कुंडलीतील ग्रहांवरून ज्योतिष शास्त्रातील अनेक भाकितं केली जातात याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. यामागे नक्की काय विज्ञान आहे? आपल्या आकाशगंगेत अगणित ग्रह असताना विशिष्ट ग्रहांचाच विचार कुंडलीत का केला जातो? आणि हे इतके दूरचे ग्रह माणसावर कसे परिणाम करतात? ह्यात तथ्य किती आणि विज्ञान किती? अशा सगळ्या गोष्टींवर आज थोडी माहिती देण्याचा प्रयत्न मी या लेखात करत आहे.
ज्योतिष शास्त्रावरील अनेक पुस्तकं वाचून मी काही निष्कर्ष याबाबत काढले आहेत. ही दोन लेखांची मालिका असून पहिल्या लेखात मी ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम आणि विज्ञानाची सांगड कशी घालता येईल हे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या लेखात वैयक्तिक भाकितं कशी काढली जातात यावर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
माणसाचं वास्तव्य पृथ्वीवर असल्यानं ज्योतिष शास्त्रामध्ये पृथ्वीला मध्यबिंदू धरून इतर ग्रहांचा विचार केला आहे. काही विशिष्ट म्हणजे नऊ ग्रहांनाच या शास्त्रात स्थान दिलं गेलं आहे. मुळात इतक्या दूर असणारे ग्रह आणि आपल्या आयुष्यातल्या घटना यांचा काय संबंध आहे? या प्रश्नाचं उत्तर न कळल्यामुळे अनेकदा ह्या शास्त्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. माझ्या मते ज्योतिष शास्त्रानं विचारात घेतलेल्या नऊ ग्रहांची किरणं जेव्हा आपल्यावर पडतात तेव्हा ते आपल्यावर मानसिक, शारीरिक परिणाम करत असतात. इतर ग्रहांची किरणं आपल्यापर्यंत पोहोचत असतीलही पण त्यांचा आपल्यावर प्रभाव पडत नसावा. किंवा पृथ्वीच्या भोवती असलेलं विशिष्ट वायूंचं वलय आणि सूर्याच्या किरणांतील प्रखर वायू यामुळे इतर ग्रहांच्या किरणांचा परिणाम आपल्यावर होत नसावा. कारण ती किरणं माणसापर्यंत पोहोचताना या दोन्ही गोष्टींचा सामना केल्यानं त्यांच्यातील (ज्योतिष शास्त्राशी संबंधित) रासायनिक गुण नष्ट होत असावेत. म्हणून सौरमंडलातील सर्वच ग्रहांचा विचार केला जात नाही.
ज्या ग्रहांचा विचार केला जातो ते ग्रह आपलं वैयक्तिक आयुष्य कसं ठरवतात? माझ्या मते विधिलिखित जरी सर्वोच्च शक्ती म्हणजेच परमेश्वरानं लिहिलेलं असलं तरी त्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही स्पष्टीकरण देता येईल. थोडा सखोल विचार केला तर अवकाश, पृथ्वी, पाणी, हवा, मनुष्य, प्राणी काहीही असो ही सर्व ऊर्जेची रूपं आहेत. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन यांनी उष्णता व यांत्रिक कामांच्या परस्पर शास्त्राच्या (First law of Thermodynamics) सिद्धांतावर जे भाष्य केले आहे त्यातच बरंच स्पष्टीकरण लपलं आहे. त्यांच्या भाष्यानुसार ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. तर ऊर्जा केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित केली जाऊ शकते. म्हणजे विश्वातील एकूण ऊर्जा आहे तेव्हढीच राहणार आहे. केवळ तिची रूपं बदलू शकतील. सोप्या भाषेत पृथ्वीवरील जीवनाशी याचा संबंध लावून पाहू. पृथ्वीवरील एकूण जीवन म्हणजे झाडं, पाणी, हवा, प्राणी, मनुष्य इत्यादी मिळून एका विशिष्ट संख्येनं ऊर्जा अस्तित्वात आहे; उदा: एकूण ऊर्जा १०० मापं (युनिट). त्यात ४० मापं पाणी, ४० मापं झाडं / जीव जंतू आणि २० मापं हवा + माती आहे. यातील जी ४० मापं जीव आहेत त्यात अनेक वर्षांपूर्वी १० मनुष्य, १० सस्तन जीव, १० पक्षी व कीटक आणि १० झाडं अशी एकूण ४० जीव जंतूंची ऊर्जा होती. आज मनुष्य संख्या खूप वाढली आहे आणि निसर्गातले अनेक जीव कमी होत आहेत हे आपण पाहतोच आहोत. म्हणजेच हे गणित २५ मनुष्य, ५ सस्तन जीव, ५ पक्षी व कीटक आणि ५ झाडं असं बनलं आहे. म्हणजे एकूण जीवजंतूंची ऊर्जा ४०च आहे. पण त्यांची विभागणी बदलली आहे.
