ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय असोत किंवा जुन्या रूढी परंपरा, आजची पिढी आणि आधीची पिढी यात हे उपाय, विधी, सणवार कसे करायचे याबद्दल दुमत आढळतं. नवीन पिढीचा ह्या सगळ्यावर विश्वास नाही आणि त्यामुळे देवाधर्माचं कार्य नीट पार पडत नाही असा आधीच्या पिढीचा समज आहे. आणि नवीन पिढीला हे बऱ्याचदा थोतांड वाटतं आणि जरी तथ्य वाटत असलं तरी सगळे यथासांग विधी करण्याइतका वेळ नसतो यामुळे आधीची पिढी जाचक वाटते. या सगळ्याबद्दल शास्त्र काय सांगतं आणि त्याचे कोणते परीणाम आहेत याची थोडी माहिती मिळाली तर असे गैरसमज नक्कीच दूर होतील.
हे गैरसमज कसे निर्माण झाले आहेत याचा आढावा घेतला तर काही गोष्टी लक्षात येतात. आपल्याकडे रूढी परंपरा, घराण्याच्या चाली रीती अशा अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. आधीच्या पिढीबद्दल बोलायचं तर एकूणच महत्त्वाकांक्षी लोकांची संख्या कमी होती. शिक्षण आणि अर्थार्जन यांतील संधी मर्यादित होत्या. स्त्रिया आर्थिक दृष्ट्या इतक्या स्वावलंबी नव्हत्या. त्यांना शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यांची फारशी मुभा नसायची. आपलं कुटुंब सांभाळून त्या शिक्षण घेत आणि जमलं तरच अर्थार्जन करत. पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोजकंच शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे कल होता. नोकरीत बढती मिळवणे किंवा उच्चशिक्षण याची ओढ कमी होती. यामुळे पूर्वापार चालत आलेल्या परंपरा सांभाळणं शक्य होतं. मुबलक वेळ आणि एकत्र कुटुंब पद्धती यामुळे यथासांग विधी करून एखादा सण किंवा व्रत वैकल्य केली जात असत. कोणत्याही पूजेची तयारी, नैवेद्य आणि स्वयंपाक यांची जबाबदारी स्त्रियांवर होती. स्त्रियाही सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असत. आताच्या पिढीनं हे सगळं लहानपणी पाहिलंही आहे पण काळ इतक्या झट्कन बदलला की या पिढीला हे सगळं करणं अशक्य होऊ लागलंय. आधीच्या पिढीला मात्र हा बदल पचवता येत नाही कारण त्यांनी हे सगळे सोपस्कार केले आहेत. मग आमच्या मुलांनी का करू नयेत असा प्रश्न त्यांना पडतो. स्त्रिया स्वावलंबी व्हायला लागल्या, परदेशात जाऊ लागल्या त्यामुळे या सोपस्कारांसाठी वेळ अपुरा पडू लागला. आर्थिक गणितं बदलली आणि महागाईमुळे स्त्रियांना नोकरी करणं अनिवार्य होऊ लागलं. आहे त्यात समाधान मानणाऱ्या आधीच्या पिढीला हे थोडं खटकायला लागलं. आजही अनेक मुलींना विशेषतः सुनांना घर सांभाळून नोकरी करण्याचा सल्ला दिला जातो. सुनांकडून विशेष अपेक्षा असतात. यात स्त्री वर्गाची फरफट होते आणि खटके उडायला लागतात. एकत्र कुटुंब पद्धती नसल्याने सगळी जबाबदारी एकट्या स्त्रीवर आली तर शारीरिक दृष्ट्याही ते कठीण होतं.
या सगळ्या व्यावहारिक अडचणींमध्ये या दोन्ही पिढ्यांत एक वैचारिक मतभेदही आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. कोणताही विधी, पूजा, सणवार एका विशिष्ट पद्धतीनेच का करायचे? त्यात कालानुरूप बदल करता येणार नाही का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आधीच्या पिढीकडे नाहीत. केवळ आमच्या पूर्वजांनी सांगितलं म्हणून ते खरं आहे आणि तसंच झालं पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो. कोणत्याही विधीची संपूर्ण माहिती नसल्यानं याची समाधानकारक उत्तरं त्यांना देता येत नाहीत म्हणूनच नवीन पिढीला त्या गोष्टींचं मूळ समजत नाही आणि ते थोतांड किंवा अवडंबर वाटतं. गणपतीला लाल फूल का वहायचं? उपवास का करतात? अशा साध्या गोष्टींपासून माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे विधी का करतात? इथपर्यंत कोणत्याही शंकेचं निरसन केलं जात नाही. आधीच्या पिढीने असे प्रश्न कोणाला विचारलेच नाहीत किंवा मोठ्यांच्या धाकामुळे त्यांना ते विचारता आले नाहीत. यामुळे निर्माण होणाऱ्या वैचारिक मतभेदांचं पर्यवसान हे या विधींवरच्या अविश्वासात होतं.
