जन्मकुंडलीतील आठव्या स्थानाला मृत्यूस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून एकूण आयुर्मान किती असेल, मृत्यू कसा असेल, आजारपण यांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. तसेच या स्थानावरून एखाद्या व्यक्तीला गूढशास्त्रातील ज्ञान किती असेल याचाही अंदाज येतो. आता प्रत्यक्षात याचा कसा उपयोग होतो ते पाहू.
आपलं आयुष्य किती असेल याबद्दल अनेकांना कुतूहल असतं. अष्टम स्थानावरून मृत्यू कोणत्या दिवशी येईल असं भाकीतही काही जण करतात. पण केवळ गरज असेल तरच अशा गोष्टीसाठी ज्योतिषाकडे विचारणा केल्यास ते योग्य ठरेल. वृद्ध व्यक्ती, अति महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती, ज्यांच्या मृत्यूनंतर परिवारात काही मतभेद (उदा: संपत्ती) होणार असतील अशा व्यक्तींनीच मृत्यूबद्दल माहिती करून घेतल्यास ते शास्त्राला धरून होईल असं माझं मत आहे. केवळ कुतूहल म्हणून लहान वयाच्या व्यक्तींनी असे प्रश्न न विचारल्यास उत्तम.
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याचा शेवट म्हणजे महामृत्यू. महामृत्यू हा अटळ असून तो विधिलिखिताप्रमाणेच घडतो. महामृत्यू हा कोणत्याही वयात येऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती दीर्घायुषी नसते. पण महामृत्यू आधी काही जीवावर बेतणारे प्रसंग आल्यास मृत्यूचा धोका संभवतो. ज्याला अपमृत्यू असं म्हणतात. अपमृत्यू हा स्वतःची काळजी घेऊन किंवा देवतेच्या आराधनेमुळे टाळता येऊ शकतो. याची पूर्वसूचना भाकीत करताना ज्योतिषाने द्यावी.
या स्थानावरून मृत्यू कसा येईल याचा अभ्यास करता येतो. म्हणजेच नैसर्गिक मृत्यू, आजारपणाने आलेला मृत्यू, अपघाती मृत्यू, आत्महत्या, हत्या यातील कोणत्या प्रकाराने आयुष्याचा शेवट होऊ शकतो याचा अभ्यास केला जातो. तसेच मृत्यू कधी येईल याचाही सखोल अभ्यास या स्थानावरून केला जातो. लहान वयात येणारा मृत्यू जर महामृत्यू असेल तर यावर काही उपाय करता येत नाही. मात्र अपमृत्यू टाळण्यासाठी या स्थानाचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो.
मृत्यू कधी आणि कसा येईल याचा अभ्यास केल्यास त्याचा मुख्य उपयोग होतो तो संपत्तीचं वाटप, कायदेशीर कागदपत्रं इत्यादी गोष्टींमध्ये. अनेक व्यक्ती आपला आयुष्ययोग कमी कसा असेल अशा विचाराने मृत्युपत्र करून ठेवत नाहीत. अशा व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूमुळे नंतर अनेक वाद होतात. कधी कधी संशयास्पद मृत्यू मुळेही अनेक गोष्टींचा निर्णय घेता येत नाही. मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर कायदेशीर वाद झालेले आपण बऱ्याचदा पाहतो. म्हणूनच ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन मृत्यूबद्दल मनात भीती न बाळगता आपलं आयुर्मान किती आहे याची माहिती योग्य वेळी करून घेतल्यास अनेक वाद टाळता येतील. तसेच एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला तर तो मृत्यू कसा व कोणामुळे झाला याची शहानिशा करण्यासाठीही या स्थानाचा उपयोग होतो. काही देशांमध्ये असा तपास करण्यासाठी ज्योतिषी किंवा अंतर्ज्ञान असलेल्या व्यक्तींना बोलावतात. अशा लोकांना psychic म्हणतात व पोलीस, गुप्तहेर अशा लोकांची मदत घेतात.