आता या विभागणी बदलामुळे नैसर्गिक अडचणी येत आहेतच पण मनुष्याचं आयुर्मानही कमी झालं आहे. कारण निसर्गाचा समतोल बिघडला आहे. मनुष्याच्या कमी आयुर्मानाला पौराणिक कथांचा विचार केला तर कलियुग हे एक कारण मिळतं. पण ही काही दंतकथा नसून या कलियुगाचे परिणाम आपण पाहतोच आहोत. माझ्या अभ्यासानुसार दूरदृष्टी असणाऱ्या ह्या पुराण काळातील शास्त्रज्ञांच्या मते हा बिघडलेला समतोल अनेक अडचणी आणणार होता. त्याचं गणितही त्यांनी मांडून ठेवलं आहे. त्या गणितातील कलियुग म्हणजेच आताचा हा काळ. आता अनेक वर्षांनंतर पृथ्वीवरचं जीवन संपून नवीन जीवन पुन्हा पहिल्यापासून चालू होणार हे आधुनिक वैज्ञानिकांचं मत आहे. आणि तेच आपल्या पौराणिक ग्रंथांत सांगितलं आहे की कलियुगानंतर पुन्हा सत्ययुग येऊन हे ४ युगांचं चक्र पुन्हा चालू होईल. असो, याच्या अधिक खोलात न शिरता मला केवळ ग्रहांचा आपल्यावर होणार परिणाम यासाठी याची कल्पना द्यायची होती.
आता हे बदल केवळ पृथ्वीच्या वातावरणात होत नसून अनेक वर्षांपासून सर्वच ग्रहांचं वातावरण बदलत असणार. माझ्या अभ्यासानुसार ग्रहांमधल्या ह्या बदलांमुळे पूर्वी जसे ग्रह मनुष्यावर परिणाम करत असत त्यापेक्षा वेगळा परिणाम करत असावेत. पूर्वी ग्रहांची फळं जशी मिळत असतील तशीच आता मिळतील असं नाही. आणि ह्यातही काळानुसार बदल होणारच आहेत.
सूर्याची किरणं आपल्या शरीरावर पडतात हे दृश्य चित्र आहे. पण पृथ्वीच्या जवळील सर्वच ग्रहांची किरणं आपल्या शरीरावर पडत असतात. सगळी किरणं आपल्याला दिसत नाहीत, यामुळे ही घटना विचारात घेतली जात नाही. कोणतीही किरणं पृथ्वी भोवतालच्या वायूंच्या स्तरामधून येताना त्यातील घातक तत्त्वं कमी होतात, जेणेकरून आपल्या पर्यंत ही किरणं पोहोचली तरी आपलं शरीर जळत नाही किंवा कोणताही घातक परिणाम होत नाही. हे निसर्गानं पृथ्वीवरील जीवांना दिलेलं वरदानच आहे असं म्हणता येईल. हळूहळू मात्र पृथ्वी भोवतालच्या वायूंच्या स्तरात होणाऱ्या ह्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. सूर्याच्या किरणांमुळे आता मनुष्याला त्रास होऊ लागलाय हे विज्ञानाने सिद्ध झालंय.
असो, ग्रह किरणांचे वैयक्तिकरित्या होणारे परिणाम सोप्या शब्दांत आपण समजून घेऊ. समजा दुपारी एकाच ठिकाणी समान शारीरिक स्थिती असणाऱ्या दोन व्यक्ती उभ्या आहेत. त्यातील एका व्यक्तीला सूर्यकिरणांचा जास्त त्रास होतो. खूप तहान लागते किंवा चक्कर येते. पण दुसऱ्या व्यक्तीला तेव्हढा त्रास होत नाही. हा दृश्य परिणाम झाला. अशाच प्रमाणे आपल्या मानसिक स्थितीवरही ही किरणं प्रभाव पाडतात.
