Thursday, 1 March 2018

ज्योतिष शास्त्र आणि आधुनिक जगातील ताळमेळ (Astrology and Modern World)


ज्योतिष शास्त्र ह्या विषयाचा उल्लेख केला की दोन टोकाच्या प्रतिक्रिया येतात. पहिली म्हणजे हे शास्त्र अतिशय जुनं म्हणून खरं आहे आणि दुसरी म्हणजे हे थोतांड आहे. अशा परस्पर विरुद्ध प्रतिक्रिया मिळण्याचं कारण म्हणजे ह्या शास्त्राला आधुनिक विज्ञानाच्या ज्या कसोट्या लावल्या जातात त्यात बसणारं हे शास्त्र नाही. तसंच ह्या शास्त्राला केवळ 'जुनं' म्हणून मानणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सामान्य लोकांना हे शास्त्र कशावर आधारलेलं आहे यात रस नसून केवळ कुंडली विवेचन यातच रस आहे. त्यामुळे ह्या शास्त्राची आधुनिक काळानुसार बाजू मांडणं कठीण जातं. केवळ भावनेचा विचार न करता लोकांनी ह्या शास्त्राची माहिती करून घेतल्यास अनेक मुद्दे समोर येतील.

ज्योतिष शास्त्रासंबंधी अनेक पुस्तकं आता उपलब्ध आहेत. इंटरनेटच्या माध्यमातूनही याची सखोल माहिती मिळू शकते. त्यामुळे जी माहिती अगोदरच उपलब्ध आहे त्यावर न लिहिता ह्यामागील उद्देश सांगून काही गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. ज्योतिष शास्त्र म्हणजे काय? त्याचा नक्की वापर कसा करावा? दूरवरच्या ग्रहांचा आपल्यावर परिणाम कसा होतो? ह्या शास्त्राला काही मर्यादा आहेत का? अचूक भाकीत करणं कसं शक्य आहे? अशा अनेक मुद्द्यांवर माझ्याकडे काही शंका उपस्थित केल्या गेल्या. ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावरही याचा वैयक्तिक पातळीवर कसा उपयोग होतो हा प्रश्नही उपस्थित होतो. याचं कारण म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य निराळं आणि अडचणी निराळ्या. एकच नियम प्रत्येक व्यक्तीला लावून ह्या शास्त्राची उपयुक्तता सांगता येणार नाही. ज्योतिषांच्या भाकीत वर्तवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तसंच एकापेक्षा अधिक ज्योतिषींचा सल्ला घेतल्यानं उडालेला गोंधळ यामुळेही अनेक प्रश्न सुटण्याऐवजी आणखी गुंतत जातात.

अडचणींवर सांगितलेले उपाय-टोटके, रत्न, मंत्र, यंत्र, दैवी शक्ती, पूजा याबद्दलही अनेक समज गैरसमज आहेत. यामध्ये तथ्य जरी असलं तरी केवळ उपायांचा वापर करून ईप्सित साध्य करणं अशक्य आहे. आजकाल काही मोठ्या घटना किंवा अतिप्राचीन कलाकृती, वास्तू, वस्तू यांचा संबंध परग्रहवासी असणाऱ्या प्राण्यांशी लावणे किंवा एखाद्या मोठ्या देशाने किंवा व्यक्तीने मोठा कट रचून काही घटना कशा 'घडवून' आणल्या आहेत व आपण त्याला कसे अनभिज्ञ आहोत हे सांगणे (Conspiracy Theories) याचंही पेव फुटलं आहे. ज्या गोष्टींचा शोध अजून आपल्याला लागला नाही किंवा जी रहस्ये लुप्त झाली आहेत त्याचा सरळ सरळ अमानवी शक्तींशी संबंध लावणे, पौराणिक संदर्भ ग्रंथांचे वेगवेगळे विवेचन अशा गोष्टींमधे तथ्य असतीलही पण एक ठोस लिखाण नसल्याने तिढा आणि गोंधळ वाढत आहे. अमानवी शक्ती, विचित्र अनुभव येणाऱ्या वास्तू, अतिमानवी ताकद असणाऱ्या व्यक्ती यावर माझा विश्वास जरूर आहे. पण अनेकदा प्रसिद्धीसाठी याचं अतिरंजित आणि खोटं चित्र आपल्यासमोर उभं केलं जातं. दुसरीकडे आधुनिकतेच्या नावाखाली केवळ अशा काही घटना घडतच नाहीत असं भासवण्यासाठी काही खऱ्या घटना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. अशा मुद्द्यांवरही मी टप्प्याटप्प्यानं लिहिणार आहे. माझे विचार सर्वांनाच पटतील असं नाही. पण असे गैरसमज दूर करून यात नक्की प्रत्येकानं कोणता मार्ग निवडावा आणि कसा याबद्दल थोडं विवेचन करायचं आहे. ज्योतिष शास्त्रातील गणित आणि कुंडली मांडणे, भाकीत कसे करायचे असे मुद्दे मी टाळले आहेत. मोजक्या माहितीवरून स्वतःची कुंडली मांडून त्याचं परीक्षण करणारे अनेक वाचक मी पहिले आहेत. असं कोणतंही परीक्षण सखोल अभ्यासाशिवाय करणं त्रासदायकही होऊ शकतं म्हणून मी या भागावर लिहू इच्छित नाही.

