Friday 9 December 2022

पांढरी जादू - १ (White Magic-1)

काळी जादू, वुडू, करणी असे शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. ह्या प्रकारच्या म्हणजेच वाममार्गी विद्येला अर्थातच बरेच जण घाबरतात. पण ह्या काळ्या जादू सारखीच 'पांढरी जादू' असते हे अनेकांना माहित नाही. ही पांढरी जादू म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी हा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. खरं पाहायचं तर या विद्यांना लोक घाबरतात ते त्यातल्या 'जादू' या शब्दामुळे. त्यामागे काहीतरी गूढ, भयंकर आहे या समजामुळे. कारण जे अज्ञात आहे त्यालाच आपण जास्त घाबरतो. म्हणूनच अशा गोष्टी अगदी सगळं आकलन नाही पण थोड्या जरी समजून घेतल्या तरी त्याबद्दलची भीती कमी होऊन अंधश्रद्धाही कमी होतील आणि अशा गोष्टींचा फायदा घेऊन आर्थिक व मानसिक दृष्ट्या पिळवणूक होणार नाही यासाठी हा माहितीपर लेख आहे.

शास्त्रांमध्ये कोणत्याही प्रकारची 'जादू' असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ असतो कोणताही उद्देश सफल करण्यासाठी केलेला असा उपाय की ज्यानं विलक्षण गोष्टीही साध्य होतील. मग ह्यात भौतिक सुखापासून ते मोक्ष मिळवण्यापर्यंत सर्वच गोष्टी येतात. आपल्याला अपेक्षा नसतील किंवा कल्पनाही नसेल अशा चांगल्या वाईट गोष्टी अगदी जादूची कांडी फिरल्यासारख्या आपल्या आवाक्यात येतात म्हणून 'जादू' हे संबोधन वापरलं आहे. जिथं नकारात्मक ऊर्जा वापरून वाईट कर्मं केली जातात त्याला साध्या भाषेत काळी जादू म्हणतात. याउलट जिथं सकारात्मक ऊर्जा वापरून कोणाचंही नुकसान न करता आपली किंवा दुसऱ्यांची प्रगती केली जाते वा अडचणी दूर केल्या जातात ती पांढरी जादू असते. पांढऱ्या जादूमधे निसर्ग व नैसर्गिक गोष्टी आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा हाच कार्यासाठी वापरला जाणारा स्रोत असतो. ह्या सगळ्या मार्गांचा इतिहास फार जुना आहे आणि काळानुसार ह्यांत बदलही झाले आहेत. जगातील प्रत्येक देशात काळी आणि पांढरी जादू वापरली गेली. प्रत्येक देशाच्या संस्कृतीनुसार त्यांची दैवतं, पद्धती आणि नावं बदलली पण त्यामागचं शास्त्र व तत्त्व थोड्याफार फरकानं तेच राहिलं. आता पुरातन काळापासून आताच्या काळापर्यंत हे बदल कसे झाले आणि सद्य स्थितीत पांढरी जादू कशी वापरली जाते याबद्दल माहिती घेऊ.