आपल्या शरीराभोवती सुद्धा एक ऊर्जेचं वलय असतं. जसं पृथ्वीभोवतालच्या वायूच्या स्तरांमधून ही किरणं येताना त्यातील काही रासायनिक गुण बदलतात तसंच प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीनुसार ही किरणं शरीरावर पसरताना कमी जास्त परिणाम करतात. वरती सांगितल्यानुसार दृश्य परिणाम तर होतातच. पण अदृश्य परिणाम म्हणजे विचार करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, त्या अनुषंगाने घेतले जाणारे निर्णय इत्यादीत होणारे बदल. आता हे मानसिक परिणाम एका दिवसात दृश्य परिणाम देत नाहीत, तर जन्मापासून जी सगळी किरणं आपलं शरीर शोषून घेत आहे त्याचा एकत्रित परिणाम आपल्याला दिसत असतो. ह्या परिणामांचं मांडलेलं सांकेतिक रूप म्हणजे 'कुंडली'.
जन्मतः आपली एक कुंडली बनते. ज्यात काही ग्रह विशिष्ट स्थानी असतात. म्हणजेच त्या ग्रहांच्या किरणांच्या त्या स्थानाच्या अनुसार परिणाम आपण आयुष्यभर अनुभवणार असतो. आपलं पंच महाभूतांपासून बनलेलं शरीर ज्यावेळी अस्तित्वात येतं त्यावेळी जे ग्रह अवकाशात ज्या स्थानी असतील त्यानुसार ते आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करणार असतात. म्हणजे काय तर आपलं सर्वांचं शरीर हे केवळ पाच तत्वांचं मिश्रण असलं तरी ते अस्तित्वात येतं तेव्हा प्रत्येकासाठी एक विशिष्ट रचना घेऊनच येतं. म्हणजे प्रत्येकात समान पाच तत्त्वं असली तरी त्यांचं क्रमपरिवर्तन आणि संयोजन सारखं नसतं. प्रत्येकाचा रंग, बुद्धी, उंची, आयुष्य सगळ्यातच फरक असतो, त्याचप्रमाणे जनुकीय पातळीवरही फरक असतो. त्यामुळेच हे दृश्य फरक असतातच पण पेशीय फरकही असतात.
ह्याला विज्ञानात 'गुणसूत्र' म्हणतात.
ह्या पेशीय फरकामुळे प्रत्येकाचं शरीर, रोग, आयुर्मान हे वेगळं असतंच पण आयुष्यातल्या घटनाही वेगळ्या असतात. ह्या गुणसूत्रांचं, पंच महाभूतांच्या विशिष्ट रचनेचं प्रतीक म्हणजेच 'कुंडली'.
ह्या रचनेमुळे आपल्यावर पडणाऱ्या नवग्रहांच्या किरणांमधली काही रासायनिक तत्त्वं आपल्यावर परिणाम करतात, पण काही तत्त्वं नाही करू शकत. काही तत्वांना आपल्या जनुकीय मांडणीमुळे आपल्यावर परिणाम साधता येत नाही. जसं वीज ही लोखंडातून सहज वाहते कारण लोखंडाच्या रासायनिक मांडणीमध्ये विजेला अडथळा आणणारी कोणतीच रसायनं नसतात. पण लाकडातून वीज वाहू शकत नाही. कारण लाकडाच्या मूळ रचनेमुळे विजेला अडथळा येतो. आता आपण ह्यावर प्रश्न विचारला तर ते लाकूड आणि लोखंड यांच्यातल्या नैसर्गिक गुणांमुळे होतं असं सहज साधं उत्तर देऊ. किंवा लाकूड हे वीज प्रवाहक नाही असं आपण शाळेत वाचलेलं आहेच. त्याच धर्तीवर मी समजावेन की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ग्रहाच्या किरणांची 'प्रवाहक' नसते. आपल्या जनुकीय मांडणीमुळे या ग्रह किरणांच्या शरीराशी होणाऱ्या प्रक्रियेत कधीकधी त्यांच्यातील काही तत्त्वं आपल्या पेशींवर परिणाम करण्याइतकी प्रभावी राहत नाहीत. जेव्हा चांगली तत्त्वं आपल्यावर परिणाम करत नाहीत तेव्हा आपल्याला काहीतरी त्रास होतो त्याला कुंडलीतील ग्रह बिघडला आहे असं म्हणलं जातं. जेव्हा वाईट तत्त्वं आपल्यावर परिणाम करत नाहीत तेव्हा काही चांगले परिणाम दिसून येतात त्याला ग्रह शुभ स्थितीत आहे असं म्हणलं जातं.
