Tuesday, 10 March 2020

मनुष्येतर प्राणी आणि ज्योतिष शास्त्र (Non human creatures and Astrology)


हल्ली पाळीव प्राणी किंवा शेतीसाठी लागणाऱ्या प्राण्यांची सुद्धा कुंडली पाहिली जाते असं कुठेतरी वाचनात आलं. मनुष्य योनी सोडली तर इतर प्राण्यांसाठी हे शास्त्र लागू पडतं का असा एक प्रश्न मला विचारण्यात आला. वैदिक ज्योतिष शास्त्राचा विचार करून या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी मी हा लेख लिहिला आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्र हे केवळ आणि केवळ मानव जातीसाठी आहे. त्या शास्त्राचे नियम ओढून ताणून इतर प्राणिमात्र, देश, राजकीय पक्ष अशांसाठी वापरू नये हे माझं स्पष्ट मत आहे. कुंडलीतील ग्रह - सर्व स्थानं आणि त्यांचं अधिपत्य यांचा वापर केवळ मनुष्य जातीसाठीच असावा. मग ज्योतिष शास्त्रात प्राण्यांचा उल्लेख कसा येतो? आणि त्याचा पाळीव प्राण्यांशी कसा संबंध जोडला जातो ते आता पाहू. 

आपल्या शास्त्रानुसार प्रत्येक देवतेला वाहन म्हणून एक प्राणी दिलेला आपण पाहतो. उदा: गणपतीचं वाहन उंदीर तर शंकराचं वाहन नंदी आहे. यामागे असलेल्या अनेक सुरस कथा आपण पुराणांत किंवा इतर ठिकाणी वाचतो / ऐकतो. या कथांची इथे तपशीलवार माहिती देणं शक्य नाही. पण या सगळ्याचं मूळ कारण अतिशय शास्त्रशुद्ध आणि समर्पक आहे. कोणत्याही प्राणिमात्राचं महत्त्व मनुष्याच्या नजरेत कमी होऊ नये यासाठी आपल्या शास्त्रांत अनेक प्राण्यांना देवतेचं वाहन म्हणून स्थान दिलेलं आहे. मनुष्य स्वभाव स्वार्थी असणं नैसर्गिकच आहे. त्यामुळे आपल्याला दृश्य स्थितीत तरी उपयोग नसणाऱ्या कोणत्या लहानसहान प्राण्याचाही अपमान वा विनाकारण हत्या होऊ नये आणि निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून हा सगळा प्रपंच. आता हे कारण प्रत्येक जण समजून घेईलच याची शाश्वती नाही. म्हणून एखाद्या देवतेचं वाहन म्हणून जर स्थान दिलं तर त्याची निदान काही प्रमाणात तरी विटंबना थांबेल हा याचा मूळ उद्देश. म्हणूनच अगदी वाघ सिंहापासून ते कावळ्यापर्यंत अनेक प्राणी पक्षांचा यात समावेश केला गेलेला आपल्याला दिसतो. निसर्गाचा इतका विचार आपल्या शास्त्रात केला गेला आहे याचा मला नितांत आदर आणि अभिमान आहे. 

