Sunday 5 July 2020

जॅनिस जॉप्लिन एक झंझावात..2 (Fast and furious.. Janis Joplin-2)



मी मागील लेखात सांगितल्याप्रमाणे जॅनिस जॉप्लिनच्या कुंडलीवरून काही मुद्दे मांडण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी या वादळी व्यक्तिमत्त्वानं जगाचा निरोप घेतला. तरी एवढ्या लहान वयातही तिनं सारं काही मिळवलं. यश, पैसा, प्रसिद्धी, व्यसनं, शरीरसुख कोणत्याही बाबतीत काही मिळवायचं राहिलं आहे, असं झालं नाही. म्हणूनच तिच्या कुंडलीवरून आपल्याला बरंच काही शिकता येईल असं मला वाटतं.  

जॅनिसची कुंडली पुढीलप्रमाणे आहे: 
 

जॅनिसच्या कुंडलीत लग्नी कुंभ ही शनिची रास आहे. लग्नेश शनि चतुर्थस्थानी हर्षल बरोबर आहे. जॅनिसच्या बालपणाचा विचार करायचा तर लग्नेश शनि आणि चंद्र दोन्ही ग्रह शुभ स्थितीत आहेत. चंद्र मिथुन राशीत पंचमात असल्यानं तिला बालपणी त्रास, संघर्ष असं काही करावं लागलं नाही. वडिलांचा कारक रवि व्ययात शुभ स्थितीत आहे. तो शुक्र आणि बुधाबरोबर असल्यामुळे तिच्यावर तिच्या वडिलांचा खूप प्रभाव होता. तिला संगीत क्षेत्रात येण्यासाठी वडिलांनी खूप पाठिंबाही दिला. आई - वडील दोघांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे ती स्वतःला या क्षेत्रात आणू शकली. उलटपक्षी नाव मिळाल्यावर तिलाच एक मुलगी म्हणून चांगलं वागता आलं नाही याची तिला खंत होती. एकदा तिच्या कुटुंबाला लिहिलेल्या पात्रात तिनं म्हटलं होतं " मी कमकुवतपणे का होईना पण कुटुंबात अतिशय वाईट वागल्याची क्षमा मागत आहे."         

तिच्या कुंडलीत शुक्राच्या राशीत शनि आणि हर्षल असल्यानं तिला अनपेक्षितरीत्या यश मिळालं. तिला स्वतःलाही याची कल्पना नव्हती असं ती सांगत असे. शनि हा परीक्षा पाहणारा ग्रह आहे. अनेक लोक शनिला पापग्रह म्हणून घाबरतात. पण शनि किती उच्च कोटीचं यश देतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ह्या शनि हर्षल जोडीची पूर्ण दृष्टी दशम म्हणजे कर्मस्थानावर असल्यानं हे अनपेक्षित यश मिळालं पण त्यामुळे बदनामीनं तिची पाठ काही सोडली नाही. मुख्यतः मनमुक्त वागणं आणि समाजाच्या चौकटीत अडकलेल्यांच्या दृष्टीनं बोलायचं तर 'बिघडल्यामुळे' तिची खूप बदनामी झाली. पण हा शनि लग्नेश आणि व्ययेश असल्यानं तिला कीर्ती आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टींची फळं फार लवकर मिळाली. रोहिणी नक्षत्रातला हा शनि तिच्यासाठी खूप शुभ ठरला. कलेचा कारक शुक्र आणि पंचमेश बुध हे दोन्ही ग्रह कला क्षेत्रासाठी फार महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही ग्रह एकत्र व्ययस्थानात आहेत. त्यामुळे तिची कीर्ती देशोदेशी पसरली. बुध ग्रह इथे फार महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला दिसतो. तो वाणीचा कारक असल्यानं तिचा वेगळ्या जातकुळीतला आवाज, संगीत सादर करण्याची कला आणि मुक्तपणा यामुळे तिनं तुफान यश मिळवलं. अनेक देशांत तिचं नाव गाजलं. मात्र दशमस्थानी असलेल्या वृश्चिक राशीमुळे तिची अनेक ठिकाणी वादावादी झाली. मंगळ हा तीव्र ग्रह इथे दशमेश असून तो लाभस्थानी गुरूच्या धनू राशीत आहे. त्यामुळे मिळालेल्या लाभात तिला अनेकदा वाद आणि स्पष्टवक्तेपणामुळे थोडं नुकसान सहन करावं लागलं. धनेश गुरू चंद्राबरोबर पंचमात आणि पंचमेश बुध शुक्राबरोबर व्ययस्थानी ह्या मुख्य योगांमुळे तिला प्रचंड यश मिळालं. आर्थिक बाबतीतही ती समाधानी होती. तिच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल बोलायचं तर जागा अपुरी पडेल. गोऱ्या समाजातील इतर कलाकारांप्रमाणे नेहमीची वाट न धरता तिनं Blues (ब्लूज) ह्या लोकसंगीताची वाट धरली. कृष्णवर्णीयांची कला अशी समाजात प्रतिमा असतानाही तिनं ह्याच संगीत प्रकारात नाव मिळवलं. आणि अमेरिकेची पहिली रॉकस्टार बनण्याचा सन्मानही प्राप्त केला.         