अगदी पुरातन काळाचा विचार करता काळी वा पांढरी जादू करणाऱ्यांना चेटक्या / चेटकीण म्हणत. काळी जादू करताना हे काळे चेटूक करणारे परयोनीतील आत्मे, अप्सरा, योगिनी, भुतं, राक्षस यांची साधना करून दुष्कर्म करत. पांढरी जादू करणारे पांढरे चेटूक मुख्यतः नैसर्गिक देवता म्हणजे पृथ्वी, चंद्र,अग्नि इत्यादींची साधना करून सत्कर्म करत. पण दोन्हीही जादूंमध्ये कर्त्याची मानसिक शक्ती अतिशय महत्त्वाची असे. इच्छाशक्ती आणि श्रद्धा असेल तरच कोणत्याही प्रकारची जादू यश देऊ शकेल यावर चेटूक करणाऱ्यांचा जबरदस्त विश्वास होता किंबहुना आजही आहे. इटली, ग्रीस, इजिप्त, भारत अशा अनेक देशांत पांढरी जादू वेगवेगळ्या रूपात वापरली गेली. सामान्य जनतेला त्यांच्या कष्टप्रद आयुष्यात सुखाचा मार्ग दाखवणं हा ह्या जादूचा मुख्य उद्देश असे. इ. सा. पूर्व काळात इटलीमधील वर्जिल या कवीनं पांढरी जादू शिकून जादुई तावीज बनवले ज्यामुळे लीच प्लेग सारख्या रोगापासून नेपल्स शहरात सर्वांचं रक्षण झालं. तसंच तो अशी जादू करत असे की त्यामुळे निर्जिव वस्तू सचेतन झाल्यासारख्या परिणाम करत उदा: तांबं / लोखंडा पासून बनलेले घोडे रोग बरे करत, धातूचे पुतळे खजिन्याचं रक्षण करत अशा अख्यायिका आहेत. ग्रीस मधील सर्सी आणि तिची भाची मडिया या दोन प्रसिद्ध चेटकिणी होत्या. काळी व पांढरी दोन्ही जादू प्रयोगात आणताना त्या त्यांच्या (स्त्री म्हणून असलेल्या) आकर्षक गोष्टी उदा: स्वतःचे केस इ. वापरून चांगली वाईट कर्मं करत असत. या काळातील जादूंमध्ये आपण गोष्टींत / चित्रपटांत ऐकलेल्या जादुई वस्तू म्हणजेच कढई, त्यात उकळणारं औषधी द्रव, त्यात टाकले जाणारे प्राण्यांचे अवयव व वनस्पती, त्याच्या प्राशनाने होणाऱ्या अकल्पित गोष्टी उदा: म्हातारी व्यक्ती तरुण होणं, माणसाचं रूपांतर प्राण्यात होणं अशा अनेक गोष्टींचे संदर्भ मिळतात. ब्रिटनमधे अशी आख्यायिका आहे कि देवदूत तेथील मर्लिन नावाच्या खूप मोठ्या जादूगाराच्या रूपात प्रकट होऊन स्वतःहून केल्टिक जादू करणाऱ्या चेटक्यांना मदत करत असे. केल्टिक या जादूच्या प्रकारात पांढऱ्या जादूतील नैसर्गिक देवता म्हणजे पृथ्वी (कुमारिका, पत्नी / माता, ज्ञानी वृद्धा अशा सर्व रूपांत), वृक्ष, प्राणी, फुलं, दगड माती यांना खूप आदर दिला गेला आहे. केल्टिक जादूमधे परमेश्वराला सूर्याचा आणि पाताळ लोकांचा स्वामी अशा रूपातही पुजलं जात असे. केल्टिक जादूचं तत्त्व सृष्टीचा आदर करून कार्य करतं. अगदी ज्योतिष विद्येपासून, डोळे बंद करून विशिष्ट पद्धतीनं इच्छा प्राप्तीसाठी प्रार्थना करणं अशा अनेक क्रिया या जादूमधे केल्या जात असत. अमेरिका (मूळ किंवा नेटिव्ह प्रजाती), आशियामधे शमन (शेमन) हा पांढऱ्या जादूचा पंथ खूप नावारूपाला आला. या पंथाचा अभ्यास करणाऱ्या साधूंना शमन (स्त्री - शमंक) म्हणत असत. कोणताही रोग बरे करण्याची क्षमता असणारे शमन मनुष्य वा प्राण्याला काळ्या जादूमुळे काही शारीरिक त्रास होत असेल तर तो दूर करत, संपूर्ण शहरावर काही संकट / रोगराई येणार असेल तर तेही थांबवत असत. पारलौकिक शक्तींशी एका वेगळ्या पातळीवर संपर्क साधून ते मार्ग सांगत, मृतात्म्याला पुढील प्रवासासाठी ते सहाय्य करत. विविध प्राण्यांच्या नैसर्गिक शक्ती ओळखून त्या त्या प्राण्याच्या विशेष शक्तीचा मनुष्याशी संबंध जोडून ते प्राण्यांची पूजा करत. उदा: गरुड उत्तम दृष्टीचं प्रतीक मानून विशिष्ट रूपात त्याची साधना करत. आफ्रिका खंडात वूडू नावाचं शास्त्र काळ्या आणि पांढऱ्या जादूत वापरलं गेलं आणि आजही ते अस्तित्वात आहे. वूडू या आफ्रिकन शब्दाचा अर्थ परमात्मा किंवा दैवत असा आहे. एक परमोच्च शक्ती सर्व विश्वाचा स्वामी असून बाकीची दैवतं त्या शक्तीच्या अधिपत्याखाली आहेत असं या शास्त्रात मानलं जातं. नैसर्गिक घटना आणि प्राणी यांना या शास्त्रात खूप महत्त्व आहे. सर्प पूजन हा या शास्त्रातील फार मोठा भाग आहे. हिंदू संस्कृतीतील वासुकी प्रमाणे इथेही एक सर्पांचा राजा मानला गेला आहे तो म्हणजे डॅनभलाह विडो. त्याचप्रमाणे सूर्याचा आणि मृतांचाही एक एक स्वामी आहे. वूडू शास्त्रात विशिष्ट ठिकाणी बसून काही यंत्र / प्रतिकं जमिनीवर काढली जात ज्यातून मृतांचे आत्मे स्वर्गाकडे जाऊ शकतील आणि यासाठी सूर्याचा स्वामी पापा लेग्बा याची आराधना केली जात असे. कोणाचीही मदत करणे, अडचणी दूर करणे अशी शुद्ध भावना यामागे असूनही काळी जादू करणाऱ्या काही वूडू तांत्रिकांमुळे या विद्येचा ऱ्हास होऊ लागला आणि आज ही विद्या काळ्या जादूसाठी ओळखली जाते हे दुर्दैवच आहे. एखाद्या व्यक्तीची बाहुली सारखी प्रतिमा करून त्याला सुई टोचून त्रास देणं ही वूडू तंत्राचीच देणगी आहे. एखादं मृत व्यक्तीचं शव पुनर्जीवित करून त्याच्याकडून अथक काम करून घेणं ज्याला झोम्बी म्हणतात त्याचाही उगम वूडू मधेच आढळतो. ह्याच शास्त्रात एखाद्या चांगल्या आत्म्याला काही काळापुरता एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करायला लावून चांगली कामं करून घेणं, रोग बरे करणं अशी पांढरी जादू केली जात असे. ज्यात विशिष्ट वेळेनंतर तो आत्मा सन्मानाने परत त्याच्या ठिकाणी पाठवला जात असे. पण दुष्ट आत्म्यांचा वापर करून एखाद्याच्या शरीराला झपाटून वाईट कामांसाठी याचा वापर वाढू लागला (काळी जादू). ह्यात मात्र त्या दुष्ट आत्म्यापासून सुटका करणं त्रासदायक होत असे. इंग्लंड, युरोप, अमेरिका यासारख्या देशांतही मूर्तिपूजा, निसर्ग हाच देव मानून सूर्य, पृथ्वी, झाडं सगळ्यांचं पूजन होत असे. 'युल' सारख्या सणात सूर्याचं आपल्याकडील संक्रांतीच्या सणासारखं पूजन करून सण साजरा करत असत. इजिप्त मधील ज्ञान हे गूढ आणि निसर्गाच्या अधिक जवळ असलेलं होतं. पिरॅमिड, इजिप्तची सांकेतिक प्रतीकं, अनेक गूढ मंत्र / यंत्र या गोष्टी निसर्ग, खगोल विज्ञान यांच्या अभ्यासावर आधारित होत्या. ह्या देशातील काही गूढ गोष्टींचं गारुड आजही लोकांच्या मनावर आहे. इजिप्त मधील देवता आणि भारतीय देवतांमधे काही साधर्म्य नक्कीच आहे. ह्या देवतांचं कार्य आणि त्यांचं रूप पाहता भारतीय सनातन संस्कृती प्रमाणेच निसर्ग, स्त्री शक्ती, प्राणिमात्र अशा साऱ्यांचा आदर केलेला दिसतो.

