Sunday, 11 March 2018

ज्योतिष शास्त्रातील उपायांची पार्श्वभूमी (The background of Astrological Remedies)


मागील लेखात मी 'उपाय' ही संकल्पना थोडी विस्तृत करून सांगण्याचा प्रयत्न केला. आता प्रामुख्याने जे उपाय सांगितले जातात त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. 

वैदिक शास्त्रातील उपाय काय आहेत हे समजण्यासाठी आधी त्यांची तत्त्वं समजून घ्यावी लागतील. वैदिक शाखेमध्ये देवतेचं रूप हा उल्लेख फारसा आढळत नाही. मुख्य देवतांमध्ये इंद्र, वरूण, अग्नी, सूर्य अशा नैसर्गिक रूपातील गुणांना महत्त्व आहे. सरस्वती, विष्णू आणि रुद्र अशा देवतांचा काही ठिकाणी उल्लेख आहे. पण देवतेला मूर्त स्वरूप देण्यापेक्षा देवतेच्या गुणांची आराधना केली जाते. उदा: 'शिव' (रुद्र) ही देवता ऋग्वेदामध्ये परमदैवत आहे. पण शिवाची व्याख्या अग्नि सोमात्मकम् अशी आहे. म्हणजे अग्नि (रुद्र) आणि सोम (शिव) या नैसर्गिक गोष्टींचं नाव शिव आहे. अशा गुणांची आराधना ही अत्यंत सात्त्विक आहे असंही नाही. काही वैदिक विधी वाममार्गीही आहेत. वैयक्तिक सुखासाठी, युद्धात अपराजित राहण्यासाठी अनेक वाममार्गी विधी आहेत. पण मुख्यतः वैदिक विधींचा भर हा परमतत्वाच्या (ज्योतिर्मय प्रकाशाच्या) आराधनेवर असल्याने आणि काळानुरूप आलेल्या बदलांमुळे वैदिक शाखा तांत्रिक शाखेपासून संपूर्णपणे वेगळी आहे असं आपल्याला भासतं. 

वैदिक शास्त्रातील उपायांपैकी 'यज्ञ' हा पूर्वीच्या काळी केला जाणारा उपाय होता, ज्याचा उल्लेख अगदी रामायणातही आहे. यज्ञ म्हणजे देवतेला काही अर्पण करून त्याची आराधना करणे. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. पण आताच्या काळात यज्ञाचे यथासांग विधी कमी वेळा केले जातात. कारण यज्ञाचं मूळ रूप हे पूजन, अर्पण किंवा बळी देणे, दान अशा काही स्तंभांवर आधारीत आहे. काळानुसार नरबळी, प्राण्यांचे बळी यावर बंदी घालण्यात आली. आता अशा वेळी नारळ फोडून हा विधी केला जातो. हविष्य म्हणजे ज्याची आहुति द्यायची आहे त्या पदार्थांमध्येही बदल होत गेले. यज्ञामध्ये अग्नि हिच देवता असली पाहिजे असे नाही. त्या त्या आराध्य देवतेनुसार विधी संपन्न केले जातात. यज्ञ हा विधी अनेक दिवसांचा, महिन्यांचा वा वर्षांचा असू शकतो. काही यज्ञ हे संस्कार असतात उदा: विवाह (सप्तपदी), नामकरण. हे एकदाच करायचे असून यासाठी लागणारा वेळ कमी असतो.  

होम किंवा हवन म्हणजे अग्निला हविष्य अर्पण करणे किंवा आहुति देणे.  यज्ञाचा आवाका मोठा असतो पण होम हा विधी वैयक्तिक कारणांसाठीही करता येतो. कोणत्याही वास्तूमध्ये होम नियमितपणे होत असेल तर आत्मशुद्धी तर होतेच पण वातावरणातील जंतू नाश पावतात आणि शुद्ध हवा खेळती राहते. असे काही शास्त्रीय गुण आता विज्ञानानेही सिद्ध झाले आहेत. अग्निसाठी लागणारं होमकुंड, हविष्य अशा अनेक गोष्टी अत्यंत नैसर्गिक आणि काहीवेळा औषधी परीणाम करणाऱ्या असतात. यामुळेच विशिष्ट हविष्य, होमकुंड बनवण्याचं साधन आणि अग्नि प्रज्वलन करताना वापरलेली सामुग्री याचा एकत्रित परीणाम होऊन अनेक फायदे होतात. 

