Thursday, 25 February 2021

शेवटचा प्रवास...एमीलिया एअरहार्ट (The Last Flight... Amelia Earhart) 

 


मागील लेखात मी धाडसी वैमानिक एमीलिया एअरहार्ट हिच्या बद्दल माहिती दिली होती. १९३७ साली विमानानं जगप्रवासाला निघालेल्या एमीलिया आणि फ्रेड यांचं विमान अचानक संपर्काबाहेर गेलं. आजही त्यांच्याबद्दल निश्चित कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अथक प्रयत्नांनंतरही त्यांचा शोध लागला नाही. दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला हेच म्हणावं लागेल. पण दोघांचेही शारीरिक अवशेष न मिळाल्यानं या दोघांचं नक्की काय झालं असावं याबद्दल अनेक अंदाज बांधण्यात आले. त्यातील काही महत्त्वाच्या शक्यता पुढील प्रमाणे आहेत. 

१) अनेक मोठमोठे वैमानिक, सांकेतिक प्रणालीचा गाढा अभ्यास असणारे कॅप्टन लॉरेन्स सॅफोर्ड, नौदलाचे अधिकारी अशा अनेक लोकांनी शोधकार्याला हातभार लावण्यासाठी आपापली अभ्यासपूर्ण मतं मांडली. बऱ्याचशा तज्ज्ञांनुसार प्रशांत महासागरातील हॉवलंड आयलंडच्या आसपास एमीलियाच्या विमानातलं इंधन संपलं असावं ज्यामुळे तिचं विमान समुद्रात कोसळलं. एमीलिया आणि फ्रेड यांनी अर्थातच जास्त इंधन बरोबर घेऊनच प्रवास सुरु केला होता. तरीही सकाळी ७.४२ वाजता एमीलिया कडून इंधन कमी असल्याचा संदेश होता. १९३७ साली जी अद्ययावत विमानं होती त्यात आजच्यासारख्या प्रगत साधनांचा समावेश नव्हता. तसंच बिनतारी संदेश देण्याची सुविधा असली तरी मी आधी नमूद केल्याप्रमाणे एमीलिया आणि फ्रेड ह्यांना त्यातलं संपूर्ण ज्ञान नव्हतं. त्यामुळे दिशा ठरवताना फ्रेड यांना सूर्य आणि तारे यांच्या स्थितीवरून अंदाज लावावा लागत होता. नेमका हाच कळीचा मुद्दा ठरला असावा असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यातच काही अभ्यासकांच्या मते एमीलियानं विमानाचा वेग जास्त ठेवला असावा. ढगाळ हवामान आणि दिशेचा अंदाज नसणं यामुळे जास्त इंधन खर्ची पडून तिचं विमान हॉवलंड जवळ असताना इंधनाची कमतरता भासली असणार. या गोंधळात तिचं विमान कोसळून समुद्रात बुडालं आणि त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी सोपी शक्यता वर्तवली जाते जी बऱ्याचदा मान्य केली जाते. 

२) एका वादग्रस्त अभ्यासानुसार १९३७ च्या काळात दुसरं महायुद्ध सुरु असल्यानं मार्शल आयलंडचा बराचसा भाग जपानी लोकांनी व सैनिकांनी व्यापलेला होता. ह्या बेटाजवळ एमीलियाला तांत्रिक अडचणींमुळे उतरावं लागलं किंवा जपानी सैन्यानं तिचं विमान तिथं उतरवलं / पाडलं असावं. काहींच्या मते हॉवलंड बेटापासून २७०० मैलांवर असणाऱ्या सायपान बेटावर त्यांचं विमान कोसळलं आणि त्यात एकतर एमीलिया आणि फ्रेड यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना गुप्तहेर समजून मारलं गेलं. जपानी सैनिकांबद्दलच्या या दोन्ही शक्यता धूसर वाटतात. कारण एमीलिया कडून आलेला शेवटचा संदेश जिथून आला ती जागा आणि वरील दोन्ही जागा यांत खूप अंतर आहे. अर्थात नंतर एमीलिया संपर्काबाहेर असल्यानं ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. पण एकूण हवामान आणि विमानातील इंधनाचा विचार करता ही अतिशयोक्ती वाटते. 

