ज्योतिष शास्त्रात भाकीत वर्तवण्यासाठी जन्म कुंडली, सामुद्रिकशास्त्र- हस्तसामुद्रिक शास्त्र/ शरीरलक्षण शास्त्र अशा अनेक पद्धती आहेत. मी जन्म कुंडली (पारंपरिक) आणि हस्तसामुद्रिक शास्त्र या दोहोंचा अभ्यास केल्यानं या पद्धतींवर काही लिखाण करू शकेन. कुंडली वरून विवेचन करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक पारंपरिक (जन्म कुंडली) आणि दुसरी कृष्णमूर्ती ज्यात प्रामुख्याने एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. मी पारंपरिक ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला असल्यानं या विषयावरूनच सुरुवात करते. .
पृथ्वी ही सूर्य या ताऱ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. मनुष्य जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा जवळपासच्या काही ग्रहांची आणि सूर्याची स्थिती (पृथ्वीच्या तुलनेत) एका विशिष्ट पद्धतीत असते. त्या जन्म वेळेचं गणित म्हणजेच जन्म कुंडली. आता अवकाशातील दूरवरच्या सर्वच ग्रह ताऱ्यांचा विचार यात होत नाही. तर मुख्य ग्रह आणि सूर्य ज्यांचे किरण पृथ्वीपर्यंत पोहोचतात त्यांचाच विचार केला जातो, असे बारा ग्रह आहेत. कुंडली बनवताना त्याचे बारा भाग केले आहेत, ज्यांना स्थान किंवा घर म्हणतात. प्रत्येक स्थानावरून विशिष्ट गोष्टींचं गणित मांडलं जातं. ठराविक बारा ग्रहांची मनुष्याचा जन्मवेळची स्थिती त्या बारा स्थानांत मांडली जाते जी मनुष्याची जन्म कुंडली असते. यात कधीही बदल होत नाही.
ही जन्म कुंडली एका नकाशासारखी असते. त्यात या सर्व मुद्द्यांचा विचार करून मनुष्याचा स्वभाव, शरीर रचना, शरीर प्रकृती, काही वैयक्तिक नाती, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती अशा काही गोष्टींचं आकलन करता येतं. होऊ शकणाऱ्या घटनांचा अंदाज हा महादशा अंतर्दशा अशा गणितांतून मांडला जातो. जन्म कुंडली पाहताना नेमक्या या मुद्यावरच अनेकांचे गैरसमज होतात. जर घटना घडणारच आहेत तर कुंडली बघून काय होणार? किंवा टाळता येणार असतील तर मग कुंडली खरी कशी मानावी? पूजा, होम हवन, रत्न, मंत्र, तंत्र इत्यादी उपायांनी जर सगळ्या अडचणी दूर होणार असतील तर एव्हढे कष्ट का उपसायचे?
या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आधी जन्म कुंडलीचा अर्थ आणि त्यातून कोणता बोध घेता येतो हे समजून घ्यायला हवं. जन्मकुंडली बनवण्यासाठी जे गणित केलं जातं त्यासाठी त्या मनुष्याची जन्म तारीख, जन्म ठिकाण आणि जन्म वेळ याची माहिती घेतली जाते. जन्म ठिकाणाचे अक्षांश रेखांश हा महत्त्वाचा भाग असतो. मनुष्य जिथे जन्माला आला तेथून, जन्म वेळेला असणारी ग्रहांची तुलनात्मक स्थिती ह्यावर हे गणित केलं जातं. जन्मकुंडलीतील ग्रह, चलित ग्रह, कुंडली मांडण्याच्या आणखी काही पद्धती आणि इतर अनेक मुद्द्यांच्या सारासार विचाराअंती भाकीत केलं जातं.
