Thursday, 7 January 2021

एमीलिया एअरहार्ट - एक बंडखोर (Amelia Earhart - A badass girl)

 


विमान प्रवासात अनेक धोके असतात याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असते. तसंच विमान अपघात (यांत्रिकी अडचणींमुळे वा खराब हवामानामुळे) ही एक सर्वांच्या माहितीतील घटना आहे. पण जेव्हा अख्खं च्या अख्खं विमान किंवा त्यातील काही प्रवासी बेपत्ता होतात तेव्हा मात्र या घटनेला एक वेगळीच कलाटणी मिळते. त्यावर अनेक तर्क वितर्क केले जातात आणि निदान मात्र बऱ्याचदा होत नाही. अशाच एका विमान प्रवासाबद्दल आणि एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीबद्दल आज मी वाचकांना माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. २ जुलै १९३७ रोजी जगप्रवासाला निघालेली धाडसी वैमानिक एमीलिया एअरहार्ट अचानक संपर्काबाहेर जाऊन बेपत्ता झाली. जगातील सगळ्यात धाडसी स्त्रियांपैकी ती एक होती. आजही तिच्या बद्दल कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. हे रहस्य पूर्णपणे उलगडणं शक्य नाही पण तिच्या हस्तरेषांवरून तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांबद्दल काही अंदाज बांधायचा मी प्रयत्न करणार आहे. 


एमीलियाचा जन्म २४ जुलै १८९७ रोजी अमेरिकेतील कन्सास येथे झाला, दोन वर्षानंतर तिला एक बहीणही झाली. एमीलियाच्या आईला आपल्या मुलींना जुनाट वा मुली म्हणून ठराविक साच्यातलं आयुष्य द्यायचं नव्हतं. आपल्या आईमुळे मिळालेलं स्वातंत्र्य आणि लहानपणा पासूनच असलेला बंडखोर स्वभाव यामुळे एमीलिया खूप धाडसी बनली. एक 'टॉमबॉय' असणारी एमीलिया साहसी खेळात जास्त रमत असे. साहसी आणि यशस्वी स्त्रियांची माहिती जेव्हा वृत्तपत्रात वा मासिकात येत असे तेव्हा एमीलिया त्याची कात्रणं जपून ठेवत असे. पुरुषी मक्ता असलेल्या क्षेत्रात जर एखाद्या स्त्रीनं नाव कमावलं तर एमीलियाला ते जास्त कौतुकास्पद वाटत असे. वडिलांना असलेलं दारूचं व्यसन आणि त्यातून उद्भवलेल्या अडचणींमुळे एमीलियाचं बालपण मानसिक तणावात गेलं. त्यातूनही मार्ग काढत विज्ञानाची ओढ असणाऱ्या या मुलीनं अनेक अडथळे पार करत शिक्षण पूर्ण केलं. १९१८ साली स्पॅनिश फ्लू च्या महामारीत रुग्णांची सेवा करता करता तिला स्वतःलाच सायनसचा प्रचंड त्रास झाला. पूर्वीच्या काळी योग्य उपचार नसल्यानं तिला आयुष्यभर हे दुखणं सहन करावं लागलं. पुढे वैमानिक म्हणून काम करताना तिला एक नळी घालूनच वावरावं लागत असे आणि ती झाकण्यासाठी ती गालांवर पट्टी (बँडेज) लावत असे.

