Tuesday 29 October 2019

ग़ज़लकारांची व्यक्तिमत्वं (Shayars' Personalities)


          

ग़ज़ल हा काव्यप्रकार आपल्याकडे सर्वांनाच माहित आहे. फाळणी आधीच्या हिंदुस्थानात अनेक नामवंत गज़लकार होऊन गेले, त्यामुळे आपल्याकडे ह्याची लोकप्रियता आधीपासूनच होती. पण ग़ज़ल ही काव्यलेखनाची पद्धत खूप आधी ७व्या शतकात अस्तित्वात आली. दक्षिण आशियात अंदाजे १२ व्या शतकात आली. इस्लाम धर्माच्या जन्माआधी अरब देशांमध्ये 'क़सीदा' लिहिला जात असे. एखाद्या मोठ्या सम्राटाची किंवा प्रसिद्ध, धनाढ्य व्यक्तीची स्तुती हा त्याचा मुख्य उद्देश. ह्या क़सीदाच्या पहिल्या ओळींत उदासवाणे किंवा प्रणयवादाचे भाव येऊ लागले तेव्हा त्याला 'नसीब' म्हणू लागले. अत्यंत अलंकारीक भाषा आणि अत्युच्च शैलीतील हे लिखाण जेव्हा छोट्या कवितांमध्ये रूपांतरीत झालं तेव्हा त्याची ग़ज़ल झाली.    

त्यात काळानुरूप अनेक बदल होऊन ग़ज़ल हा काव्य प्रकार लोकप्रिय होऊ लागला. ओमय्याद खलिफांच्या काळात ६व्या शतकाच्या उत्तरार्धात ग़ज़लेनं स्वतःचं असं रूप घेतलं. ग़ज़ल ही काही 'शेर' यांची मिळून एक कविता असते. शेर दोन ओळींचा असतो. मग ह्या कवितेत मतला, रदीफ़, बहर, काफ़िया आणि मक़्ता हे नियम पाळले गेले आहेत की नाही ते पाहिलं जातं. ह्या नियमांत गज़लेचं वृत्त, यमक, शेर आणि त्यांचे अर्थ, ग़ज़लेची मूळ कल्पना, शेवट आणि शायराचं नाव (टोपण नाव) या सर्वांचा विचार केला जातो. बहर म्हणजे ग़ज़लेचा छंद, इंग्रजीत मीटर. अशा नियमांत बसणारा हा काव्य प्रकार कठीण असला त्यातील गर्भितार्थ, सुंदर उपमा आणि प्रेमाची उत्कट आणि उच्च कल्पना यामुळे लोकप्रिय होऊ लागला. ग़ज़ल हा शब्द मूळ अरेबिक भाषेत उच्चारताना टाळू आणि जिभेचा वापर करून उच्चारला जातो. याचा शाब्दिक अर्थ प्रेयसीशी केलेला संवाद असा आहे. या संकल्पनेत मुख्यतः विरह, प्रियकराशी कधीच एकरूप होऊ न शकणारी प्रेयसी, मदिरेच्या आधारे हे दुःख विसरण्याचा प्रयत्न अशा विषयांचा जास्त वापर केला गेला. अर्थात यात अनेक बदलही झाले, पण तो मुळातला गोडवा नवीन कल्पना आणि उपमा यात नाही आला.     
        
इंग्रजी Gazelle  म्हणजेच काळवीट. या शब्दाच्या साधर्म्यामुळे काळवीटाचा ग़ज़ल या नावाशी काही संबंध असावा असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मूळ ग़ज़ल या शब्दाचा शाब्दिक अर्थ तसा नाही. मध्यंतरी वाचनात आलं की, १९७३ साली पाकिस्तानी शायर अहमद अली यांनी An Anthology of Urdu Poetry या त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला. क़सीदाच्या पहिल्या पंक्ती म्हणजेच 'तगाझ्झुल' यात या नावाचं मूळ आहे असं त्यांचं मत. जेव्हा शिकारी प्राण्यांनी घेरलेल्या काळवीटाला आपण आता वाचणार नाही आणि किती एकटे पडलोय हे समजतं तेव्हाच्या त्याच्या आर्त, केविलवाण्या रडण्याची तुलना त्यांनी  ग़ज़लेच्या अर्थाशी केली. इतका ग़ज़ल हा खोल अर्थाचा काव्य प्रकार आहे. वरवरच्या उथळ भावनांना गज़ल लेखनात स्थान नाही.
                
महाराष्ट्रात मात्र ग़ज़ल ऐकणं किंवा वाचणं हे थोडं मर्यादित आहे. काही नामांकित शायर आणि चित्रपटात वापरल्या गेलेल्या काही ओळी एव्हढंच याबद्दलचं ज्ञान सीमित आहे. काही रसिक ग़ज़ल गायनाच्या कार्यक्रमांना, चर्चांना आस्थेनं हजेरी लावतात. ह्या क्षेत्राशी संबंधित आणि काही रसिक व्यक्ती सोडल्या तर बहुतेक तरुण पिढी ब्लॉग्स आणि इंटरनेट च्या माध्यमातून ज्या 'भावनाशील' ओळी पाठवल्या जातात त्यावर समाधानी आहे. पण मूळ ग़ज़ल ही ह्यापेक्षा खूप खोल, गूढ आणि अनेक भावना, शब्द, रंगांनी नटलेली असते. सुफ़ी, पर्शिअन व तुर्की  ग़ज़लकार तसंच भारतीय आमिर खुसरो यांच्यासारखे दिग्गज शायर ज्यांनी 'हिंदवी' भाषेत अनेक कव्वाली लिहिल्या. पण असं वाचन कमी होत चाललंय. शायर ए आझम मिर्झा ग़ालिब यांच्या  ग़ज़ल सर्वश्रुत आहेत. पण त्यांच्या प्रसिद्ध ग़ज़लांखेरीज अनेक  ग़ज़ल, नझ्म, सुंदर पत्रं उपलब्ध आहेत. 

