Thursday, 2 August 2018

चतुर्थ स्थान (मातृस्थान) The fourth house (House of native's Mother)


जन्म कुंडलीतील चतुर्थ स्थानाला मातृस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून मातृसौख्य, वाहन सौख्य, जमीन किंवा स्थावर जंगम मालमत्ता, गृहसौख्य (स्वतःचे घर होईल की नाही), प्राथमिक शिक्षण, शिक्षणाची मुख्य शाखा वगळून छोट्या प्रमाणावर घेतलेलं शिक्षण, लहान कोर्सेस अशा गोष्टींचा अभ्यास केला जातो. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते पाहू. 

मातृसौख्य म्हणजे प्रामुख्याने मातेच्या आयुष्यामुळे जातकाच्या आयुष्यावर होणारे परिणाम, मातेचं सुख किती मिळेल म्हणजेच अप्रत्यक्षपणे मातेचं आयुष्य किती असेल, मातेकडून होणारे मानसिक व आर्थिक सहाय्य इत्यादी गोष्टींचा विचार या स्थानावरून होतो. अनेक घरांमध्ये मुलांचं आईशी पटत नाही. विशेषतः लग्नानंतर काही वैचारिक मतभेद होतात. दोन पिढ्यांमधील असणारा हा फरक बऱ्याचदा टोकाला जातो. कधीकधी आईचं आयुष्य कमी असल्याने मुलांना लहानपणीच मातृसुखाला मुकावं लागतं किंवा सावत्र आई असते. यात दर वेळी मतभेदच असतात असं नाही. पण जेव्हा काही आर्थिक व्यवहार असतात किंवा मातेकडील संपत्ती मिळणार असते तेव्हा या स्थानाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आताच्या काळात अनेक स्त्रिया नोकरी वा व्यवसाय करतात. अशा वेळी आई आणि मुलांमध्ये सुसंवाद नसला तर अनेक गैरसमज होऊ शकतात. तसेच मातेला असणारे आजार कशा प्रकारचे असतील याचाही विचार ह्या स्थानावरून होतो. अनेक मुलांना आईचं सौख्य न मिळाल्यानं मोठेपणी स्वभावात काही बदल झालेले आढळून येतात. लहानपणीच मातृसौख्य हरपल्यास अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक क्वचित शारीरिक त्रासही सहन करावे लागतात. अशा प्रकारच्या अडचणींना अनेक पैलू आहेत. या सगळ्याचा परामर्श इथे घेणं शक्य नाही. पण इथे नंमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतील तर चतुर्थ स्थानाचा अभ्यास केल्यास काही मार्ग काढणं शक्य होऊ शकेल. 

या स्थानावरून गृहसौख्य आणि वाहनसौख्य यांचाही विचार केला जातो. स्वतःचे घर होईल का? किंवा ते कधी होईल आणि कशा प्रकारचे असावे यासाठी या स्थानावरून मार्गदर्शन घेता येईल. केवळ घरच नाही तर जमीन, बागायती, शेती, गुंतवणूक म्हणून घेतलेली जमीन इत्यादींचा विचारही या स्थानावरून होतो. या संबंधित असणारे प्रश्न म्हणजे जमिनीत गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल का? घर किंवा जमीन कोणाच्या नावावर घेतल्यास जास्त फायदेशीर ठरेल? अशा अनेक बाबतीत या स्थानाचा विचार केल्यास संभवव्य धोके टाळता येतील. आर्थिक गुंतवणूक करूनही ताबा मिळत नसलेली घरे, बिल्डरशी असलेले वाद, जमिनी बळकावण्याचे प्रकार इतकंच नाही तर घर मुलांच्या नावावर केल्यावर वृद्धांची होणारी फरफट, भावंडांमधील घर/जमिनीसंबंधित वाद अशा अनेक गोष्टींचा विचार या स्थानावरून करता येतो. वाहनसौख्याचा विचार करता स्वतःचे वाहन कधी घेता येईल? कोणत्या प्रकारचे वाहन लाभेल? किंवा वाहन घेऊन त्यासंबंधित व्यवसाय करता येईल का? अशा प्रश्नांचा विचार या स्थानावरून करता येतो. कधीकधी काही व्यक्तींना वाहनांमुळे अपघात, वाहन चोरीला जाणे असे त्रास उद्भवतात. अशा वेळी या स्थानाचा विचार केल्यास काही मार्गदर्शन नक्की मिळू शकेल. 

