Tuesday, 29 October 2019

ग़ज़लकारांची व्यक्तिमत्वं (Shayars' Personalities)


          

ग़ज़ल हा काव्यप्रकार आपल्याकडे सर्वांनाच माहित आहे. फाळणी आधीच्या हिंदुस्थानात अनेक नामवंत गज़लकार होऊन गेले, त्यामुळे आपल्याकडे ह्याची लोकप्रियता आधीपासूनच होती. पण ग़ज़ल ही काव्यलेखनाची पद्धत खूप आधी ७व्या शतकात अस्तित्वात आली. दक्षिण आशियात अंदाजे १२ व्या शतकात आली. इस्लाम धर्माच्या जन्माआधी अरब देशांमध्ये 'क़सीदा' लिहिला जात असे. एखाद्या मोठ्या सम्राटाची किंवा प्रसिद्ध, धनाढ्य व्यक्तीची स्तुती हा त्याचा मुख्य उद्देश. ह्या क़सीदाच्या पहिल्या ओळींत उदासवाणे किंवा प्रणयवादाचे भाव येऊ लागले तेव्हा त्याला 'नसीब' म्हणू लागले. अत्यंत अलंकारीक भाषा आणि अत्युच्च शैलीतील हे लिखाण जेव्हा छोट्या कवितांमध्ये रूपांतरीत झालं तेव्हा त्याची ग़ज़ल झाली.    

त्यात काळानुरूप अनेक बदल होऊन ग़ज़ल हा काव्य प्रकार लोकप्रिय होऊ लागला. ओमय्याद खलिफांच्या काळात ६व्या शतकाच्या उत्तरार्धात ग़ज़लेनं स्वतःचं असं रूप घेतलं. ग़ज़ल ही काही 'शेर' यांची मिळून एक कविता असते. शेर दोन ओळींचा असतो. मग ह्या कवितेत मतला, रदीफ़, बहर, काफ़िया आणि मक़्ता हे नियम पाळले गेले आहेत की नाही ते पाहिलं जातं. ह्या नियमांत गज़लेचं वृत्त, यमक, शेर आणि त्यांचे अर्थ, ग़ज़लेची मूळ कल्पना, शेवट आणि शायराचं नाव (टोपण नाव) या सर्वांचा विचार केला जातो. बहर म्हणजे ग़ज़लेचा छंद, इंग्रजीत मीटर. अशा नियमांत बसणारा हा काव्य प्रकार कठीण असला त्यातील गर्भितार्थ, सुंदर उपमा आणि प्रेमाची उत्कट आणि उच्च कल्पना यामुळे लोकप्रिय होऊ लागला. ग़ज़ल हा शब्द मूळ अरेबिक भाषेत उच्चारताना टाळू आणि जिभेचा वापर करून उच्चारला जातो. याचा शाब्दिक अर्थ प्रेयसीशी केलेला संवाद असा आहे. या संकल्पनेत मुख्यतः विरह, प्रियकराशी कधीच एकरूप होऊ न शकणारी प्रेयसी, मदिरेच्या आधारे हे दुःख विसरण्याचा प्रयत्न अशा विषयांचा जास्त वापर केला गेला. अर्थात यात अनेक बदलही झाले, पण तो मुळातला गोडवा नवीन कल्पना आणि उपमा यात नाही आला.     
        
इंग्रजी Gazelle  म्हणजेच काळवीट. या शब्दाच्या साधर्म्यामुळे काळवीटाचा ग़ज़ल या नावाशी काही संबंध असावा असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मूळ ग़ज़ल या शब्दाचा शाब्दिक अर्थ तसा नाही. मध्यंतरी वाचनात आलं की, १९७३ साली पाकिस्तानी शायर अहमद अली यांनी An Anthology of Urdu Poetry या त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला. क़सीदाच्या पहिल्या पंक्ती म्हणजेच 'तगाझ्झुल' यात या नावाचं मूळ आहे असं त्यांचं मत. जेव्हा शिकारी प्राण्यांनी घेरलेल्या काळवीटाला आपण आता वाचणार नाही आणि किती एकटे पडलोय हे समजतं तेव्हाच्या त्याच्या आर्त, केविलवाण्या रडण्याची तुलना त्यांनी  ग़ज़लेच्या अर्थाशी केली. इतका ग़ज़ल हा खोल अर्थाचा काव्य प्रकार आहे. वरवरच्या उथळ भावनांना गज़ल लेखनात स्थान नाही.
                
