मागील लेखात मी बाधिक वास्तू म्हणजे काय याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. जगात अनेक वास्तू 'बाधिक' म्हणून गणल्या जातात. त्यात तथ्य किती आणि अवडंबर किती हे ठरवणं कठीण आहे. अशाच एका 'बाधिक' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वास्तूबद्दल मी वाचकांना माहिती देत आहे.
१९२४ साली अमेरीकेतील लॉस अँजेलिस इथे हॉटेल व्यावसायिक विल्यम हॅनर यांनी मोठ्या हौशीनं हॉटेल सिसिल (Hotel Cecil) उभारलं. प्रवासी व्यावसायिक, हौशी प्रवासी अशा लोकांची सोय करणं हा या हॉटेलचा मुख्य उद्देश होता. असं म्हणतात कि हॅनर यांनी त्या काळचे तब्बल १ लाख डॉलर केवळ हॉटेलच्या पुढील भागाच्या सजावटीसाठी खर्च केले. एकूण ७०० खोल्या असलेलं हे प्रशस्त हॉटेल खरं तर लॉस अँजेलिसचं आकर्षण बनायला हवं होतं. पण पुढील काही वर्षांतच अनेक वाईट घटना, आत्महत्या, हत्या आणि इतर विचित्र गोष्टींमुळे हे हॉटेल 'बाधिक' आहे की काय अशी शंका सगळ्यांना येऊ लागली. अभ्यासकांच्या आकलनापलीकडील काही गोष्टी इथे घडल्या. त्यातील प्रत्येक गोष्ट खोलात सांगणं शक्य नाही पण महत्त्वाच्या घटना मी इथे जरूर विस्तारानं सांगेन.
एकूण १६ च्या वर आत्महत्या - हत्या आणि ज्यांना 'पारलौकिक' म्हणता येईल अशा घटनांची नोंद या हॉटेल संदर्भात कायदेशीररित्या आहे. माझं स्पष्ट मत आहे की यापेक्षा अनेक जास्त पारलौकिक घटना इथे घडल्या असतील. पण काही कारणास्तव त्याची नोंद केली गेली नाही.
असो, नोव्हेंबर १९३१ मध्ये एका ४६ वर्षीय व्यक्तीनं हॉटेल सिसिल मध्ये खोट्या नावानं खोली घेतली. एका आठवड्यानंतर त्यानं विषारी गोळ्या घेऊन आत्महत्या केली. ही ह्या हॉटेलमधील मृत्यूची सर्वात पहिली नोंद आहे. त्यानंतर दरवर्षी काही ना काही घडतच होतं. उदा: १९३४ मध्ये या हॉटेल मधील एका खोलीत लुईस बोर्डेन नावाच्या सैन्य अधिकाऱ्यानं वस्त-यानं स्वतःचा गळा कापून घेतला. पण काही वेगळ्या घटनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्या घटना अशा आहेत.
१९४४ मध्ये या हॉटेल मध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय डोरोथी परसेल हिनं त्याच ठिकाणी एका बाळाला जन्म दिला. डोरोथीच्या मते ती गर्भवती असल्याचं तिला ठाऊकच नव्हतं (?). तिनं ते नवजात बालक मृत आहे असं समजून त्याला खिडकीतून फेकून दिलं. त्या बालकाच्या मृत्यूनंतर तिला मानसिक रोगी ठरवलं गेलं.