आपण वरील सूर्य किरणांचं उदाहरण पुन्हा घेऊ. जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा पृथ्वीपासून सूर्य (रवि) किती अंशांवर आणि कोणत्या कोनात आहे यावरून कुंडलीतली त्याची स्थिती लिहिली जाते. त्या बाळाच्या कुंडलीत रवि प्रथम स्थानी असेल तर त्याचा अर्थ त्या बाळाची जनुकीय मांडणी अशी आहे की सूर्याची किरणं त्याच्यावर विशिष्ट परिणाम करणार. जेव्हा एखाद्याचा जन्म सूर्योदयाच्या वेळी होतो तेव्हा कुंडलीत रवि प्रथम स्थानी येतो. आणि रवि प्रथम स्थानी असेल तर ज्योतिष शास्त्रानुसार असं भाकीत केलं जातं की त्याचा स्वभाव आक्रमक असेल, तो स्पष्टवक्ता असेल आणि रागीट असेल. ह्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अर्थ लावायचा तर जनुकीय मांडणीमुळे सूर्याच्या किरणांतले विशिष्ट गुण त्याच्या शरीरात शोषले जातील जे त्याच्या मेंदूला अशा प्रकारे उत्तेजना देतील की त्याचा स्वभाव वरीलप्रमाणे झालेला दिसून येईल. सूर्योदयाच्या वेळी सूर्य अशा स्थितीत असतो जेव्हा तो पृथ्वीवरून सौम्य वाटला तरी तो निश्चितपणे प्रखरतेकडे झुकत असतो. याचा कुंडलीतील प्रथम स्थानातील रविशी संबंध लावला तर लक्षात येईल की अशा व्यक्ती काही काळ शांत वाटल्या तरी एखाद्या छोट्या निमित्तामुळे सुद्धा त्यांचा आक्रमक स्वभाव लगेच दिसून येईल. जनुकीय मांडणी व एखाद्या ग्रहाची कुंडलीतील स्थिती यातील समन्वय आता वाचकांच्या लक्षात येईल.
वरील उदाहरणावरून हे लक्षात येईल की सगळे ग्रह परिणाम करताना अर्थातच स्वतःच्या रचनेनुसारच परिणाम करत असतात. त्यांच्यातून उत्सर्जित झालेली किरणं ही त्यांच्यापासूनच जन्माला येतात. त्यामुळे हे ग्रह प्रत्यक्षात कसे आहेत याचाही विचार वैयक्तिक भाकीतामध्ये केला जातो. उदा: शनि हा ज्योतिष शास्त्रात वायू तत्वाचा ग्रह मानला जातो. अनेक संशोधनानंतर हे लक्षात आलं आहे की खगोलीय दृष्ट्या शनि ग्रह वायूंचाच बनला आहे. त्याला घन किंवा भरीव गाभा असला तरी तो पृथ्वीच्या गाभ्यातका मजबूत असण्याची शक्यता कमी आहे. याचा दुवा जोडून असं म्हणता येईल की ज्या व्यक्तींवर शनिचा प्रभाव आहे त्या व्यक्ती सहज हुरळून जाणाऱ्या (शनिला घन गाभा म्हणजेच स्थिर स्वभाव देण्याची शक्ती नाही), निर्णय घेण्यास वेळ लावणाऱ्या (शनि संथपणे मार्गक्रमण करतो) अशा असतात. पण 'वायू'मुळे यांची कीर्ती दूरवर पसरते. शनि ग्रहाभोवती काही कडी आहेत ज्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. खगोलीय संशोधनानुसार ही कडी मुख्यतः पाण्याचा बर्फ आणि काही अशुद्ध अणू (थोलिन, सिलिकेट इ.) यांपासून बनलेली आहेत. म्हणजेच शनि ग्रह बाहेरून कठीण अर्ध आवरण असलेला एक पोकळ ग्रह आहे. पण हे आवरण देखील बर्फाचं असल्यानं जास्त तापमानात विरघळून जलमय होईल. शनिच्या अंमलाखाली असणाऱ्या व्यक्तीही अशाच असतात. त्या बाहेरून रुक्ष, लवकर मन मोकळं न करणाऱ्या असल्या तरी मोठ्या अडचणी किंवा भावनिक धक्के बसले तर ह्या व्यक्ती कोसळून जातात. ह्यांना जेवढी अन्नाची गरज असते तेव्हढीच प्रेमाचीही असते. याचं वैज्ञानिक कारण असं की शनि ग्रहाची किरणं अशा वातावरणातून आपल्या शरीरावर येतात त्यामुळे ते मनावर आणि शरीरावर कसे परिणाम करतील हे शनि ग्रहाच्या रासायनिक जडण घडणीवर अवलंबून राहतं. ज्या व्यक्ती शनिच्या प्रभावाखाली येतात त्यांच्या जनुकीय मांडणीमुळे शनिची किरणं इतर ग्रहांच्या किरणांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात. अशा प्रकारे सर्व ग्रहांचा सखोल विचार करून ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम ठरवले जातात.