त्याचबरोबर शेख़ इब्राहिम ज़ौक़, शेवटचे मुघल बादशाह बहादुर शाह जफ़र, दाग़ देहलवी, मीर, मोमिन ख़ान मोमिन, ख़्वाजा मीर 'दर्द', नज़ीर अक़बराबादी अगदी १८/१९ व्या शतकातील हास्य कवी ग़ज़लकार अक़बर इलाहाबादी, शायरा परवीन शाकिर, अहमद फ़राज यांसारख्या अनेक शायरांचं ग़ज़ल लेखनात मोलाचं योगदान आहे.    

शायर ए आझम मिर्झा ग़ालिब यांच्या थोडं आधी ज़ौक़ यांचा ग़ज़ल प्रवास सुरु झाला, या दोहोंत अहमहमिकाही होती. दोघांची लेखनाची जातकुळी वेगळी आणि मिर्झा ग़ालिब यांच्या शब्दसंग्रह आणि उपमांना तोड नव्हती. पण त्यामुळे ज़ौक़ काही कमी ठरले नाहीत.    
    
शायरांची माहिती वाचताना एक छान गोष्ट नजरेत आली. बरेचसे शायर हे केवळ शायरीचे अभ्यासक नव्हते तर अनेक विषयात पारंगत होते. मिर्झा ग़ालिब यांना त्यांच्या गुरूने भाषांबरोबरच तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र याचेही धडे दिले होते. मोमिन हे उत्तम वैद्य होते त्यामुळे त्यांना हक़ीम ख़ान म्हणत, तसंच त्यांना गणित, ज्योतिषशास्त्र, संगीत, भौगोलिक शास्त्र आणि बुद्धिबळ याचं उत्तम ज्ञान होतं. बहादुर शाह जफ़र हे तर मुघल बादशाहच होते. कर्मठ मुघल बादशाह औरंगजेब यांची कन्या ज़ैबुन्निसा ही अनेक शास्त्रात पारंगत होती. सूफी काव्य, काही ग़ज़ल याचबरोबर अनेक काव्यग्रंथाचं लिखाण तिनं केलं. सौन्दर्य आणि बुद्धिमत्तेची खाण असलेली ही राजकन्या कुराण, पर्शिअन, उर्दू, अरेबिक भाषांची जाणकार होतीच पण त्या काळातील सर्वोत्तम गायिका होती असं म्हटलं जातं. खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, कॅलिग्राफी आणि साहित्य यांची अभ्यासक असलेली अशी ही बुद्धिमान कवियत्री होती. दाग़ देहलवींनी कॅलिग्राफी आणि घोडेस्वारी याचं प्रशिक्षण घेतलं होतं. आमीर खुसरो यांना गूढशास्त्र आणि अध्यात्म यांची उत्तम जाण होती.     

मला वाटतं उत्तम लिखाण करण्यासाठी अनेक विषयांची माहिती लागते. अन्यथा कल्पना करणं सीमित होऊन जाईल. म्हणूनच असे सर्वांगाने अभ्यास करणारे लेखक, कवी यांच्या लिखाणात सर्वंकष विचार झालेला दिसतो. केवळ आपल्याच क्षेत्राचा अभ्यास करणारे काही कमी आहेत असं मुळीच नाही. पण चौफेर वाचन, अभ्यास याचं प्रतिबिंब लिखाणात उतरतंच. 

मी एक ज्योतिषी असल्यानं ह्या सर्व कलावंतांचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अभ्यास केला. त्याबद्दल मी नंतरच्या लेखांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.         

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

       =============================================

Ghazal is a poetic expression which is well known in India. There were many exquisite Ghazal writers in Hindustan even from before partition, which already lead to the popularity of this form of poetry. Practically speaking Ghazal writing came to existence much earlier like before 7th century. It bloomed in southern Asia in almost 12th century. Before the birth of Islam in Arab countries they used to write 'Qasida' a then well known poetic form. Thematically Qasidas were panegyric for a ruler, lampoons and moral maxims. It was mostly a panegyric poem to praise an emperor or iconic figure at that time. When Qasida's opening prelude was nostalgic or romantic it was known as 'Nasib'. When this stylish and highly ornamental Nasib transformed to shorter poems and standalone mode, it was known as a Ghazal.

With time Ghazal has changed in many different forms and became very popular. Near the end of 6th century in the period of Umayyad Caliphate, Ghazal took it's own shape. In short Ghazal is a poetry of a few Sher(s). A Sher is made up of two lines. Then the Ghazal should follow rules like Matlaa, Radif, Beher, Qaafiyaa and Maqtaa. These rules take care of the rhyme, shers and their meaning, theme, ending and pen name of the shayar etc. For example Beher is the meter of the poem. Though this kind of  poetry seems very difficult due to the rules, it's connotation, beautiful similes, ardent and epic imaginations made it highly popular. Ghazal is an Arabic word which has a very soft pronunciation using tongue and soft palate. The literal meaning of Ghazal is a sweet talk to display amorous gestures. The concept of Ghazal mainly includes nostalgic emotions like separation, broken love, leaving behind thoughts of love with the help of liquor etc. Nonetheless there were changes in the themes in future, but in my opinion these new themes or similes are lacking the sweetness of the original theme of Ghazal.  

A slender antelope is known as Gazelle in English. That is why many people think that meaning of Ghazal is near to Gazelle, which is not the case. In between I read somewhere that in 1973 a Pakistani shayar Ahmed Ali mentioned this point in his well known book 'An Anthology of Urdu Poetry'. He said the meaning of Ghazal has it's root in the opening verses of Qasida i.e. 'Taghazzul'. According to him, when a Gazelle is wounded and cornered by predators it comes to know how lonely and vulnerable it is. An appalling and agonized cry of that Gazelle can describe the depth of the Ghazal. So Ghazal is a very deep form of poetry. Superficial emotions or shallow ideas have no place in Ghazal writing whatsoever. 

