आकाशात दूरवर असणाऱ्या ग्रहांचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परीणाम होतो ही रास्त शंका अनेकांच्या मनात असते. यामुळे बऱ्याचदा ज्योतिष शास्त्राची वैधता नाकारली जाते. मी आधी एका लेखात नमूद केल्याप्रमाणे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीत बसणारं हे शास्त्र नाही. त्यामुळे ह्या शास्त्राला लावल्या जाणाऱ्या कसोट्या सुद्धा ह्या शास्त्राच्या मुळाला धरूनच असायला हव्यात. ह्या शास्त्राचं मूळ आणि विज्ञान यांची सांगड घातली तर या प्रश्नाचं उत्तर मिळतं.
एका साध्या उदाहरणापासून सुरुवात करता येईल. सूर्य किरण पृथ्वीवर पडतात ते आपण सगळेच डोळ्याने पाहू शकतो. दोन व्यक्ती दुपारच्या उन्हात एकाच जागी उभ्या असतील तर एखाद्या व्यक्तीला उन्हाने खूप तहान लागते क्वचित चक्करही येते पण दुसऱ्या व्यक्तीला घाम येण्यापलीकडे काहीच त्रास होत नाही. याचं कारण एखाद्याची प्रकृती सूर्य किरण सहन करू शकत नाही तर एखाद्याची प्रकृती सहन करू शकते. सूर्याप्रमाणेच चंद्र, बुध, गुरु, शुक्र आणि शनी, हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो या ग्रहांचे किरणही आपल्यावर पडतात. सगळेच किरण काही डोळ्याला दिसत नाहीत. पण त्याचा परीणाम हा होतच असतो. प्रत्येक ग्रहाची स्वतःची अशी एक गुरुत्वाकर्षण शक्तीही असते (खगोल शास्त्राचा संदर्भ आवश्यक).
आता हा परीणाम नक्की होतो कसा? मागील लेखात मी लिहिलं होतं की मनुष्य स्वभाव हीच गुरुकिल्ली आहे आणि ह्या भोवतीच इतर मुद्दे फिरत असतात. ह्या ग्रहांचे किरण, त्यांचं गुरुत्वाकर्षण आणि अवकाशातील काही खगोल शास्त्रीय घडामोडी यामुळे मनुष्यामध्ये कधी उत्साह तर कधी नैराश्य येतं. हे किरण शारीरिक क्षमतेवर परीणाम करतात ते दिसतं (उदा: अति उन्हामुळे थकवा येणे) पण ह्याच मुळे अदृश्य रूपात मानसिक परीणाम होतो जो मनुष्य स्वभावानुसार व्यक्त होतो. पौर्णिमेला किंवा अमावास्येला जशी भरती, ओहोटी, पाऊस या घडामोडींवर दृश्य परीणाम होतो तसंच मानसिक रोगी जास्त आक्रमक होतात हेही सिद्ध झालं आहे.
जन्म कुंडली नुसार याचा अर्थ समजून घेऊ. जन्म कुंडलीतील ग्रहांची स्थिती ही त्या व्यक्तीसाठी कायम राहते. उदा: जन्म कुंडलीत मंगळ नीच/अशुभ राशीत आहे, ज्यात तो शुभ फळ देणार नाही. म्हणजेच जन्मभर मंगळ ग्रहाचे किरण त्या व्यक्तीच्या शरीरावर पडल्यावर शारीरिक, मानसिक परीणाम होऊन ती व्यक्ती चुकीचे निर्णय घेऊ शकते अथवा रागीट बनते. अनेक वर्षे ह्या किरणांचा प्रभाव झाल्यावर त्या किरणांच्या गुणाप्रमाणे रोगही उत्पन्न होतात, जे मंगळ शुभ स्थितीत असणाऱ्या व्यक्तीला होणार नाहीत किंवा इतर कारणांनी होतील. अशा प्रकारच्या मानसिक परीणामांचं पर्यवसान हे नंतरच्या काळातील 'घटनां'मध्ये होतं. अशा दहा ग्रहांचे किरण आणि राहू व केतू या दोन छेदन बिंदूंचे परीणाम या सर्व गणिताचं उत्तर म्हणजे भाकीत. एखाद्या व्यक्तीला 'मंगळ' आहे असं विधान जेव्हा केलं जातं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीच्या जन्म वेळी मंगळ ग्रह पृथ्वीशी निगडित अशा स्थितीत असतो की त्या व्यक्तीला त्या किरणांमुळे होणारा त्रास हा तीव्र असतो. अशा प्रकारे ग्रह हे आपल्यावर प्रभाव टाकत असतात.
