Saturday, 27 October 2018

एकादशस्थान (लाभस्थान) The eleventh house (House of gains)


जन्मकुंडलीतील अकराव्या स्थानाला लाभस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून मनुष्याला होणाऱ्या सर्वप्रकारच्या लाभांचा विचार केला जातो. यात इछा आकांक्षा यांची पूर्तता, योग्य वेळी मदत करणारे वा आधार देणारे स्नेही, मित्र परिवार, हितचिंतक, जवळच्या व्यक्ती व त्यांच्याकडून मिळणारा मानसिक आधार यांचा विचार होतो. तसंच आर्थिक लाभांचाही विचार होतो. वेगवेगळ्या क्षेत्रातून होणारे आर्थिक लाभ उदा: लेखन, कला, व्यवसाय, विशेषतः परदेशातील कामांमुळे होणारे आर्थिक लाभ, मित्र परिवाराकडून होणारे आर्थिक साहाय्य अशा अनेक पैलूंचा विचार या स्थानावरून केला जातो. 'लाभ' म्हणजे केवळ ऐहिक सुख नव्हे तर कोणत्याही स्तरावरून होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा आणि अनुभवांचा आयुष्यात होणारा सकारात्मक उपयोग. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते पाहू. 

आयुष्यात होणारे लाभ म्हणजे केवळ आर्थिक लाभ असा संकुचित दृष्टिकोन न ठेवल्यास आपण ह्या स्थानाचं महत्त्व समजून घेऊ शकतो. 

आपल्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट घेतो. स्वप्नपूर्तीचा आनंद फार वेगळा असतो. पण आपल्या काही इच्छा कधी वेळेत पूर्ण होत नाहीत किंवा कधी त्यावर पाणी सोडावं लागतं. यात शिक्षण, वैवाहिक सौख्य, संतती सौख्य, घर, वाहन, आर्थिक सुबत्ता, कार्यक्षेत्र, आरोग्य अशा सर्व गोष्टी असतात. अगदी घरगुती नातेसंबंध चांगले असणे हाही एक लाभच आहे. समाजात होणारं नाव, प्रसिद्धी हा लाभाचा आणखी एक पैलू आहे. हे स्थान मित्र परिवाराचं स्थानही आहे. त्यामुळे केवळ आपल्या सहवासात असलेली मित्र मंडळीच नव्हे तर दूरवर असलेले स्नेही, त्यांच्या मदतीने झालेली कामे / व्यवसाय, परदेशात असलेली कामे वा शिक्षण या सर्वांचा विचार या स्थानावरून होतो. लाभाचा विचार करताना याची दुसरी बाजू पाहणंही तेव्हढंच गरजेचं असतं. अनेकदा मैत्रीच्या नावाखाली फसवणूक होते, परदेशाचं आमिष दाखवून पैसे उकळले जातात किंवा लेखन वा तत्सम कामात नामुष्की येते, नुकसान होतं इत्यादी. अशा सर्व उणीवांचा विचारही ह्या स्थानावरून होतो. अशा त्रासदायक होऊ शकणाऱ्या गोष्टींचा आधीच विचार केल्यास अनेक धोके टाळता येतील तसंच अशा प्रकारचे आर्थिक गुन्हेही काही प्रमाणात थांबवता येतील. असो, या स्थानावरून आपल्या इच्छा कधी पूर्ण होऊ शकतील याचा अंदाज आल्यास त्यानुसार पाऊले उचलता येतील. तसंच काही कारणाने कुठे अडथळे येणार असतील किंवा इच्छा पूर्ण होण्याचे योग नसतील तर मानसिक व आर्थिक गुंतवणूक करताना योग्य विचार केला जाऊ शकतो. 

आता मित्र परिवाराचं स्थान म्हणजे यावरून कोणत्या गोष्टीत मार्गदर्शन घेता येईल ते पाहू. अनेक लहान मुलांच्या कुंडलीत वाईट संगत असल्याने बिघडण्याचे योग असतात. घरात कोणतीही कमी नसताना केवळ वाईट मित्र परिवारामुळे मुलं बहकत जातात. लहानपणी याची परिणीती जुगार, व्यसनं, नको त्या गोष्टींकडे वळणं यात होते. मोठेपणी मात्र आर्थिक नुकसान, कोर्ट कचेरीत अडकणे, क्वचित गंभीर गुन्हे घडणे इथपर्यंत त्रास होऊ शकतो. अशा प्रकारच्या कुंडल्यांचं वाढतं प्रमाण पाहता मला नमूद करावंसं वाटतं की ज्योतिष शास्त्राचा आधार असला तरी व्यावहारिक आयुष्यातही पालकांनी डोळे उघडे ठेऊन पाल्यावर लक्ष ठेवणं गरजेचं बनलं आहे. या स्थानावरून कोणत्याही व्यक्तीचा मित्र परिवार कसा असेल, किती विश्वासू असेल याचा अंदाज घेतल्यास अनेक संभाव्य धोके टाळता येतील. 