महाराष्ट्रात मात्र ग़ज़ल ऐकणं किंवा वाचणं हे थोडं मर्यादित आहे. काही नामांकित शायर आणि चित्रपटात वापरल्या गेलेल्या काही ओळी एव्हढंच याबद्दलचं ज्ञान सीमित आहे. काही रसिक ग़ज़ल गायनाच्या कार्यक्रमांना, चर्चांना आस्थेनं हजेरी लावतात. ह्या क्षेत्राशी संबंधित आणि काही रसिक व्यक्ती सोडल्या तर बहुतेक तरुण पिढी ब्लॉग्स आणि इंटरनेट च्या माध्यमातून ज्या 'भावनाशील' ओळी पाठवल्या जातात त्यावर समाधानी आहे. पण मूळ ग़ज़ल ही ह्यापेक्षा खूप खोल, गूढ आणि अनेक भावना, शब्द, रंगांनी नटलेली असते. सुफ़ी, पर्शिअन व तुर्की  ग़ज़लकार तसंच भारतीय आमिर खुसरो यांच्यासारखे दिग्गज शायर ज्यांनी 'हिंदवी' भाषेत अनेक कव्वाली लिहिल्या. पण असं वाचन कमी होत चाललंय. शायर ए आझम मिर्झा ग़ालिब यांच्या  ग़ज़ल सर्वश्रुत आहेत. पण त्यांच्या प्रसिद्ध ग़ज़लांखेरीज अनेक  ग़ज़ल, नझ्म, सुंदर पत्रं उपलब्ध आहेत. 

त्याचबरोबर शेख़ इब्राहिम ज़ौक़, शेवटचे मुघल बादशाह बहादुर शाह जफ़र, दाग़ देहलवी, मीर, मोमिन ख़ान मोमिन, ख़्वाजा मीर 'दर्द', नज़ीर अक़बराबादी अगदी १८/१९ व्या शतकातील हास्य कवी ग़ज़लकार अक़बर इलाहाबादी, शायरा परवीन शाकिर, अहमद फ़राज यांसारख्या अनेक शायरांचं ग़ज़ल लेखनात मोलाचं योगदान आहे.    

शायर ए आझम मिर्झा ग़ालिब यांच्या थोडं आधी ज़ौक़ यांचा ग़ज़ल प्रवास सुरु झाला, या दोहोंत अहमहमिकाही होती. दोघांची लेखनाची जातकुळी वेगळी आणि मिर्झा ग़ालिब यांच्या शब्दसंग्रह आणि उपमांना तोड नव्हती. पण त्यामुळे ज़ौक़ काही कमी ठरले नाहीत.    
    
शायरांची माहिती वाचताना एक छान गोष्ट नजरेत आली. बरेचसे शायर हे केवळ शायरीचे अभ्यासक नव्हते तर अनेक विषयात पारंगत होते. मिर्झा ग़ालिब यांना त्यांच्या गुरूने भाषांबरोबरच तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र याचेही धडे दिले होते. मोमिन हे उत्तम वैद्य होते त्यामुळे त्यांना हक़ीम ख़ान म्हणत, तसंच त्यांना गणित, ज्योतिषशास्त्र, संगीत, भौगोलिक शास्त्र आणि बुद्धिबळ याचं उत्तम ज्ञान होतं. बहादुर शाह जफ़र हे तर मुघल बादशाहच होते. कर्मठ मुघल बादशाह औरंगजेब यांची कन्या ज़ैबुन्निसा ही अनेक शास्त्रात पारंगत होती. सूफी काव्य, काही ग़ज़ल याचबरोबर अनेक काव्यग्रंथाचं लिखाण तिनं केलं. सौन्दर्य आणि बुद्धिमत्तेची खाण असलेली ही राजकन्या कुराण, पर्शिअन, उर्दू, अरेबिक भाषांची जाणकार होतीच पण त्या काळातील सर्वोत्तम गायिका होती असं म्हटलं जातं. खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, कॅलिग्राफी आणि साहित्य यांची अभ्यासक असलेली अशी ही बुद्धिमान कवियत्री होती. दाग़ देहलवींनी कॅलिग्राफी आणि घोडेस्वारी याचं प्रशिक्षण घेतलं होतं. आमीर खुसरो यांना गूढशास्त्र आणि अध्यात्म यांची उत्तम जाण होती.     

मला वाटतं उत्तम लिखाण करण्यासाठी अनेक विषयांची माहिती लागते. अन्यथा कल्पना करणं सीमित होऊन जाईल. म्हणूनच असे सर्वांगाने अभ्यास करणारे लेखक, कवी यांच्या लिखाणात सर्वंकष विचार झालेला दिसतो. केवळ आपल्याच क्षेत्राचा अभ्यास करणारे काही कमी आहेत असं मुळीच नाही. पण चौफेर वाचन, अभ्यास याचं प्रतिबिंब लिखाणात उतरतंच. 

मी एक ज्योतिषी असल्यानं ह्या सर्व कलावंतांचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अभ्यास केला. त्याबद्दल मी नंतरच्या लेखांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.         