पृथ्वीचा विचार या ग्रहांत होत नाही का? तर होतो पण अप्रत्यक्षपणे. आपल्या जन्म स्थळाचे अक्षांश व रेखांश कुंडली मांडताना विचारात घेतले जातात. मनुष्य जन्म पृथ्वीवरच होणार असल्याने ह्या शास्त्राने पृथ्वीचे गुण, परीणाम हे गृहीत धरूनच इतर ग्रहांशी निगडित परीणामांचा विचार केला आहे. आणि काळानुसार पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानव निर्मित घटनांचा विचार करूनच ज्योतिषाने विवेचन सांगावं.
आता राहिला प्रश्न आकस्मिक घडणाऱ्या घटनांचा. मनुष्य स्वभाव हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असला तरी आपण जिथे राहतो, काम करतो तेथील व्यक्तींचे स्वभाव, आकस्मिक घटना ज्या आपल्या हातात नाहीत अशा गोष्टीत ह्या शास्त्राची भूमिका काय असते? याचंही उदाहरण घेऊ. काही 'अटळ' घटनांमध्ये मृत्यू सारख्या घटना येतात. जिथे मनुष्य स्वभाव कमी वेळा महत्वाचा ठरतो. महादशा (या दशा काढण्याच्या अनेक पद्धती आहेत) ह्या पुढील काळातील ग्रहांच्या भौगोलिक स्थिती वरून मनुष्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची सूचना देऊ शकतात. भविष्य काळात कोणत्या दिवशी कोणते ग्रह कोणत्या स्थितीत असतील यावरून घटना कधी घडतील याचं निदान केलं जातं. जर विधिलिखिताप्रमाणे मनुष्याचं आयुष्य संपलं असेल तर अपघात घडणाऱ्या जागी असण्याची बुद्धी त्याला होते असं सोप्या भाषेत म्हणता येईल. जन्म कुंडलीतील मूळ ग्रहांवरून आयुष्य योग किती आहे याचा अंदाज येतोच. प्रत्येकालाच काही पूर्णायुष्य लाभत नाही. अशा वेळी चुकीच्या ठिकाणी हजार असणं, चुकीच्या मार्गानं प्रवास करणं, अशा अनेक मार्गांनी मृत्यू मनुष्याला गाठतो. प्रत्यक्षपणे मनुष्य स्वभाव याला कारणीभूत नसला तरी काही वेळा असे निर्णय घेण्याची बुद्धी होणं, हा ग्रहांचाच परिणाम असतो. अनेक वेळा ती 'चूक' नसून मृत्यूनं निवडलेलं निमित्त मात्र असतं.
अशा घटनेचा अंदाज आधी कुंडलीवरून आला नाही का ? ह्याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आणि वादग्रस्त आहे. अशा वेळी वैयक्तिक वा भावनिक पातळीवर विचार न करता निसर्गचक्राचा विचार केला तरच याचं उत्तर मिळेल. कोणत्याही व्यक्तीची मृत्यूची वेळ विधिलिखितानुसार निश्चित असते, ज्याला काही ग्रंथांत 'महामृत्यू' म्हटलं आहे. महामृत्यू आधी काही जीवावर बेतणारे रोग/प्रसंग ओढवतात, ज्यातून सुटका होऊ शकते त्याला 'अपमृत्यू' म्हटलं आहे. ह्या दोहोंचा मनुष्याच्या वयाशी संबंध नसतो. अपमृत्यू कधी कधी योग्य उपाय केल्यास टाळता येतो. पण महामृत्यू अटळ असतो, जो आधी निदान करता आला तरी त्यातून सुटका नसते. तसंच अचूक भाकीत आधीच कळल्यामुळे जर 'महामृत्यू' टाळता आले तर जन्म मृत्यूचं चक्र पूर्ण होणार नाही. हा झाला वैयक्तिक भाग. अनेकदा सामुदायिक अपघातांवर ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोन काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. अपघाती मृत्यू हे बऱ्याचदा महामृत्यू असतात. ज्या जीवांचं आयुष्य विधिलिखितानुसार संपलं आहे असे जीव एकाच वाहनातून प्रवास करतात ज्याला अपघात होतो आणि हे जीव मृत्युमुखी पडतात, पण ज्यांचा महामृत्यू नसेल ते अशा अपघातातूनही बचावतात. याचंच दुसरं उदाहरण म्हणजे असाध्य रोग. अनेकदा असाध्य रोग जडलेली लहान मुलं आयुष्याची लढाई हरतात, मात्र काही वयस्कर व्यक्ती ह्या रोगांवर मात करून पूर्णायुष्य उपभोगतात. याला वैद्यकीय कसोटी लावता येणार नाही तर विधिलिखित हे समाधानकारक उत्तर आहे.
