Wednesday, 9 May 2018

परंपरा आणि आधुनिकता - एक सुवर्णमध्य (४) {Cultural Traditions and Modernization - A Golden Mean (4)}

वास्तूशास्त्र आणि त्यासंबंधित काही मुख्य विधींबद्दल मी आधीच्या लेखांत माहिती दिली. घरामधे नियमित होणारी देवपूजा, व्रत वैकल्य, सणवार ह्याबद्दलही अनेक मतभेद आहेत. ह्या सर्व विधींमागील उद्देश आणि तत्त्वं समजून घेतली तर गरजेनुसार यांत बदल करून कोणतेही विधी व्यवस्थित पार पाडता येतील. 

घरात देव्हारा कसा असावा, देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा कशा ठेवाव्यात याची संपूर्ण माहिती शास्त्रीय ग्रंथांत मिळते. मुख्य प्रश्न असतो तो उद्देशाचा. मूर्तिपूजा हा तांत्रिक शाखेतील भाग असल्याने वैयक्तिक पातळीवर याचा उपयोग जास्त फलदायी ठरतो. वैदिक काळात देवतेलाकोणतंही मूर्त स्वरूप न देता आराधना केली जात असे. तंत्र शाखेत देवतांच्या गुणांनुसार त्यांना मूर्त रूप दिलं गेलं. देवतेची मूर्ती समोर ठेवण्याचं प्रमुख कारण म्हणजे मनाची एकाग्रता साधणे. प्रत्येक व्यक्तीला मन एकाग्र करून ध्यान धारणा करणं शक्य नाही. जर देवतेच्या इष्ट रूपातील मूर्ती समोर असेल तर मन त्या शक्तीवर एकाग्र करून आराधना करणं सोपं जातं. अध्यात्मात मूर्तीवर लक्ष एकाग्र करणे ही साधकाची पहिली पायरी आहे. त्यानंतर अध्यात्मात प्रगती साधून कोणत्याही मूर्ती शिवाय मानसिक उपासना करता येते. आपल्या संस्कृतीत मूर्तिपूजा अजिबात बंधनकारक नाही तर ती उपासनेची सुरुवातीची पातळी आहे. म्हणूनच मूर्तिपूजेचं कोणतंही अवडंबर न करता मनापासून इष्ट देवतेची उपासना केली तरी फळ मिळतंच. यासाठी आपल्या इष्ट देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवताना आपली उपासना कोणत्या प्रकारची आहे याचा विचार करून निर्णय घ्यावा. 

जर चराचरात देव आहे तर देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणं गरजेचं आहे का? असाही एक प्रश्न नेहमी येतो. संपूर्ण पृथ्वीवर पाणी आहे पण कोणत्याही ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य नसतं. त्यासाठी पाणी शुद्ध करणं गरजेचं असतं. तसंच चराचरात देव असला तरी त्याची ऊर्जा ही विशिष्ट रूपातच मिळते. म्हणून देवतेची मूर्ती समोर असल्यास अध्यात्माच्या सुरुवातीच्या पातळीवर फळ मिळतं. मूर्तिपूजा हा ईश्वराच्या उपासनेचा केवळ एक भाग आहे. "न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये, भावे हि विद्यते देवस्तस्माद्भावो हि कारणम् - या उक्तीनुसार देव हा लाकडात किंवा मातीमधे नसतो, तर भक्ती भावात असतो.  

