Thursday 13 August 2020

बाधिक वास्तू (Haunted Houses)


बऱ्याचदा आपण पारलौकिक घटनांबद्दल ऐकतो, वाचतो. अशा कथा ऐकताना आपण त्यावर सहज विश्वासही ठेवतो. त्यात किती तथ्य असतं हा वादाचा मुद्दा आहे. पण आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपण अशी एक तरी गोष्ट ऐकलेली असते. जुन्या काळातल्या लोकांकडून अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मग त्यातून गैरसमज, अंधश्रद्धा पसरतात. ह्या पारलौकिक घटनांमधलाच एक भाग म्हणजे 'बाधिक वास्तू'. एखाद्या वास्तूमध्ये काही काळ वा कधी कधी मोठ्या कालावधीत काही त्रास उद्भवतात. तिथे राहणाऱ्या व्यक्तींना चांगले - वाईट पण विचित्र अनुभव येतात. बहुतांशी त्रास हे वास्तू दोष आणि तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीनुसार असलेल्या विधिलिखित घटनाच असतात. किंबहुना ती वास्तू 'बाधिक' आहे या पूर्वग्रहामुळेच अनेक गोष्टींचं कारण हे पारलौकिक आहे असं मानलं जातं जे मानसिक दुर्बलतेमुळे घडतं. माझ्या अभ्यासानुसार कोणतंही वैज्ञानिक, ज्योतिष शास्त्रीय कारण नसताना जर विचित्र अनुभव येत असतील तर ती वास्तू 'बाधिक' आहे असं म्हणता येईल. व्यावहारीक गोष्टी, ज्योतिष शास्त्र या  दृष्टिकोनातून वा आपल्या कर्मांचा विचार न केल्यामुळे त्या वास्तूत जी फळं मिळतात त्याचं उत्तर बऱ्याच लोकांना काढता येत नाही. मग अशा घटनांना 'पारलौकिक घटना' असं सोपं नाव दिलं जातं. कारण पारलौकिक घटना घडल्या आहेत अथवा नाहीत हे दोन्ही मुद्दे सिद्ध करणं कठीण आहे. एकतर यावर कोणत्याही अभ्यासकांचं एकमत होत नाही. तसंच पारलौकिक घटना सिद्ध करताना नेहमीच्या कसोट्या लावता येत नाहीत. त्यामुळे त्या जागेत राहणाऱ्या आणि आधीच त्रासलेल्या लोकांचा पारलौकिक घटनांवर विश्वास पटकन बसतो. हे जरी खरं धरलं तरी यात आणखीही एक मुद्दा येतो. एखाद्या वास्तूत जेव्हा खरोखर पारलौकिक घटना घडतात तेव्हा त्या जागेसंबंधी असण्यापेक्षा त्या जागेत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात असू शकतात. वैयक्तिक दृष्टीनं पाहायला गेलं तर एखाद्या व्यक्तीला असे काही त्रास होऊ शकतात. पण केवळ त्या वास्तूत असताना ते घडल्यामुळे ती संपूर्ण वास्तूच बाधिक आहे असं म्हटलं जातं. याची शहानिशा करणं खूप गरजेचं असतं. कारण अशी व्यक्ती त्या वास्तूतून बाहेर पडली तर अशा विचित्र घटना घडत नाहीत, पण केवळ बदनामीमुळे नंतरच्या काही घटनांचं खापरही त्या वास्तूवर फोडलं जातं. कोणत्याही अंधश्रद्धेच्या वा भावनांच्या आहारी न जाता याचं निदान केलं जावं असं माझं मत आहे. अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या कथित वा सद्य स्थितीतील परोक्ष घटनांपेक्षा अपरोक्ष घटना, पुरावे अशा सर्व मुद्द्यांचा सारासार विचार करूनच कोणत्याही निर्णयाप्रत यावं.   

