शुद्धाद्वैताचे
जनक श्री वल्लभ आचार्य यांनी पुष्टिमार्गातून श्रीकृष्ण आराधना
करण्यासाठी या रचनेची निर्मिती केली. या रचनेत श्रीकृष्णाच्या मधाळ
वर्णनाबरोबरच भक्तिमार्गही दाखवला आहे. संपूर्ण मधुरसात आकंठ बुडालेली ही श्रीकृष्णस्तुती आठ कडव्यांमध्ये श्रीकृष्णाची गोड पण रोखठोक रूपं दाखवते. आश्चर्य म्हणजे श्रीकृष्णाच्या
सहा आवडत्या बास-यांपैकी वेणू या बासरीचा उल्लेख आढळतो. खरे तर महानंदा ही राधेनं दिलेली बासरी त्याची सगळ्यात आवडती बासरी. पण वेणू या बासरीला
कृष्णानं इतकं जवळचं मानलं कि राधाही तिचा द्वेष करीत असे. पौराणिक काळात
संगीताराधनेत मूलभूत तीन खांब सांगितले आहेत. आत्मा-वीणा-वेणू. संगीताचे हे
त्रिदेवच जणू. त्यात स्थान मिळवलेली ही वेणू नामक गोपिशत्रू नेहमीच श्रीकृष्णाच्या
ओठाचे मधुरसपान करीत असे. या सर्वांगसुंदर दैवताचे वर्णन इतक्या रसभरीत
रीतीनं करून वल्लभ आचार्य यांनी भक्तीसाठी एक प्रेमाचा मार्ग आखून दिलेला
आढळतो.
ब्रह्मसंहितेतही "वेणुम् क्वणन्तारविन्द दलायताक्षम्, बार्हावतंसम् असिताम्बुद सुन्दरााङ्गम्, कन्दर्प
कोटि कमनीय विशेष शोभम्, गोविंदम् आदि पुरुषम् तं अहम् भजामि" (मी त्या
परमदैवत गोविंदाचे पूजन करतो जो आपले वेणू वादनाचे कौशल्य दाखवतो, ज्याचे
तजेलदार डोळे कमलदला सारखे आहेत, ज्याचे कपाळ निळ्या ढगांनी
आच्छादल्याप्रमाणे मोरपिसाने सजलेले आहे आणि ज्याचे शरीर अनेक कामदेवांनाही
लाजवेल इतके मोहक आहे त्याचे मी भजन करतो). अशा वर्णनाने श्रीकृष्ण नटला
आहे. कामरस आणि काम शास्त्रातील अनेक पद्धतींचा जनक श्रीकृष्ण फक्त
शरीरसुखातच अग्रेसर नव्हता, तर सर्व बाजुंनी स्त्रीला सुखावणारा होता.
मोहकपणा बरोबरच न्यायप्रियता आणि शरीर सौष्ठव यात कुठेही कमी नसणारा हा
नंदकुमार मानसिक रीत्याही गोपींचा प्रियकरच होता. कोणत्याही नात्यात तो
परिपूर्ण असाच होता. खऱ्या अर्थाने 'वासुदेव' या पातळीला पोचलेला हा युगंधर
होता. वासुदेव म्हणजे फक्त वसुदेवाचा पुत्र नव्हे तर श्री, पूर्णत्व,
अचूकता, परिपूर्णता म्हणजे वासुदेव. मात्र या उपाधी साठी कृष्णानेही भौतिक
तपश्चर्या केली होती. सहजासहजी हि उपाधी त्याला मिळालेली नाही. या
लीलाधर श्रीकृष्णाचे पूजन आणि भजन दोन्ही साध्य करताना श्री वल्लभ आचार्य
यांनी 'मधुर' या त्याच्या रूपाचा आधार घेतला आहे. कुणासही सहज राग न यावा
असंच रूप असलेला हा श्यामल गवळी किती सहज सगळ्या गोष्टी साध्य करीत असे.
