उत्स्फूर्त मानवी दहन याविषयी मागील लेखात मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मतं मांडली होती. आता ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या याबद्दल काय मतं मांडता येतील ते पाहू.
उत्स्फूर्त मानवी दहन म्हणजेच मानवी शरीराचं अचानक पेट घेऊन जळून राख होणं. यामुळे बहुधा मृत्यू येतोच. म्हणूनच अष्टम स्थान म्हणजेच मृत्यू स्थान मला खूप महत्त्वाचं वाटतं. अष्टम स्थानाचा भावचलित कुंडलीतून झालेला विचार, अष्टमेश आणि त्यावर असलेली ग्रहांची दृष्टी, महादशा व आंतर्दशा हे मुद्दे येथे महत्त्वाचे ठरतात. मी मागे नमूद केल्यानुसार मृत्यू हा अचानक नसतोच. ते विधिलिखित आहे ज्याला आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे आधी व्यक्तीचं आयुर्मान आणि त्याच्या मृत्यूचं कारण ह्याचा अभ्यास गरजेचा आहे. अष्टमस्थान जर अचानक आणि अग्नीशी संबंधित असलेला मृत्यू देत असेल तर या घटनेकडे पाहता येईल. पण अग्नीमुळे घडणारे मृत्यू इतर अनेक कारणांमुळे घडू शकतात. मग उत्स्फूर्त मानवी दहन हेच कारण का असावं? शरीराचा कोणताही भाग कोणत्याही दृश्य कारणाशिवाय जळणं हा एक दुर्मिळ असा योग आहे. मृत्यूचं कारण कुंडलीवरून अभ्यासताना त्याचा स्रोत काय आहे हेही अभ्यासलं जातं. पण उत्स्फूर्त मानवी दहन अजून कोणत्याही विशेष श्रेणीमध्ये येत नसल्यानं याचं निदान करणं कठीण आहे. मग याच्या खोलात जाऊन विचार केल्यास काही मुद्दे समोर येतात.
उत्स्फूर्त मानवी दहनात मानवी शरीराचा काही भाग किंवा पूर्ण शरीर जळून भस्म होतं. अग्नी, रक्त, पेशी व त्यातील प्रक्रिया यावर मुख्य अंमल असतो तो मंगळाचा. त्यामुळे अशा लोकांच्या कुंडलीत मंगळ ग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आता मंगळ ग्रह अनेक गोष्टींचा कारक असल्यानं यातील मानवी दहन आणि इतर कारणं यात फरक कसा करणार? तर निचीचा मंगळ, त्यावर रवि सारख्या उग्र आणि जलद ग्रहाची दृष्टी तसंच मंगळाचा अष्टम स्थानाशी संबंध हा भाग अभ्यास करण्याजोगा आहे. उत्स्फूर्त मानवी दहन ही तीव्र आणि लवकर घडणारी घटना असल्यानं जलद गति ग्रहांचा संबंध जलद गति असणाऱ्या मंगळाशी आला पाहिजे. तसंच अष्टम भाव, मंगळ किंवा अशाच तीव्र ग्रहाच्या नवमांशात असायला हवा. मंगळाचा शनिशी संबंध असू शकेल पण एकटा शनि ह्यात कारण ठरू शकणार नाही.
'अचानक' घडणाऱ्या गोष्टींचा संबंध प्लूटो या ग्रहाशी नक्कीच येतो. यासाठी प्लूटो ग्रहाची थोडी माहिती घेऊ. हर्षल, नेपच्यून व प्लूटो हे ज्योतिष शास्त्रात ब्रह्मा, विष्णू आणि महेश समजले जातात. कारण हे तीनही ग्रह ह्या ऊर्जा आहेत. त्यांना स्वतःचं असं कारकत्व नसून ते केवळ ऊर्जा देतात. प्लूटोचा विचार करता तो शिव शंकराचं प्रतीक आहे. आणि शंकर हा विनाशकारी आहे. म्हणूनच संपूर्ण विनाश हा शिवाच्या आशिर्वादाशिवाय घडत नाही. यावर तपशीलवार माहिती मी नंतर देईनच पण उत्स्फूर्त मानवी दहन ही कमी वेळात होणारी तीव्र अशी प्रक्रिया असल्यानं त्यात प्लूटो या ग्रहाचा संबंध येणार हे माझं मत आहे. मंगळामुळे शारीरिक प्रक्रिया घडल्या तरी त्याला तीव्र स्वरूप देऊन शरीराचं भस्म करणं यात प्लूटोचा सहभाग निश्चितच आहे. म्हणूनच अशा व्यक्तींच्या कुंडलीत प्लूटो आणि मंगळ यांची एकमेकांवर दृष्टी किंवा युती असणं निश्चित असावं. मी मागील लेखात नमूद केल्यानुसार शारीरिक उष्मा प्रमाणाबाहेर गेला तरच हाडांची राख होऊ शकते. इतक्या पातळीवर केवळ कोणत्याही बाह्य प्रज्वलना शिवाय मंगळ ग्रहामुळे जाणं अशक्य आहे. म्हणूनच प्लूटो सारख्या स्फोटक ग्रहाची साथ असणं अनिवार्य आहे.
