मेदनीय ज्योतिष शास्त्र म्हणजे देशाची / प्रदेशाची कुंडली मांडून त्याबद्दल भाकीत करणं असा काही लोकांचा (गैर) समज आहे. आजकाल अनेक ठिकाणी देश, प्रदेश अगदी शहरांच्या राशी सांगून त्या ठिकाणी अडचणी का आहेत याबद्दल माहिती दिली जाते. निवडणूका जवळ आल्या की अशा चर्चांना ऊत येतो. पण खरंच अशी देशाची कुंडली मांडता येते का? आणि असं असेल तर विविध देशांत एव्हढ्या अडचणी का आहेत? एक अस्सल भारतीय म्हणून आणखी एक प्रश्न मनात येतो की भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्षं राज्य केलं. मग ही आपत्ती आधीच समजू शकली नाही का? अशा प्रकारच्या अनेक शंका अनेकांच्या मनात असतील. म्हणूनच मेदनीय ज्योतिष या विषयाबद्दलची थोडी माहिती इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.
मेदनीय ज्योतिष हे ज्योतिष शास्त्राचं एक महत्त्वाचं अंग मानलं गेलं आहे. अगदी पूर्वीच्या काळापासून याचा वापर केलेला आढळतो. त्याचं बदललेलं स्वरूप पाहता, त्याचा गर्भितार्थ आणि आत्ताची मांडणी याबद्दल दुमत आहे. माझ्या अभ्यासातून मला दिसलेलं मेदनीय ज्योतिष काय आहे (किंबहुना काय असावं) हे सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे.
पूर्वीच्या काळी मेदनीय ज्योतिषाचा वापर हा नैसर्गिक घटनांसाठी केला गेलेला आढळतो. ज्यात ऋतू बदल, त्यांचा निसर्गावर होणारा परिणाम, भरती ओहोटी, चंद्र दर्शन, नैसर्गिक आपत्तींचं भाकीत, पशु पक्ष्यांवर त्याचा होऊ शकणारा परिणाम, पाऊस अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. या सर्व गोष्टी संपूर्णपणे नैसर्गिक आहेत. त्यामुळे त्यांचं भाकीत करताना वापरलेलं मेदनीय ज्योतिष शास्त्राला धरून आहे हे निश्चित. त्यासाठी संवत्सर, वेगवेगळ्या कालमापन पद्धती, ऋतू, महिने, पक्ष, दिवस अशा गणितांचा योग्य वापर केलेला आढळतो. तसंच गुरु शनी सारखे मोठे ग्रहगोल, त्यांची स्थिती, सूर्यप्रदक्षिणेचा काळ, सूर्याची स्थिती अशा शास्त्रोक्त गोष्टींचा अवलंब केलेलाही दिसतो. या सर्व परिमाणांचा वापर करून केलेली नैसर्गिक घटनांची भाकितं मला पूर्णपणे मान्य आहेत.
याच मेदनीय ज्योतिषाचा एक भाग म्हणून एखाद्या राज्याचं भाकीत वर्तवलं गेलं असण्याची शक्यताही मी नाकारत नाही. पण यासाठी त्या राज्याच्या राजाची स्वतःची जन्मकुंडली निश्चितच बनवली गेली असणार. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या काळी असलेली राज्यपद्धती अत्यंत वेगळी होती. एखाद्या राजावर संपूर्ण राज्याची जबाबदारी होती आणि लोकशाही हे तंत्र अस्तित्वात नव्हतं. अशा वेळी त्या राजाच्या निर्णयावर सर्व गोष्टी अवलंबून असत. राजाच्या दरबारी कितीही अधिकारी असले तरी अंतिम निर्णय घेण्याचा हक्क राजाचाच असे. म्हणून त्या वेळी जर मेदनीय ज्योतिष वापरलं गेलं असेल तर त्यात वावगं असं काही नाही. पण आताची परिस्थिती पाहता अनेक देशांत लोकशाही आली आहे. राजेशाही असली तरी त्याचं स्वरूप लोकशाहीच्या जवळ जाईल असंच राहिलं आहे. मग अशा काळात देश, प्रदेश, शहर यांच्या कुंडल्यांचा मेदनीय ज्योतिषात केला जाणारा वापर अनाकलनीय वाटतो. देशातील महत्त्वाच्या नेत्यांच्या कुंडल्यांचा परिणाम त्यांच्या निवडणुकांमधील निकालांवर नक्कीच होऊ शकतो. किमान तसं भाकीत करणं शास्त्राला धरून वाटतं. पण देश आणि प्रदेशांच्या कुंडल्या हा प्रकार मला सर्वथा अयोग्य वाटतो.
