बाधिक वास्तू म्हणल्यावर सामान्यतः मनात एक भीती असते. ऐकीव माहितीवरून बाधिक वास्तूंबद्दल अनेक समज - गैरसमज आहेत. एखादी वास्तू बाधिक आहे किंवा तिथे पारलौकिक शक्तींचा प्रभाव आहे असं म्हटलं जातं तेव्हा सगळ्यात आधी त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे. वास्तू बाधिक होणं म्हणजे त्या वास्तूला काही अतृप्त किंवा वाईट वृत्तीच्या योनींमधील आत्म्यांची बाधा होणं. प्रामुख्याने अनैसर्गिक वा अपमृत्यू झालेल्या व्यक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्ती आणि अभिचार कर्मं करणाऱ्या व्यक्तींना अशा योनी मृत्यूनंतर प्राप्त होतात. अर्थात अशा प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना त्रास देण्याची शक्ती असतेच असं नाही. कधी कधी अभिचार कर्मं करणारे तांत्रिक अशा आत्म्यांना वशीभूत करून घेतात. ज्या वास्तूत अशा आत्म्यांचा जीव अडकलेला असतो, प्रबळ भावना असतात उदा: राग, बदला घेणे इत्यादी किंवा माहितगार तंत्रिकांनी एखाद्या वास्तूच्या अकल्याणासाठी अशा आत्म्यांचा वापर केलेला असतो अशा वास्तू बाधिक असतात. ज्या जागांमध्ये हत्या/सार्वजनिक हत्या, अनेक व्यक्तींचा छळ, आत्महत्या अशा गोष्टी घडल्या आहेत त्या जागांवर बांधल्या गेलेल्या वास्तूंमध्ये पारलौकिक शक्तींचा प्रभाव जाणवतो. ज्या योनींमध्ये अशी शक्ती आहे अशाच योनीतील आत्मे त्रास देऊ शकतात. त्यामुळे ज्या वास्तूत पूर्वी वाईट प्रसंग घडले आहेत तिथे बाधा असेलच असं म्हणता येणार नाही. जगात आजवर अनेक व्यक्तींचे अपमृत्यु झाले आहेत. प्रत्येक अपमृत्यु झालेली व्यक्ती पिशाच्च किंवा तत्सम योनीत अडकून त्रास देत नाही.
जेव्हा एखादी वास्तू बाधिक आहे असं म्हटलं जातं तेव्हा कधीकधी ती प्रसिद्धी साठी केलेली जाहिरात असते किंवा त्या वास्तूमधील लोकांना येणारे विचित्र अनुभव हे त्यांच्यातील मानसिक रोग किंवा अंधश्रद्धेमुळे एखाद्या घटनेचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे निर्माण झालेले गैरसमज असतात. म्हणून याची शहानिशा करून घेताना एखाद्या वास्तूचा/जमिनीचा भूतकाळ कसा आहे हे पाहतानाच तेथे येणारे अनुभव हे इतर कोणत्या कारणाने येत नाहीत ना याची खात्री पटल्यावरच याबाबतीत मतं मांडता येऊ शकतील. अनेकदा वास्तूमधे राहताना आधी कोणतेही विचित्र अनुभव येत नाहीत किंबहुना कोणत्याही विचित्र अनुभवाचा संदर्भ पारलौकिक शक्तींशी लावला जात नाही. पण जेव्हा ती वास्तू बाधिक आहे असं सांगितलं जातं त्यानंतर अनेक गोष्टींचा संबंध पारलौकिक शक्तींशी लावला जातो. आपल्या मनात असलेल्या भीतीमुळे अशी मानसिकता तयार होते. याचा फायदा घेऊन काहीवेळा अंधश्रद्धांना खतपाणी घातलं जातं. म्हणून अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास आपले अनुभव खरंच पारलौकिक शक्तींमुळे येत आहेत की आपल्याकडून काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या नाहीत याचं नीट परीक्षण करूनच पुढील निर्णय घ्यावेत. याचं आणखी एक कारण म्हणजे काही अनुभव विज्ञानाच्या माध्यमातून समजून घेता येत नाहीत. जगातील कोणतंही विज्ञान निसर्ग, विश्व, मानवी शरीर, प्राणिमात्र यांचा संपूर्ण अभ्यास करू शकलेलं नाही. काही अज्ञात असलेल्या गोष्टींचा भविष्यात नवीन शोध लागल्यावर अर्थ लावता येऊही शकेल. पण सध्याचं विज्ञान याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही म्हणून त्याचा सरळसरळ पारलौकिक गोष्टींशी संबंध लावणं गैर आहे. अभिचार कर्मांमुळे वास्तूमध्ये जो त्रास होतो त्याचीही विज्ञानाशी सांगड घालता येत नाही. पण या सगळ्याचा अर्थ लावताना कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये.
