ज्योतिष शास्त्र आणि त्यातील उपाय याबद्दल माझ्या आधीच्या लेखांत मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. जन्मकुंडलीचं विवेचन आणि उपाय या दोन्ही गोष्टींचा विचार करताना काही मुद्दे लक्षात ठेवले तर उपायांचा फायदा तर होतोच आणि त्याचबरोबर कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही. असे काही मुद्दे इथे मांडले आहेत.
अनेकदा परीस्थितीमुळे आलेली हतबलता आणि मानसिक त्रास यामुळे लोक अडचणींच्या काळात मार्ग शोधण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा आधार घेतात. एरवी ह्या शास्त्रावर विश्वास नाही असं ठामपणे सांगणारे लोक अडचणी आल्या की ह्या शास्त्राकडे वळतात. याचं कारण असं की बऱ्याच लोकांचा ह्या शास्त्रावर किंवा देव धर्मावर विश्वास असतो पण त्यातील अवडंबर त्यांना नको असतं. ही अगदी योग्य भावना असली तरी अवडंबर नक्की कसं टाळावं? याचीही माहिती करून घेण्याची इच्छा नसते. जर आधीच ह्या शास्त्राची जुजबी माहिती करून घेतली तर खरं शास्त्र आणि अवडंबर यात फरक करता येईल. याच अनुषंगाने येणारा आणखी एक मुद्दा म्हणजे ह्या शास्त्राची जुन्या पद्धतीची मांडणी. हे शास्त्र पुरातन असल्यामुळे त्या काळातील जीवन सरणीला अनुसरूनच ज्योतिष विषयक ग्रंथ लिहिले गेले आहेत. पण काही जणांना आजच्या काळातील गोष्टी ह्या ग्रंथांमध्ये नसताना विवेचन कसं दिलं जातं? अशी शंका असते. ज्योतिष शास्त्रातील भाषेमधला प्रतीकवाद समजून घेतला तर त्याचा अर्थ आताच्या काळानुसार नक्की लावता येईल. यासाठी एक साधं उदाहरण घेऊ. शुक्र ग्रहाचं कारकत्व म्हणजे कलाकौशल्य, विषयसुख, कांति इ. आहे. त्यामुळे शुक्र ग्रह जन्मकुंडलीत शुभयोग करत असेल तर ती व्यक्ती कलाकार बनू शकते. अर्थात यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण या उदाहरणावरून ग्रहांचं कारकत्व आणि आजच्या काळातल्या काही गोष्टींची सांगड कशी घालता येईल याची कल्पना करता येऊ शकेल. यात ज्योतिषाचं कौशल्य आणि चौफेर अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे.
काही लोकांना वरचेवर जन्मकुंडली वेगवेगळ्या ज्योतिषांना दाखवण्याची सवय असते. जन्मकुंडलीचं विवेचन हे शक्यतो एकाच ज्योतिषाकडून करून घ्यावं. जर काही कारणानं एकाच ज्योतिषाकडे नेहमी जाता येणार नसेल तर केवळ काही अडचणी असतील तेव्हाच दुसऱ्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. भाकीत बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या ज्योतिषांकडे गेल्यास गोंधळ उडेल. तसंच ज्योतिषाकडे जाताना मनात श्रद्धा असावी. एखाद्या ज्योतिषाची तुलना दुसऱ्या ज्योतिषाशी करून वादविवाद करू नयेत. ज्योतिषाकडे जाण्याआधी त्याची माहिती नक्की असावी पण ज्योतिषाचं ज्ञान हे त्याच्या प्रसिद्धीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मोठमोठ्या जाहिराती, तंत्र शास्त्रातील उपायांबद्दलचे मजकूर इत्यादी गोष्टींना बळी पडू नये.
प्रश्नकर्त्यानं आपल्या कुंडलीचं विवेचन तसंच दिलेल्या उपायांची चर्चा करू नये. उपायांची शक्ती त्या व्यक्तीसाठीच राखून ठेवलेली असावी.
