Monday 29 June 2020

जॅनिस जॉप्लिन एक झंझावात.. (Fast and furious.. Janis Joplin)


  
अमेरीकेतील वातावरण मुळातच आकर्षक आहे. विशेषतः ज्यांना व्यक्ती स्वातंत्र्याची आवड आहे, त्यांना हा देश आणि इथलं मोकळं ढाकळं वातावरण नेहमीच भुरळ पाडतं. या मोकळेपणामुळे संगीत क्षेत्रातही अनेक क्रान्तिकारक बदल इथे घडले आणि इथल्या जनतेनं ते मनापासून स्वीकारले. वर्णद्वेष, धर्म, जात असल्या राजकारण्यांच्या हातातील खेळण्यापासून कलाक्षेत्र बऱ्यापैकी सुरक्षित राहिलं. सुरुवातीला काही काळ वर्णद्वेष आणि पुरुषी अहंकाराच्या कचाट्यातून कलाक्षेत्राला बाहेर यायला थोडा अवधी जरूर लागला. १८८० मध्ये शिकागो मध्ये संगीत क्षेत्रातील टीकाकार जॉर्ज अप्टन यांनी त्यांच्या 'विमेन इन म्युझिक' या पुस्तकात मत मांडलं होतं कि " स्त्रियांमध्ये जैविक कारणांमुळे उत्तम संगीत बनवण्याची कला नसते." २०व्या शतकाच्या सुरुवातीला रिचर्ड रूबेलीन आणि रिचर्ड बेल यांनी मत व्यक्त केलं कि आपल्या संगीत क्षेत्राच्या इतिहासात स्त्रियांची नावं (कवियत्री) गाळणं हि एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट झाली आहे. कारण त्या काळात स्त्रियांना पुरुषांनी लिहिलेली गाणी सादर करता येत होती पण संगीत देणं हे स्त्रियांचं कामच नाही असं म्हणून त्यांना कोणतंही पद वा अधिकार दिला जात नसे. हळूहळू बदल घडत गेले आणि रॉक, जॅझ अशा अनेक संगीत प्रकारात स्त्रियांनी नाव गाजवलं. संपूर्ण स्त्रियांचे असे म्युझिक बँड आले.  

रॉक या संगीत प्रकारानं त्या काळच्या तरुण पिढीला अक्षरशः वेड लावलं. यातलंच एक आग्रगण्य नाव म्हणजे जॅनिस जॉप्लिन. अत्यंत बंडखोर स्वभावाची आणि आपल्या बिनधास्त वागण्यानं तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली हि गोड गळ्याची हरहुन्नरी कलाकार, नावारूपाला आली नसती तरच नवल. केवळ एक कलाकार म्हणून तिची ओळख करून द्यायला मी हा लेख लिहिलेला नाही, तर खऱ्या अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्य कसं असावं हे तिच्या आयुष्यावरून शिकता येईल. समाजाच्या चौकटी मोडून आयुष्य झपाट्यानं जगावं हा तिचा बाणा होता, मग भले आयुष्य कमी असलं तरी चालेल. एका स्त्रीनं असं आयुष्य जगणं त्या काळी समाजाला फारसं रुचलं नाही. श्लील अश्लीलतेच्या बंधनात न जगता तिनं आपल्या छोट्या आयुष्यात सारं काही मिळवलं. म्हणूनच तिची कारकीर्द आणि तिच्या कुंडलीचा अभ्यास करून त्यावर माझ्या पद्धतीनं माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे.   