आता वास्तू 'बाधिक' असणं म्हणजे नक्की काय? भारतीय वास्तू शास्त्रानुसार वास्तू कधीच बाधिक नसते. अशी कोणतीही गोष्ट आपल्या शास्त्राने मान्य केलेली नाही. वास्तू शास्त्रानुसार जागेत दिशादोष (मुख्यतः दक्षिण), आपली कर्मं, मानसिक अवस्था, कुंडलीतील दोष, मृतात्म्यांचा एखाद्या व्यक्तीच्या मनावर ताबा असणं अशा गोष्टींमुळे राहणाऱ्या व्यक्तींना त्रास होतात. पण जागा 'बाधिक' होणं अशक्य आहे. बहुतांशी हे सत्य असलं तरीही संशोधनात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अज्ञात गोष्टींना पूर्णपणे मी नाकारत नसल्यानं हे शास्त्र भविष्यात वास्तू बाधिक होते असं सिद्ध करणारच नाही असा माझा दृष्टिकोन नाही. असो, याबद्दल अनेक मत मतांतरं आहेत. माझ्या अभ्यासानुसार आणि अनुभवांनुसार माझी जी मतं आहेत ती मी इथे मांडायचा प्रयत्न करत आहे. त्याच्याशी सगळेच सहमत होतील असं नाही याची मला जाणीव आहे.          

आता सोप्या शब्दांत सांगायचं तर वास्तूला बाधा होणं म्हणजे एखाद्या वास्तूत जेव्हा निरनिराळ्या योनितील अतृप्त आत्म्यांचा वावर असून त्यांच्या मार्फत त्या जागेतील व्यक्तींना मानसिक क्लेश होतात आणि त्याचं पर्यवसान शारीरिक क्लेश वा भौतिक घडामोडींवर होतं. काही वेळा हे नैसर्गिकरित्या घडतं, तर काही वेळा सिद्धीप्राप्त तांत्रिक हे घडवून आणतात. शक्यतो हे आत्मे त्या वास्तूच्या बाहेर आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत. त्यामुळे ती वास्तू त्यांच्या बंधनात अडकते आणि त्या वास्तूला त्यांची बाधा होते, म्हणजेच ती वास्तू अप्रत्यक्षरीत्या 'बाधिक' होते. या पारलौकिक शास्त्राला इतके कांगोरे आहेत कि त्याचा अभ्यास असलेली व्यक्तीच याचं योग्य निदान करू शकते. त्या अतृप्त आत्म्याची (योनि) शक्ती किती आहे, नक्की कोणत्या कारणासाठी तो अतृप्त आहे, किती काळापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे आणि कसा झाला आहे, एकाच आत्म्याचा वावर आहे कि जास्त अशा अनेक गोष्टींवर होणारा त्रास अवलंबून असतो. एखाद्या मृतात्म्याचा वावर एखाद्या योनित किती काळ असतो यालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे असे काही वावर असतील तर त्या आत्म्याचं देहावसान फार पूर्वी झालेलं नसणार. ज्या वेळी काही शेकडो वा हजारो वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तींची नावं अशा बाबतीत घेतली जातात ते मला पटत नाही. पण नुकत्याच मरण पावलेल्या व्यक्तींच्या मृतात्म्याबद्दल एखाद्या जागेत राहून काही त्रास देणं शक्य आहे. मग त्यासाठी त्या जागेत असणाऱ्या एखाद्या कमकुवत मनाच्या व्यक्तीच्या मनाचा ताबा घेणं हा सर्वात जास्त अनुभवलेला प्रकार असतो. तसंच जिवंतपणी त्या व्यक्तीच्या भावना किती तीव्र होत्या आणि आताची योनि कोणती यावरही सर्व फळं अवलंबून असतात. मृतात्मा जेव्हा अशा अवस्थेत असतो तेव्हा त्याला स्वतःला काहीही करता येत नाही. त्यामुळे अशा विचित्र अनुभवांच्या वेळी जागेवर ताबा असतो म्हणजे बऱ्याचदा त्या जागेत राहणाऱ्या व्यक्तींना विचित्र अनुभव येतात, त्यांच्या हातून काही गोष्टी घडतात. बऱ्याचदा अशा ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना वाईट स्वप्न पडतात किंवा मृतात्मा त्यांना स्वप्नात दिसतो. अशा व्यक्ती त्या मृतात्म्याला जिवंतपणी ओळखतही नसतात. पण निद्रावस्थेत असताना जिवंत व्यक्तीच्या मनाचा ताबा घेणं तुलनात्मकरित्या सोपं असतं. या बाबतीतला विशेष अनुभव म्हणजे जेव्हा कोणी पोटावर वळून झोपतं तेव्हा अशी स्वप्नं जास्त पडतात. पण एरवीसुद्दा वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तरी पोटावर वजन पडेल असं झोपलं तर वाईट स्वप्नं पडतात कारण त्यामुळे पचनक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे कोणत्याही अशा पारलौकिक अनुभवांच्या वेळी सगळ्या शक्यता पडताळून पाहाव्यात. 

