तांत्रिक शाखा वैयक्तिक पातळीवर भर देत असल्याने त्यातील उपाय कर्मांवर आधारीत आहेत. सिद्धी, साधना ही प्रमुख शुद्ध कर्म आहेत ज्यात अनेक विधी आहेत. जी कर्म संरक्षणाच्या हेतूने तंत्र शास्त्रात लिहिली गेली पण केवळ वाईट कार्यासाठी जास्त प्रमाणात वापरली गेली त्यांना अभिचार कर्म किंवा वाममार्गी कर्म म्हटलं जातं. प्रामुख्याने आकर्षण, वशीकरण, स्तंभन, विद्वेषण, उच्चाटन आणि मारण ही अभिचार कर्म आहेत.
या कर्मांवर आधारीत उपाय वैयक्तिक पातळीवर करता येत असले तरी सोपे नक्कीच नाहीत. यामागे अनेक गूढ विधी आहेत ज्याची माहिती काही तांत्रिक शाखेतील तज्ञांनाच आहे. कुंडली विवेचनाच्या वेळी अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख झाल्यास त्याची संपूर्ण खात्री करून घ्यावी.
मी मागे नमूद केल्याप्रमाणे वैदिक आणि तांत्रिक शाखा या संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत हा मुद्दा लक्षात घ्यावा. तांत्रिक शाखेतील अनेक उपायांपैकी सध्याच्या काळात रत्न, मंत्र, तंत्र, यंत्र अशा रूपात सांगितले जातात. त्याचबरोबर एखाद्या दैवताची आराधना करण्यासाठी स्तोत्रं दिली जातात. पण या उपायांमागे असलेले बरेचसे विधी सांगितले जात नाहीत. स्तोत्र वा मंत्र म्हणण्याची पद्धत, शब्दोच्चार, वेळ, दिशा, वापरण्याचे आसन, यंत्र बनवण्याचे नियम आणि त्यासाठी लागणारे साहित्य अशा अनेक गोष्टींत योग्य मार्गदर्शन न झाल्यानं तांत्रिक उपायांची फळं मिळत नाहीत. 'त्र' या संस्कृत शब्दाचा अर्थ (तारणारा) साधन असा आहे, या धातूवरच काही साधनांची नावे दिली गेली आहेत. 'मंत्र' हे मनाला तारणारं साधन आहे. 'यंत्र' हे एखाद्या गोष्टीला (कार्याला) साहाय्य करण्यासाठी किंवा त्यावर अंमल करण्यासाठी (यम्) बनवलेलं साधन आहे. 'तंत्र' हे विशिष्ट पद्धतीनं गुंफलेलं साधन आहे. हे उपाय ही कार्यसिद्धीसाठीची साधनं आहेत. मनुष्याचे प्रयत्न योग्य पद्धतीनं होत असतील तरच या साधनांचा उपयोग होतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की तांत्रिक उपाय करताना आपण ज्या कार्यासाठी उपाय करतो त्या कार्याच्या प्रकृती नुसार देवतेचं रूप डोळ्यासमोर आणल्यास कार्यसिद्धी लवकर होते. सात्त्विक कार्य असेल तर देवतेच्या सात्त्विक रूपाचं ध्यान करावं म्हणूनच अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना सरस्वती किंवा गणपती यांच्या सात्त्विक रूपाचं ध्यान आणि मंत्र आराधना करायला सांगावी. जेव्हा सात्त्विक कार्य नसेल तेव्हा देवतेच्या उग्र रूपाचं ध्यान करावं. उदा: एखाद्या व्यक्तीकडून काही त्रास होत असेल तर शिवाचं उग्र रूप किंवा वीर हनुमानाचं वीरासनातील रूपाचं ध्यान करायला सांगून तसे मंत्र आराधनेसाठी दिले जावेत.