काही पूजा, इष्टी विधी, पुरश्चरण, सत्र, याग हे सर्व वैदिक विधींचेच भाग आहेत, प्रामुख्याने यज्ञाचे. या सर्व वैदिक विधींसाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या पुरोहितांची गरज असते. 'गृह्य' विधींमध्ये वैयक्तिक कारण असल्याने घरातील व्यक्ती पुरोहितासोबत विधी करू शकते पण बाकी विधी मात्र केवळ पुरोहितच करतात. याचं जे कारण मला समजलं ते येथे मांडण्याचा प्रयत्न करते. ह्या विधींचे नियम हे वर्णसंस्था अस्तित्वात असताना केले गेले आहेत त्यामुळे त्यात जातसंस्था नाही हे प्रथम लक्षात घेऊन गैरसमज टाळावेत. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेताना ब्राह्मण विद्यार्थी (वर्णानुसार) मंत्र, पठण, ध्यान इत्यादी पद्धतीने अध्ययन पूर्ण करून त्यावर प्रभुत्व मिळवीत असे. हे अध्ययन संसारी व्यक्तीला किंवा दुसरा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अशक्य असावं, कारण या अध्ययनाला एकाग्रतेने वेळ देणे अशा व्यक्तीला शक्य होणार नाही. तसंच प्रत्यक्ष विधी अनेक दिवस किंवा महिने चालणारा असू शकतो. अशा वेळी पूर्णवेळ पौरोहित्य करणारी व्यक्तीच हे विधी संपन्न करू शकेल. म्हणूनच वैदिक विधीसाठी (किमान एका) पुरोहिताची गरज असते. 

या वैदिक उपायांचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो? वैदिक विधींमध्ये अग्नि (ऊर्जा) आणि मंत्रोच्चार (स्वर) या दोहोंचा परीणाम दिसून येतो. होम/यज्ञासाठी तयार केलेली वेदी म्हणजेच होमकुंड/यज्ञकुंड विविध नैसर्गिक गोष्टींपासून बनवलं जातं. त्याचे विविध आकार अग्निची ऊर्जा विशिष्ट पद्धतीनं पसरवण्यास मदत करतात. यामुळे हविष्य ज्वलनासाठी योग्य वेळ मिळून वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी उपयोग होतो. तसेच कुंड बनवण्याचे साधनही अग्निमुळे तापून त्याचे रासायनिक गुणही ऊर्जेत मिसळतात. आपण जेवण बनवताना लोखंडाच्या भांड्यांचा वापर केल्यावर अन्नात जसं लोह उतरतं तसाच हा परीणाम आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या समिधा म्हणजेच लाकूड हे विशिष्ट गुणांनी युक्त असतं. उदा: चंदन, रक्तचंदन अशा विविध लाकडांचा उपयोग केला जातो. ज्वलना नंतर यातील रासायनिक गुण औषधी परीणाम करतात. हविष्य हेही अनेक प्रकारचं असून नागकेशर, शंखपुष्पी, सुंठ, तमालपत्र अशा विविध औषधी वनस्पतींमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन हवा शुद्ध होते. हवेतील जिवाणू मारले जातात. अनेक रोगांवर याचा उपचार म्हणून वापर केला जातो (ऍरोमा थेरपी, यज्ञ थेरपी). फक्त माणसांसाठी नाही तर झाडांसाठीही याचा उपयोग केला जातो. हवेतील झाडांना लागणारी कीड अनेकदा मारली जाते आणि रसायनांचा वापर न करता झाडं उत्तम प्रकारे वाढू शकतात. तुपाच्या वापरामुळे अग्नि हळूहळू जळत राहतो व एकदम सर्व हविष्य जाळून खाक होत नाही. कारण अग्निमुळे वाढणारी प्रचंड उष्णता औषधी वनस्पती काही क्षणात भस्म करू शकेल, पण तूप वापरल्याने यास पुरेसा वेळ मिळून रासायनिक तत्त्वं वातावरणात मिसळतात. मोठ्या आकाराच्या जमिनी किंवा घरे यांच्या शुद्धीकरणासाठी हा विधी अनेक दिवस चालू शकतो. मंत्रोच्चारामुळे अनेक ऊर्जा मानसिक परीणाम करतात. स्वरांमुळे  होणारा मानसिक परीणाम आता विज्ञानाने सिद्ध झालाच आहे. वैदिक विधींमधील मंत्रोच्चार अशा पद्धतीने गुंफले गेले आहेत की त्यामुळे मानसिकच नाही तर शारीरिक रोगांवरही औषधी परीणाम होतो. मनुष्य, झाडं, प्राणी सर्वांवर स्वरांचा परीणाम होतो. यामुळेच वैदिक उपायांचा आवाका मोठा आहे असं मी नमूद केलं होतं. जिथे अग्निचा वापर करण्याची आवश्यकता नाही अशा विधींमध्ये मंत्रोच्चार, ध्यान अशा पद्धतींनी चांगली ऊर्जा आकर्षित केली जाऊन वाईट ऊर्जा दूर केली जाते. वैदिक विधींमध्ये दानालाही खूप महत्त्व आहे. एखाद्या गरजू व्यक्तीस दान केल्यानं ती व्यक्ती समाधानानं चांगली ऊर्जा दान देणाऱ्याला देत असते. यालाच आपण सोप्या शब्दात आशिर्वाद म्हणतो. अशा चांगल्या ऊर्जेमुळे आपल्या वृत्तीमध्ये  फरक पडतो, दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा होते, कुविचार कमी होतात. याचा चांगला परीणाम आयुष्यावर होतोच. 

