जन्मकुंडलीतील दशमस्थानाला कर्मस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून
मनुष्याचे कर्म कसे असेल याचा अभ्यास करता येतो. म्हणून या स्थानावरून
स्वतःच्या कर्माने मिळवलेल्या गोष्टी म्हणजे नाव, मान मरातब, प्रसिद्धी,
कार्य कोणत्या क्षेत्रात असेल, यश, समाजातील स्थान, सार्वजनिक आयुष्य,
त्यातील चढ उतार, लोकप्रियता अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळते. हे
पितृस्थानही आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे आपल्या वडिलांशी असलेले
संबंध, पितृसुख याचाही अभ्यास या स्थानावरून केला जातो. आता याचा प्रत्यक्ष
आयुष्यात कसा उपयोग होतो ते पाहू.
कोणताही
मनुष्य (स्त्री किंवा पुरुष) स्वकर्माने उदयाला येतो किंवा वाईट कर्म असेल
तर देशोधडीला लागतो. कर्म म्हणजेच मनुष्य आयुष्यात कोणते कार्य करतो,
अर्थार्जन कसे करतो, वैवाहिक आयुष्यात घर कसे सांभाळतो, कोणत्या प्रकारे
समाजाची सेवा करतो अशा अनेक गोष्टी आहेत. मनुष्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर
अर्थार्जनाला सुरुवात होते. कधी कधी शिक्षण आणि अर्थार्जनाचं साधन याचा
काही संबंध नसतो. अनेक नोकऱ्या किंवा व्यवसाय केले जातात. तर कधी कुणी
खेळात प्राविण्य मिळवून त्या क्षेत्रात नाव आणि पैसा मिळवतात. एखाद्या
व्यक्तीचं कर्म कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल आणि त्याचा शिक्षणाशी
संबंध असेल का? याचा विचार या स्थानावरून करता येतो. शिक्षणानंतर एखाद्या
व्यक्तीला वेगळ्या क्षेत्रात प्रगती करावीशी वाटली तर असे पाऊल उचलावे का
याचा आधीच विचार केला तर नंतर होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. आयुष्यातल्या
अनेक गोष्टी या आपल्या कर्मावर अवलंबून असतात. म्हणूनच या स्थानाचा अभ्यास
केल्यास आयुष्यात स्थिर होण्यास मदत मिळू शकेल तसंच आयुष्याच्या
उत्तरार्धात समाधानाने जगता येईल.
दशम स्थान हे
पितृस्थानही आहे. काही ज्योतिषी नवमस्थान हे पितृस्थान मानतात. परंतु
कोणत्याही कुंडलीत सप्तमस्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं. त्यानुसार
चतुर्थस्थानाचं (मातृस्थान) सप्तमस्थान म्हणजेच दशमस्थान हे पितृस्थान
मानलं जावं हे गणित मला माझ्या अभ्यासानुसार योग्य वाटतं. पितृस्थान
असल्यामुळे या स्थानावरून पितृसुख किती असेल, त्या व्यक्तीचे पित्याशी नाते
संबंध कसे राहतील याचा अंदाज या स्थानावरून येतो. अनेकदा सावत्रपणामुळेही
मुलं आणि वडिलांच्यात संवाद होत नाहीत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणींत
दशम स्थानाचा अभ्यास केल्यास अनेक गुंते सुटू शकतात. वडिलांची मालमत्ता,
वडिलोपार्जित संपत्ती / व्यवसाय व त्यातील वडिलांचा सहभाग, घरात
असलेलं वडिलांचं वर्तन अशा अनेक गोष्टींमध्ये या स्थानाचा अभ्यास
महत्त्वाचा ठरतो.
या स्थानाचा अंमल गुढघ्यावर
असतो. त्यामुळे यासंबंधातील तक्रारी, गुढघेदुखीमुळे होणारे त्रास, अशा वेळी
करावी लागणारी शस्त्रक्रिया अशा अनेक बाबतीत या स्थानाचा अभ्यास केल्यास
उत्तम मार्गदर्शन मिळू शकते.
अशा प्रकारे दशम
स्थान या अत्यंत महत्त्वाच्या स्थानाचा अभ्यास केल्यास वेळीच काही
गोष्टींचे निर्णय घेण्यास मदत मिळू शकते. तसेच आपल्याला आयुष्यात कोणत्या
क्षेत्रात पुढे जायचे आहे याचा निर्णय घेताना पूर्ण विचाराअंती निर्णय
घेतल्यास नुकसान टाळता येऊ शकेल.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
================================================
The tenth house in the Janm kundli is also known as Karmasthana or house of Karma. This house describes about the deeds of a person or achievements. It means this house describes the things achieved by efforts like name, fame, honour, prestige, success, public life and status, ups and downs in social life, popularity, achievements at work place etc. This house is also known as Pitrusthana or house of one's father. So it also describes the relationship with one's father. Now lets see how practically it can be applied.
Any
person's achievement in life depends on the karma or deeds. Good deeds
will lead to successful life and bad deeds will lead to the downfall of
the person. Now the deeds means how one works in life, earns by which
way, one's behaviour in married life and social life etc. Mostly a
person starts earning after the education is complete. Some times
educational background and earning source are not related. Some people
go for different businesses or jobs, some people settle in life being
sports persons and some people chose a different career altogether. This
permanency in life and its relation with the educational background is
calculated on the basis of tenth house. If one wants to pursuit a
different profession after completing basic education then one can give a
thought beforehand by studying the tenth house to avoid further
complications. Many things in life depend on the karma. That's why
studying this house and making improvements in performing deeds can help
to settle down in life and live a stable life in the later stages of
life.
The tenth house is also known as pitrusthana or the house of father. Some astrologers consider ninth house as pitrusthana.
But in any kundli the seventh house is the house of spouse. According
to this, the seventh house of the house of mother should be the house of
father. So I feel considering the tenth house as pitrusthana is the correct calculation method as it is the seventh house of matrusthana (fourth house). So being a pitrusthana this
house describes one's relation with the father. Many times such
relationship is spoiled due to the second marriage of the mother /
father. Such cases lead to different complications and problems in the
house which can be dealt by studying this house. The study of this house
becomes important in the problems like father's property, distribution
of ancestral property, ancestral business and the role of the father in
these, complications due to father's (or step father's) behaviour in the
family etc. Thus studying this house can help in resolving such issues
and avoiding major problems.
This house governs
the knees of our body. So the study of this house can be important in
ailments of knees, surgery required for such ailments like knee
replacement etc.
In this way this house is a
very important house, which can help in taking important decisions in
life. Also one can decide which field is to be chosen to permanently
settle in life. This can help to avoid the loss if wrong career path is
chosen.
©
All rights reserved. No part of this publication may be reproduced,
distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
==================================================
No comments:
Post a Comment