आशिया खंड आणि विशेषतः भारताबद्दल बोलायचं तर वैदिक काळात उपरोक्त सर्वच चांगल्या विद्या सत्कर्मासाठी वापरलेल्या आढळतात. वैदिक काळात पंचतत्त्वं, निसर्ग, सूर्य, पृथ्वी, प्राणी, वृक्ष, पाऊस अशा सगळ्यांचंच पूजन होत असे. माझ्या मते वैदिक काळातील शास्त्रं ही पांढरी जादूच होती. होम, हवन, मंत्रोच्चार, १६ संस्कार, निसर्गापासून बनलेल्या वस्तू उदा: शेण, कापूस, फुलं, फळं, लाकडं इ. वापरून केलं जाणारं पूजन आणि प्राण्यांना दिलेला आदर हे भारतीय खंडात सर्रास आढळतं. सनातन संस्कृतीत प्रत्येक देवतेला दिलेलं वाहन म्हणजेच प्रत्येक छोट्यामोठ्या प्राण्याचा केलेला सन्मानच आहे. आशिया खंडातील भारत, चीन, जपान अशा देशांमधे निसर्ग, प्राणी इतके पुजले जात असत की त्यांची शास्त्रं, खाद्य संस्कृती, सण अशा अनेक गोष्टी प्राण्यांच्या गुणांवर आधारीत असत. काही प्रमाणात ह्या गोष्टी आजही अस्तित्वात आहेत. चीन मधील ज्योतिष शास्त्रात राशी ह्या प्राण्यांच्या नावावर असून त्या प्राण्यांचे गुण आणि मनुष्य जन्मातील गुणवैशिष्ट्यं यांचा सुरेख संगम करून मनुष्य स्वभावाचं वर्णन केलं जातं. आशियातील प्राचीन आयुर्वेद, चिनी / जपानी औषधं, युनानी पद्धती अशा अनेक पद्धतींत वनस्पती, प्राणी (शारीरिक भाग) अशा नैसर्गिक गोष्टींचाच वापर आढळतो. पांढऱ्या जादूची व्याख्या पहिली तर आशिया खंडात पांढरी जादू सर्वात जास्त प्रमाणात वापरली गेली असं माझं मत आहे. गावावरील संकट असो, वैयक्तिक अडचणी असोत वा रोग बरे करायचे असोत; उपरोक्त अनेक पद्धती वापरल्याचे दाखले आपल्याला ग्रंथांमधे मिळतात. अगदी रामायण काळात लक्ष्मणासाठी हनुमानानं आणलेली संजीवनी वनस्पती असो, महाभारतात मंत्रोच्चारानं झालेला कुंतीपुत्र कर्ण असो, श्रीकृष्णांच्या बासरीनं मोहित झालेले मनुष्य व प्राणी असो, त्यांच्या वैजयंती माळेची महती असो यातील कोणत्याही संदर्भात नैसर्गिक गोष्टींपासून सत्कर्मच घडलेलं दिसतं. विस्तारानं बोलायचं तर या सर्व उदाहरणांचं आजच्या भाषेत सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण देता येईल. श्रीकृष्ण त्यांच्या खास प्रकारच्या सहा बासऱ्यांमधून काही विशिष्ट प्रकारचे स्वर अशा पद्धतीनं उमटवत की कोणत्याही जीवाला संमोहित करण्याची शक्ती त्यात असे. आजच्या भाषेत याला साऊंड थेरपी म्हणता येईल. वैजयंती माळेतील विशिष्ट फुलांच्या सुगंधामुळे काही भावना जागृत होत असत. ज्याला आज आपण ऍरोमा थेरपी म्हणतो. म्हणजेच अशा प्रकारे ध्वनी लहरी, फुलांचे सुगंध इत्यादींपासून केवळ संमोहनच नव्हे पण रोग नाशन, मानसिक उपचार, नैसर्गिक घटनांवर नियंत्रण करून जनतेचं संरक्षण अशी अनेक चांगली कर्मं ज्ञानी व्यक्तींनी त्या काळी केली आहेत. भारतीय खंडात मंत्र (बीज मंत्र शक्ती), होम हवन (अग्नि पूजन), सर्व सणांमध्ये कोणत्यातरी नैसर्गिक शक्तीचं पूजन, स्त्री (कुमारिका, माता, पत्नी) शक्तीचं पूजन, विशिष्ट आकृत्या (यंत्र), पारलौकिक शास्त्र, खगोल आणि ज्योतिष शास्त्र (ग्रह पूजन, ग्रहांच्या हालचाली नुसार सण व आहार बदल उदा: संक्रांत, चातुर्मास) अशा अनेक माध्यमांतून सकारात्मक ऊर्जा मिळवून मानवी जीवनासाठी वा वैयक्तिक अडचणींसाठी मदत केल्याचे दाखले आहेत. आशिया मधील शमन हा शब्द संस्कृत 'श्रमण' यावरून आला असावा असा एक अंदाज आहे. दुसऱ्यासाठी श्रम करणारा तो श्रमण असा याचा शाब्दिक अर्थ आहे. जैन, बौद्ध संस्कृतीतही श्रमण आहेत. वैदिक काळातील मुनी म्हणजेच श्रमण असावेत असा वेद व उपनिषदांतील संदर्भांवरून अंदाज लावता येतो. कोणत्याही धर्मातील श्रमण हे उत्तम सल्लागार असून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केवळ परोपकारासाठी करत असत. यात मुख्यतः रोग बरे करणं हा उद्देश असे. भारतीय वेद-पुराणांनुसार मंत्र शक्तीनं रोग बरे करण्याबरोबरच दुष्ट लोकांना शिक्षा देण्याचं कार्यही केलं जात असे.