माणसाच्या कुंडलीनुसार त्यानं कोणते प्राणी पाळावे किंवा कोणत्या प्राण्याची उपासना करावी अशी काही माहिती काही ठिकाणी दिलेली आढळते. यामागे कारणं वेगळी आहेत. मुख्य म्हणजे प्राण्यांशी संबंधित व्यवसाय असणारे जे लोक आहेत उदा: शेतकरी, खाटीक इत्यादी अशा व्यक्तींनी कोणते प्राणी पाळल्यास जास्त फायदा होईल हे केवळ निसर्गाला धरूनच नाही तर त्यांच्या उपजिवीकेसाठीही उपयुक्त ठरतात. अशा वेळी गरज नसताना किंवा व्यवसायाशी संबंधित नसलेल्या प्राण्यांची फरफट होऊ नये हा मुद्दा असतो. असे व्यवसाय नसणाऱ्यांसाठी दोन प्रकारचे सल्ले दिलेले आढळतात. एक तर पाळीव प्राणी कोणता असावा किंवा एखाद्या प्राण्याची उपासना करणे हा एक ज्योतिष शास्त्रीय उपाय असतो. यामागील तत्त्वंही आता समजून घेऊ. अनेकांना घरात पाळीव प्राणी असावा असं वाटतं. त्यामागे अनेक कारणं असली तरी प्राणीप्रेम, घराची सुरक्षा ही मुख्य कारणं दिसून येतात. पाळीव प्राणी घरात ठेवायचा असेल तर कुंडलीनुसार कोणत्या प्राण्याच्या कोषांमुळे घरात चांगली ऊर्जा येईल हे पाहिलं जातं. कारण मनुष्य जन्माचं चक्र समजून घेतलं तर ८४ लक्ष योनींमध्ये फिरणाऱ्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या जन्मी प्राण्याच्या वा कीटकांच्या रूपात जीवन जगतात. त्यामुळे प्राण्यांच्या भोवतीही सप्तकोष असतातच. मनुष्य कुंडलीनुसार कोणत्या प्राण्यापासून चांगली ऊर्जा मिळेल याचं निदान होऊ शकतं. मग असा प्राणी जर घरात असेल तर त्यामुळे निश्चितच फायदा होतो. पूर्वी अनेक लोक कावळे, सरडे, सापसुद्धा पाळत असत. आजकाल काही नियम आणि संस्कृतीनुसार झालेल्या विचारांच्या बदलांमुळे पाळीव प्राण्यांची व्याख्या बदलली आहे. पण घरात चांगली ऊर्जा वाढवणं हा प्राणिपालनाचा प्रमुख उद्देश आहे. केवळ प्राणिमात्राचं सौंदर्य हा मुद्दा गौण आहे. आता याचं एक उदाहरण देते. श्वान / कुत्रा हे राहू वा केतूचं प्रतीक आहे. त्यामुळे राहू - केतूचे अगदी साधारण दोष असतील तर घरात कुत्रा असावा असं सांगितलं जातं. ह्याचाच पुढील भाग म्हणजे एखाद्या प्राण्याची उपासना करणे. जेव्हा कुंडलीनुसार एखाद्या प्राण्याची उपासना, त्याला विशिष्ट पदार्थ विशिष्ट मुहूर्तावर खायला देणं किंवा तंत्रशास्त्रात विशिष्ट रंगाच्या प्राण्याची सेवा करणं असे उपाय दिलेले असतात तेव्हा त्याचा संबंध त्या कुंडलीतील ग्रहांशी असतो. प्राणी पालन आणि विशिष्ट आराधना यात फरक आहे. जसं प्रत्येक ग्रहाचं कारकत्व असतं तसंच प्रत्येक ग्रहासाठी एखादा प्राणी नेमला आहे. मग कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ग्रहांची वाईट फळं कमी करण्यासाठी एखाद्या प्राण्याची आराधना सांगितली जाते. एखाद्या ग्रहासाठी एखादं रत्न सांगितलं जातं तसाच हा मार्ग आहे. ही आराधना करताना तो प्राणी पाळलाच पाहिजे असंच काही नाही. वैदिक आणि विशेषतः तंत्रशास्त्रात अनेक मार्गांनी ही आराधना सांगितली आहे. उदाहरणार्थ काही अडचणींसाठी काळ्या कुत्र्याला ७ दिवस पोळी खायला द्यावी असा एक उपाय असतो. मग यात तो कुत्रा घरचाच असला पाहिजे असं नाही. रस्त्यावरील कुत्र्याला खायला देऊनही योग्य तो परीणाम साधता येतो. यामागे ग्रहांचे परीणाम, पापक्षालन असे अनेक उद्देश असतात. 