१९ जानेवारी १९४३ रोजी पोर्ट आर्थर, टेक्सस इथे डोरोथी आणि सेथ जॉप्लिन या दाम्पत्याला जॅनिस हे कन्यारत्न झालं. किशोर वयातच काही बहिष्कृत लोकांशी तिची मैत्री झाली. त्यांचा ग्रुप ब्लूज (Blues) ह्या आफ्रिकन अमेरीकन लोकांच्या संगीत प्रकाराचे कार्यक्रम करत होता. त्या मित्र परीवारामुळेच आपण संगीत क्षेत्राकडे वळलो असं जॅनिस आवर्जून सांगत असे. तिनं शाळेत असतानाच ब्लूज आणि लोकसंगीत गायला सुरुवात केली. त्यामुळे तिला शाळेत अनेकदा वाळीत टाकलं गेलं. ती खूप जाड होती आणि मुरुमं झाल्यामुळे तिच्या अंगावर इतके डाग पडले कि तिला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. कृष्ण वर्णीय लोकांशी केलेल्या मैत्रीमुळे तिला शाळेत पिग, फ्रीक, निग्गा लव्हर, क्रीप अशी नावं पडली, ज्याची तिनं फारशी फिकीर केली नाही. याच काळात अनेक व्यक्तींशी मुक्तपणे ठेवलेल्या शारीरिक संबंधांमुळे तिची बदनामी झाली. एक अत्यंत जहाल मुलगी जिला दारू प्यायला खूप आवडतं अशी तिची जणू व्याख्याच बनून गेली. समाजाच्या चौकटीत ती कधी बसलीच नाही. त्या काळचं कॉलेज कॅम्पसचं वृत्तपत्र द डेली टेक्सन यात २७ जुलै १९६२ रोजी "She Dares to be Different" या मथळ्याखाली तिच्या बिनधास्त वागण्याचं वर्णन केलं. ती हवं तेव्हा अनवाणी येते, हवी तेव्हा लेविस (जिन्स) घालते, जवळ हार्प ठेवते म्हणजे पाहिजे तेव्हा गाणं म्हणता येईल. जिचं नाव आहे जॅनिस जॉप्लिन. अशी हि माहिती होती. अतिशय लहान वयात दारू, सिगारेट, गर्द अशा सर्व व्यसनांचा मनसोक्त उपभोग घ्यायला तिनं सुरुवात केली. खूप दारू पिऊन नशेत असताना तिनं पाहिलं गाणं लिहिलं (डिसेंबर १९६२) जे तिचं पाहिलं ध्वनि मुद्रित गाणं आहे "What Good Can Drinkin' Do". त्यानंतर १९६३ आणि १९६४ मध्ये तिने अनेक प्रसिद्ध गाणी गायली जेव्हा ती टेक्सस सोडून सॅन फ्रॅन्सिस्कोला आली होती. 

