Sunday, 17 March 2019

सामुदायिक मृत्यू आणि ज्योतिष शास्त्र (Mass deaths and Astrology)

प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्यातरी वयात मृत्यू योग असणार हे उघड आहे. पण सामुदायिक मृत्यू घडले तर अनेक प्रश्न समोर येतात. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्ती एकाच ठिकाणी व एकाच वेळी मृत्यू पावतात तेव्हा सगळ्यांच्याच कुंडल्यांमध्ये त्या वेळी मृत्यू योग असतो का? सगळ्यांच्याच कुंडल्यांमध्ये मृत्यूचं एकच कारण असतं का? अशा घटना आधीच का वर्तवल्या जात नाहीत? वगैरे..  या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा लेख लिहिण्याचा प्रपंच केला आहे. 

पुढील मीमांसा संपूर्णपणे माझा अभ्यास आणि माझ्या वैयक्तिक मतांवर आधारलेली आहे. याच्याशी प्रत्येकजण सहमत असेलच असे नाही. 
  
कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानलं आहे. संपूर्ण कुंडलीचा अभ्यास, विशेषतः अष्टम स्थान व त्यासंबंधित ग्रह, गोचरीचे ग्रह, महादशा यांचा अभ्यास यावरून कोणत्याही व्यक्तीच्या आयुर्मानाची कल्पना येते. आपली कितीही इच्छा असली तरी प्रत्येकजण काही दीर्घायुषी नसतो. माझ्या अष्टम स्थानावरील लेखात मी महामृत्यू आणि अपमृत्यु या दोन्ही कल्पना विस्तारानं लिहिल्या आहेत. कृपया त्याचा संदर्भ घ्यावा. कुणाचा महामृत्यू म्हणजेच आयुष्य २ वर्षांचं कुणाचं ३० तर कुणाचं १०० वर्षांचंही असतं. जन्मकुंडलीनुसार आयुष्य किती आहे (महामृत्यू कधी आहे) हे पाहताना (अगदी दीर्घायुषी व्यक्ती असली तरी) आयुष्यात धोक्याची वळणं खूप दिसतात. अनेकदा आपण इतक्या सहज त्यातून बाहेर येतो की असे धोके येऊन गेलेत हे लक्षातही येत नाही. मात्र काही वेळा असे प्रसंग मनाला वा शरीराला कायमचे व्रण देऊन जातात. तेव्हा अशा योगांचं महत्त्व लक्षात येतं. अपमृत्यूच्या योगात काळजी घेतली गेली नाही किंवा अगदी वाईट योग असतील तर मात्र यातून सुटका होत नाही आणि मृत्यू ओढवतो. खरं तर मृत्यू हा 'अकाली' नसतोच. पण आपल्या कमी आयुष्याची कल्पना नसल्यानं आणि आपण किमान ७०-८० वर्षे जगणार आहोत हे गृहीत धरल्यानं ते अचानक घडल्यासारखं वाटतं. या सर्व विधिलिखित गोष्टी असल्याने यात अकल्पित असं काही नाही.  

सामुदायिक मृत्यूंमागे आणखी एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. अपघात हे बऱ्याचदा चालकाच्या चुकीमुळे किंवा समोरील वाहनाच्या चालकाच्या चुकीमुळे घडतात असं म्हटलं जातं. अशा वेळी एका व्यक्तीच्या कुंडलीतील मृत्यूयोगामुळे सर्वांचाच मृत्यू ओढवतो का? कधीकधी अपघात हे नैसर्गिक कारणांमुळे घडतात उदा: दाट धुकं वा रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडल्यानेही अपघात होतात. मग याचं नक्की स्पष्टीकरण काय करायचं?  