तिच्या कुंडलीत मंगळाची पंचम स्थानावर पूर्ण दृष्टी आहे. कलेच्या ह्या स्थानावर जिथे चंद्रही आहे तिथे मंगळाची पूर्ण दृष्टी असल्यानं तिची कारकीर्द वादग्रस्तच राहिली. पंचम आणि सप्तम स्थानाचा मिलाफ म्हणजे आयुष्यातील प्रेमप्रसंग आणि विवाह याबाबतीत मिळणारी फलप्राप्ती. गुरू ज्या स्थानी असतो त्या स्थानाचा नाश करतो असं म्हणतात. पंचमातील ह्या गुरूनं आपल्या ५, ७, आणि ९ व्या दृष्टीनुसार तिला लाभ, भाग्य आणि निर्मळ स्वभावाचं फळ जरूर दिलं. पण सप्तमातील राहू आणि पंचमातील गुरू - चंद्र यांचा एकत्रित विचार केला तर तिला प्रेमप्रसंगात स्थैर्य असं लाभलंच नाही. अर्थात ह्याला तिचा चंचल स्वभाव, अनेक लोकांशी असलेले शारीरिक संबंध हे सारं कारणीभूत आहे. पण मिथुन राशीतल्या चंद्राचा विचार केला तर हे सारं काही फार अनपेक्षित नव्हतं. एका जागी निवांत होऊन रमणारा हा जीवच नव्हता. अत्यंत वेगवान आयुष्य जगताना ह्या speed freak असलेल्या मुलीनं एक मोठा थांबा घेऊन आपला प्रवास खंडित करावा हे घडणारं नव्हतं. तेच तर तिचं वैशिष्ट्य होतं. हा वेगवान प्रवास कुणाला फारसा मानवलाच नाही. त्यामुळे ठराविक साच्यातल्या व्यक्तींना ज्यांना तिनं आपली 'जीवनसाथी' बनावी ही अपेक्षा होती त्यांचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. षष्ठातील प्लूटो आणि अष्टमातला नेपच्यून ह्यामुळे तिचं सप्तमस्थान पापकर्तरी योगात होतं असं म्हणता येईल. त्यातून सप्तमातला राहू आणि लग्नी असलेला केतू यामुळे वैवाहिक सौख्य तिला मिळालं नाही. तिच्या आई वडिलांनाही तिचा सहवास फार काळ मिळाला असं नाही. पण तिचं त्यांच्यावरचं प्रेम अबाधित राहिलं हे खरं. 

पंचमातल्या ह्या गुरू चंद्रामुळे ती कलाक्षेत्रात येताना एक नाजूक, कल्पनाशक्तीनं रसरसलेलं असं मन घेऊन आली. नितांत सुंदर अशी गाणी तिनं लिहिली आणि सादरही केली. मंगळाची पंचमावर पूर्ण दृष्टी आणि पंचमेश बुध व्ययस्थानी असल्यानं तिनं बोलताना, वागताना वा कला सादर करताना निर्भीडपणे सादर केली. हाच मंगळ तृतीयेशही असल्यानं तिला भीती ठाऊक नव्हती. अत्यंत हिमतीनं तिनं कृष्णवर्णीय लोकांशी मैत्री केली आणि कधीही लपवली नाही. त्या काळात हे एक धैर्याचं काम होतं. सप्तमातल्या राहुमुळे तिच्या खाजगी आयुष्यात वेगळेपण आलं, जी त्या वेळी बंडखोरी होती. तिच्या आयुष्यात कृष्णवर्णीय व्यक्तीही होत्या, स्त्रियाही होत्या आणि पुरुषही. चंद्र, मंगळ आणि राहू या ग्रहांमुळे तिचं संपूर्ण आयुष्य वादग्रस्त राहिलं असं माझं मत आहे.  

