तांत्रिक उपायांमध्ये 'यंत्र' हा अतिशय परीणामकारक उपाय बऱ्याचदा सांगितला जातो. यंत्र म्हणजे प्रमाणबद्ध आकृतीतील ऊर्जा अशी साधी व्याख्या करता येईल. यंत्राचा आकार किंवा मिती हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. काही यंत्रांमध्ये चौकोनांमध्ये विशिष्ट आकडे, चिन्हं किंवा अक्षरं लिहिली जातात. यंत्र बनवण्यासाठी धातू, कागद, भूर्जपत्र, झाडांची पानं, स्फटिक अशा अनेक साहित्यांचा वापर केला जातो. यंत्रात लिहिले जाणारे आकडे किंवा अक्षरं विशिष्ट प्रकारच्या शाईने लिहिली जातात. यंत्र बनवताना लागणाऱ्या नैसर्गिक गोष्टींमधील तत्त्वं या साधनाला प्रभावी बनवतातच पण यंत्रांचं रहस्य हे त्यांच्या आकृतीमधे असतं. त्रिमितीय यंत्र बनवल्यास त्यात ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असते, त्यामुळे संपूर्ण वास्तूसाठी याचा उपयोग केला जातो. ज्या भूमितीतील सिद्धांतांवर मंदिरं, पिरॅमिड बनवले जातात त्याच धर्तीवर यंत्रांचा प्रभाव असतो. द्विमितीय यंत्रांतील प्रमाणबद्ध आकार आणि त्याबरोबर मंत्रोच्चार आणि ध्यान धारणा यामुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा यांचा वैयक्तिक पातळीवर जास्त उपयोग केला जातो. मात्र ह्या यंत्रांचा वापर कसा करावा याची योग्य माहिती मिळाली तरच यांचा उपयोग होतो.
याचा वैद्यकीय दृष्ट्या कसा फायदा होतो ते पाहू. उदा: श्रीयंत्रावर लक्ष केंद्रित करून नियमितपणे ध्यान केल्यास मेंदूतील पिनिअल ग्रंथींना चालना मिळते. भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित झाल्याने या ग्रंथी उत्तम क्षमतेने काम करतात. या ग्रंथींच्या स्रावांमुळे शांत झोप लागते. झोपेच्या अनियमितपणामुळे उद्भवणारे अनेक त्रास कमी होतात. परीणामी स्वभावातील चिडचिड कमी होऊन निर्णय क्षमताही वाढते. इतकेच नव्हे तर या स्रावांमुळे स्मरणशक्ती आणि मेंदूतील काही भावनांशी संबंधित भागावरही रक्ताभिसरणामुळे चांगला परीणाम होतो. अत्यंत शास्त्रीय दृष्ट्या बनवलेली ही यंत्रं योग्य पद्धतीनं हाताळली तर अतिशय प्रभावी असतात. कोणतेही यंत्र वापरण्यासाठी त्याची मिती आणि अर्थ यांचा बोध घेऊन साधना करावी. यासाठी दिलेले विधी शास्त्रोक्त असतात त्यामुळे विधीवत यंत्र साधना हा नक्कीच एक चांगला उपाय ठरू शकतो.
तांत्रिक शाखेत देवतेच्या मूर्त स्वरूपाला महत्त्व असल्याने इतर उपायांमध्ये व्रत, पूजा अशा उपायांचाही उल्लेख होतो. एखाद्या आराध्य दैवताची किंवा कुलदेवतेची विधीवत पूजा करणे हा उपाय असला तरीही माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासावरून काही मुद्दे इथे सांगावेसे वाटतात. कुलदेवता ही मातेसारखीच असते. प्रत्येक कुळाशी त्या देवतेच्या रूपाचा घनिष्ट संबंध असतो. म्हणून कोणत्याही विशेष कार्यापेक्षा नियमितपणे कुलदेवतेची आराधना करणं चांगलंच आहे. अनेक पिढ्यांनी त्या देवतेची आराधना केली असल्याने एक वलय आपल्याभोवती तयार झालेलं असतं. अशा आधीच तयार झालेल्या ऊर्जेमुळे फार कठीण साधना न करताही अशा वेळी मनःशांती मिळते. मात्र काही कारणासाठी आराध्य देवतांची तांत्रिक साधना करताना देवतेचं रूप समजून घ्यावं. देवतेच्या गुणांप्रमाणेच ही रूपं असल्यानं आपल्या इच्छित कार्याशी संबंधित रूप असलेली देवता असावी.
