Tuesday, 11 February 2020

सिरीयल किलिंग आणि ज्योतिष शास्त्र (Serial killing and Vedic Astrology)


प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. माणसाच्या स्वभावातले दोष समजून घेऊन आपण त्यानुसार कोणाशी जुळवून घेतो किंवा कधी कधी स्वतःमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो. काही दोष हे समजून घ्यायच्या पलीकडले असतात. उदा: मनुष्य हत्या. काही विशिष्ट कारणानं मनुष्याच्या हातून दुसऱ्या माणसाची हत्या होते. पण आज जगात असे अनेक गुन्हेगार आहेत जे काही काळाच्या अंतरानं संबंध नसलेल्या अनेक व्यक्तींची हत्या करतात, ज्याला दृश्य कारण नसलं तरी मानसिक दोष हेच कारण दिसून येतं. अशा गुन्हेगारांना सिरीयल किलर किंवा साखळी हत्या करणारा असं म्हटलं जातं. भारतात हा प्रकार कमी असला तरी दुर्मिळ नक्कीच नाही. ह्या अशा हत्यांचा मनुष्य स्वभाव आणि त्या अनुषंगानं ज्योतिष शास्त्राशी काय संबंध येतो यावर आज मी माझे विचार मांडणार आहे. 

प्रथम साखळी हत्या म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. जेव्हा एखादी व्यक्ती एक हत्या करून थांबत नाही तर काही काळानं दुसरी मग काही काळानं तिसरी अशा हत्यांचं सत्र चालूच ठेवते त्याला साखळी हत्या म्हटलं जातं. पण एकाच वेळी अनेक माणसांची हत्या केली तर त्याला सामूहिक हत्या म्हटलं जातं. त्यानंतर तो गुन्हेगार परत हत्या करेलच अशी शाश्वती नसते. जगात जवळपास प्रत्येक देशात साखळी हत्या करणारे गुन्हेगार आहेत. पण त्यांची सर्वात मोठी संख्या मात्र अमेरीकेत आहे. मी हा विषय निवडण्यामागचं खास कारण म्हणजे जगातील सर्वात लहान वयाचा सिरीयल किलर दुर्दैवानं भारतीय आहे. बिहारमधील अमरदीप सदा (फोटो पहा) ह्या आठ वर्षीय मुलानं ३ बालकांची हत्या केली ज्यात त्याच्या आठ महिन्यांच्या सख्ख्या बहिणीचाही समावेश होता. जगातील अनेक १० वर्षांपासूनची मुलं ह्या गुन्ह्यात सापडली आहेत. इतक्या लहान वयात देखील इतका मोठा गुन्हा कसा घडू शकतो असा प्रश्न आपल्याला नाही पडला तरच नवल.    

  

मनुष्य हत्येमागे गुन्हेगारांच्या ज्या भावना असतात त्या राग, द्वेष, सूड, आर्थिक फायदा, फसवणूक, शारीरिक आकर्षण अशा प्रकारच्या असतात. बऱ्याचदा एका लक्ष्य केलेल्या व्यक्तीला मारून त्या भावना थांबतातही. पण सिरीयल किलर्स मध्ये ह्या भावनांचा ओघ चालूच असतो. मानवहत्येचा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर काही ग्रह / योग विशेष करून समोर येतात. कुंडलीतील 'गण' हा भाग मी सर्वप्रथम विचारात घेतला आहे. देव, मनुष्य आणि राक्षस अशा तीन गणांत मनुष्य स्वभावाची वर्गवारी झाली आहे जी चंद्र रास आणि नक्षत्रावर अवलंबून असते. नावाप्रमाणेच राक्षसगणी मनुष्य थोडा कडक स्वभावाचा असतो आणि कमी भावनाशील असतो. जेव्हा चंद्र बिघडल्यानं याचा अतिरेक होतो तेव्हा मनुष्य हत्येपर्यंतही या व्यक्तींची मजल जाते. याला वाईट मंगळाची साथ असेल तर हत्या करण्याचे विचार पूर्णत्वाला पोचतात. मंगळ हा धैर्य देतो, रक्ताचा कारक आहे पण तो बिघडला असेल तर अशी क्रूरकृत्य केली जातात. अर्थात हत्या करण्यामागे जी कारणं आहेत त्या कारणांशी संबंधित ग्रह व योग तितकेच वाईट असले पाहिजेत. उदा: जर एकतर्फी प्रेम वा शारीरिक संबंधातून हत्या घडली तर शुक्र बिघडलेला असतो. जर आर्थिक व्यवहारातून हत्या घडली तर कुंडलीतील धनेश, गुरु हे बिघडलेले असतात. राहू आणि केतू या पापग्रहांचा विचार अतिशय महत्त्वाचा ठरतो. चंद्र किंवा मंगळ यांचा राहू, केतू किंवा क्वचित शनिबरोबर संबंध आल्याशिवाय मन इतकं वाईट विचार करत नाही. मनाचा कारक चंद्र बिघडणं हा हत्येसारख्या गुन्ह्यांच्या मागील प्रथम व अनिवार्य कारण आहे. चंद्र सुस्थितीत असेल तर हत्येसारखा गुन्हा घडत नाही. किंबहुना अशी कोणतीही कुंडली माझ्यासमोर आली नाही. कुंडलीतील रवि हा एक मुद्दा थोडा दुय्यम असला तरी विचारात घेण्यासारखा आहे. रवि राग, अतिरेकी भावना तर देतोच पण राहू वा केतू बरोबर अंशात्मक युतीमध्ये असेल तर सुडाची भावना असते. अशा वेळी अनेक दिवस राग मनात ठेवून मग हत्या केली जाते अशी अनेक उदाहरणं आहेत. 