१९४७ साली लॉस अँजेलिस मध्येच राहणारी व चित्रपट क्षेत्रात नाव कमावण्यासाठी धडपडणारी २३ वर्षांची एलिझाबेथ शॉर्ट हिनं याच हॉटेल मध्ये काही काळ मद्यपान केलं. त्यानंतर तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या शरीराची अशी विटंबना झाली की त्याची तपासणी करणाऱ्या पोलिसांचाही थरकाप उडाला. तिच्या शरीराचे मध्यभागी कापून २ तुकडे केले होते. तिच्या चेहऱ्यावर तोंडाजवळ असा वार केला कि तोंडाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोठी चीर दिली गेली. तो रक्तबंबाळ भाग जणू मोठं हास्य असल्यासारखा पण भयानक दिसत होता ज्याला 'ग्लासग्लो स्माईल' असं म्हटलं जातं. तिचे अनेक अवयव आणि आतडी कापून वेगळी केली गेली. अशा अत्यंत भयानक स्थितीत सापडलेल्या तिच्या नग्नावस्थेतल्या शवाची आधी ओळखच पटत नव्हती. त्या वेळी त्या शवाला 'ब्लॅक डाहलिया' असं नाव दिलं गेलं. आजही तिची हत्या कोणी केली हे गूढ उकललेलं नाही.
१९६२ साली सिसिल हॉटेल मधील एका खोलीतून २७ वर्षीय पौलिन ऑटन हिनं आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. रस्त्यावरून जाणाऱ्या आणि ह्या घटनेशी काहीही संबंध नसणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीवर ती आदळली. यामुळे त्या निष्पाप व्यक्तीचाही जीव गेला.
या काळात सिसिल हॉटेल मध्ये इतक्या आत्महत्या घडल्या की तेथील रहिवाशांनी या हॉटेलला 'द सुईसाईड' (The Suicide) म्हणजेच आत्महत्या होण्याचं ठिकाण असं नाव ठेवलं. आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त होतं तेव्हा त्या व्यक्तीचं इतकं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं की त्यापासून त्याला परावृत्त करणं खूप कठीण असतं. पण अशा व्यक्तींना घरी वा बाकी ठिकाणांपेक्षा याच हॉटेलमध्ये येऊन जीव द्यावा असं वाटणं हे संशोधकांसाठी नक्कीच अनाकलनीय होतं.
त्यानंतरही अनेक भीतीदायक घटना सिसिल हॉटेल मध्ये घडल्या. काहींची नोंद तर झालीच नाही. १९८०च्या दशकात हे हॉटेल म्हणजे गर्दशी संबंधित टोळ्या, खुनी, गुन्हेगार यांचा अड्डाच बनलं. काळी जादू करणारे लोकही ह्या हॉटेलचा आसरा घेऊन इथं राजरोसपणे आपली कृत्यं करू लागले. ह्या हॉटेलच्या गच्चीवर कोणालाही प्रवेशबंदी होती. तरीही ह्या हॉटेलच्या गच्चीवर काळी जादू केल्याचे पुरावे नंतरच्या तपासणीत मिळाले. अत्यंत गूढ असे संदेश आणि इतर काही पुरावे यावरून हे सिद्ध झालं की इथं वामकृत्यं केली गेली. अर्थात कोणी कितीही नाकारलं तरी यात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग किमान पैशाच्या लोभानं दिलेली सूट होती हे उघडच आहे. पण ह्याबद्दल कोणतेही पुरावे कधीच उघड केले गेले नाहीत.
१९८५ साली प्रसिद्ध सिरीयल किलर रिचर्ड रमीरेझ याच हॉटेल मध्ये वास्तव्य करत होता. अत्यंत निर्दयी असा हा साखळी हत्या करणारा, हत्या केल्यानंतर याच हॉटेल मध्ये राहायला येत असे. शैतानाचा खूप मोठा पुजारी असणारा हा हत्यारा इथेच आपल्या शैतानाची पूजा करत असे. हत्या केल्यानंतर रक्तानं माखलेले कपडे तो ह्याच हॉटेलच्या पाठी लपवत असे. नंतर तो हॉटेलच्या मोकळ्या जागेत नग्नावस्थेत किंवा आंतर्वस्त्रांवर फिरत असे. यावर कोणाच्याच भुवया कशा उंचावल्या नाहीत ? असा प्रश्न पत्रकार जॉश डीन यांनी उपस्थित केला होता. म्हणूनच ह्या हॉटेल मधील कर्मचाऱ्यांच्या आणि व्यवस्थापकांच्या वागण्यावर थोडा संशय येतो. तो राहत असणारी खोली नंतर कायमची बंद केली असली तरीही त्याच्या तिथल्या वास्तव्यामुळेच एक प्रकारची भीती लोकांच्या मनात बसली. 'नाईट स्टॉकर' म्हणून नाव दिला गेलेला हा सिरीयल किलर राजरोसपणे हत्यांच्या काळात इथं राहत होता.