हा जन्म कुंडली नामक नकाशा सर्वप्रथम मनुष्याचा स्वभाव वर्णन करतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणून भारतीय पद्धतीनुसार चंद्र रास हीच आपली जन्म रास म्हणून सांगितली जाते. एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा ती व्यक्ती आपल्या स्वभावानुसारच ती घटना हाताळते आणि तसंच फळ त्या व्यक्तीला मिळतं. मनुष्य स्वभाव हा त्याची बुद्धी, निरीक्षण, अवलोकन, वय यानुसार थोडा बदलतही जातो. म्हणजेच स्वभाव वर्णन या गोष्टीलाही अनेक कांगोरे आहेत. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नसला तरी हे काळानुसार होणारे बदल अनेक गोष्टींबद्दलचे त्याचे दृष्टिकोनही बदलवतात. त्याचीच प्रतिबिंब वयानुसार बदलत जाणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये दिसतात. नीट विचार केला तर ह्या प्रतिक्रिया म्हणजेच बऱ्याचशा घटनांचं मूळ असतं. कारण ग्रह कोणतीही कृती करीत नाहीत. फक्त याचं गणित कुंडलीत मांडलं जातं. हा नकाशा फक्त दिशा दाखवतो. कर्म ही आपली आपल्यालाच करायची असतात, लग्न जमवताना जुळवलेली कुंडली फक्त दिशा दाखवते. पण संसार त्या जोडप्यालाच करायचा असतो. म्हणजेच मनुष्य स्वभाव हीच गुरुकिल्ली असून बाकी बहुतांशी भाकितं याच मुद्द्याभोवती फिरतात.
अनेकदा आपल्या पूर्व कर्मांचा विचार न करता लोक आपल्या अपयशाचं खापर हे नशिबावर फोडतात. (मात्र यशाचं श्रेय नशिबाला न देता स्वकष्टांना देतात). वादविवाद अनेकदा होतात जे सामोपचाराने सोडवता येतात. विवाह बंधनात अडकताना आयुष्यभर ह्या व्यक्तीचा मूळ स्वभाव आपणही विचारपूर्वक हाताळला तरच संसार टिकू शकतो. अशा अनेक व्यावहारिक गोष्टींचा विचार केल्यास ज्योतिष शास्त्रापेक्षा सारासार विचार हा जास्त महत्वाचा असतो. अशावेळी ज्योतिषाला किती खोलवर प्रश्न विचारावेत याला एक मर्यादा असावी. आपल्या प्रत्येक हालचालींचं गणित आपल्याला आधीच कळेल आणि मग आपण त्याचा सामना आपल्या पद्धतीनं सहजच करू अशा मानसिक स्थितीत लोक ज्योतिषाकडे जातात आणि तिथेच असमाधान पदरी पडतं. अनेकदा अशा अट्टाहासानं साध्या गोष्टीही गुंतागुंतीच्या होऊन बसतात.
एखाद्या घटनेचं भाकीत करताना ज्योतिषी 'ही घटना अमुक दिवशी घडेल' असं सांगतात. ती घटना 'घडेल' याचा अर्थ ती प्रयत्नानं मिळवायची असते. 'घडेल' म्हणजे काहीही करून किंवा काहीच न करून घटना 'घडेल' कशी? याचाही विचार व्हावा. मात्र असं भाकीत ऐकल्यावर बरेच लोक निर्धास्त राहतात. प्रयत्न केल्यास अपयश मिळणार नाही किंवा आधी अपयश आलं असेल तर आता तसं होणार नाही असा याचा अर्थ असतो. उदा: एखाद्या व्यक्तीला जानेवारी महिन्यात नोकरी मिळेल असं भाकीत असेल तर त्या व्यक्तीनं त्या दृष्टीनं प्रयत्नही करायला हवेत. नोकरी मिळणार आहे हे नक्की आहे ना मग कष्ट कशाला घ्या? अशा विचारानं घरी बसून कुणीही नोकरी देणार नाही. तसंच नोकरी ही त्या व्यक्तीच्या बुद्धिकौशल्यावरच मिळेल. ज्योतिषानं सांगितलंय ना मग तसंच होईल ही अंधश्रद्धा न बाळगता त्यावर श्रद्धा ठेवून आशावाद बाळगावा.