आता यात सर्वांना जास्त जवळचा वाटणारा विषय म्हणजे स्वतःची रास. आपण जी स्वतःची रास म्हणून सांगतो ती म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ग्रह ज्या राशीत असतो ती रास. माझ्या अभ्यासानुसार चंद्र रास हा केवळ एक वरवरचा मुद्दा आहे. या राशीवरून ऐकिवात आलेल्या गोष्टींवरून एक सामान्य मत तयार करून आपला (किंवा दुसऱ्याचा) स्वभाव कसा असेल याचे ठोकताळे आपण मांडतो. हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी केवळ चंद्र राशीवरूनच स्वभावाचे कांगोरे कधीच कळत नाहीत. केवळ यावरून काही निष्कर्षाप्रत येऊन उगीच समज गैरसमज वाढू नयेत यासाठी हा मुद्दा थोडा स्पष्ट केला आहे.
मनुष्याचा स्वभाव, कुंडलीचं भाकीत हे मुख्यतः कोणत्या ग्रहाची किरणं आपल्या जनुकीय मांडणीनुसार प्रभावी ठरतील यावरून ठरतं. आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचा स्वामी ग्रह आणि त्या ग्रहाची किरणं आपल्यावर जास्त परिणामकारक ठरतील. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीला एक स्वामी ग्रह नियुक्त केला आहे. म्हणजेच ती रास त्या ग्रहाची प्रतीकात्मक रूप असते. कोणताही ग्रह एखाद्या राशीत असतो म्हणजे खगोलीय दृष्ट्या पृथ्वीवरून तो अशा पद्धतीनं दिसतो की तो त्या विशिष्ट स्थानी आहे. वैज्ञानिक दृष्ट्या याचा अर्थ असा की त्या ग्रहाचा आणि राशी स्वामी ग्रहाचा असा अंशात्मक कोन किंवा संबंध येतो की त्या वेळी या दोन ग्रहांच्या कोनामुळे विशिष्ट किरणं आपल्यावर पडून जनुकीय मांडणीनुसार ती आपल्यावर परिणाम करतात. चंद्ररास म्हणजेच आपली जन्म रास ही अशाच पद्धतीनं काम करते. वेदांमध्ये 'चंद्रमा मानसो जात:' असं म्हटलं आहे. याचाच अर्थ चंद्र हा मनाचा कारक आहे. आपल्या जन्माच्या वेळी चंद्र मेष राशीत असेल तर याचा अर्थ चंद्र आणि मेष राशी स्वामी मंगळ हे दोन ग्रह अवकाशात अशा पद्धतीनं असतात की जन्म होताना ही दोन्ही किरणं आपल्या मेंदूवर रासायनिक प्रक्रिया करतात आणि आयुष्यभर ती बदलत नाही. सोप्या भाषेत आपला 'स्वभाव' जन्माच्या वेळीच ठरतो जो बदलत नाही. चंद्राची किरणं मनाची जडण घडण ठरवतात आणि जन्माच्या वेळी मंगळ ग्रह इतर ग्रहांपेक्षा विशेष प्रभावी असल्यानं 'स्वभाव' ठरताना या किरणांमुळे एक विशिष्ट घडणीत मेंदू प्रतिक्रिया देतो. अर्थात या सगळ्यासाठी इतर ग्रह, ते कोणत्या राशीत आहेत हेही तितकंच महत्वाचं आहे. चंद्र कोणत्याही राशीत असला तरी कुंडलीतील १२ ग्रहांपैकी कोणत्या ग्रहाचा प्रभाव जास्त आहे हे समजलं तरच इतर भाकितं करता येतील. फार खोलात न शिरता मला इतकाच मुद्दा मांडायचा आहे की कोणत्याही ग्रहाची रास म्हणजे खरं तर राशी स्वामी ग्रह.