१९९१ मध्ये आणखी एका सिरीयल किलरनं इथं वास्तव्य केलं. 'व्हिएन्ना स्ट्रँगलर' म्हणून प्रसिद्ध असलेला जॅक अंटरविगर मूळचा ऑस्ट्रियाचा. तिथं तो खुनासाठी जन्मठेप भोगत होता. पण त्या काळातच त्यानं अनेक कविता, पुस्तकं, नाटकं इतकंच काय तर आत्मचरित्रही लिहिलं. तो लिखाणामुळे इतका प्रसिद्धीला आला की अगदी जगप्रसिद्ध अशा लेखकांनीही त्याच्या सुटकेसाठी आंदोलनं केली. शेवटी १९९० ला त्याची सुटका झालीही, पण ती केवळ आणखी काही निष्पाप जीव जाण्यासाठीच. कारण त्यानंतर तो १९९१ मध्ये अमेरिकेतील सिसिल हॉटेलमध्ये आला आणि पुन्हा हत्येचं सत्र सुरु झालं. ह्याच हॉटेल मध्ये रिचर्ड रमीरेझ असल्यामुळे जॅक दुसरीकडे न जाता इथेच राहिला असंही काही लोकांचं म्हणणं आहे. रिचर्ड प्रमाणे जॅकही हत्येनंतर राजरोसपणे ह्या हॉटेलमध्ये राहत असे.
२०१३ मध्ये एक वेगळ्याच प्रकारची गूढ हत्या सिसिल हॉटेलमध्ये झाली. २१ वर्षांची कॅनडाची रहिवासी असलेली एलिसा लॅम (Elisa Lam)इथं शिक्षणासाठी राहत होती. ती मानसिक दृष्ट्या संतुलित नव्हती आणि त्यासाठी औषधं घेत होती. पण ३१ जानेवारीला ती गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर तिचा शोध घेऊनही फायदा झाला नाही. पण त्याच हॉटेलमधील लिफ्ट मध्ये अत्यन्त विचित्र हालचाली करतानाचा तिचा एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ योग्य पद्धतीनं न दाखवता त्यात बदल केले गेलेत असे आरोप आजही होत आहेत. त्यानंतर फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासून सिसिल हॉटेलच्या रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याला विचित्र 'मजेशीर' (?) चव असल्याचं आणि पाण्याचा रंग काळपट असल्याचं सांगितलं. त्यानंतर पाहणी केली असता १९ फेब्रुवारीला तिचं नग्न शव पाण्याच्या टाकीत सापडलं. या मृत्यूला अनेक कांगोरे आणि 'योगायोग' आहेत. तिनं आत्महत्या केली असं हॉटेल मधील कर्मचारी म्हणत होते. पण गच्चीवर कोणालाही प्रवेश नसताना ती तिथे पोहोचून पाण्याच्या टाकीचं खूप वजनी झाकण उघडून आत कशी गेली याचं कोणतंही समाधानकारक उत्तर आजही मिळालेलं नाही. दुसरा योगायोग म्हणजे, त्या वेळी लॉस अँजेलिस मध्ये जे टीबीच्या जंतूंचं संशोधन चालू होतं त्या तपासणीच्या साधनाचं नाव होतं 'लॅम एलायसा'. उच्चार वेगळा असला तरी इंग्रजी स्पेलिंग Lam Elisa हेच आहे. तिच्यावर बलात्कार झाला असण्याची दाट शक्यता असूनही त्यासंबंधीचं कोणतंही तपासणीचं निदान खात्रीलायक नाही. तिच्या मृत्यू पूर्वी तिनं लिहिलेले काही सोशल मीडिया वरील लेख अत्यंत संशयास्पद आणि कोणीतरी लिहिलेले किंवा जबरदस्तीने लिहून घेतलेले वाटतात. तिच्या मृत्यूनंतरही त्या ठिकाणी लेखन चालू होतं. तिचा मोबाईल कधीच मिळाला नाही. सगळ्यात मोठी योगायोगाची गोष्ट म्हणजे एलिसाच्या मृत्यूच्या आठ वर्षे आधी 'डार्क वॉटर' नावाचा एक चित्रपट आला होता. त्याची कथा आणि