असो, मुख्य मुद्दा असा आहे की पांढरी जादू हा तुलनेनं नवीन शब्द प्रयोग आहे. मात्र यासंदर्भातील लिखाणात इजिप्त,आशिया आणि विशेषतः भारतीय संस्कृतीचा उल्लेख कमी आढळतो. प्रार्थना, आशीर्वाद देणं, मंत्र / यंत्र, परोपकार, निसर्ग हा प्रमुख स्थानी असणं अशा सर्वच गोष्टी असूनही उपरोक्त संस्कृतींचा उल्लेख खूप कमी केला गेल्यानं 'पांढरी जादू' ही संकल्पना आशियात प्रसिद्धीला आली नाही.

साधारण १४ व्या शतकाच्या आसपास काळ बदलायला सुरुवात झाली. पुनर्जागरणाचा हा काळ माणसाला निसर्गापासून दूर घेऊन जाऊ लागला. वैज्ञानिक क्रांतीची ही सुरुवात होती पण यामुळे माणसं निसर्गाशी जुळवून घेण्यापेक्षा निसर्गाला नियंत्रणात ठेवण्याचा विचार करू लागली. प्रामाणिकपणानं यश मिळवणं आणि परोपकार करणं विसरून कमी वेळात इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागली, मग त्यात कोणाला त्रास द्यावा लागला तरी चालेल. पैसा, शिक्षण, मान मरातब अशा भौतिक सुखांच्या मागे धावताना नैसर्गिक वस्तू / ऊर्जा यांचा वाईट पद्धतीनं जास्त वापर होऊ लागला. सगळी गणितं बदलली. सगळ्या जगात दैवतं, पूजा - अर्चा करण्याचे नियम सगळं फायदे तोटे पाहून बदललं गेलं. प्रार्थनास्थळं वाढून निसर्गपूजा कमी महत्त्वाची ठरायला लागली. इतकी की सणांमधील निसर्गाचं दैवत्व काढून घेतलं जाऊ लागलं. उदा: युल नावाच्या एका सणात सूर्य देवतेचा भूमातेच्या पोटी झालेला जन्म साजरा केला जात असे. पण हिवाळ्याच्या हंगामातील होणारे खगोलीय बदल दर्शवणारा युल हा सण बंद करून त्या जागी नाताळ हा सण साजरा केला जाऊ लागला. पांढरी जादू करणाऱ्या चेटूक  / चेटकिणींना, ज्ञानी व्यक्तींना काळी जादू करणारे म्हटलं जाऊ लागलं. त्यांना इंग्लंड सारख्या देशात देव विरोधी, शैतानाचे पुजारी म्हटलं जाऊ लागलं. मग हे लोण अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांत, युरोपमधेही आलं. आशिया, भारत खंडात त्यांना तांत्रिक म्हटलं जाऊ लागलं. काळी आणि पांढरी जादू यातील फरक नष्ट करून सरसकट सगळ्यांनाच दुष्ट प्रवृत्तीचं म्हणून रेखाटलं गेलं. आजही दुर्दैवानं तांत्रिक म्हटलं की तो वाममार्गी कार्य, जादूटोणा करणाराच असेल अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. जादूटोणा करणारी चेटकीण झाडूवर बसून उडते, कुरूप असते, एखाद्याला शाप देऊन प्राणी बनवू शकते अशा अनेक कल्पना थॉमस ऍक्वीनास या धर्मशास्त्रज्ञानं १३ व्या शतकात पुढे आणल्या. अशा गैरसमजांमुळे निसर्गाचं सखोल ज्ञान असणारे अनेक पांढरी जादू करणारे ज्ञानी वाममार्गी असल्याचा शिक्का बसून त्या काळातील शिक्षेनुसार मारले गेले. युरोपमधे अनेक स्त्रियांना काळी जादू करणारी चेटकीण समजून घृणास्पद वागणूक आणि मृत्यू दिला गेला. आशियातही चांगल्या तांत्रिकांना वाममार्गी म्हणून शिक्का बसला. त्यांनाही अशाच प्रकारे मृत्युदंड मिळाला. सुदैवानं याच काळात जर्मनीतील थोर विचारवंत संत अल्बर्टस मॅग्नस यांनी विज्ञानाची कास धरून निसर्ग नियम ही संकल्पना पुढे आणली. स्वतः ज्योतिषी असलेले हे संत नैसर्गिक शक्तींवर विश्वास ठेवत असत.