सध्याच्या काळात शक्य असणारे वैदिक विधीच फक्त केले जातात. त्यामुळे वैदिक उपायांचा वापर करताना वैदिक ग्रंथांमध्ये लिहिलेलं फळ आपल्याला जसं च्या तसं मिळेल अशी अवाजवी अपेक्षा बाळगू नये. आणि उपाय करताना त्यामागील तत्त्वं समजून घेऊन मगच उपाय करावा.

प्रामुख्याने दिल्या जाणाऱ्या उपायांपैकी दुसरा प्रकार आहे तांत्रिक उपायांचा. तांत्रिक शाखेचा उगम हा थोडा वादाचा मुद्दा आहे. पण तांत्रिक शाखा हा वैदिक शाखेचाच भाग असून काही तात्त्विक फरकामुळे ही शाखा वेगळी मानली जाते. वैयक्तिक पातळीवरील साधना आणि देवतेचं शक्ती रूप हे दोन मुख्य फरक आहेत. तांत्रिक विधींशी साधर्म्य असणाऱ्या विधींचा उल्लेख वेदांमध्येही आढळतो. मंत्र, होम, आहुति हे विधी तंत्र शाखेतही आहेत. पण जसं वेदांचं नंतरच्या काळातील रूप म्हणजे पुराणं, तसंच गुणांची आराधना या वैदिक तत्वाचं नंतरचं रूप म्हणजे शक्ती आराधना. तांत्रिक शाखेत येणारं देवतेचं मूर्त रुप अनेक साधकांना भावलं. तसंच या शाखेत आत्मिक प्रगतीबरोबरच वैयक्तिक सुखासाठी अनेक विधी असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. तांत्रिक शाखेतील सर्वच उपायांची माहिती देणं शक्य नाही पण काही नेहमी दिल्या जाणाऱ्या उपायांची थोडक्यात माहिती पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करेन.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                      ====================================================

In my previous article I tried to elaborate the concept of remedies. Now lets know about some commonly recommended remedies.  

To know about the Vedic remedies one should understand the concept behind Vedic traditions. Vedic tradition doesn't mention much about the form or manifestation of the Gods. Major deities include natural qualities like Indra (King), Varun (Sky/Clouds/Rain), Agni (Fire), Surya (Sun) etc. Personification of some deities like Vishnu, Saraswati and Rudra (Shiv) are mentioned in some texts. But rather than the form of these deities the qualities are worshiped. For example Shiv (Rudra) is the supreme lord in Rigveda. But Shiv is defined as 'agni somatmakam', which means Fire (Rudra) part and Water (Shiv) part are the two qualities considered as manifestations of Shiv. The worship of these qualities is not fully 'Sattvik'. For example for personal gains, for victory in wars etc there are some left handed rituals mentioned in Vedic tradition. Due to emphasis on Divine energy and evolution of procedures with time it just appears that Vedic tradition is completely different than Tantric tradition.

Coming to the remedies in Vedic tradition Yajna is a major ritual of a much higher magnitude which was also mentioned in epics as old as Ramayana. Yajna is a way of worshiping a deity by oblation or sacrifice . There are different types of Yajna explained in the texts. In today's world all protocols can not be followed to the full extent. Yajna is based on different fundamentals like  Poojan (Worship),  Daan (Charity) etc. Periodically human/animal sacrifices were banned. Now this has been replaced by breaking a coconut. Havishy or substances/herbs to be sacrificed in fire also changed accordingly. Yajna is not necessarily a worship of Fire God. According to the deity the rituals are performed. Yajna can be a ceremony of a few days or months together. Some Yajnas are Sanskaras (Rights to passage) which is a one time procedure and may take less time to perform e.g. Naamkaran (Naming a child), Vivaha (Saptapadi ritual in marriage). 