मनुष्य मरण पावल्यावर जी पहिली अवस्था असते त्यातली एक म्हणजे 'वासनाशव'. एखाद्या मनुष्याचा किंवा प्राण्याचा मृत्यू झाला तरीही त्याच्या मेंदूच्या भागात 'धुगधुगी' असते हे आपणही पाहतो. हि धुगधुगी म्हणजेच चेतना एक ऊर्जा असते जी जिवंतपणी त्या मनुष्य / प्राण्याची जीवनउर्जा असते. पण मृत्यूनंतर ती एका क्षणात संपत नाही. उदाहरण द्यायचं तर मनुष्याचं शीर धडावेगळं केलं तरी किमान १५ सेकंद आपल्या आवती भोवती काय चाललंय हे त्याच्या मेंदूला समजतं. अशीच चेतना मृतात्म्यातही असते. जेव्हा ही चेतना जास्त असते तेव्हा मृतात्मा 'जिवंत वासनाशाव' होतो. पण अशी चेतना अत्यंत कमी किंवा जवळपास नसतेच तेव्हा तो मृतात्मा 'मृत वासनाशाव' असतो. ही चेतना प्रामुख्यानं मेंदूत असते. मी वरती वर्णन केलेले अनुभव येणं, एखाद्याच्या मनाचा ताबा घेणं ह्या गोष्टी जिवंत वासनाशवांकडून होतात. कारण तेव्हढी चेतना त्यांच्यात बाकी असते जी त्यांना उद्युक्त करते. यालाच संचार म्हणतात. मृत वासनाशवांकडून झालेले त्रास अजून तरी सिद्ध झालेले नाहीत. काही वेळा देवतांचे गण मनुष्य मनाचा ताबा घेतात आणि माणसाला दुष्कृत्य करायला भाग पाडतात. याला 'गणसंचार' म्हणतात. पण ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. काही वेळा दुष्ट व्यक्ती, तांत्रिक अशांचे मृत्यू झाल्यावर त्यांना पिशाच्च योनि मिळते. याचेही संचार असतात ज्यांना 'पिशाच्चसंचार' म्हणतात. पिशाच्च ही शवभक्षक राक्षसी योनि असून नुकत्याच मरण पावलेल्या वासनाशवातील ऊर्जा पोषक द्रव्यासारखी वापरून ते आपली ऊर्जा वाढवतात.                       

