जन्म कुंडलीतील द्वादश (बाराव्या) स्थानाला व्ययस्थान असंही म्हणतात. व्यय म्हणजे खर्च. आता आयुष्यातील हा खर्च आर्थिक आहे की कष्टांच्या रूपाने, चांगल्या कारणासाठी आहे की वाईट, ठरवून केलेला आहे की अनपेक्षित, याचा अभ्यास या स्थानावरून होतो. त्याशिवाय या स्थानावरून आयुष्यातील एकटेपणा, अध्यात्मिक प्रगती, तुरुंगवास, राजदंड या सगळ्यांचाही विचार याच स्थानावरून होतो. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते पाहू.
व्यय म्हणजेच खर्च हा कोणत्या उद्देशाने होईल याचा अंदाज या स्थानावरून येतो. आरोग्य, जागा, वाहन, शिक्षण, विवाह अशा अनेक कारणांसाठी पैसे खर्च होत असतात. कधी कधी अनपेक्षितरीत्या आर्थिक फटका बसतो. ध्यानीमनी नसताना अनेक खर्च करावे लागतात. उदा: अपघात, आजारपण, आर्थिक ठेवी बुडणे, फसवणूक व त्यातून झालेलं आर्थिक नुकसान इत्यादी. अशा वेळी कधीतरी कर्ज घेऊन सुद्धा गरजा भागवाव्या लागतात. ह्या गोष्टींचा विचार व्ययस्थानावरून होत असल्याने आपली आर्थिक गुंतवणूक कशा प्रकारे असावी याचा निर्णय घेण्याआधी या स्थानाचा अभ्यास केल्यास निश्चितच मार्गदर्शन मिळेल. विशेषतः अचानक काही खर्च येऊ शकतात का किंवा असे योग कुंडलीत असतील तर गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी याचा विचार करता येईल. कधी कधी व्यसनं, विलासी आयुष्य यातही विनाकारण खर्च केला जातो. ज्याला अपव्यय म्हणता येईल. आपल्या कामाच्या ठिकाणी लाच घेऊन विलासी आयुष्य जगणारे, दुसर्यांना अडचणीत पाहून त्याचा फायदा उठवणारे अनेक लोक आपण पाहतो. अशा लोकांच्या कुंडलीत द्वादश भाव व त्यासंबंधी ग्रहांचे वाईट योग्य असण्याची दाट शक्यता असते.
द्वादशस्थान हे एकटेपणा, तुरुंगवास याचंही स्थान आहे. काही व्यक्तींना त्यांची वाईट कर्मं / वृत्ती यामुळे समाजातून हद्दपार केलं जातं किंवा कोणीही त्यांच्याशी संपर्क ठेवत नसल्यानं त्यांना एकटेपणा सहन करावा लागतो. नातेवाईक असूनही अशा व्यक्तींशी संबंध ठेवत नाहीत तर कधी दुर्दैवाने माता पित्याचंच नाव ठाऊक नसल्याने अनाथपण नशिबी येतं. काही लोक कुटुंबात राहत असतात पण त्यातील कोणाशीही मन न जुळल्यामुळे मानसिक एकटेपणा भोगत असतात. अशा अनेक वेगवेगळ्या परिस्थितींत एकटेपणा येऊ शकतो. मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याने एकटेपणामुळे अनेक त्रास भोगावे लागतात. यात मानसिक संतुलन बिघडण्यापासून आत्महत्येपर्यंत अनेक वाईट गोष्टी घडू शकतात. काही व्यक्ती मात्र एकटेपणामुळे खचून न जाता त्यातूनही मार्ग काढतात आणि स्वतःची ओळख नव्याने तयार करतात. आयुष्यात एकटेपणा असेल का की कौटुंबिक सौख्य मिळेल याचा अभ्यास करताना दोन्ही बाजुंनी विचार करून कोणत्याही परिस्थितीत याची परिणीती वाईट गोष्टींत होणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो.
आयुष्यात कोणत्याही कारणाने तुरुंगवास होणार असेल, तर त्याचाही अभ्यास याच स्थानावरून होतो. साधारणपणे छोट्या गुन्ह्यांत कमी वेळासाठी तुरुंगवास होतो पण गुन्हा गंभीर असेल तर मात्र जास्त काळ तुरुंगात राहावं लागतं किंवा जन्मठेप भोगावी लागते. हा ही एका अर्थाने एकटेपणाच आहे. पण कधी कधी कोणताही गुन्हा नसताना खोटे आरोप केले जाऊन पूर्ण आयुष्य उध्वस्त होतं अशीही उदाहरणं आपण पाहतो. तर कधी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही अनेक व्यक्ती गुन्हे करतात. त्यातही भ्रष्टाचार, लाच देणं, मोठ्या व्यक्तींशी ओळखी असल्या गोष्टींमुळे अनेक छोट्या गुन्हेगारांना (क्वचित निर्दोष व्यक्तींना) मोठ्या गुन्ह्यात गुंतवलं जातं. गुन्हेगारी विश्वाला अनेक पैलू आहेत जे इथे लिहिणं योग्य नाही. त्याशिवाय राजदंड म्हणजेच शासकीय गुन्ह्यात झालेली शिक्षा याचाही विचार ह्या स्थानावरून होतो. राजकीय गुन्ह्यांत केवळ तुरुंगवासच नव्हे तर इतर शिक्षाही होऊ शकतात. असो, कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील तुरुंगवास हा त्या व्यक्तीला उध्वस्त करतो एव्हढं निश्चित. म्हणूनच अशा प्रकारच्या कोणत्याही भाकीतासाठी योग्य ज्योतिषाकडूनच मार्गदर्शन घ्यावं.