भारतीय संस्कृतीत असणाऱ्या विधींना शास्त्रीय कारणं आहेत. त्यामागची तत्त्वं माहित नसल्याने काही शास्त्रीय विधी कायमचे नष्ट होतील की काय अशी भीती वाटते. या शास्त्रीय कारणांची माहिती नवीन पिढीला मिळाली तर आपली संस्कृती टिकून राहिलंच पण यामुळे येणाऱ्या पिढयांना त्याचा फायदाही होईल. नवीन पिढीची बदललेली जीवनशैली पाहता यातून काही सुवर्णमध्य काढता येईल का याचा विचार आता व्हायला हवा. या शास्त्रीय विधींसाठी लागणारं साहित्य आता उपलब्ध असेलच असं नाही. त्याला काही पर्याय शोधले जायला हवेत. शास्त्रीय माहितीच्या आधारे अशा सुधारणा करून आणि योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन जर असे विधी, उपाय किंवा दैनंदिन जीवनातील काही गोष्टी नवीन पद्धतीने करता आल्या तर दोन पिढ्यांमधला हा दुवा नक्कीच साधता येईल. अशाच काही विधींबद्दल आणि त्यात करता येण्यासारख्या बदलांबद्दल पुढील काही लेखांत माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
=======================================================
Today's generation and earlier generation always have disputes on how tocelebrate festivals, perform rituals or astrological remedies. The earlier generation thinks that the new generation does not believe in our tradition and our cultural or spiritual heritage is in danger. The new generation either thinks this is ostentation or has no time to perform the rituals and feels that the earlier generation is too taxing. If both generations are made aware of the principles behind these rituals and their effects, these misunderstandings can be definitely cleared.
If we try to learn how these misunderstandings were created, then we realize certain issues. In our society there is a mixture of cultures, rituals and family traditions. In the earlier generation there were very few people who were really ambitious. There were limited opportunities in education as well as earning sources. Females were not completely independent and had many restrictions. The family was the priority for females and education or earning were only allowed if possible. Men used to take basic education and went for a job. Due to lack of ambitions many of them were also not keen about higher education or career prospects etc. The joint family system and availability of time were the reasons why the earlier generation could perform the rituals as per protocols. The females were taking the responsibility of the preparations for the rituals we well as cooking. The new generation has observed this system when they were young. In spite of this, the rapid change in the lifestyle has made it difficult for the new generation to follow in the parent's footsteps. The earlier generation could not digest this change as they have strictly performed all the rituals. So they think the next generation is giving excuses which they feel are questionable. As the females in new generation started getting independent and educated they found no time for these rituals.Due to inflation, now the females have to earn to run the families. This started the conflict between the self-satisfied earlier generation and the aspiring new generation. To a certain extent today also females are expected to work from home. The older generation expects more from daughter in laws. This leads to estranged relationships and particularly females suffer a lot. In this dilemma the females are still supposed to take all the responsibilities and increasing number of nuclear families are adding to the pressure on them.
Well in all these practical issues there is a conceptual misunderstanding which is a very important factor. Due to practical difficulties the new generation has some questions like "What is the principle behind the protocols of these rituals?" or "Can we alter these protocols periodically?". Frankly speaking the earlier generation can not answer these questions. They stick to their thoughts just because it was told by the ancestors. The lack of satisfactory answers to these valid questions make the new generation think that this is a hoax or ostentation, which is absolutely unnecessary. Even simple questions like why Lord Ganesha has be offered a red flower or why we keep a fast are not answered. Many people are still not aware of the importance of rituals after the death of any person. Either the earlier generation did not ask these questions to anybody or they could not ask their elders due to fear. Whatever may be the reason, the result of this conceptual difference is disbelief of the new generation on our traditional rituals.
Indian tradition and the rituals are based on valid scientific principles. The unawareness of the information regarding the principles is really taking our new generation away from our culture.If we can educate this generation about the traditions we will not only save our culture but it will also help the future generations in various ways. We should seriously think about finding a golden mean. The authorities in this field should come forward and help to alter the rituals without affecting the principles. For example the materials prescribed in the rituals may not be available today. If substitutes for such materials are derived from proper interpretation of the texts it will be possible to perform the rituals by new protocols with maximum effect. This will also help to avoid the misunderstandings between the two generations. I will try to elaborate some of these rituals and possible alterations in my next articles.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
==================================================
No comments:
Post a Comment