Wednesday, 8 August 2018

पंचमस्थान (संतती स्थान) The fifth house (House of progeny)





जन्म कुंडलीतील पंचम स्थानाला संतती स्थान किंवा विद्या स्थान असेही म्हणतात. या स्थानावरून बुद्धिमत्ता, शिक्षण, संततीसौख्य, खेळ आणि कलेतील प्राविण्य अशा महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. तसंच प्रेमविवाह (सप्तमस्थानाचा विचार आवश्यक), विवाहापूर्वीचे प्रेमसंबंध, सट्टा लॉटरी मधून मिळणारे पैसे (काही इतर स्थानांचा विचारही आवश्यक) अशा गोष्टींचा अभ्यासही करता येतो. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते पाहू. 

हे विद्येचं स्थान असल्याने कोणती व्यक्ती कोणत्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकेल किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यावं यासाठी या स्थानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. शिक्षणावर आयुष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे शिक्षण घेताना त्या व्यक्तीचा कल कुठे आहे हे पाहणं गरजेचं असतं. प्रत्येक व्यक्तीचा बुध्यांक काही सारखा नसतो त्यामुळे शिक्षण घेताना विद्यार्थ्याकडून किती अपेक्षा ठेवायच्या याबद्दल विचार करताना हे स्थान महत्त्वाचं ठरतं. उच्च शिक्षणाचा विचार ह्या स्थानावरून होत नाही पण मूळ शिक्षण घेताना पुढील विचार करूनच पावले उचलल्यास ते योग्य ठरेल. एखाद्या विद्यार्थ्याला खेळ किंवा कलेची आवड असेल तर लहानपणीच या क्षेत्राचं शिक्षण दिल्यास लवकर फायदा होऊ शकेल. विशेषतः खेळात प्राविण्य मिळवायचं असेल तर त्याची सुरुवात लहानपणापासूनच करावी लागते. पुढे फार थोडा अवधी असतो. विशेषतः मैदानी खेळातील कारकीर्द लवकर संपते. यासाठी याचा विचार आधीपासूनच करावा लागतो. म्हणूनच शिक्षण आणि त्याचबरोबर इतर काही प्रशिक्षण घ्यायचे असेल तर पंचम स्थानाचा विचार करावा. 

या स्थानावरून कलेची केवळ आवडच नव्हे तर त्यातून मिळणारा आनंद कसा असेल याचाही विचार केला जातो. कलेतून मिळणाऱ्या आर्थिक समाधानापेक्षा मानसिक समाधानाचा विचार यावरून होतो. म्हणूनच कलेतील यश याची व्याख्या करताना पैसा, प्रसिद्धी यापेक्षा समाधान आणि  उपभोगता येणारा आनंद याचा विचार ह्या स्थानावरून करावा. कोणत्याही क्षेत्रातून किंवा शिक्षणातून एखादी व्यक्ती किती समाधानी होऊ शकेल याचा अंदाज या स्थानावरून येतो. 

प्रेमसंबंधांचा विचार करता एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर लग्न करणे आणि केवळ शारीरिक संबंध ठेवणे या दोन्ही गोष्टींचा अभ्यास या स्थानावरून केला जातो. प्रेम जमून लग्न व संसार करणे या सरळ पठडीतील काही गोष्टी यात समाविष्ट आहेतच. पण कधीकधी उद्भवणारे कठीण प्रसंग म्हणजे लग्नाआधीचे प्रेम संबंध व त्यातील गुंतागुंत, प्रेमभंग होऊन टोकाचे पाऊल उचलणे, जबरदस्तीने ठेवलेले संबंध (अगदी पळवून नेऊन झालेले अत्याचार) अशा अनेक गोष्टींचा उलगडा या स्थानावरून होतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीत मानसिक समाधान किती मिळेल याचा विचार या स्थानावरून होतो. त्यामुळे प्रेमसंबंध असताना त्यात मानसिक गुंतवणूक आहे की केवळ शारीरिक, याचा अभ्यास केल्यास होणारी फसवणूक टाळता येऊ शकेल. केवळ शारीरिक आकर्षण किंवा श्रीमंती पाहून केलेले प्रेमसंबंध तुटून अनेक व्यक्तींना त्याचा त्रास होतो. अशा वेळी या स्थानावरून मार्गदर्शन घेतल्यास काही निर्णय वेळीच घेता येऊ शकतील.            