Homa or Havana is sacrificing Havishy (depends on the protocol) to Fire God. Homa is evolved with time as a fire ritual for personal gain in contrast to Yajna which many times considered as public fire ritual. Homa if regularly performed in the abode not only helps in purifying the soul but also kills the aerial bacteria cleansing the environment around, which has now been scientifically proved. The material of altar for fire and substances to be sacrificed are of natural origin and mostly have medicinal properties. Thus when fire is lit it chemically affects the environment and creates a positive energy around.    

Some poojas, ishti vidhis, satra, yaag are the parts of Vedic rituals mostly of Yajnas. These rituals are performed by priests. Some 'grihya' (domestic) rituals can be performed by people with the help of a priest but other rituals meant for public are performed by a group of priests. I will try and explain my point of view behind the reason of this. To  avoid the misunderstandings it should be noted that the protocols of the rituals were made when caste system did not exist. While learning the rituals a Brahmin student (by Varna system) would achieve mastery by learning mantra, meditation and other skills. This mode of education was likely not possible for a person in other field or a worldly person. The amount of time to be spared and concentrating on time consuming rituals was probably not possible for a worldly person. Some rituals continue for days or months together, so a full time priest can only perform these rituals. This is the reason in my opinion why Vedic rituals need at least one priest.   

How these Vedic remedies affect our life? Vedic rituals include effect of both Energy (mostly Fire) and Mantras (Sound waves). The altar made for fire in Vedic rituals known as Kunda or Vedi is made up of different natural materials. Its symmetry helps the slow combustion of the materials. This helps in providing necessary time for slow burning of Havishy (the offerings) letting the fumes mix in the environment. Also the material used for making the altar slowly gets heated and its chemical constituents get absorbed in the fumes. Its like the process of making food in iron vessels where small amount of iron gets mixed in the food each time., acting as natural iron supplement. The wood used for the rituals (Samidha) is also from selected plants like sandalwood, red sandalwood etc to add the medicinal effect in the process. The heat generated extracts the phytochemical constituents from the woods which help in cleansing the air. The offerings or Havishy also has medicinal properties. Many medicinal plants like dry ginger, cobra's saffron, cinnamon etc are used as offerings. The gross effect of the process reduces carbon dioxide from the environment and also has a bactericidal effect. Many diseases are treated by the fumes of the fire sacrifice rituals (Yajna Therapy, Aroma Therapy). Further not only humans but plants and animals are also benefited by these medicinal fumes. The aerial bacteria or viruses infecting plants are killed and use of pesticides can be reduced by this effect. The marinated butter or ghee used as an offering helps slowing the process of combustion. This avoids the spontaneous combustion of the materials. For bigger lands or palaces this cleansing process may take a few days or weeks. Mantra chanting (sound waves) creates a positive energy affecting human psychology. Effect of sound waves as a therapy is proved by science now. The mantras in Vedic rituals are woven in such a fashion that those not only possess properties to heal psychological disorders but also some diseases. These sound waves affect humans, plants as well as animals. Thus I mentioned earlier that Vedic rituals have much bigger magnitude. In these rituals where Fire is not the deity, mantra chanting or meditation create positive energy. Vedic rituals also emphasize on Dana or Charity. If a needy person is provided with money or materialistic things that person is definitely going to give blessings to the giver. These 'blessings' is a simple term used for positive waves. These waves change our attitude and have positive impact on one's conscience, thus making one feel satisfied and happy. This definitely has a good effect on one's life. 

In today's world only possible forms of Vedic rituals are performed. So one should not expect the result as it is mentioned in the texts. One should also understand the fundamentals of Vedic remedies before following any remedy.

The second major type of recommended remedies is Tantric remedies. The exact origin of Tantra tradition is a bit controversial theory. But Tantra tradition evolved as a part of Vedic tradition and due to some fundamental differences it is considered as a different tradition. Individuality and personification of deities are two major differences between Vedic and Tantra Traditions. Rituals similar to Tantra tradition are mentioned in Vedic tradition. Vice a versa Homa, mantra chanting, oblation, sacrifice etc are also present in Tantra tradiition. As the Puranas are the later manifestations of Vedas, worship of Shakti is a later manifestation of worship of qualities of deities and Divine light. The personification of the Gods in Tantra tradition attracted many worshipers. Along with purification of soul and individualistic approach in protocols, this tradition also emphasized more on personal gains which increased its popularity. Providing information on all remedies in Tantra tradition is not possible, but I will try to elaborate some common remedies in my next article.        

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

                   =================================================

No comments:

Post a Comment