Sadly in Maharashtra, Ghazal writing or even listening is very much limited. This knowledge is restricted to some famous shayars and their verses used in films. Some connoisseurs do attend programmes like Ghazal singing or listening and discussions. Apart from these and some people related to this industry, most of the young generation is satisfied with the common 'emotional' verses found on internet or blogs. But original Ghazal is full of depth, emotions, words and colours. Sufi, Persian and Turkmen even Indian legends like Amir Khusrow have composed fabulous Qawwalis in 'Hindavi' language. Such readers are diminishing now. Many Ghazals by Shayar-E-Azam Mirza Ghalib are well known. On the contrary, apart from his Ghazals a treasure like his letters, Nazms and Ghazals different from his famous ones are available.   
Along with Ghalib, Sheikh Ibrahim Zauq, the last Mughal emperor Badshah Bahadur Shah Zafar, Daagh Dehelvi, Meer, Momin Khan Momin, Khwaja Meer 'Dard', Nazeer Akbarabadi, recent shayars and poet of humour like Akbar Allahabadi, shayara Parveen Shakir, Ahmed Faraz etc. have a great contribution in Ghazal writing. 

Zauq started his journey as a shayar just before Mirza Ghalib, in fact they were competitors. Both had a different style of writing but Ghalib's vocabulary and skill in simile had no comparison whatsoever. But this doesn't mean that Zauq was any less.   

While reading about these legendary shayars an interesting thing came up. Most of these shayars were not only the masters of shayari but they were versatile personalities too. Mirza Ghalib was not only a scholar of Urdu but was also versed in many languages, philosophy and logic. Momin was a very good doctor, so he was well known as Hakim Khan. Along with medicine he had a vast knowledge of mathematics, astrology, music, geomancy and chess. Bahadur Shah Zafar was an emperor himself. 

Zeb-un-Nissa, the daughter of a precisian emperor Aurangzeb, was a scholar in various fields. Along with Sufi poetry and Ghazal writing, she wrote many books of poetry.  A symbol of beauty and brains, princess Zeb-un-Nissa was born with high intellect and was not only a master in Quran, Persian, Urdu and Arabic languages but was also one of the best female singers at that time. She was a highly accomplished scholar with a vast knowledge in astronomy, philosophy, mathematics, calligraphy and literature. Daag Dehelvi was a scholar in calligraphy and horse riding. Legendary Amir Khusrow was a mystic and a highly spiritual person. 

I think a person should have a good general knowledge and information in various fields to produce the best of his/her writing. This is the reason why the writers or poets who are well versed in various fields write using their broad views. There are in fact good writers or poets with one sided study. But a widespread or ubiquitous study will definitely reflect in the writing.  

Being an astrologer I tried to study these artists from astrological point of view. I will write about my observations in my next article. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

      ===========================================================

Saturday 19 October 2019

उत्स्फूर्त मानवी दहन-ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोन (Spontaneous Human Combustion-Astrological point of view)


उत्स्फूर्त मानवी दहन याविषयी मागील लेखात मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मतं मांडली होती. आता ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या याबद्दल काय मतं मांडता येतील ते पाहू. 

उत्स्फूर्त मानवी दहन म्हणजेच मानवी शरीराचं अचानक पेट घेऊन जळून राख होणं. यामुळे बहुधा मृत्यू येतोच. म्हणूनच अष्टम स्थान म्हणजेच मृत्यू स्थान मला खूप महत्त्वाचं वाटतं. अष्टम स्थानाचा भावचलित कुंडलीतून झालेला विचार, अष्टमेश आणि त्यावर असलेली ग्रहांची दृष्टी, महादशा व आंतर्दशा हे मुद्दे येथे महत्त्वाचे ठरतात. मी मागे नमूद केल्यानुसार मृत्यू हा अचानक नसतोच. ते विधिलिखित आहे ज्याला आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे आधी व्यक्तीचं आयुर्मान आणि त्याच्या मृत्यूचं कारण ह्याचा अभ्यास गरजेचा आहे. अष्टमस्थान जर अचानक आणि अग्नीशी संबंधित असलेला मृत्यू देत असेल तर या घटनेकडे पाहता येईल. पण अग्नीमुळे घडणारे मृत्यू इतर अनेक कारणांमुळे घडू शकतात. मग उत्स्फूर्त मानवी दहन हेच कारण का असावं? शरीराचा कोणताही भाग कोणत्याही दृश्य कारणाशिवाय जळणं हा एक दुर्मिळ असा योग आहे. मृत्यूचं कारण कुंडलीवरून अभ्यासताना त्याचा स्रोत काय आहे हेही अभ्यासलं जातं. पण उत्स्फूर्त मानवी दहन अजून कोणत्याही विशेष श्रेणीमध्ये येत नसल्यानं याचं निदान करणं कठीण आहे. मग याच्या खोलात जाऊन विचार केल्यास काही मुद्दे समोर येतात.            

उत्स्फूर्त मानवी दहनात मानवी शरीराचा काही भाग किंवा पूर्ण शरीर जळून भस्म होतं. अग्नी, रक्त, पेशी व त्यातील प्रक्रिया यावर मुख्य अंमल असतो तो मंगळाचा. त्यामुळे अशा लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आता मंगळ ग्रह अनेक गोष्टींचा कारक असल्यानं यातील मानवी दहन आणि इतर कारणं यात फरक कसा करणार? तर निचीचा मंगळ, त्यावर रवि सारख्या उग्र आणि जलद ग्रहाची दृष्टी तसंच मंगळाचा अष्टम स्थानाशी संबंध हा भाग अभ्यास करण्याजोगा आहे. उत्स्फूर्त मानवी दहन ही तीव्र आणि लवकर घडणारी घटना असल्यानं जलद गति ग्रहांचा संबंध जलद गति असणाऱ्या मंगळाशी आला पाहिजे. तसंच अष्टम भाव, मंगळ किंवा अशाच तीव्र ग्रहाच्या नवमांशात असायला हवा. मंगळाचा शनिशी संबंध असू शकेल पण एकटा शनि ह्यात कारण ठरू शकणार नाही.   