इतक्या अडचणींनंतरही तिनं कुठेही हार मानली नाही. १९२० साली ती आपल्या वडिलांबरोबर एका विमान उड्डाणाच्या जागी भेट द्यायला गेली. तिथं फ्रॅंक हॉक्स या जगप्रसिद्ध वैमानिकानं तिला विमानातून एक छोटी सफर घडवली. आणि हाच तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ठरला. याच दिवशी तिच्या आयुष्यानं एक निर्णायक वळण घेतलं आणि एमीलियाला तिचा मार्ग सापडला. त्या दिवशी विमानातून सफर करताना तिनं ठरवलं की तिला आकाशालाच गवसणी घालायचीये. तिच्याच शब्दांत सांगायचं तर " मी जेव्हा जमिनीपासून दोन तीनशे फुटांवर गेले तेव्हाच मी ओळखलं मला भरारी घ्यायचीये". एक वैमानिक होण्यासाठी लागणारा खर्च तिला परवडणार नव्हता कारण तिच्या वडिलांच्या व्यसनापायी त्यांचं खूप आर्थिक नुकसान झालं होतं. हे शिक्षण घेण्यासाठी ह्या बंडखोर मुलीनं अगदी ट्रक चालवण्यापासून, छायाचित्रकारिता, टेलिफोन ऑपरेटर, लघुलेखन (स्टेनोग्राफर) अशी अनेक कामं केली. जगातील पहिल्या महिला वैमानिकांपैकी एक अशा अनिता स्नूक यांच्या कडून तिनं शिक्षण घेतलं. यासाठी घरापासून खूप लांब अंतरावर करावा लागणारा प्रवासही ( बसनं प्रवास आणि ६ कि. मी. पायपिट ) तिनं आनंदानं केला. ह्या शिक्षणासाठी कुठेही नकार येऊ नये म्हणून तिनं केस कापले, चामड्याचं जॅकेट घालून ती ३ दिवस झोपली पण आपला ध्यास सोडला नाही. १९२१ साली तिनं स्वतःसाठी एक विमान खरेदी केलं, ज्याला तिनं 'द कॅनरी' असं नाव दिलं. पण अआयुष्यातील अडचणी थांबण्याचं नाव घेत नव्हत्या. पुन्हा आलेल्या आर्थिक अडचणींमुळे एमीलियानं शिक्षिकेची नोकरी पत्करली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ती म्हणूनही काम केलं. १९२४ च्या दरम्यान तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. हा धक्का पचवून तिनं अमेरिकेच्या वैमानिक संस्थेत (बोस्टन) नाव नोंदवलं. इतकंच नाही तर ती तिथली उपाध्यक्षा बनली. १९२७ साली डेनिसन विमानतळावरून तिनं अधिकृतपणे पाहिलं विमान चालवलं. त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

१९२८ साली तिनं अटलांटिक महासागरावरून भरारी मारणाऱ्या विमानात प्रवासही केला (चालक -विल्मर) . पण त्या विमानातील मशीनची माहिती नसल्यानं तिला ते विमान चालवायला मिळालं नाही. पण त्या प्रवासानं तिला ख्यातनाम केलं हे मात्र खरं. त्यानंतर तिला वृत्तपत्रांनी आदरानं 'क्वीन ऑफ द एअर', 'लेडी लिंडी' (सुप्रसिद्ध वैमानिक चार्ल्स लिंडबर्घ यांच्यासारखी दिसायची म्हणून) अशी नावं देऊन एक सेलिब्रिटीच केलं. अर्थात ती त्यायोग्य होती तरीही हे सगळं काही प्रमाणात तरी ठरवून पुढे आणल्यासारखं होतं. तिच्या समकालीन महिला वैमानिक काही कमी नव्हत्या किंबहुना एमीलिया पेक्षा जास्त कौशल्यपूर्ण होत्या. पण याच विमान प्रवासाच्या वेळी अशा काही घटना घडल्या कि एमीलिया इतरांपेक्षा लवकर नावारूपाला आली. खरं तर ऍमी गेस्ट हि गर्भश्रीमंत घरातील वैमानिक अटलांटिक महासागरावरून भरारी घेणारी पहिली वैमानिक होणार होती. पण हा प्रवास अत्यंत धोक्याचा असल्यानं तिच्या घरून विरोध होता. म्हणून तिनं दुसऱ्या स्त्री वैमानिकाची निवड करायला सांगून त्यासाठी प्रायोजक राहायचं ठरवलं. जॉर्ज पटनम या लेखकानं आधी चार्ल्स लिंडबर्घ यांच्यासाठी पुस्तक लिहिलं होतं. त्यांनी या विमान प्रवासासाठी तरुण, तडफदार एमीलियाला विचारलं. आणि अर्थातच ही संधी एमीलियाला सोडायची नव्हती. या प्रवासात एमीलियाचं नाव जगभर होणार होतं तर पटनम यांना लेखक म्हणून प्रचंड यश आणि पैसा मिळणार होता. त्यावेळी वेगवेगळे विक्रम करण्याची अमेरिकेतील वैमानिकांमध्ये चढाओढ असे. आणि 'विक्रम' हेच यशाचं परिमाण झालं. एमीलियानं अनेक विक्रम केले हे खरं आणि पटनम मुळे ते प्रसिद्धीझोतात येऊन तिच्या 'सेलिब्रिटी' आयुष्याला ते पूरकच ठरलं. या सर्व गोष्टी गृहीत धरल्या तरी एमीलिया एक धाडसी वैमानिक होती यात कोणतीही शंका नाही. मी हा मुद्दा लिहिण्याचं कारण इतकंच कि कष्ट, कौशल्य आणि बुद्धिमत्ता यांच्या जोडीला नशीब असावं लागतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. दैव बलवत्तर असल्याशिवाय इतकं उत्तुंग यशाचं शिखर गाठता येत नाही. याबद्दल सविस्तर माहिती मी पुढील लेखात एमीलियाच्या हस्तरेषांवरून देणारच आहे.       
            