एलिसाचा मृत्यू यात ९५ % साम्य आहे. इतकंच काय तर या चित्रपटातील नायिकेचं नाव आहे सिसिलिया (Cecilia) आणि तिच्या आईचं नाव आहे डाहलिया (Dahlia). एलिसाच्या मृत्यूचं खापर अर्थातच तिच्या मानसिक रोगावर फोडलं गेलं. काही लोकांच्या मते एलिसा 'एलिव्हेटर गेम' नावाचा जपानी खेळ खेळत होती जो पारलौकिक शक्तींशी संबंधित आहे. यानंतर या संबंधी अनेक दावे केले गेले पण एलिसाच्या मृत्यूचं गूढ अजूनही एक गूढच आहे. तिचा मृत्यू एक अपघात आहे अशी नोंद केली गेली आहे.
आता मी वर दिलेल्या घटना सर्वच बाबतीत पारलौकिक आहेत असं मुळीच नाही. अशी अनेक हॉटेलं किंवा ठिकाणं आहेत जिथं हत्या, आत्महत्या घडतात. त्यात बळी पडलेल्यांची वैयक्तिक कारणंही खूप असतात. गुन्हेगारी, पोलिसांचं / राजकीय संरक्षण असे अनेक मुद्दे यात येतात. पण हे हॉटेल थोडं वेगळ्या कारणामुळे मला विचित्र वाटलं. इथे घडलेल्या घटना, सिरीयल किलर्सचं वास्तव्य, काळी जादू आणि तत्सम प्रकार ह्या गोष्टी तर आहेतच. पण पहिल्यापासूनच ह्या वास्तूत राहणाऱ्या लोकांना अनेकदा भास होणं, भीती वाटणं, आवाज येणं अशा गोष्टी घडल्या आहेत. इथे आल्यानंतर आत्महत्येचे विचार प्रबळ झाले किंवा नैराश्य आलं असंही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. अर्थात यात मानसशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे. अनेकांच्या मृत्यूपूर्वीचं शेवटचं ठिकाण हॉटेल सिसिल आहे. इथला अभ्यास करणाऱ्या अनेक संशोधकांनी इथल्या जागेबद्दल इथे राहिल्यावर 'विचित्र' वाटण्याचे अनुभव सांगितले आहेत. गुन्हेगारी जगतातील किंवा इतर वेळीही अनेकांना काळ्या जादूसाठी 'मदत' म्हणूनही वाईट गोष्टी इथं घडवल्या गेल्या आहेत. माझ्या मते ज्या जागेवर हे हॉटेल बांधलं गेलं त्या जागेतील दोष, दिशादोष अशी काही वास्तूशास्त्राशी निगडित कारणं यामागे असू शकतील. किंवा सुरुवातीच्या काळात जे मृत्यू इथं झाले त्यांची वासनाशवं इथे वावरत असावीत. कारण काही महिन्यांच्या अंतरानं इथे दुर्दैवी घटना घडतच गेल्या. त्यामुळे खूप वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तींचा इथं संबंध येत नाही. म्हणूनच नुकत्याच मरण पावलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींची वासनाशवं इथं वावरत असण्याची दाट शक्यता आहे. तसंच हे हॉटेल वाममार्गी कृत्यांसाठी वापरलं जायचं हे बऱ्याच लोकांना ठाऊक होतं. त्यामुळे कोणी सिद्ध तांत्रिक इथं राहत असल्याची किंवा इथं वावरणाऱ्या अतृप्त आत्म्यांचा त्यानं वापर केल्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या हॉटेल मध्ये घडलेले सर्व मृत्यू अनैसर्गिकच होते. त्यामुळे मृतात्म्याला कोणती योनी मिळाली असेल हे सांगणं अवघड आहे. मृत व्यक्तींची वैयक्तिक कारणं आणि मृत्यूपूर्वी इथं घडलेल्या गूढ गोष्टी यांचा विचार करता तांत्रिक (वाममार्गी) घटनांची शक्यता आहे असं माझं मत आहे.