आपण हे निसर्गाचं गणित लक्षात न घेता मृत्यू हा म्हातारपणीच यावा ही अपेक्षा बाळगतो. भावनिक दृष्ट्या यात काहीच चूक नाही पण निसर्ग आणि विधिलिखित हे भावनांवर आधारीत नाही. लहान वयात आलेल्या मृत्यूला आपण अकाली मृत्यू म्हणून संबोधतो. पण जो मृत्यू आपल्या दृष्टीनं 'अकाली' असतो तो विधिलिखितानुसार अकाली नसतो. म्हणूनच जन्म कुंडली बनवताना आयुष्य योग किती आहे याचा विचार केला जातो. 'विधिलिखित' या संकल्पनेला अनेक आधार आहेत, पौराणिक संदर्भही आहेत ज्याची माहिती एका लेखात देणं शक्य नाही.
काही वेळा वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग समोरील व्यक्तीच्या कर्मामुळेही घडतात. कारण`घर, समाज, निसर्ग हे काही एकट्या व्यक्तीचे नसतात. मग त्यात वैयक्तिक कर्म, सामाजिक कारणं आणि विधिलिखित या सगळ्याचा एकत्रित विचार करूनच ह्या शास्त्राचा वापर करावा. ज्योतिषाला प्रश्नकर्त्याने संपूर्ण माहिती न दिल्यास चुकीचं मार्गदर्शन मिळण्याची शक्यता असते. कुंडली समोर ठेवल्यावर ज्योतिषी अंतर्ज्ञानाने सगळं ओळखेल हा अत्यंत चुकीचा समज आहे. अडचणी संदर्भात पुरेशी आणि खरी माहिती देऊन मगच ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की विज्ञान, अध्यात्म, आपल्या बुद्धीपलीकडील काही गोष्टी, श्रद्धा यांचा मोकळ्या मनाने विचार केल्यास हे शास्त्र आहे हे पटतं. मात्र आताच्या काळातील विज्ञान एवढी एकच कसोटी लावल्यास हे शास्त्र पटणार नाही.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
==============================================
How can the planets situated far away from the Earth can affect human life? is a legitimate question in many knowledge seekers' minds. Many times due to this unanswered query, the authenticity of Astrology remains debatable. As I mentioned in one of my earlier article that Astrology can not be tested on the parameters of modern science. Thus if parameters used for Astrology are relevant then only it will make sense. A combination of base of Astrology and modern science can definitely answer such queries.
We can start with a simple example. Sun rays reach on the Earth and are visible by naked eye. If two people are standing at the same place in the afternoon time, one of them may feel thirsty or sometimes may feel dizzy but the second person may have no other symptoms than sweating. The reason behind it in simple words is the first person can't tolerate that heat and the latter one can. Just like the Sun all selected planets in Astrology like Moon, Mars, Mercury, Jupiter, Venus, Saturn, Uranus, Neptune and Pluto emit rays and they reach on earth at different speeds. Not all rays are visible to the naked eye, but they do have an effect on human body. Every planet has its own magnetic field (Astronomical references required).
How these celestial bodies exactly affect human life? I mentioned in my previous article that human nature is the key factor. The rays of these planets, magnetic fields and other celestial movements create a emotional effects like zeal or depression. The effect on physical body can be visible (e.g. feeling more thirsty in afternoon time). Same celestial events affect the human mind invisibly, which gets reflected according to human nature. On full moon day or no moon day just as tides, rain etc are affected visibly, psychotic patients behave more aggressively is a proven fact.