या दोन ग्रहांखेरीज शनि, राहू आणि केतू हे ग्रह तेव्हढीच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याशिवाय अशी दुर्मिळ घटना घडू शकत नाही. शनि मुख्यतः अग्नी, गुदमरणं, भाजणं, हाडांची दुखणी अशा कारणांमुळे मृत्यू देतो. मात्र लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे शनिमुळे तात्काळ मृत्यू येण्यापेक्षा प्रदीर्घ आजार, एकटेपणा मुळे झालेले त्रास अशा प्रकारे मृत्यू संभवतो. म्हणून उत्स्फूर्त मानवी दहनात शनि एकटा कारण नसून त्याचे राहू किंवा केतूशी झालेले कुयोग, मंगळाशी असलेले कुयोग वा दृष्टी आणि अष्टम स्थानाशी असलेला योग ह्या सर्वांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. अचानक मृत्यू हे केतूचं एक वाईट फळ आहे. त्यामुळे शनि बरोबर राहू आणि केतूचा संयोग तेव्हढाच महत्त्वाचा आहे.
या सर्वाचं तात्पर्य असं आहे की मंगळ, रवि, प्लूटो, शनि, राहू आणि केतू या सर्वच ग्रहांचा एकमेकांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आलेला वाईट योग घडवून आणणारा संबंध असेल, त्याच वेळी मृत्यूला पोषक अशी महादशा आणि अंतर्दशा असेल आणि गोचरीतही हे ग्रह तसेच वाईट योग करत असतील तर या सर्वांच्या मिलाफामुळेच असा पट्कन मृत्यू येऊ शकेल. इतके सगळे योग कुंडलीत एकत्र येणं हा इतका दुर्मिळ योग आहे की उत्स्फूर्त मानवी दहन हे मृत्यूचं अतिदुर्मिळ कारण आहे यात शंकाच नाही.
मी मागील लेखात लिहिल्याप्रमाणे अशा मृत्यूंची ठोस उदाहरणं खूपच कमी आहेत. त्यामुळे उत्स्फूर्त मानवी दहन ही मान्य झालेली प्रक्रिया आहे असं गृहीत धरूनच मी वरील विवेचन केलं आहे. नवीन संशोधनानंतर यात अनेक बदल घडू शकतील. मी स्वतः ही प्रक्रिया पूर्णपणे स्वीकारली नसली तरी एक अभ्यासक म्हणून मी हे विचार मांडले आहेत. कोणत्याही वेळी यातील झालेले बदल मी पूर्णपणे स्वीकारून माझं विवेचन बदलू शकते. इतके कमी पुरावे असतानाही मी केवळ एक उत्सुकता म्हणूनच या वेगळ्या विषयाचा अभ्यास केला आहे. विशेषतः भारतात उत्स्फूर्त मानवी दहन हा विषय फार कमी लोकांना ठाऊक असल्याने त्याची माहिती वाचकांना मिळावी हा माझा उद्देश आहे. त्यामुळे या विवेचनातील कोणताही मुद्दा ठोस ज्योतिष शास्त्रीय मुद्दा म्हणून निदान आत्ता तरी वाचकांनी गृहीत धरू नये.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
=============================================
I put my thoughts on Spontaneous Human Combustion (SHC) in my previous article from scientific point of view. Now lets see if we can understand this from astrological point of view.