३) काही अभ्यासकांच्या मते एमीलिया प्रशांत महासागरातील गार्डनर आयलंड (आताचं निकुमारोरो) मध्ये उतरली जे हॉवलंड पासून ६५० कि.मी. वर आहे. तिथं दोघांनीही काही दिवस जिवंत राहण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी अन्न पाण्याविना त्यांना फार दिवस तग धरता आला नाही. या ठिकाणी त्यांचे अवशेष शोधण्याचा खूप प्रयत्न झाला पण हाती काहीच लागलं नाही. 

४) तर काही अभ्यासकांच्या मते प्रशांत महासागरातील गार्डनर आयलंड वरील कोकोनट क्रॅब जातीच्या महाकाय खेकड्यांनी तिचा दुर्बळ झालेला देह खाऊन तिचा मृत्यू ओढवला किंवा तिच्या मृत्यूनंतर या खेकड्यांनी तिचा संपूर्ण देह खाऊन कोणताही अवशेष मागे ठेवला नाही. कोकोनट क्रॅब जातीच्या खेकड्यांचा विचार करता ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही. कारण त्यांचा आकार (चार्ल्स डार्विन यांच्या मते राक्षसी) आणि मांस भक्षण करण्याची सवय पाहता हे शक्य असेलही. तरीही एमीलियाचं शोधकार्य इतक्या मोठ्या पातळीवर केलं गेलं की तिचा आणि फ्रेड यांचा आणि मुख्य म्हणजे विमानाचा कोणताही अवशेष मिळू नये हे अकल्पित आहे.                  

५) काही अति उत्साही मंडळींच्या नुसार एमीलिया या विमानप्रवासातून वाचली आणि न्यू जर्सी इथे आली. तिनं तिचं नाव बदललं आणि आयरीन बोलम म्हणून बँकेत काम करू लागली. आयरीन आणि एमीलिया यांच्यात नक्कीच साम्य आहे पण ह्या दोघीही पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती आहेत. आयरीन यांनी असे दावे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा केली. त्यामुळे या शक्यतेला मी कधीही मान्य करणार नाही. 

असो मग एमीलिया बाबत काय घडलं असावं याचा अंदाज लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तिच्या हस्तरेषांवरून काही अभ्यासपूर्ण मुद्दे मला मांडायचे आहेत. यात मी केवळ अभ्यास करून शक्यता वर्तवली आहे. अगदी असंच घडलं असेल असा माझा कोणताही दावा नाही. केवळ अभ्यासासाठी याचा उपयोग व्हावा हाच उद्देश आहे.  

एमीलियाच्या हस्तरेषा आणि हाताचा आकार पाहताना प्रथम तिच्या हाताच्या बोटांवरून काही मुद्दे मांडता येतील. तिच्या हातांची बोटं लांबसडक आहेत आणि अंगठा हा हाताच्या तळव्यापासून लांब आहे. यावरून तिची कामाची आवड ,कष्ट करण्याची आणि मदत करण्याची वृत्ती दिसून येते. पण हाताची करंगळी ही थोडी वाकडी आहे त्याचबरोबर अंगठ्याचं दुसरं पेरही वाकडं आहे. ज्यामुळे थोडा दिखावा, वाहवत जाण्याचा स्वभाव, सुप्त गुण आणि गूढ विषयांचा अभ्यास असे गुण दिसून येतात. एमीलियाच्या करंगळीची उंची फार नाही किंबहुना वाकडेपणामुळे ती दिसत नाही यामुळे तिचा आयुष्य योग कमी आहे असं दिसतं. बोटांवरील काही विकसित गाठी आणि निमुळती तर्जनी व अंगठा यामुळे ती शिस्तप्रिय असेल असं वाटतं. पण इतर बोटांची टोकं सुपासारखी आहेत त्यामुळे व्यवहारापेक्षा भावना अधिक महत्त्वाची असावी. हातावरील उंचवट्यांचा विचार करता चंद्र उंचवटा प्रामुख्यानं दिसून येतो. यामुळे परदेशगमन, पाण्याशी संबंध आणि आंतर्ज्ञानही दिसून येतं. चंद्र उंचवट्यावरील काही छोट्या रेषा अंतर्ज्ञान दर्शवतात पण ते तिनं किती गंभीरपणे घेतलं हे ठाऊक नाही.