तांत्रिक उपायांत 'तंत्र' हा गाभा आहे. कोणतीही देवता हे प्रचंड उर्जेचंच रूप. त्यामुळे आराधना करण्याचं तंत्र म्हणजेच विधींचे नियम पाळावेत. अगदी साधी उदाहरणं बघितली तरी ही गोष्ट लक्षात येईल. कोणताही पदार्थ स्वयंपाकघरात बनवताना त्याला लागणारं साहित्य, वेळ आणि तापमान (म्हणजेच पाककृती) याचा समन्वय नसेल तर पदार्थ बिघडतो. तसंच विधींचा समन्वय साधला गेला तरच तंत्राचं फळ मिळेल. या विधींमधील काही गोष्टी मूळ कारण माहित नसल्याने कधी कधी पटत नाहीत. त्या टाळल्या गेल्या तर समन्वय बिघडतो. म्हणूनच जे विधी बुद्धीला पटत नाहीत ते एकदम टाळण्यापेक्षा त्याची माहिती करून घ्यावी. त्याचा अर्थ समजल्यावर योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने त्यात बदल नक्की करता येऊ शकेल. तसंच अर्थ माहित नसताना केलेले विधीही फलदायी होणार नाहीत. केवळ पाठांतर करून केलेल्या मंत्रोच्चारात एकाग्रता होत नाही कारण मंत्रांचा अर्थ माहित नसतो. आपण करत असलेल्या उपायावर श्रद्धा असणं हेही तितकंच महत्त्वाचं, कारण श्रद्धा हीसुद्धा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जाच आहे. मनात शंका असेल कोणत्याही उपायाचं फळ मिळत नाही.
तांत्रिक शाखेमध्ये अभिचार कर्मासाठी बरेच विधी दिले आहेत. ह्या कर्मांचा मूळ उद्देश हा स्वसंरक्षण आहे. उदा: उड्डीश तंत्रात भगवान शिवानेही मारण तंत्राचा वापर केवळ जीवाला धोका असेल तरच करावा असं सांगितलं आहे. अर्थात हे लिखाण झालं तेव्हाची समाज व्यवस्था अत्यंत वेगळी होती हा मुद्दा लक्षात घ्यावा. मात्र काही (स्वघोषित) तांत्रिक याचा वापर करून अभिचार कर्म करतात. मूळ उद्देश माहित नसताना स्वार्थासाठी केलेलं अभिचार कर्म हे वाममार्गीच असणार म्हणूनच या विधींचा गैरवापर करू नये. शाबरमंत्रांसारखे स्वयंसिद्ध मंत्र (ज्यांना सिद्ध करण्याची गरज नाही) असे मंत्र योग्य पद्धतीने वापरावे. अनेकदा अशा मंत्रांची माहिती देताना अतिशयोक्ती केली जाते. तंत्र शास्त्र ही काही जादूची कांडी नाही. अशक्य गोष्टी अथक प्रयत्नानं शक्य करणं मनुष्याच्या हाती नक्कीच आहे. त्यात अडथळे येऊ नयेत यासाठी अशा उपायांचा वापर करावा. पण महामृत्यू सारख्या अटळ गोष्टी, आवाक्याबाहेरील गोष्टी यासाठी ह्या शास्त्राचा कोणताही उपयोग होत नाही. अशा अतिशयोक्तीमुळे केवळ अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं. मानवी बुद्धीला अजूनही ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टी आहेत. अगदी निष्णात डॉक्टर, मोठे संशोधक अनेकदा निसर्गापुढे हतबल होतात. नैसर्गिक चमत्कार विज्ञानाच्या चौकटीत बसत नसले तरी ह्या चमत्कारांमागील कारणं एका अर्थानं नैसर्गिकच असतात फक्त ती आपल्या बुद्धीच्या पलीकडील असतात. अशा काही गोष्टींचा संदर्भ तंत्रशास्त्रा सारख्या शास्त्रांमध्ये आहे. अनेक धर्मांत अशा विषयांवर विविध ग्रंथ लिहिले गेले आहेत. या ग्रंथांचा प्रतीकवाद समजून घेतला तर अतिशयोक्ती नक्की टाळता येईल. तसंच हे ग्रंथ निर्माण झाले तेव्हाची समाज व्यवस्था, नियम, भौगोलिक परिस्थिती, हवामान, वनस्पती आणि प्राणी या सर्वच गोष्टी आतापेक्षा भिन्न होत्या. अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच उपायांचा अवलंब करावा.