१५, १६ व्या शतकात काही जणांनी निसर्ग आणि मानवी जीवनाचा कसा घनिष्ठ संबंध आहे हे सिद्ध करून ज्योतिष शास्त्र, नैसर्गिक ऊर्जा, पारलौकिक शास्त्र यांच्या साहाय्यानं रोग कसे बरे होतील, इतर अडचणींमधे मार्ग कसा काढता येईल यावर खूप लिखाण केलं. निसर्ग हाच इतका मोठा जादूगार आहे की निसर्गाकडून सहाय्य घेता आलं तर इच्छा शक्तीच्या जोरावर 'नैसर्गिक जादू' वापरून अनेक अडचणी दूर होतील असं त्यांचं मत होतं. या लेखकांपैकी काही नावं म्हणजे जर्मनीचे हेनरी अग्रीप्पा, स्वित्झर्लंडचे पॅरासेल्सस, इंग्लंडचे डॉ. जॉन डी, इटलीचे मर्सिलिओ फिचिनो आणि जिओव्हानी पिको. खरं तर हे सर्व सिद्धांत पुरातन काळातच मांडले गेले होते पण तात्कालीन गैरसमजांमुळे हे सिद्धांत पुन्हा प्रकाशात आणण्याची गरज होती. कारण अशा जादू आणि विज्ञान यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. पण ह्या तंत्रांच्या दृष्टीआड असणाऱ्या कार्यपद्धतीमुळे विज्ञानवादी काळात निकष बदलले आणि या शास्त्राची महती कमी होत गेली. तसंच सामान्य जनतेपर्यंत ह्या गूढ शास्त्रांची माहिती पोहोचू नये यासाठी या विषयावर सार्वजनिक लिखाणही कमी होत गेलं. फिचिनो आणि पिको सारख्या लेखकांनी याला जुमानलं नाही पण तरीही या शास्त्रांची प्रतिमा डागाळण्यात तात्कालीन प्रस्थापितांना यश मिळालं. सगळ्याच अभ्यासकांचा सार्वजनिक लिखाण न करण्यामागचा उद्देश वाईट नव्हता. काही शास्त्रज्ञ उदा: जर्मनीचे गूढ व सांकेतिक शास्र तज्ञ जोहानस ट्रायथेमियस यांच्या मते तज्ञांनी आपलं ज्ञान हे निष्ठा आणि विवेकबुद्धी असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच द्यावं. म्हणून ते अशा विद्यांवर सार्वजनिक लिखाण टाळत असत.