घरातील नियमित देवपूजा हा सुद्धा उपासनेचाच एक भाग. आपण रोज स्नान करून कामाला सुरुवात करतो तसंच कोणत्याही देवतेच्या मूर्तीलाही स्वच्छ ठेवून प्रसन्न मनानं पूजा करावी. देवतेचा योग्य मान राखला जावा म्हणून देवपूजा करताना देवाच्या मूर्तीला पाण्याने स्वच्छ करणं, सर्व सोपस्कार करून वंदन करणं असे काही विधी आहेत. प्रत्येक देवतेसाठी असलेली वेगळी फुलं ही फुलांच्या रंग आणि रासायनिक गुणांवर आधारीत आहेत, जेणेकरून साधकालादेवतेची मूर्तीमधील तरंगरूपी ऊर्जा (पवित्रक) ग्रहण करता येईल. उदाहरणार्थ गणपतीला  जास्वंदीचं लाल फुल वाहिलं जातं. तेव्हा त्याचं देठ गणपतीकडे करून मग ते फूल त्याच्या चरणावर वाहावं. लाल रंगात आकर्षिली जाणारी ऊर्जा गणपतीच्या मूर्तीकडून साधकाकडे येते. गणपती ह्या देवतेची ऊर्जा इतर रंगांच्या फुलांपेक्षा लाल रंगाच्या फुलांमध्ये जास्त आकर्षिली जाते यासाठी गणपतीला लाल फूल आवडतं असा एक समाज निर्माण केला गेला आहे. अशा प्रकारे देवपूजनातील काही गोष्टींची तत्त्वं समजून घेतली तर त्या गोष्टी शास्त्रोक्त आहेत हे पटेल. 

घरात नियमित देव पूजन झालं तर देवतेची ऊर्जा घरात पसरते आणि वातावरण पवित्र राहतं. काही कारणामुळे नित्य नियमित विधिवत पूजन शक्य नसेल तर देवतेची मानसिक आराधना केली तरीही त्याची फळं मिळतात. त्याखेरीज आपलं चांगलं वर्तन, आपण करत असलेल्या कामाबद्दल निष्ठा आणि गरजू व्यक्तींना केलेली मदत ही सुद्धा ईश्वरसेवाच आहे. त्यामुळे नियमित देवपूजा व संध्याकाळची दिवेलागणी वेळेअभावी शक्य नसल्यास त्यामुळे काही अशुभ घडेल असं अजिबात नाही. पण घरात देव देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा असतील तर त्यांची स्वच्छता राखावी. त्यावर धूळ किंवा घाण बसणार नाही याची काळजी घ्यावी. 

स्त्रियांनी मासिक धर्माच्या वेळी देवाची कोणतीही उपासना करू नये किंवा देवळात जाऊ नये असाही एक समज आहे. यामागे स्त्रियांना शारीरिक विश्रांती देणे आणि मासिक धर्माच्या वेळी कोणत्याही देवतेच्या ऊर्जेमुळे शारीरिक त्रास होऊ नये एवढाच शास्त्रीय भाग आहे. मातृत्वासाठी जी गोष्ट निसर्गानेच स्त्रीला दिली आहे त्यामुळे स्त्री अशुद्ध होते असा अतिरेक करणं हे निव्वळ अवडंबर आहे. स्त्रीने या काळात पूजा केल्यास कोणतीही अनिष्ट गोष्ट घडणार नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती व स्त्रियांवर घरातील कामांच्या खूप जबाबदाऱ्या होत्या. म्हणून मासिक धर्म असताना त्यांना शारीरिक श्रम पडू नयेत यासाठी विश्रांती दिली जात असे. तेव्हा घरातील इतर स्त्रिया कामाची जबाबदारी घेत असत. आताच्या काळात अशा गोष्टी करणं शक्य नाही. मासिक धर्म ही अशुद्धता नाही तर शरीरातील नको असलेल्या गोष्टींचा विसर्ग करण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून याचा कोणताही विपरीत अर्थ न घेता त्या काळात शारीरिक श्रमांवर मर्यादा आणल्यास स्त्रीला तिच्या प्रकृतीनुसार विश्रांती मिळू शकेल. मात्र याचा देवपूजनाशी संबंध जोडू नये. उलट या काळात स्त्रीला कोणत्याही कामात घरातील व्यक्तींनी मदत केल्यास ते जास्त योग्य ठरेल.          