१९६३ मध्ये ऑस्टिन मध्ये कलाक्षेत्राचं शिक्षण घेत असताना तिला The Ugliest Man on Campus हे नाव पडलं. तिचं रांगडं रूप आणि कृष्णवर्णीय लोकांशी मैत्री यामुळे त्या काळच्या गोऱ्या समाजाला ती खटकत होती. तिचं नावारूपाला येणं अनेकांना पाहवत नव्हतं. त्याच सुमारास दुकानात वस्तू चोरताना तिला अटक झाली. त्यानंतर तिचं गर्दचं व्यसन खूप वाढलं. तिचं वजन ४० किलो झालं. मग १९६५ मध्ये तिनं काही काळ व्यसनांपासून दूर रहायचं ठरवलं. १९६५ मध्ये तिनं पीटर दे ब्लांक बरोबर साखरपुडा केला. पण काही काळानं त्यानं तिला नकार दिला. १९६५ - ६६ मध्ये तिनं मानसोपचार तज्ज्ञाकडून काही उपचार घेतले. त्या संस्थेला जॅनिसच्या मृत्यूनंतर तिच्या स्मरणार्थ 'युनाइटेड वे' असं नाव देण्यात आलं. पण व्यसनांपासून लांब राहणं काही फार काळ टिकलं नाही. जॅनिसच्या मते तिला व्यसनांपासून दूर राहून गाणी म्हणायचं बंद करायचं झालं तर ती एक साधी स्त्री बनून एक साधी नोकरी मग लग्न मग आई होणं असं सामान्य आयुष्य जगेल, जे तिला नको होतं. त्यानंतर अनेक म्युझिक बँड्स मध्ये तिनं आपली कला सादर करून खूप नाव मिळवलं. तिच्या गाण्याची कारकीर्द इतकी मोठी आहे कि इथे सगळं लिहिणं शक्यच नाही. तिच्या आवाजाची जातकुळी नेहमीची नसल्यानं आणि तिच्या सुंदर गीत रचनेनं तिनं लोकांच्या मनात पट्कन घर केलं. Big Brother and the Holding Company सारख्या मोठ्या बँड बरोबर तिनं केलेलं काम खूप गाजलं. त्या आधी तिनं सात गाणी स्वतः गिटार वाजवून मुद्रित केली जी तिच्या मरणानंतर 'This is Janis Joplin 1965' या नावानं १९९५ मध्ये नवीन अल्बम म्हणून जेम्स गर्ले यांनी पुनः प्रसारीत केली. ज्यात तिनं स्वतः लिहिलेलं एक गीतही होतं. ३१ जुलै १९६८ रोजी तिचा टीव्हीवर पहिला कार्यक्रम झाला. त्याच्या २ महिने आधी Vogue मासिकात रिचर्ड गोल्डस्टिन या नामांकित वृत्तपत्रकारानं तिचं खूप कौतुक केलं होतं. १९६८ च्या काळात तिच्या दारूच्या व्यसनामुळे तिला काही ठिकाणी संघर्ष करावा लागला. अनेकदा ती दारूच्या आहारी असताना कार्यक्रम करत असे ज्यामुळे वादावादी होऊन तिला आधीच्या ग्रुपपासून वेगळं व्हावं लागलं. पण डगमगेल ती जॅनिस कुठली. तिनं Kozmic Blues Band नावाचा स्वतःचा एक ग्रुप तयार केला आणि एकटीच्या जीवावर काही कलाकारांना हाताशी धरून अनेक सुंदर गाणी सादर केली. देशोदेशी तिनं कार्यक्रम केले. इंग्लंड, ब्राझील अशा अनेक ठिकाणी केलेले तिचे कार्यक्रम गाजले. अनेक पत्रकारांना तिनं बिनधास्त मुलाखती दिल्या. कोणताही आडपडदा न ठेवता तिनं आपले विचार मांडले. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही तिच्या गाण्यापेक्षा बिनधास्त वागण्यामुळे ती जास्त चर्चेत राहिली. 

समाजातलं वागणं असो वा शारीरिक संबंध जॅनिस मोकळेपणानं वागत आली. मनस्वी लोकांचे अनेक किस्से आपण ऐकतो. काही खरोखर मनस्वी असतात तर काही लोक मी मनस्वी आहे हे दाखवण्यात धन्यता मानतात, मात्र एका मर्यादेपुढे त्यांची नाटकं चालत नाहीत. कारण त्यांना सामाजिक भान असतं, केवळ प्रसिद्धीसाठी ते असं करतात. पण जॅनिस खऱ्या अर्थानं मनस्विनी होती. तिनं आपलं बेभान आयुष्य कोणत्याही बंधनासाठी सोडलं नाही. किंबहुना ती बेभान झाली आहे हे तिच्या लेखी महत्त्वाचं नव्हतं कारण ते तिच्यासाठी नेहमीचंच होतं.         
तिचे पुरुष आणि स्त्रिया दोहोंशीही संबंध असत हे तिनं कधीही लपवलं नाही. तिचं खाजगी आयुष्यही वादग्रस्तच राहिलं. १९६३ मध्ये जे व्हिटेकर नावाच्या एका कृष्णवर्णीय स्त्रीबरोबर ती राहत होती. पण जॅनिसचं गर्दचं व्यसन आणि इतरांशी असलेले शारीरिक संबंध यामुळे जे तिच्या आयुष्यातून निघून गेली. पेगी कासेरटा बरोबर नंतर तिचे संबंध जुळले. जे जॅनिसच्या मरणापर्यंत होते पण त्यात खूप चढ उतार आले. पेगीनं तिच्या आणि जॅनिसच्या एकत्र आयुष्याबद्दल पुस्तकही लिहिलं आणि अनेक मुलाखतीही दिल्या. पुरुषांबद्दल बोलायचं तर तिच्या आयुष्यात अनेक पुरुष आले ज्यात संगीतकार लिओनार्ड कोहेन, टॉक शो करणारे डिक कॅव्हेट, संगीतकार कंट्री जो मॅकडॉनल्ड, कादंबरीकार सेथ मॉर्गन अशी काही नावं आहेत. सेथ मॉर्गन यांच्याबरोबर ती विवाह करणार होती. १९७० मध्ये मरणाच्या थोडं आधी ती ब्राझीलमध्ये असताना डेव्हिड नीहोस नावाच्या एका सामान्य अमेरीकन व्यक्तीशी तिची ओळख झाली. त्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि डेव्हिडनं तिला गर्द (हेरॉईन) पासून दूर केलं. पण लवकरच तिनं परत व्यसन सुरु केलं आणि डेव्हिड तिच्यापासून दूर गेला. पण त्यानं तिच्यावर प्रेम करणं थांबवलं नाही. जॅनिसच्या मृत्यूनंतर तिच्या हॉटेलवर त्याचं पत्र आलं ज्यात त्यानं त्याच्या प्रेमाची कबुली देऊन तिला माहित नाही इतकं प्रेम तिच्यावर करत असल्याचं सांगितलं. जॅनिसवर चित्रपट बनवणाऱ्या ऍमी बर्ग यांच्या मते ते पत्र जॅनिसला मिळालं असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. काहीही असलं तरी तिच्या संपूर्ण आयुष्यात समाजाला माहित असलेल्या साच्यात ती कधी अडकलीच नाही.           