श्री कृष्णाच्या ह्या मधुर स्तुतीचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे:
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे
श्रीकृष्णा तुझे ओठ मधुर आहेत, तुझे मुख मधुर आहे, तुझे डोळे मधुर आहेत,
तुझं हास्य मधुर आहे, तुझं हृदय मधुर आहे, तुझं चालणंही मधुर आहे. हे
मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
जेव्हा
कृष्णानं बाम्बूच्या झाडाला विचारलं "मी सर्व गोपी, प्राणी पक्षांना
मोहवतो मग तू मला काय देणार आहेस?" तेव्हा बाम्बू उत्तरला "हे देवा तुला
हवे ते घे" कृष्णाने त्याचा जीव मागितला आणि त्याने तो दिलाही. त्याचे शरीर
कापून कृष्णाने आठ छिद्रे केली जेव्हा बाम्बू खूप तळमळला. मग त्याची मधुर
सूर उमटणारी बासरी करून कृष्णाने सतत ती आपल्या जवळ ठेवली. अगदी मृत्यू जरी
आला तरी युगंधराच्या साध्या फुंकर घालण्यानंही ते दुःख सुरेल होतं याचंच
हे प्रतीक, म्हणजे बासरी.
वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् ।
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे श्रीकृष्णा तुझं
बोलणं मधुर आहे, तुझं चरीत्र मधुर आहे, तुझे अलंकार मधुर आहेत, तुझं
बाकदार शरीर मधुर आहे, तुझं चालणं मधुर आहे, तुझं गोंधळवून टाकणं मधुर आहे.
हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
श्रीकृष्णाच्या
बोलण्यातील एक नटखट आणि राजकारणी गुण म्हणजे दुसऱ्याला गोंधळात टाकणे.
स्वतःच अवतारी पुरुष असल्याने सर्वज्ञानी असलेला हा नारायण स्त्रियांना
गोंधळात टाकून ते सौन्दर्य टिपत असे आणि पुरुषांना गोंधळात टाकून राजकारण
खेळत असे. असा हा कावेबाजपणा कधी मादक तर कधी घातक ठरे. रंगिणी, नवमाळी,
सुमाली, चमेली, जाई इत्यादी फुलांनी सजलेला मुकुट, वैजयंती नामक रानफुलांची
माला (जी राधेनं त्याला स्त्रीरूप दाखवताना पहिल्या प्रणयाराधनाआधी दिली
होती), बलापास्य नामक गजरा, ताडांक नामक भिकबाळी, कमल, भृंग आणि
डाळिंबाच्या फुलांनी सजलेल्या कर्णिका, पुष्पी नावाचे डूल, ग्रेवेक्यक
नामक छोटी फुलांची माला, अंगद नामक वाकी, मणिबंधीनी नावाचं कंकण, सिंधूवर
फुलांनी सजलेला माथा, शिवाय हंसक, कंचुली इत्यादी अलंकारांनी नटलेला हा
कामदेव रुपी नर खरोखर अपूर्व सुंदर होता.
वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे श्रीकृष्णा तुझी वेणू मधुर आहे, तुझ्या शरीरावरील परागयुक्त फुले मधुर आहेत, तुझे नटलेले हात मधुर आहेत, तुझे पाय मधुर आहेत, तुझं नृत्य मधुर आहे, तुझं सख्य मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
वाजवायला
कठीण असलेली मदनझंकृती नामक बासरी ही खरे तर या बन्सीधराची ओळख. याच बासरीने
प्राणिमात्रांनाही मोहविले. पण 'वेणू'तून निघालेले सूर काही आगळेच. त्यात
नुसती मधुरता नाही तर मादकपणा होता. अगदी लीलया आलेला हा सौन्दर्याविष्कार
रासलीला रचवून जायचा. खरे तर त्याच्या अंगावर सांडलेल्या परागकणांची तुलना
स्त्री स्तनाग्रांभोवती असलेल्या उठावदार पण नाजूक लालसर माळेशी केली गेली
आहे. त्या बिंदूंची आठवण करून देणारे ते परागकण कोणत्याही स्त्रीला प्रणयच
नव्हे तर बाळाच्या लुचण्याचीही आठवण देत असत. एक प्रेयसी आणि अनंतकाळची
माता या दोन्हीही पर्वातील मधुर क्षणांचंच ते प्रतीक. पण कृष्णानं सगळ्या
गोपीना जणू अनंतकाळची प्रेयसी म्हणूनच थोपवून धरलं होतं जणू . नखशिखांत
मादकतेने भरलेला हा लीलाधर एक सखा म्हणूनही परीपूर्ण असाच होता. द्रौपदी पासून सुदामा पर्यंत साऱ्यांनी हे सुख पुरेपूर अनुभवलं. पण मधुवासी
ब्रिजबलांना मिळालेला सखा काही औरच होता.
गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे श्रीकृष्णा तुझं गाणं मधुर आहे, तुझं पिणं मधुर आहे, तुझं खाणं मधुर आहे, तुझं झोपणं मधुर आहे, तुझं रूप मधुर आहे, तुझा टिळा मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
विश्वरूप
दर्शन देणारा हा असामान्य योद्धा खऱ्या नावाप्रमाणेच आकर्षण होता. देवकी
मातेचं सारं सौन्दर्य आणि वसुदेवांचं राजसौष्ठव एकवटलेला हा देवकी पुत्र अत्यंत
देखणा आणि श्यामरंगी होता. द्रविडी सौन्दर्याची खूण असलेला श्याम रंग खरे तर
आपण कृष्ण म्हणून चुकीच्या पद्धतीने घेतो. कृष्ण या शब्दाचा खरा अर्थ आहे
कृषी + ण शेतीचा देव. ज्या अन्नावर आपण जगतो त्या अन्नाचा पालक आणि
पर्यायानं पालक विष्णू. खरे तर विष्णू म्हणजे विश्यति प्रविष्यति इति
विष्णू = जो हवे तिथे प्रवेश करू शकतो असा तो विष्णू. अन्नकणांतही प्रवेश
करून जीवन देणारा असा तो कृष्ण. पण कृष्ण म्हणजे काळा हे चुकीचं समीकरण
ह्या दैवताच्या रंगामुळे झाले आहे. माधुर्य काळ्या रंगातही असतं असं गोऱ्या
रंगाच्या आधीन गेलेल्या आर्यवंशी जनमानसाला हा एक धडा असावा. रंगावर प्रेम
करून जात, वय, कौमार्य यावर
प्रेम वा विवाह ठरवणाऱ्या तमाम समाजाला कृष्णानं एक आदर्श घालून दिला आहे.
विवाहित राधा आणि गांधर्व पद्धतीनं विवाह झालेली वैदर्भीय राजकन्या
रुक्मिणी ह्या दोन उदाहरणातून कृष्णाचं स्वच्छंदी प्रेमच दिसून येतं.
करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे श्रीकृष्णा तुझी कृत्य मधुर आहेत, तुझं तारणं मधुर आहे, तुझं हरण करणं मधुर आहे, तुझं प्रणयमिलन मधुर आहे, तुझं भावना दर्शविणं मधुर आहे, तुझं शांत होणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
वैदर्भीय
राजकन्या रुक्मिणी हिचं केलेलं हरण कोण विसरेल? त्या सुरेख प्रसंगात
प्रेमी जीवांना दिलेला एकरूप होण्याचा अधिकार आणि पुरुषाचं पौरुषत्व याचं
दर्शन होतं. 'पु' या बीजाचा अर्थच अनंत काळ टिकणारा असा आहे. पुरुष हा
पौरुषाचं म्हणजेच अनंतकाळच्या पालकत्वाचं प्रतीक आहे. या ताकदीचं दर्शन घडवून
देणारा हा वासुदेव परीपूर्ण पुरुष आहे. स्त्रीच्या भावना जपणारा आणि तिला
आंतरिक समाधान देणारा असा हा पुरुष आहे. भावना दर्शविताना कुठेही न
संकोचणारा धीट असा हा पुरुष प्रियकर रुक्मिणीचं हरण करताना रुक्मि ला
घायाळही करतो. कुठेही पौरुषत्व न लपवता रक्तपातही करणारा, कालिया मर्दन
करणारा, कंसवध करणारा हा योद्धा महाभारताच्या युद्धावेळी एक सारथी होतो. ही सगळीच मधुर रूपं मोहक आहेत. रतिक्रीडेवेळी उत्कट होणारा हा मिलिंद
त्यानंतरही घायाळ करणारं मादक हास्य करतो आणि मन आणि शरीर शांत करतो. ह्या
अनेक रुपातला भाव मधुर असाच आहे.
गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।
सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे श्रीकृष्णा
तुझा प्रणयाराधनेच्या वेळचा गुंजारव मधुर आहे, तुझी वैजयंती माला मधुर
आहे, तू ज्या नदीकाठी बसतोस ती यमुना मधुर आहे, त्या यमुनेच्या लाटा मधुर
आहेत, त्या यमुनेचं पाणी मधुर आहे, तुझं अलंकारातलं कमळ मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
श्रीकृष्णाचा
प्रणय काळातील गुंजारव बासरी सारखा मधुर असे. त्या वैजयंती फुलांची माळही
त्या वेळी सुंदर दिसे. या रानटी फुलांची औषधी शक्ती अशी आहे कि ती फुले
हळदी प्रमाणे जिवाणू मारू शकतात. ही फुले स्वतःच नैसर्गिकरीत्या लवकर खराब
होत नाहीत. त्यातील औषधी गुणांमुळे ती रोगापासून स्वतःला दूर ठेवतात तसेच
त्यापासून दारुही बनवली जाते. अशा ह्या औषधी आणि वारुणीसुगंध युक्त फुलांचा
प्रभाव प्रणयकालात न पडला तरच नवल. रोगमुक्त शरीर आणि वारुणीचा आभास असे
दोन्ही गुण प्रणयकालात उपयुक्त असेच होते. यमुनेप्रमाणे अथांग प्रेम, आणि
प्रणय काळातील शरीराची लाटांसारखी हालचाल, शरीरावर जमलेले घर्मबिंदू जणू
यमुनेच्या जलाप्रमाणेच पवित्र प्रेमाचे प्रतीक आणि नाजूक पण उठावदार शरीर
अवयवांचं प्रतीक असलेलं कमळ. मूर्तिमंत प्रेमाचं प्रतीक असलेला हा बन्सीधर
मधुर असाच आहे.
गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे श्रीकृष्णा
तुझ्या गोपी मधुर आहेत, तुझ्या लीला मधुर आहेत, तुझं एकरूप होणं मधुर आहे,
तुझं मुक्त करणं मधुर आहे, तुझं रोखून बघणं मधुर आहे, तुझं शिष्टाचारानं
वागणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
जवळपास
सर्व गोपी ह्या विवाहित होत्या. पण त्यांचा सखा मात्र कृष्णच होता.
उत्कटतेनं एकरूप होऊन तेव्हढ्याच कोमलतेनं स्त्रीला दूर करणं ही कला ह्या
नटवाराला छान जमली. इतक्या स्त्रियांशी शारीरिक जवळीक करूनही कुठेही शिष्टाचार
न सोडणारा हा सभ्य प्रियकर स्त्रियांचा अत्यंत लाडका होता. स्त्रीचं शरीर
हा तिचा खरा अहंकार असतो. स्वतःहून शरीर समर्पण करताना स्त्री फुलते पण
बळजबरीनं ती कोमेजते. म्हणूनच कायम बहरलेली वैजयंती माला ह्या स्त्री
मनाचंच एक प्रतीक आहे. कोणत्याही गोपीचं मन न दुखावता आकर्षून घेणारा हा
कामरूपी मुकुंद स्त्रीला फुलासारखं जपायचा. आजही अशा प्रियकरांचं वर्णन
कृष्ण म्हणूनच केलं जातं. प्रत्येक गोष्टीत सौन्दर्य आणि शिष्टाचार
यांचा समतोल साधणारा हा मनुष्यरूपी कामदेव कोणत्याही स्त्रीला आदर्शच
वाटेल. खरे तर श्रीविष्णू यांचं शेषशायी हे रूपही असंच. लक्ष्मीला प्रणय
हवा असताना कुणी पाहू नये यासाठी स्त्री सुलभ लज्जेनं केलेली एकांताची
मागणी शेषनागरूपी पडद्यानं विष्णूंनी पूर्ण केली. स्त्रीभावना जपण्याचं हे
आणखी एक उदाहरण. अगदी निरागस भाव असणाऱ्या गायींनाही आकर्षून घेण्याची
क्षमता असणारा हा संगीत प्रभू स्त्री संगात कसा कमी ठरेल?
गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥
हे श्रीकृष्णा
तुझे गोप मधुर आहेत, तुझ्या गायी मधुर आहेत, तुझा गोप परीवार मधुर आहे,
तुझी निर्मिती मधुर आहे, तुझं पायदळी तुडवणं मधुर आहे, तुझ्या भक्तीचं
फलित मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
गोविंद
म्हणजेच गो = सृष्टी विंद = आनंद देणारा साऱ्या सृष्टीला आनंद देणारा असा
हा गोविंद. खरे तर गोविंद याचं खरं रूप गोमांस आहे. चुकीच्या रीतीनं गायीचं
मांस असा अर्थ निघतो. पण गोमांस (गो = सृष्टी माम् = मला स = परम ईश्वर)
म्हणजे जो चराचरात आहे आणि मला परम ईश्वराकडे घेऊन जातो तो गोमांस. सर्व
वर्ण वरोत्तम 'ह' ने सुरु होणारे 'हरी' हेही याच रूपाचं नाव. र म्हणजे
शरीरातील ईश्वरी शक्ती. ई कार म्हणजे श्वास घेण्याची शक्ती. 'हरती अविद्यम्
इति हरी' जेव्हा जीवशक्ती नष्ट होते तेव्हा आत्म्याचं रूप 'हरी' होतं, ईश्वराशी
एकरूप होतं. ज्याच्या हातून मृत्यू आल्यास मुक्ती मिळते असा तो. गाय हे
अशा निःस्वार्थी प्रेमाचं निरागस प्रतीक. त्या गायीला आणि तिला
सांभाळणाऱ्या गोपांना पालक म्हणून सांभाळणारा हा हरी. लाहिरी महाशय यांच्या
नुसार कृष = वाढवणे न = नकार जे शेतीची गोपालनाची कामे करतात ते गोप
त्यांना पाळणारा (कृष) तो गोपांच्या कर्माला नकार देऊन त्यांच्यातल्या
ईश्वरी प्राण शक्तीचे अस्तित्व दाखवतो तो कृष्ण. सर्वच चराचर सृष्टीचं असं
पालन करणारा हा कृष्ण मधुरच आहे. अध्यात्मात अनेक रीतीने पुजला गेलेला
विष्णू भौतिक जगात कृष्ण म्हणूनच लोकप्रिय आहे. अशा ह्या लोकप्रिय दैवताची ही भक्ती पुष्टिमार्गाने केल्यास अद्वैतवाद साधता येईल या मताने श्री वल्लभ
आचार्य यांनी या रचनेला आकार दिला. प्रेम आणि अध्यात्म यांचा हा मिलाफ
पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. शिवाय माझं नाव
मधुरा या श्रीकृष्ण स्तुती मध्ये इतक्यावेळा यावं यापेक्षा मोठं भाग्य ते काय असेल ?
©
ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास
shivsanchitam@gmail.com.
या वर ई-मेल करावी.