आता मुद्दा येतो तो प्राण्यांवरील ज्योतिष शास्त्रीय परीणामांचा. मुळात प्राण्यांची कुंडली बनू शकते यावर माझा कोणताही विश्वास नाही. कुंडली ही मनुष्य जातीसाठी आहे ज्याला आयुष्यातील काही नियम आणि भावनांच्या आधारे आयुष्य जगायचं आहे. मनुष्य जन्म मिळताना ह्या सर्व गोष्टींमुळे त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. मात्र मनुष्येतर प्राणी म्हणून जन्मताना ह्याचा संबंध नसून केवळ तीन कर्मांच्या आधारे ते भोग भोगून पुढील वाटचाल करायची असते. त्यात भावना, आयुष्याचे सामाजिक नियम असा कोणताही भाग नसून केवळ निसर्ग नियमांच्या आधारे तो प्राणी आयुष्य जगतो. प्राण्यांचे जगण्याचे नियम नसतात असं मुळीच नाही. पण त्यात निसर्गात टिकून राहणं आणि आपली प्रजा वाढवणं हेच उद्देश असतात. मनुष्याच्या आयुष्यातील घटना उदा: शिक्षण, विवाह, अर्थार्जन वा कोणतीही (मनुष्यासारखी) भावना याचा संबंध प्राण्यांच्या आयुष्यात येत नसल्यानं त्यांची जन्मवेळ पाहून त्यांची कुंडली मांडणं ही केवळ अतिशयोक्ती आहे. प्राण्यांच्या भावना (उदा: कुत्रा) ह्या प्रेमाच्या मानल्या तरी मनुष्यासारख्या सर्वंकष भावनांचा यात समावेश होत नाही. एखाद्या प्राण्याभोवती त्याला 'जीव' असल्यानं कोष जरूर असतात मात्र त्याचा संबंध केवळ प्राण्याच्या जीवन मरणाशी असतो. आजकाल काही ठिकाणी प्राण्यांची जन्मवेळ पाहून त्यांची कुंडली बनवली जाते. आणि तो प्राणी पाळला तर काय फळ मिळेल याचं गणित पाळणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीचा आधार घेऊन केलं जातं. पश्चिमी देशात प्राण्यांच्या सूर्य राशीवरून हे गणित मांडतात. हे गणित अनाकलनीय आहे. कोणत्याही प्राण्याच्या कुंडलीमधील स्थानांवरून भाकीत करणं शास्त्रशुद्ध नाही. प्राण्यांवर ग्रहांचा परीणाम नक्कीच होतो पण मगाशी नमूद केल्यानुसार तो केवळ कर्मांचा भाग असतो. कुंडलीतील स्थानं उदा: पंचम (संतती) स्थानावरून प्राण्यांचाही संततीचा विचार करणं अशक्य आहे. मी आधीच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे मेदनीय ज्योतिष या प्रकारात कोणत्याही देशाची कुंडली मांडून पंचम स्थानावरून लोकसंख्येचा विचार केला जातो तसाच हा भाग आहे. मला ही दोन्ही गणितं पटत नाहीत. माझ्या मते प्राणीप्रेम असण्यात काहीच वावगं नाही. पण त्याचा अतिरेक होऊन त्याचं रूपांतर प्राणी आणि मनुष्याची कुंडली जुळते आहे का अशा रीतीनं व्हावं हे अयोग्य आहे. 

माझ्या ह्या लेखाचा भावार्थ हा की प्राण्यांची स्वतंत्र कुंडली मांडणं हा भाग शास्त्राला धरून नाही. कोणत्या प्राण्याची आराधना करावी किंवा कोणता प्राणी पाळावा हे मनुष्याच्या कुंडलीवरून सांगणं अगदी योग्य आहे. पण त्याचा अतिरेक करून कोणत्यातरी प्राण्याच्या कुंडलीवरून आपण तो प्राणी घरात ठेवावा हे गणित मात्र सर्वथा अयोग्य आहे. आणि अशा प्रकारच्या कोणत्याही गणिताचा आधार घेऊन आपले निर्णय आपण घेऊ नयेत.           

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
        
     ===============================================

I recently heard about pet astrology and even astrology used for cattle by farmers. I was asked about the credibility of the application of astrology on (non human) animal species. So I have written this article to shed some light on this topic from Vedic astrology point of view. 

Vedic astrology is an important facet meant only for human species. I strongly opine that the horoscopic astrology should not be stretched and used as per our convenience for predictions like pet astrology or mundane astrology. The predictions based on planetary positions, houses and their sovereignty are applicable to humans only. Now lets see how animals are mentioned in horoscopic astrology and how it is wrongly associated to the pets astrology. 

In Hindu scriptures every deity carries an animal or in some cases a mythical entity as vahana i.e. mount or vehicle. Like Lord Ganesha is depicted as riding on a mouse as his vehicle or Lord Shiv rides on Nandi. There are many mythological stories written in various scriptures explaining the principle and reason for specific vahana. Of course it is not possible to provide the detailed information in this article. Nonetheless the practical reason behind the concept of vahana is very pertinent and scientific. Practically humans should respect every animal no matter how big or small it is. Therefore many animals are given a 'position' in Hinduism as vahana of a particular deity. By nature human beings are selfish. The whole concept behind this iconography is to avoid abuse or unnecessary hunting of even smaller creatures in nature which can help to maintain the balance of our mother nature. Not every human being is going to understand this practical aspect and apply the same in life. Thus if the animals are depicted as vahana of a deity it will definitely succor to stop or at least reduce the intensity of disgracing the non human creatures. That's why non human creatures from as strong as tigers to as small and infamous as crows are included in the mythical iconography. I absolutely respect and proud of our culture which takes into account the lives of almost all creatures in nature. 