जॅनिसला घाबरणं जणू माहितच नव्हतं. एका पार्टीमध्ये ख्यातनाम संगीतकार जिम मॉरीसन यांचं काही वागणं तिला पटलं नाही तेव्हा तिनं सरळ एक दारूची बाटली त्यांच्या डोक्यावर फोडली. बॉब साईडमन या प्रसिद्ध फोटोग्राफरनं जेव्हा तिला अंगातील शर्ट काढून फोटो काढायला सांगितलं तेव्हा तिनं तिला नग्नावस्थेत फोटो द्यायला आवडेल असं सांगितलं. इतकंच नाही तर एकदा जेव्हा एका कार्यक्रमाला तिला उशीर झाला तेव्हा तिनं सरळ ती सेक्स करत असल्यानं उशीर झाला असं सांगितलं. अनेकदा ह्या कारणामुळे ती अंतर्वस्त्र न घालता स्टेजवर येऊन कार्यक्रम सादर करत असे. तिच्या ह्या बिनधास्त वागण्याचे अनेक किस्से आहेत. आणि ह्यामुळेच अनेक ठिकाणी तिची बदनामी किंवा पुरुषांनी तिला गृहीत धरण्याचे प्रकारही घडले. जॅनिसला स्टेजवर वा इतर वेळीही किंचाळायला फार आवडायचं. एकदा फ्लोरीडामध्ये कार्यक्रम असताना ती पोलिसांवर इतकी ओरडली कि तिला शेवटी अटक करावं लागलं.              
    
जॅनिस नावाच्या या वादळी व्यक्तीची एक नाजूक बाजूही होती. तिला चित्रकारीता आणि कविता करायला खूप आवडायचं. त्या काळच्या समाजात बंडखोरी करून कृष्णवर्णीय लोकांवर आपलं प्रेम व्यक्त करायला तिनं कधीच मागेपुढे पाहिलं नाही. ब्लूज या संगीत प्रकारची महाराणी असलेली बेस्सी स्मिथ हि कृष्णवर्णीय गायिका जॅनिसची आदर्श होती. बेस्सीचं १९३७ सालीच निधन झालं होतं. पण जेव्हा जॅनिसला कळलं कि तिला दफन करताना चांगली जागा मिळाली नाहीये तेव्हा जॅनिसनं स्वखर्चानं तिला सन्मानपूर्वक जागा उपलब्ध करून दिली आणि तिच्या थडग्यावर  “The Greatest Blues Singer in the World Will Never Stop Singing.” कोरून घेतलं. मी म्हणजे बेस्सीचाच पुनर्जन्म आहे असं ती अभिमानानं सांगत असे.  

