Monday, 15 October 2018

नवमस्थान (भाग्यस्थान) The ninth house (House of fortune)



जन्मकुंडलीतील नवव्या स्थानाला भाग्य स्थान असंही म्हणतात. या स्थानावरून त्या व्यक्तीचा भाग्योदय, लोकोपयोगी कामे, धर्मावरील विश्वास आणि त्यासाठी केलेली उपयुक्त कार्ये, धर्मस्थान वा देवस्थानासाठीचे प्रवास अशा काही गोष्टींचा अभ्यास केला जातो. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते पाहू. 

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात. पण एका विशिष्ट वयात एखाद्या व्यक्तीचं भाग्य उदयाला येतं. हा योग म्हणजेच भाग्योदय. भाग्योदय म्हणजे माझ्या मते बालपणानंतर स्वकष्टाने किंवा क्वचित नशिबाने आयुष्याच्या पुढील पर्वात मिळवलेलं सौख्य. यात मी बालपणात मिळालेलं सौख्य हे भाग्योदयात गणलं नाही. कारण हे आधीच्या पिढीमुळे मिळालेलं सौख्य असतं. याचा वैयक्तिक भाग्याशी संबंध मी जोडला नाही. असो, हा भाग्योदय अर्थार्जन, यश, मनोकामना पूर्णत्वाला जाणे, प्रसिद्धी, उत्तम स्थळ मिळून विवाह होणे, स्वतःचे घर / वाहन अशा अनेक प्रकारे मांडला जाऊ शकतो. भाग्योदयाची व्याख्या त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे भाग्य केव्हा उदयाला येईल असा प्रश्न विचारताना सरसकट एकच कसोटी न लावता आपल्या परिस्थितीचा आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे याचा विचार करून हा प्रश्न विचारावा. भाग्योदय ही केवळ सुरुवात असते. यानंतर आयुष्यात अडचणी येणारच नाहीत असा काहींचा गैरसमज असतो. मात्र आपल्या कष्टाने आपल्या इच्छा पूर्ण करताना अडचणी तर येणारच. परंतु भाग्य उदयाला आल्यानंतरच त्या पूर्णत्वाला जातात. भाग्योदय म्हणजे सर्व अडचणी दूर झाल्या असे नाही. 

नवम स्थानावरून तीर्थ यात्रा, धर्मस्थळांचे दर्शन, धर्मकार्ये अशाही गोष्टींचा अभ्यास केला जातो. काही व्यक्तींचे असे प्रवास किंवा तीर्थ यात्रा बऱ्याचदा लांबतात किंवा रद्द होतात. विशेषतः धर्मस्थळ दूर असेल तर अशा अडचणी अनेकदा येतात. अशा वेळी नवम स्थानावरून याचा अंदाज घेता येईल की तीर्थयात्रा केव्हा संपन्न होईल.  

या स्थानाचा अंमल हा मांडीवर असतो. यासंबंधी काही तक्रारी विशेषतः लठ्ठपणा / वातामुळे मांडीचे स्नायू दुखणे वा आखडणे यात नवम स्थानाच्या अभ्यासावरून वैद्यकीय उपायांबरोबरच आणखी काही उपाय करता येतील. ज्या मैदानी खेळात मांडीचे स्नायू बळकट असणं आवश्यक आहे अशा खेळाडूंच्या कुंडलीत नवम स्थान महत्त्वाचं ठरेल. तसंच लहान मुलांच्या चालण्यात दोष असेल व निदान होत नसेल तर आरोग्य स्थानाबरोबर नवम स्थानाचाही अभ्यास केल्यास निदान करण्यास मदत होईल.  

अशा प्रकारे नवमस्थानावरून आपल्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या योगांची माहिती मिळते. याचा उपयोग करून आपण आपले आयुष्य चांगले कसे घालवता येईल यासाठी प्रयत्न करू शकतो.   

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती, किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

   =====================================================

The ninth house in Janm kundli is also known as Bhagya sthana (house of Fortune). This house can describe about the fortune or prosperity, social work, belief in religion and religious deeds, pilgrimage to holy places etc. Now lets see how practically this can be applied.

In any person's life usual ups and downs are obvious. At some stage of life every person starts getting results of his own 'fortune'. This beginning of fortune is known as Bhagyodaya. According to me the Bhagyodaya is the prosperity or happiness achieved or in rare cases getting by luck, after childhood. I particularly said 'after childhood' because in childhood everything is provided by parents and nothing is achieved per se. Any way a Bhagyodaya can be presented in many ways like earning, success, achieving a goal, getting a good life partner, getting own house or a vehicle, getting fame etc.  The definition of Bhagyodaya depends on the background of the person. So while asking a question regarding fortune, one should think about the goal to be achieved and the circumstances around. Bhagyodaya is just the beginning of fortune. But that doesn't mean that all the problems are solved. While achieving the goals some ups and downs or obstacles can occur. Bhagyodaya just begins the fortune and helps us in completing our goals.    

The ninth house also describes about the travel to holy places, religious deeds and belief in religion and social welfare. In Hinduism the pilgrimage to holy places is considered to be very auspicious. Sometimes such travels are delayed or cancelled due to many reasons. Especially when the holy place is far away then travelling becomes a problem for elders. In such cases it can be calculated that when the pilgrimage is possible.

This house governs the thigh portion of our body. Any ailments regarding this portion especially pain in thigh muscles due to obesity or vata or strain in muscles can be studied by using this house. The ninth house is important in the horoscopes of the sports persons who need to strengthen their muscles. Also in infants who have defect in thigh bones and having problems in walking also can get help from the analysis of the ninth house in their horoscopes.

In this way the ninth house provides a lot of important information regarding our lives. We can use this information to try and improve our life style and live a happy life.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

   =====================================================

No comments:

Post a Comment