काही लोकांचा गैरसमज असतो कि वास्तू बाधिक आहे म्हणजे ती संपूर्ण जागा / एखादी खोली / एखादा भाग / दरवाजा अशा गोष्टींवर मृतात्म्याचा 'कब्जा' असतो. कब्जा असणं म्हणजे त्या ठिकाणावर मृतात्मे सर्पासारखे वेटोळं घालून बसतात आणि कोणी तिथे गेलं तर ते त्रास देतात असंच काही लोकांना वाटतं. पण सत्य तसं नसतं. मृतात्मे तिथे वावर जरूर करतात पण कोणतीही वस्तू घट्ट धरून बसत नाहीत. एखाद्या व्यक्तीची जिवंतपणी ती आवडती जागा असते, त्या जागेसंबंधी काही तीव्र भावना असतात त्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणाविषयी त्या खूप आक्रमक असतात. मृत्यूनंतर जी अवस्था असते त्यात प्रत्यक्ष काही करता येत नसल्यानं त्या आणखी आक्रमक होऊन दुसरा काही मार्ग नसल्यानं असे काही संकेत देतात, जेणेकरून त्या जागी दुसरं कोणी असलेलं त्यांना आवडलेलं नाही हे दर्शवता येईल. अर्थात त्या जागी त्यांच्याबाबतीत पूर्वी काही वाईट घडलं असेल तर त्यांना याचा संकेतही द्यायचा असतो किंवा त्यांच्यावर जिवंतपणी ज्यांनी अन्याय केला आहे अशा व्यक्ती तिथे आल्या तर मृतात्मे तीव्र भावना व्यक्त करायचा प्रयत्न करतात. पण ह्या सगळ्याला भौतिक जगात खूप मर्यादा असतात.

काही लोकांच्या अनुभवानुसार अशा जागेत त्यांना मृतात्मे 'दिसतात'. म्हणजेच एखादी पांढरी झालर ज्याला मनुष्याचा आकार असू शकतो वगैरे. ही जिवंत वासनाशवं असतात ज्यांना कधीकधी पिशाच्च योनि प्राप्त होते तर कधी इतर कोणती योनि मिळते. पण ही वासनाशवं त्यांच्यात चेतना असल्यानं इकडून तिकडे फिरत असतात आणि कधी कधी दर्शन देतात. रसायनशास्त्र, किमयाशास्त्र आणि पारलौकिक शास्त्र  (पैशाचिक) अशा शास्त्रांत यांचा अभ्यास होतो. बऱ्याचदा असं काही 'दिसलं' तर इतर लोक त्या व्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवतात. पण अनेक कारणांमुळे असं 'दिसणं' शक्य आहे. याचा संपूर्ण अभ्यास केला जायला हवा. हि दिसणारी वासनाशवं किती त्रासदायक आहेत हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं ज्याबद्दल इथे सखोल माहिती देणं शक्य नाही. 

असो, हा विषय इतका सखोल आहे कि एका लेखात सर्व माहिती देणं शक्य नाही. पण ठळक मुद्दे मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही मृतात्मा प्रत्यक्षात काही करू शकत नसल्यानं जी चुकीची माहिती पसरवली जाते त्याला बळी पडू नये. एखादं यंत्र (गॅजेट), कॅमेरा अशा कोणत्याही यंत्रात यांचे फोटो वा व्हिडिओ घेणं (सध्यातरी) अशक्य आहे. प्लँचेट सारखी पद्धत अवलंबताना शेकडो वा हजारो वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला 'बोलावणं' अशक्य आहे. एखाद्या शिकलेल्या व्यक्तीनं अभ्यास करताना मृतात्म्याला त्याच्या मनाचा ताबा घ्यायला परवानगी देऊन एखादी माहिती घेणं शक्य आहे. पण अशा शिकलेल्या व्यक्तींना 'माध्यम' म्हणतात. पूर्ण मार्गदर्शन घेतल्याशिवाय असे प्रयोग करू नयेत. अनिच्छेने कोणी माध्यम झालंच तर ते कमकुवत मानाचं लक्षण असल्यानं कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता मानसिक बल वाढवावं. त्यामुळे अशा गोष्टींतून सहज सुटका होते. काही पारलौकिक शास्त्रातले वा ज्योतिष शास्त्रातले उपाय यासाठी आहेत पण कोणत्याही शास्त्राच्या खूप आहारी जाऊन घाबरून जाऊ नये. मृतात्म्यांच्या अवस्थांना काळाची मर्यादा असते त्यामुळे कोणी आपल्या खूप आधीच्या पिढीतील व्यक्तींबद्दल काही सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर विश्वास ठेवू नये. श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी. 