मुद्दाम प्रवाहाच्या विरोधात जायचं म्हणून जॅनिस अशी कधीच वागली नाही. अगदी सहजतेनं गोष्टी घडत गेल्या. तिची व्यसनं, बेभान होणं, स्वच्छंद वागणं सारं काही सहाजवस्थेतच होतं, म्हणूनच तिचा कोणाला कधी राग आला नाही. मनसोक्त आयुष्य जगणाऱ्या या मनस्विनीचा मृत्यूही सगळ्यांना चटका लावून गेला. ४ ऑक्टोबर १९७० रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी तिचं निधन झालं. हॉलिवूडच्या लँडमार्क हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत असताना गर्दच्या अतिसेवनामुळे (Drug overdose) तिचा प्राण गेला. ज्या बेभानपणाच्या आधारावर ती मनस्वी आयुष्य जगली त्या बेभानपणानेच तिचा जीव घेतला. म्हणूनच ती खऱ्या अर्थानं मनस्विनी होती. तिच्यावर अनेक चित्रपट, पुस्तकं सारं काही नंतर आलं. पण मरणानंतरही तिनं 'वेगळेपण' काही सोडलं नाही. वयाच्या २७व्या वर्षी अनेक कलाकार या ना त्या कारणानं मरण पावले आहेत. अशा व्यक्तींचा, विशेषतः कलाकारांचा एक 'क्लब'च तयार झाला ज्याला 'The 27 Club' म्हणतात. आणि रॉक संगीताची ही अभिषिक्त सम्राज्ञी या क्लबची पहिली सदस्य आहे. म्हणजे इथेही तिनं आपलं वर्चस्व गाजवलं. तिचा मृत्यू 'दुर्दैवी' होता असं मी कधीही म्हणणार नाही. तिनं ओढवून घेतलेलं ते मरण होतं. पण याची पूर्ण कल्पना असूनही जॅनिस मुक्तपणे बागडत राहिली. एका वेगळ्या जातकुळीच्या आवाजाची मधुर भेट तिनं आपल्याला दिली आहे, जी कायम स्मरणात राहील. या वेड्या बागड्या मुलीनं मरणाच्या ३ दिवस आधी म्हणजे १ ऑक्टोबरला आपल्या मृत्युपत्रात बदल केले. त्यात तिनं तिच्या मरणानंतर आपल्या जवळच्या मित्र परिवारासाठी २५०० डॉलर्स एव्हढी मोठी रक्कम ठेवली. तिच्या जाण्याचं दुःख न करता त्यांनी कॅलिफोर्निया मधील तिच्या आवडत्या पबमध्ये रात्रभर एक मोठी पार्टी करून जल्लोष करावा यासाठी ते पैसे ठेवले होते. "यामुळे माझा मित्र परीवार माझ्यानंतर एक जल्लोष करू शकेल" असं तिनं नमूद केलं होतं. 

अमेरीकेची पहिली रॉकस्टार म्हणून आजही तिच्याकडे आदरानं पाहिलं जातं. अशा ह्या रांगड्या प्रतिभेला आणि मनस्वी कलाकाराला माझा सलाम. 

जॅनिस जॉप्लिन तू कायम आमच्या स्मरणात राहशील !!!                                

जॅनिसच्या कुंडलीबद्दल पुढील लेखात मी सविस्तर माहिती देणार आहे.   

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
      ============================================

America had been and remained an all time attraction for many people across the globe. Individual freedom here aspires to be universal. The freedom and the liberty of the culture always fascinates the world. Due to the opportunity for prosperity which is the ethos of the nation, many revolutionary changes in the field of music occurred here and the people accepted them without hesitation. The field of art was luckily in the safer hands and was a bit away from the political gewgaw like racism, religious intolerance etc. Of course in the early 1900's it took a bit of time to come out of racism and the image of being a man's world. In 1880 Chicago music critic George P. Upton argued in his book Women in Music that "Women lacked the innate creativity to compose good music". In the 20th century Richard A. Reublin and Richard G. Beil opined that "Lack of mention of women (songwriters) is a glaring and embarrassing omission in our musical heritage." In the earlier era, women were allowed to perform on the songs composed and written by males. But women composers were significantly underrepresented in the music repertoire just due to being women. Slowly many female artists emerged and conquered the world of music including Rock, Jazz etc. All-female bands also started at the same time and gained a huge popularity.