'अचानक' घडणाऱ्या गोष्टींचा संबंध प्लूटो या ग्रहाशी नक्कीच येतो. यासाठी प्लूटो ग्रहाची थोडी माहिती घेऊ. हर्षल, नेपच्यून व प्लूटो हे ज्योतिष शास्त्रात ब्रह्मा, विष्णू आणि महेश समजले जातात. कारण हे तीनही ग्रह ह्या ऊर्जा आहेत. त्यांना स्वतःचं असं कारकत्व नसून ते केवळ ऊर्जा देतात. प्लूटोचा विचार करता तो शिव शंकराचं प्रतीक आहे. आणि शंकर हा विनाशकारी आहे. म्हणूनच संपूर्ण विनाश हा शिवाच्या आशिर्वादाशिवाय घडत नाही. यावर तपशीलवार माहिती मी नंतर देईनच पण उत्स्फूर्त मानवी दहन ही कमी वेळात होणारी तीव्र अशी प्रक्रिया असल्यानं त्यात प्लूटो या ग्रहाचा संबंध येणार हे माझं मत आहे. मंगळामुळे शारीरिक प्रक्रिया घडल्या तरी त्याला तीव्र स्वरूप देऊन शरीराचं भस्म करणं यात प्लूटोचा सहभाग निश्चितच आहे. म्हणूनच अशा व्यक्तींच्या कुंडलीत प्लूटो आणि मंगळ यांची एकमेकांवर दृष्टी किंवा युती असणं निश्चित असावं. मी मागील लेखात नमूद केल्यानुसार शारीरिक उष्मा प्रमाणाबाहेर गेला तरच हाडांची राख होऊ शकते. इतक्या पातळीवर केवळ कोणत्याही बाह्य प्रज्वलना शिवाय मंगळ ग्रहामुळे जाणं अशक्य आहे. म्हणूनच प्लूटो सारख्या स्फोटक ग्रहाची साथ असणं अनिवार्य आहे. 

या दोन ग्रहांखेरीज शनि, राहू आणि केतू हे ग्रह तेव्हढीच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याशिवाय अशी दुर्मिळ घटना घडू शकत नाही. शनि मुख्यतः अग्नी, गुदमरणं, भाजणं, हाडांची दुखणी अशा कारणांमुळे मृत्यू देतो. मात्र लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे शनिमुळे तात्काळ मृत्यू येण्यापेक्षा प्रदीर्घ आजार, एकटेपणा मुळे झालेले त्रास अशा प्रकारे मृत्यू संभवतो. म्हणून उत्स्फूर्त मानवी दहनात शनि एकटा कारण नसून त्याचे राहू किंवा केतूशी झालेले कुयोग, मंगळाशी असलेले कुयोग वा दृष्टी आणि अष्टम स्थानाशी असलेला योग ह्या सर्वांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. अचानक मृत्यू हे केतूचं एक वाईट फळ आहे. त्यामुळे शनि बरोबर राहू आणि केतूचा संयोग तेव्हढाच महत्त्वाचा आहे.    

या सर्वाचं तात्पर्य असं आहे की मंगळ, रवि, प्लूटो, शनि, राहू आणि केतू या सर्वच ग्रहांचा एकमेकांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आलेला वाईट योग घडवून आणणारा संबंध असेल, त्याच वेळी मृत्यूला पोषक अशी महादशा आणि अंतर्दशा असेल आणि गोचरीतही हे ग्रह तसेच वाईट योग करत असतील तर या सर्वांच्या मिलाफामुळेच असा पट्कन मृत्यू येऊ शकेल. इतके सगळे योग कुंडलीत एकत्र येणं हा इतका दुर्मिळ योग आहे की उत्स्फूर्त मानवी दहन हे मृत्यूचं अतिदुर्मिळ कारण आहे यात शंकाच नाही.   

मी मागील लेखात लिहिल्याप्रमाणे अशा मृत्यूंची ठोस उदाहरणं खूपच कमी आहेत. त्यामुळे उत्स्फूर्त मानवी दहन ही मान्य झालेली प्रक्रिया आहे असं गृहीत धरूनच मी वरील विवेचन केलं आहे. नवीन संशोधनानंतर यात अनेक बदल घडू शकतील. मी स्वतः ही प्रक्रिया पूर्णपणे स्वीकारली नसली तरी एक अभ्यासक म्हणून मी हे विचार मांडले आहेत. कोणत्याही वेळी यातील झालेले बदल मी पूर्णपणे स्वीकारून माझं विवेचन बदलू शकते. इतके कमी पुरावे असतानाही मी केवळ एक उत्सुकता म्हणूनच या वेगळ्या विषयाचा अभ्यास केला आहे. विशेषतः भारतात उत्स्फूर्त मानवी दहन हा विषय फार कमी लोकांना ठाऊक असल्याने त्याची माहिती वाचकांना मिळावी हा माझा उद्देश आहे. त्यामुळे या विवेचनातील कोणताही मुद्दा ठोस ज्योतिष शास्त्रीय मुद्दा म्हणून निदान आत्ता तरी वाचकांनी गृहीत धरू नये.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

       =============================================

I put my thoughts on Spontaneous Human Combustion (SHC) in my previous article from scientific point of view. Now lets see if we can understand this from astrological point of view. 

SHC is a process where human body suddenly gets burnt to ashes, without any external source of ignition. Mostly this devours the victim's body with gusto. Therefore I feel the eighth house in the kundli is the most important house to be studied. The eighth house, it's position in the bhavachalit kundli, eighth house lord and planets aspecting the eigth house or it's lord, mahadasha and antardasha are some of the important aspects here. As I mentioned in one of my earlier article, death is never unexpected. It is always destined but we are not aware of our destiny. Ergo astrologers need to study a person's life span as well as the reason for the person's death. First of all if the eighth house exhibits any signs of sudden and fire related death, then SHC can be taken into account. Nonetheless, fire related deaths can occur in various forms. Then how can one predict SHC as the exact reason for death? Burning a whole or part of human body to ashes is a very rare yog. Studying the reason behind death from kundli will also shed light on the source of death. But SHC is still not categorized, so it's prediction becomes a back-breaking calculation. By profound thinking some points can be observed.    

