Saturday, 12 October 2019

उत्स्फूर्त मानवी दहन- एक वैज्ञानिक  दृष्टिकोन (Spontaneous Human Combustion- A scientific view)  

   


Spontaneous Human Combustion (SHC) याला मराठीत वैज्ञानिक प्रतिशब्द मला सापडला नसला तरी त्याचं योग्य भाषांतर करून आपण 'उत्स्फूर्त मानवी दहन' असं म्हणूया. अनेक शतकांपासून कथितरित्या उत्स्फूर्त मानवी दहनाचे अनेक दावे केले गेले आहेत, तरीही ही घटना एक गूढ आणि अज्ञात म्हणूनच पहिली जाते. जरी अनेक वेळा ही घटना घडल्याचं लोक सांगत आले आहेत आणि अनेकांनी यावर संशोधनही केलं आहे तरी उत्स्फूर्त मानवी दहनाला एक नैसर्गिक घटना म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी मान्यता दिलेली नाही. आता हे उत्स्फूर्त मानवी दहन म्हणजे नक्की काय? तर व्याख्येनुसार कोणत्याही सदृश्य ज्वलनाच्या स्त्रोताशिवाय मनुष्य देहाचं (जिवंत अथवा नुकतेच मृत) होणारे दहन. बहुतांशी यात शरीराचा एखादा भाग जळून राख होतो पण क्वचित संपूर्ण शरीर जळून भस्म होतं. ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याने शोधकर्ता अजूनही या संभ्रमात आहेत की ही घटना नेमकी कोणत्या श्रेणीत असावी आणि याचे वैज्ञानिक निकष काय असावेत. असो, काही प्रमाणित संदर्भ आणि माझं ज्योतिष शास्त्र आणि विज्ञान याचं ज्ञान यांची सांगड घालून मी उत्स्फूर्त मानवी दहनाची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत आहे.          

प्रथम मी वैज्ञानिक दृष्टिकोनातून माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्स्फूर्त मानवी दहनावर अनेक गृहीतकं आहेत पण माझ्या मते त्यातील एकही सिद्धांत सर्वांगाने याचं स्पष्टीकरण देत नाही.    

ती गृहीतकं पुढील प्रमाणे आहेत. काही तज्ज्ञांचे जे सिद्धांत आहेत त्यात उत्स्फूर्त मानवी दहनाची कारणं दिली आहेत. उदा: बाह्य प्रज्वलन घटक म्हणजे मेणबत्त्या, सिगारेट, भाजणे इत्यादी जे ज्वलनाला पोषक ठरतात. शरीरावरील जखमा वा भाजल्यामुळे त्वचेखालील चरबी बाहेर पडते ती दिव्यातील वातीप्रमाणे काम करते आणि ज्वलनाला सहाय्य करते (wick effect). शरीरातील प्रथिनेही जळतात (चरबी पेक्षा कमी) परंतु शरीरातील पाण्यामुळे त्यांच्या ज्वलन प्रक्रियेत अडथळे येतात. जर बळी पडलेल्या व्यक्तीच्या रक्तात मद्याचे प्रमाण जास्त असेल तर ते प्रज्वलनासाठी अत्यंत पोषक ठरतं. यातील गोम अशी आहे की अशा वेळी बळी पडलेल्या व्यक्तीच्या जवळपास असलेल्या गोष्टी उदा: फर्निचर, गादी अशा ज्वलनशील गोष्टींना फारसा धक्का पोचलेला दिसत नाही. आणखी एका मतानुसार अनेक वर्षांचे मद्यपान किंवा कमी कार्बोदकांचा आहार अशामुळे केटोसिस हा रोग होऊन शरीरात ॲसिटोन या अत्यंत ज्वलनशील पदार्थाचे प्रमाण वाढून उत्स्फूर्त मानवी दहन घडू शकतं. काही सिध्दांतांनुसार मानवी आतड्यात तयार होणाऱ्या मिथेन गॅसच्या प्रमाणाबाहेरील उत्पादनामुळे मानवी शरीर अचानकरित्या पेट घेऊ शकतं. 