=============================================
The Author of Shudhadvaita Shri Vallabh Acharya created this composition to worship Lord Shri Krishna, by Pushtimarga. Along with this the composition describes Shri Krishna with sweetness along with Bhaktimarga - The path to God is through love. This apprehension of Shri Krishna is completely woven in Madhu rasa (sweet emotions), which not only limns his sweetness but also his equivocal forms. Surprisingly it mentions the 'Venu' bansuri (flute) which was the most favourite of Shri Krishna amongst his six favourite bansuris. The bansuri 'Mahananda' which was gifted to Shri Krishna by Radha was best-loved by him. But, the bansuri 'Venu' was so dear to him, that even Radha had started being jealous of it. In ancient times Indian culture considered 3 basic pillars of Worship by Music. Atma - Veena - Venu, almost considered as Trinity of music. One of the Trinity and enemy of the Gopis, 'Venu' was lucky to drink the nectar of Shri Krishna's lips. Shri Vallabh Acharya described this Lord of sweetness so charmingly that it shows the path of pure love to the disciples for Bhaktimarga.
Bramhasamhita also describes Shri Krishna in a very ornamental way saying " I worship the Supreme Lord Govind who evinces his skill of playing Venu, whose eyes are like Lotus petal, whose forehead is covered with peacock feather and looks like muffled up in blue clouds and whose body is more beautiful than Kamadeva".
Shri Krishna, the creator of many variations of Kamashastra and Kamarasa, was not only a prodigy in sex but he was a real man who was able to satisfy a woman in true sense. This son of Nanda was not only attractive but was also righteous and powerful. Emotionally every Gopi was in love with him. He was a plenipotentiary master in any relationship. This almighty Lord (Yugandhar) truly attained the position of 'Vasudeva'. 'Vasudeva' is not merely the son of Vasudev but Shri, completeness, perfection, being ideal is 'Vasudeva'. Well, Lord Krishna himself has put his efforts to attain this position. He didn't get this title easily. To worship and praise this Leeladhar, Shri Vallabh Acharya chose the Madhur or sweet form (rupa) of Shri Krishna. A very sweet and dewy eyed but dark skinned milkman (Gawli) did impossible things in his life so smoothly.
I am trying to comprehend this (sweet) praising of Shri Krishna:
adharaṃ madhuraṃ vadanaṃ madhuraṃ
nayanaṃ madhuraṃ hasitaṃ madhuram।
hṛdayaṃ madhuraṃ gamanaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your lips are sweet, your cherubic face is sweet, your mesmerizing eyes are sweet and your laughter is sweet। Your loving heart is sweet and your enchanting gait is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness ॥
When Shri Krishna asked the bamboo tree " I entice the Gopis, other animals and birds, so what are you going to offer me?" The bamboo answered "Take whatever you want". Shri Krishna asked for his life and he did not hesitate. Krishna cut his body, made eight holes to it and the bamboo was agonized. After this examination Krishna made a beautiful flute out of the body of the bamboo tree, called Bansuri emanating hypnotizing tunes and he kept the flute always with him. Even if the death is near the sorrow becomes sweet due to mere whiff of Shri Krishna is the symbolic form of the Bansuri.
vachanaṃ madhuraṃ charitaṃ madhuraṃ
vasanaṃ madhuraṃ valitaṃ madhuraṃ।
chalitaṃ madhuraṃ bhramitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your speech is sweet, your nature is sweet, your garments are sweet and your bent posture is sweet। Your movement is sweet and your creation of confusion is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
To bemuse anyone was a naughty but in a sense political efficacy of Lord Krishna. Being the incarnation of Lord Vishnu himself, the omniscient Narayana used to confuse the women around him to observe that innocent beauty and confuse the men for political purpose. This guile sometimes was intoxicating but sometimes proved to be ruinous. With the crown decorated with beautiful flowers like rangini, navamali, sumaali, chameli and jaai, gorgeous Vaijayanti Mala made from different wildflowers (offered to him by Radha during the courtship), balapaasya flower ornament, a upper earring called tadaank, earrings made from lotus, bhrunga and pomegranate, small earrings made of pushpi, small flower garland called grevekyak, upper hand ornament angada, manibandhini bracelet, forehead adorned with sindhuvar flowers and other ornaments like hansaka and kanchuli this manly beauty like Kamadeva was absolutely ecstatic and irresistible.