अवकाशात प्रत्यक्षात ग्रह कोणत्या रसायनांनी बनला आहे, किती मोठा आहे, त्याचं तापमान काय आहे, त्याचे चंद्र किती आहेत अशा सगळ्या भौतिक परिस्थितीवरून ग्रहाचं वर्णन ज्योतिष शास्त्रात केलं गेलं आहे. हे ज्ञान इतकं वैज्ञानिकरित्या परिपूर्ण आहे की आपण ग्रह गोलांची खगोलीय माहिती वाचली तर हे लक्षात येईल की ज्योतिष शास्त्रातील त्यांचं वर्णन खगोलीय दृष्ट्या तंतोतंत जुळतं.
आता या शास्त्रावरून वैयक्तिक आयुष्यातील घटनांवरचं भाकीत कसं करता येतं या बद्दल आपण पुढील लेखात सखोल माहिती घेऊ.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
=====================================================
Astrological predictions are based on the planetary positions is a well known fact. What is the science behind it? Out of the infinite number of planets in our galaxy why specific planets are taken into consideration in the kundli? And how do these celestial bodies placed far away from us affect our lives? How much of this is factual and how much is scientific? I am trying to shed some light on all these topics in this article. After a lot of reading on astrology and much cogitation, I have drawn some conclusions. In this series of two articles, in the first article I am trying to expound the effects of the planets on humans and the science behind it. In the second article I will try to expound the use of this science in personal kundli prediction.
Considering human existence on the Earth, Astrology considers Earth as its center point and the planetary positions with respect to the Earth. A specific precisely nine planets are taken into consideration in Astrology. Many times question marks are raised over the authenticity of Astrology; mainly due to not getting the drift of the connection between these distant celestial bodies and our personal life events on the Earth. According to my research, when the rays from these nine specific planets (considered in Astrology) fall on our bodies, they create physical, psychological effects on us. The rays from other or more distant planets may reach our bodies but their effects are not significant to be considered. Or the gaseous layer around the Earth's atmosphere and the stronger gases in the Sun rays might be obstructing the effects of these rays. Because after facing these two obstacles during their journey towards humans their chemical properties (astrologically important) are destroyed. This is why every planet from the universe is not considered in Astrology.
How can these Astrologically considered planets decide our personal lives? I think, though our destiny is under control of the supreme almighty God, this phenomenon can be explained scientifically. If you think intensively, the universe, the Earth, water, air, humans, animals etc. are forms of 'Energy'. Much of the explanation lies in the quote by famous scientist Albert Einstein on the First Law of Thermodynamics. He states, energy cannot be created nor be destroyed. Rather it can be transferred from one form to another. It means the total energy of the universe is going to be constant. The very thing is energy can exist in various forms. In simple words, let's try to understand this concept in connection with Earthly life. On our Earth the total life forms like plants, water, air, animals, humans etc.make a certain amount of energy. E.g. Let's think this total energy existing is 100 units (U). This includes 40 U of water, 40 U of living creatures and 20 U of air + soil. 40 U of living creatures in the above example included 10 U human life, 10 U other mammals, 10 U birds & insects and 10 U plants at that time which makes a total of 40 U of energy of living creatures. In today's world we can see that the number of human beings is increasing rapidly and other life forms are decreasing consistently. This equation now comes to 25 U human life, 5 U other mammals, 5 U birds & insects and 5 U plants. Id est the total energy of living creatures is 40 U only just it's quotient is changed.