एकूण आकडेवारी पाहिली तर पारलौकिक घटनांमध्ये २ ते ५ % तथ्य असतं. बाकी निव्वळ गैरसमज, अंधश्रद्धा, मानसिक दौर्बल्य आणि भीती असते हे माझं स्पष्ट मत आहे.  

ह्या विषयाचा अभ्यास करताना अनेक 'बाधिक' जागांबद्दल माहिती मिळाली. भारताबद्दल बोलायचं तर राजस्थान, दिल्ली, पुणे येथील किल्ले / वाडे (भांगरा किल्ला, शनिवारवाडा इ.), मुंबई / ठाणे येथील काही भाग, हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी, अमेरिकेचे व्हाईट हाऊस जिथे अब्राहम लिंकन यांनाही भास होत असत आणि आजही लिंकन यांचा आत्मा तिथे वावरतो असं म्हणतात, जगभरातील अनेक हॉटेलं, युद्धाची ठिकाणं, छळछावण्या, इस्पितळं, जुनी घरं अशा एक ना अनेक वास्तू बाधिक आहेत असं सांगणारे ठामपणे सांगतात. ह्यात तथ्य किती आणि आर्थिक फायद्यासाठी केलेली प्रसिद्धी किती हे वाचकांनी ठरवावं. अशाच एका बाधिक वास्तूबद्दल पुढील लेखात काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

टीप: कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. उलटपक्षी अंधश्रद्धा दूर होण्यासाठी मी हि माहिती देत आहे. जो श्रद्धेचा भाग आहे आणि सुसंगत आहे तेव्हढाच मी मान्य केला आहे. त्यामुळे कृपया कोणत्याही प्रकारचे गैरसमज व अंधश्रद्धा यांना मी स्थान देत नाही आणि देणार नाही याची नोंद घ्यावी.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
    =================================================

The stories of paranormal incidents have become a staple of every culture. Many times we blindly believe such stories quite easily. Whether they are real or fake is a matter of debate. But in our life at least once we have been told such stories. Elderly people have a collection of such tales. Well, many times it only helps to spread misunderstandings or superstitions. One large genre of these tales of paranormal incidents includes the 'haunted houses'. Many people experience some weird things or 'supernaturals' at some locations either for a short period of time or even for years together. Though these experiences can be good or bad, they are testified as 'weird'. Mostly such experiences occur due to flaws in the characteristics of the elements related to the house / place (Vastu dosha) or due to the destined issues in the kundlis of one of the (or more) people staying at that place (Vidhilikhit). In fact the prejudice against the 'haunted' place makes people think irrationally about the incidences occurring there and makes them mentally more and more vulnerable. I feel in such cases we need a great deal of investigation and if no scientific or astrological or logical explanation can decipher the events, then it can be stated that the place is 'haunted'. Many times people are not able to comprehend the effects of the karmas / deeds in the past or relate life with practical or astrological issues. Due to this the otherwise destined events in life are simply labelled as 'paranormal experiences'. In the main such allegations are common because it is really byzantine to prove either way i.e. whether supernaturals exist or do not exist. Firstly there is no complete unanimity on the study of supernaturals. Secondly it is not possible to 'prove' these events as paranormal by using normal criteria. So the victims who are already troubled tend to easily believe the allegations of paranormal events. Even if this affirmation is accepted per se, it has one more point at issue. When such paranormal activities occur actually they could be related to the possession of a person by some entities rather than the haunting of that place. Individually a person can be possessed by some entities or ghosts in common terms. Coincidentally when such a possessed person experiences the effects while staying at a particular place, that place is wrongly assumed as haunted. A detailed fact - finding is necessary in such cases. Because usually such weird events do not occur after the possessed person leaves the place, but due to the strong prejudice the defamed place is blamed for any tragedy or even destined problems by the residents in future. In my opinion such experiences should be thoroughly investigated without getting into the clutches of superstitions or emotions. Rather than blindly accepting the professed avouches or so called proofs one should consider the witnessed events and logical evidences to come to any conclusion.    