जन्मकुंडलीच्या विवेचनाचा हेतू अडचणी दूर करण्याचा असतो त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींची कल्पना ज्योतिषी आपल्याला देईल हा विचार करून विवेचन मागणं योग्य होणार नाही. एक ज्योतिषी म्हणून माझा अनुभव असा आहे की प्रश्नकर्त्याची अडचण काय आहे हे मी न सांगता ओळखावं असं बऱ्याच जणांना वाटतं. जन्मकुंडली समोर ठेवल्यावर एखादा मुद्दा ज्योतिषानं स्वतःहून ओळखावा ही मागणीच ज्योतिष शास्त्राला धरून नाही. जन्मकुंडली पाहिल्यावर अनेक मुद्दे ज्योतिषाच्या लक्षात येतात हे खरं असलं तरी प्रत्येक गोष्ट ज्योतिषानं अचूक ओळखावी असं घडू शकत नाही. आपली अडचण निःसंकोचपणे ज्योतिषासमोर मांडली तरच काही मार्ग निघू शकेल. अनेकदा लोक काही मुद्दे स्वाभिमानापोटी सांगत नाहीत. चुकीची किंवा अर्धवट माहिती ज्योतिषाला दिली तर मार्ग कसा काय निघू शकतो? मी मागे नमूद केलं होतं तसं उपाय ही केवळ औषधं आहेत पण त्यासाठी डॉक्टरला काय आजार आहे याची माहिती द्यावीच लागते. चुकीची औषधं आजार बरा करू शकणार नाहीत, तसंच चुकीच्या माहितीमुळे योग्य मार्गदर्शन मिळू शकणार नाही. म्हणून प्रश्नकर्त्यानं आपण ज्याच्याशी निःसंकोचपणे बोलू शकतो अशाच ज्योतिषाकडे जावं.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही उपाय स्वतः ठरवून किंवा कोणी सांगितला म्हणून करू नये. मनःशांतीसाठी असलेले साधे मंत्र किंवा साधी स्तोत्रं म्हणायला काहीच हरकत नाही. पण विशेष उपाय मात्र योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच सुरु करावेत. याचं पाहिलं कारण म्हणजे उपाय कोणत्याही स्वरूपातला असो त्याची शक्ती आणि दोष हे जाणकार व्यक्तीलाच माहित असतात. दुसरं कारण असं की उपाय करताना असलेले विधी योग्य पद्धतीनेच केले गेले पाहिजेत. याचं गांभीर्य नसेल तर उपायांचं फळ मिळत नाही. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्यात काही अडचणीही येऊ शकतात. अशा वेळी विधींमध्ये काही बदल करायचे असतील तर ते स्वतःहून करू नयेत. उदा: कधी कधी जपासाठी वेळ देता येत नाही. अशा वेळी जपसंख्या बदलताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. मंत्र म्हणताना स्पष्ट शब्दोच्चार हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेकदा शब्दोच्चार चुकतात ज्यामुळे मंत्राचा प्रभाव दिसत नाही. जपमाळ कोणत्या बोटांमध्ये धरावी यालाही काही नियम आहेत. तसंच कोणत्याही देवतेची आराधना करायची असेल तर त्या देवतेच्या रूप आणि गुणांची माहिती करून घ्यावी. त्यानुसार देवतेची आराधना करावी. अशा गोष्टींकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. या सगळ्या विधींची पूर्ण माहिती घेऊनच उपाय करावेत.
काही लोकांना विधीवत उपाय केल्यानंतरही फळ मिळत नाही. यात प्रश्नकर्ता आणि ज्योतिषी दोघांचीही जबाबदारी असते. जसं प्रश्नकर्त्यानं आपण कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय करतोय याचं भान ठेवायला हवं तसंच ज्योतिषानं सुद्धा आवाक्याबाहेरील इच्छा, अटळ घटना याबाबतीत खोटी आश्वासनं देऊ नयेत. जर जन्मकुंडली नुसार एखादी गोष्ट मिळवणं अशक्यच असेल तर त्याची पूर्ण कल्पना ज्योतिषाने प्रश्नकर्त्याला द्यावी. उपाय हे तेव्हाच प्रभाव दाखवतात जेव्हा तसे योग कुंडलीत असतात आणि काही अडथळ्यांमुळे इच्छा पूर्ण होत नसते. त्यामुळे ज्योतिषाने उपाय सांगताना किंवा भाकीत करताना प्रश्नकर्त्याला अंधारात ठेऊ नये.
आपण अनेकदा वृत्तपत्र, दूरदर्शन वरील वाहिन्या, मासिकं अशा अनेक माध्यमांमध्ये रोजचं किंवा वार्षिक भविष्य असा एक भाग पाहतो. यातील भविष्य प्रत्येकाला तंतोतंत लागू पडेलच असं नाही. याचं कारण म्हणजे एकूण राशी फक्त बारा आहेत. प्रत्येक राशींची कोट्यावधी माणसं जगात आहेत. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य निराळं असतं. अगदी जुळ्या भावंडांच्या आयुष्यातही सगळ्या घटना एकसारख्या घडत नाहीत. मग केवळ राशींच्या आधारावर मार्गदर्शन कसं मिळू शकेल? अशा भाकितांचा उपयोग जुजबी गोष्टींत होत असेलही पण त्याचा खूप गांभीर्यानं विचार करून कोणतेही निर्णय घेणं किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे ठरवून त्या व्यक्तीला दोष देणं सर्वस्वी चूक आहे.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्योतिष शास्त्राच्या आहारी जाऊ नये. हे शास्त्र आणि उपाय यांचा अतिरेक कधीही करू नये. आपलं आयुष्य आपणच घडवायचं असतं. त्यात अडचणींच्या वेळी मार्गदर्शन आणि अडथळे दूर करण्यासाठी साहाय्य म्हणूनच ह्या शास्त्राचा वापर करावा. ज्योतिष शास्त्रालाही स्वतःच्या अशा मर्यादा आहेत त्या ओळखून ह्याचा अतिरेक टाळावा. योग्य प्रकारे या शास्त्राचा वापर केला गेला तरच या शास्त्राबद्दलचे गैरसमज दूर होतील. ज्योतिष शास्त्र हा प्राचीन भारतीय सांस्कृतीतला एक खजिना आहे. याचं जतन करून आधुनिक काळानुसार या शास्त्राची मांडणी केली तरच ह्या शास्त्राचं मोल पुढच्या पिढयांना कळेल.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
======================================================
I elaborated on astrology and astrological remedies in my previous articles. Along with all such information some do's and don'ts should be followed while approaching any astrologer. These will not only help for getting results of the remedies but will also develop awareness regarding superstitions. Here are some technical know'hows of astrology and remedies.