जॅनिसच्या कुंडलीतील पंचमातला मिथुन राशीतला चंद्र बरंच काही सांगून जातो. मुख्य म्हणजे तिनं तिच्यावर झालेली टीका कधीही मनाला लावून घेतली नाही. खूप चांगल्या स्थितीत असलेल्या ह्या चंद्रामुळे तिचं मन घट्ट होतं, किंबहुना तिला कोणत्याही गोष्टीनं फरक पडत नसे. कुणासाठी थांबणं वा रडत राहणं तिला ठाऊक नव्हतं. गुरू चंद्र एकत्र असल्यानं एक नक्की सांगता येईल कि ह्या मनस्विनीचं मन अतिशय निर्मळ आणि शुद्ध होतं. मुद्दाम प्रवाहाच्या विरोधात जाणं, कुणाला दुखावणं हा तिचा हेतू नव्हता. गुरूनं तिच्या मनाला एक पावित्र्य दिलं होतं. तिच्या बेफाम वागण्यानं ज्यांना त्रास झाला असेल ते ठराविक साच्यातील विचार करणारे असावेत. जॅनिस अशा लोकांना कधी उमगलीच नाही. तिनं जी कला सादर केली ती मनापासून केली आणि म्हणूनच लोकांना ती आवडली. लग्नेश शनि असूनही ती कधीही निराश झाली नाही. कायम चांगला विचार करून ती आपल्या मार्गानं पुढे जात राहिली. शनिची कोणतीही दृष्टी चंद्रावर नसल्यानं ती कायम प्रसन्न, हसतमुख असायची. मात्र मंगळाची चंद्रावर जी दृष्टी होती त्यामुळे तिचं वागणं कधी कधी अगोचरपणाचं होत असे. स्टेजवर वा बाहेर किंचाळणं, दुकानात चोरी करणं अशा काही गोष्टी तिच्याकडून घडल्या. अर्थात याला तिचं गर्दचं व्यसन कारण असेलही, कारण गर्दच्या अंमलाखाली असताना तिला भान राहिलं नसणार हे उघडच आहे. 

व्ययातले बुध, शुक्र हे तिच्या विलासी आयुष्यासाठी कारण असणारे ग्रह आहेत. सर्वसाधारण फलप्राप्ती पाहता व्ययात जर बुध आणि शुक्र असेल तर व्यक्ती विलासी, व्यसनी होते. अनेकदा ह्यामुळे आर्थिक अडचण भासते पण जॅनिस आर्थिक अडचणीत कधी सापडली नाही. पण व्ययातील ग्रहांमुळे तिची अटक, व्यसनामुळे मृत्यू ह्या गोष्टी काही टाळता आल्या नाहीत. मृत्यूचा कारक मानला गेलेला शनि तिच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी आहे. शानिच्याच महादशेत रवि अंतर्दशेत तिचा मृत्यू ओढवला. व्ययस्थानी रवि असल्यानं व्यसनामुळे तिचा मृत्यू झाला. अष्टमेश बुध तिच्या कुंडलीत रवि बरोबरच आहे. त्यामुळे तिचा मृत्यू घरी न होता एका हॉटेलच्या तिच्या खोलीवर झाला. 