सारासार विचार केल्यास यातील काही घटनांचा अर्थ आपण लावू शकतो. काही घटनांचा अर्थ न लागण्यामागे त्यामागील मुख्य कारणं आणि पुरावे लपवले गेले असण्याची शक्यताही खूप आहे. तसंच एकदा अशी प्रसिद्धी झाल्यावर आर्थिक फायद्यासाठी काही गोष्टी फुगवूनही सांगितल्या गेल्या असतील. या सर्व शक्यतांचा सगळ्या बाजुंनी विचार करूनच वाचकांनी यात तथ्य किती हे ठरवावं. केवळ माहिती म्हणून मी हा लेख लिहिला आहे.
आज हॉटेल सिसिलचं नाव बदलून स्टे ऑन मेन (Stay on Main) केलं आहे. त्याचं रूपही बदललं आहे. नवीन सुधारणा करून हा काळा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आजच्या हॉटेल चालकांनी नक्कीच केला आहे. पण आजही या हॉटेलमधील घडलेल्या घटनांचा विसर कोणालाही पडलेला नाही. अनेक अनुत्तरीत गोष्टींमुळे '
स्टे ऑन मेन' पेक्षा 'हॉटेल सिसिल' लोकांच्या स्मरणात आहे.
©
ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास
shivsanchitam@gmail.com.
या वर ई-मेल करावी. ===============================================
In my previous article I tried to explain the concept of 'haunted places'. Of course, worldwide there are many places considered as 'haunted' but it is really difficult to figure out the actual number of authentically haunted places. Well, I am trying to present the inside story of one of such famous haunted places here.
In 1924, hotelier William Hanner from Los Angeles, USA passionately built the Hotel Cecil in Downtown Los Angeles. It was primarily built as a destination for the business travellers and tourists. He was as keen as mustard about every detail of the hotel and it is said that he spent almost $ 1 million for the opulent marble lobby of the hotel. The commodious hotel with 700 guest rooms should have been the center of attraction in LA. But beneath this glittering surace laid a troubled past and a history of darkness. After only a few years of opening the hotel it became the site of suicides, murders and other grisly unexplained events. This led to the sprawling of the conspiracy that the Hotel Cecil might be 'Haunted'. Even some paranormal researchers found the gruesome history of this hotel inexplicable. All the details of these numerous grisly events are not possible to write here, but I will describe a few important incidences associated with the hotel.
Well, after just a few years of opening the hotel i.e. in November 1931 a 46 year old person booked a room in the Hotel Cecil under a false name. After just one week of checking in this person was found dead in his room after consuming poisonous capsules. This was the earliest recorded death in the hotel. Then almost every year some unfortunate and mysterious events occurred which gave an unparalleled reputation for the macabre to this hotel. For example, in 1934, former Army Medical Corps Sgt. Louis Borden, was found dead in his room at the Hotel Cecil. He slashed his throat with a razor. There were many such eerie suicides and deaths in the hotel. But a few remarkable events took the whole Los Angeles to storm. Here are a few of them.
In 1944, 19 years old Dorothy Purcell gave birth to a baby boy in the hotel while she was sharing the room with her boyfriend. According to her, she was unaware that she was pregnant (?). Thinking her new born baby was dead, she threw him out of the window. Though she was first charged with murder, later on she was not found guilty by the reason of insanity.