वास्तू खरंच बाधिक असेल तर ती कशी ओळखायची? तर वास्तूमध्ये मनःशांती कधीच मिळत नाही, उत्कर्ष होत नाही. तसंच घरातील लहान मुलं अनेक विचित्र अनुभव सांगतात किंवा विचित्र वागतात. घरातील व्यक्तींमध्ये आळस अकारण वाढतो, रोग होतात ज्याचं निदान होत नाही. घरातील लोकांना विचित्र स्वप्नं पडतात, विचित्र आवाज येतात व भास होतात, घरातली विजेची उपकरणं अचानक चालू किंवा बंद होतात. अशी लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा वास्तू बाधिक असू शकते. अभिचार कर्मांमुळे बाधिक झालेल्या वास्तूमध्ये अभिचार कर्मानुसार अनुभव येतात. अशा घरातील व्यक्ती कधी अचानक मृत्यू पावतात, वंश क्षय होतो किंवा काही व्यक्ती अतिमानवी शक्ती असल्यासारख्या वागतात. या सगळ्या लक्षणांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की यातील काही लक्षणं मानसिक रोगांची आहेत तर काही वेळा आपल्याच चुकीमुळे घरातील उपकरणं बिघडलेली असतात. काही रोग सवयींमुळे होतात तर काही निकृष्ट अन्नामुळे होतात. या सर्व गोष्टींची शहानिशा झाल्यावर जेव्हा कोणत्याही प्रकारे अशा अनुभवांचं उत्तर मिळत नाही तेव्हा वास्तू बाधिक आहे असं म्हणता येईल. याबद्दलचं पूर्ण ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडूनच याची खात्री करून घ्यावी. मात्र खात्री करताना एक गोष्ट ध्यानात असावी की पारलौकिक शक्तींचा अनुभव कोणत्याही वैज्ञानिक कसोटीवरून तपासता येत नाही. त्या वास्तूमध्ये सतत आलेले अनुभव आणि सर्व शक्यता पडताळून पाहून मगच याचा सारांश निघू शकतो.
वास्तू बाधिक आहे हे सिद्ध झालं तर त्यावर उपाय नक्कीच आहेत जे सावधतेने अवलंबावेत. वैदिक आणि तांत्रिक शाखांमध्ये यावर अनेक उपाय दिलेले आहेत, ज्यांचा उल्लेख वास्तुशास्त्रातही होतो. कोणत्या प्रकारची बाधा आहे त्यानुसार होम, मंत्र पठण, पूजा, तांत्रिक उपाय अशा अनेक मार्गांनी यातून सुटका होऊ शकते. कधी कधी अशी बाधा फारशी शक्ती नसलेल्या काही योनींमुळे होते. अशा वेळी घरात नित्यनियमित देवपूजन, शुद्ध विचार आणि आचार यामुळेही अशी बाधा सहज दूर होते. अभिचार कर्मं तांत्रिक शाखेत येत असल्याने यामुळे झालेल्या बाधांचे उपाय तांत्रिक असतात आणि ते योग्य व्यक्तींनाच ठाऊक असतात. जर अशी कोणतीही बाधा असेल तर कुठल्याही जाहिरातीला बळी न पडता योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. पारलौकिक शक्तींमध्ये काही अशा शक्ती आहेत ज्यांच्या बाधेवर उतारा होत नाही. उदाहरणार्थ ब्राह्मसमंध ही अशी एक योनी आहे ज्याच्या बाधेवर फारसे उतारे उपलब्ध नाहीत. अशा वेळी मात्र ती वास्तू सोडून दुसऱ्या वास्तूत वास्तव्य करणं हेच योग्य ठरतं. .