veṇu-rmadhuro reṇu-rmadhuraḥ
pāṇi-rmadhuraḥ pādau madhurau।
nṛtyaṃ madhuraṃ sakhyaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your flute 'Venu' is sweet, your flowers (with pollen) are sweet, your hands are sweet and the dust of your feet is sweet। Your dance is sweet and your friendship is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
'Madanajhankruti' a bansuri very difficult to play is in fact the real identity of Bansidhara - Shri Krishna. This bansuri hypnotized the animals too. But the tunes emerging from Venu bansuri were out of this world. The were not only sweet but were intoxicating. This deftly and graceful piece of art gave rhythm to Rasleela. In the poetrical sense the pollen grains scattered on Krishna's body were equated to the salient but dainty red garland around the nipples of a woman. These pollen grains not only jogged the memories of women about romance but also the feeding of the baby. It was a symbol of the golden moments in women's life both as a lover and as a mother. A woman is said to be in undying motherhood once she conceives a baby, but Shri Krishna stymied them to be undying lovers. A cap-a-pie cupid - Leeladhara was a faultless 'sakha' or lover of the Gopis. His divine friendship was deeply experienced by everyone from Draupadi to Sudama. But, being the 'sakha' of the Gopis of Brijabhumi was a totally angelic role played by Shri Krishna.
gītaṃ madhuraṃ pītaṃ madhuraṃ
bhuktaṃ madhuraṃ suptaṃ madhuraṃ।
rūpaṃ madhuraṃ tilakaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your singing is sweet, your drinking is sweet, your eating is sweet and your sleeping is sweet। Your form is sweet and your mark (tilak) on the forehead is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
This extraordinary warrior revealing his cosmic form was truly attractive as his real name Akarshan means. Inheriting his mother Devaki's beauty and his farther Vasudeva's handsomeness Shri Krishna was very princely looking with a dark complexion. A mark of the Dravidian beauty i.e. dark skin is absolutely misinterpreted by us as krishna (colour). In practicality krishna means krushi +N (the God of farming) The God of food on which we survive, the operator, none other than Lord Vishnu. Vishnu literally means 'vishyati pravishyati iti' (one who can enter anywhere). By entering in food particles he offers us life.But, Krishna is dark coloured is a very wrong interpretation, which was linked to the skin colour of this incarnation of Lord Vishnu. Perhaps this was a lesson to the white supremacist people and let them realize that beauty lies in any colour. Shri Krishna has indirectly taught a lesson to such people whose criteria for love depends on skin colour, age, race / caste. Krishna's pure lovemaking with already married Radha and eloping with princess of Vidarbha, Rukmini shows his boundary-less love.
karaṇaṃ madhuraṃ taraṇaṃ madhuraṃ
haraṇaṃ madhuraṃ smaraṇaṃ madhuraṃ।
vamitaṃ madhuraṃ śamitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your acts are sweet, your carrying over is sweet, your stealing is sweet and your divine love play is sweet।Your exuberance is sweet and your relaxation is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
Who can forget the eloping of Shri Krishna with the princess of Vidarbha, Rukmini? The episode depicts the right of the lovers to come together and manhood of the real 'man' (Purusha). The root or beej 'pu' itself means infinitely existing. A purusha is a symbol of manhood or infinite guardian (of a female). 'Vasudeva' the form of Shri Krishna depicts this power of a complete man. This form satisfies a woman in every sense and pampers her emotions. This brave and bold lover who never hesitates to express his emotions also hurt Rukmi, the brother of Rukmini without any prejudice. With no hesitation to express his courage this brave lover never fears for bloodshed, goes on to kill the Kaliya Naga, kills his maternal uncle Kansa and becomes a charioteer in the war of Mahabharata. All these forms of his are alluring. At the time of lovemaking this Milinda becomes passionate, gives an intoxicant smile and is able to satisfy a woman's body and mind. All these forms of Shri Krishna are sweet, absolutely sweet...