SHC is a process where human body suddenly gets burnt to ashes, without any external source of ignition. Mostly this devours the victim's body with gusto. Therefore I feel the eighth house in the kundli is the most important house to be studied. The eighth house, it's position in the bhavachalit kundli, eighth house lord and planets aspecting the eigth house or it's lord, mahadasha and antardasha are some of the important aspects here. As I mentioned in one of my earlier article, death is never unexpected. It is always destined but we are not aware of our destiny. Ergo astrologers need to study a person's life span as well as the reason for the person's death. First of all if the eighth house exhibits any signs of sudden and fire related death, then SHC can be taken into account. Nonetheless, fire related deaths can occur in various forms. Then how can one predict SHC as the exact reason for death? Burning a whole or part of human body to ashes is a very rare yog. Studying the reason behind death from kundli will also shed light on the source of death. But SHC is still not categorized, so it's prediction becomes a back-breaking calculation. By profound thinking some points can be observed.
In SHC some part or complete human body gets burnt into ashes. The planet Mars precisely governs fire, blood, blood cells and the processes on cellular level. So I feel Mars will have a very important role in the horoscopes of victims of SHC. Mars governs a lot of things in human life so how to differentiate between other things under Mars and SHC? Then debilitated Mars, a fierce and fast planet like Sun aspecting Mars and the position of Mars with respect to the eighth house should be the important points to be studied. As SHC is allegedly a fast process fast moving malefic planets should have a malefic yog with fast moving Mars. The eighth house should be in the navamansha of malefic or fierce planets like Mars. Saturn along with Mars can definitely play a role here but Saturn alone can not harm a human being to such level.
When unexpected or abrupt things take place then Pluto is a planet to be considered with a balanced view. Lets get some information about Pluto. Uranus, Neptune and Pluto are considered as Brahma, Vishnu and Mahesh in vedic astrology. Because this trio is a form of energy. They provide energy rather than ruling some materialistic things in human life. Pluto is supposed to be the form of Lord Shiv. Lord Shiv is a destroyer as we all know. So destruction is always ruled or due to the blessing of Lord Shiv. I will definitely elucidate this concept later on but as SHC is a fast and destroying process, I feel it is definitely related to Pluto. Mars can lead to the processes in the human blood cells but to make the output so drastic is a work of Pluto. Therefore the victims of SHC are most likely to have Pluto and Mars aspecting each another in some or the other way in their horoscopes. As I mentioned in my previous article, if the heat generated by human body goes beyond limits then only it can burn the bones to ashes. This seems very unlikely with only malefic Mars without any external source of ignition. Thus Mars imperatively have a concomitance from the fierce planet Pluto.
Apart from these two planets Saturn, Rahu and Ketu must be playing vitally important roles, without which such rare incidences will be unobtainable. Saturn in broad terms gives a prolonged death by fire, suffocation, burns or bone problems. A pondering point here is that Saturn usually gives a prolonged death or a death in loneliness rather than a quick death like in SHC. So Saturn can not be the only reason for occurrence of SHC. Saturn's malefic yogas with Mars, Rahu or Ketu, aspecting of Mars or it's malefic yogas with eighth house etc. all such points should be studied in detail in the context of SHC. Though unexpected death can be the result of very much malefic Ketu, along with this it's position and yogas with Saturn are equally important.
Finally the gist of this is if all these malefic planets like Mars, Sun, Pluto, Saturn, Rahu and Ketu form malefic yogas directly or indirectly, at the same time bad mahadasha or antardasha are running and the horary planets are equally malefic then only it can result in such a horrific death. Now simultaneously having all these malefic yogas in a horoscope is such an exceptional thing that no wonder SHC is the rarest cause of death.
As I mentioned in my previous article that there are very few cognizable cases of SHC. So please note that I have written this article by taking it granted that SHC is a scientifically accepted process. My opinions on this can change after some new discoveries in future. Though personally I haven't accepted this process completely, as a analyst I have put my thoughts with an open mind. At any given time I can accept new theories and change my interpretations. In spite of scarce evidences I wrote this article on this different topic merely out of curiosity. Also my pure intention is to increase the awareness of this subject especially in India. Inasmuch as more study is needed to come to any conclusion, I request the readers not to consider any point as a full proof explanation of SHC.
©
All rights reserved. No part of this publication may be reproduced,
distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
============================================================
No comments:
Post a Comment