In SHC some part or complete human body gets burnt into ashes. The planet Mars precisely governs fire, blood, blood cells and the processes on cellular level. So I feel Mars will have a very important role in the horoscopes of victims of SHC. Mars governs a lot of things in human life so how to differentiate between other things under Mars and SHC? Then debilitated Mars, a fierce and fast planet like Sun aspecting Mars and the position of Mars with respect to the eighth house should be the important points to be studied. As SHC is allegedly a fast process fast moving malefic planets should have a malefic yog with fast moving Mars. The eighth house should be in the navamansha of malefic or fierce planets like Mars. Saturn along with Mars can definitely play a role here but Saturn alone can not harm a human being to such level.

When unexpected or abrupt things take place then Pluto is a planet to be considered with a balanced view. Lets get some information about Pluto. Uranus, Neptune and Pluto are considered as Brahma, Vishnu and Mahesh in vedic astrology. Because this trio is a form of energy. They provide energy rather than ruling some materialistic things in human life. Pluto is supposed to be the form of Lord Shiv. Lord Shiv is a destroyer as we all know. So destruction is always ruled or due to the blessing of Lord Shiv. I will definitely elucidate this concept later on but as SHC is a fast and destroying process, I feel it is definitely related to Pluto. Mars can lead to the processes in the human blood cells but to make the output so drastic is a work of Pluto. Therefore the victims of SHC are most likely to have Pluto and Mars aspecting each another in some or the other way in their horoscopes. As I mentioned in my previous article, if the heat generated by human body goes beyond limits then only it can burn the bones to ashes. This seems very unlikely with only malefic Mars without any external source of ignition. Thus Mars imperatively have a concomitance from the fierce planet Pluto.    

Apart from these two planets Saturn, Rahu and Ketu must be playing vitally important roles, without which such rare incidences will be unobtainable. Saturn in broad terms gives a prolonged death by fire, suffocation, burns or bone problems. A pondering point here is that Saturn usually gives a prolonged death or a death in loneliness rather than a quick death like in SHC. So Saturn can not be the only reason for occurrence of SHC. Saturn's malefic yogas with Mars, Rahu or Ketu, aspecting of Mars or it's malefic yogas with eighth house etc. all such points should be studied in detail in the context of SHC. Though unexpected death can be the result of very much malefic Ketu, along with this it's position and yogas with Saturn are equally important.  

Finally the gist of this is if all these malefic planets like Mars, Sun, Pluto, Saturn, Rahu and Ketu form malefic yogas directly or indirectly, at the same time bad mahadasha or antardasha are running and the horary planets are equally malefic then only it can result in such a horrific death. Now simultaneously having all these malefic yogas in a horoscope is such an exceptional thing that no wonder SHC is the rarest cause of death. 

As I mentioned in my previous article that there are very few cognizable cases of SHC. So please note that I have written this article by taking it granted that SHC is a scientifically accepted process. My opinions on this can change after some new discoveries in future. Though personally I haven't accepted this process completely, as a analyst I have put my thoughts with an open mind. At any given time I can accept new theories and change my interpretations. In spite of scarce evidences I wrote this article on this different topic merely out of curiosity. Also my pure intention is to  increase the awareness of this subject especially in India. Inasmuch as more study is needed to come to any conclusion, I request the readers not to consider any point as a full proof explanation of SHC.    
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com

       ============================================================

Saturday 12 October 2019

उत्स्फूर्त मानवी दहन- एक वैज्ञानिक  दृष्टिकोन (Spontaneous Human Combustion- A scientific view)  

   


Spontaneous Human Combustion (SHC) याला मराठीत वैज्ञानिक प्रतिशब्द मला सापडला नसला तरी त्याचं योग्य भाषांतर करून आपण 'उत्स्फूर्त मानवी दहन' असं म्हणूया. अनेक शतकांपासून कथितरित्या उत्स्फूर्त मानवी दहनाचे अनेक दावे केले गेले आहेत, तरीही ही घटना एक गूढ आणि अज्ञात म्हणूनच पहिली जाते. जरी अनेक वेळा ही घटना घडल्याचं लोक सांगत आले आहेत आणि अनेकांनी यावर संशोधनही केलं आहे तरी उत्स्फूर्त मानवी दहनाला एक नैसर्गिक घटना म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी मान्यता दिलेली नाही. आता हे उत्स्फूर्त मानवी दहन म्हणजे नक्की काय? तर व्याख्येनुसार कोणत्याही सदृश्य ज्वलनाच्या स्त्रोताशिवाय मनुष्य देहाचं (जिवंत अथवा नुकतेच मृत) होणारे दहन. बहुतांशी यात शरीराचा एखादा भाग जळून राख होतो पण क्वचित संपूर्ण शरीर जळून भस्म होतं. ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याने शोधकर्ता अजूनही या संभ्रमात आहेत की ही घटना नेमकी कोणत्या श्रेणीत असावी आणि याचे वैज्ञानिक निकष काय असावेत. असो, काही प्रमाणित संदर्भ आणि माझं ज्योतिष शास्त्र आणि विज्ञान याचं ज्ञान यांची सांगड घालून मी उत्स्फूर्त मानवी दहनाची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत आहे.          

प्रथम मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्स्फूर्त मानवी दहनावर अनेक गृहीतकं आहेत पण माझ्या मते त्यातील एकही सिद्धांत सर्वांगाने याचं स्पष्टीकरण देत नाही.    