त्याखालोखाल बुध आणि शुक्र उंचवटे विकसित आहेत. यामुळे तंत्रज्ञान, कल्पक मन असे काही गुण दिसून येतात. शनि आणि रवि उंचवटे मात्र थोडे कमी विकसित असल्यानं अति आत्मविश्वास आणि वाहवत जाण्यानं तिचं काही प्रमाणात नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. पण रविरेषा स्पष्ट असल्यानं तिला प्रसिद्धी आणि पैसा मिळाला (लहानपणचा काळ सोडून). आयुष्यरेषेचा सुरुवातीचा भाग थोडा गुंतागुंतीचा आहे. ज्यामुळे लाहाणपणी तिला खूप कष्ट करावे लागले आणि खूप कष्टानं तिनं आपलं ध्येय साध्य केलं.           

तिच्या हातावरील हृदयरेषा आणि आयुष्यरेषा ह्या दोन्ही किचकट आहेत. तसंच आयुष्य रेषेवरून जाणाऱ्या अनेक छोट्या आडव्या रेषा आणि आयुष्यरेषेच्या शेवटी अनेक किचकट रेषा ह्या तिचा आकस्मिक मृत्यू दर्शवतात. तिची हृदयरेषा एक वळण घेऊन शनि (मधलं) आणि गुरूच्या (तर्जनी) बोटांच्या मध्ये येऊन थांबली आहे. हा रेषेचा शेवटचा भाग अभ्यासनीय आहे. हृदयरेषा आणि आयुष्यरेषा यांचा एकत्र विचार करता तिचा मृत्यू अपघाती असावा असा माझा अंदाज आहे. म्हणजे तिचं विमान जेव्हा कोसळलं तेव्हाच तिचा मृत्यू झाला असावा. पण आयुष्यरेषेचा शेवटचा भाग पाहता तिच्या मृत्यू बद्दल जेव्हा खात्रीलायक बातमी मिळेल / मिळाली असेलही तेव्हा काही काळ गुप्तता पाळण्यात येईल. कदाचित काही वर्षांनी तिच्या मृत्यूबद्दलचं गूढ सार्वजनिक करण्यात येईल. यामागे राजकीय शक्तींचा हात असावा. 

आयुष्यरेषा आणि मृत्यूशी संबंधित मुख्य रेषा आणि छोट्या रेषा यांचा मिलाफ करून काही माहिती मला इथे नमूद करावीशी वाटते. एमीलियाच्या हातावरील आयुष्यरेषा जिथे तुटली आहे तिथून जर तिच्या आयुष्याचं गणित केलं तर तो वय वर्ष ३५ ते ४३ हा भाग दाखवतो. आणि एमीलियानं हा शेवटचा प्रवास केला तेव्हा ती ३९ वर्षांची होती. भारतीय हस्तसामुद्रिक शास्त्राचा विचार केल्यास याच काळादरम्यान तिचा शेवट झाला असणार. आता आयुष्य रेषेभोवती असणाऱ्या भाग्यरेषेचा भाग पाहिला तर तो रेषांनी युक्त असा आणि तुटलेलाच आहे. हा भाग पाण्याशी संबंध दाखवतो. तसंच आयुष्यरेषेचा शेवटचा भागही पाण्याशी संबंध दाखवतो आहे. शुक्र उंचवट्यावरून एक स्पष्ट दिसणारी रेषाही दिसत आहे जी आयुष्यरेषेचा भाग वाटते आहे इतकी स्पष्ट आहे पण तसं नसून ती रेषा आणि अंगठ्याच्या खालील काही स्पष्ट रेषा तिला पाण्यापासून धोका दाखवत आहेत. यात फक्त पाण्यात बुडणं असं नाही तर इतरही धोके येतात उदा: मूत्रपिंडाचे त्रास, पण तशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मुख्य म्हणजे भाग्य रेषेचा भाग हा चंद्र उंचवट्यावर आहे. चंद्र हा पाण्याचा कारक आहे. वरील रेषा परदेशगमन आणि पाण्याशी संबंधित शेवट दर्शवत आहेत. तिच्या हातावरील चंद्र उंचवटयाचा भाग चांगला विकसित आहे. यामुळे परदेशगमनही अनेकदा घडलं आहे आणि मुख्य म्हणजे मृत्यूच्या वेळी पाणी हे कारण असणार आहे. हृदयरेषेवर शेवटी एका रेषेमुळे एक आडवी फुली तयार झाली आहे. ज्यामुळे तिची एकनिष्ठता, कर्तव्यदक्षता हे गुण दिसतातच पण दुर्दैवी मृत्यूही दिसत आहे. शेवटच्या काही क्षणांत तिला त्रास झाला असणार हे उघड आहे. जर खरंच तिच्या विमानाचा शेवट समुद्रात झाला असेल तर श्वास गुदमरल्यामुळे तिला नक्की त्रास झाला असेल. वरील गोष्टींवरून माझा अंदाज असा आहे की एमीलियाचा मृत्यू विमान समुद्रात कोसळल्यामुळे पाण्यातच झाला असावा आणि खोल समुद्रातील तिचे व विमानाचे अवशेष न सापडल्यामुळे अजूनही हे गूढ उकललं नसावं. 
       