सुदैवानं १९व्या शतकाच्या सुरुवातीला आपण किती ज्ञान काळाच्या ओघात विसरत चाललो आहोत याची जाणीव अनेक देशांतल्या सुजाण नागरिकांना व्हायला लागली. मूर्तिपूजा आणि आशिया मधील गूढ व अध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास करायला पाश्चिमात्य देशांतील लोकांनी सुरुवात केली. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, युरोप सारख्या देशांत गुप्तपणे काही गट या नैसर्गिक शास्त्रांचा अभ्यास करून त्यावर विचार विनिमय करू लागले. मर्यादित असलेल्या स्थानिक जादू पुनरुज्जीवित व्हायला लागल्या. युरोप मधील लोकसाहित्यकार जेराल्ड गार्डनर यांनी मार्गारेट मरे यांच्या लिखाणाचा संदर्भ घेऊन युरोपमधे विका नावाची मूर्तिपूजा असलेली स्थानिक जादू म्हणजे डायनिक कल्टचा प्रसार केला. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चिमात्य जगात पांढऱ्या जादूचा गांभीर्यानं अभ्यास केला गेला. द हरमेटिक ऑर्डर ऑफ द गोल्डन डॉन या संस्थेनं विशेष पुढाकार घेऊन उच्च प्रकारची शास्त्रं पुढे आणली. या काळात ज्यू धर्मातील तंत्र 'कबाला' म्हणजे मनुष्य व सृष्टीतील ऊर्जेच्या प्रवाहाचं शास्त्र याचा विशेष अभ्यास झाला. त्यावर आधारित देवदूतांची भाषा समजणारं शास्त्र (एनोकिअन मॅजिक), आत्म्याचं आवाहन करणारं शास्त्र (द की ऑफ सॉलोमन), राक्षसांना आवाहन व वश करणारं शास्त्र (अब्रा मेलीन मॅजिक) अशा अनेक उच्च कोटीच्या शास्त्रांचा अभ्यास केला गेला. पौर्वात्य व पाश्चिमात्य देशातील गूढ आणि दैवी शास्त्रांचा मिलाफ करून त्याचा प्रसार करणारी द थिऑसॉफिकल सोसायटी अमेरिकेत हेलेना ब्लाव्हाट्स्की या रशियन बाईंनी स्थापन केली. यात भारतीय आणि तिबेट देशातील शास्त्रांचा विशेष अभ्यास झाला. पुनर्जन्म, निसर्गाच्या सुप्त शक्ती आणि मनुष्याच्या अपरिमित शारीरिक शक्तीअशा गूढ पण उच्च तंत्रांचं आशिया मधील ज्ञान या अभ्यासकांना भारून टाकत होतं. मात्र काही कारणास्तव या संस्थेचं मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क मधून भारतातील अड्यार (चेन्नई) इथं हलवण्यात आलं.        

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
  
      ==============================================

Many times we hear some occult related words like black magic, voodoo, diabolic etc. Of course most people get scared of such left handed practices. Still many are unaware that a pure practice called White Magic exists, which is a counterpart of the infamous Black Magic. I am writing this article to explain the concept behind White Magic. Really speaking people are scared of such practices due to the word 'magic'. Because the word 'magic' gives some occult or spooky vibes to the hearer. The reason is obvious that we get scared of the unknown. That's why understanding the concept behind such things, at least to some extent, can not only help to reduce the fear but also remove superstitions and prevent financial or emotional exploitation; which is the purpose of writing this informative article.     
 
When any kind of ritualistic practice is called magic, it means a methodology to fulfil a desire where even incredible things would become feasible. This includes everything from materialistic pleasures to salvation. The term 'magic' is used for such practices because after a successful spell any good or bad things which look impossible or not expected to happen are within our reach as if a magic wand is waved. Where negative energy is used for evil purposes it is called as Black Magic. Per contra where positive energy is used for benevolent purposes to help one self or others it is called White Magic. White Magic uses nature or natural resources as the main source of energy. The history of White Magic starts with archaic times and with time there were certain changes in this science. Black or White Magic was used in almost every part of the world. According to the cultural system of the latitude, the deities, methods and names may have changed but the science and principles behind the Magic remained almost the same. Now let's see how these changes occurred from ancient times to today's world and how the White Magic is practiced in the present day.      