गेली बावीस वर्षं मी ह्या शास्त्राचा अभ्यास करत आहे. काही काळ स्वतःच अभ्यास केल्यानंतर  २००२ साली 'ज्योतिष शास्त्री' ही पदवी घेतली. तसंच मी मायक्रोबायोलॉजि या विषयात मास्टर्स पदवी घेतल्यामुळे ह्या विषयाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला. इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर, अनेक क्षेत्रातील व्यक्तींच्या कुंडल्या तपासून काही असे मुद्दे समोर आले जे मला लिहावेसे वाटले. असे मुद्दे सर्वांपर्यंत पोहोचून या शास्त्राबद्दलचे गैरसमज दूर करण्यात काही प्रमाणात जरी मला यश आलं तरी माझ्या परिश्रमांचं सार्थक होईल.                   

वाचकांनी माझ्या या लिखाणाला प्रतिसाद देऊन आणखी काही माहिती असल्यास ब्लॉग वर जरूर लिहावी जेणेकरून ती सर्वांपर्यंत पोहोचेल. काही शंका येथे नमूद करण्यासारख्या नसतील तर मला shivsanchitam@gmail.com यावर जरूर ई-मेल करावी.   
              =================================================

Astrology is a subject which gets extreme opinions. One about it being true and old ancient and another it being a hoax. The reason behind such extreme reactions is Astrology cannot be proved on the scientific parameters in today's world. Also there are many believers who believe Astrology just because its an 'old tradition'.  People are not interested in the base of Astrology but they are interested on the prediction part of it. Thus to prove this as a science in modern era it becomes a difficult task. If with open mind we start studying its basics and principles definitely some interesting points will come up. 

Now many books, links and blogs etc are available providing technical information on Astrology.  So I do not want to write on the details which are already accessible, but want to put up information regarding the aim of this science and reduce some misunderstandings regarding the concept of Astrology. During my practice as an Astrologer I get some queries like What is the concept behind Astrology? How to apply it? Are there any limitations to this? How can exact predictions be made?. Even if these answers are provided technically one question still remains on the application of Astrology on personal basis. As everybody's life, problems and circumstances are different, one standard or thumb rule cannot be applied for each and every person. Also astrologers vary in their way of presenting their predictions and people approach more than one astrologer at a time, these factors also complicate the situations. 

The astrological remedies like poojas, gemstones, mantras, tantras, yantras is also a vast topic but due to lack of uniformity it is subjected to misunderstandings. Though these remedies are factual, just using these remedies won't help anybody to achieve the goal. 

Now a days many archaeological things, structures are directly linked to Aliens, some major incidences (even natural calamities), some 'different' aspects in lives of famous public figures, are linked to Conspiracy Theories. To connect the undiscovered 'mysteries' or secrets wiped out along with time with Paranormal Theories and different mythological explanations may be true up to a certain level but lack of standard evidence or uniform theory is creating a chaos. I definitely believe in super human powers, possessed locations or paranormal powers, but for fame or some other motive, at times an exaggerated or totally false picture is put in its place. On the other hand some real incidences are not published just to support the modernized concept of 'science'. I will step by step write on all these concepts. Not everybody will agree to it, but definitely it will give a new perspective to readers ponder on. I am purposely going to avoid technical details of horoscope calculation and text book theory, as some people take this scant information as a way of prediction of personal horoscope. This can lead to trouble. Without proper study and experience jumping on any conclusion will not give any results.

I am studying Astrology for past 22 years. I got Jyotish Shastri degree in 2002.  I am also a Microbiologist  (M.Sc.) so I could study Astrology from scientific point of view. After all this experience and studying wide range of horoscopes (4000+), I felt that honestly I can put some points in writing to guide people. If I can help to clear some doubts or misunderstandings I think the goal of writing this blog is achieved. 

Readers can definitely reply here, put some valuable information so that everybody is benefited. If readers want to personally approach me they can definitely send an email on shivsanchitam@gmail.com.     
                 =================================================

2 comments:

  1. Very nice article. It showcases a proper balance between science and astrology

    ReplyDelete