Rock music revolutionized the musical taste of the young generation. Janis Joplin is one of the pre-eminent name in the world of Rock n Roll. No wonder this rebellious and audacious singer with a unique vocal style, immediately captured the heart of the audience and became the heartthrob to the young generation. I haven't written this article to just introduce the readers to Janis as a singer, but one can learn about the true meaning of 'freedom' from her life. She always wanted to live a fast and furious life breaking the walls of the society, though it was at the cost of her life. The bolishie girl was not easy to digest for the white collar society. This raw talent achieved everything in her short life without getting bound into the etiquettes of the society, which seemed tasteless to her. Here, I am trying to explain her career and life from an astrological point of view.  

On 19th January 1943 at Port Arthur, Texas Dorothy and Seth Joplin were blessed with the baby girl named Janis. As a teenager she befriended a group of outcasts. The group performed in albums mainly in the Blues genre, which is an African-American folk music. She always mentioned that this group influenced her decision to become a singer. In her school days she began singing Blues and folk music. So she was ostracized and bullied in high school. After some time she became overweight and suffered so badly from acne that she required a surgery. Due to the close relationship with many black friends she was routinely taunted and called names like pig, freak, nigga lover, creep etc. but she naver bothered about it. Due to her reputation of being sexually promiscuous she faced a lot of vilification. Janis was known as a 'tough girl who likes to drink.' She didn't fit in with her peers...never. The campus newspaper, The Daily Texan, ran a profile of her in the issue dated July 27, 1962, headlined "She Dares to Be Different." The article began, "She goes barefooted when she feels like it, wears Levis to class because they're more comfortable, and carries her autoharp with her everywhere she goes so that in case she gets the urge to break into song, it will be handy. Her name is Janis Joplin." Janis started enjoying drugs, cigarettes and booze from a very early age. Her first song "What Good Can Drinkin' Do" was recorded in December 1962, when according to her it was written by her when she drank herself into a stupor. Then she recorded numerous hits in 1963 and 1964 when she left Texas for San Francisco. In 1963 while studying at the University of Austin, she was voted as The Ugliest Man on Campus. The racist white community could not tolerate her friendship with Afro Americans as well as the sturdy looks of a female musician. Many conservative people were jealous of her success. Then drug and alcohol fueled performances of this front woman of the band started causing trouble. In 1965 when her weight was reduced to just 40 kg, she tried to lead a sober life. In the same year she got engaged to Peter de Blanc. But after some time he rejected her and moved on in his life. In 1965 - 66 she had regular sessions with a psychiatric social worker in a counseling agency. This agency changed its name to 'United Way' after her death. Well, this sober lifestyle was really short lived. According to Janis if she were to live a sober life and avoid singing professionally, she would have to become a keypunch operator (as she had done a few years earlier) or a secretary, and then a wife and mother, and she would have to become very similar to all the other women in Port Arthur. Of Course which she never imagined. Then she performed in various bands and achieved huge success becoming the first female Rockstar of America. Her career in music is so vast that it is not possible to mention the details in a small article. She became the talisman of the youth due to her songwriting talent and a unique vocal ability. She became the lead singer of the famous band, Big Brother and the Holding Company. This gave her enormous fame and success. Before joining the band, she recorded seven studio tracks with her acoustic guitar. These tracks were later issued as a new album in 1995, titled This is Janis Joplin 1965 by James Gurley. Amongst the songs were a famous song composed by her. On 31 July 1968 she made her first nationwide television appearance. Just 2 months before her appearance, Richard Goldstein praised her in the May issue of Vogue. Around 1968 was the time when Janis started to struggle due to her alcohol and drug abuse. This was amongst the major reasons for her splitting from the Big Brother and the Holding Company. Then she formed the Kozmic Blues Band composed of many talented artists, which also gained huge popularity. She performed in various countries like the UK, Brazil etc. She gave many unafraid interviews and bold photoshoots. She fearlessly expressed her thoughts in her interviews. Even though she was at the peak of her career as the Queen of Rock, she caught more attention due to her audacious behaviour. 

