सध्या ज्योतिष शास्त्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. एक ज्योतिषी म्हणून मात्र हा अतिरेक मला कुठेतरी खटकतो. कारण हा वापर शास्त्र म्हणून नाही तर एक खूळ किंवा फॅड म्हणून होतोय. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाहिराती, तांत्रिक विधींचा भडीमार, अभिचार कर्मांच्याही जाहिराती, एका दिवसात कोणतीही अडचण दूर करण्याची जाहिरात अशा अनेक तद्दन दांभिक गोष्टींमुळे या शास्त्राचा मूळ उद्देशच हरवल्यासारखा वाटतोय.
खरं तर ज्योतिष शास्त्र, वास्तूशास्त्र, सामुद्रिक शास्त्र, वैदिक आणि तांत्रिक शाखा आणि त्यासंबंधित विषयांवरचे प्राचीन ग्रंथ यांत या शास्त्रांचा उद्देश, विधी आणि खगोलशास्त्रीय घटना यावर भर दिला गेला आहे. पण मूळ ग्रंथांचं अर्धवट किंवा चुकीचं भाषांतर आणि लोकांची बदललेली मानसिकता यामुळे दांभिक लोक केवळ धंदा करण्यासाठी याचा वापर करत आहेत. ते खरेच ज्योतिषी किंवा तांत्रिक आहेत की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण खोटी आमिषं दाखवून पैसे उकळणे, तांत्रिक शाखेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणे अगदी स्त्रियांचं शोषण करण्यापर्यंत ही फसवणूक चालू आहे. या शास्त्रांची अपुरी माहिती आणि बदललेल्या जीवन शैलीतल्या अडचणी यामुळे अनेक लोक याला बळी पडत आहेत.
ज्योतिष शास्त्र आणि संबंधित ग्रंथ लिहिले गेले तेव्हाची परिस्थिती आजच्या पेक्षा खूपच निराळी होती. पण काळानुसार ह्या ग्रंथांच्या भाषेत फारसे बदल झाले नाहीत आणि तेव्हाचा काळ आणि आजचा काळ यातला दुवाच साधला गेला नाही हे याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे नवीन पिढी या ग्रंथांना थोतांड मानते. अगदी साधी उदाहरणं घ्यायची झाली तर हस्त सामुद्रिक शास्त्रावरील काही ग्रंथांत अजूनही तळहातावर एखादी खूण असेल तर मनुष्य राजा किंवा चक्रवर्ती सम्राट होतो असं भाष्य असतं. आता असं कोणतंही पद नसताना त्याची आजच्या काळाशी सांगड घातली गेली नाही तर ते भाष्य निरर्थक वाटतं. पूर्वीच्या काळी लोकसंख्या मर्यादित होती आणि प्राणी व वनस्पती मुबलक प्रमाणात होते. त्यामुळे अनेक वैदिक किंवा तांत्रिक विधी करणं सहज शक्य होतं. आता अफाट लोकसंख्या, वेळेची मर्यादा आणि नष्ट झालेले प्राणी व वनस्पती यामुळे हे विधी तंतोतंत करणं अशक्य आहे. त्यामुळे हे विधी ज्या पुस्तकांत आहेत ती पुस्तकं केवळ वाचना पुरतीच राहिली आहेत. काही ज्योतिषांनी काळानुसार भाषेत बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे पण अशा ज्योतिषांची संख्या कमी आहे. तसंच अनेक पुस्तकांत ज्योतिष शास्त्राचा मूळ उद्देश, त्यावरील भाष्य यापेक्षा लेखकाने पाहिलेल्या कुंडल्या हा एक स्वतःच्या जाहिरातीचा भाग जास्त असतो. अशी उदाहरणं जरूर द्यावीत पण प्रत्येक व्यक्तीची कुंडली किंवा हस्तरेखा एकाच तराजूत तोलणं शक्य नाही. याचा परीणाम म्हणजे अशा उदाहरणांतील प्रसिद्ध व्यक्तींच्या कुंडल्या किंवा हस्तरेखा यांच्याशी स्वतःची तुलना करण्याकडे वाचकांचा कल असतो. प्रत्येक व्यक्ती ज्योतिष विषयाची अभ्यासक नसते, सामान्य वाचकाला स्वतःचं भविष्य पाहण्यात जास्त रस असतो. ज्योतिष शास्त्रात अध्याहृत असलेले बारा ग्रह आणि कुंडलीतील बारा स्थानं धरून किती प्रकारे कुंडली मांडता येते हे उघड आहे. यामुळे वरवर पाहता अनेक कुंडल्या एकसारख्या दिसतात. अशा वेळी जुजबी माहिती वरून काही ठाम मत बनवून घेणं योग्य नसतं याची कल्पना लेखकांनी द्यायला हवी.