Many Hindu scriptures describe about the pets or animals to be worshiped on the basis of human kundlis. The rationality behind this reckoning is different and scientific. Importantly the professionals like farmers or butchers who have to work with animals need to know about the breed of animals which is profitable not only from their business point of view but also considering the natural resources. At such points the issue is to avoid any unnecessary physical torment of animals. People who are not in these professions are advised in two ways. One is about the pet species and other is about the worship of an animal as an entity which is an astrological remedy. Lets understand the principles behind these. Many people love pets. Though there are various reasons for keeping a pet at home, mainly two purposes are common one is love for animals and the other is safety. When the kundli of the people interested in keeping a pet is observed it can only speculate about the species of the animal to be kept at home so as to increase positive energy. If we understand the human life cycle we can notice that the human soul travels through 84 million yonis, thus in some or the other birth the soul is born as an insect or animal depending on the karma. So all non human creatures have seven koshas or sheaths around them. From human kundli it can be calculated that which animal can provide positive energy. Keeping that particular animal at home will definitely help in many ways. In ancient times people kept crows, chameleons or even snakes as pets. In today's world the definition of 'pets' has changed completely due to some developed laws and thought procedures depending on various cultures. Nevertheless increasing positive energy is the primary goal of livestock (other than farmers). Keeping animals just for the sake of their beauty is not supported by shastras or I can say its a secondary purpose when it comes to the balance of mother nature. I will just give a small example. A dog represents Rahu or Ketu according to Hindu astrology. Thus keeping a dog at home is a genuine remedy recommended for people with malefic Rahu or Ketu in the kundli. Worshiping an animal is the extension of this of remedy. When a querent is given a remedy like to worship an animal, give a particular food to particular animal on a specific date / time or worship an animal of specific colour (Tantra shastra), it is calculated on the basis of the planetary position in the querent's kundli. I again highlight that keeping a pet and worshiping an animal are totally different things. To simplify it more I will add that as every planet has it's own governing body it is also allotted with a specific animal. Thus to reduce the ill effects of a particular planet in the kundli a person is recommended to worship the animal governed by that planet. It is very similar to the gemstone therapy used for the planets. In case of worshiping the animal it is not at all necessary to keep the animal as a pet. In Vedic and specifically Tantra shastra such remedies are very common and have a specific procedure. For example a black dog is to be given a chapati (Indian bread) for seven days is one of the remedy recommended for certain planetary issues. It is not necessary that the affected person should keep the black dog as a pet. He / she can give the chapati to a street dog to achieve the desired results. The purpose behind such remedies are like minimizing the ill effects of the planets or get relief from the sins etc. 

Now the question arises is whether animals are affected by the planetary conditions or not? I have an opinion that making a kundli of a non human creature is absolutely meaningless. A kundli os meant for a human being who lives a life with certain laws, emotions and life events. A human birth of a soul has a very deep and bass meaning in nature. But a birth in other yonis has the only purpose of completing a life cycle on the basis of three karmas. The animals other than humans are only influenced by nature's law and are not linked to any human like emotions or social laws or other life events. This doesn't mean that animal species have no laws at all. Nevertheless the laws of animal life only support their survival of them and their species in the nature. As the life events like education, marriage, earning and (human like) emotions do not play any role in the animal world, calculating the kundli of an animal based on it's birth time is a far fetched concept. Though animals like dogs are friends to humans and do love humans who love them, it can not be ubiquitous like us. As the animals have 'life' they have koshas around them but they only contribute in completion of their life cycle. I heard that nowadays some people are asking for the kundli of an animal by providing it's birth details to the astrologers. Then the kundli of the pet and the would be owner are 'matched' to know about their life together. In western countries this calculation is based on Sun signs. This kind of calculation is incomprehensible. Predicting certain events from the houses of the animal's kundli is a fallacious practice. As I have mentioned earlier the planets do influence an animal's life, but it is only meant for completing the life cycle on the basis of karmas. For example: The houses in the kundli like fifth (progeny) house to be linked with the progeny of the animal is unthinkable. It is similar to the mundane astrology practice where the fifth house in a country's kundli is used to predict the population of that country. I abhor both of these practices. I respect the concept of animal love, as there is nothing wrong about it. But stretching this concept to 'match' the kundlis of animals and humans is baffling. 

The gist of my today's article is to make the readers aware that calculating the kundli of the animals is not recommended by shastras. According to Hindu astrology one can suggest about the pet species or remedies for worshiping the animals. The calculation based on the animal's kundli for keeping it as a pet or other purposes is impractical. I recommend all the readers not to fall for such trickery and ask the queries regarding pets or animal husbandry to any authentic scholar. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

       =============================================

No comments:

Post a Comment