सिरीयल किलर्सचा विचार करायचा तर अनेक मुद्दे विचारात घेतले जातात. पहिला मुद्दा येतो तो त्यांच्या पार्श्वभूमीचा. जवळपास सगळ्याच सिरीयल किलर्सचं लहानपण हे सुखी घरातलं नसतं. आईवडिलांचं वेगळं होणं, भांडणं, व्यसनाधीनता, आई वडील चांगले पालक न असणं असे अनेक मुद्दे यात येतात. माझ्या मते लहानपणी जेव्हा मेंदूचा विकास होत असतो तेव्हा अशी काही दृश्य पाहून मनावर विपरीत परीणाम होणं साहजिकच आहे. काही मानवतावादी लोकांच्या मते लहानपणच्या गोष्टींशी मोठेपणी केलेल्या हत्यांशी संबंध कसा जोडता येईल? मी मनुष्य हत्येला कोठेही दयाभाव दाखवत नाही. पण लहानपणी मनावर झालेल्या आघातांवरच आपला स्वभाव ठरत असतो हे माझं मत आहे. सुस्थितीत, आपुलकीमध्ये वाढलेली मुलं शक्यतो असे गुन्हे करत नाहीत. आणि केलेच तर ती दर्शनी सुस्थिती आतून वेगळीच असते. लहानपणी बघितलेल्या वाईट नाते संबंधांमुळे मनात एखाद्या व्यक्ती / नातं / स्त्री वा पुरुष लिंगी व्यक्तीबद्दल तिरस्कार असतो. ज्याचे पडसाद कधी लहानपणीच उमटतात तर कधी मोठेपणी. वेळेवर उपचार केले तर ह्यातून बाहेर पडता येईलही. पण त्यांचा संबंधच केलेल्या हत्येशी नाही हे मला पटत नाही. उमलत्या वयात अशी दृश्य पाहून कठोर किंवा भावनाहीन स्वभाव तयार होतो. म्हणूनच कौटुंबिक स्थितीला आपण सर्वजण मानतो. वयानुसार होणारे संप्रेरकांचे बदल आणि अशी परीस्थिती यांचं अतूट नातं आहे. ज्या लहान मुलांनी साखळी हत्या केल्या आहेत ते लहानपणीच अशा वातावरणामुळे घरातून बाहेर पडतात किंवा दारू / गर्दच्या आहारी जातात. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं पाहायचं तर अनेक सिरीयल किलर्सना अशा परिस्थितीत राहावं लागलं, आई किंवा वडील कोण आहेत याचाच पत्ता नव्हता, पालकांची सततची भांडणं, वेगळं होणं किंवा अनैतिक संबंध, वैवाहिक बलात्कार अशा अनेक प्रसंगांना सामोरं गेल्यानं भावना उमलत्या वयातच कोमेजून गेल्या. त्यांच्या कुंडलीत कुटुंब स्थान बिघडलेलं असणं अगदी नियमित गोष्ट होती. मातेचा आणि मनाचा कारक चंद्र बिघडलेला असून पित्याचा कारक रवि अत्यंत वाईट स्थितीत होता. कौटुंबिक सौख्याच्या अभावामुळे प्रेम काय असतं याची कल्पनाच यांना नव्हती. चंद्र आणि मंगळ यांच्या विचित्र योगांमुळे क्रौर्य विकसित झालं. ही मुलं लहानपणी प्राणी, प्राण्यांचे मृतदेह यांची विटंबना करतात. त्यातील आसुरी आनंद कुंडलीतील चंद्र प्रतिबिंबित करतो.       

कौटुंबिक अन्यायात प्रामुख्यानं एक मुद्दा पुढे येतो तो म्हणजे लैंगिक अत्याचार. लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचं प्रमाण पश्चिमी देशांत थोडं जास्त असलं तरीही भारतात याचं प्रमाण नक्कीच विचारात घेण्याइतपत आहे. आपल्या समाज संस्थेमुळे याला अनेकदा वाचा फोडली जात नसली तरी हे प्रमाण काही नगण्य नाही. अनेक सिरीयल किलर्स लहानपणी ह्या दुर्दशेतून गेले आहेत. आणि ह्याच मुळे त्यांच्या भावना निरागस राहिल्या नाहीत. दुर्दैवानं घरातूनच याची सुरुवात होते आणि पुढे ही मुलं डोळ्यासमोर तीच चित्रं ठेवून वाईट वर्तन करतात. ज्या लिंगी व्यक्तीनं त्यांच्यावर अत्याचार केले होते त्या लिंगी व्यक्तींना छळून त्यांची हत्या केली जाते. मानसशास्त्रानुसार असे अन्याय करताना ते गुन्हेगार त्यांच्यावर झालेले अन्याय आठवून त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीलाच जणू त्रास देत आहोत अशा भावनांमध्ये जगतात. काही तज्ज्ञांच्या मते हे सिरीयल किलर्स भावनाशून्य असतात. माझ्या मते ते भावनाशून्य नसून केवळ सूडाच्या भावनेनं पेटलेले असतात. जवळपास सर्वच सिरीयल किलर्स ह्यामुळे लैंगिक छळ करून हत्या करतात किंवा विशिष्ट लिंगी व्यक्तींच्या हत्या करतात. त्यांना आपण काय करतो आहोत याची पूर्ण जाणीव असते अन्यथा ते वेडेपणाने ग्रासले आहेत असं म्हणता येईल. पण ते आयुष्यात इतर वेळी इतके चांगले वागतात, नोकरी / व्यवसाय करतात, लग्नंही करतात पण ही सुडाची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 

समलैंगिकता हाही एक महत्त्वाचा मुद्दा यात येतो. समलैंगिकतेला अजूनही अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानं अनेक गुन्हेगार समलिंगी व्यक्तींची हत्या करतात. आपण समलैंगिक आहोत हे समाजाला कळू नये म्हणून हे टोकाचं पाऊल उचललं जातं. समाज, धर्म, पालकांचे विचार यांचा पगडा हे यामागील प्रमुख कारण. घरातीलच समलिंगी व्यक्तीनं केलेले अत्याचार हेही यासाठी कारणीभूत ठरतात. धार्मिक स्थळं, चित्रपट क्षेत्र अशा अनेक ठिकाणी समलैंगिक अत्याचार सर्रास होत असतात. लहान मुलांनी याला वाचा फोडली तरी पूर्वी याकडे दुर्लक्ष केलं जात असे. पण आता याबद्दलचे कायदेही बदलले आहेत आणि पालकही जागरूक होत आहेत. त्यामुळे आता असे अत्याचार कमी झाले आहेत. 