असो, काहीही असलं तरी ती एक प्रतिभावान कलाकार होती आणि मुख्य म्हणजे मुक्त आयुष्य जगणारी होती. मुक्तपणाचा खरा अर्थ तिच्या आयुष्यावरून समजतो. कलेला वाहून घेतलेल्या ह्या सरळ मनाच्या मनस्विनीचा मृत्यू मात्र खूप लवकर झाला. जॅनिस आणखी जगली असती, तर संगीतच काय आणखी काही क्षेत्रात तिनं मानसन्मान मिळवले असते आणि अजूनही आपल्याला खूप काही शिकवलं असतं. पण ह्या चिरतरुण, रांगड्या मुलीला आपण म्हातारी झालेलं, थकलेलं पाहूच शकलो नसतो आणि तिलाही असं उत्तरार्धातलं आयुष्य रुचलं नसतं. कदाचित म्हणूनच कि काय परमेश्वरानं तिला ऐन तारुण्यात, कारकीर्दीच्या शिखरावर असताना बोलावून घेतलं. म्हणजे रसिकांच्या मनातली तिची प्रतिमा कायम राहील. तिच्या या अकल्पित जाण्यानं मला पु. ल. देशपांडे यांनी बेळगावच्या 'रावसाहेब' ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेलं एक वाक्य आठवलं "आपली छोटीशी जीवनं समृद्ध करण्यासाठी देवानं दिलेली ही मोलाची देणगी. न मागता दिली होती, न सांगता परत नेली. "  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

     ===============================================


As I have mentioned in my previous article, I am trying to explain the life of Janis Joplin from an astrological point of view. Though this Rockstar with a stormy personality drew her last breath merely at the age of 27, she achieved everything possible in her short life. It was nothing that she could not achieve, may be it success, money, fame, addictions or even sexual satisfaction. That is why I feel that we can learn a lot from her kundli. 

Janis's kundli is as follows:


In her kundli, Aquarius is the ascendant which is ruled by Saturn. The lord of Ascendant Saturn is situated in the fourth house with Uranus. Thus, if we think about her childhood then Saturn and Moon both are placed at a very good position. The Moon situated in the fifth house in Gemini, shows as a child she never had to struggle in her life. Sun which governs her father and paternal side is also placed in a good condition in the twelfth house. As it is also accompanied by Venus and Mercury, this 'Little Blue Girl' was always supported by her father to meet her ambition. In fact she was influenced by her father. The support by her parents really mattered a lot for her and helped her to achieve her goal in life. On the contrary she was driven by a constant need to please her parents. Once she wrote a letter to her family saying " Weak as it is, I apologize for being just so plain bad in the family."

Saturn and Uranus in the sign of Venus in her kundli gave her enormous but unexpected success. Even Janis once mentioned that she was not expecting such huge success in her life. Most people have a bad impression about Saturn as it tests us and pushes us to our limits. But this is the best example of a good Saturn giving unlimited success to the native. Though this pair of Saturn and Uranus is fully aspecting the 10th house i.e. the house of Karma in her kundli, it also stigmatized her to some extent. This stigmata was precisely due to her audacious behaviour which was a kind of 'spoiled' behaviour for the white collar society. As this Saturn is the lord of Ascendant as well as the twelfth house, she achieved fame and money at a very young age. Saturn in the Rohini Nakshatra proved very auspicious for her. Lord of the art Venus and the fifth house lord Mercury are at a very important position for the success in art in her kundli. Both these planets are placed in the twelfth house. This really helped her in achieving success in different countries. Mercury plays a vital role here. As it governs the speech, it gave her tremendous success due to her unique vocal style, presentation and mainly unrestrained behaviour. She successfully performed at many concerts in different countries. The Scorpio sign in her tenth house gave her some negative results though. She had to face confrontations and split from a few bands. The tenth house lord Mars which is a very aggressive planet sits in the 11th house (house of gains) in the sign of Jupiter. This resulted in the loss in her gains in some or the other way due to her straightforward nature. The second house lord (house of money) Jupiter placed in the fifth house along with the Moon and the fifth house lord Mercury along with Venus are the two main yogas which gave her a huge success. These yogas also made her financially accomplished. It is not possible to review her huge success in music in such a small article. She didn't choose the regular path of the then white singers, but went for the music genre Blues. The music form mainly involved African American performers, but Janis chose the genre as her career. Nonetheless, she is considered as the first Rockstar of America. 