ती गृहीतकं पुढील प्रमाणे आहेत. काही तज्ज्ञांचे जे सिद्धांत आहेत त्यात उत्स्फूर्त मानवी दहनाची कारणं दिली आहेत. उदा: बाह्य प्रज्वलन घटक म्हणजे मेणबत्त्या, सिगारेट, भाजणे इत्यादी जे ज्वलनाला पोषक ठरतात. शरीरावरील जखमा वा भाजल्यामुळे त्वचेखालील चरबी बाहेर पडते ती दिव्यातील वातीप्रमाणे काम करते आणि ज्वलनाला सहाय्य करते (wick effect). शरीरातील प्रथिनेही जळतात (चरबी पेक्षा कमी) परंतु शरीरातील पाण्यामुळे त्यांच्या ज्वलन प्रक्रियेत अडथळे येतात. जर बळी पडलेल्या व्यक्तीच्या रक्तात मद्याचे प्रमाण जास्त असेल तर ते प्रज्वलनासाठी अत्यंत पोषक ठरतं. यातील गोम अशी आहे की अशा वेळी बळी पडलेल्या व्यक्तीच्या जवळपास असलेल्या गोष्टी उदा: फर्निचर, गादी अशा ज्वलनशील गोष्टींना फारसा धक्का पोचलेला दिसत नाही. आणखी एका मतानुसार अनेक वर्षांचे मद्यपान किंवा कमी कार्बोदकांचा आहार अशामुळे केटोसिस हा रोग होऊन शरीरात ॲसिटोन या अत्यंत ज्वलनशील पदार्थाचे प्रमाण वाढून उत्स्फूर्त मानवी दहन घडू शकतं. काही सिध्दांतांनुसार मानवी आतड्यात तयार होणाऱ्या मिथेन गॅसच्या प्रमाणाबाहेरील उत्पादनामुळे मानवी शरीर अचानकरित्या पेट घेऊ शकतं. 

वरील जवळपास सर्वच सिद्धांत मला अशक्य किंवा अपूर्ण वाटतात आणि याची कारणंही मी येथे देत आहे. अंदाजे ७०% पाणी असलेलं मनुष्य शरीर जळणं हे निश्चितच सावकाश घडणारी प्रक्रिया आहे. आणि जर जिवंत मनुष्याचं शरीर जळलं तर यात मिळणारा वेळ जास्त असल्याने ती व्यक्ती आपलं संरक्षण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्य शरीराची राख होण्यासाठी खूप जास्त तापमानाची गरज असते. इतक्या उच्च तापमानामुळे मनुष्याच्या आजूबाजूच्या गोष्टी नक्कीच जास्त प्रमाणात जळतील. पण उत्स्फूर्त मानवी दहनाच्या दाव्यांमध्ये अशी माहिती मिळत नाही. केटोसिसच्या सिध्दांता बद्दल बोलायचं तर शरीरात असलेलं केटोनचं प्रमाण कितीही जास्त असलं तरी उत्स्फूर्त मानवी दहनासाठी लागणाऱ्या तापमानाच्या दृष्टीनं ते पुरेसं नाही. काही मि.ली. मध्ये असणारे केटोन इंधन बनून संपूर्ण मनुष्य देहाचं भस्म करतील हे गणित मला पटत नाही. यासाठी मनुष्य देहाचं दहन समजून घेऊ. मी हिंदू धर्मीय असल्याने आमच्या धर्मानुसार मृत्यूनंतर असणारा विधी म्हणजेच दहन मी जवळून पाहिलं आहे. मनुष्य देहाचं संपूर्ण दहन होण्यासाठी इंधन, प्रज्वलन साहित्य, उच्च तापमान, ऑक्सिजनशी संयोग होण्याची प्रक्रिया अशा अनेक घटकांची गरज असते. ही काही सोपी किंवा त्वरित घडणारी प्रक्रिया नाही. म्हणूनच मनुष्य देहाचं संपूर्ण ज्वलन होणं ही उत्स्फूर्त मानवी दहनामागील कल्पना हा कदाचित शक्य असणारा सिद्धांत असूही शकेल पण या प्रक्रियेतील भयंकर ज्वलनाचं स्पष्टीकरण वरील कोणत्याही गृहीतकात सर्वांगानं दिलं गेलेलं नाही हे स्पष्ट आहे. याचाच आपण दुसऱ्या बाजूनं विचार करू. रोज धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांची संख्या किती आहे याचा विचार करू. प्रत्यक्षात बघायचं तर बहुतांशी मद्य सेवन करणारे धूम्रपानही करतात. रक्तातील अल्कोहोलची पातळी जास्त असलेले अनेक लोक गाडी चालवतात, स्वयंपाक करतात, धूम्रपान करतात किंवा अशा अनेक गोष्टी करतात ज्याचा अग्नीशी जवळचा संबंध येतो. यातील अनेक व्यक्तींना केटोसिस असतो तसेच त्यांच्याही शरीरातील आतडी मिथेन गॅस उत्पादन करतात हे काही वेगळं सांगायला नको. मग इतके शारीरिक दृष्ट्या संवेदनात्मक लोक असतानाही उत्स्फूर्त मानवी दहनाचे इतके कमी बळी का आहेत? अजून खोलात जायचं तर रक्तात जास्त अल्कोहोल असणारे अनेक लोक नापर्वाईने गाडी चालवतात, त्यांचे काही वेळा अपघात होतात व गाड्या पेट घेतात. जर मेणबत्ती वा सिगारेट सारख्या छोट्या वस्तू प्रज्वलनाला कारणीभूत ठरतात तर गाडी सारख्या मोठ्या वस्तू का नाही? अनेक अपघातातील व्यक्ती (मद्यपान केलेल्या) भाजतात पण बव्हंशी बऱ्या होतात परंतु त्यांच्या शरीराची राख होत नाही. मग उत्स्फूर्त मानवी दहनामागील महत्त्वाचं कारण तरी कोणतं आहे? माझ्या मते हे कारण म्हणजे केवळ मद्यपान किंवा केटोन नक्कीच नाही. मी वरील सर्व सिद्धांत तत्परतेने नाकारत नसले तरी हे सिद्धांत जसेच्या तसे स्वीकारणं मला पटत नाही.                                        