वरील जवळपास सर्वच सिद्धांत मला अशक्य किंवा अपूर्ण वाटतात आणि याची कारणंही मी येथे देत आहे. अंदाजे ७०% पाणी असलेलं मनुष्य शरीर जळणं हे निश्चितच सावकाश घडणारी प्रक्रिया आहे. आणि जर जिवंत मनुष्याचं शरीर जळलं तर यात मिळणारा वेळ जास्त असल्याने ती व्यक्ती आपलं संरक्षण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्य शरीराची राख होण्यासाठी खूप जास्त तापमानाची गरज असते. इतक्या उच्च तापमानामुळे मनुष्याच्या आजूबाजूच्या गोष्टी नक्कीच जास्त प्रमाणात जळतील. पण उत्स्फूर्त मानवी दहनाच्या दाव्यांमध्ये अशी माहिती मिळत नाही. केटोसिसच्या सिध्दांता बद्दल बोलायचं तर शरीरात असलेलं केटोनचं प्रमाण कितीही जास्त असलं तरी उत्स्फूर्त मानवी दहनासाठी लागणाऱ्या तापमानाच्या दृष्टीनं ते पुरेसं नाही. काही मि.ली. मध्ये असणारे केटोन इंधन बनून संपूर्ण मनुष्य देहाचं भस्म करतील हे गणित मला पटत नाही. यासाठी मनुष्य देहाचं दहन समजून घेऊ. मी हिंदू धर्मीय असल्याने आमच्या धर्मानुसार मृत्यूनंतर असणारा विधी म्हणजेच दहन मी जवळून पाहिलं आहे. मनुष्य देहाचं संपूर्ण दहन होण्यासाठी इंधन, प्रज्वलन साहित्य, उच्च तापमान, ऑक्सिजनशी संयोग होण्याची प्रक्रिया अशा अनेक घटकांची गरज असते. ही काही सोपी किंवा त्वरित घडणारी प्रक्रिया नाही. म्हणूनच मनुष्य देहाचं संपूर्ण ज्वलन होणं ही उत्स्फूर्त मानवी दहनामागील कल्पना हा कदाचित शक्य असणारा सिद्धांत असूही शकेल पण या प्रक्रियेतील भयंकर ज्वलनाचं स्पष्टीकरण वरील कोणत्याही गृहीतकात सर्वांगानं दिलं गेलेलं नाही हे स्पष्ट आहे. याचाच आपण दुसऱ्या बाजूनं विचार करू. रोज धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांची संख्या किती आहे याचा विचार करू. प्रत्यक्षात बघायचं तर बहुतांशी मद्य सेवन करणारे धूम्रपानही करतात. रक्तातील अल्कोहोलची पातळी जास्त असलेले अनेक लोक गाडी चालवतात, स्वयंपाक करतात, धूम्रपान करतात किंवा अशा अनेक गोष्टी करतात ज्याचा अग्नीशी जवळचा संबंध येतो. यातील अनेक व्यक्तींना केटोसिस असतो तसेच त्यांच्याही शरीरातील आतडी मिथेन गॅस उत्पादन करतात हे काही वेगळं सांगायला नको. मग इतके शारीरिक दृष्ट्या संवेदनात्मक लोक असतानाही उत्स्फूर्त मानवी दहनाचे इतके कमी बळी का आहेत? अजून खोलात जायचं तर रक्तात जास्त अल्कोहोल असणारे अनेक लोक नापर्वाईने गाडी चालवतात, त्यांचे काही वेळा अपघात होतात व गाड्या पेट घेतात. जर मेणबत्ती वा सिगारेट सारख्या छोट्या वस्तू प्रज्वलनाला कारणीभूत ठरतात तर गाडी सारख्या मोठ्या वस्तू का नाही? अनेक अपघातातील व्यक्ती (मद्यपान केलेल्या) भाजतात पण बव्हंशी बऱ्या होतात परंतु त्यांच्या शरीराची राख होत नाही. मग उत्स्फूर्त मानवी दहनामागील महत्त्वाचं कारण तरी कोणतं आहे? माझ्या मते हे कारण म्हणजे केवळ मद्यपान किंवा केटोन नक्कीच नाही. मी वरील सर्व सिद्धांत तत्परतेने नाकारत नसले तरी हे सिद्धांत जसेच्या तसे स्वीकारणं मला पटत नाही.                                        