असो, या नंतर विमानचालन क्षेत्राची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एमीलियानं मनापासून प्रयत्न केले. अमेरिकेच्या प्रसिद्ध कॉस्मोपॉलीटन या मासिकाची ती सहसंपादक बनली. चार्ल्स लिंडबर्घ यांच्याबरोबर तिनं ट्रान्स कॉन्टिनेन्टल एअर ट्रान्सपोर्ट (TAT) साठी काम केलं. न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन दरम्यानची पहिली विमानसेवा सुरु करण्यासाठी तिनं आर्थिक मदतही केली. एमीलियाच्या अतुलनीय कामगिरीमुळं ती नॅशनल एअरवेजची उपाध्यक्षा झाली.  

आता एमीलिया इतक्या सराईतपणे विमान चालवू शकत होती कि तिला एकटीनं विमान चालवायचं होतं (सोलो फ्लयिंग). ऑगस्ट १९२८ मध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या भोवती एकटीनं विमान चालवणारी ती पहिली महिला वैमानिक ठरली. त्यानंतर महिलांच्या विमान शर्यतींमध्येही तिनं भाग घेतला. विमान उड्डाणाशी संबंधित अनेक संस्थांमध्ये तिचं नाव अग्रगण्य असे. दरम्यान १९३१ साली लेखक जॉर्ज पटनम यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. 

केवळ विमान शास्त्राशी संबंधित न राहता या बंडखोर तरुणीनं इतर क्षेत्रांतही खूप काम केलं. स्त्रियांसाठी समान हक्क प्रस्ताव १९२०च्या सुमारास आला. अमेरिकेतील संविधानात दुरुस्तीसाठी जेव्हा हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याला पाठिंबा देणाऱ्या पहिल्या काही स्त्रियांमध्ये एमीलिया होती. स्त्रियांना समानाधिकार आणि मतदानाचा हक्क मिळावा यासाठी आग्रही असणाऱ्या नॅशनल विमेन्स पार्टीची ती प्रवक्ता होती. स्त्री वैमानिकांच्या शिक्षणासाठी असलेल्या 'द नाईनटी नाईन्स' या संस्थेच्या निर्मिती मध्येही तिनं पुढाकार घेतला. अनेक स्त्रियांना आर्थिक मदतही केली. तसंच तिच्या अनुभवांवर आधारीत पुस्तकंही लिहिली ज्यामुळे विमान उड्डाण क्षेतत्राशी संबंधित शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांना प्रोत्साहन मिळेल. इतकं सारं एमीलियानं मिळवलं ते केवळ वयाच्या चाळिशीतच. ज्या गोष्टी साध्य करायला अनेक दशकं उलटतात त्या गोष्टी एमीलियानं ऐन तारुण्यातच साध्य केल्या. 

बंडखोर स्वभाव, स्वातंत्र्याची आवड, स्त्रियांच्या ठराविक चौकटीत न बसणं यामुळे एक बदमाश (badass) म्हणून एमीलिया ओळखली जाते. कोणत्याही क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी तिला मान्य नसे. अशा धाडसी स्त्रियांमुळेच इतिहासात अनेक बदल घडले आहेत हे नाकारता येणार नाही. आज स्त्रिया सर्व क्षेत्रांत ज्या स्वातंत्र्यात वावरत आहेत, त्याचं श्रेय एमीलिया सारख्या जगभरातील सर्व बदमाश (badass) स्त्रियांनाच जातं हे माझं मत आहे.

