जन्म कुंडलीतील षष्ठ स्थानाला आरोग्य स्थान असंही म्हणतात. ह्या स्थानावरून प्रामुख्याने आरोग्याचा विचार केला जातो. तसंच काही छुपे शत्रू, त्या शत्रूंचा नाश किंवा वृद्धी, व्रण किंवा तत्सम गाष्टींमुळे होणारे त्रास यांचाही विचार ह्या स्थानावरून केला जातो. आता प्रत्यक्षात याचा उपयोग कसा होतो ते पाहू.
हे आरोग्य स्थान असल्यामुळे आरोग्याच्या सर्वच तक्रारींसाठी आधी षष्ठस्थान विचारात घेतलं जातं. कुंडलीतील प्रत्येक स्थानाचा एका विशिष्ट अवयवावर अंमल असला तरी आरोग्याचा सर्वांगीण विचार ह्याच स्थानावरून होतो. आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी, झोपण्याच्या वेळा आणि इतर काही कारणांमुळे अनेक रोग उद्भवतात. तसंच जन्मजात असलेले रोग, पिढीजात असलेले काही रोग, जनुकांच्या दोषामुळे उद्भवणारे रोग अशा सर्वच प्रकारच्या रोगांचा विचार ह्या स्थानावरून केला जातो. काही रोग पूर्णतः बरे होतात, काही निदान होऊनही आयुष्यभर बरे होत नाहीत (उदा: एड्स), तर काही रोग बरे होण्यासाठी बराच अवधी लागतो. ज्या रोगांमुळे किंवा अपघातांमुळे कातडीवर व्रण येतात याचाही अभ्यास या स्थानावरून केला जातो. या व्रणांमुळे कधी शरीर विद्रुप होऊ शकतं तर कधी हालचाली करताना अडचणी येतात. असे व्रण फार मोठ्या प्रमाणावर असतील तर त्यामुळे मानसिक त्रासही होतो. अशा प्रकारच्या शारीरिक अडचणींच्या उपचारांच्या वेळी ह्या स्थानाचा अभ्यास केल्यास नक्कीच मदत मिळू शकेल. तंत्र शास्त्रातील काही उपायांमुळे एखाद्याची मानसिक क्षमता वाढवता येऊ शकेल किंवा व्रण कमी होण्यास मदत मिळू शकेल. असे उपाय करताना संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहेच पण हे उपाय वैद्यकीय उपचारांना डावलून कधीच करू नयेत. कोणताही तंत्र शास्त्रातील उपाय वैद्यकीय उपचारांच्या ऐवजी वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. वैद्यकीय उपचारांबरोबर हे उपाय केल्यास लवकर फायदा मिळू शकेल. एकूणच आरोग्य ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा विचार करताना ह्या स्थानाचा अभ्यास केल्यास निरोगी आयुष्य जगण्यासाठी काही मदत नक्कीच मिळू शकेल. आपल्या खाण्यात विशेषतः मधुमेह, रक्तदाब अशा रोगांसाठी काही बदल करायचे असतील तर या स्थानाचा अभ्यास केल्यास फायदा होऊ शकेल.
ह्या स्थानाचा अंमल कटीस्थानावर असतो. त्यामुळे त्यासंबंधी काही तक्रारी असतील तर ह्या स्थानाचा अभ्यास करून काही मार्ग नक्की काढता येऊ शकेल.
हे स्थान आपल्या छुप्या शत्रूंची माहिती देऊ शकेल. काही व्यक्ती केवळ विद्वेषापोटी एखाद्या व्यक्तीला जेरीस आणतात. व्यवसाय, नोकरी असेल तर कंपनीतील अगदी घरातही काही अशा व्यक्तींबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकेल ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. किंवा ज्या व्यक्ती आपल्या विरुद्ध काही काम करत असतील व आपल्याला त्याची कल्पना नसेल तर या स्थानावरून अशा व्यक्तींची माहिती मिळू शकेल. यामुळे कामात किंवा नातेसंबंधांत काही अडचणी येत असतील तर काही मार्ग काढता येईल.
अशा प्रकारे षष्ठ स्थानावरून आपले आरोग्य चांगले राहावे आणि हितशत्रूंपासून सावध राहण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन मिळू शकेल.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
================================================
The sixth house in the Janm kundli is also known as Arogyasthana i.e. health house. This house mainly describes the health of an individual. Precisely this house governs the skin problems related to lesions or ulcers. Along with this it also tells about some hidden enemies, their rise and fall . Now lets see how this can be practically applied.
This is the house of health so as the name suggests this house deals with health of an individual in general. Every house in horoscope governs a particular body organ but total health is studied by this house. Our eating habits, sleep timings and many other reasons cause health problems. Some diseases are inborn or hereditary or some are genetic disorders. All types of health issues can be studied by this house. Some ailments get completely cured by proper medical treatment but some are not curable even after proper diagnosis (viz: HIV / AIDS) and some illnesses take long time to get cured. Some illnesses or accidents which cause lesions or ulcers or permanent marks on the skin are governed by this house. The lesions sometimes make the body look ugly or cause difficulty in movements. If such major lesions are present on the body especially on visible areas like face, they may cause psychological disturbances or affect the confidence of the person. So during the treatment of such cases, the study of this house can be helpful. There are some remedies in Tantra shastra which can boost the the confidence or help to reduce the lesions. These kind of remedies must be used with caution and it should be remembered that they are not the alternative for medical treatments. Altogether health an important parameter is studied by this house, which can give a guideline to live a long life. For any changes to be made in eating habits like in case of diabetes or blood pressure then a proper study of this house can help a lot.
This house also governs the lower abdominal part of human body. So any ailments of this portion need proper diagnose and treatment then along with proper medical care the guidance from this house can be extremely useful.
This house also describes about the hidden enemies in life. There are some people who put us in some sticky situations out of jealousy and can get away with it without noticing. Thus at business place or work place or even at home if one is getting troubled by such people then that can be revealed by studying this house. Some people make tricky activities behind the back which can not be easily pointed out but affect the individual a lot. In such cases where work or relationships are affected. By studying this house such troublesome people and their activities can be unveiled.
In this way this house not only helps in keeping good health but can also protect us from hidden enemies.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
================================================
No comments:
Post a Comment