In 1947, an aspiring actress and resident of Los Angeles, Elizabeth Short was seen at the Hotel Cecil's bar. Later on she was gruesomely murdered. Her body was discovered in such a rebarbative condition that the scene made the police officers' hair stand on the end. Elizabeth Short's naked body was found severed into two pieces. Her face had been slashed from the corners of her mouth to her ears, creating an effect known as the glasgow smile.
She had several cuts on her body, where entire portions of flesh had been sliced away. This naked dead body when discovered, was not even recognizable. And it was posthumously named as 'Black Dahlia'. Till date the murder case is a mystery.
In 1962, 27 year old Pauline Otton jumped from the window of her room in Hotel Cecil. Tragically she landed on a 65 years old pedestrian who was just walking by and had no connection with her. This killed them both instantly.
Throughout the 1940s to the 1960s so many suicides occurred at the Hotel Cecil that the long time residents of the hotel had begun to call the Cecil "The Suicide". When people have suicidal tendencies, they are so emasculated that it really becomes difficult to get them out of the tight spot, though it is exigent. But researchers or police found it difficult to exactly know the reason behind the victims to choose this hotel as a suicide spot, rather than choosing their own homes or other locations.
Later on also the hotel still remained a site for some unexplained eerie events. Some events just went unrecorded. In 1980s when already the tragic incidences had contributed to the hotel's body count, it also became a joint for the notorious criminals, drug dealers, junkies and serial killers. Satanic rituals were regularly performed in the hotel, though these kinds of sneaky activities were properly veiled. There was no access to the roof of the Hotel Cecil to the residents or visitors. But while inspecting the hotel after a murder case, it was revealed that some satanic rituals have been performed on the roof of the hotel. Some mysterious codes and other evidences proved that the rituals were performed. Though the 'associated' people have given it the thumbs down, it is an open secret that the staff of the hotel was directly or indirectly involved in these sneaky acts, probably for the money they were offered. Though it was obvious that without their support, it was not possible to perform such acts in the hotel, no allegation was ever accepted.
In 1985, notorious serial killer Richard Ramirez stayed in the Hotel Cecil. The merciless serial killer stayed here during his horrific killing spree. A satanist and a devotee of Lucifer used to perform his rituals in his hotel room. After murdering a victim he used to dump his bloody clothes into the hotel's dumpster. Then he used to saunter into the hotel lobby either naked or only in underwear. On this journalist Josh Dean writes "
none of which would have raised an eyebrow". Due to such reasons there is always a question mark on the behaviour of the staff members or management of the Hotel Cecil. Well, though the room where Richard resided was closed and never allotted to any resident again, the temporary home of this horrific killer had created fear in peoples' minds. Dubbed as the 'Night Stalker', Richard Ramirez could stay in the hotel with his blood soaked lifestyle.
In 1991 Hotel Cecil served as a temporary home for one more serial killer. Dubbed as 'Vienna Strangler' the Austrian serial killer Jack Unterweger also stayed here during his second killing spree. In Austria the convicted murderer was serving life sentence for a murder. While imprisoned he wrote poems, plays, short stories and even an autobiography. He became so famous that even a campaign to pardon and release Unterweger from prison began. Supported by world famous authors, this campaign was so aggressive that finally he was released in 1990. Sadly this release merely proved to be fatal for more innocent lives. Because in the next year he came to the USA and stayed in the Hotel Cecil to start his next killing spree. According to some researchers Jack chose this hotel because he was influenced by Richard Ramirez. Just like Richard, even Jack stayed here with his blood soaked lifestyle.