आजच्या पिढीला बाधिक वास्तू असणं हे थोतांड वाटतं कारण पारलौकिक शक्तींचे अनुभव वैज्ञानिक कसोटीतून सिद्ध करणं कठीण जातं. दुसरं कारण म्हणजे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेक वास्तू 'बाधिक' आहेत आणि त्यावर केवळ धार्मिक उपाय करून उतारा केला गेला असं अनेक ठिकाणी वाचनात येतं. पारलौकिक शक्तींबद्दल अतिशयोक्तीपूर्ण लिखाण, वाहिन्यांवरील कार्यक्रम किंवा चित्रपटांमधील अतिरंजित चित्रण यामुळे याबद्दलची शास्त्रोक्त माहिती मिळत नाही. म्हणूनच कोणताही अतिरेक न करता व अंधश्रद्धेच्या आहारी न जाता बाधिक वास्तूंची माहिती दिल्यास ती नवीन पिढीला नक्कीच पटेल. तसंच योग्य मार्गांचा अवलंब करून आपल्या वास्तूची पवित्रता राखता येईल.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
=====================================================
The term haunted or possessed location usually creates a fear in our minds. Generally this kind of information is derived according to hearsay. So whenever any location is supposed to be haunted then it must be verified. A location is haunted means it is infested by unsatisfied spirits or souls from evil yoni (realms), commonly known as ghosts. Mostly people who die untimely or unnaturally, who have extremely strong willpower and people doing abhichara karma enter into these troublesome yonis after death. Of course not all such people gain the powers to trouble living beings after death. Some times Tantriks doing fearsome sadhanas enchant weak spirits and exploit them to trouble others. Mostly the locations get haunted by following reasons. (a) When souls of the people who were residing in the location are still emotionally entangled (b) When people residing in the location have very strong feelings of rage/revenge and die suddenly with unfulfilled desires and (c) When some Tantriks exploit the souls to harm the location. The structures constructed on locations where foul or evil incidences like mass killings, tortures, murders or suicides have occurred are usually prone to paranormal activities. Only the souls from powerful yonis can harm the livings beings. So every location with such gory history can not be labelled as haunted or possessed. Many people in the world have met their untimely ends, but all such souls do not have powers to infest a location.
Some times when locations are said to be haunted it is merely a publicity stunt. In some cases the weird experiences in the locations are the result of unusual behaviour of a person due to psychological disorders (psychotic episodes) which is interpreted from a superstitious point of view. Thus to confirm whether a location is really haunted, the history of the location is as important as to check whether the weird experiences are not caused due to any other reason. Some times people do not experience any weird incidences in the beginning, in fact I should say they don't relate the weird incidences with paranormal activities. But when they come to know that the place is haunted then they start relating every incidence with paranormal activities. The fear created by the hearsay can develop such kind of views and ultimately superstitions. So if any information regarding paranormal activities is given it should be verified whether the suspicious experiences are really due to infestation of souls/spirits or it is wrong interpretation due to negligence. One more reason is some weird experiences can not be understood using scientific criteria. The modern science has not discovered nature, space, human body or animals to full extent. New discoveries in future may provide scientific explanation for the things which are unknown today. But relating any such experience to paranormal activities due to lack of information is not advisable. The experiences caused in some locations due to Abhichar Karmas also can not be understood by scientific criteria. While interpreting any such experience, superstitions should be avoided.
How to confirm whether a location is haunted? Well, in such location the residents are derived of mental peace and prosperity. Also small children in the house behave oddly or get some weird experiences. The elders feel lethargic without any significant reason or fall ill where proper diagnose is not obtained. The people get nightmares, hear weird sounds, get illusions or electric appliances suddenly start or stop working. These or similar symptoms may tell that the place is haunted. The places infested due to abhichar karmas may show the symptoms according to the ritual performed. Some of the symptoms are sudden death of a family member, stillbirths or some times a person in the family behaves like a superhuman with odd powers. If we consider all the above symptoms it is very necessary to keep in mind while interpreting that many of the symptoms are of psychological disorders. Or sometimes due to manual mishandling the electrical appliances do not work properly. Similarly some health issues occur due to addictions, bad eating habits or non nutritional food. When all these possibilities are considered and still there is no answer for any bad incidences then it can be confirmed that the place is haunted. For confirmation advise should be taken from a knowledgeable authority. It should also be noted that these symptoms of paranormal activities can not be defined by scientific criteria. The recurrent experiences and consideration of all other possibilities will only help to come to any conclusion.
If it is confirmed that a location is haunted then there are certain remedies which can be followed with caution. Vedic and Tantric both sects provide some remedies which are also mentioned in Vastushastra. Depending on the type of infestation the remedies like homa, mantra, poojan or Tantric remedies can be followed. In some cases certain souls/spirits which are less powerful infest a location. In such cases daily worshiping of God, good behaviour and calm mind can help to get rid of them. Abhichar karmas come under Tantra tradition, so the well trained authority from Tantra tradition only knows the remedies on infestations caused by abhichar karmas. If any such infestation is confirmed then advise should be taken from an authority and falling prey to any advertisement should be avoided. There are some kind of yonis or spirits which are so powerful that no remedy can help to get rid of them e.g. Brahmasamandh. In such cases leaving that place is advisable.
Today's generation thinks that infestation of a place or haunted location is a hoax. The reason behind this is paranormal activities can not be proved on the basis of modern science. Secondly all over the world it is advertised that many places are haunted and the infestation was cleared with the help of religious remedies. This kind of advertisement sounds unthinkable. Exaggerated writings and television shows on paranormal activities or overstated presentations in films create misunderstandings rather than giving proper information on paranormal activities. If the factual information is provided without any superstitious view, the new generation will definitely understand and accept it. Also if proper remedies are followed in any place or house it's sacredness can be maintained.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
=======================================================
No comments:
Post a Comment