वरील दोन्ही मुद्द्यांमध्ये कुंडलीतील शुक्र, चंद्र आणि मंगळ हे प्रमुख ग्रह आहेत जे अशा गुन्ह्यांसाठी कारणीभूत आहेत. पालकत्व म्हणजे नुसतंच जन्म देणं नव्हे हे ज्यांना समजत नाही असे पालक असल्यानं अशा गुन्हेगारांचं कुंडलीतील कुटुंब स्थान बिघडलेलं असतं. त्यात मंगळाची भर पडली तर हत्येसारखा गुन्हा घडतो. अशुभ शुक्र, सप्तम स्थान अशुभ योगात असणं ही कुंडलीतील प्रमुख कारणं आहेत. कुटुंब स्थानचा स्वामी शुभ ग्रह असला तरी पाप कर्तरी योगात असतो किंवा पाप ग्रहांनी दृष्ट असतो. जेव्हा अशुभ ग्रहांच्या महादशा - अंतर्दशा असतात तेव्हा हे गुन्हे प्रत्यक्षात घडतात. या शिवायही अनेक कारणांमुळे असे गुन्हे घडतात, मी प्रमुख कारणांचा इथे विचार केला आहे. 

आता प्रत्यक्ष साखळी हत्येमागील गुन्हेगारांनी दिलेली कारणं पाहू. बहुतांशी गुन्हेगारांच्या मते साखळी हत्या ही लैंगिक समाधान, द्वेष वा राग यापेक्षा दुसऱ्याला ताब्यात ठेवण्यासाठी असते. आपण एखाद्यावर अत्याचार करतो म्हणजे त्याला सुटकेचा वाव देत नाही. इथे आपण त्या बळी जाणाऱ्या व्यक्तीला कसं ताब्यात ठेवलं आहे ही भावना खूप सुखावते. अशा अबल, निःशस्त्र व्यक्तीला छळून लहानपणी जे अत्याचार झाले आहेत ते पुन्हा जगले जातात. मानसिक संतुलन बिघडल्यानं (वेड नाही) आपल्यावरील अन्यायाचा पुन्हा पुन्हा विचार केला जातो आणि अशी कृत्य घडतात. हे गुन्हेगार ओलिस ठेवलेल्या व्यक्तीला माणूस नाही तर एक वस्तू समजतात. कुंडलीतील बिघडलेला चंद्र जर राहू किंवा केतू युक्त असेल तर अशी भावना तयार होते. कारण राहू हा सूडाची भावना देतो आणि केतू एखाद्या व्यक्तीला निर्जीव वस्तू समजून त्याचा छळ करण्याची मानसिकता देतो. राहूमुळे हत्या करणं हे एक अन्यायाचा सूड घेण्याचं तंत्र ठरतं. आणि केतू माणुसकी नष्ट करतो. म्हणूनच कुंडलीतील हे योग खूप महत्त्वाचे ठरतात. बिघडलेला मंगळ असेल तर रक्तपाताला न घाबरता अशा हत्या करण्याचं सामर्थ्य मिळतं. चलित गुरु, राहू, केतू आणि रवि यात महत्त्वाचे ठरतात. तसंच हा अन्याय गुन्हेगारावर झालेला असल्यानं शुक्र वक्री किंवा अशुभ असतो.                

काही गुन्हेगारांच्या म्हणण्यानुसार समलैंगिकतेमुळे त्यांच्या भावना कधीच व्यक्त झाल्या नाहीत. म्हणून एखादी समलैंगिक व्यक्ती आयुष्यात आली तर ती जाऊ नये म्हणून त्या व्यक्तीला मारून तिच्या शरीराचे काही भाग कापून जवळ ठेवले जातात किंवा त्या व्यक्तीचं शव जवळ ठेवलं जातं. जेणेकरून ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांच्या संपर्कात आहे असं वाटतं. अशावेळी शुक्र हा विशेष भूमिकेत येतो. अत्यंत वाईट स्थितीतला शुक्र आणि मंगळ यामुळे समलैंगिक गुन्हेगार या मार्गाकडे वळतात. मानसिक असमाधान हे कारण जरी असलं तरीही ते लैंगिक बाबतीत असल्यानं शुक्र प्रमुख भूमिकेत येतो. जर बळी जाणाऱ्या व्यक्तीचा छळ केला गेला तर पुन्हा राहू आणि केतू कारणीभूत असतात. समलैंगिकतेमुळे आलेला एकटेपणा, समाजानं वाळीत टाकणं अशाही घटना यांच्याबरोबर घडतात. यामुळे अशा घटनांमध्ये शनिचा विचार केला जावा असं माझं मत आहे. शनि एकटेपणा देतोच पण प्रचंड नैराश्य देतो. ज्यामुळे अकल्पित गोष्टी घडतात ज्याला नैराश्य आणि वाईट विचारांची साथ असते. शरीराचे अवयव कापून जवळ ठेवणं, ते खाणं ह्या कल्पना शनिसारख्या ग्रहामुळेच येऊ शकतात. केतू हा मानवी शरीराला एक निर्जीव वस्तू समजून त्याचे तुकडे करायचे या भावनेला कारणीभूत ठरतो. अशा प्रकारच्या कुंडल्यांमध्ये शनि - शुक्र - चंद्र - केतू यांचे योग दिसून येतात.         