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

       =============================================

Ghazal is a poetic expression which is well known in India. There were many exquisite Ghazal writers in Hindustan even from before partition, which already lead to the popularity of this form of poetry. Practically speaking Ghazal writing came to existence much earlier like before 7th century. It bloomed in southern Asia in almost 12th century. Before the birth of Islam in Arab countries they used to write 'Qasida' a then well known poetic form. Thematically Qasidas were panegyric for a ruler, lampoons and moral maxims. It was mostly a panegyric poem to praise an emperor or iconic figure at that time. When Qasida's opening prelude was nostalgic or romantic it was known as 'Nasib'. When this stylish and highly ornamental Nasib transformed to shorter poems and standalone mode, it was known as a Ghazal.

With time Ghazal has changed in many different forms and became very popular. Near the end of 6th century in the period of Umayyad Caliphate, Ghazal took it's own shape. In short Ghazal is a poetry of a few Sher(s). A Sher is made up of two lines. Then the Ghazal should follow rules like Matlaa, Radif, Beher, Qaafiyaa and Maqtaa. These rules take care of the rhyme, shers and their meaning, theme, ending and pen name of the shayar etc. For example Beher is the meter of the poem. Though this kind of  poetry seems very difficult due to the rules, it's connotation, beautiful similes, ardent and epic imaginations made it highly popular. Ghazal is an Arabic word which has a very soft pronunciation using tongue and soft palate. The literal meaning of Ghazal is a sweet talk to display amorous gestures. The concept of Ghazal mainly includes nostalgic emotions like separation, broken love, leaving behind thoughts of love with the help of liquor etc. Nonetheless there were changes in the themes in future, but in my opinion these new themes or similes are lacking the sweetness of the original theme of Ghazal.  

A slender antelope is known as Gazelle in English. That is why many people think that meaning of Ghazal is near to Gazelle, which is not the case. In between I read somewhere that in 1973 a Pakistani shayar Ahmed Ali mentioned this point in his well known book 'An Anthology of Urdu Poetry'. He said the meaning of Ghazal has it's root in the opening verses of Qasida i.e. 'Taghazzul'. According to him, when a Gazelle is wounded and cornered by predators it comes to know how lonely and vulnerable it is. An appalling and agonized cry of that Gazelle can describe the depth of the Ghazal. So Ghazal is a very deep form of poetry. Superficial emotions or shallow ideas have no place in Ghazal writing whatsoever. 

Sadly in Maharashtra, Ghazal writing or even listening is very much limited. This knowledge is restricted to some famous shayars and their verses used in films. Some connoisseurs do attend programmes like Ghazal singing or listening and discussions. Apart from these and some people related to this industry, most of the young generation is satisfied with the common 'emotional' verses found on internet or blogs. But original Ghazal is full of depth, emotions, words and colours. Sufi, Persian and Turkmen even Indian legends like Amir Khusrow have composed fabulous Qawwalis in 'Hindavi' language. Such readers are diminishing now. Many Ghazals by Shayar-E-Azam Mirza Ghalib are well known. On the contrary, apart from his Ghazals a treasure like his letters, Nazms and Ghazals different from his famous ones are available.   
Along with Ghalib, Sheikh Ibrahim Zauq, the last Mughal emperor Badshah Bahadur Shah Zafar, Daagh Dehelvi, Meer, Momin Khan Momin, Khwaja Meer 'Dard', Nazeer Akbarabadi, recent shayars and poet of humour like Akbar Allahabadi, shayara Parveen Shakir, Ahmed Faraz etc. have a great contribution in Ghazal writing. 

Zauq started his journey as a shayar just before Mirza Ghalib, in fact they were competitors. Both had a different style of writing but Ghalib's vocabulary and skill in simile had no comparison whatsoever. But this doesn't mean that Zauq was any less.   

While reading about these legendary shayars an interesting thing came up. Most of these shayars were not only the masters of shayari but they were versatile personalities too. Mirza Ghalib was not only a scholar of Urdu but was also versed in many languages, philosophy and logic. Momin was a very good doctor, so he was well known as Hakim Khan. Along with medicine he had a vast knowledge of mathematics, astrology, music, geomancy and chess. Bahadur Shah Zafar was an emperor himself. 

Zeb-un-Nissa, the daughter of a precisian emperor Aurangzeb, was a scholar in various fields. Along with Sufi poetry and Ghazal writing, she wrote many books of poetry.  A symbol of beauty and brains, princess Zeb-un-Nissa was born with high intellect and was not only a master in Quran, Persian, Urdu and Arabic languages but was also one of the best female singers at that time. She was a highly accomplished scholar with a vast knowledge in astronomy, philosophy, mathematics, calligraphy and literature. Daag Dehelvi was a scholar in calligraphy and horse riding. Legendary Amir Khusrow was a mystic and a highly spiritual person. 

I think a person should have a good general knowledge and information in various fields to produce the best of his/her writing. This is the reason why the writers or poets who are well versed in various fields write using their broad views. There are in fact good writers or poets with one sided study. But a widespread or ubiquitous study will definitely reflect in the writing.  

Being an astrologer I tried to study these artists from astrological point of view. I will write about my observations in my next article. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

      ===========================================================

No comments:

Post a Comment