In ancient times the workers of Black or White Magic or sorcerers were called witches (females) or wizards (males). While performing Black Magic these black witches / wizards used to converse with angels, spirits from the other worlds, devils and ghosts to conduct misdemeanors. The white witches / wizards used to worship natural deities like Earth, Moon, fire etc. to conduct benevolent acts of White Magic. In both the magics psychological strength of the performer is the key to the success. These sorcerers used to believe rather still also believe that strong will power and faith can give success in any kind of magic. White Magic was used in different forms in countries like Italy, Greece, India, Egypt and many others. The main purpose of this magic was to help common people to overcome the hardships in life. In B.C. era a popular Roman poet Vergil was a White Magic scholar who made magical talismans which protected the city of Naples from leech plague. According to legend he made inanimate objects animate like iron / copper horses cured diseases, metal statues guarded treasures etc. Circe and her niece Medea were two famous sorcerers from Greece. While practicing both White and Black Magic they used their females charms like their beautiful hair. In such ancient form of sorcery we can get the references of some 'magical' things which we only watch in movies or read in story books like cauldron, the bubbling magical liquid, adding of organs of animals or plants in that and unbelievable things happening after drinking such potions like an old human being changed to a young one, a human changed into an animal and so on. In Britain it was believed that the guardian angel takes the form of Merlin, a very famous wizard to help sorcerers working with Celtic magic. In Celtic magic natural deities from White Magic like Earth (as virgin, mother / wife, crone), trees, animals, flowers, soil, rocks were worshipped. Celtic pantheon revered God in both his roles as Lord of the Sun and Lord of the underworld. The main principle behind Celtic magic is veneration of nature. Many procedures from astrology to singing a prayer with closed eyes to fulfil a wish were followed in this magic. In Native Americans and some part of Asia Shamanism became quite popular as a path of White Magic. The religious practitioners of this tradition were known as shamans (female - shamank). Though the primary goal of Shamanism was healing, in which the shamans were masters they also used to help the human or animal victims of black magic or protect entire cities from calamities or epidemics. They could communicate with the spirits on a higher level and help the common people and escort the souls of the dead to the afterlife. They used to worship animal powers in the sense relating various animals' natural attributes to humans. Like worshipping Eagle as a symbol of keen vision. In the African continent Voodoo emerged as a cult for Black and White Magic spells and it still exists. The African term 'Voodoo' literally means deity or spirit. This cult believes in one supreme God who is the lord of the universe and who governs other deities. Natural phenomena and animals are of utmost importance in this science. Serpent worship is a very essential part of this science. Just like The King of Serpents 'Vasuki' in Indian culture, here is a Great Serpent called 'Danbhalah Wedo'. Similarly there is a Lord of the Sun and Lord of the dead. In Voodoo magic the practitioners used to sit at a specific place and draw some symbols as a door for passage of the souls towards heaven. Though this benevolent magic was used to help people and remove obstacles, it began to be feared when Black Magic practitioners started using it. Sadly today also Voodoo magic is better known for its evil effects rather than its original pure purpose. The appalling strategies like making dolls in human shape and torturing it by stucking pins or so is a gift of Voodoo Black Magic. Even the debatable concept of 'Zombie' which is allegedly created by reanimating a corpse for working tirelessly, shows its origin in Voodoo. In African White Magic practices spiritual possessions were performed by consciously inviting a good soul for temporary possession of the participant to conduct benevolent acts like helping others, healing etc. After the purpose was solved the soul was allowed to return in a respectful manner. But Black Magic sorcerers started using this technique for demonic possession for evil purposes. In demonic possessions it was difficult to get rid of the soul allowed to enter the body. In Britain, USA, Europe and some other countries there was paganism and worshipping natural resources like Sun, Earth, trees as deities. In festivals like 'Yule' which was a pagan winter solstice celebration of birth of the Sun God just like 'Sankranti' festival in Hinduism. The knowledge of Egypt was more close to mother nature and mystical.
The structure of pyramids, mysterious symbols and secret prayers were all based on the study of nature and astronomy. Some mysterious things from Egypt are still alluring the whole world. There is definitely a striking similarity between Hindu and Egyptian deities. The iconographies and duties of Egyptian deities also show a reverence towards nature, woman power and animals just like Indian Sanatan culture.    

Talking about Asian continent and especially India, it can be found that aforementioned all such magical techniques were used for benevolent purposes. In Vedic period five elements of nature, mother nature, Sun, Earth, animals, trees, rain and almost all natural resources were worshiped. I think the cultural practices in Vedic era should also be considered as White Magic. Benevolent practices using rituals like homa, havana, mantra chanting, 16 samskaras, worshipping using natural materials like cow dung, cotton, flowers, fruits, wood etc, respect to animals was commonly observed in the Indian continent. Specific mount of each deity in Sanatana culture is to revere that animal, be it big or small one. In Asian countries like India, China and Japan reverence of nature and animals was so prevalent that many of their ritual practices, food culture or festivals were based on the attributes of the animals. In Chinese astrology the zodiac signs are named after different animals and they describe human nature by beautifully combining the animal qualities with those of humans. Ancient Asian sciences like Ayurveda, medicinal sciences of China / Japan, Unani medicines use natural components like herbs, parts of animals etc. Considering the definition of White Magic, I personally feel that Asian continent has implemented this magic to a large extent. Be it a calamity affecting the city, personal problems or healing, many old scriptures can provide references that aforementioned methods were used very commonly. Just have a look at some examples like In Ramayana Lord Hanuman brought sanjivani herb for Laxmana, In Mahabharata Kunti had conceived with the power of mantra chanting, Lord Krishna hypnotized people and animals by playing his bansuri and the significance of his garland, Vaijayanti mala, in all such references we can see that natural substances were used for philanthropic purposes. Comprehensively we can get the explanations for these examples in today's language. Lord Krishna produced such beautiful sounds from his six bansuries that they could hypnotize any creature. In today's terminology it can be called an old form of sound therapy. Specific flowers used in his Vaijayanti mala used to activate some emotions. This is the basic principle behind Aromatherapy in today's world. This shows that in ancient times using sound waves, natural aroma etc the masters of such sciences have not only helped through hypnosis but also by healing, protection and many other altruistic acts. Many examples have time and again proved that in Indian continent power of mantras (beej mantra), homa, havana (fire worship), worshipping natural powers in festivals, woman power (virgin, mother, wife) worship, yantras, paranormal sciences, astronomy and astrology (worshipping planets, different festivals and change in diet according to celestial phenomena viz; Makar Sankranti, Chaturmasa) all such methods are used for utilising positive energy for benefit of human culture or solving problems in mundane life. The word Shaman may have evolved from the Sanskrit word 'Sramana'. Sramana literally means the one who selflessly exerts himself for others. Sramana tradition is also present in Buddhism and Jainism. According to references from the Vedas and upanishads, the Munis in Vedic era are probably Sramanas. Well, Sramanas from any religion were great advisors who used their knowledge only for altruistic purposes. Healing was the primary goal of this tradition. According to Indian Vedas and Puranas Sramanas not only worked as healers using mantra power but also punished the evils.       