एक सिद्धांत मात्र थोडा तर्कसंगत वाटतो तो म्हणजे MCAS. एका मास्ट पेशींवरील संशोधकानं एक सिद्धांत मांडला आहे. एका दुर्मिळ रोगात  Mast Cell Activation Syndrome (MCAS), मास्ट पेशी जास्त प्रमाणात मेडिएटर्स उत्पादित करतात उदा: नॉरएपीनेफ्रीन. या नॉरएपीनेफ्रीनच्या अतिस्त्रावामुळे ॲडिपोस पेशींत ऊष्मा वाढून ॲडिपोस टिश्यू जळू लागतात व त्या अस्थिमज्जा (bone marrow) सकट जाळतात. पण अजूनही MCAS ही प्रक्रिया अजूनही संशोधनाखालीच आहे याची नोंद घ्यावी. आता MCAS हे उत्स्फूर्त मानवी दहनाचे कारण बनू शकते का याचा विचार करू. या MCAS मुळे मास्ट पेशी अतिप्रमाणात काम करत असल्या तरी त्यामुळे मानवी शरीराची जळून राख होणे ही थोडी अतिशयोक्ती वाटते. एका शास्त्रज्ञाच्या मते या अप्रमाणित नॉरएपीनेफ्रीन मुळे ९० डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होऊन ॲडिपोस पेशी जळू लागतात. आता व्यावहारिक विचार करता मनुष्य देह जाळण्यास किमान १५०० डिग्री सेल्सिअसची गरज असते. म्हणूनच मला वाटते की MCAS हे उत्स्फूर्त मानवी दहनाच्या कारणाशी संबंधित असू शकते पण हे त्याचे सर्वस्वी एकच कारण नाही.     

आता उत्स्फूर्त मानवी दहनाच्या कारणांचा विचार करून मी माझी मते येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एक सूक्ष्मजीव शास्त्राची अभ्यासक म्हणून माझं मत आहे की ही घटना मानवी शरीरातील उष्मा तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या जनुकांमधील दुर्मिळ उत्परिवर्तनामुळे घडण्याची शक्यता जास्त आहे. अनियंत्रित उष्मा उत्पादन प्रक्रिया ज्यात नॉरएपीनेफ्रीनचा मुख्य समावेश असतो त्यातील दोषामुळे असे दहन होऊ शकते. म्हणूनच वरील MCAS हा सिद्धांत मला उत्स्फूर्त मानवी दहनाच्या कारणाच्या अगदी जवळपासचा वाटतो पण सर्वस्वी तेच कारण मला वाटत नाही. मानवी शरीरातील उष्मा उत्पादन वयानुसार बदलत जाते. म्हणूनच यासंदर्भातील जनुकीय कारणांचा अजून सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. मद्यपान, धूम्रपान वा इतर बाह्य प्रज्वलनाची कारणं मला योग्य वाटत नाहीत. उत्स्फूर्त मानवी दहनाच्यावेळी वाढलेलं अति तापमान इतक्या सहजासहजी साध्या दोषांमुळे गाठणं शरीराला शक्य नाही. असं इतक्या कमी वेळात शारीरिक तापमान इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलं असतं तर याचे अनेक बळी पडले असते. पण या घटनांची दुर्मिळता हेच सांगते की ही अत्यंत दुर्मिळ घटना असून याच्या कारणांची संपूर्ण मीमांसा करणं आवश्यक आहे.    