एक सिद्धांत मात्र थोडा तर्कसंगत वाटतो तो म्हणजे MCAS. एका मास्ट पेशींवरील संशोधकानं एक सिद्धांत मांडला आहे. एका दुर्मिळ रोगात  Mast Cell Activation Syndrome (MCAS), मास्ट पेशी जास्त प्रमाणात मेडिएटर्स उत्पादित करतात उदा: नॉरएपीनेफ्रीन. या नॉरएपीनेफ्रीनच्या अतिस्त्रावामुळे ॲडिपोस पेशींत ऊष्मा वाढून ॲडिपोस टिश्यू जळू लागतात व त्या अस्थिमज्जा (bone marrow) सकट जाळतात. पण अजूनही MCAS ही प्रक्रिया अजूनही संशोधनाखालीच आहे याची नोंद घ्यावी. आता MCAS हे उत्स्फूर्त मानवी दहनाचे कारण बनू शकते का याचा विचार करू. या MCAS मुळे मास्ट पेशी अतिप्रमाणात काम करत असल्या तरी त्यामुळे मानवी शरीराची जळून राख होणे ही थोडी अतिशयोक्ती वाटते. एका शास्त्रज्ञाच्या मते या अप्रमाणित नॉरएपीनेफ्रीन मुळे ९० डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होऊन ॲडिपोस पेशी जळू लागतात. आता व्यावहारिक विचार करता मनुष्य देह जाळण्यास किमान १५०० डिग्री सेल्सिअसची गरज असते. म्हणूनच मला वाटते की MCAS हे उत्स्फूर्त मानवी दहनाच्या कारणाशी संबंधित असू शकते पण हे त्याचे सर्वस्वी एकच कारण नाही.     

आता उत्स्फूर्त मानवी दहनाच्या कारणांचा विचार करून मी माझी मते येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एक सूक्ष्मजीव शास्त्राची अभ्यासक म्हणून माझं मत आहे की ही घटना मानवी शरीरातील उष्मा तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जनुकांमधील दुर्मिळ उत्परिवर्तनामुळे घडण्याची शक्यता जास्त आहे. अनियंत्रित उष्मा उत्पादन प्रक्रिया ज्यात नॉरएपीनेफ्रीनचा मुख्य समावेश असतो त्यातील दोषामुळे असे दहन होऊ शकते. म्हणूनच वरील MCAS हा सिद्धांत मला उत्स्फूर्त मानवी दहनाच्या कारणाच्या अगदी जवळपासचा वाटतो पण सर्वस्वी तेच कारण मला वाटत नाही. मानवी शरीरातील उष्मा उत्पादन वयानुसार बदलत जाते. म्हणूनच यासंदर्भातील जनुकीय कारणांचा अजून सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. मद्यपान, धूम्रपान वा इतर बाह्य प्रज्वलनाची कारणं मला योग्य वाटत नाहीत. उत्स्फूर्त मानवी दहनाच्यावेळी वाढलेलं अति तापमान इतक्या सहजासहजी साध्या दोषांमुळे गाठणं शरीराला शक्य नाही. असं इतक्या कमी वेळात शारीरिक तापमान इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं असतं तर याचे अनेक बळी पडले असते. पण या घटनांची दुर्मिळता हेच सांगते की ही अत्यंत दुर्मिळ घटना असून याच्या कारणांची संपूर्ण मीमांसा करणं आवश्यक आहे.    

दुसरा मुद्दा असा की मानवी शरीरातील सूक्ष्म पेशींमधील अनेक प्रक्रियांचा शोध विज्ञानाला अजून लागायचा आहे. तेव्हा मोकळ्या मनाने विचार करता एखाद्या वेगळ्याच कारणाचा शोध भविष्यात लागू शकेल. केवळ उष्मा निर्मितीच नव्हे तर एखादी वेगळीच प्रक्रिया अशा मानवी दहनाला कारण असू शकेल. आत्ता ही अतिशयोक्ती वाटली तरी भविष्यात मानवी शरीरावरील वेगळे शोध, मज्जासंस्था वा संप्रेरकांची कार्यपद्धती अशा अनेक गोष्टींचा शोध लागल्यावर आपण उत्स्फूर्त मानवी दहन एका वेगळ्या दृष्टिकोनातून समजू शकू.    

शेवटी मी एव्हढंच म्हणेन की सध्याच्या वैज्ञानिक पातळीवर तरी उत्स्फूर्त मानवी दहनाला एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून स्वीकारणं थोडं कठीण आहे. मी घाईघाईने कोणताही सिद्धांत पूर्णपणे नाकारत नाही. तरीही नेमक्या उत्स्फूर्त मानवी दहनाच्या वेळचा कोणताही भक्कम सिद्धांत, साक्षीदार, पुरावे, फोटो वा व्हिडिओ क्लिप यांच्या अभावी या घटनांना मान्यता देणं कठीण आहे. कोणत्याही निर्णयावर येण्यासाठी अजून अभ्यास, संशोधन व तपासणी गरजेची आहे. 

असो, माझ्या पुढील लेखात मी या विषयाचा ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून माझी मते मांडण्याचा प्रयत्न करेन.  

सूचना: सादर लेखात कोणत्याही अभ्यासकाचा किंवा वैज्ञानिकाचा अपमान करण्याचा हेतू नाही.    

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

      =============================================

The phenomenon Spontaneous Human Combustion (SHC) is a mystery and remains unexplained even after alleged claims for over a century. Though a fair amount of claims and research works regarding SHC exist, its still not completely accepted as a natural phenomenon by many scientists. Now what exactly is Spontaneous Human Combustion? It is the concept of the combustion of a living (or recently deceased) human body without an apparent external source of ignition. In SHC mostly a particular part of the body burns into ashes. As this is an extremely rare phenomenon, the experts and investigators are still skeptical about the scientific criteria under which SHC can be categorized. Well with some authentic references and my knowledge in astrology and science, I am trying to check the reality of SHC.  