तंत्र शास्त्रातील काही नेहमी दिल्या जाणाऱ्या काही उपायांबद्दल मी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या शास्त्रात इतर उपायही आहेत ज्यासाठी काही गूढ विधी आहेत. मात्र सर्वच उपाय इथे सांगणं अशक्य आहे. कोणताही उपाय करताना उपायाचे विधी, नियम हा भाग महत्त्वाचा आहेच पण काही वेळा काही अलिखित नियमांचं पालनही करावं. हे अलिखित नियम कोणत्याही कसोटीत बसत नसले तरी सारासार विचार केला तर या गोष्टी नक्कीच मनाला पटतात. अशा काही गोष्टींबद्दल पुढील लेखात लिहिण्याचा प्रयत्न करेन.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
=====================================================
'Yantra' is a very popular and effective Tantric remedy. Yantra literally means machine. So Yantra as a remedy can be simply defined as symmetrical diagram of cosmic energy. The geometry of Yantra is a very important aspect. In some Yantras specific numbers, alphabets or symbols are written in squares. Yantras can be drawn or made on different materials like metals, papers, bhojapatras, leaves, gems or crystals. The symbols, alphabets or numbers are written using specific inks. Though the natural materials used in making of Yantra make it powerful, its secret lies in its symmetrical diagram. Three dimensional Yantras have powers to attract cosmic energies so these Yantras are used for abodes. The Pythagoras theory or geometry of Temples/Pyramids can be the most relevant examples to understand the principle behind Yantra symmetry. Two dimensional Yantras drawn on specific material are mostly used for individual purposes. Mantra chanting along with mediation by concentrating on two dimensional Yantras help gaining positive energies. The specific rituals for energizing the Yantras should be followed to gain the results.
Lets see how Yantras affect human mind from a scientific point of view. Sri Yantra for example is geometrically so precise that while meditating on it by focusing between eyebrows stimulates Pineal Glands. The secretions of these glands not only control sleep but are also linked to memory and some other emotions. Thus these scientifically designed Yantras are very effective if properly used. Any Yantra should be used as a remedy after understanding the symmetry and its meaning. The rituals recommended for energizing the Yantras are scientific. So the worship of Yantra after following all rituals can definitely be an effective remedy.
As Tantra tradition emphasizes on manifestation of the deities, some of the other remedies includes Vrata (resolution) or Pooja. Worshiping a deity or Kula Devata (family deity or mother Goddess) by Pooja is one of the remedies, but some concepts are needed to be understood. Kula Devata is like a mother, who is closely related to the family. So rather than worshiping Kula Devata for a particular purpose, her daily worship is always fruitful. Her worship for generations together creates a protective circle of energy around the family members. This circle of energy helps to get some solutions or mental peace by simple methods of worship. If a different deity is to be worshiped for a purpose then one should understand the manifestation of the deity. These manifestations are the forms of their qualities or knowledge so the deity (quality) related to the purpose should be worshiped.
In Tantric remedies methodology is the key factor. Any deity is a form of energy. So the method of worship i.e. rituals should be followed. Take a simple example for understanding importance of methodology. For preparing a food item, quantity of the ingredients, time, temperature (recipe) should be followed as prescribed. Any alteration can spoil the food item. In the same way if the method of rituals is followed as prescribed then only it will give results. Some people do not agree to the protocols of rituals because they don't know the principles behind the rituals. The skipping or avoiding any step in the rituals can not give the desired results. The principles behind the rituals should be understood rather than disapproving the rituals. After understanding the rituals one can definitely ask for some alteration if the procedure is not possible to perform. In the same way any ritual performed without knowing the meaning or principles can not be fruitful. Blindly chanted Mantras can not give results as one can't concentrate on them without knowing the meaning.
In Tantra tradition various rituals are given for abhichara Karmas. The aim of such Karmas is self defense. For example in Uddish Tantra Lord Shiv stated that Maran Tantra must be used only in life threatening situations. It should be understood that when these rituals were written the system of the society was totally different than what it is today. In spite of this some Tantra experts (mostly self declared) use the rituals for abhichara Karmas. Any abhichara ritual performed for evil purposes without proper knowledge will lead to trouble. Thus misuse of these Tantric rituals must be avoided.The Sidha mantras (which don't need energizing) like Shabar Mantras must be used carefully. Many times information provided for these mantras is exaggerated. Tantra tradition is definitely powerful but not magical. Difficult or impossible goals can be achieved by putting human efforts tirelessly. And the remedies should be used to remove any obstacle if present. In inevitable incidences like Mahamrutyu or desires beyond human capacity, this science will not play any role. Any exaggeration of remedies in such cases increases superstitions. There are many secrets of nature which are still not discovered by humans. Sometimes expert doctors/surgeons, scientists or engineers throw up their hands in despondency. These 'miracles' in one sense occur due to natural reasons only; just they are still not discovered by human brain. Tantra tradition texts or texts from various religions have references for such 'miraculous' events. If we understand the symbolism in these texts any exaggeration can be avoided. We should also understand that most of these texts are ancient when rules of society, environmental and geometrical conditions, plants, animals etc was totally different than today's world. So proper interpretation of these texts is important.
I tried to explain some common remedies from Tantra tradition. There are some other remedies where occult rituals are performed. Explaining all remedies is not possible here though. For any remedy protocols are definitely important but apart from protocols or rituals there are some unwritten laws which should be followed. These unwritten laws may not fit in any protocol per se but are some sensible ways to follow. I will try to write on such do's and don'ts in my next article.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
=======================================================
No comments:
Post a Comment