काही गुन्हेगारांच्या म्हणण्यानुसार त्यांना वाईट शक्तींनी पछाडलेलं असतं. आणि त्या शक्ती त्यांना स्वप्नात किंवा प्रत्यक्षात आकाशवाणी वा अशाच काही प्रकारे आवाजाच्या माध्यमातून सूचना देत असतात असं ते म्हणतात. या मुद्द्यात मुख्यतः मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असलेले आजार असतात. ज्यामधे स्कित्झोफ्रेनिया, दुहेरी व्यक्तिमत्व असे आजार असतात. याला मूळ कारण प्रामुख्यानं लहानपणी झालेले अन्याय हेच असलं तरी त्याची परीणीती ह्या रोगांमध्येच होते. काल्पनिक विश्व आणि प्रत्यक्ष आयुष्य याचा समन्वय साधला न गेल्यानं असे आजार होतात. मग गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीनुसार त्याला सैतान, अदृश्य शक्ती इतकंच काय देवाकडूनही मनुष्य हत्या करण्याची आज्ञा झाली आहे असे भास होतात. असे आजार असतील तर ते गर्द, दारू अशा व्यसनांमुळे वाढतात किंवा नसले तर व्यसनांमुळे असे भास व्हायला सुरुवात होते. चुकीची औषधं घेणं किंवा डॉक्टरांना न विचारता औषधं वाट्टेल त्या प्रमाणात घेणं यामुळेही विकृती तयार होते. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं विचार करायचा तर बिघडलेला चंद्र आणि षष्ठेश वा षष्ठ स्थान यामुळे हे आजार उद्भवतात. यात मंगळाचा सहभाग असला तरी जाणून बुजून किंवा केवळ एक विकृती म्हणून हत्या केल्या जात नाहीत. तर काल्पनिक विश्वाच्या प्रभावामुळे आपण काय करतो आहोत हेच बऱ्याचदा त्यांना निदान त्या वेळी तरी समजत नाही. काही काळानं गुन्हेगारांना पश्चात्तापही होतोही पण पुन्हा ते त्याच मार्गाला जातात. म्हणजे चंद्र हा भावना नष्ट करतोच पण सारासार विचार बुद्धीही नष्ट करतो. बिघडलेल्या चंद्रामुळे त्यांचा भूतकाळ आणि काल्पनिक विश्व यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. राहू आणि केतूची भूमिका निदान या प्रकरणांत जरी दुय्यम असली त्यांचा प्रभाव असल्यामुळे हत्या घडतात. कधी कधी त्यांचं मन चंद्र, शुक्र आणि शनि सारख्या ग्रहांमुळे इतकं संवेदनशील झालेलं असतं की त्यांनीच हत्या केलेल्या व्यक्तींचे मृतदेह पाहून गुन्हेगारांना भीती वाटते आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी ते पुन्हा व्यसनांचा आधार घेतात. अशा गुन्हेगारांच्या कुंडल्यांमध्ये बारावं स्थान सुद्धा बिघडलेलं असतं. ज्यामुळे व्यसनं हा प्रमुख मुद्दा ठरतो. 

या विषयावर अभ्यास करताना एक खूप वेगळा मुद्दा माझ्यासमोर आला. अनेक सिरीयल किलर्सचे बुद्ध्यांक अतिशय उच्च होते. 'उनाबॉम्बर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणितात डॉक्टरेट मिळवलेल्या टेड कॅक्झिन्स्कीचा बुद्ध्यांक तर आईनस्टाईन यांच्यापेक्षाही जास्त होता. एडमंड केम्पर, जेफ्री डाहमर, डेनिस निल्सन अशा अनेक गुन्हेगारांचे बुद्ध्यांक चांगले होते. म्हणजे केवळ बुद्धीचा अभाव म्हणून अशी कृत्यं घडत नाहीत. तर अतिसंवेदनशील मनामुळे टोकाचे विचार केले जातात आणि त्यातूनच मानसिक आजार उद्भवून असे गुन्हे घडतात. बुद्ध्यांक उच्च असणारे गुन्हेगार हे टोकाचे अहंकारी असतात ज्यांना narcissistic म्हटलं जातं, ज्यात अगदी हिटलरचाही समावेश होतो. जॅक अंटरविगर उर्फ व्हिएन्ना स्ट्रँगलर आणि टेड बंडी हे गुन्हेगार म्हणजे याचं उत्तम उदाहरण. टोकाच्या अहंकारापायी त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. जॅक तर इतका हुशार, अहंकारी होता की पहिल्या हत्येच्या सत्रानंतर तो मोकळा सुटला (parole) आणि त्यानं हत्येच्या मानसिकतेवर आधारून आत्मचरीत्रही लिहिलं. त्याच वेळी तो इतर हत्याही करत होता. टेड बंडी अनेकदा तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला, त्यानं तुरुंगात लग्नही केलं आणि पोलिसांना बुद्धिमत्तेच्या जोरावर फसवून बेकायदेशीररीत्या पत्नीशी तुरुंगात एकांतात भेटी घेतल्या आणि त्यांना एक संततीही झाली. स्वतःचा वकील म्हणून त्यानेच त्याचा दावा सिद्ध करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्याचे आजोबा (आईचे वडील) हेच त्याचे वडील होते ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावर त्याच्या मनात स्त्रीबद्दल एक तिरस्कार तयार झाला. त्यात त्याला एका मुलीनं लग्नासाठी नकार दिला आणि त्याचा अहंकार दुखावला. त्यामुळे हा अति अहंकारी माणूस एक सिरीयल किलर बनला आणि हत्या केलेल्या स्त्रियांच्या मृतदेहाशीही संभोग करण्याइतका विकृत बनला. ह्या सगळ्याचा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर चंद्र आणि रवि बिघडलेले असले तरी उत्तम बुद्धिमत्ता देण्याइतके नक्कीच सुस्थितीत होते. म्हणजे या गुन्हेगारांना वेड लागलं आहे असं पूर्णतः आपण म्हणू शकत नाही. दुसऱ्याला फसवण्यासाठी लागणारा मुख्य ग्रह म्हणजे बुध. याच्या जोरावर हे गुन्हेगार वाक्चातुर्यात प्राविण्य मिळवतात. मात्र हे प्राविण्य वाईट गोष्टींसाठी वापरलं जातं हे दुर्दैव आहे. सप्तम स्थान आणि बुध यांचा संबंध वाईट दृष्टीनं आला की पौरुषत्व, अहंकार अशा गोष्टी वाईट मार्गानं उद्दीपित होतात. अशा गुन्हेगारांच्या बाबतीत लैंगिक अत्याचार हा मुद्दा कदाचित नसेलही पण स्त्रीकडून (विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून) झालेला अपमान हा मुद्दा असतो. आई, पत्नी, प्रेयसी यांच्याकडून झालेला हा अपमान अशा मार्गांनी बाहेर पडतो. स्त्री गुन्हेगारांच्या बाबतीत बोलायचं तर एलिन वुर्नोस (फोटो पहा) हे ह्याचं उत्तम उदाहरण. लहानपणापासून अगदी स्वतःचा भाऊ आणि आजोबांचा मित्र अशा अनेक जवळच्या व्यक्तींच्या वासनेला बळी पडलेली ही गुन्हेगार अगदी मोकळ्या स्वभावाची होती. पण दुर्दैवानं आई वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे लहानपणीच वेश्या व्यवसायात यावं लागल्यानं पुरुषांबद्दल तिला कमालीचा तिरस्कार होता. सात पुरुषांची हत्या केल्यानंतर ती पकडली गेली ज्यात तिनं विश्वासानं आपलं मानलेली तिची समलैंगिक मैत्रिण तिला धोका देऊन गेली आणि एलिनला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करताना स्वतःची मात्र सुटका करून घेतली. पुरुषी वासनेला कंटाळून समलैंगिक बनलेल्या एलिनची कहाणी दुर्दैवी असली तरी तिची मानसिकता समजून घेतल्यास असे गुन्हे घडण्यामागील कारण समजू शकेल. अशा गुन्हेगारांच्या बाबतीत हा काही एका वेळीच झालेला अपमान असेल असं नाही. फार मोठा काळ यात घालवल्यामुळे त्यांची मनस्थिती अशी होते. 