First I will try and put my thoughts on SHC with scientific approach. There are different hypotheses explaining SHC, though I feel none of them are across the board. 

Some experts proposed causes of SHC, which include possible external ignition factors like candles, cigarettes, scalding etc which cause a 'wick effect'. Where the subcutaneous fat released during the process of burns or wounds act as a wick and encourage burning of human body. The protein in the body also burns, but provides less energy than fat, with the water in the body being the main impediment to combustion. If the victim has high blood alcohol levels, then it may boost the process of combustion. The glitch here is the furniture, sofas or many other things present near the vicinity of the victim are mostly seen unharmed. It is also conjectured that ketosis caused by chronic alcoholism or low-carb diet produces acetone, which is highly flammable and could lead to spontaneous combustion. According to some theories, methane produced in the intestines can be responsible for the sudden human body combustion. 

Almost all of these theories sound very implausible to me and I will explain why. Combustion of a human body which is made up of almost 70% of water looks a lengthy process, which (if happens) will give time to fight against the raging fire. Secondly very high temperature is required to completely burn a human body into ashes. After attaining such high temperatures, the nearby things like furniture will definitely burn to major extent. But in most of the alleged cases no such harm is indicated. Regarding the ketosis theory, the blood level of ketone bodies produced even in severe form ketosis and the severity of the burning in SHC do not seem to match. Burning a full or part of human body to ashes with milliliters of ketones in the blood, working as a fuel does not sound possible to me. Lets talk about burning of human bodies to understand this. I have personally witnessed cremations of human dead bodies, which is a ritual in Hindu religion. There are many factors like fuels, ignition source, oxidizing agents, high temperatures etc needed to get the human body fully consumed by the flames. It is not a easy or fast process. Thus burning of a human body (alive or recently deceased) to ashes within no time may be a contingent theory but these enigmatic blazes in SHC can not be fully explained on the basis of these theories. This point also has another view. Consider the number of people who are chronic alcoholics and chain smokers. Practically speaking many of the people with high alcohol levels smoke regularly. After consumption of alcohol many people drive, cook food, smoke and do many activities which are in the close proximity of fire. Not to mention, many of these people may have ketosis, produce methane in intestines etc. Then why there are very few claims of SHC compared to the number of people vulnerable to it? If we dwell into this, many people with high alcohol levels drive recklessly, meet with an accident and their vehicles catch fire. If candles and cigarettes can be the source of ignition then why not the bigger thing called a vehicle? Many such burn victims recover but not burn to ashes at that moment. What is the triggering factor then? In my opinion it is definitely not just alcohol or ketone bodies or methane for sure. I am not readily dismissing above mentioned theories but accepting them unconditionally is not quite apropos.    

One interesting theory which seems to hold water is MCAS. A mast cell researcher proposed this theory, that a rare condition called Mast Cell Activation Syndrome (MCAS) may cause SHC. In MCAS, mast cells spontaneously release high amount of mediators, including norepinephrine.  A sudden flood of norepinephrine released from adipose mast cells could generate enough heat to ignite adipose tissue. which in turn would burn itself out, inclusive of bone marrow. Then again MCAS is still a poorly understood condition and is a current topic of research. Now lets understand whether this can be accepted as a cause of SHC. Though in MCAS the mast cells are hyperresponsive and lead to anaphylaxis and many other symptoms; the theory of burning a human body to ashes still remains quixotic. According to the scientist a sudden flood of norepinephrine may lead to some uncontrolled processes which cause the generation of heat exceeding to 90 degrees Celsius. Due to this the adipose tissues get ignited which will burn along with the bone marrow. Now practically human body needs almost 10000 degrees Celsius for 2 to 2.5 hrs to get completely burned into ashes (with bones). Now the question arises here is can the process lead to such high temperatures? Also a factor to be noted is if the body is burned in such less time as claimed in the process of SHC, then it will require much higher temperature i.e. probably above 1500 degrees Celsius. I feel that MCAS may be related to the cause of SHC but it may not be the sole cause of it.

Well I will put my thoughts here on the possible causes of SHC. As a microbiologist I feel SHC can be caused by a rare mutation in the genes responsible for the process of thermogenesis or heat production by human body. Uncontrolled thermogenesis may be caused due to defects in hormones including norepinephrine. So I consider the above mentioned MCAS as a plausible but not the sole cause of SHC. The process of thermogenesis slightly differs with age. Thus considering the age of the SHC victims I feel a detailed study of the genetic factors is necessary. I don't consider alcoholism, smoking or any other external factors of ignition as possible cause of SHC. The intensity of the heat generated during SHC is still a mystery and it is really impossible to attain such high temperatures by the human body in normal stages of defects. If it were so simple to attain such high temperatures quicky, then there would have been many victims of SHC. But the scarcity of the cases tells us that it is a very rare phenomenon. 

Secondly there are many processes in human body on molecular level which we haven't explored yet. Keeping an open mind I feel that there can be a very unknown cause of SHC which can be discovered in future. Not only thermogenesis, but a totally unknown phenomenon can lead to the combustion of human body within no time. Currently this may feel far fetched but in future we may discover new aspects of human body, our nervous system or hormonal functioning which may help us to understand the process of SHC.    

Lastly I would like to mention that with the current knowledge of science it is very difficult to accept SHC as a natural phenomenon. I am not hastily dismissing any theories though. But due to lack of any solid theory and proper evidence like photographs, video clips or witnesses during the exact time of burning of the human body, it becomes dubious to accept it as a scientific process. Unambiguously more research and proper investigation is needed to come to any conclusion. 

In my next article I will try to study this mysterious process of SHC from astrological point of view. 
Please Note: This article is not intended to insult any investigator or scientist.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

      =============================================