'रत्न' हा प्रामुख्याने दिला जाणारा उपाय आहे. ऋग्वेदकालापासून रत्नांचा उल्लेख अनेक ग्रंथांत आढळतो. पण वैदिक काळातील आणि आधुनिक काळातील रत्नशास्त्र ह्यांचं तत्त्व एकच आहे का असा ठोस पुरावा मात्र उपलब्ध नाही. रत्नं मुख्यतः खनिजं असतात, काही रत्नं जलजन्य, वनस्पतीजन्य व प्राणिजन्यही आहेत. रत्नांचा प्रभाव हा त्यांच्या रासायनिक गुणांवर अवलंबून असतो. ढोबळ मानाने सांगायचं तर एखाद्या अनिष्ट ग्रहाची किरणं शोषून घेऊन त्यांचं निष्क्रियीकरण करणे हा रत्नांचा खरा प्रभाव असतो. रत्नांचे आणि रत्नं ज्या धातूमध्ये जडवलेली आहेत त्या धातूंचे रासायनिक गुण यांचा एकत्रित परीणाम म्हणजेच रत्नांचा प्रभाव. एखाद्या अनिष्ट ग्रहाऐवजी एखाद्या शुभ स्थितीतील ग्रहाचं रत्न देऊन त्याग्रहाची चांगली फळे मोठ्या प्रमाणावर मिळवणे हाही कधीतरी उपाय होऊ शकतो. मात्र याचं निदान करण्यासाठी माहितगार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. ज्या कार्यासाठी रत्नं वापरायची आहेत त्यासाठी ती मंत्रोच्चार, होम अशा विशिष्ट विधींनी सिद्ध केली जातात, अर्थात दर वेळी याची गरज असतेच असं नाही. रत्नं महाग असल्यानं कधीकधी त्यांची उपरत्नं वापरण्यास सांगितली जातात. रत्नं शरीरावर कुठे परिधान करावी यामागेही काही कारणं आहेत. कोणत्याही ग्रहांच्या किरणांचं निष्क्रियीकरण करण्यासाठी ते किरण त्या रत्नांच्या संपर्कात यायला हवेत. अशा वेळी शरीरातील कोणत्या भागातून किरणांना जास्त प्रमाणावर आकर्षिलं जाऊ शकेल त्या ठिकाणी रत्न असल्यास त्याचा परीणाम अनुभवायला मिळू शकेल. यात सामुद्रिक शास्त्राचा संदर्भ येतो. हस्तसामुद्रिक शास्त्रात हातावरील बोटांना ग्रहांचं प्रतिनिधी मानून तशी नावं दिली गेली आहेत. उदा: गुरुचं बोट म्हणजेच तर्जनीमध्ये गुरुचं रत्न पुष्कराज परिधान करावं. रत्नशास्त्र आता खूप प्रगत झालं आहे. आयुर्वेद शास्त्रातही रोग बरा करण्यासाठी रत्नभस्म दिलेली आहेत. रत्नं मनुष्याच्या शरिराभोवतीच्या कोषांमधील समतोल राखण्यास मदत करतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक रोग बरे होण्यास मदत होते. जरी प्रत्येक राशीसाठी काही रत्नं नेहमी सांगितली जातात तरी जन्म कुंडलीनुसार याची गरज असतानाच याचा वापर करावा.
पुढील उपाय म्हणजे 'मंत्र'. मंत्रोच्चारातील शक्ती हा सखोल विषय आहे. स्वरांचा मनावर होणारा प्रभाव विज्ञानाने सिद्ध झालेला आहेच. विविध स्वर अशा पद्धतीने गुंफून 'मंत्र' लिहिले गेले आहेत की ज्याच्या पुनरुच्चारामुळे स्वरांचा ठराविक परीणाम दिसून येतो.म्हणूनच एखाद्या कार्यासाठी मंत्रसंख्या निश्चित केली आहे. कोणताही मंत्र उपाय म्हणून दिला असेल तर आधी त्या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मंत्र म्हणताना त्या अर्थानुसार भाव मनात असावेत. आपण कोणत्या कार्यासाठी मंत्र म्हणत आहोत त्यानुसार देवतेचं रूप ध्यानात असावं. तंत्र शास्त्रात मंत्रांसाठी काही वेळ, दिशा, आसन, जपमाळ, वस्त्र असे काही नियम निश्चित केले आहेत. यामागे अनेक तत्त्वं, वास्तूदेवतांच्या दिशा असे अनेक मुद्दे विचारात घेतले आहेत. वैयक्तिक पातळीवर अशी साधना करताना यामागील कारणं समजून घ्यावीत. षट्कर्मांपैकी सिद्धी किंवा साधना कर्मासाठी पहाटेची वेळ उत्तम असते. साधना हे शुद्ध कर्म आहे त्यामुळे सूर्यप्रकाश, शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न राहतं आणि शरीरातून चांगली ऊर्जा मिळत असते. दिशा पूर्व असते ज्यामुळे उगवत्या सूर्याचे कोवळे किरण अंगावर पडून कडक उन्हाचा त्रास होत नाही. इतर वैयक्तिक कामांसाठी संपूर्ण दिवस मिळतो त्यामुळे कामांचे विचार येऊन मन विचलित होत नाही. सूर्याच्या कोवळ्या उन्हातील ड जीवनसत्व शरीरास आवश्यक असतं. म्हणून अशा साधना नेहमी केल्यास शरीराला पूरकच ठरतात. कोणत्याही शुद्ध कर्मासाठी किंवा केवळ आत्मशुद्धीसाठी पहाटे जप केल्यास निश्चितच फळ चांगलं मिळतं. विशिष्ट वस्त्र व आसन यामागे ग्रहांची किरणे व नैसर्गिक शक्ती आकर्षून घेणे हे प्रमुख कारण आहे. रंगांचा भौतिकशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केल्यास याची माहिती मिळते. जपमाळ यामागील प्रमुख कारणही हेच असावं. रुद्राक्ष या फळाच्या नैसर्गिक गुणांमुळे कोणत्याही साधनेसाठी विशिष्ट जपमाळ उपलब्ध नसेल तर रुद्राक्षमाळ वापरली जाऊ शकते. म्हणून दुर्मिळ किंवा महाग असलेल्या जपमाळा घेणे शक्य नसल्यास रुद्राक्ष माळेचा वापर करावा. साधना मार्गात प्रगती करायची असेल तर मात्र माहितगार व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावं. कारण मंत्रशक्तीचा चुकीचा वापर झाल्यास याचा त्रास होऊ शकतो.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
==================================================
As Tantra tradition emphasizes on individuality, the remedies in Tantra are based on Karma. Sidhi (Achievement) and Sadhana (Meditation) are major Shanti Karmas (pacification). The Karmas originally mentioned for defense purpose which got mostly used for evil purposes are known as Abhichara Karma or Vaammargi Karmas (Left handed). Mainly Akarshan (attraction), Vashikaran (enchantment), Stambhan (immobilization), Vidweshan (creating enmity), Uchchatan (expulsion) and Maran (killing) are the abhichara Karmas. Though the remedies based on these Karmas are individualistic, they are definitely not simple. Only some masters of Tantrik tradition know the exact procedures of the occult rituals for these remedies.