मित्र परिवार, स्नेही, शेजारी कुटुंब हे सर्व आपल्या आयुष्याचा भाग असतात. आपल्या रोजच्या आयुष्यात या सगळ्यांशी अनेकदा संपर्क येतो. आपण त्यांच्यावर विसंबून राहून अनेक गोष्टी करतो. अगदी घराची किल्ली ठेवण्यापासून ते घर वापरायला देण्यापर्यंत अनेक गोष्टींत आपला संपर्क असतो. मात्र जिथे अगदी महत्त्वाच्या गोष्टींची माहिती एकमेकांना सांगायची असते, आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर असतात तिथे एकदशस्थानावरून मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच काही वाईट गोष्टी टाळता येतील. मित्र परिवार हा सुख दुःख वाटण्यासाठी असला तरी गैरसमजांमुळे होणारे टोकाचे परिणाम, त्यामुळे घरात होणारे त्रास आपणही अनेकदा पाहतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मित्र परिवाराचं सुख किती आहे यावरून अनेक गोष्टीत मार्गदर्शन मिळू शकेल.       

एकदशस्थानाचा अंमल हा पोटऱ्यांवर असतो. त्यामुळे पोटऱ्या दुखणे, सायटिका, व्हेरीकोस व्हेन्स सारखे गंभीर आजार अशा प्रकारच्या रोगांमध्ये निदान व उपचार यात वैद्यकीय सल्ल्याबरोबरच ज्योतिष शास्त्राचा सल्ला घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकेल. व्यायाम करणाऱ्या व्यक्ती, खेळाडू यांना आपल्या पोटऱ्यांचे स्नायू मजबूत ठेवणं गरजेचं असतं. अशा वेळी एकदशस्थानाचा अभ्यास केल्यास आहार व इतर काळजी यात मार्गदर्शन नक्कीच मिळू शकेल.  

एकूणच ह्या स्थानाच्या अभ्यासावरून आपल्या आयुष्यात होणारे 'लाभ' कसे असतील हे अनेक दृष्टिकोनातून आपण समजून घेऊ शकतो. तसंच आपला मित्र परिवार कसा असेल यावरूनही अनेक निर्णय घेण्यास मदत होऊ शकेल. अशा प्रकारे हे स्थान अनेक गोष्टींत मार्गदर्शक असं आहे.      

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

            =============================================


The eleventh house in the Janm kundli is also known as Labhasthana i.e. house of gains. This house governs all types of gains or profits. The 'gains' include every kind of profit viz. fulfillment of desires, having good friends who help when needed, well wishers, close people and their emotional support etc. This house also describes monetary gains with different angles. This includes money earned through writing, art, business especially business or work in foreign lands, monetary help by friends etc. Well, gain or profit here not only means worldly pleasures but also benefits 'gained' by various experiences and circumstances in life. Now lets see how practically this can be applied. 

We can understand the importance of this house if we change our views and consider labha or gains as not merely monetary but in all aspects of life. 

All of us struggle to complete our desires and dreams. The fulfillment of our desires gives a satisfaction in life. Sometimes some desires are not fulfilled or fulfillment gets delayed. It includes every desire like education, job business, marriage, marital satisfaction, children, own house, vehicle, health, work field, financial security etc. Even having good family relationships is a 'gain' in one sense. The name and fame in society and overall good social life is also a different angle of 'gain'. As this house also governs friend circle we can also study about the close friends, long distance friends and their help in work or business, education / work in foreign countries etc from this house. Learning about gains also has a second side or dark side which is equally important. Many times people are looted under the name of friendship / love or by so called 'friends' using different schemes or job opportunities abroad and personal losses like getting defamed in writing or any work place etc. This negative side is also studied on the basis of this house. If one gets an idea about such troublesome things beforehand, one can definitely avoid such loss or even stop the cyber crimes, frauds to some extent. Well, as one can know about the fulfillment of desires from this house, one can decide which steps has to be taken. Also this can help to know about possible dangers or chances of desires getting fulfilled are less or none then one can take proper care in financial as well as emotional investments.

Now lets see how this house describes about friend circle and how it can be used for guidance. Many children or young stars have malefic yogas in their horoscopes where they get carried away due to a bad friend circle. In spite of having good nurturing at home, these kids choose a wrong path under the influence of such friends. In the childhood this mostly results in illegal things like gambling, addictions or infatuation. But in adulthood it may take a serious turn and result in financial frauds, court matters or serious criminal activities. Due to increasing number of such cases, I feel that apart from astrological guidance parents should be alert and keep an eye on the activities of their children and their friends. As this house can describe about the friend circle and how much one can trust the friend circle, this can help to avoid some dangers in future.

Our friends, neighbors are a part of our lives. We are very much in touch with these people on a daily basis. It starts from keeping extra keys at their place to let them use our home for a few days. But when any confidential thing has to be shared or financial deals with friends are on a higher scale then a guidance from the eleventh house is definitely recommended.

The eleventh house governs the calves of human body. Thus in diagnose and treatment of any ailments regarding this portion like pain in calf area, serious ailments like sciatica, varicose veins etc the study of this house along with proper medical treatment is very important. Especially the people who do a lot of physical exercise or sports persons need to keep their calf muscles toned. Such people can get good guidance by the study of this house in deciding their diet and other health related care.

Well all together from this house we can understand about the gains in life from different angles. Also by understanding about the friend circle many important things can be handled with ease. Thus this house gives a very good guidance in many aspects of life.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

       ============================================

No comments:

Post a Comment