काही गुन्हेगार लहानपणी डोक्याला मार लागल्याचं सांगतात. मेंदूला झालेली जखम आणि त्याचे हे परीणाम असल्याचं डॉक्टरही मान्य करतात. पण मला हे कारण फारसं पटत नाही. केवळ मेंदूला जखम झाली तर त्यात एखादाच व्यक्ती असे गुन्हे करेल असं माझं मत आहे. अनेक गुन्हेगार जेव्हा हे कारण देतात तेव्हा ते मला अनाकलनीय वाटतं. कारण ज्या गुन्हेगारांनी हे कारण दिलं त्यांचा बुद्ध्यांक चांगला होता.    

गुन्हेगारीमध्ये जनुकं किंवा पिढीजात दोष असतात का असा एक प्रश्न नेहमी मला विचारला जातो. माझ्या मते जनुकांमधले हे दोष काहीवेळा आपल्या क्षमतेच्या बाहेरचे असतातही. अशी काही गुणसूत्रं  / जनुकं आहेत ज्यावरून साखळी हत्या सारख्या गुन्ह्यांचा मागोवा आपण घेऊ शकतो. पण केवळ हे परीमाण म्हणजे या विषयाचा अंत नव्हे. किंवा असे दोष असणारे सगळेच गुन्हेगार होत नाहीत. अन्यथा असं संशोधन करून हे गुन्हे थांबवता येतील. पण असे दोष हे फक्त एकच परीमाण आहे, जे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.  

लहानपणी झालेले अत्याचार असोत, कौटुंबिक स्थिती वाईट असो, मेंदूला लागलेला मार असो, जनुकीय दोष असो वा अन्य काही कारण असो, यातला प्रत्येक जण काही हत्या करत नाही. मग काही व्यक्तीच अशा हत्या का करतात? ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून याचं उत्तर द्यायचं तर कोणत्याही वाईट परिस्थितीचा मनावर होणारा परीणाम प्रत्येकावर सारखाच होतो असं नाही. प्रत्येकाची सहनशक्ती वेगळी असते. आपल्या आयुष्यातही आपण पाहतो की एखादं संकट आल्यास घरातील प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं त्याचा सामना करते. त्याचप्रमाणे गुन्हेगारी हा जन्मजात दोष असण्यापेक्षा परीस्थितीमुळे उद्भवलेला दोष असतो. मग अशा अति संवेदनशील व्यक्तींना व्यसनं, एकटेपणा अशा गोष्टींमुळे वाईट मार्गांची चटक लागते, त्यातलीच ही एक. कुंडलीतील चंद्र नक्की कोणत्या पद्धतीनं बिघडला आहे याचं निदान करणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय शनि आणि केतू हे फार महत्त्वाचे ग्रह बिघडले असतील तर नैराश्याची (शनि) परिणीती हत्येमध्ये होते (केतू). मानवता सोडून दुसऱ्या व्यक्तीला एक वस्तू आणि आपल्या सूडाचा एक मार्ग समजण्याची मानसिकता तयार होते. असे ग्रहयोगच गुन्हेगार घडवतात. उदा: टेड बंडीला ज्या मुलीनं लग्नासाठी नकार दिला तिच्यासारख्या दिसणाऱ्या ३० (+) मुलींची त्यानं हत्या केली. निचीचा चंद्र केतूने युक्त असा पंचमात, सप्तमेश शनि लग्नी आणि पंचमात ५ बिघडलेले ग्रह यामुळे प्रेमातील असफलतेमुळे त्यानं अशा हत्या केल्या. दृश्य कारण हेच असलं तरी आईबद्दलचा राग, आईचे तिच्याच वडिलांशी असलेले संबंध आणि त्यामुळे उध्वस्त झालेलं बालपण हे मूळ कारण नाकारून चालणार नाही. नाहीतर नकार मिळालेली प्रत्येक व्यक्ती गुन्हे करत नाही. स्वराशीचा शुक्र कुंडलीत केंद्रात असूनही टेड असा वागला.  