In 2013, due to another mysterious murder case, the stories about the Hotel Cecil's spooky environment swirled once more. 21 year old Canadian student Elisa Lam was staying at the hotel. Reportedly she was a patient of bipolar disorder and was under proper medication. She was missing from January 31st and her parents reported the case to the police. Even after search and thorough investigation nothing could be found in her case. Then her allegedly last
surveillance
footage was published, where she was behaving erratically in the elevator of the hotel. Even today, the people demanding justice for Elisa are claiming that the video was doctored. During her search in February second week the hotel guests began complaining about the dark colour of the tap water and it's 'funny' (?) taste. On February 19th Elisa's naked body was discovered in the water tank of the hotel. This strange case has many angles and haps. According to hotel management, she committed suicide but there is no access to the roof of the hotel. Then how her body was found inside the water tank with a very heavy lid which is impossible for a woman of Elisa's stature to lift up. This question remains unanswered. Another creepy coincidence is at the time of Elisa's death a study on tuberculosis was going on in LA. The kit used for the test was called 'Lam Elisa'. There was a very high possibility that she was raped and murdered, but the total investigation was botched from the beginning. Some of her social media blogs written allegedly by her really seem dubious, as if they were edited or written by somebody else or she was forced to write them. Even some blogs were published after her death. Her mobile was never recovered. The eeriest coincidence of all is definitely disturbing. 8 years before the death of Elisa Lam, a film named Dark Water was released. The plot of the movie and the whole incidence of Elisa Lam case has almost 90% similarity. Not only the story, but even the names of the characters in the movie like the main female character named Cecilia and her mother named Dahlia is a very eerie coincidence. Well, Elisa Lam's death was ruled out as an accident (which is hard to believe) and her mental illness was held responsible for it. A few researchers believe that she was playing the 'Elevator Game' which is related to supernatural powers according to some Asian folklore. In spite of many theories presented, this case still remains cold and sadly and (wrongfully) ruled out as an accidental death.
Not all of these and other creepy incidents occurred in the Hotel Cecil are necessarily paranormal. There are many such places or hotels all over the world which are suicide or murder spots. The victims have their personal reasons for their deaths too. Also crimes, protection by corrupt police / politicians are some of the points to be considered. Nonetheless, I felt something weird about this hotel. The eerie incidents, a paradise of satanists and serial killers, satanic rituals are all notable points here. But right from the beginning the guests staying in the hotel had some weird experiences like hallucinations, unexplained fear or hearing noises etc. Many people have shared their experiences of becoming more prone to suicide or depression in the hotel area. Obviously a thorough study of psychology is needed to come to any conclusion. In the main, the fact still remains that this hotel was the last place where many people were seen before their deaths. Many researchers who stayed here for the study of this place have also experienced weird things. So many times satanic or similar kinds of rituals were performed to 'help' criminals or other satanic practitioners here. I opine that along with all these creepy factors even the faults in the plot on which the hotel was constructed and other Vastu doshas must have contributed to the dark history of this hotel. Such causes are still unexplored. One more point to be noted is, may be the frequent deaths were responsible for the living shells wandering in the hotel premises, as the deaths were unnatural. As the deaths occurred at the interval of a few months, there is no question of people dying years back. Thus fresh living shells wandering here is a strong possibility. As this hotel was used for satanic rituals, there is also a possibility that a knowledgeable and authentic Tantrik may have either stayed here or used his powers to control the living shells. Though the deaths occurred here were all unnatural, it is not possible to predict the yoni acquired by the souls after death, as it depends on many other parameters. Taking into account the personal reasons of the victims and the events just before death, I feel there is a higher possibility of ritualistic events causing such weird things.
Overall, some events can be deciphered using logical explanation. While it becomes nearly impossible to comprehend a few of them due to more sinister reasons like hiding the evidence, purposely doctoring the evidence and even not reporting the cases. Well, once the hotel was famous for it's notoriety, it is also possible that a few events were wrongly reported or exaggerated for the financial gains. Taking all these points into consideration, the readers can decide if the theory holds any water. This article is only written to provide the information about the strange history of the Hotel Cecil.
Today the hotel has rebranded itself to 'Stay on Main'. It has totally changed its appearance. With new renovations, new management has tried to shake off it's dark history and reputation for the macabre. Nevertheless, people can not forget the notoriety of the hotel. Due to many unanswered questions, people still remember the 'Hotel Cecil' rather than 'Stay on Main'.
©
All rights reserved. No part of this publication may be reproduced,
distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com. ===============================================
No comments:
Post a Comment