In Janis's kundli, Mars is fully aspecting the fifth house. This house representing the art of the native also has Moon situated there, which lead to a controversial career of this Rockstar. The combined results of the fifth and the seventh house are about the love life and marriage of the native. Jupiter spoils the results of the house where it is placed. So, though the Jupiter placed in her fifth house gave favourable results of the houses which it is aspecting i.e. 5, 7 and the 9th house from it which are gains, prosperity and unclouded nature. It proved to be inauspicious for her lovelife. Combined with the Moon in the fifth house and Rahu in the seventh house, Jupiter didn't allow her to settle in a married life.  Of course this was also the result of her fickle nature and infidelity. I feel her transient nature was also not unexpected due to the Moon in the sign like Gemini. She was not from the category of people who really want to 'settle' down at one point of life. This 'speed freak' was not interested in applying a break to her fast life. And that was the speciality of Janis. Her speedy life was not everybody's cup of tea. So the people who loved her but expected her to be their 'life partner' were badly hurt or disappointed. Due to Pluto in the sixth house and Neptune in the eighth house her seventh house (house of marriage) was in a 'Paapkartari yog'. On the top of it Rahu and Ketu in the seventh and first house respectively proved to be malefic for her married life. Even her parents were not blessed by a harmonious cohabitation with Janis. But Janis purely loved her parents. 

The Jupiter - Moon combination in the fifth house granted her a delicate mind with a power of imagination and creativity. She composed and presented many beautiful, everlasting songs. Due to the Mars completely aspecting the fifth house in her kundli and the fifth house lord Mercury placed in the twelfth house, Janis was completely fearless while talking, in behaviour and also in the presentation of her art. As this Mars is also the third house lord, it made her venturous and gutsy. While living in the then racist era compared to today's world, she never feared to show her friendship with the outcasts. It was a perilous behaviour at the time. Rahu in the seventh house also made her personal life controversial. Her lovers included men and women both including some Afro Americans. I clearly feel that the positions of Moon, Rahu and Mars made her whole life turbulent.  

The Moon placed in Gemini in the fifth house in her kundli says a lot. Importantly she never paid attention to the criticism she faced. The favourably positioned Moon made her a strong minded person, in fact there were hardly any things in life which truly affected her in a negative way or stopped her from achieving her goals. She was never a cry baby who would stop her fast life for anybody. I can surely say that the combination of Moon and Jupiter made her a 'pure' human being with a clean and serene mind. She never purposely went against the flow or deliberately hurt anybody. Jupiter gave her a sinless mind. The people who were hurt due to her behaviour were probably from the typical conservative or narrow minded framework. Such people never understood Janis as a person. Janis always presented her art of music with a pure mind and that was the real reason behind her enormous success. Though her ascendant was Saturn, she was never fidgety or unpleasant. She was always focused and went along her chosen path unbiased. As this Saturn never aspected the Moon in her kundli, she was always smiling and pleasant. Although the Mars aspecting the Moon made her a bit inapprehensible. Though this made her behave abrasively like screaming at times or shoplifting. Of course her drug addiction may have affected her behaviour, as due to drug intake people are influenced in such a way that they are not in their senses at times. 

The presence of Mercury and Venus in the twelfth house made her amative. Commonly when Venus and / or Mercury are present in the twelfth house make the native amative or addicted to luxurious life. Many times such planetary position causes financial trouble but luckily Janis was financially very strong. But the planets in the twelfth house could not stop the activities like her addictions or her arrest. The lord of death, Saturn is situated in her fourth house. She died in the mahadasha of Saturn and antardasha of Sun. The Sun placed in the twelfth house caused her death due to addiction i.e. drug overdose and alcoholism. The eighth house lord Mercury is also placed in the twelfth house along with the Sun. So her death occurred in a hotel room away from her home.

Well, considering all these hard facts in her life we can not forget that Janis was a talented artist and mainly a free bird. We can learn the meaning of 'freedom' from her life. This arbitrary persona and a true artist died too young. If Janis were alive today she would have definitely achieved fame in many fields other than music. She would have taught us many things by her deeds. Nevertheless, I feel even we could not have been able to see this evergreen and sturdy persona, being old or tired or done up. Even she would not have accepted such a life. Perhaps, God has taken her away because we should always remember as a young and electric personality. Her sudden demise has shocked the whole world but I remember a comment by a famous author P. L. Deshpande on the demise of the similar personality named 'Ravsaheb' from Belgavi (India). P. L. Deshpande writes of Ravsaheb's death " This was a gift by God to make our small lives bounteous. He gifted us (with such people) without asking and took (them) away without telling."    

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

      ==============================================