वयोमानामुळे होणारे रोग हाही एक असाच प्रश्न. रोग, मृत्यू कोणालाही टळत नाहीत. पण जी व्यक्ती जास्त पौष्टिक आहार घेते तिला रोग कमी होतात हे साधारण गणित आहे. मात्र आकस्मिक उद्भवणारे रोग, अपघातामुळे आलेले शारीरिक व्यंग/मृत्यू, चुकीच्या औषधामुळे किंवा चुकीच्या शस्त्रक्रिया ई. गोष्टींमुळे आलेले व्यंग अशी याची दुसरी बाजूही आहेच. याचा विचार कुंडलीवरून करून योग्य मार्गदर्शन करणे, वेळीच त्या व्यक्तीला सावध करणे आणि काही अटळ घटना असेल तर पूर्वसूचना देणे हे ज्योतिषाचं काम आहे. पण संपूर्ण आयुष्य (आपल्या प्रिय व्यक्तीचं सुद्धा) निरोगीच असावं असा अट्टहास मात्र निसर्गाला धरून नाही.
एखादी व्यक्ती मला फसवेल का ? किंवा माझी मुलं मला म्हातारपणी विचारतील का? असे प्रश्न विचारताना आपण त्या व्यक्तीशी आयुष्यभर कसे वागलो, मुलांवर काय संस्कार केले? कुणाला पैसे उधार देताना त्याची पार्श्वभूमी न पाहता फक्त कुंडली पाहणं योग्य आहे का? या सगळ्याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. मग या प्रश्नांवर मिळालेल्या उत्तरांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केल्यास मार्ग नक्की मिळतो. त्यामुळे आपण ज्योतिषाकडे जाताना कोणता प्रश्न विचारतोय याचं भान ठेवून संवेदनशील प्रश्न टाळावेत. निसर्गाचं चक्र कुणालाही सुटलेलं नाही. लहानपणापासून सगळी औषधं घेत राहिल्यानं रोग टाळता येत नाहीत. फक्त काहीच रोग हे लस/vaccine याने थांबवता येतात. तशाच प्रकारे काही वाईट घटना या टाळता येण्यासारख्या असतात. मात्र मनुष्याचा स्वभाव, त्या त्या वेळची परिस्थिती, आजूबाजूच्या व्यक्ती, कायदेशीर कागदपत्र, आर्थिक स्थिती, अगदी काही वेळा जागतिक घडामोडी (परदेश गमन अशा प्रश्नासाठी) अशा अनेक गोष्टींवर याचं भाकीत अवलंबून असतं. अन्यथा आपण योजलेली प्रत्येक गोष्ट यशस्वी होऊ लागली तर अडचणी राहणारच नाहीत.
.
अर्थात या सगळ्या साठी ज्योतिषी हा उत्तम ज्ञान असलेला, समोरील व्यक्तीचा स्वभाव आणि कुवत जाणून तसं भाकीत करणारा असाच हवा. फक्त पैसे कमावण्यासाठी गोड बोलून कोणतीही दिशा न दाखवणं अतिशय अयोग्य आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव पाहून त्या व्यक्तीकडून एखादी चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी मुद्दाम खोटं भाकीत करणं ही एक चांगली विवेचनाची पद्धत मी पहिली आहे. उदा: एखाद्या रागीट व्यक्तीला डिवचून तिच्याकडून सत्कार्य करवून घेणारेही ज्योतिषी आहेत. पण यासाठी तितकी क्षमता आणि ज्योतिष विषयाचं उत्तम ज्ञान आवश्यक आहे. तेवढ्या योग्यतेला पोहोचलेला ज्योतिषीच हे काम करू शकतो. तसंच यासाठी मानसशास्त्राचा थोडा अभ्यास असावा. कुंडलीचं विवेचन करताना ज्योतिषी स्वतः त्याचे कोणते अर्थ लावू शकतो आणि त्यावरून समोरील व्यक्तीला मानसिक दृष्ट्या सक्षम कसा करू शकतो यासाठी वेगवेगळ्या शास्त्रांची थोडी माहिती हवीच. समुपदेशन करताना ज्योतिषी फक्त ज्योतिष ह्या विषयाचा एककल्ली अभ्यास करत गेला तर बदलत्या काळानुसार समोरच्याला सल्ले देणं अशक्य होईल. बदलेल्या रूढी-परंपरा, पूर्वीच्या काळी अस्तित्वात नसलेल्या आणि आता असलेल्या अनेक गोष्टींची सांगड घालूनच सल्ले द्यावेत.