Many times due to circumstantial pressures or emotional stress people take support of astrology to get rid of their problems. Strong disbelievers also turn to this science when are under pressure. The main reason behind this is they believe in astrology and religion but they don't want any ostentation. Though this is a correct view they don't even want to know how to avoid this. If we go through some information regarding the basics of this science, we can surely differentiate between scientific aspects of astrology and ostentation. There is another misunderstanding in context with this point. The texts of Vedic astrology are ancient so obviously those are based on ancient cultures, customs and traditions. Some people are skeptical about the correlation of these texts with modern world. They usually ask 'how can anyone predict on new subjects which are not mentioned in these texts?' Well, if we understand and interpret the symbolism in these texts then it will be very easy to relate the astrological theories with today's world. Lets take a simple example, planet Venus governs skin, art, beauty, passion and sexual pleasures etc. If Venus is well placed in one's Janm Kundli with benefic yogas then there are much higher chances that the person will become an actor/singer. Of course such a prediction needs deep study of one's Kundli, but from this example it can be understood how astrology can be related to the things in modern world. Astrologer's skill and knowledge are equally important in such interpretations.
I have seen some people frequently approaching different astrologers without any significant reason. One should ask for prediction of Janm Kundli to only one astrologer. If it is not possible to approach the same astrologer again then one should approach another astrologer only when a guidance is required. Cross checking the predictions with different astrologers will create confusion. Also one should approach an astrologer with full faith. Comparing two astrologers and arguing by comparison of two astrologers should be avoided. Before approaching any astrologer one should definitely know about the authenticity of the astrologer but astrologers knowledge is more important than fame. Nobody should get carried away by fancy advertisements or public display of details in Tantric remedies etc.
As far as possible querents should avoid unnecessary discussion of the Janm Kundli predictions with anybody. The remedies specially mantras or rituals should be kept confidential.
An astrologer can predict certain events from Janm Kundli and provide guidance but expecting the astrologer to tell each and every thing in life is redundant. In my practice as an astrologer many people expected that I should come to know about their queries just by looking at their Kundli. Well, many astrologers have intuition power but to 'predict' the query is too much. Similarly if the querent frankly talks about the problems then only the astrologer can guide correctly. Some people adamantly do not disclose personal information, such incomplete data will not help to resolve the problems. As I mentioned in my earlier article, remedies are like medicines and for getting proper medicines the patient should not hide anything from the doctor. In the same way querent should disclose all required information to the astrologer rather I should say querent should approach an astrologer to whom he/she can fully trust.
Another important point is one should not start any remedy by own. Chanting of simple mantras or stotras for peace of mind is no harm. But specific remedies should be started with proper guidance. The first reason behind this is only a knowledgeable person will know about the powers and drawbacks of a remedy. Secondly if rituals or method of a remedy are not followed as per protocols the results will not be obtained. Some times it is not possible to follow the method of a ritual then making alterations without consultation will not give desired results. For example some times chanting specific number of mantra or japa is not possible due to lack of time. In such cases the number of chanting should be altered with proper guidance. Proper pronunciation of alphabets is very important in chanting mantra. Wrong pronunciations of mantra will make it ineffective. Technique of holding the rosary also varies with rituals. Before starting any ritual one should have proper information about the manifestation and gunas (knowledge, quality) of the deity to be worshiped. All such things are neglected many times which can affect the results of the remedies.
Many times people don't get desired results even after following the remedies as per protocol. This is a two way stream and both the querent and the astrologer should understand the application of remedies. The querent should not ask the remedies for impossible desires,similarly the astrologer should also avoid giving false hopes to the querent. In inevitable incidences the astrologer should tactfully explain the situation to the querent without lowering his/her morale.
News papers, news channels, magazines have a separate section of daily or yearly astrological predictions. These predictions can not be applicable to everybody for obvious reasons. There are only twelve zodiac signs and billions of people have the same zodiac sign. Every single person has a different life style, even twins do not have exactly similar events in their lives. So how can everything be predicted accurately by just a zodiac sign? These kind of predictions may be helpful at superficial level but taking them seriously can be dangerous. Taking some major decisions or labeling a person on the basis of these vague predictions is absolutely unjustified.
Well the most important point is to succumb to Astrology and Remedies is not advisable at all. We have to establish our life and reach our goals by putting efforts. In this process astrology is useful to remove the obstacles if any. Astrology being a science has its own limitations, so it should not be overused. Understanding the concept of astrology and using it in a proper way can help to reduce the misconceptions. Vedic Astrology is an ancient tradition and a treasure in Indian history. We should preserve this remarkable science and make necessary changes according to time which will help our next generations to understand the importance of astrology as a science.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
================================================
No comments:
Post a Comment