आता थोडं बाकीच्या शक्यतांकडे या दृष्टीनं पाहू. जर एमीलियाला जिवंतपणीच जपानी किंवा अन्य कोणत्या सैनिकांनी बंदी बनवून नेलं असतं तर तिच्या हातावर मंगळ उंचवटा व आयुष्यरेषा यांचा काही संबंध दिसला असता. कारण मंगळ हा युद्ध, सैनिक, पोलीस वा शस्त्र अशा गोष्टींचा कारक आहे. माणसाच्या हातावर दोन मंगळ उंचवटे असतात. एक आयुष्य रेषेच्या सुरुवातीला आणि दुसरा करंगळीवरून सरळ खालच्या भागात हृदयरेषेच्या खाली. एक तर तिच्या हातावर कोणताही मंगळ उंचवटा फारसा विकसित नाही आणि त्याचा आयुष्याच्या शेवटच्या काळाशी काही संबंध नसल्यानं ही शक्यता मला कमीच वाटते. 

कोकोनट क्रॅब जातीच्या खेकड्यांमुळे तिचा मृत्यू झाला किंवा मृत्यूनंतर त्या खेकडयांनी तिचा देह खाल्ला हाही मुद्दा हस्तरेषांवरून सिद्ध करता येत नाही. कारण प्राण्यांपासून असलेलं भय किंवा त्यांची शिकार होणं यासाठी काही विशिष्ट रेषांची उपस्थिती दिसते. उदा: शुक्र व शनि उंचवटयाचा काही संबंध एखाद्या रेषेमुळे येत असेल तर मनुष्याचा शेवट प्राण्याची शिकार होऊन येतो. प्राण्यांमुळे मृत्यू होण्यासाठी ज्या रेषा असतात किंवा उंचवटे असतात अशा कोणत्याही प्रकारची चिन्हं तिच्या हातावर दिसत नाहीत. त्यामुळे या महाकाय खेकडयांनी एमीलियाचा दुर्बळ झालेला देह खाल्ला असेल याची शक्यता मला वाटत नाही. अर्थात असे खूप मृत्यू जंगलात होत असतात पण या बाबतीत मला ही शक्यता दिसत नाही. 

एमीलियाच्या हातावर बुध उंचवट्यावर करंगळीच्या पायथ्याशी एक आडवी रेष दिसत आहे जी 'कंकण' या सदरात येते. ही रेष अपघाती मृत्यू दर्शवते. बुध रेषेवर एखादं वर्तुळ असतं तर याला पुष्टी मिळाली असती पण असं कोणतंही चिन्ह तिच्या हातावर नाही. 