आता देशाची किंवा प्रदेशाची कुंडली आणि एखाद्या नेत्याची कुंडली यातील अंतर काय आहे ते समजून घेऊ. ज्योतिष शास्त्रात कुंडली ही एखाद्या व्यक्तीसाठी बनवली जाते. कुंडलीतील बारा स्थानांचा अभ्यास हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि आयुष्यातील इतर व्यक्तिगत गोष्टी पाहण्यासाठी केला जातो. प्रत्येक स्थानाचं वेगळं कारकत्व आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी कुंडली बनवताना त्या व्यक्तीची जन्म तारीख, जन्म स्थान व जन्म वेळ या माहिती वरून कुंडली तयार केली जाते. जन्म स्थान पाहताना त्या ठिकाणचे अक्षांश व रेखांश किती आहेत हे गणितात मांडले जातात. कुंडली बनवताना लागणाऱ्या ह्या तीन गोष्टी एखाद्या देशाची, प्रदेशाची किंवा शहराची कुंडली बनवताना कशा घेतल्या जाऊ शकतात? तसंच कोणत्याही देशाचं भवितव्य पाहताना कोणत्या स्थानावरून माहिती घ्यावी? या प्रश्नांची उत्तरं शोधताना मला अशी माहिती मिळाली की पंचम स्थान हे संततीचं कारक स्थान आहे, म्हणून देशाची कुंडली मांडताना पंचम स्थान हे लोकसंख्येचं स्थान म्हणून पाहिलं जातं. किंवा तो देश जेव्हा स्वतंत्र झाला अथवा स्वतःच्या नावाने ओळखला गेला ती त्या देशाची जन्म वेळ धरली जाते. अशाच प्रकारे सर्व बारा स्थानांचं कारकत्व देशाच्या कुंडलीत 'बसवलं' जातं. हा भाग मला एक ज्योतिषी म्हणून अनाकलनीय वाटतोच पण याचा फायदा घेऊन सामान्य माणसापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत कोणाचीही फसवणूक केली जाते हेही चूकच आहे. कोणताही देश हा विशिष्ट नावाने उशिरा ओळखला गेला असेल परंतु त्या मातीचा जन्म पृथ्वीबरोबरच झाला आहे. त्यामुळे देशाची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण (राजधानी ???) मांडणं हे गणित शास्त्रोक्त वाटत नाही. उदाहरणार्थ भारत देशाची जमीन पृथ्वीच्या जन्माबरोबरच अस्तित्वास आली. अनेक संस्कृती, राज्यकर्ते अशा बदलत्या परिस्थितीत काही काळ तो 'भारत' होता. मग दीडशे वर्षं इंग्रजांच्या राजवटीत 'इंडिया' झाला. पुन्हा १९४७ साली स्वतंत्र 'हिंदुस्थान' झाला. पण या सगळ्यात मूळ भारतीय भूमी आहे तिथेच राहिली. मग या देशाची जन्मवेळ, जन्म ठिकाण नक्की कोणतं? आणि 'भावना' किंवा व्यक्तिगत गोष्टी या माणसाला असतात, मातीला नाही. मनुष्य जन्मातील व्यावहारिक गोष्टींची कसोटी एखाद्या देशाला / प्रदेशाला लावणं तर्कसंगत वाटत नाही. एक लहानसं उदाहरण देऊन ही गोष्ट स्पष्ट करते. कोणत्याही मुलीचा जन्म जिथे आणि ज्या वेळेस होतो त्यावरून तिची जन्म कुंडली बनवली जाते. लग्न झाल्यावर त्या मुलीचं नाव, राहण्याचं ठिकाण बदलतं. पण तिची नवीन ओळख म्हणून नवीन कुंडली बनवली जात नाही. तसंच सगळे देश हे एक भूमी म्हणून पृथ्वीच्या जन्माच्या वेळेसच जन्माला आले आहेत. नवीन ओळख मिळणं ही काही जन्मवेळ धरली जाऊ शकत नाही. आणि भविष्यात काही मोठ्या घटनेमुळे तो देश वेगळ्या नावाने ओळखला गेला किंवा त्या देशाचं विभाजन झालं तर यातील कसोट्या पुन्हा बदलाव्या लागतील. म्हणूनच मेदनीय ज्योतिषातील देशांच्या कुंडल्या बनवण्याचा भाग मला पटत नाही.