ज्योतिष शास्त्र हे फक्त कुंडलीच्या नकाशावरून दिशा दाखवण्याचं साधन आहे याची जाणीव ज्योतिषानं गरजू व्यक्तीला करून द्यावी. आणि लोकांनीही अशा मार्गदर्शक व्यक्तीकडेच कुंडली विवेचन मागितल्यास योग्य सल्ला मिळूनअनेक वाईट गोष्टींनाही आळा बसेल.
मनुष्य स्वभावावर अवलंबून नसलेल्या अनेक घटना आयुष्यात घडतात. विधिलिखित, आयुष्यातील इतर व्यक्तींच्या निर्णयाचे परिणाम,आकस्मिक घटना अशा अनेक गोष्टी आहेत जिथे केवळ स्वभाव हा मुद्दा नसतोच. अशा गोष्टींवर पुढील लेखांमध्ये सविस्तर लिहिण्याचा प्रयत्न करेन.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
============================== ================
In the field of Astrology there are different branches practiced in Indian culture to predict the future viz; Natal Chart (Janam Kundli), Samudrik Shashtras like Hasta Samudrik Shastra (Palmistry)Sharir Lakshan Shastra (Characteristics of body). I have studied two methods Natal Chart i.e. Janam Kundli and Hasta Samudrik Shastra (Palmistry) so I can elaborate these methods in detail.
There are two methods to predict from the Chart; one is Janam Kundli or Natal chart where prediction of whole life is calculated and another is Krishnamurti (K.P.) method where precisely one question is answered accurately. As I studied the traditional Janm Kundli method I can start my writing beginning with this topic.
In our galaxy Earth is the planet which is completely dependent on the star- Sun. When a human is born on earth the nearby planets in our galaxy and the Sun are at a certain fixed position related to the position of Earth. In broad sense this calculation of relative positions of planets and Sun is the Natal Chart or Horoscope or Janm Kundli in Vedic Astrology. Every planet in our huge galaxy is not considered in this calculation. The nearest planets to the Earth including the Sun whose radiation or light affects the Earth are considered. Thus twelve planets are taken into account. Janm Kundli is divided into twelve parts these are known as Houses. The position of these selected twelve planets at the time of birth of a person is noted in these Houses accordingly. This is the Janm Kundli for that person which is constant for lifetime.
A Janm Kundli is like a map. Considering the above stats, human nature, body structure, health, some personal relations, social, financial status etc can be broadly comprehended. The possibility of incidences which can happen in future can be calculated on the basis of Mahadasha-Antardasha i.e. the study of major time periods in the life of the person. Exactly at this point this science is misunderstood. If something is bound to happen then why to go for Astrology? If we can avoid certain incidences then how can a Janm Kundli reflect it correctly? If remedies like poojas, homa - havana, gemstones, mantras, tantras can find a solution for everything then why to put efforts in life?
To get the answers to all these queries first one has to understand the meaning of Janm Kundli and know how to perceive the interpretations. To calculate the Janm Kundli one's birth date, birth time and birth place are the details required. The longitudes and latitudes of the birth place are certainly the most important for the calculation. The exact location where the person is born and the relative position of considered planets is the key factor here. The prediction is always presented after considering different angles like the position of planets in the Janm Kundli, current position of these planets with respect to original position in the Kundli, different calculated Kundlis of the person etc.
The Janm Kundli first of all explains the nature of the person. Moon is the reflection of mind. Thus according to Indian Astrology, Moon sign is the birth sign. In one's life a person tackles any situation as per one's basic nature, this decides what results one would get. This is the point of utmost importance, which is precisely calculated. Human nature changes according to his intellect, observation, age, experience etc. Thus describing one's nature from Janm Kundli is not a fixed term but has different shades. Basic nature of a person cannot change but these circumstantial changes which occur over time do change one's views. These changes in views reflect in one's reactions. If we think rationally these reactions or way of handling a situation is the root cause of many 'incidences'. As planets do not practically 'perform' anything in human life. The calculation of these 'reactions' is the Janm Kundli.
Janm Kundli only shows directions. The actual 'doing' or 'Karma' has to be performed by humans. In match making during marriages both Kundlis will provide a direction, but the couple has to live their life together. Thus human nature is the prime factor and most of the 'predictions' revolve around this factor.