Lets try and understand this from Janm Kundli point of view. The position of planets in Janm Kundli is fixed for that person for lifetime. So if in Janm Kundli Mars is in its inauspicious sign it will not give good results. This means rays from Mars falling on that person's body for the whole life will affect the person physically and/or psychologically and that person may take wrong decisions or may become short tempered. After constant effect of such rays some diseases may generate, depending on chemical structure of those rays. This effect can not be observed in a person with Mars at a auspicious position in Janm Kundli or can be by other reason. Such psychological effects ultimately result in some 'incidences' in life. Thus gross effect of rays from such ten planets and effect of two intersection points Rahu and Ketu is the final prediction. Thus when it is predicted that one is Manglik, it means at one's birth time Mars was at such a relative position that the rays affect him acutely. This way planets affect our lives.
The planet Earth is not considered in twelve planets? Yes it is, but indirectly. The latitudes and longitudes of birth place are taken into consideration. Human birth obviously occurs on the Earth. Thus this science has already taken Earth's parameters into consideration in a relative manner. The Astrologer should also consider natural and man made movements while prediction.
Now sudden incidences is a point to be noted. Though human nature is the key factor, other factors like where one lives, works, nature of people around and sudden incidences like calamities are not under control of anyone. So what is the role of Astrology here? Lets take another example. Some inevitable events include death of a person, where human nature may not play a significant role (some exceptions excluded). Mahadasha- Antardasha is a method of calculation which provides position of planets in future on the basis of Astronomical Mathematics (there are some other methods too). The position of planets in future help to calculate which events can occur and when. In simple words, if one's life is over according to the destiny, then one reaches the location of accident just because one's mind operates unknowingly to make one reach there. Life span of a person can be calculated from Janm Kundli and not everybody is long lived. Thus by reaching at the wrong place at the wrong time, selecting wrong road to travel etc Death finds its way. Some times human nature is not directly responsible for this but taking such decisions which later on prove to be 'wrong', is the effect of the planets. Many times its not a 'mistake' but it is a 'reason' selected by the destiny.
Why such fatal incidences are not predicted beforehand? The answer is complicated and debatable for some. In such cases rather than thinking personally or emotionally if we think practically about nature's cycle then only we can get the answer.
The time of death for any person is already destined, which in some Indian texts is referred as 'Mahamrutyu' or we can call it Eternal rest. Before Mahamrutyu some fatal incidences/diseases may occur in one's life, where death can be avoided. This is referred as Apamrutyu i.e. death under inauspicious circumstances. Both of these are not related to the age of a person. Apamrutyu can be sometimes avoided by proper remedies but Mahamrutyu is inevitable. Also if Mahamrutyu is avoided then it will not complete the cycle of birth and death. Well this was at a personal level. But there rises a question that what is the view of Astrology on road accidents where many people die at a time. Accidental deaths are usually Mahamrutyus. The people who have completed their life according to destiny, travel in the same vehicle which meets the accident and they die. On the other hand if some travelers are not destined to die, they miraculously survive the fatal road accident of the same vehicle. Another example of destiny is incurable diseases. Many times fatally ill children lose the battle against the disease, but some old people with same disease get fully cured and live a long life. This cannot be every time explained on the basis of medical science, but destiny is a satisfactory answer.
We don't consider this cycle of nature and expect the death only at the old age. Emotionally it seems correct but nature and destiny are not programmed on emotions. Death at a young age is considered as Akaal mrutyu or Untimely death. But the death 'untimely' for us is not untimely for the destiny. That is why in the calculation of a Janm Kundli, life span is calculated. Destiny is a concept based on many factors. There are explanations for this concept in various texts. Writing the detailed information in one article is not possible.
Some personal encounters occur due to the behaviour of others. As home, community, nature all these don't belong to a single person. So personal doings or Karma, communal reasons and natural factors should be considered from various angles in the prediction part.
By reading this analysis it can be understood that science, spirituality, belief and some things beyond the power of human brain must be considered with an open mind to understand the authenticity of Astrology. Just applying a single parameter of modernized science will not help in understanding or accepting this 'science'.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
================================================
Awesome ... making astrology so easy to understand ! Looking forward for the next article :)
ReplyDeleteThank you very much for your reply. I will post my new article shortly. Keep reading.
Delete