पंचम स्थानावरून सट्टा, लॉटरी वा जुगार यातून मिळणाऱ्या पैशांबद्दल काही भाकितं करता येतात. अर्थात या सर्व गोष्टी तत्त्वात बसणाऱ्या नसून काही गोष्टी बेकायदेशीरही आहेत. मोठ्या प्रमाणावर घोड्यांच्या शर्यती, जुगार यात पैसे लावताना काही लोक या स्थानाचा अभ्यास करतात किंवा कोणत्यातरी माहितगार ज्योतिषाचा सल्लाही घेतात. असो, पण अशा मार्गाने पैसा मिळू शकेल का किंवा लॉटरीचे तिकीट लागेल का अशा काही प्रश्नांची उत्तरे या स्थानावरून देता येऊ शकतात. 

पंचम स्थानाचा अंमल हा उदर आणि कुशी या अवयवांवर असतो. त्यामुळे पोटाची दुखणी, स्त्रियांचे रोग, हे संतती स्थानही असल्याने गर्भधारणेत येणाऱ्या काही अडचणी अशा काही रोगांचा विचार या स्थानावरून केला जातो. सतत होणारे पोटाचे आजार किंवा योग्य निदान न होऊ शकणाऱ्या पोटाच्या विकारांसाठी या स्थानाचा अभ्यास करून मार्गदर्शन घेतल्यास निश्चितच फायदा होऊ शकेल.        

अशा प्रकारे पंचम स्थानावरून अनेक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन मिळू शकते. योग्य प्रकारे याचा उपयोग करून घेतल्यास अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यास निश्चित मदत मिळेल.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
        
      ===============================================

The fifth house in the Janm kundli is known as Santatisthana ( house of progeny) or Vidyasthana (house of education). As the names suggest this house mainly describes one's intellect, education, progeny and skill in sports and art. Along with this the house also tells about love marriages (7th house should be studied), relationships before marriage, money gained through gambles ( along with this few other houses should be studied) etc. Now lets see how it can be practically applied.

As the fifth house is house of education it's study is very important to know what kind of education is suitable or which education should be taken even at early stages of life. Many things in life depend on education. So it is important to understand the IQ as well as interest of the student in studies. Every person is not a brilliant student, so the study of this house also guides for the expectation from the student. Though this house doesn't explain much about higher studies, but taking proper early education can help in later stages of life. Any student who is more capable in sports or art rather than standard pattern of education, then training the student for these fields in the beginning can help in future. Precisely speaking for career in sports one must start the training at an early age. After puberty not much time is left for training in sports. Career in physical sports mostly ends in 30s or 40s. So one must think about this kind of career at childhood only. So if one is interested in education and a professional career along with it then a guidance from fifth house will be helpful. 

This house not only describes the liking or skill in art but also tells about the mental satisfaction gained by performing an art. Rather than monetary gains this house tells about satisfaction through art. So when one defines 'success' in art it should be on the basis of mental satisfaction and pleasure but not money and fame. This house tells that how much pleasure and satisfaction is gained through any kind of education or art or even relationship.  

While predicting about courtship, a marriage with a loved one or just a physical relationship both can be studied by this house. A mutual courtship and then marriage is a straight forward path in most cases which is included in such predictions. Apart from this some complications like secret relationship before marriage, extreme steps taken during heartbreak, forceful relationships (like kidnapping, rape etc) can also be known by studying this house. As mentioned earlier this house denotes mental satisfaction gained through any relationship. So while in courtship if one comes to know about the depth of the relation ship i.e. whether it is emotional attachment or just infatuation many problems in future can be avoided. Many emotional people become victims of physical torture or superficial relationship due to rich family background and get depressed later on. If any such doubt arises during courtship or even before commitment then the guidance by studying this house can be very helpful. 

This house can also predict about the money gained through gambling. Though many such things are unethical and sometimes illegal too. Talking about the gamblers many of them study this house or take guidance of a 'professional' astrologers in  horse races, lottery tickets or gambles. Any way the questions about getting money by gambling or lottery tickets can be answered using this house.  

The fifth house governs abdomen and parts of lower abdomen. So abdominal ailments, gynecological problems and even problems in conceiving ( as this house is house of progeny), can be studied by using this house. For problems like recurring abdominal pains or some abdominal ailments which are not getting diagnosed properly the guidance from this house can be extremely helpful. 

In this way the fifth house can give a good guidance regarding many important issues in life. When used properly this can help in finding solutions of various problems. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
           ================================================

No comments:

Post a Comment