अष्टम स्थान हे गूढ विद्येचं स्थानही आहे. त्यामुळे गूढ शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठी हे स्थान खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीला अशा शास्त्राची आवड असेलही पण त्यात प्राविण्य मिळेल का याचा विचार या स्थानावरून होतो. गूढ विद्या वाईट मार्गांसाठीच वापरली जाते असं नाही. काही चांगल्या गोष्टींसाठीही तंत्रशास्त्रात या विद्येचा वापर केला जातो. पण ज्या व्यक्तीला अशा शास्त्रांची आवड असते अशा व्यक्तीच्या कुंडलीतील अष्टम स्थान व त्यासंबंधित ग्रह बलवान असले तरच यात प्राविण्य मिळू शकेल.
या स्थानाचा अंमल गुह्यभागावर असतो. त्यामुळे यासंबंधित काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर या स्थानाच्या अभ्यासामुळे त्यांचे निदान व उपचार यासाठी साहाय्य मिळू शकेल.
एकूणच हे स्थान पापस्थान मानलं जातं. पण मृत्यू अटळ आहे. त्यामुळे मृत्यूबद्दल कोणतीही भीती न बाळगता या स्थानावरून योग्य माहिती घेतल्यास अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळता येतील.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
========================================================
In the Janm kundli the eighth house is also known as Mrutyusthana or house of death. This house describes about the longevity, illnesses (fatal) and how the person will die. This house also tells about the knowledge in occult science. Now lets see how practically this can be applied.
Every person is curious about the life span. Some astrologers predict the exact date and time of the death of a person. But I personally feel that such a sensitive question should be asked only if required. Old aged people, VIPs or the people who's death may cause some issues in the family (e.g. financial matters) should ask such questions and which is right. I feel that young people should not ask these questions just out of curiosity.
The death of any living person is known as Mahamrutyu. Mahamrutyu is certain and it comes according to the destiny. It can come at any stage of life because every person is not long lived. Before this certain death there can be some incidences in life which may be fatal. If in such incidences the death occurs it is called as Apamrutyu or untimely death. Apamrutyu can be avoided by taking proper precautions or worshiping God the almighty. Astrologers should give the information regarding such possible fatal incidences to the querents.
This house can also tell about the cause of death. It means whether the death will occur by natural cause or illness or accident or murder or suicide or any other reason can be studied by using this house. This house can also tell about the time of death or exact life span of the person. Mahamrutyu, even if destined at a young age can not be avoided. But to avoid Apamrutyu the study of the eighth house is very important.
The main application of the study of longevity is the distribution of the property, legal matters etc. Many people think that how I will die early? and just neglect the legal paperwork like the authentic will. An unexpected death of people in such cases causes lots of troubles later on. Some times legal matters keep pending due to the death of a person in suspicious conditions. Many times we see such cases where the deaths of people at higher posts or businessmen create prolonged issues. That is why rather than getting feared one should know about one's longevity which can help to solve the issues. In the cases of suspicious deaths this house can help to find the cause of death as well as the person responsible for it (if applicable). In some countries such investigation is carried out with the help of skilled astrologers and people with intuition power. Such people are known as psychics and police department or detectives take help from these psychics.
The eighth house is also a house of occult sciences. Thus this is a very important house for people who study occult sciences. Some people may have interest in occult sciences but if they will get skilled in these sciences or not can be studied by this house. Occult sciences are not used only for evil purposes. In Tantra shastra there are many procedures where a good purpose is achieved. Any way if a person has a strong eighth house or strong planets related to the house then only that person can achieve a skill in occult sciences.
Thus in general this house is considered as a Paapsthana or evil house. But death is inevitable. So rather than fearing for death we should consider this house as a normal house and get proper guidance to avoid major problems.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
=================================================
No comments:
Post a Comment