असो, मी अनेक प्रकारच्या कारणांमुळे तयार झालेले गुन्हेगार आणि त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून वरील मतं मांडली आहेत. यात एका क्षुल्लक कारणावरून असे गुन्हे घडत असल्याचं निदान माझ्या तरी निदर्शनाला आलं नाही. फार मोठा काळ आणि तोही आयुष्यातील महत्त्वाच्या वर्षांचा काळ अशा वाईट स्थितीत गेल्यानं असे गुन्हे घडतात असं माझं स्पष्ट मत आहे. पालकत्व किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला यावरून समजू शकेल. अर्थात याला प्रत्येक ठिकाणची संस्कृती, मोकळीक आणि विचारधारा हेही कारण असलं तरी मुलांची वाढ होताना त्यांना चांगल्या पद्धतीनं वाढवणं आणि चांगले पालक होऊ शकत नसतील तर मुलांना जन्मच न देणं अशा उपायांचा विचार व्हायला हवा. मुलांना नकार पचवण्याची सवय लावायला हवी आणि प्रेमानं / वेळ पडल्यास कठोरतेनं समज द्यायला हवी. याचंच उदाहरण म्हणजे भारतातील सर्वात लहान वयाचा सिरीयल किलर अमरदीप (८ वर्ष)  पकडला गेला तेव्हा त्याच्या पालकांनीच त्याला पाठिंबा द्यावा ही संतापजनक गोष्ट आहे. तसंच केवळ समाज काय म्हणेल म्हणून संतती प्राप्ती करून पुढे त्याचे परीणाम काय होतील याचा विचार न करणं हे चांगल्या पालकांचं लक्षण नाही. किंबहुना आपण एक चांगली पिढी घडवणार असू, तरच आपण पालक बनावं किंवा निदान संतती संख्या कमी असावी हे जरी वाचकांच्या लक्षात आलं तरी माझ्या अभ्यासाचं सार्थक झालं असं मी समजेन. जर दुर्दैवानं सुस्थिती असतानाही संकटं आली तर तो नशिबाचा आणि आपल्या संचित कर्माचा भाग असतो. पण विवेक बुद्धीनं आणि जागरूकतेनं वागल्यास आपण भविष्यातील गुन्हे रोखू शकतो हे आपण लक्षात घ्यावं. पालकांनी आपली कर्तव्यं पार पाडली तरीही अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे मुलं वाईट मार्गाला लागू शकतात. पण जे आपल्या हातात आहे निदान ते तरी आपण निश्चित करू शकतो. म्हणूनच बाकी मुद्द्यांवर न लिहिता मी पालकत्व या मुद्द्यावर भर दिला आहे.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
       ==============================================

Every person's nature is different. By understanding the flaws sometimes we try to adjust with somebody or try to change our self. Some taints are really difficult to tackle, for example killer instincts. Due to some virile reason a person kills another person. Nonetheless some people kill many strangers with some time interval without any apparent motive but mere psychological gratification. Such killers are called as serial killers. Serial killing is not common in India though it is not rare. When a killer kills many people at a time then he is known as a mass killer. But this may not be predictive that the killer will kill again. Serial killers exist almost everywhere in the world, but their number is much higher in USA. I specifically chose this topic as the youngest serial killer is (dismally) from India. Amardeep Sada (see photo) was only 8 years old when he committed this gruesome crime and killed 3 infants including his 8 months old sister. There are many kids in the world aging from 10 years who have become serial killers. Rather it will be a wonderment if we do not have this question raised in our minds that how these kids can commit such crimes at such a tender age. 



Practically speaking the psychological motives behind murders include extreme anger, jealousy, revenge, financial gains, cheating or physical attraction. Many time the rage stops by killing the targeted person. But in case of serial killers this emotional rage goes on and on. From astrological point of view some planets / yogas are prominent in cases of murders. The Gana in kundli matters a lot, which I have considered as the first criteria. Human nature has been divided in three Ganas Dev (God), Manushya (Human) and Rakshas (Demon), which depends on the Moon sign and the Nakshatra. As the name suggests people with Rakshasa Gana tend to be more strict and with lesser emotions. When Moon is debilitated and other yogas are extremely inauspicious then the person might commit a crime like murder. When inauspicious Mars also supports such Moon then the dark fantasies like murders actually eventuate in real life. Mars gives the courage and is also responsible for bloodshed, thus when it is inauspicious, it evokes such heinous crimes. Of course the planets responsible for the root cause of murders should be equally effective when such crimes occur. Like when murders occur due to physical attraction or one sided love, then Venus will come into picture and should be inauspicious. If murders occur due to financial reasons then the second house lord and Jupiter are deteriorated. The inauspicious planets like Rahu and Ketu (Paap grahas) are equally influential in these cases. The minds of the criminals becomes turbulent when Moon or Mars are in yogas with Rahu or Ketu or sometimes Saturn. Moon which governs our minds if situated in a bad position, becomes a prominent reason for the crimes like murders. If Moon in the kundli is very auspicious then it is highly unlikely that a crime like murder can occur. The position of Sun, though secondary when it comes to the crimes is definitely a point to be considered. Sun not only gives aggression but if it is in conjunction with Rahu or Ketu it gives revengeful thoughts. When such conjunctions are there in the kundli the criminals take a long time to commit the murders even though they have revengeful thoughts in their minds.

When it comes to serial killers many aspects come into play. The first and important one is the background of these criminals. Almost all the serial killers come from a dysfunctional family. There are many issues like separation of parents, disputes, addictions or problems in parenthood etc. I strongly feel when the brain of the child is growing the child is in a critical stage of life. Exactly at the same time when child faces such circumstances there are more chances that the child gets affected in a negative way. Some humanitarians claim that these traumas in childhood can not be related to the crimes committed in adulthood. I am not at all justifying human killing, but I have a clear opinion that the trauma in childhood definitely reflects in adulthood and plays a vital role in defining the nature of a person. The children raised in a good environment and affection will hardly turn towards such crimes. And if they do commit such heinous crimes then the apparent family situation is a hoax and some thing more must have happened behind the doors. The dysfunctional family background many times creates a hatred for a particular gender. Sometimes this hatred reflects in childhood and sometimes in adulthood. A good treatment can help these children if treated in time. But this is totally not related to the crimes like murders is not acceptable. When children experience such grating situations at the budding age they tend to become harsh and sometimes emotionless in the adulthood. This is the reason we respect family values. The hormonal changes of the children in growing age and such conditions have inseparable relation. The serial killers who have faced such situations usually leave the home at very young age or get addicted to drugs / alcohol. Thinking from astrological point of view many serial killers came from dysfunctional families and had to experience extreme circumstances like parental disputes, unawareness of biological parents, illicit relationships of family members or marital rapes etc. which withered their tender emotions at a very young age. The second house (family) in their kundlis was absolutely debilitated which was a very common factor due to obvious reasons. Due to such factors lack of affection was a prevailing factor. An inauspicious yog between Moon and Mars created cruelty and psychopathy in some cases. Mostly these children expressed their emotions by torturing animals or playing with animal carcasses. The evil emotions were reflected by the debilitated or inauspicious Moon in their kundlis. 