guñjā madhurā mālā madhurā
yamunā madhurā vīchī madhurā।
salilaṃ madhuraṃ kamalaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your humming is sweet, your garland is sweet, the Yamuna river is sweet and her rippling waves are sweet। The water (of Yamuna) is sweet and the lotus flowers floating in the river are sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
The humming of Krishna while lovemaking was sweet as a flute. The garland of Vaijayanti mala looked very elegant at that time. The flowers used in the Vaijayanti mala are medicinal like turmeric and can kill infectious bacteria. These flowers don't get spoiled easily. Due to the medicinal properties not only these flowers remain fresh but some good quality liquor is prepared using these flowers. No wonder these medicinal but intoxicating flowers affect the mood while lovemaking. A healthy body and intoxicating smell of these flowers both were effective during lovemaking. Unfathomable love like the deep Yamuna river, wavy movements of the body during lovemaking, the sweat droplets impersonating pure water of Yamuna and lotus flowers mimicking the curves of the body.. Bansidhara, the absolute symbol of love is very sweet.
gopī madhurā līlā madhurā
yuktaṃ madhuraṃ muktaṃ madhuraṃ।
dṛśhṭaṃ madhuraṃ śiśhṭaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your Gopis (cowherd girls) are sweet, your divine play is sweet, your togetherness is sweet and your setting free is sweet। Your glance is sweet and your courtesy is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
Almost all the Gopis in Brijabhumi were married, though their true love was Shri Krishna. This Natavar was the master of passionate love and a delicate separation. While close to so many women, he never forgot his etiquette and this was the reason this Natavar was so popular among them. A woman's body is her real pride. A woman blossoms if she willingly participates in lovemaking but she withers under force. So the never withering freshness of the Vaijayanti mala was the symbol of a woman's mind when Krishna was around. This cupid like Mukund would attract every Gopi without hurting her mind. Even today such lovers are called 'Krishna'. Like a Kamadeva in human incarnation Krishna would be the ideal lover for any woman, who maintained a perfect balance between beauty and courtesy. Sheshashayi Bhagwan (reclining on the serpent-bed of Shesha) - the form of Lord Vishnu also depicts the same balance. When Shri Laxmi urged for lovemaking she demanded privacy to avoid embarrassment. Shri Vishnu fulfilled her wish by using Shesha Naga as a veil. This is another example of taking care of a woman's dainty emotions. How this perfect lover and the master of music, who attracted the innocent cows too, would fail to satisfy the desires of women?
gopā madhurā gāvo madhurā
yaśhṭi rmadhurā sṛśhṭi rmadhurā।
dalitaṃ madhuraṃ phalitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥
O Krishna, your Gopas (cowherd boys) are sweet, your cows are sweet, your herding staff is sweet and your creation is sweet। Your breaking is sweet and your making is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
Govind is derived as go (nature) +vinda (happiness) i.e. the one which gives happiness to the world. Metaphorically real form of Govinda is Gomansa. Though it is mostly misinterpreted as beef. But, Gomansa is go (nature) + mam (to me) + sa (almighty Lord) which means the one who drives me to the almighty Lord and exists in every particle of nature. 'Hari' is another form of this name which includes the most exalted Varna 'ha'. 'ra' is the divine power in the body and 'i' is the power to breath. It is derived from 'harati avidyam iti Hari' which means when the mortal power of Jeeva perishes then the soul becomes 'Hari' and unites with the almighty Lord. So 'Hari' is a form of the Lord which will bless you with salvation if you die at his hands. Cow is a very innocent form of such selfless love. The guardian of the cows and the cow herds is Hari. According to Lahiri Mahashay Krishna is derived from Krish (nurture) + na (No) which means the one who denies the (negative) results of Karmas of the cowherds and shows his powerful existence to save them is Krishna. Krishna, the powerful guardian of the nature is really sweet. Though in spiritual world, Lord Vishnu is worshiped in various ways, but in mundane life his incarnation of Krishna is the most popular one. Shri Vallabh Acharya created this beautiful Madhurashtaka claiming that if this popular deity is worshiped through Pushtimarga then it will help to attain Advaitvada, spiritual realization. We are no doubt tempted to read this conciliation of love and spirituality again and again.
Well, my name Madhura has been mentioned in every line of this beautiful creation praising Lord Krishna. What will be more prosperous than this?
©
All rights reserved. No part of this publication may be reproduced,
distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
==========================================