आणखी एक विचार याबद्दल मांडला जातो की एमीलिया या अपघातातून वाचली आणि नाव बदलून अमेरिकेत राहत होती. याला मी केवळ अतिशयोक्ती म्हणेन. अशा गोष्टी जगात घडतात याबद्दल माझा नकार नाही. अनेक लोकं आपल्या भूतकाळाला कंटाळून असे निर्णय घेतात. पण एक तर एमीलियाला असं करण्याचं कारणच नव्हतं. दुसरं म्हणजे तिचा स्मृतिभ्रंश होऊन ती असं काही करेल अशी कोणतीही चिन्हं तिच्या हातावर दिसली नाहीत. अशा वेळी बुध उंचवटा (मेंदूशी संबंध) आणि मस्तक /आयुष्यरेषा यात अनेक पद्धतीनं संबंध येतो. आयुष्य रेषेभोवती एक वेगळी पण सुस्पष्ट आयुष्यरेषा असते जी वेगळं आयुष्य दर्शवते. मस्तकरेषा खूप प्रमाणात खराब असते ज्यामुळे मेंदूला दुखापत, स्मृतिभ्रंश वा वेगळं आयुष्य जगण्याइतपत नैराश्य येतं. अशा काही रेषा वा खुणा तिच्या हातावर दिसल्या नाहीत. त्यामुळे ही शक्यता विचारात घेता येणार नाही. 
          
हाताच्या तळव्यावर जेव्हा विशिष्ट चिन्हं असतात उदा: त्रिकोण, चौकोन, ग्रहांची चिन्हं, बोटांच्या पहिल्या पेरावरील वलय चिन्हं (ही ५ प्रकारची असतात), ग्रहांच्या उंचवट्यावरील वलयं इ. तेव्हा त्याचा वेगळा अर्थ असतो. पण मृत्यूशी संबंधित अशी वेगळी चिन्हंही एमीलियाच्या हातावर नाहीत. त्यामुळे इतर कोणत्याही कारणांपेक्षा तिचं विमान समुद्रात कोसळून त्यावेळीच तिचा मृत्यू ओढवला असावा असं मला वाटतं. पण काही कारणांमुळे तिच्या मृत्युबद्दलच्या काही गोष्टी लपवण्यात येतील आणि नंतर सर्वांना सांगण्यात येतील असा माझा अंदाज आहे. कदाचित या प्रवासात तिला काही अति महत्त्वाच्या गोष्टी, पुरावे, ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळाली असेल जी लगेच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येणार नसेल. किंवा अन्य काही राजकीय कारणं असतील. 

असो, एमीलियाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल माझी एक ज्योतिषी म्हणून जी मतं आहेत ती मी मांडली आहेत. ही मतं केवळ अभ्यास म्हणून मांडली आहेत याची नोंद घ्यावी. त्याशिवाय तिच्या हस्तरेषांचा अभ्यास केवळ ठशांवरून झाल्यामुळे अनेक गोष्टींची उकल झालेली नाही. भविष्यात याबद्दल काही ठोस माहिती मिळेल अशी मी आशा करते.      

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.

       ==============================================

In my previous article I wrote about a brave but badass aviator, Amelia Earhart. In 1937 Amelia and Fred Noonan started their journey to circle the globe, but their plane mysteriously vanished. Even today no full proof evidence of her fate is available. Even after chaotic search nothing solid could be found out. Sadly we have to say that Amelia and Fred are no more now. This sad story led to lots of speculation as no trace of their plane or bodies could be recovered. Many theories about the fate of Amelia have surfaced, here are a few of them.
1) Many researchers, aviators, navy officers, cryptologists like Capt. Lawrance Safford contributed to the mission to search and rescue Amelia and Fred. According to the majority of them Amelia and Fred ran out of fuel near Howland Island in Pacific Ocean. Due to this their plane crashed into the sea. Though both of them carried enough fuel with them before starting the journey. In spite of this in the morning at 7.42, Amelia's last confirmed message was 'running low'. Of course the most modernised and sophisticated planes in 1937 were still not like today's planes. Though their plane 'Electra' had radio equipment for communication and navigation, as I mentioned earlier, neither Amelia nor Fred was a skilled radio operator. So Fred could have used a celestial navigation method to determine their position. This would have been the key factor, according to many researchers. Some skeptics arrived to a slightly different speculation. Due to the stronger head winds faced by Electra, probably Amelia kept the speed of it a bit more than what was planned thus the tanks were almost empty much before than expected. A rough cloudy weather and lack of navigation may have resulted in more consumption of fuel and Amelia was almost out of fuel near Howland Island. It is the widely accepted theory that in this chaos the Electra crashed in the sea and sank in the deep waters.  