Now what really happens when a house or a place becomes 'haunted'? Well, Indian Vastu Shastra has not accepted the concept of haunting of a place. According to the ancient Indian texts, calling a place haunted is nothing but a stereotypical viewpoint. Though this theory is plausible and widely accepted, I can not deny any other possibility which can emerge in research works in future. I do agree that there are many unexplored things in the world, so from my point of view it can be proved in the future that a place can get haunted. Anyway there is a lack of agreement among the scholars on this point. Here I am trying to present my opinions on this topic based on my study and observations. I understand that every reader might not agree to my views. 

In simple words, a place is haunted when some insatiable entities (souls) from various yonis exist at the place and create mental issues to the people staying there, which results in some 'weird' events in their materialistic life. Sometimes it happens naturally and sometimes expert Tantriks control these souls and procure various activities. Possibly these entities can not show their powers beyond the vicinity of the property. Thus the place comes under the control of these souls and (indirectly) gets 'haunted'. Paranormal science is such a vast science that only a fully knowledgeable person can verify the situation. The difficulties resulting due to haunting of a place depend on many parameters like the yoni (power) of the soul, reason behind discontent, the reason and way of death, time passed after death, there is one soul existing or more etc. There is a time limit to every stage of progress for the souls. Thus if any such entity is existing it is obvious that the person has died in the recent past. I don't agree with the averments that the ancestors or unrelated people who died hundreds or thousands of years back are haunting the place. It is possible though that the soul of a recently died person can create some troubles. In such cases the soul can take full control of a person with a weaker mind (possession), which is the most common type of haunting. The point to be noted is all the powers of the soul depend on the intensity of the emotions when the person was alive and the acquired yoni at that stage. When the soul is in the stage of any yoni, it can not 'perform' or do any acts interfering with the mundane life of others. Thus when a place is haunted it is mostly due to the mental possession of the weak minded person or aggressive behaviour of that person resulting in catastrophic events. Some victims bear evidences of having weird dreams or seeing a particular spirit in their dreams when they sleep in allegedly haunted places. They claim that they don't know the person in their dreams in real life. The main reason behind this is it is easier to capture one's subconscious mind when the person is in deep sleep. Well it also works the other way round. When a normal person in a normal place sleeps with legs curled towards torsos (side sleepers) gets weird dreams due to obstacles in the digestive process. So it is very important to analyse all the factors before jumping onto any conclusion regarding paranormal events.  

In the life after death one of the first stages acquired by the human soul is the 'shell'. When a human being or an animal dies, there lies a meager energy, especially in the part of the brain. This is the remnant of the driving force (energy) of life i.e. consciousness. But it doesn't vanish completely after death. For example when a human being is beheaded the brain still refuses to die for at least 15 seconds and can understand what is happening around. Similar energy is present in the shells of the deads in the afterlife. When this energy is significant the shell becomes a 'living shell'. But when negligible or almost none of this energy remains the shell becomes a 'dead shell'. This energy exists in the brain of any animal or human being. The possession of a living person's mind or weird experiences etc which I mentioned above are all due to living shells. Because the energy in the shells can drive them. This is the basic concept of 'possession' (sanchar). It is still not proved that such things can be done by dead shells. Sometimes the Ganas ( a certain group of souls who have become close to a deity by pure devotion) of the deities possess the mind of a weaker person and create similar troubles. This is known as the possession by Ganas (Ganasanchar).  Well this happens rarely though. Mostly wicked people, Tantriks enter the yoni of Pishach i.e. Ghost, one of the demonic spirits. Their possessions are common and are known as Ghost possessions (Pishachsanchar). Pishach is a yoni of demonic spirits which ghoul - like feeds upon the waning vital substance which lingers on in the newly dead. 