The dysfunctional family background also highlights one more point and that is sexual harassment. Though pedophilia is more common in western countries it is not uncommon in countries like India. Albeit it is not documented due to social pressure here but it is definitely not negligible. Most of the serial killers have gone through such devastating experiences and this explains why their tender innocent emotions were harmed. Sadly the pedophilia begins at home and these children whoi are victims, keep the same picture in front of their minds and behave inhumanely in future. They tend to torture or kill the people of same gender, which have traumatized them in their childhood. According to psychological analysis they relive the same torture and assume that they are torturing the same person. Some analysts think that serial killers are emotionless morons. But I think they are not emotionless but in fact have very strong emotions of revenge, though they become ruthless due to the trauma. Most of the serial killers prefer to torture the victims first and then kill them or attack victims of a particular gender, due to their traumatizing past. They are aware of what they are doing otherwise they can be categorized as insane. But in their day to day life they behave so normally like they work, get married and / or have kids but the revengeful thoughts cause the anxiety and disquietude.    

Sexual orientation precisely homosexuality is also a very important parameter here. Even today homosexuality is not accepted openly in our society. Thus many serial killers with homosexual orientation have killed their homosexual partners or victims of  same gender. Due to social pressure these criminals are bound to hide their feelings and the outrage results in killing or torture of the victims. The crub of society, religion or parental views puts immense pressure on the minds of homosexuals in many cases. As a consequence of this sexual assault sometimes begins at home. These kinds of assaults are especially common at religious places or in film industry. Decades earlier when children tried to expose these assaults they were either neglected or the children were pressurized. Thankfully today such harassment cases are not disregarded and parents also remain alert about the safety of their children. This has significantly reduced the number of such assaults.  

In both the above mentioned points Venus, Moon and Mars play a vital role and become responsible for the crimes related to sexual assaults. The killers who were once victims of such assaults have a very inauspicious second house and planets related to the house in their kundlis. The reason behind this is  their parents who do not understand the concept of 'parenthood', which is not just giving birth to the next generation. Inauspicious Venus and seventh house in the kundli are the primary reasons behind such consequences. Even if the lord of the second house is a good planet it is placed in the 'pap kartari' yog or aspected by some powerful inauspicious planet. The crimes actually occur when the Mahadasha or Antardasha of such inauspicious planets are running. There are numerous external reasons behind the heinous crimes but I have focused on major reasons affecting the criminals' minds. 

Now lets consider the reasons given by the serial killers which according to them, 'compelled' them to commit the crimes.  Most of the killers stated that serial killing is not about sexual pleasures, jealousy or anger but it is all about having full control over the victim. While torturing the victims they get a feeling that victims can not escape the situation and this possession gives the killers a strange pleasure. The killers relive the same tortures which they had faced in their childhood by re enacting using helpless victims. The disturbed minds of the criminals (not insanity) recollect those bad memories again and again and thus repeat the torture procedures on the victims. They abduct the victims and consider them as their slaves or non living toys. When Moon in the kundlis of such criminals is debilitated or in conjunction with Rahu or Ketu, boosts the psychopathy. As Rahu supports the feeling of revenge and Ketu makes them consider other human as a non living thing. Rahu supports the dark fantasies of killing, which is taken as a way of getting revenge and Ketu makes them inhumane. This is why these planets are vital while analyzing the kundlis of serial killers. If inauspicious Mars supports such yogas then it removes the fear of bloodshed and encourages for killings. Horary Jupiter, Rahu, Ketu and Sun are all important planets in these cases. Also as the serial killers were once victims of the torture or assault, Venus is either retrograde or inauspicious. 

Some killers mention that the homosexuality separated them from the society as they could not express their feelings. So when a person of same sexuality comes into their lives they become possessive and despicable to such a level that they kill the victim, cut their body parts and keep with them or keep the dead body near them for a long time. This makes them feel that the victim is near them in some or the other form, which can be the victim's body part too. In such cases Venus in the kundlis comes into play. A deadly combination of miserable Venus and Mars trigger the dark fantasies of homosexuals. Mental in-satisfaction can be the apparent reason but the roots of the issues lie in sexual (dark) fantasies which are not fulfilled in normal life where Venus plays a major role. Rahu and Ketu come into picture when the victim is not only abducted but tortured and killed. Rejection due to homosexuality in many cases cause loneliness or even ostracism.  I feel Saturn is the planet to be considered here. Inauspicious Saturn not only gives loneliness but also gives pessimistic thoughts / depression due to various circumstances. This also triggers the execution of the dark fantasies which are encouraged by depression. Such Saturn can cause weird crimes like cannibalism or keeping body parts of the victims. Again Ketu gives a ruthless psyche where human body is considered as a non living source of possession. These type of kundlis show different yogas between Saturn - Venus - Moon and Ketu. 

Some serial killers say that they are possessed by demons or evil powers. These powers 'order' them to kill others through dreams or voices (auditory hallucinations). This manifests the psychological disorders which are many times not diagnosed properly. These include schizophrenia, dual personality disorder, auditory hallucinations etc. The main ground is usually the assaults occurred in the childhood which emerge in the adulthood as psychological disorders. The obvious imbalance between the fantasy world and the real world causes these disorders. Then According to the intensity of assaults faced by the criminal they hallucinate different entities like Satan, demon or even God who 'order' them to kill. Such hallucinations worsen with time and addictions like drugs or alcohol. The addictions not only worsen the symptoms but also cause the disorders if not present earlier. Too much consumption of the prescription drugs especially without doctor's advice also adds to the whimsical behaviour and psychopathy symptoms. From astrological point of view inauspicious Moon and sixth house or sixth house lord cause these mental health issues. Some times if Mars is involved then the killing is not only a disorder or a purposely committed crime but unknowingly the criminals kill the victims. Mostly at the time of killing either they are under the effect of drugs or psychopathy drifts where the fantasy world overcomes the real world. In some cases some killers repent after they realize what they have done but their mental instability drives them towards their fantasy world again. The inauspicious Moon not only makes them emotionless but also kills their thinking power. This Moon forces them to stay in their fantasy world rather than real world. Rahu and Ketu may play a secondary role in this type of cases but definitely contribute in murders as mentioned earlier. Sometimes the killers become so sensitive that they get scared after viewing the gory scene created by themselves but again they take help of addictions to come out of the trauma. Such criminals also have inauspicious twelfth house in their kundlis which contributes to their habit of using drugs / alcohol as a remedy to calm their minds. 

