Friday, 8 June 2018

जन्मकुंडली मधील बारा स्थानं (Twelve houses in Janm Kundli)

ज्योतिष शास्त्रामध्ये खगोल शास्त्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या पृथ्वीभोवती असणारे महत्त्वाचे ग्रह, सूर्य तसेच अवकाशातील धूमकेतू सारख्या अनेक खगोलीय गोष्टींचा मनुष्यावर कसा प्रभाव होतो हे या शास्त्रामुळे समजून घेता येतं. या शास्त्राला सिद्धांत (गणित), संहिता (खगोलीय घटना), होरा, अशा प्रमुख शाखा आहेत. त्यातील होरा शास्त्र म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळी असलेल्या ग्रहस्थितीवरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या घटनांचा अभ्यास करणं. ही शाखा मनुष्याच्या आयुष्याशी निगडित असल्याने जास्त प्रमाणावर ह्या शाखेचा अभ्यास केला जातो. पण इतर शाखांच्या अभ्यासाशिवाय या शाखेचा अभ्यास करणं शक्य नाही. कारण गणित व खगोलीय घटना यांचा अभ्यास केल्याशिवाय कोणतंही भाकीत मांडणं अशक्य आहे.  

वैदिक ज्योतिषात होरा शास्त्र अनेक शाखांमध्ये विभागलं गेलं आहे. यातील जातक शास्त्र म्हणजेच जन्मकुंडलीवरून भाकीत करण्याचं शास्त्र सध्या जास्त अभ्यासलं जातं. पण होरा शास्त्राच्या इतर शाखांमध्ये ताजिक (वर्षफल), मुहूर्त, स्वर शास्त्र, अंकज्योतिष, नाडी ज्योतिष, स्वप्न शास्त्र, शकुन शास्त्र, प्रश्न कुंडली अशी अनेक शास्त्रं आहेत. 

मनुष्याची जन्मकुंडली बनवताना जन्मवेळचे ग्रह कुंडलीत मांडले जातात. कुंडली ही बारा भागांत विभागली जाते. त्या प्रत्येक भागाला भाव/स्थान किंवा घर असं म्हटलं जातं. प्रत्येक स्थानावरून काही विशिष्ट गोष्टींची माहिती मिळते. या बारा स्थानांची माहिती मी पुढील लेखांत सविस्तर देणार आहे. एखाद्या व्यक्तीची कुंडली मांडताना केवळ एकाच पद्धतीने न मांडता (पाराशर शास्त्रानुसार) सोळा पद्धतींनी मांडली जाते. त्यांना वर्ग कुंडली असं म्हटलं जातं. षोडश वर्ग म्हणजेच सोळा वर्ग कुंडल्या वेगवेगळ्या भाकितासाठी बनवल्या जातात. हे सोळा वर्ग म्हणजे लग्न, होरा, द्रेष्काण, चतुर्थांश, सप्तमांश, नवमांश, दशांश, द्वादशांश, षोडशांश, विशांश, चतुर्विशांश, सप्तविशांश, त्रिशांश,षष्टांश, खवेदांश आणि अष्टवेदांश. षोडशवर्ग कुंडल्यांचे चार उपवर्ग आहेत जे वेगवेगळ्या भाकितासाठी वापरले जावेत असे पाराशर शास्त्रात नमूद केले आहे. त्यातील लग्न, होरा, द्रेष्काण, नवमांश, द्वादशांश आणि त्रिशांश या सहा म्हणजे षड्वर्ग कुंडल्या जास्त प्रचलित आहेत. बाकी तीन उपवर्ग म्हंणजेच सप्तवर्ग, दशवर्ग आणि षोडशवर्ग सध्याच्या काळात जास्त प्रचलित नाहीत. 

जन्मकुंडली वरून नक्की कशा प्रकारची माहिती मिळू शकते याचा अंदाज अनेकदा प्रश्नकर्त्याला नसतो. त्यामुळे केवळ आपल्या अडचणींशी निगडित प्रश्न ज्योतिषाला विचारले जातात. कुंडलीतील प्रत्येक स्थान आणि त्याचं महत्त्व समजून घेतलं तर अनेक बाजुंनी प्रश्न विचारता येऊ शकतील जेणेकरून आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करता येईल. केवळ अडचण असतानाच जन्मकुंडली पाहावी असंही नाही. एक मार्गदर्शक म्हणूनही या शास्त्राचा वापर करता येईल.     

जन्मकुंडलीतील बारा स्थानं आणि त्यावरून विचारता येऊ शकणारे प्रश्न याचा आढावा पुढील काही लेखांत मी देण्याचा प्रयत्न करणार आहे.   

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                   ========================================================

Astronomy plays a very important role in Astrology. Important planets surrounding the Earth, Sun and other celestial bodies affect human life in different ways. This effect can be studied by Astrology. Astrology is mainly divided in Siddhant  (mathematics), Samhita (celestial events) and  Hora. Hora shastra is a branch of Vedic Astrology which deals with the position of planets at the time of birth of a person (horoscope) and their effect on that person's life. As this branch deals with the human life it is more popularly studied. Though it should not be forgotten that without the other two branches it is not possible to predict any thing from a horoscope. Without mathematics and study of celestial events it is merely impossible to study the effects of planets on any person's life. 


In Vedic Astrology Hora shastra is divided in different branches. In these Jataka Shastra (Natal Astrology) i.e. prediction from Janm kundli is a popular branch. Some of the other branches include Tajik, Muhurta, Swar shastra, Ank jyotish, Nadi jyotish, Swapna shastra, Shakuna shastra, Prashna kundli and many others.

In Janm kundli the positions of planets at the time of birth are written by using specific method. The Janm kundli is divided in twelve parts. Each part is known as Bhav/sthan or ghar (house). Every house is attributed to a specific part of the person's life. I will explain these twelve houses in detail later on in my articles. The Janm kundli is not written in a single fashion, but in sixteen different ways (Parashara Shastra- composed by great sage Parashar). These are known as Varg kundlis. Shodasha varg i.e. sixteen varg kundlis are calculated for different purposes. These sixteen vargas are Lagna, Hora, Dreshkan, Chaturthansh, Saptamansh, Navamansh, Dashansh, Dvadashansh, Shodashansh, Vishansh, Chaturvishansh, Saptavishansh, Trishansh, Shashtansh, Khavedansh and Ashtvedansh. These sixteen varg kundlis are divided in four subgroups known as upavarg which are used for specific purposes. Out of these six varg kundlis i.e Shadvarg are more popular in today's Astrology. These are Lagna, Hora, Dreshkan, Navamansh, Dvadashansh and Trishansh. The remaining three subgroups i.e. Saptavarg (seven kundlis), Dashvarg (ten kundlis) and Shodashavarg (sixteen kundlis) are not practiced in today's Astrology.         
Well many times the querent is unaware of the depth of astrology. So mostly the querents ask the questions related to their problems. If they come to know about the meaning of the twelve houses and their importance, then they can ask questions from different angles. It will not only help during difficult times but astrology can be used as a general guidance in life. 

In my next articles I will try and explain the importance of the twelve houses in Janm kundli and how the information can be used to get different predictions from Janm kundli.   

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
       
   ======================================================

No comments:

Post a Comment