There is a widespread misunderstanding that if a place / house is haunted it means it's some part / room/ door/ complete house is possessed by the demonic spirits. They wrongly interpret the term possession as presence of these ghoul like spirits on the place just like coiled snakes and attack anyone who enters that place. But this is not the reality. The souls do wander at such places due to various reasons but do not catch hold of or capture any solid material. These souls become aggressive at certain places which was their favourite place when they were alive or they have some strong memories about that place (not necessarily the complete house). In the afterlife the souls can't act or perform anything as such, so they become more aggressive and try to express themselves in indirect ways. Sometimes it merely shows their unwillingness for the presence of others in 'their' favourite places. Of course sometimes they also try to give a hint about the injustice that occurred at the place or when the tyrant happens to be at that place they become more aggressive due to the victimization in the past. But expressing all these emotions to the people from the mundane world is not an easy task for the souls as there are limitations of the boundaries between the two 'worlds'.  

According to some victims they have 'seen' the ghosts or evil spirits. They describe it as a very thin white fimbria with a humanoid shape. These are mostly living shells which sometimes get the Pishach yoni or sometimes any other yoni. As these living shells have a bit of vitality or energy they aimlessly wander here and there. Sometimes they pay a visit and are visible to some people and sometimes they just go unnoticed. Many scientists from Chemistry, Alchemy and paranormal sciences (including science of spirits) are diligently researching this topic. Most of the times when people claim to have 'seen' the spirits they are considered as psychologically disturbed. But it is quite possible to 'see' the spirits in the physical world. This subject should be studied in detail. These visible shells do have some powers but it is impossible to give all the information here.   

Well, this topic is so vast that it is not possible to mention every detail in a single article. I have tried to mention the important points here. As I mentioned earlier no soul can 'perform' any act by its own in this mundane world, so I request the readers not to fall prey to any rumours or wrong information spread about the acts of a spirit without proper information. It is not possible (at least today) to film or take a photograph of these spirits by any gadget. In methods like planchet it is not possible to invite the soul of a person who has died hundreds or thousands years back. A trained research student can allow the spirits to capture his mind (possess) and get some information using his skills. Such a person is known as a 'medium'. But such experiments should be strictly performed under proper guidance. If unwillingly a person becomes a medium i.e. gets possessed, then it is a sign of a weak mind. In such cases one should become mentally strong rather than falling victim to the superstitions. This will help to easily get rid of the troubles. There are some remedies in paranormal sciences or astrology, but one should not get scared and follow the remedies blindly. The stages in the progress of the souls have time limits, so one  should not believe about the presence of the spirits of their ancestors who have died many years or decades back. We should have faith in this science but we should avoid superstitions or ostentation. 

The statistics of these paranormal events suggests that only 2 to 5% claims are real. I frankly opine that the others are mere misunderstandings, superstitions, mental weakness and fears. 

While studying the 'haunted houses' I learnt about many places around the world which are (allegedly) haunted. Talking about India there are many haunted places (and forts) in cities / states like Rajasthan, Delhi, Mumbai, Thane, Pune (Bhangrah fort, Shaniwar wada etc), Ramoji Film city in Hyderabad etc. In the USA the White House is supposed to be haunted and even president Abraham Lincoln claimed to have experienced supernaturals. After his assassination a few presidents and staff of the White house have claimed to have seen Lincon's soul in the office or his room. Numerous hotels, hospitals, old palaces / mansions, torture chambers, war places around the world are 'haunted' according to many people. Now its up to the readers to judge whether these claims are real or fake, created just for the financial gains. I will put my thoughts on one of the famous haunted places, in my next article. 

Note: This article is not intended to encourage any kind of superstition. In fact I have written this article to stop the spreading of misleading hearsay. I have only accepted the facts which are coherent and related to faith. I request the readers to please note that I do not and will not entertain any superstitious or misleading information.

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

     ===============================================