जन्मकुंडलीतील प्रथम स्थानाला लग्नस्थान किंवा तनुस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, शारीरिक ठेवण, प्रकृती, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आयुष्यातले वेगवेगळे टप्पे, बौद्धिक क्षमता इत्यादींचा अभ्यास करता येतो. कुंडलीतील बारा स्थानांवरून वेगवेगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करता येत असला तरी प्रथम स्थानावरून एकूण आयुष्याचा अभ्यास करता येतो. आता प्रत्यक्षात याचा कसा उपयोग होऊ शकतो ते पाहू.
जेव्हा दोन व्यक्तींमध्ये टोकाचे मतभेद होतात तेव्हा त्या व्यक्ती विशिष्ट प्रसंगी अशा का वागल्या हे प्रथम स्थानावरून सांगता येऊ शकेल. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन कसा आहे हे समजल्यावर अशा प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळू शकतील. यामुळे अनेक गोष्टींची सांगड घालता येईल आणि गैरसमज दूर होण्यासाठी मदत मिळू शकेल.
लहानपणी घडलेल्या प्रसंगांचे परिणाम होऊन अनेकदा स्वभाव विचित्र बनतो. जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करते तेव्हा अशा प्रसंगांचा अभ्यास नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. स्वभावात कोरडेपणा असणे, एकलकोंडा स्वभाव, नैराश्य, दुष्ट वृत्ती किंवा गुन्हेगारी कडे वळणाऱ्या अनेक व्यक्तींनी लहानपणी वाईट आयुष्य भोगलेलं असतं. अशा कारणांचा शोध घेतला तर याबाबत काही मार्ग काढता येऊ शकेल.
लहान मुलांच्या कुंडलीवरून त्यांच्या एकूण क्षमतेचा अंदाज आला तर त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्या जाणार नाहीत. मुलांची क्षमता आणि त्यांच्या आवडीचं क्षेत्र कोणतं आहे याचा अंदाज घेऊन आणि विज्ञानाची मदत घेऊन (IQ test, समुपदेशन इ.) मुलांना योग्य पर्याय निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल.
विवाह जुळवताना प्रथम स्थान अतिशय महत्त्वाचं ठरतं. स्वभाव, दृष्टिकोन, क्षमता अशा अनेक गोष्टींवर वैवाहिक सौख्य अवलंबून असतं. अशा वेळी एक मार्गदर्शक म्हणून या शास्त्राचा वापर केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरेल.
वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता एखाद्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण्यासाठी मानसशास्त्रा सारखाच ज्योतिष शास्त्राचा वापर करता येऊ शकेल. एखाद्या रोग्याची असंतुलित मानसिक अवस्था नक्की कोणत्या कारणांनी झाली आहे याचा शोध घेण्यासाठी कुंडलीतील प्रथम स्थानाचा अभ्यास उपयोगी ठरू शकेल. तसंच शारीरिक रोगांचाही विचार या स्थानावरून करता येईल. यामुळे रोग निदान आणि उपचार दोन्ही बाबतीत मदत होऊ शकेल. लग्न स्थानाचा अंमल शिरावर असतो. शरीरातील मुख्य भाग म्हणजे मेंदू ज्या भागी असतो त्यावर या स्थानाचा अमल असल्याने एकूण स्वभाव, वर्तणूक, मानसिक स्थिती याचा अभ्यास या स्थानावरून करता येतो. म्हणूनच मेंदू संदर्भातील आजार किंवा मानसिक विकार यांचा अभ्यास करून उपचार चांगल्या प्रकारे होण्यासाठी या शास्त्राची मदत होऊ शकेल. ज्या व्यक्तींना सुप्त आजार / विकार आहेत त्यांनाही यामुळे निश्चित मदत मिळू शकेल.
अशा पद्धतीने जन्मकुंडलीवरून आपण स्वतःला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना समजून घेतल्यास अनेक अडचणी दूर होतील. आपल्या आयुष्यातील बरेचसे प्रसंग हे स्वभावामुळे दिलेल्या प्रतिक्रियांचं प्रतिबिंब असतं. म्हणून जर मूळ स्वभाव आणि व्यक्तिमत्व समजून घेता आलं तर काही वाईट घटना नक्कीच टाळता येतील.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
======================================================
First house in the Janm kundli is known as Ascendant. From the Ascendant one's nature, physique, health, view towards life, different stages in life, intellectual capacity etc. can be studied. Though complete study of a person's life can be done by using all twelve houses in the Janm kundli, the overall life can be studied by the Ascendant. Now let's see how it can be used practically.
When two persons have estranged relationships, then by studying the Ascendant it can be calculated that why they reacted in such a way at that particular point of life. By knowing the views of the persons such answers can definitely be found out. These answers can be linked to various behaviours and it can help in reducing some misunderstandings.
A bitter past some times makes people behave oddly in their life. When some of these people choose a wrong path in life, such study can be very helpful. People with weird behaviours like rigid / extreme nature, social / emotional isolation, depression, evil nature or criminal mind mostly have a bitter past. If such peoples' backgrounds are studied carefully, it can definitely help them to improve their lives.
If the parents come to know about the intellectual capacity of their children then they will not expect unreasonably from the children. Even the children can choose right career by knowing their capacity and liking along with the help of scientific tests like IQ test or career counselling. This will definitely reduce the stress on students' minds.
Marriage is an important step in anybody's life. Thus when two persons want to stay together as a couple the study of Ascendant is very important. The stability of married life depends on the couple's views, nature, capacity etc. So if this science is used as a guideline it can be definitely helpful.
In medical science, Astrology can be used just as Psychology to understand one's mental status. If a patient is mentally disturbed, then the patient's history can be studied using the first house in Janm kundli. This can help to find the reasons behind the disturbance. Some physical ailments can also be known by the study of the Ascendant. This can help in diagnosis as well as treatment. Ascendant is said to govern the head of human body. As it governs the part where the most vital organ the brain is located, a person's nature, behaviour and mental status can be studied. This can help in improving treatments of brain diseases or psychological disorders. People with dormant or undiagnosable disease or disorder can also get help from such study to come to any conclusion.
From Janm kundli if one understands his / her own nature as well as the nature of the loved ones it can help to remove many obstacles in life. Many incidences are actually a reflection of the reactions given due to one's nature. So understanding basic nature and personality can help to avoid some unnecessary problems in the relationships.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
=======================================================
No comments:
Post a Comment