I came across another strange point while studying the serial killers. Many of the serial killers have higher IQs. Famous 'Unabomber', Ted Kaczynski a PhD holder in mathematics, had his IQ even higher than Einstein. Edmind Kemper, Jeffrey Dahmer, Dennis Nilsen are some of the notable killers who had very high IQs. This shows that lack of intelligence is not the reason behind the serial murders. In fact intelligent but over sensitive minds of the killers are prone to psychological disorders which cause the crimes. Usually the intelligent killers are narcissistic too, this can also be proved by the example of Adolf Hitler. The best examples of narcissistic serial killers the Vienna strangler - Jack Unterweger and Ted Bundy. Extreme ego and pride disturbed their mental balance. Jack Unterweger was such a clever murderer that he managed to get released on parole, wrote his autobiography and at the same time kept on committing murders. Ted Bundy successfully broke out of prison a lot of times, he got married while in prison and also manipulated prison officers for illegal conjugal visits and fathered a baby girl. During trial he unsuccessfully advocated himself but was finally executed. When he came to know that his maternal grandfather is his biological father, he started hating females. In all this a girl whom he loved a lot rejected his marriage proposal and this narcissistic person transformed into a serial murderer and a necrophiliac. From astrological point of view his Moon and Sun were definitely bad but not inauspicious so he got cleverness and could even manipulate police. This proves that insanity can not be linked to these kind of criminals. Mercury plays an important role when people manipulate others. A properly placed Mercury in these criminals' kundlis furnishes them with the power of manipulation and talking skills. Sadly this natural gift is utilized in a wrong way. When seventh house and Mercury are connected in some way, it affects manhood and ego in an unsettling way. In such cases sexual assaults in childhood are not so common but abasement or abuse from an opposite gendered person is a vital factor. In cases of males an disgrace due to mother, sister, lover or wife bursts out as extreme obloquy. While talking about female criminals I can not stop myself mentioning about Aileen Wuornos (see photo). From her early childhood always smiling Aileen, was an easy prey for her own brother and her grandfather's friend.  Due to mere negligence from her parents she had to start prostitution at a tender age and started hating males. She was even betrayed by her homosexual partner whom she loved and trusted a lot, helped the police to catch Aileen after committing 7 murders. After years of sexual exploitation by males finally Aileen became a homosexual. Her story is definitely sad and painful but if we analyse her past and her mental instability it will shed light on her killing spree. In these cases such abuse is definitely not a one time incidence. Such psyche develops after years of abuse and assaults. 


A very common reason provided by serial murderers is that they had a significant injuries on their heads in childhood. Even doctors agree to the theory that such wounds can cause drastic changes in the psychology. I really doubt that these unspecified head injuries can be related to the murders committed in adulthood. I think in rare cases this can be the manifestation of the injuries but commonly linking this factors to killing spree is not acceptable. As many of the serial murderers who claimed that they had such injuries had a very good IQ and presence of mind.        
   
Many people ask me whether genetic disorders can be linked to the crimes like serial killing. In my opinion many times genetic disorders are highly unpredictable. We can trace the behavioural patterns like crimes by studying DNA. But this can not be the full proof evidence to prove that the accused is a criminal. I feel genetic disorders are not predictive to full extent otherwise every person with same genetic pattern will certainly become a serial murderer. And it will become very easy to stop such crimes on the basis of genetic analysis. I feel this can be one of the criteria of analyzing but it will depend on various other factors and can not be used in legal trials as a full proof against the accused. 

Not every body who faced assaults in childhood, had dysfunctional family, had head injury or genetic disorder becomes a serial murderer. Then why some people with similar background become criminals but not all? From astrological point of view, I feel that everybody gets affected by such circumstances in a different way. Everybody has different level of tolerance. Even we can observe the same pattern in our day to day life. Every person in our family reacts differently to the same situation. Similarly I feel criminal behaviour is rather a result of various experiences of life than a genetic disorder. When such sensitive people get addicted to drugs or alcohol, in the same way murders become their addiction. I feel one should not only focus on inauspicious Moon but should think about the yogas or reasons behind such Moon. When Saturn or Ketu are debilitated or badly placed then depression (Saturn) can lead to murder (Ketu). This combination compels them to behave with such a mindset that they consider victims a way to overcome their past. Such planetary combinations create criminals. Viz; When Ted Bundy was rejected by a girl whom he loved so badly that he killed more than 30 girls who looked similar to the girl who rejected him. A debilitated Moon in the fifth house with Ketu, seventh house lord Saturn in ascendant and 5 inauspicious planets in the fifth house in the kundli of Ted made him so sensitive and narcissistic that he started murdering after the rejection which became the triggering factor. Then again, this is an apparent reason as the real trauma was his hatred for his mother, incestuous relationship between his mother and grandfather and his disturbed childhood. This reason is of utmost importance as every man who gets rejected doesn't become a murderer. Though a good Venus in it's own sign was present in Ted's kundli it could not stop his murderous thoughts. 

Well, I have studied the kundlis of many serial murderers who came from different backgrounds. I never observed that a small reason created these monsters. Constant abuse for a significant period of time that too at a very crucial phase of life was the obvious reason for the crimes to occur. This depicts the importance of 'parenthood' in real terms. Of course the factors like cultures, ideologies do matter. I think practical remedies like being good parents or not to become parents if it is not possible should be taken into account seriously. Children should be taught to digest rejection either gently or harshly if needed. The reason I am putting this point is when the youngest serial killer 8 years old Amardeep Sada (India) was arrested his parents supported him and were in a denial position, which was harrowing. Giving birth to the progeny just under social pressure is also not a sign of good parenthood. I will be grateful if the readers can understand the importance of parenthood and think about having children if they can become good parents or at least having few number of children depending on their capacity. If crisis suddenly occurs it can be the result of Sanchit Karma and destiny. But by awareness and rational thinking we can definitely stop creating future criminals. I would like to mention that other than parenthood there are many factors responsible for crimes. Nevertheless I have focused on parenthood as this factor is of utmost importance and under our control.               

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
        ============================================== 

No comments:

Post a Comment