असो, इतक्या बुद्धिवान, धाडसी तरुणीनं अनेकदा विमान चालवलं होतं. त्यामुळे एक मोठी झेप घेण्यासाठी १७ मार्च १९३७ रोजी एमीलियानं तीन सहकाऱ्यांसोबत विमानानं जगप्रवास करण्यासाठी उड्डाण केलं. त्यांनी लॉकहीड कंपनीचं इलेक्ट्रा हे विमान उड्डाणासाठी निवडलं. पण वाटेतच काही बिघाडामुळे ते दुरुस्तीला पाठवावं लागलं. काही दिवसानंतर पुन्हा एमीलियानं दुरुस्त झालेल्या विमानानं विषुववृत्तावरून जगप्रवास सुरु करायचं ठरवलं. हा प्रवास विषुववृत्तावरून असल्यानं जगातील सर्वात जास्त लांबीचा (२९,००० मैल) विमान प्रवास ठरणार होता. आधीच्या तांत्रिक बिघाडामुळे होणारे धोके जाणवून हॅरी मॅनिन या कुशल सहकाऱ्यानं माघार घेतली. एमीलियानं यावेळी अत्यंत कुशल दर्यावर्दी फ्रेड नूनन ह्यांच्यासह प्रवास करायचं असं ठरवलं. दुर्दैवानं या दोघांपैकी कोणालाही विमानाच्या रेडिओ (बिनतारी संदेश) चालनाबद्दल संपूर्ण माहिती नव्हती. कुशल रेडिओ चालक मॅनिन यांनी आधीच नाव काढून घेतलं होतं. तरीही न डगमगता एमीलिया आणि फ्रेड यांनी प्रवास सुरु करून फ्लोरिडा वरून दक्षिण अमेरिका, भारतीय उपखंड, दक्षिण आशिया असा प्रवास करत पापुआ, न्यू गिनी गाठलं. तब्बल बावीस हजार मैलांचा प्रवास करून उरलेल्या सात हजार मैलांच्या प्रवासासाठी प्रशांत महासागरावरून जाणाऱ्या मार्गावरून हे दोघे प्रवास करणार होते. त्यासाठी २ जुलै १९३७ रोजी न्यू गिनी वरून उड्डाणही केलं. प्रशांत महासागरातील हॉवलंड आयलंड इथं त्यांचा पहिला थांबा होता. पण अवघ्या ८०० मैलांवरील टास्मन आयलंडवर (आताचं नूकुमॅनु आयलंड) पोहोचल्यावर त्यांचा संपर्क तुटला. त्यानंतर एमीलिया आणि फ्रेड यांच्याशी आजतागायत कधीही संपर्क साधता आला नाही किंवा त्यांच्याबाबत नक्की काय घडलं याची कोणतीही खात्रीशीर बातमी उपलब्ध नाही. आज इतक्या वर्षांनंतर फ्रेड आणि एमीलियाला अर्थातच मृत घोषित केलं गेलं आहे. तरीही या प्रवासाचा शेवट कसा झाला असेल याचं गूढ आजही कायम आहे. 
 
इतक्या उत्साही, बुद्धिवान स्त्री वैमानिकाचा वयाच्या अवघ्या चाळिशीतच दुर्दैवी अंत व्हावा हे नक्कीच दुःखदायक आहे. स्त्रियांना स्वतःची ओळख मिळवून देण्यासाठी झटणारी, पुरुषी मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांत न घाबरता काम करणारी आणि अनेक अडचणी पार करून आकाशाला गवसणी घालण्याचं आपलं स्वप्न स्वबळावर सत्यात उतरवणारी एमीलिया एअरहार्ट हिची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही. 

यावेळेस जन्मकुंडलीपेक्षा तिच्या हस्तरेषांवरून तिच्या शेवटच्या क्षणी काय घडलं असावं याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न मी पुढील लेखात करणार आहे.     
 