Many times people don't consider what they have done in the past.and keep blaming the destiny for every failure. (Well the credit for a success goes to the efforts and not destiny). Dispute is a part and parcel of a relationship but it can be resolved by finding a golden mean. While taking important decision as marriage, the nature of the partner has been described in Janm Kundli can be tackled for life or not and many such practical thinkings beforehand sound more convincing than Astrological guidance. In such cases one should know the limitation for queries to be asked to any astrologer. People who approach an astrologer expecting to know each and every movement in the future life perfectly and to handle every such move in their own way get disappointed quickly. This obstinacy complicates even simple situations.
Astrologer sometimes predicts 'an incidence will occur/happen on a particular day'. 'Occur' means it has to be achieved by efforts. How can doing anything or doing nothing will let that 'occur/happen'? Negligence after such prediction is not expected. Such prediction means if you try you will get success or if you have failed in the past then that won't repeat now. For example: A person will get a job in January is the prediction, then the person should make efforts for getting a job. Thinking that its predicted that I will get a job then why to take efforts? will not provide job. Also the job offered will depend of one's caliber. Getting carried away by astrologer's prediction that this IS going to happen is a superstition. Rather than being superstitious one should be a 'believer' and try to achieve the goal.
The diseases that can affect a person after a certain age is a common query again. A person on healthy diet, healthy lifestyle is less prone to the diseases is a natural equation. But sudden occurrence of a disease, trauma induced malformation/death, malformation due to prescription of wrong medicines or failure of a surgery is definitely the other side of this natural equation. To predict such disturbing events from horoscope, guiding the person to avoid such situation and if inevitable then adumbrate the ill effect is the duty of the astrologer. Asking an astrologer for a solution to spend the whole life (even a query for the most beloved) without any disease or medical emergency is just not with the nature.
While asking a query like can this person deceive me? or will my children be with me till the end of my life? one should recollect how one has treated the person in life or how one has nurtured the children. While lending money to someone one should think is it right to just blindly follow the astrological guidance or is it necessary to check the background of that person. One should start introspecting on such points. Then the whole approach can be scanned through practical viewpoint and solutions are not far. Thus one should avoid such sensitive queries while approaching any astrologer. Nobody is free from the cycle of nature. Like we cannot avoid diseases by taking all kind of medication right from birth, there are some situations of life which can't be completely avoided. And like some diseases can be prevented by vaccines, there are some situations of life which can be dealt wisely and ill effects can be prevented. Such practical prediction depends upon the nature of the person, circumstances, people around, legal matters (whenever applicable), financial position and sometimes global events (queries where foreign countries come into question) too. Otherwise if everything is perfectly and precisely predicted and it is successful then happiness will not have an antonym in the dictionary.
Of course for a proper prediction skill the astrologer should be a knowledgeable person. He/she should sense the nature and capability of the querent. Just for the sake of 'business' making all positive comments in prediction is unethical. On the other hand I have seen one strange method of prediction where astrologer predicted in tricky way (or sometimes false prediction) just to get some good things done from the querent. For example provoking a short tempered person just to make the person work for a good purpose was a method of one astrologer. But to apply this way of prediction, the astrologer should be capable enough and should be aware of all consequences as it is a very risky method. Also I feel that for a proper prediction astrologer should have some knowledge of Psychology. While prediction of a Kundli, it is very important how the astrologer interprets it and how he/she can convince and educate the querent. For this a updated information of different fields is necessary. If astrologer keeps concentrating only on 'Astrology' per se, it will be difficult to consult along with changing time. Changing customs-rituals, the newly emerged subjects (in every field) which were not present in the past and changed parameters of life, all these points should be logically connected for interpretation of a Kundli. Astrology is definitely an old tradition but astrologer should update himself with the new lifestyle.
Thus astrologer should make the querent aware that Astrology is just a medium to show the direction or path. People should also seek for the guidance from a authentic astrologer and avoid negative consequences.
Well there are many events in life which do not result due to one's nature. Destiny, nature of people around, sudden incidences etc are some of these where human nature is not the only parameter. I will definitely elaborate on such points in my next articles.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
================================================
No comments:
Post a Comment