दुसरा मुद्दा असा की मानवी शरीरातील सूक्ष्म पेशींमधील अनेक प्रक्रियांचा शोध विज्ञानाला अजून लागायचा आहे. तेव्हा मोकळ्या मनाने विचार करता एखाद्या वेगळ्याच कारणाचा शोध भविष्यात लागू शकेल. केवळ उष्मा निर्मितीच नव्हे तर एखादी वेगळीच प्रक्रिया अशा मानवी दहनाला कारण असू शकेल. आत्ता ही अतिशयोक्ती वाटली तरी भविष्यात मानवी शरीरावरील वेगळे शोध, मज्जासंस्था वा संप्रेरकांची कार्यपद्धती अशा अनेक गोष्टींचा शोध लागल्यावर आपण उत्स्फूर्त मानवी दहन एका वेगळ्या दृष्टिकोनातून समजू शकू.    

शेवटी मी एव्हढंच म्हणेन की सध्याच्या वैज्ञानिक पातळीवर तरी उत्स्फूर्त मानवी दहनाला एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून स्वीकारणं थोडं कठीण आहे. मी घाईघाईने कोणताही सिद्धांत पूर्णपणे नाकारत नाही. तरीही नेमक्या उत्स्फूर्त मानवी दहनाच्या वेळचा कोणताही भक्कम सिद्धांत, साक्षीदार, पुरावे, फोटो वा व्हिडिओ क्लिप यांच्या अभावी या घटनांना मान्यता देणं कठीण आहे. कोणत्याही निर्णयावर येण्यासाठी अजून अभ्यास, संशोधन व तपासणी गरजेची आहे. 

असो, माझ्या पुढील लेखात मी या विषयाचा ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून माझी मते मांडण्याचा प्रयत्न करेन.  

सूचना: सादर लेखात कोणत्याही अभ्यासकाचा किंवा वैज्ञानिकाचा अपमान करण्याचा हेतू नाही.    

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

      =============================================

The phenomenon Spontaneous Human Combustion (SHC) is a mystery and remains unexplained even after alleged claims for over a century. Though a fair amount of claims and research works regarding SHC exist, its still not completely accepted as a natural phenomenon by many scientists. Now what exactly is Spontaneous Human Combustion? It is the concept of the combustion of a living (or recently deceased) human body without an apparent external source of ignition. In SHC mostly a particular part of the body burns into ashes. As this is an extremely rare phenomenon, the experts and investigators are still skeptical about the scientific criteria under which SHC can be categorized. Well with some authentic references and my knowledge in astrology and science, I am trying to check the reality of SHC.  

First I will try and put my thoughts on SHC with scientific approach. There are different hypotheses explaining SHC, though I feel none of them are across the board. 

Some experts proposed causes of SHC, which include possible external ignition factors like candles, cigarettes, scalding etc which cause a 'wick effect'. Where the subcutaneous fat released during the process of burns or wounds act as a wick and encourage burning of human body. The protein in the body also burns, but provides less energy than fat, with the water in the body being the main impediment to combustion. If the victim has high blood alcohol levels, then it may boost the process of combustion. The glitch here is the furniture, sofas or many other things present near the vicinity of the victim are mostly seen unharmed. It is also conjectured that ketosis caused by chronic alcoholism or low-carb diet produces acetone, which is highly flammable and could lead to spontaneous combustion. According to some theories, methane produced in the intestines can be responsible for the sudden human body combustion. 