आताची जीवनशैली स्पर्धात्मक असल्यानं लोकांचे दृष्टिकोनही खूप वेगळे आहेत. झटपट यश मिळवण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची लोकांची तयारी असते. याचाच फायदा घेऊन अभिचार कर्मांच्या जाहिराती केल्या जातात. वशीकरण, मारण, विद्वेषण अशा कर्मांचा उल्लेख सामान्य भाषेत करून लोकांना मोहवलं जातं. कोणतेही विधी (अगदी अभिचार कर्मांचेही) इतके सोपे नसतात. त्यासाठी लागणारी तपश्चर्या, एकाग्रता आणि मुख्य म्हणजे कार्य सिद्ध करण्यासाठी लागणारे योग यावर ह्या कर्मांचे परीणाम अवलंबून असतात. अशा दांभिक जाहिराती आणि त्यासाठी स्वघोषित ज्योतिषी / तांत्रिक यांचा भपकेबाज पेहराव या सगळ्यामुळे सुज्ञ लोक ह्या शास्त्रापासून दूर राहतात. खऱ्या साधकाला अशा भपकेबाज वागण्याची गरज नसते. पण अशा प्रकारच्या मांडणीमुळे या शास्त्राची बदनामी होत आहे हे सत्य नाकारता येणार नाही. याचाच एक दुष्परिणाम म्हणजे काही कारण नसतानाही रत्नांचा, उपायांचा वापर केलाच पाहिजे असा काहींचा समज होतो. जन्मकुंडलीचं विवेचन ऐकल्यावर "मी कोणता खडा वापरू?" किंवा "नेहमी वापरता येईल असा काही तोडगा आहे का?" असे प्रश्न मला अनेकदा विचारले जातात. काही अडचण नसताना किंवा जिथे उपायांपेक्षा कष्टांची गरज आहे तिथे अशा जाहिरातींमुळे उपायांची मागणी केली जाते.
ज्योतिष शास्त्राचं शिक्षण हा एक मुद्दाही विचारात घेण्यासारखाच आहे. खरं तर या शास्त्रात 'पदवी'पेक्षा अनुभव जास्त महत्त्वाचा ठरतो. अनेक कुंडल्या (आणि हस्तरेखा) अभ्यासल्यानंतर ज्योतिषाची स्वतःची अशी एक पद्धत किंवा शैली तयार होते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अशा स्वतःच्या अनुभवामुळे आलेल्या ज्ञानावर खरा ज्योतिषी भाकीत सांगत असतो. कारण पुस्तकातले मुद्दे आयुष्यातल्या घटनांशी जसेच्या तसे जोडता येत नाहीत. यासाठी तर्क आणि अनुभव हाच मार्ग आहे. मात्र निवृत्तीनंतर वेळ घालवण्यासाठी किंवा लहान वयात 'छंद' म्हणून या शास्त्राचा 'अभ्यास' केला जातो. आज अनेक ठिकाणाहून यातल्या पदव्याही घेता येतात आणि त्या घेण्यात काहीच गैर नाही. पण या शास्त्राचा खरा अभ्यास केवळ पदवीवर थांबत नाही हे माझं स्पष्ट मत आहे. कुंडली बनवण्याचं गणित आणि विवेचन शिकल्यानंतरच खरा अभ्यास सुरु होतो, ज्यात अनेक कुंडल्यांचा अभ्यास करावा लागतो. हस्तरेखांचं शिक्षणही अनेक लोकांच्या हस्तरेखा पाहून करावं लागतं. यातली विविधता कागदावरची पदवी घेऊन शिकता येत नाही, त्यासाठी संशोधनात्मक अभ्यासाची गरज असते. पण ज्योतिष शास्त्रातील गणितापेक्षा कुंडली विवेचन रंजक असल्यानं त्यावरच भर दिला जातो आणि कुंडली मांडण्याचं गणित टाळून कॉम्प्युटर वर कुंडली पहिली जाते. कॉम्प्युटरवर बनवलेली कुंडली आणि संपूर्ण गणित मांडून स्वतःच्या हाताने बनवलेली कुंडली यात अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप फरक पडतो. आता काही महिने (फक्त कुंडली विवेचनाचं) शिक्षण घेऊन ज्योतिषी बनण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. तात्पुरतं शिक्षण घेऊन ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या काही व्यक्तींमुळेही ह्या शास्त्राचं गांभीर्य कमी होत चाललं आहे.
एक ज्योतिषी आणि एक वाचक म्हणून ज्योतिष शास्त्राची आजची प्रतिमा सुधारण्यासाठी मी माझे हे विचार मांडले आहेत. यातून बोध घेऊन ह्या शास्त्राचा योग्य मान राखला जावा आणि चांगल्या दृष्टिकोनातून याचा वापर व्हावा हीच इच्छा आहे.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
=========================================================
In recent years Astrology has been glamorized and overused beyond limits. As an astrologer I abhor this overuse because astrology has become a fad or a fashion rather than a science. Many kinds of advertisements in different media including Tantric remedies (even Abhichara Karmas), remedies to get rid of problems in 24 hours etc are deviating us from the basic goals of astrology.