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
      =============================================
 


We all know that travel in the air is not as safe as it sounds. Air crashes and other accidents regarding flights is also not rare due to the possible technical errors or bad weather. But when the whole aircraft is lost or a few passengers are missing then such accidents take a different turn. Usually a lot of speculations are made on such sinister events but these hardly reach a final conclusion. I am trying to explain about such sinister air travel and an outstanding personality in this article. On 2nd July 1937 the venturous aviator Amelia Earhart started her journey around the globe. Suddenly she disappeared in the middle of her flight plan. There is no full proof evidence about her disappearance. Though it is not possible to completely solve the enigma, I will try to guess what could have happened in Amelia's final moments. 



Amelia was born on 24 July 1897 at Kansas (USA) and after two years she was blessed with a younger sister. Amelia's mother never believed in conventional upbringing and didn't want to raise her daughters as 'nice little girls'. Due to the freedom and her basic rebellious nature, the spirit of adventure abode in her right from her tender age. Characterized as a 'tomboy', Amelia enjoyed rough and tumble plays. She used to keep a scrapbook of newspaper clippings about adventurous and successful women. she would appreciate successful women in predominantly male dominated fields. Her father's alcoholism and eventual complications, made her childhood miserable. Overcoming all these hurdles, her deep interest in science never let her stop. Finally she completed her education but with a lot of obstacles and gaps. In 1918 during the Spanish Flu pandemic she was engaged in formidable nursing duty. Sadly at that time she suffered from maxillary sinusitis. Her convalescence never fully ended and she suffered from chronic sinusitis which accompanied her for her remaining life. As a consequence, while working at the airfield she had to wear a bandage on her cheeks to cover her drainage tube. 

In spite of all these problems she never gave up. In 1920, she visited an airfield along with her father. Famous pilot Frank Hawks gave her a 10 mins ride. This flight became the turning point in Amelia's life. That was the decisive point where Amelia found the right direction. She was determined that she is going to conquer the sky. In her words  "By the time I had got two or three hundred feet off the ground,I knew I had to fly." Well, flying was not going to be so easy for Amelia as she was going through a financial crisis mainly due to her father's alcoholism. But she was so focused on her dream of becoming a pilot that she worked at a variety of odd jobs like truck driver, photographer, stenographer, in telephone company etc. She was able to get her lessons from the pioneer aviator Anita Snook, who was one of the first female pilots. She happily put all her efforts to reach the airfield and learn about aviation. And by efforts I mean she had to take a bus and then walk four miles, every day. She was so committed to flying that she cut her hair short, once she slept with a jacket for 3 nights and did everything possible to complete her training. Finally in 1921 she purchased a secondhand biplane, and named it  'The Canary'. But her life was not so smooth and bad luck struck again. Due to another financial crisis she had to work as a teacher and then as a social worker. In 1924 Amelia's parents divorced. Though she was shattered she maintained her interest in aviation. Around the same period she not only became a member of American Aeronautical Society (Boston), but was eventually elected as it's vice president. She flew her first official flight in 1927 from Dennison Airport and then she never looked back. In 1928 she travelled with Wilmer Stultz to become the first woman to fly across the Atlantic Ocean. She could not pilot the aircraft as she had no training on instrumental type of flying. She felt that her Nonetheless, she received a rousing welcome after landing and became a celebrity. The media respectfully dubbed her as 'Queen of the Air' 'Lady Lindy' (as she struck a striking resemblance to iconic pilot Charles Lindbergh). Of Course Amelia was no doubt a talented aviator, but somewhere it was planned the way it happened. Her contemporaries were no less than Amelia, in fact some of them were more skillful than her. But during this flight some events occurred in such a fashion that some of the better female pilots faded into obscurity and Amelia quickly gained a reputation of an iconic female aviator. Actually Amy Guest, a wealthy socialite expressed her interest to become the first woman to fly across the Atlantic Ocean. But she felt that the trip will be too perilous and her family also refused to allow her due to the same, she decided to sponsor the trip. Meanwhile George Putnam who was a famous publisher encashed the new craze of aviation in America. He published the world famous book 'WE' by Charles Lindbergh. He interviewed the young aspiring pilot Amelia Earhart for the flight across the Atlantic Ocean. And of course Amelia didn't want to lose this golden opportunity. As this deal would work the best for both. Amelia would get a worldwide recognition and Putnam would get an opportunity for another bestseller. At that time record setting became the form of aviation. Setting new records became the parameter of success in aviation. Amelia and her contemporaries did the same but Putnam's encashing for Amelia proved to be ancillary which led her from relative ambiguity to international headlines. Well, though these factors played a significant role in her career it can not be denied that Amelia was an adventurous pilot. I mentioned this point as her career is the best example of how 'fate' is a crucial factor along with hard work, skill and intelligence. Without lofty destiny it is not possible to attain sky high success. I am going to explain this in detail in my next article where I will try to comprehend from Amelia's palm print. 