2) According to a controversial theory some people blame the Japanese for Amelia's disappearance. As 1937 was the period of World War II, most of the Marshall Island was occupied by the Empire of Japan. This theory states that due to technical issues Amelia landed here or was forced to land here by the Japanese. Some of these researchers claim that Electra crashed on the Saipan Island and Amelia and Fred either died or were executed by misunderstanding as spies. This theory seems to be far fetched. As the location of the last message from Amelia is too far from the Marshall Islands. Of course there is a possibility that Amelia was out of reach after the message was delivered, for a long time and reached the Marshall Island. But considering the rough weather and availability of fuel, this seems to be an amplified idea. 

3) Another theory holds that Amelia made it to the Gardner Island (today's Nikumaroro) which is 650 k.m south of Howland Island. She and Fred may have survived for a few days but succumbed to the environment after lack of food and water. There was a massive but futile search for the remains of them on the island. 

4) Some researchers say that possibly Amelia and Fred were killed by the swarms of giant Coconut crabs. According to this theory after so much exposure and struggle to survive both were frail. At this time the giant crabs killed their almost lifeless bodies. Or both of them perished on the Island and the Coconut crabs, being natural scavengers, consumed their bodies without keeping any remnants of them. Well considering the food habits of these giant crabs this possibility is not totally unlikely. Due to their massive size (monstrous according to Charles Darwin) and capacity to eat any kind of flesh this theory can not be fully denied. In spite of all this the strange thing I feel here is there were no remains of not only the bodies but also the plane Electra. 

5) Now comes a literally far fetched theory. Some armchair detectives and overthinking conspiracy theorists claim that Amelia survived this plane crash and came to New Jersey. She changed her identity and started working as a banker with her new name Irene Bolam. Irene Bolam was a real person and was eerily similar to Amelia, but she was a totally different person. Real Irene had filed a lawsuit requesting the damages due to troubles caused by such claims in a book and also submitted an affidavit. I do not accept this theory at all.  

Well, what exactly happened to Amelia in her last journey? I will try to find some answers by studying Amelia's handprint. I am hereby writing a few possibilities on the basis of my study of her palm lines. I am not claiming anything or not judging how or why she vanished. I request the readers to please note that these are just a few points based on the study of palmistry and should be only used for study purposes. 

Roughly some predictions can be made from Amelia's palm lines and the shape of her palm. Her fingers are long and slender. Also the distance between her palm and thumb is significant. This shows that she was a workaholic person and had a helping nature. But the little finger has a bent also the second phalange of the thumb is bent inwards. This shows her nature to get carried away, boasting, some hidden talent and liking in occult subjects. Her little finger is not long, in fact due to bending it looks more short, this sadly gives a shorter life span. The knotted fingers and tapering index finger and thumb tips may have given her qualities like discipline. But all other fingers have spatulate tips, so she seems to be more emotional rather than practical in nature. Considering the mounts on her hand the Moon mount is more prominent and developed. A good Moon mount gives foreign travels, a travel or business related to water and some intuition power. Small intuition lines on her Moon mount may have provided her the power but I don't know how seriously she took it. 

Next to it Mercury and Venus mounts are well developed. So she had good technical knowledge as well as imagination power. Saturn and Sun mounts are not so favourable so this may have led to some loss due to overconfidence and a nature to easily  get carried away. The prominent and well developed Sun line must have contributed to her fame and success (except her childhood). At the beginning the life line is complicated. This shows her struggle in childhood but ultimately she achieved her dream. 

The heart line and life line on her palm are complicated. Many fine lines across her life line and specifically near the end of her life line show untimely death. The heart line has taken a curve and has ended between Saturn (middle) and Jupiter (index) fingers. This part is interesting and has influenced her life a lot. Combining the heart and life line, I feel her death was an accidental one. I mean when her plane crashed into the sea and sank she probably drowned to death. One more thing can be observed from the end part of her life line is when this mystery will be solved (or is already solved ??) at least for some time the details of her last moments will not be revealed. Perhaps after a few years the revelation about her death will be publicized. Some political issues may not allow the disclosure.   