The original texts of Astrology, Vastushastra, Samudrik Shastra, Vedic and Tantra traditions emphasize on the principles, rituals, astronomical events and ultimate goals of these traditions. Sadly due to the incomplete or wrong translations of these original texts and changed mentality of the society, the pseudo masters of astrology or tantra are taking big advantages. Their knowledge in astrology or tantra is a controversial subject. By bluffing and plundering money, spreading superstitions or even by harassing women these pseudo masters are exploiting the needy people. Due to inadequate information about these traditions and problems in the changing lifestyle people are falling prey to these kind of advertisements.
The ancient lifestyle when these texts were written was totally different from today's lifestyle. The language in many recent editions of these texts was not changed according to time, which missed the connection between the two periods. Due to unchanged ancient language in the translations of these texts, new generation has stamped these traditions as hoax. We can take a few simple examples of this. In many books of Hasta Samudrik Shastra (palmistry) there is a common interpretation which says "If a person has a specific mark on palm he will be a king or an emperor". Now this concept of becoming a king or emperor has to be related to the modern world or else it may sound meaningless. Secondly in ancient times it was possible to perform all the rituals as the population was limited and many plants and animals were present in abundance. Speaking for today's world it is not possible to perform the rituals as per protocol because many plants and animals are extinct, the society laws are also different. So these books are just read for entertainment and forgotten. Well, there are some astrologers who have tried to make changes in the translations of these texts but they are very few in number. There are numerous books on astrology where the authors make their advertisement by writing the cases they have solved rather than writing on principles of astrology. I am not against giving the examples of such cases but every kundli can not be judged by a particular combination of planets. As a result, the readers compare their kundlis or lines on the palm with that of a celebrity. Everybody is not a student of astrology or palmistry so its obvious that most people are interested in knowing their own future. Astrology takes twelve planets into account and there are twelve houses in a kundli. So by considering all possible combinations a kundli can be written in limited ways. So apparently many kundlis look same or have same planet positions. In such cases it is the author's responsibility to inform the readers that jumping on to any conclusion on the basis of these examples is not advisable.
Today's competitive lifestyle has changed the views of people in general. For quick success people are ready to go to any level. The pseudo Tantrics take advantage of this mentality and advertise their so called left handed tantric skils. They put advertisements of Vashikaran, Maran etc in fascinating or enchanting words promising the work to get done in a few days or hours. Ironically these protocols are not so simple to perform and take time to show the effect. The results of these rituals depend on many parameters. Due to these phoney advertisements and the garish apparel, discreet people keep a distance from all astrologers. Real masters of astrology or tantra won't need any such fancy advertisement. It can not be denied that this kind of gaudy presentation is one of the reasons of the downfall of this remarkable science. Another side effect of this is many people think that the use of a remedy or gemstone is a must. Even I have been asked many times "Should I use any gemstone?" or "Any remedy or mantra which can be used in general?" Even if there is no requirement of remedies or rather than a remedy practical efforts should be put to solve the issue, people still ask for remedies. This bombardment of various advertisements has adversely impacted peoples' minds.
The qualification of an astrologer is another issue which needs to be reformed. I strongly feel that just getting an official degree on papers is not enough in this field. Experience of the astrologers is what really matters. After studying numerous kundlis (or palm lines if a palmist) an astrologer develops his/her own style. Rather than theoretical knowledge an astrologer 'predicts' on the basis of practical experience. The reason behind this is the theoretical points in astrological texts can not be linked to an 'exact' situation of human life. This needs logic and a lot of experience with full dedication. People take astrology very lightly and 'study' it after retirement to pass the time or at a young age as a hobby. Now different universities offer degree courses in astrology as a subject and there is nothing wrong in getting official degree as an astrologer. My point is the actual 'study' of astrology can not stop after getting the degree. The actual 'study' starts after theoretically learning the mathematics for calculating a kundli and its prediction. This 'study' means learning many kudlis of various people from different backgrounds. Similarly palmistry is studied by reading palms of many people from various backgrounds. This diversity can not be learnt by just getting a degree. A research oriented study is required to get mastery in this science. As prediction part in the study is more recreational than the mathematical part, more importance is given to it and the calculation is done using computer softwares. There is a major difference between a computerized kundli and a manually calculated kundli from study point of view and accuracy. Sadly by neglecting this view many students are just studying the prediction part on a computer generated kundli and becoming professional astrologers. This short term study of such a vast subject is also contributing in decreasing it's seriousness.
As an astrologer and a reader I have put my thoughts here. I hope it will help to improve the reputation of Astrology. This phenomenal ancient tradition should be used respectfully for the welfare of all.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
========================================================
Very informative article.
ReplyDeleteThanks for reading my blog.
Delete