Well, after her huge success Amelia started campaigning, giving lectures and encouraging female pilots. She worked as an associate editor of the famous Cosmopolitan magazine where she focused on extolling the virtues of air travel for greater public acceptance of aviation. Along with Charles Lindbergh she represented Transcontinental Air Transport (TAT). She worked hard and also invested her money to start the first regional shuttle service between New York and Washington, D.C. Due to her unparalleled work she became the vice president of National Airways.  
 
Now Amelia was so adroit at flying that she was craving for a solo flight. In 1928 she became the first woman to fly solo across the North American continent and back. She also participated in many air racings. She was involved with many aviation organizations. Meanwhile she got married to George Putnam in 1931. 

Amelia was outstanding because her territory had no borders. This bolshie youngstar worked in various fields. The Equal Rights Amendment was proposed in 1920. When an amendment to the Constitution that would guarantee women equal rights was proposed she was one of the first women to support it. She also became a vocal member of the National Women's Party, which worked for women to get the right to vote. She was a vigorous supporter of female pilots and was a key member in the formation of 'The Ninety Nines' an organization helping women in aviation. She also provided financial support to many female pilots. She also published books on her experience in aviation to encourage aspiring female pilots. Her numerous accomplishments were achieved just in her 30s. She became a towering figure at a very young age, which might take a few decades for others.  

The freedom loving, rebellious and tomboyish Amelia is known as a 'badass' girl. She never endorsed the traditional wall of male dominance. Well, It can not be denied that such badass women make history. I believe that the credit for today's women empowerment in all settings and of course freedom, goes to such badass women in history. 

Well, this talented and passionate pilot was vastly experienced with flying. As Amelia's ambitions grew she planned for the round the world flight. On 17th March 1937 Amelia and her crew of (3 colleagues) flew for the trip. They chose Lockheed Electra for the flight. Due to major technical issues the aircraft was severely damaged and was sent for repair. Amelia of course refused to give up and planned for the second attempt. This flight would be the longest (29,000 miles) as it roughly followed the equatorial route. As the damage occurred was severe Harry Mannin, one of the efficient crew members refused to continue. Finally Amelia decided to fly along with Fred Noonan, a professional navigator and sea captain. Dismally none of them were skilled radio operators. The skilled radio operator Mannin had already ended his association with the trip. Still without any boggling Amelia and Fred began their journey from Florida with many stops in South America, the Indian subcontinent and Southeast Asia and arrived at Papua, New Guinea. At this stage they had covered a massive 22,000 miles and were ready to take off for the remaining 7,000 miles over the Pacific Ocean. They started their last leg on July 2nd 1937 from New Guinea. Their first stop was supposed to be at Howland Island. But after mere 800 miles at Tasman Island (now Nukumanu Island), which was their last known position the flight couldn't be tracked. After the disappearance neither Amelia nor Fred could be heard from. There is no full proof evidence to what exactly happened to Amelia and Fred. Of course after so many years both of them are declared dead. Still the enigma is unsolved.   

It is really sorrowful that such an enthusiastic and courageous female pilot tragically lost her life at the age of 40. Nobody can replace Amelia Earhart, an ardent supporter of womens' empowerment, a rebellious badass girl working in male dominant fields and a towering personality who overcame all the obstacles to achieve her dream.  

This time in my next article, I will try and explain about what could have happened at the last moments of Amelia Earhart by reading her palm lines (print).

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
     ===============================================