घरातील देवपूजा असो किंवा मोठे सणवार, मनातील भक्तीभाव खूप महत्त्वाचा असतो. कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी कसे करायचे हे त्यांचा उद्देश आणि मनातील भावनेवर ठरतात. आज अनेक विधी, सणवार कसे साजरे करायचे याबद्दल दुमत आढळतं कारण त्यांचा उद्देश पूर्णपणे माहित नसल्याने विधींमध्ये बदल घडवला गेला नाही. जर असे बदल घडवले तर त्या विधींचं फळ मिळणार नाही असा एक समज आहे. मूळ उद्देशाला धक्का न लावता जर विधी काळानुसार बदलले तर त्यात काही अडचण येण्याची शक्यता नाही. पण यासाठी लागणारी जागरूकता अजूनही आपल्या समाजात आली नाही हे सत्य नाकारता येणार नाही.
मी मागील लेखात लिहिल्याप्रमाणे कोणत्याही विधीचं मूळ समजून घेतलं तर तो विधी छोट्या किंवा मोठ्या प्रमाणावर योग्य पद्धतीने करून फळ नक्कीच मिळेल. उदाहरणार्थ मूर्तिपूजा घरात छोट्या प्रमाणावरही होते आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या पातळीवरही होते. मूर्ती हे गणपती ह्या दैवताकडून ऊर्जा मिळवण्याचं एक माध्यम मात्र आहे. तितक्याच भक्तीभावाने आपण मूर्ती समोर न ठेवता साधना केली तरी गणेशाकडून ऊर्जा मिळणारच आहे. मात्र त्यासाठी अध्यात्माच्या पुढील पातळीवर जाण्याची गरज आहे. कोणत्याही दैवताला विशिष्ट फूल का आणि कसं वाहायचं याची माहिती मिळाल्यास त्यामागील शास्त्रीय कारण समजून येईल. अशा अनेक छोट्या गोष्टींमागील कारणं समजून घेतल्यास त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरील विधींसाठी वा सणवारासाठी करता येईल. तसंच ह्या विधींचा उद्देश समजून घेता आला तर कालबाह्य पद्धती मोडून नवीन पद्धती स्वीकारता येतील. जे बदल आज आवश्यक वाटतात ते काही वर्षांनी लागू पडतील असं नाही. म्हणून कोणत्याही विधीचा अट्टहास न धरता उद्देश साध्य करण्यासाठी जे बदल गरजेचे आहेत ते निश्चितच आमलात आणले गेले पाहिजेत. येणाऱ्या पिढयांना या विधींमागील उद्देश समजावून सांगण्यासाठी ते आपल्यालाही समजून घेता यायला हवेत. त्यानंतर सुसंवाद साधून यातून मार्ग निश्चित काढता येईल.
काळानुरूप बदल म्हणजे नेमकं काय करायचं? तर आजच्या पिढीकडे कमी असलेला वेळ आणि मनुष्यबळ याचा विचार करून विधींमध्ये योग्य असे बदल घडवता येतील. मी मागील एका लेखात लिहिल्यानुसार अनेक विधींची सामुग्री आज उपलब्ध नाही. अशा वेळी त्याला पर्याय शोधला जायला हवा. अनेक शास्त्रोक्त ग्रंथांचं भाषांतर करताना आजच्या काळानुसार शब्द वापरले गेले तरच ते ग्रंथ नवीन पिढीला वाचावेसे वाटतील. कोणतीही अतिशयोक्ती न करता आणि अट्टहास न धरता विधी सांगितले जायला हवेत. अनेकदा नवीन पिढीतील वाचक अशी पुस्तकं वाचतात पण कठीण विधींना कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने ते विधी किंवा उपाय केलेच जात नाहीत. किंबहुना त्याबद्दलची माहिती नीट वाचली जात नाही. अध्यात्म, ज्योतिषशास्त्र किंवा वास्तूशास्त्र यांना न मानणे ही आधुनिकता समजली जाते. आपल्या संस्कृतीतील इतक्या शास्त्रोक्त गोष्टी जेव्हा परदेशात लोकप्रिय होतात तेव्हाच आपली नवीन पिढी तिकडे वळते. असं होऊ नये यासाठी नवीन पिढीला या शास्त्रांची तत्त्वं समजावून सांगून विचार करण्यास वेळ द्यावा. जेव्हा मनापासून ही शास्त्रं अवलंबिली जातील तेव्हाच त्यांचा खरा उद्देश साध्य होईल.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
======================================================
It may be daily worshiping or celebrating festivals, devotion is the most important factor. The protocols of divine rituals depend on the aim of the ritual and emotions of the worshipers. As many people are still not fully aware of the aim of the rituals, they hesitate to make any alterations in the protocols. This creates differences in the opinions. They think that the slightest alteration in the protocols of the rituals will not give results. Practically speaking if these alterations are made without affecting the aim of the ritual it should not create any problem. Sadly our society is not so open minded to accept these changes.
As I mentioned in my previous article if we understand the aim of the rituals they can be properly performed on smaller or bigger scales with maximum effect. For example idol worshiping is performed at domestic level as well as in festivals like Lord Ganesha festival. The idol is just a medium to receive energy and positive frequencies from the deity. If Lord Ganesha is worshiped with full devotion and and dedication the worshiper will definitely get the energy from him irrespective of the idolatry. What it needs is the higher level in spirituality. If we understand the reason behind the offerings like different flowers to different deities, we will come to know about the scientific base of this ritual. If all such small rituals are understood from the scientific point of view, they can be applied to bigger rituals or festivals. Also some old or obsolete rituals can be replaced with altered protocols. We should also note that the alterations applicable today may not be valid after some years. So rather than rigidly sticking to old protocols, the necessary alterations should be made and accepted with an open mind. If we want our new generation to understand the base of these rituals it is necessary that the earlier generation should know the principles behind our rituals. Then only with consonance the two generation can work on it with cohesion to find a golden mean.
The question still remains that how can we find a golden mean? As we can observe that today's generation has less time and manpower due to nuclear family system. Then the alteration in the rituals can be made accordingly. I also mentioned in one of my earlier articles that the contents recommended in original protocols of the rituals may not be available today. In such cases some substitutes should be found out. Many texts are translated using old terminology, which should be changed according to time. The rituals should be written in a new format without any exaggeration and obstinacy. Some times readers from new generation do read the texts but due to lack of plausible theories the rituals are not performed. Rather I should say that the information is not read to full extent. Following spirituality, astrology or vastushastra is considered as a sign of orthodox or conservative behaviour. When the theories from these sacred texts become popular in western countries then only our new generation starts appreciating them. Thus the new generation should be made aware of the principles and scientific approach of our traditions. We should also give them enough time to think upon it and accept the traditions by understanding them and not by force.The goal of these sacred texts will be achieved when our traditions and shastras will be accepted unfeignedly.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
=======================================================
No comments:
Post a Comment