As I mentioned before Vedic and Tantric traditions are intermingled. From various Tantric remedies in the Tantra tradition, now a days mostly gemstones, mantras, yantras, tantras are recommended. Along with these some Stotras (hymns) are recommended for the worship of a deity. The key rituals for these remedies are usually not disclosed. Lack of guidance in such rituals, like method for chanting stotras, pronunciations, timings, directions, asana or rituals of making a yantra leads to unfruitful efforts. Coming to the basics of Tantra, 'Tr' is Sanskrit root which means a 'tool'. Names of many remedies are based on this root. For example Mantra is a tool guiding the mind, Yantra is a tool to control and Tantra means woven tool ( 'tan' means loom). These remedies act as a supplement to human efforts by removing obstacles if any. Another important point in Tantric remedies is the manifestation of a deity according to the nature of the desired work should be meditated in mind. When 'sattvik' achievement is desired a 'sattvik' or calm manifestation of the deity should be meditated. So for students desiring achievement in academics a 'sattvik' manifestation of Goddess Saraswati or Lord Ganesha is recommended for meditation purpose. Similarly when the desired work is not 'sattvik' then fierce manifestation of the deity should be meditated in mind. For example if one is getting harassed or threatened, then fierce personification of Lord Shiv or Veer Hanuman etc are recommended for meditation.
'Gemstone' is a most popular remedy now a days. Though Gemstones are mentioned in the texts of Vedas, the principle of Gems as a therapy in Vedic era is not clear. These Gemstones are mostly minerals. Some Gemstones are waterborne, plant-borne or even animal borne. The effect of Gemstones depends on their chemical composition. Broadly speaking Gemstones can absorb and nullify the rays of a inauspicious planet. Gemstones and the metals in which they are carved together help to get the outcome. In some cases a Gemstone for an auspicious planet is recommended as a remedy. Though in such cases advise from a knowledgeable person is required. For their use as a remedy some times Gemstones are energized by certain rituals. If precious Gemstones are not affordable, semi precious Gemstones are recommended. The use of the Gemstones on a particular body part is important. The science of palmistry describes each finger as a representative of a planet. For example, index finger represents Jupiter and Yellow Sapphire is recommended to be wore on index finger. Ayurveda also prescribes the ashes (bhasma) of Gemstones as a remedy for curing diseases. Gemstones also balance the human aura curing psychological and physical illnesses. Thus the effect of Gemstones is well known. In Astrology Gemstones are recommended for all twelve signs, but Gemstones should be used as a remedy only if required.
The next remedy is 'Mantra'. The powers of Mantra is a vast topic. The effect of sound waves on our mind is proved by science. In Mantras different sound waves are woven in certain fashion and the repeated chanting of these sounds is very effective. So the number of chants is fixed for a specific Mantra. When any Mantra is recommended as a remedy one should understand the meaning of the Mantra and then should worship the personification of God while meditation during chanting. Tantra tradition has prescribed specific timings, direction, asana, rosary and clothing for specific Mantra chanting. One should learn these basics before starting Mantra sadhana as a remedy. Mantra sadhana is also a scientific ritual which benefits human body in many ways. For example, for Shanti Karmas, early morning time is recommended. At dawn the Sun rays are not harsh and the clean air keeps the mind calm. The skin absorbs the early sun rays at dawn, which provides ample vitamin D as compared to the harsh rays at noon which can be harmful. So such meditation practices always reduce the risk of health issues. Specific asana or the cloth on which one sits during meditation and one's clothing has scientific reasons. Different colours can attract different energies. Physics can explain the details of this phenomenon. The scientific reason behind the rosary is also related to absorbance of energies. Rudraksha is a fruit which has many such properties. Probably this is the reason why rudraksha bead rosary can be used for any Tantric ritual irrespective of the purpose. So when a rare or a costly rosary is not available a rudraksha rosary can be used for any remedy or even simple meditation. Apart from remedies if any one wants to make progress in spirituality, one must take proper guidance, as misuse of the Mantra powers can be harmful.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
==================================================
No comments:
Post a Comment