Almost all of these theories sound very implausible to me and I will explain why. Combustion of a human body which is made up of almost 70% of water looks a lengthy process, which (if happens) will give time to fight against the raging fire. Secondly very high temperature is required to completely burn a human body into ashes. After attaining such high temperatures, the nearby things like furniture will definitely burn to major extent. But in most of the alleged cases no such harm is indicated. Regarding the ketosis theory, the blood level of ketone bodies produced even in severe form ketosis and the severity of the burning in SHC do not seem to match. Burning a full or part of human body to ashes with milliliters of ketones in the blood, working as a fuel does not sound possible to me. Lets talk about burning of human bodies to understand this. I have personally witnessed cremations of human dead bodies, which is a ritual in Hindu religion. There are many factors like fuels, ignition source, oxidizing agents, high temperatures etc needed to get the human body fully consumed by the flames. It is not a easy or fast process. Thus burning of a human body (alive or recently deceased) to ashes within no time may be a contingent theory but these enigmatic blazes in SHC can not be fully explained on the basis of these theories. This point also has another view. Consider the number of people who are chronic alcoholics and chain smokers. Practically speaking many of the people with high alcohol levels smoke regularly. After consumption of alcohol many people drive, cook food, smoke and do many activities which are in the close proximity of fire. Not to mention, many of these people may have ketosis, produce methane in intestines etc. Then why there are very few claims of SHC compared to the number of people vulnerable to it? If we dwell into this, many people with high alcohol levels drive recklessly, meet with an accident and their vehicles catch fire. If candles and cigarettes can be the source of ignition then why not the bigger thing called a vehicle? Many such burn victims recover but not burn to ashes at that moment. What is the triggering factor then? In my opinion it is definitely not just alcohol or ketone bodies or methane for sure. I am not readily dismissing above mentioned theories but accepting them unconditionally is not quite apropos.    

One interesting theory which seems to hold water is MCAS. A mast cell researcher proposed this theory, that a rare condition called Mast Cell Activation Syndrome (MCAS) may cause SHC. In MCAS, mast cells spontaneously release high amount of mediators, including norepinephrine.  A sudden flood of norepinephrine released from adipose mast cells could generate enough heat to ignite adipose tissue. which in turn would burn itself out, inclusive of bone marrow. Then again MCAS is still a poorly understood condition and is a current topic of research. Now lets understand whether this can be accepted as a cause of SHC. Though in MCAS the mast cells are hyperresponsive and lead to anaphylaxis and many other symptoms; the theory of burning a human body to ashes still remains quixotic. According to the scientist a sudden flood of norepinephrine may lead to some uncontrolled processes which cause the generation of heat exceeding to 90 degrees Celsius. Due to this the adipose tissues get ignited which will burn along with the bone marrow. Now practically human body needs almost 10000 degrees Celsius for 2 to 2.5 hrs to get completely burned into ashes (with bones). Now the question arises here is can the process lead to such high temperatures? Also a factor to be noted is if the body is burned in such less time as claimed in the process of SHC, then it will require much higher temperature i.e. probably above 1500 degrees Celsius. I feel that MCAS may be related to the cause of SHC but it may not be the sole cause of it.

Well I will put my thoughts here on the possible causes of SHC. As a microbiologist I feel SHC can be caused by a rare mutation in the genes responsible for the process of thermogenesis or heat production by human body. Uncontrolled thermogenesis may be caused due to defects in hormones including norepinephrine. So I consider the above mentioned MCAS as a plausible but not the sole cause of SHC. The process of thermogenesis slightly differs with age. Thus considering the age of the SHC victims I feel a detailed study of the genetic factors is necessary. I don't consider alcoholism, smoking or any other external factors of ignition as possible cause of SHC. The intensity of the heat generated during SHC is still a mystery and it is really impossible to attain such high temperatures by the human body in normal stages of defects. If it were so simple to attain such high temperatures quicky, then there would have been many victims of SHC. But the scarcity of the cases tells us that it is a very rare phenomenon. 

Secondly there are many processes in human body on molecular level which we haven't explored yet. Keeping an open mind I feel that there can be a very unknown cause of SHC which can be discovered in future. Not only thermogenesis, but a totally unknown phenomenon can lead to the combustion of human body within no time. Currently this may feel far fetched but in future we may discover new aspects of human body, our nervous system or hormonal functioning which may help us to understand the process of SHC.    

Lastly I would like to mention that with the current knowledge of science it is very difficult to accept SHC as a natural phenomenon. I am not hastily dismissing any theories though. But due to lack of any solid theory and proper evidence like photographs, video clips or witnesses during the exact time of burning of the human body, it becomes dubious to accept it as a scientific process. Unambiguously more research and proper investigation is needed to come to any conclusion. 

In my next article I will try to study this mysterious process of SHC from astrological point of view. 
Please Note: This article is not intended to insult any investigator or scientist.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

      =============================================      

No comments:

Post a Comment