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                         =====================================================

In my previous article I tried to explain the importance of Vastushastra and its applications. There are also some differences of opinions in daily rituals, worshiping of Gods and rituals in festivals. If we understand the principles behind these rituals, then it will be possible to make some alterations and perform the rituals.

Some authentic texts give information about how to keep a pooja ghar (chapel) at home and keep idols/photos of the deities in the pooja ghar. The most important thing to be understood is the aim of idolatry. Idolatry comes under the Tantra sect so it is more fruitful at individual level. In Vedic tradition there was no personification of any deity for worshiping. Tantra tradition emphasized on the personification of Gods. The main reason behind keeping an idol in front of the worshiper is to gain the concentration. Every worshiper can not concentrate the mind for worshiping or meditation. If an idol of the desired deity is put in front of the worshiper it becomes easy to get rid of other thoughts and concentrate on worshiping. In spirituality idolatry is just the first step to begin the meditation. In later stages it is possible to meditate without any medium like idol or photo of the deity. In Hinduism idolatry is not at all compulsory in fact it is the beginning. Thus rather than ostentation in idolatry, the deity should be worshiped with dedication and concentration to get desired results. If a pooja ghar or idols are to be kept at home then one should be clear about the concept of worshiping.  

If God is everywhere then why any idol or photo of God is required? Lets try and understand this. Earth is full of water. But we can not drink water from any water source like sea or pond. We need to purify the water and then we can consume it. Similarly, God is present everywhere but we need some medium to receive the energy in specific form. So an idol is recommended in the initial stages of meditation to receive the energy. Idolatry is just a part of worshiping. According to a text "God is not present in wood or stone, but he is there in the devotee's mind. After all it is the devotion which matters.

The daily worshiping of God is also a part of this devotion. We start our day by taking bath and getting cleaned. Similarly if idols are kept in the pooja ghar we should keep them clean. The rituals like cleaning the idols with fresh water, poojan and taking the blessings are recommended so the worshipers will not only give respect to this form of God but the cleansing of the idols and the surroundings will keep the mind pure. The type of flowers to be offered to the deity also depend on the flower's colour and chemical nature, which helps to transfer the frequencies (pavitrak) from the deity to the worshiper. For example red Hibiscus flower is offered to Lord Ganesha. The frequencies from the idol of Lord Ganesha are absorbed by red flower with maximum effect. This effect is not achieved by other coloured flower. The Hibiscus flower has to be offered with it's stem facing the idol which absorbs the frequencies and emits it from the front part which are received by the worshiper. Thus it is mentioned in the texts that Lord Ganesha likes red flowers. If such aspects of rituals are studied then it will be easy to understand that these rituals are based on natural principles. 

The daily worshiping of Gods emits positive frequencies and maintains the purity of the environment. If physical worshiping is not possible on daily basis, mental worshiping will also give positive results. Along with this our good behaviour, devotion towards work and helping the needy people is also a form of God worshiping. So if daily worshiping is not possible it will not create any ill effect per se. If idols of Gods are kept at home then it is advisable to keep them clean and tidy.           

Females are forbidden to worship God or get involved in any rituals during menstruation. The actual reason behind this forced isolation is to give women physical rest and avoid any effect like heat due to energies from worshiping. To consider menstruation which is a blessing given for motherhood as impurity is mere ostentation. Doing any divine rituals during menstruation will not create any ill effects. The origin of this forced isolation lies in the era where joint family system existed. Females had a lot of responsibilities at home. So during menstruation they were isolated to take rest and avoid physical stress. Other females from the family used to take the responsibilities on their shoulders. This is not possible in today's system of nuclear families. Menstruation is not an 'impurity' but it is a biological process to excrete unwanted material. So rather than misinterpreting it as 'impurity' women should take rest by understanding the natural reason behind it. It should not be related to any divine ritual. Rather it will be logical that in this period the family members share the work and let the females take rest. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                 ======================================================

No comments:

Post a Comment