योग्य पद्धतीने आर्थिक बाबी सांभाळता येतील. 

अशा पद्धतीने धनस्थानाचा अभ्यास करून आर्थिक अडचणीच नव्हे तर कौटुंबिक स्तरावरही काही बाबी सांभाळता येऊ शकतील. अनेक नातेसंबंध गैरसमजामुळे खराब होतात. असे कौटुंबिक वाद दूर होऊन कुटुंब समाधानी राहावं यासाठीही या स्थानावरून मार्गदर्शन घेतल्यास ते उपयुक्त ठरेल. 

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                         ========================================================

The second house in the Janm kundli is known as Dhanasthana (Wealth house) or Kutumbsthaan (Family house). From this house one's financial prosperity, the worldly attainment by jewellery, real estate etc can be known. From this house it can be studied how much one can enjoy by these worldly pleasures, so this house is also known as House of Possessions. Along with these one's voice, vision, relations with close family members can also be studied by this house. The questions regarding relations with close family members in future or ancestral property need a detailed study of this house. Though any specific relation can not be studied using this house. Now lets see how this can be used practically.

Any person's financial status is not only the money earned by the person but it can be gained from ancestral properties or by adoption or gained from in laws or even lottery. Money earned during different stages of life and the investment of the same is also described by this house. So from this house a guidance for how and where to invest the money can be taken. If a business has to be started then which business is suitable and how much amount should be invested with minimum risk can also be studied by this house. This can reduce the risk due to loss or frauds to a significant extent. Mostly deteriorated financial conditions are due to wrong decisions and lack of money management. In such cases a guidance from astrologer along with financial adviser can be helpful in finding out a solution. 

Second house in Janm kundli is a house of speech as well as monetary gains, so combining these two factors the people who earn on the basis of their voice or talking skill should emphasize on this house. For example singers, anchors, counselors, teachers, receptionists, medical representatives, advertising agents or people working in fields where communication is required can get a guidance from planetary positions related to this house. Also it can help in taking a decision whether they should make career in this field or not. 

Many families go through financial disputes and court matters, which is a long process. In such cases legal advice is definitely important, but along with that if one comes to know about such possible risks in future then correct decisions can be taken beforehand. Also if one can get an idea about the relations with close family members in future then money matters can be handled accordingly. 

In this way second house in the Janm kundli can not only help in money matters but also on family level. Some times close family relations get estranged due to mere misunderstandings. To avoid such unnecessary problems a guidance from the second house of the Janm kundli can be very useful.   

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
             ======================================================