ज्या राज्यकर्त्यांवर देशाची स्थिती अवलंबून आहे अशा नेत्यांच्या कुंडल्या त्यांच्यासाठी मांडणं योग्य आहे पण त्याची चर्चा देशाच्या भवितव्यासाठी करता येणार नाही. असे नेते निवडणुकीत जिंकतील का? किंवा ते देशाच्या प्रगतीत हातभार लावतील का? अशा प्रश्नांची उत्तरं नक्कीच कुंडली वरून मिळतील. पण त्यासाठी त्यांच्या राजकीय पक्षाची कुंडली मांडणं मला पटत नाही. केवळ वृत्तपत्र, मासिकातील रकाने भरून पैसे मिळवण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला जातो. म्हणूनच अशा पद्धतीचं कोणतंही भाकीत मी करत नाही किंबहुना मला ते पटतच नाही.
माझ्या मते मेदनीय ज्योतिषाचा खरा उपयोग नैसर्गिक घटना म्हणजे पाऊस पडणे, नैसर्गिक आपत्ती अशा गोष्टींसाठी जरूर व्हावा. विशेषतः शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळे मुहूर्त दिलेले असतात उदा: पेरणीसाठी. याचं कारण दरवर्षी पावसाचं चक्र थोडं फार बदलू शकतं. नक्षत्रांची त्यावेळची स्थिती पाहून पावसाचा अंदाज लावता येऊ शकतो कारण सूर्यमालेतील ग्रह ताऱ्यांचा परिणाम पृथ्वीवरील घटनांवर होतच असतो. त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, भूकंप, बर्फवृष्टी अशा अत्यंत नैसर्गिक घटनांसाठी या शास्त्रोक्त पद्धतीचा वापर जरूर व्हावा. जेणेकरून योग्य वेळी पेरणी, कापणी करून पिकं चांगली येण्यास शेतकरी बांधवांना सहकार्य मिळेल. तसंच एखाद्या देशात नैसर्गिक आपत्ती ओढवणार असेल तर सरकारला तशी काळजी घेऊन जनतेला सहकार्य करता येईल व होईल तितकी जीवितहानी टाळता येईल. इतकंच काय वैयक्तिक पातळीवर कोणी दूरच्या प्रवासाला जाणार असेल तरी अशा नैसर्गिक गोष्टींचा अंदाज असेल तर प्रवास सुखरूप व्हावा म्हणून योग्य वेळ ठरवता येईल. खरं तर पंचांगात दिलेले हे मुहूर्त नैसर्गिक हालचालींचा अंदाज देण्यासाठीच असतात आणि वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाऊ शकतात. परंतु याचा कोणताही दुरुपयोग करून लोकांना लुबाडणं अत्यंत गैर आहे.
असो, मेदनीय ज्योतिष या अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीचा योग्य वापर होऊन देशातील नैसर्गिक घटनांचा अभ्यास व्हावा व सामान्य जनतेला त्यातून काही फायदा व्हावा असं माझं मत आहे. राजकारणातील अस्थिरतेचा फायदा घेऊन हे शास्त्र वापरू नये व जनतेनेही कोणत्याही अशा भूलथापांना बळी पडू नये ही माझी नम्र विनंती आहे.
तळटीप: मेदनीय ज्योतिष या विषयावरील माझा हा लेख हा संपूर्णपणे माझ्या वैयक्तिक मतानुसार लिहिला आहे. या मतांशी सर्वजण सहमत होतील असं नाही. जर कोणाचं याबद्दल वेगळं मत असेल किंवा काही शंका असतील तर त्या योग्य शब्दांत मांडाव्यात ही विनंती.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
===================================================
Many people have a (mis) understanding that Mundane Astrology is calculation and prediction of the Kundli (horoscope) of a country / state. Now a days at many places, information regarding the 'problems' of a particular place is given on the basis of the zodiac sign of that country, state or even the city. When elections are near, such discussions are at their peak. But is it really possible to make a kundli of a country? And if it is then why so many countries are facing serious problems? As a true Indian I have another question in my mind. India was ruled by the British for almost 150 years. Then why this major problem was not predicted earlier? Many readers will have such doubts in their minds. So I am trying to give some information regarding Mundane astrology.
Mundane astrology is a very important branch of astrology. The application of this branch can be referred from very ancient texts. Speaking about today's world I really find it difficult to establish a link between the actual purpose and today's application of Mundane astrology. So here I am trying to explain my point of view on what is (rather what should be) Mundane astrology.
In ancient times Mundane astrology was used to predict natural phenomenons. This included changes in seasons, its effect on the environment on earth, eclipses, high or low tides, moon sightings, prediction of natural calamities, effect of calamities on life of plants and animals, rains etc. These all phenomenons are naturally occurring, so their prediction using astrology is definitely scientific. For these predictions the mathematical calculations were based on Samvatsara (Jovian year), various time calculation methods, seasons, months, Paksha (Lunar fortnights) and days. Along with these the planetary positions, revolution of planets around the Sun, respective position of the Sun were also taken into account to make the calculations perfect. I absolutely agree with all these predictions based on the scientific criteria and relevant methodology.