Nonetheless the important point here is 'White Magic' is a relatively new term. But the literature on this subject has not given justice to the cultural references from Egypt, Asia and especially Indian culture. In spite of including all the White Magic rituals like prayers, giving blessings, mantra / yantra, philanthropy and nature at utmost importance, aforesaid cultures are scarcely mentioned in these literatures and the concept of 'White Magic' never blossomed in Asian continent.  

From the beginning of the 14th century modernisation was on its way. This period of renaissance distanced people from mother nature. It was the beginning of scientific evolution but rather than living along with nature people thought about dominating it. Quick success in materialistic things replaced honesty and benevolence. On the path of such success people didn't hesitate to even torment others. While blindly seeking materialistic goals like money, education and prestige, natural resources / energies were used for some dark purposes. All the equations changed. Globally the ritualistic practices, deities and all good practices became a profit and loss statement. Religious pagan sites for worship became more important than nature reverence. So much so that the natural deities of the festivals were blue-penciled. Like in the festival of Yule was a winter solstice celebration marking the birth of the Sun God to Goddess Earth. But this festival celebrating the celestial changes in the winter was conveniently replaced by the Christmas festival. Masters of White magic and white witches / wizards were indiscriminately labeled as Black magic sorcerers. In England, they were called sacrilegious and satanists. And this fancy spread in the USA and other western countries, Europe etc. In Asia and the Indian continent people started calling them Tantriks. This disintegrated the difference between Black and White Magic and all magic practitioners were indiscriminately considered malicious. Sadly today also the word sorcerer (Tantrik) creates an image of a malicious magic practitioner of the left handed path. In 13th century famous theologian Thomas Aquinas put forward the (mis)concepts like witches fly on broomsticks, she is ugly or she  can curse humans and change them into animals. Due to such misconceptions many benevolent sorcerers were accused of malicious practices and even executed according to the then present laws against witchcraft. In Europe many women were accused of witchcraft and were treated infernally or killed. In Asia also the White Magic masters suffered the same fate. Luckily in this chaos the German saint Albert Magnus with his scientific approach proposed the theory of 'natural law'. An astrologer himself, he believed in natural powers. 

In the 15th and 16th century some writers demonstrated how human life and the Earth have a link and published writings on using this connection to heal or solve mundane problems by exercising astrology, natural energies or paranormal sciences. They opined that mother nature itself is the ultimate magician and if we can properly utilize it with our mind power then by creating 'natural magic' many problems can be solved. Some of such authors were Henry Agrippa (Germany), Paracelsus (Switzerland), Dr. John Dee (England), Giovanni Pico and Marsilio Ficino (both Italy). Practically speaking these philosophies were already discovered much earlier, but this corroboration was the requirement of the time due to the misunderstandings. Though such magic practices are closely related to science. But due to viewless effects of the techniques the criteria in the scientific revolution changed and ultimately subverted the importance of this science. Adding to this scourge, publishing of the material in print on this topic was also refused by some respectable authors. Although writers like Ficino and Pico did not agree to this. In spite of that the established and powerful people were successful in damaging the image of 'magic'. Of course not all the authors were rejecting public writing with a false intention. Like Germany's Johannes Trithemius stated that the knowledge of the masters should be passed to the disciples having rational thinking and discernment. For the valid reason he avoided public writing on magics. 

Fortunately in the beginning of the 19th century, the smart cookies of different societies started to realize that we are forgetting this incredible knowledge over time. People from Western world started studying Asian (Eastern) occult sciences and paganism. Secret societies formed in countries like Germany, England, USA and Europe studying these natural sciences and esoteric debates began. Folk magics which had a limited scope earlier were reborn. Based on the writings of Margaret Murray, amateur folklorist from Europe, Geral Garden brought Wicca aka Dianic cult magic to fame which was a folk magic with pagan faith. The White Magic was more seriously explored in the Western world during the end of the 19th century. Organisations like The Hermetic Order Of The Golden Dawn were bending their efforts to make such high level sciences regain their status. Similarly Jewish traditional system 'Kabbala' where flow of energy through human beings and nature is studied was also researched. Various magical systems allegedly based on Kabbala like Enochian magic (the language of angels), the Key of Solomon (conjuring spirits) and Abra-Melin magic (conjuring and taming demons) were also studied. Russian spiritualist Helena Blavatsky founded The Theosophical Society in the USA to promote the blending of Eastern and Western spiritualism and mysticism. They studied mystic sciences especially from India and Tibet. The researchers were highly impressed by the Asian mysticism deciphering high level concepts like reincarnation, hidden powers of nature and extraordinary powers of the human body. Due to some inevitable reasons the main office of this society was moved from New York to Adyar (Chennai, India).          

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.     
      ==============================================

No comments:

Post a Comment