May be the fearless behaviour or bisexual nature, Janis was always arbitrary and sometimes erratic. We often hear about people who are subject to anecdotes. But very few people are really arbitrate,  others are just faking their stories merely to remain in gossip. After a certain limit they can't continue with their imposture as they have social consciousness. Well, Janis was truly arbitrary and wild. She never stopped living her wild lifestyle for any fake consciousness as she never had one. The wildness was so normal for her that she casually thrust aside the social values.  


Janis never tried to hide her bisexual nature. She had troubled relationships with both men and women. In 1963 she briefly lived with an African American woman named Jae Whitaker. But she broke off their relationship because of Janis's hard drug use and sexual relationships with other people.  Janis then began a romantic relationship with Peggy Caserta. This on again off again relationship continued till Janis's death. Later, Peggy authored books and gave various interviews on their relationship. Regarding men in Janis's life, there are many names including notable celebrities like musician Leonard Cohen, talk show host Dick Cavett, musician Country Joe Mcdonald, novelist Seth Morgan and many more. Janis was all set to get married to Seth Morgan near the end of her life. In 1970 (just before her death) she went to Brazil and met a middle-class American traveller, David Niehaus. When David helped Janis kick her habit of drugs and alcohol, they fell in love. But their relationship suffered when she again started using drugs. In spite of this he never fell out of love. When Janis died in a hotel room, a telegraph from David was found. It wrote "Love you Mama, more than you know…". According to Amy Berg, who later made a film on Janis's life, thought that the things would have turned out differently if Janis had received it. Nonetheless, Janis could not mold herself in the mediocre lifestyle which could have been easily accepted by the society.            

'Fear' was the word which never appeared in the dictionary of this raw talent. Once at a party held, Janis was turned off by famous musician Jim Morrison’s obnoxious behavior. When she lost her temper, she hit him over the head with a bottle of booze. When photographer Bob Seidemann asked Janis if she’d pose topless for him to make a statement about the idealism of hippie culture, she said she would rather pose completely naked. Moreover, she wasn’t shy about showing off her body to her audiences. Once she was late to the stage because she had been having sex in her dressing room. When she appeared on the stage, she was not wearing her underwear. Janis has a rich store of such anecdotes. This not only caused the defamation but men were not hesitant to sexually advance. Janis always liked to scream on or off the stage. During one concert in Florida, she shouted obscenities at the police. It turned out so bad that she got arrested after the concert. 

This stormy persona had a delicate side which very few people know about. She liked painting and poetry. She rebelliously expressed her love for her African American friends, which was not accepted by the then racist society. The Empress of the Blues, African American artist Bessie Smith was her idol. Sadly she expired in 1937 but was buried in an unmarked grave. This bothered Janis to such an extent that she paid for a tombstone to be erected, with the epitaph, “The Greatest Blues Singer in the World Will Never Stop Singing.” Janis proudly told her friends that she believed she was Smith’s reincarnation.    

Janis never purposely went against the flow. It just happened with her naturally... smoothly..Her addictions, her audacious behaviour and entirely arbitrary behaviour was so natural that nobody hated her for all this. This wayward died too young, shocking everybody when the 'speed freak' permanently came to a standstill. On October 4th 1970, merely at the age of 27, she was found dead in her room in Hollywood's Landmark Motor Hotel due to drug overdose. Alcohol was also found in her blood. Unbridled passion was the driving force of her life and the same took her life. That is why she was literally arbitrary. There were many movies and books written about her life. But Janis truly exceptional, even after her death. There are many celebrities who died at the age of 27, leading to the collective name 'The 27 Club'. Janis the Queen of Rock, is the first member of this club. She dominated even after her death. I will never say that her death was unfortunate as she knowingly approached the death. Though she had an idea of the outcome of her outrageous behaviour, she continued to be like that. Her unique vocal style was a gift for the music lovers. This 'madwoman' made a few changes in her will just 3 days before her death i.e. on 1st October. In her will, she left her friends and family $2,500 to throw a wake party at her favourite bar in California. She mentioned "So my friends can get blasted after I'm gone." 

She is indeed America's first Rockstar. I salute her unbound, fearless persona and everlasting voice. 

Miss you JANIS JOPLIN !!!

I will try and explain the life of Janis from astrological point of view in my next article.     

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
     ===============================================