I do not deny the possibility of the prediction of a country at that time. But for this prediction, the kundli of the king or ruler of that country must have been calculated.
Another important point is then existing aristocratic system was totally different than the democratic system present in today's world. In aristocracy the rulers or kings had all strength in their hands, so every decision was taken by them. Though many officers were working under the rulers, the final execution of any order was not possible without the permission of the rulers. That is why the application of Mundane astrology at that time was probably acceptable. Now with the change of time democracy is the working government system in most of the countries. Though today aristocracy is not totally wiped out, it is nearly approaching democracy wherever it is still existing. In this form of government system, the application of Mundane astrology to calculate the kundlis of countries, states or cities has no relevance. The kundlis of political leaders can help in prediction of their position in elections on personal level. But making kundlis of countries or places sounds imprudent to me.
Now lets know about the difference between the kundli of a country and that of a political leader. In astrology a kundli is made for a human being. The twelve houses are studied to know about the nature and other personal matters of that person. Every house has its own instrumentality. The kundli is made by mathematical calculations based on the person's birth time, birth place and birth date. Birth place means the latitudes and longitudes of the place where the person was born. Now the questions arise that how these three parameters can be derived for a place or a country? Which house is assigned for the future of a country? When I tried to find out the answers, I got the information like fifth house is the house of progeny, so in a country's kundli he fifth house is meant for the population. And when the country got it's independence or got it's name per se, that was the birth time of the country. Just like this all twelve houses are 'assigned' for different parameters based on the application in a kundli of a human being. As an astrologer I not only abhor this prediction method but I also oppose this kind of practice where anybody from common people to politicians are bamboozled. Any country may have been recognized by it's particular name lately, but the land was formed along with the earth itself. So using a country's birth place (capital???) or time or date for calculations doesn't sound scientific. Lets take an example of India. The land now known as India was born along with the earth. During all the development of earth and different rulers and cultures it was known as Bharat for sometime. Under British rulers it was known as India. After independence in 1947 again it was known as Hindustan. But in all this process the original land was there where it was from the beginning. Then how can we calculate the birth place or time of India? Importantly a human being has emotions but a piece of land has no emotions. Thus applying the human criteria to any land makes no sense. I will give another practical example. When any baby girl is born, her janm kundli is made on the basis of her birth time, place and time. When the girl gets married she changes her name, residence etc. But after her new identity a new kundli is not made on her new details. Just like that all countries were born as pieces of lands (which were named afterwards) when the earth was formed. So a new identity of a country can not be taken as it's birth time. If so, then a name change or independence or partition can affect the kundli of that country. This is the reason why I don't support this part of Mundane astrology.
Making kundlis of political leaders of ruling parties is logical for their personal views but not for debates on that country's future. Their kundlis can tell us whether they will win the elections or whether they will serve the country for the progress in future. But I feel that making a political party's kundli for this purpose is not logical. This kind of astrological information is only used for filling columns in magazines or news papers to earn money. So I abhor such kind of prediction rather I do not agree to it.
I feel Mundane astrology should be purely used for the predictions of natural phenomena like rains, natural calamities etc. Especially it can be used for the farmers where best periods are given for various steps in farming e.g. harvesting. The reason behind this is the cycle of nature can change a bit every year. So by studying position of planets and Sun one can predict the possible period of start of rainy season or other similar natural events. As all nearby celestial bodies affect the earth by some or the other way. So this study can be extremely useful in predicting natural phenomena like rains, drought, earthquake, snowfall, heavy rains etc. This can help the farmers to get maximum crops at the time. It can also help the government if the natural calamities are approaching to make proper arrangements beforehand and avoid the loss. Not only this but it can also help on personal level to arrange a safe long distance travel. The Muhurta (time) given in the panchanga are also based on Mundane astrology and help to know about such events beforehand. Well these Muhurtas can be used for many purposes, but any malpractice using the knowledge of this science should be forbidden.
Any way my sincere opinion about Mundane astrology is, this method should be used to predict natural phenomena and help people in various ways. The use of this science to take advantage of unstable political circumstances should be strictly avoided. I humbly request people not to get buncoed by such kind of practices.
Note: This article on Mundane astrology is composed on my personal opinions. Every reader may not agree with me. If you have a disagreement or a doubt then kindly post your comments in appropriate words.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
==================================================
No comments:
Post a Comment