Now this change of quotient has not only caused some natural calamities but it has also reduced the human life span. In ancient Indian texts this effect is mentioned as a consequence of the Kaliyug i.e. the age of darkness. This mythological reference is not a made up fable but we are actually facing the consequences of this age. According to my study, the ancient scientists prophesied that this natural imbalance is going to create catastrophes later on. They even calculated the period of darkness. And that period is this Kaliyug. The new age scientists have studied and stated that after many years this cycle on the Earth will end and human life will completely finish and restart from the beginning. Same theory is mentioned in the ancient Indian texts that after Kaliyug the cycle of the 4 yugas will begin again with Satyayug. Well, I don't want to delve into these mythological prophecies, but I wanted to note this point to help my explanation of the effect of the planets on human life.
These natural transformations not only happen on the Earth, but also on every planet in the universe. According to my research I opine that due to these transformations the planets keep on changing their effects on humans. I feel that the results of the planetary effects are definitely different now than the earlier period. Nonetheless, these changes are also not going to be consistent in future.
Visibly Sun rays fall on our bodies and we can observe this in plain sight. Practically emitted rays from every nearby (from Earth) planet fall on us. But these rays are not visible to the human eye so this phenomenon is not considered normally. Though when these rays cross the gas layers around the Earth, their dangerous properties are reduced or nullified thus when they reach human bodies they can't burn or harm the humans. In other words we can say that this is a boon provided by nature to all living creatures on the Earth. Slowly this process is getting affected and the protective layers of gases around the Earth are losing their powers. Nowadays the Sun rays are causing harmful effects to humans is also proved by the scientists.
Anyway, now let's understand the effect of these planet rays on our personal lives in simple words. Just imagine that 2 people with similar physical strength are standing at the same place in the afternoon time. One of the persons has more trouble due to stronger Sun rays. The person may get more thirsty or dizzy. But the other person may not be so much affected. This is a visible effect of the rays. Like this the planet rays also affect the mental state of humans.
Our body has an aura of energy around it. When planet rays reach our bodies through the gaseous layers around the Earth, their chemical properties are altered and similarly depending on the strength of the human body; these rays have their effects altered accordingly when they reach our bodies. The visible effects as mentioned earlier are of course there. But the invisible effects like changes in way of thinking, behaviour, decisions taking capacity etc. also occur. The symbolic presentation of these planetary effects is 'Kundli' or 'Horoscope'.
The kundli is formed at the time of our birth. In the kundli, specific planets occupy specific houses. It means that we are going to face the effects of the planets according to their houses for the lifetime. Our body which is made from the panchamahabhutas or 5 elements, when comes to existence, at that time the planets in the universe are in what position decides their effect on our bodies and mind. This means though the bodies of all human beings are created by the 5 elements, every person is born with a specific composition of these elements which varies from person to person. Albeit every human being is made up of these 5 elements, their permutation and combination is different for each person. As every person has different colour, height, brain, life in general; this difference also exists on the genetic level. So these differences are not only visible but on cellular level also. This is known as 'chromosomes' in scientific terms. Due to these chromosomal differences every person's body structure, diseases, life span are different and so are the events in life. The symbol of these chromosomes and specific composition of the 5 elements is 'Kundli'.
Due to this composition few chemical components from the rays from the astrologically selected nine planets do affect us but some components can not. Due to our genetic make up these few components can not react with our bodies. Take for example electricity, how it smoothly flows through metals like iron because the chemical structure of iron is such that there are no hurdles created for the electricity. But the same electricity can not flow through wood. Because wood has such chemical makeup that it stops the flow of electricity. Now if we want to tell the reason for this then we give a simple answer that this occurs due to the natural difference between iron and wood. Or wood is not a good electricity conductor is something which we are familiar with from our school days. On the same grounds I will elucidate that every person is not a good 'conductor' of the planet rays. Due to our genetic makeup when the planet rays react with our bodies some of their chemicals remain ineffective or less effective to achieve any repercussions. When favourable components of planet rays fail to react we face some stumbling blocks, we say that the planet is not auspicious. When unfavourable components of planet rays fail to react we experience some positive outcomes where we say that the planet is auspicious.