I would like to add a few more observations from her life line and other small lines related to the death. Amelia's life line is completely broken at a point from where if we calculate her life span then it shows the age range between 35 to 43 years. And Amelia started her last journey when she was 39 years old. According to Indian Hasta Samudrika Shastra (Palmistry) it shows the end of her life during this period. The parallely going fate line is also crossed by many fine lines and broken exactly near the area where the life line is broken and crossed by fine lines. This shows some connection to water. Also the end part of her life line is showing the same. One clear line is present on the mount of Venus which may be confused as a part of the life line (which is not) and other fine lines below the thumb base show some threat due to water. The danger or threat due to water not only includes drowning but any threat caused by water like kidney ailments etc. But no such information regarding her health is available. Mainly this part of the fate line is present on the mount of Moon. Moon governs water and these lines togetherly show many foreign trips and the end of life due to water. The mount of Moon on her palm is well developed. This shows she travelled to foreign countries many times in her life and importantly the death was away from her country and the reason was water. The cross sign at the end of her heart line shows her loyal and dutiful nature and unfortunate death. Obviously she must have suffered at the last moments of her life. If she had really died by drowning in the ocean, she must have struggled to breathe. Overall my calculation says that Amelia's aircraft crashed in the ocean and sank, which resulted in the death of her and Fred. However any remains of them or the Electra are still not recovered and the enigma is still unsolved.  

Now let's talk about the other theories from this point of view. If Amelia were captured by the Japanese (or any other abductors for that matter) then some signs on her palm would have been prominent. Like there would have been some connection between the mount of Mars and life line on her palm. Because Mars is an aggressive planet which governs war, bloodshed, army, police, weapons etc. On the human palm there are two mounts of Mars. One  is situated below the mount of Jupiter just on the starting point of the life line and the other is below the heart line straight down the mount of Mercury. Firstly none of these mounts are developed on her palm and these mounts are not connected to the last period of her life. So I feel this theory is a hoax. 

The giant Coconut crab theory also can not be proved from her handprint. As there are certain signs on the palm when a person is mauled by any animal or has threat due to animals. Like if Venus and Saturn mounts are linked due to a line/s then a person is likely to die due to an animal attack. Amelia's hand shows no such signs or lines or symbols which can denote the death by any animal attack. So Amelia was either eaten alive or dead by the giant Coconut crabs seems to be almost impossible. Though such incidences do occur in the deep jungles, but in this case I don't see any such possibility.

We can see a curved line at the base of her little finger on the mount of Mercury. This curved line is like the girdle of Mercury. This line shows an accidental death. If any circle was present at the same spot it would have ensured the vindication but it is not present there. 

There is another conspiracy theory which says that Amelia survived the crash, changed her identity and started living in the USA with her new name. This is purely a myth. I know there are many people who have changed their identity and lived a new life. People who want to run away from their past take such extreme steps. But in Amelia's case she had no such reason to change her identity. Secondly there was no sign on her hand which shows that due to the crash she suffered from amnesia or any similar mental issues. In cases like mental illnesses the mount of Mercury (brain) comes into the picture. When mount of Mercury is is inauspicious or is connected to life / head line creating inauspicious yogas then only people suffer from such conditions. There is also a secondary life line in such cases which goes parallel to the original life line, then it shows a new life with a different identity. When the head line is not in a good shape or has inauspicious lines or symbols then it shows a brain injury / amnesia / dementia or extreme depression. But there were no such lines or signs on Amelia's hand so this possibility can not be considered. 

When there are specific symbols on the hand like triangle, square, planet symbols, loops on the fingers (these are of 5 types), loops on the apexes of the mounts etc. they have various interpretations. But there are no specific symbols on Amelia's hand which can relate to her death. So I think rather than all other theories the crash and sink theory fits the best. Of course the present signs on her palm tell that the mystery of her death will not be revealed so quickly. I think that in this journey she may have discovered something very important from a political or historical point of view, which is not possible to make available for the general public for some time. 

Well, in this article as an astrologer I have put my thoughts on the tragic disappearance of Amelia Earhart, Please note that these observations are merely written for study purposes. Also I have just observed her handprint and not her hand in real life, so a detailed study of her palm from all perspectives is never done. I hope in future this enigma will be solved and some concrete information about the last moments of Amelia and Fred will be disclosed. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

         ===========================================================    

No comments:

Post a Comment