चतुर्थ स्थानाचा अंमल हा हृदयावर असतो. त्यामुळे हृदय रोग आणि त्यातील गुंतागुंतीचे काही आजार ह्यावरूनही त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मार्गदर्शन घेता येते. हृदयासंबंधी काही मोठी शस्त्रक्रिया असेल तर या स्थानावरून अशी शस्त्रक्रिया कधी करावी किंवा ती यशस्वी होईल का? अशा प्रकारचा शंकांचे निरसन होऊ शकेल. अर्थात यात वैद्यकीय चाचण्या आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं मत हे सर्वात महत्त्वाचं असतं. 

अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मोठ्या शाखांमधील शिक्षण घेण्यापेक्षा किंवा घेतल्यानंतरही काही छोट्या प्रमाणावरील शिक्षण घेतात. याचा विचार या स्थानावरून करता येतो. उदा: शिवणकाम, टायपिंग, वीज उपकरण दुरुस्ती, कॉम्प्युटर मधील लहान कोर्सेस इत्यादी. काही व्यक्ती अशा प्रकारचे शिक्षण मोठेपणीही घेतात. यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास या स्थानाचा विचार महत्त्वाचा ठरतो. कोणत्या प्रकारचे लहान कोर्सेस करावेत? त्यामुळे आयुष्यात कोणता फायदा होईल? या शिक्षणाचा अर्थार्जन किंवा बढती यासाठी उपयोग होईल का? कोणत्या काळात हे शिक्षण घ्यावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या स्थानाचा विचार केल्यास मिळू शकतील. 

अशा प्रकारे चतुर्थ स्थान अनेक बाबतीत मार्गदर्शक ठरू शकते. या स्थानासंबंधित गोष्टींचा अभ्यास केल्यास आयुष्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल.       

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                             ==================================================

The fourth house in the Janm kundli is also known as Matrusthan or house of mother. This house describes the native's relationship with mother, pleasure of vehicles, land, house (native will own a house or not), small educational courses (other than main branch of education) etc. Now lets see how it can be used practically.

This house describes native's mother i. e. the contentment in the relation of the native and native's mother in every aspect. It mainly includes the effect of mother on native's life, mother's lifespan and emotional/financial help from mother. In many families there are clashes between mother and children. Especially after childrens' marriage these disputes become more prominent. The generation gap reaches to its peak. Sometimes due to untimely death of the mother the children do not get the motherly love which is much needed at small age or they have a stepmother with whom the relationship may not be sound. It is not every time about a estranged relationship but when it comes to financial deals with mother or distribution of maternal property, the study of this house is very important. In today's world many women are working. If the working women can not give enough time to the children it may create some misunderstandings which can be studied by the study of this house. This house can also shed some light on the health issues of native's mother. Many children devoid of mother's love in childhood can develop psychological issues in their adulthood. The absence of mother in some childrens' life may lead to emotional or rarely physical trouble. Every detail of such psychological complications can not be included here, but if such problems arise then the study of this house can help to explicate them.

This house also describes pleasure of vehicles and land or house. The questions like when will I own a house or when will I own a house or which type of house etc can be satisfactorily answered from the study of this house. The pleasure of land means not only house but all types of lands like plots, farmlands, gardens or even investment in properties too. The questions related to lands like when to invest in property? The property should be on whose name? which kind of property should be purchased etc are studied by this house then possible risks can be minimized. Many other problems regarding properties like pending possessions of a property, disputes with the builders, forced possession of the property or even elderly people facing issues after transfer of property to their children or disputes in the siblings related to property can also be studied using this house. The pleasure of vehicles means when someone can buy his/her own vehicle, which type of vehicle is suitable or any business regarding the vehicle can be started or not etc and many other parameters can be studied. Sometimes people frequently meet with the accident or even theft of the vehicle can also be properly studied by this house. 

The fourth house governs the heart in our body. The study of this house can guide regarding ailments of the heart or complications due to heart problems. If a major and risky heart surgery is planned then which period is good for it or the chances of success can be predicted. Obviously for such cases the medical tests and the opinions of the medical authorities is the most important

Some students prefer to go for small courses instead of or even after getting the degree in main branches of education. This type of education is also described by this house. For example: tailoring, typing, electric appliances repairing, computers related courses etc. Some people go for these courses in the later stages of life. If any guidance is required for such kind of education then the study of this house will be very useful. The questions regarding this like which type of course should be selected? How will it help? or can it help in earning or promotions? when to go for such courses etc can be answered by studying this house. 

Well, in this way the fourth house can guide in many important parts of life. The detailed analysis of this house can help at different stages of life. .     

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

             ======================================================== 

No comments:

Post a Comment