Now consider the above mentioned example of the Sun rays again. When a baby is born the position of the Sun related to the Earth (in degrees) and the angle between them at the time decides the position of the Sun in the baby's kundli. If the Sun is in the first house in the baby's kundli it means the baby is born with such genetic makeup that the Sun rays will inflict a specific effect on him/her. When someone is born at the time of Sunrise the position of the Sun is in the first house in the kundli. And when the Sun is in the first house it is astrologically predicted that the native will be aggressive, outspoken and short tempered. From a scientific point of view it connotes that specific components from Sun rays will be absorbed in the native's body which will trigger his/her brain which will build the native's nature as described above. At the time of Sunrise though the Sun appears milder from the Earth it is actually progressing towards torridity. If we relate this with the position of the Sun in kundli's first house then we can understand that these natives may look calm for some time but after a slight trigger their aggressive nature will begin to manifest. Now the readers can get an idea about the coordination between genetic makeup and the planetary position in the kundli.
From the above example it will be clear that when the planets affect us on the basis of their physical characteristics. The rays emitted from these planets are created, in other words 'born' from those planets. Thus in personal astrological predictions the physical characteristics of the planets are considered. For example Saturn is considered as an airy planet in astrology. Practically after research the scientists have claimed that astronomically Saturn is a gas giant. It can have a solid core but it is less likely to be as strong as the Earth's core. By linking this we can say that the people under Saturn's effect easily get flattered (Saturn has no power to give stable nature due to lack of solid core), take more time to make decisions (Saturn revolves very slowly). But due to the 'gaseous' nature of Saturn their fame is widespread. Everybody is aware of the fact that Saturn has rings around itself. Astronomically speaking these rings are primarily made up of water ice and other trace impurities like tholin, silicate etc. This shows that Saturn is a hollow planet with solid but sparse covering. But as this covering is of water ice if the temperature rises this can easily melt. People under Saturn's influence are just like this. From outside they seem to be insipid or introverted and in spite of this in panic situations they are down in the dumps. They require affection as much as food. The scientific reason behind this is when the Saturn rays reach our bodies they affect our body and mind on the basis of the chemical nature of Saturn. Due to the genetic makeup of the people under Saturn's influence, Saturn rays will be more effective on them compared to other people. Along these lines a detailed study of every planet helps us to calculate how the planets influence our lives.
In all this the most cherished subject is our Rashi (moon sign). Our rashi is the sign in which the Moon is placed at the time of our birth. According to my study, rashi is just a tip of the iceberg. Based on the anecdotes on the rashi, we tend to create some indeterminate opinions on our (or others') nature. Though it is an important criteria, only rashi can't describe every aspect of a person. I explained this point briefly just to make the readers aware of this fact and avoid misunderstandings.
Human nature, kundli predictions are based primarily on which planet rays can affect us depending on our genetic makeup. The lord of the sign in which the moon is situated at our birth time and its rays are predominantly effective on us. Astrology has allotted a lord planet to every rashi / sign. Which means the rashi is the symbolic representation of the lord planet. When we say a planet is placed in a particular rashi, it means astronomically the planet is visible from the Earth at that specific position. Scientifically it means the planet and the rashi lord planet both are at a particular angle which results in the mixed rays which fall on us and affect us depending on our genetic makeup. Our rashi or moon sign works on the same principle. In ancient texts like Vedas it is written as the Moon is the lord of our mind (चंद्रमा मानसो जात:). If the Moon is in Aries sign at the our birth time it denotes that at the birth time the Moon and the Aries sign lord Mars are at such an angle in the universe; their rays will react with our brain and this reaction is permanent. In simple terms our nature is determined at the birth which is constant. The Moon rays form the psyche and the Mars (as more influential than other planets at the time) rays cast the brain in such a way that it will react in a certain manner. Of course here the positions of other planets, their signs are equally important. Irrespective of the rashi of the Moon during kundli predictions which of the 12 astrologically important planets is more dominant is taken into consideration. Rather than delving into this vast topic I will just highlight that any planet's rashi in the kundli is basically the lord of that rashi.
Astrology has described each planet on the basis of the planet's chemical composition, its size, number of its moons and other celestial conditions. This ancient knowledge is so scientifically plenipotentiary that it matches the astronomical description of the planets in modern science.
Now in the next article I will try to thoroughly explain how personal kundli predictions are made on the basis of this science.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
==========================================================