द्वादशस्थानावरून एखाद्या व्यक्तीची अध्यात्मिक प्रगती कशी होईल हेही पाहता येतं. काही व्यक्तींना अध्यात्मिक क्षेत्रात खूप रस असतो. अशा व्यक्ती चांगल्या कीर्तनकार, अभ्यासक, अध्यात्मिक विद्या शिक्षक, अध्यात्मिक गुरू अशा पदाला पोचतात. तर काही व्यक्ती केवळ नामस्मरण करतात. कोणाची अध्यात्मिक प्रगती किती आणि कोणत्या पंथातून होईल याचा विचार करताना या स्थानाचा अभ्यास करावा.
या स्थानाचा अंमल पावलांवर असतो. त्यामुळे पावलांसंबंधी काही तक्रारी, रोग असतील तर त्याचा निदान आणि उपचारांसाठी या स्थानाचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो.
एकूणच हे स्थान अनेक दृष्टींनी महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यात खर्च कसा करावा, आपली अध्यात्मिक प्रगती कशी असेल अशा अनेक बाबतीत या स्थानावरून विचार केल्यास अडचणी दूर करण्यास नक्कीच मदत मिळेल.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
==================================================
The twelfth house in the Janm kundli is known as Vyayasthana or house of expenses as vyaya literally means expenditure. Now expenditure means spending in a good way or extravagantly, monetary or by efforts, predefined or unexpected etc can be studied by this house. Along with this the twelfth house also describes about loneliness, spiritual progress, imprisonment, legal punishments due to violating majesty ( in today's world it means crimes of betraying government or treason). Now lets see how practically this can be applied.
Vyaya or spending can be caused due to pleasant reasons or unpleasant can be calculated from this house. Normally people spend for health, education, marriage, property, vehicles, business etc. Sometimes unexpected expenses give a setback. For example accidents, physical ailments, forgery, bankruptcy etc. Sometimes these circumstances force people to take a loan and fulfill the needs. All these matters are studied on the basis of twelfth house. As this study helps in making decision about investments and savings it becomes a very important guideline in life. Especially which care should be taken if unexpected expenses are reflected in the horoscope or if the situation is inevitable then what is the solution or remedy for this can also be found out. Some times extravagant lifestyle, addictions and many such things result in lot of unnecessary spending. The envious or wicked people who accept bribe and live a luxurious life or deceptive people who take advantage of their posts mostly have the malicious yogas of planets related to twelfth house.
This house is also of loneliness and imprisonment. Some fraudulent people are outcasted due to their evil nature and behaviour or relatives avoid contacting them, forcing them to live a secluded life. Sometimes orphans or abandoned children have to live a tragic solitary life. Some people do have a apparently nice family but their wavelength doesn't match with anyone and this results in mental isolation. So solitary life style can be caused by various reasons. As human being is social animal this isolation results in many problems or emotional trauma. This can lead to negative effects ranging from insanity to suicidal nature. Some strong willed people overcome all this trauma and develop their personality despite of the hurdles. Thus while getting a prediction for whether one's life will be solitary or not, one should think from all angles and try to make as much positive outcome as possible.
This house also describes about any possible imprisonment in life. Usually a smaller crime will give a short time imprisonment but a major crime may result in bigger punishment or life imprisonment. Life imprisonment is also a kind of loneliness. In some unusual cases innocent people are falsely accused and this results and devastation of the person. Ironically in some cases people from a very normal family background commit serious crimes. On the inside due to corruption, influence or other such things smaller criminals (sometimes innocent people too) are accused of a big crime and get punished. Well the crime world has many such sides but writing about that is not possible here. Along with this major crimes like treason can have a different punishment along with imprisonment. Any way, imprisonment completely destroys a person's life for sure. So any prediction regarding such readings is needed one should always take guidance from a knowledgeable astrologer.
This house also tells about the spiritual progress of a person. Some people are interested in spirituality from childhood. Such people develop their interest and become good spiritual speakers, gurus or study spiritual literature to get the mastery in that. Some people practice simple ways for spiritual progress like chanting mantras, meditation etc. To know about the progress in spirituality and the path to be followed one should take guidance on the basis of this house.
This house governs the feet of human body. Thus to diagnose about any ailments related to feet or the treatment, the detailed study of this house can be extremely helpful.
Overall this house is important in many aspects. The important information about expenditures, spirituality and other important matters can definitely help to solve some problems in our lives.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
===========================================
No comments:
Post a Comment