केवळ मनुष्यच नाही तर पृथ्वीवरही अवकाशातील ग्रह परिणाम करत असतात. त्यामुळे मेदनीय ज्योतिषात वर्तवलेल्या नैसर्गिक आपत्ती आपण ध्यानात घ्यायला हव्यात. जिथे मनुष्याच्या चुका नाहीत उदा: भूकंप अशा ठिकाणी त्या त्या वेळी एक नकारात्मक ऊर्जा कार्यरत असते. नेमक्या अशा ठिकाणी जेव्हा अपमृत्यू किंवा महामृत्यू असणाऱ्या व्यक्ती पोहोचल्या तर त्यांची सुटका होणं कठीण आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं सांगायचं तर जेव्हा अशुभ योग कार्यरत असतात तेव्हा त्या व्यक्ती अशा ठिकाणी पोचतात (नकारात्मक ऊर्जेने आकर्षिले जातात) किंवा त्याच वाहनाने प्रवास करतात ज्यामुळे त्यांना दुर्दैवाने मृत्यूचा सामना करावा लागतो. आणि समजा अशा व्यक्ती त्या ठिकाणी पोचल्या नाहीत किंवा विशिष्ट वाहनातून प्रवास केला नाही तरी मृत्यू येणारच असेल तर इतर ठिकाणी त्या ठराविक वेळेस मृत्यू त्यांना गाठतोच. म्हणजे सामुदायिक मृत्यूची घटना थांबवता येईलही परंतु त्यांचा वैयक्तिक मृत्यू थांबवता येणार नाही आणि एकूण मृत्यू पावलेल्यांची संख्या तीच राहील.   

अशा वेळी बळी पडलेल्या सर्व लोकांच्या कुंडल्यांचा अभ्यास करणं शक्य नसतंच. किंबहुना ते शक्य नसतं म्हणूनच असे प्रश्न उपस्थित होतात. मृत्यूला 'अकाली' हे विशेषण लावण्यापेक्षा 'विधिलिखित' म्हटलं तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. यासाठी ज्योतिष शास्त्राला आव्हान देण्याची काय गरज? पण प्रत्येकाचं आयुर्मान वेगळं असतं ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही. असो, जेव्हा कुंडलीत मृत्यूचे योग असतात तेव्हाच अशा ठिकाणी जाण्याची बुद्धी होते किंवा अपघातग्रस्त वाहनाने प्रवास होतो. यावर अनेक लोक विश्वास ठेवत नाहीत. याचं कारणच हे आहे की सरासरी आयुष्य गृहीत धरलं जाणं. एका वेळी ५० ते १००, क्वचित हजारोंच्या संख्येने एकाच वेळी माणसं मृत्युमुखी पडली तर ते नक्कीच दुःखद आहे पण असे मृत्यू विधिलिखित असल्याने ते थांबवणं अशक्य आहे. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी दर सेकंदाला वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती मृत्यू पावतात. आधी लिहिल्याप्रमाणे मृत्यूची आकडेवारी तीच राहते. पण आपल्याला सामुदायिक मृत्यूची घटना ऐकून धक्का बसतो कारण एकाच वेळी अनेक लोक मृत्युमुखी पडलेले असतात. अधिक समजून घ्यायचं तर इस्पितळात अनेक लहान मुले, तरुण व्यक्ती, वृद्ध रोज मरण पावतात पण प्रत्येकाच्या मृत्यूचं कारण वेगळं असल्यानं ते अघटित वाटत नाही. तसंच आपल्याशी संबंधित अशा व्यक्तींच्या मृत्यूची बातमी आपण ऐकतो त्यामुळे त्याची आकडेवारी लहान असते. म्हणून यात सामुदायिक मृत्यूइतका धक्का बसत नाही. पण एकाच वेळी अनेक लोकांचे मृत्यू पचवणं आपल्याला सहज शक्य नसतं.       

कोणत्याही अपघाताचा विचार करताना केवळ वाहन चालकाच्या कुंडलीतील वाईट योगांमुळे अनेक मृत्यू ओढवतात असं मुळीच नाही. प्रत्येकाचं विधिलिखित असल्याने 'अचानक' कोणीही मृत्यू पावत नाही. प्रत्येकाच्या प्रारब्ध कर्मांनुसार फलित मिळत असतं. ह्या बद्दल योग्य माहिती नसल्याने अनेकदा अकाली मृत्यू असं म्हटलं जातं. अशा प्रकारचं प्रारब्ध असणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा मृत्यू एकाच जागी आणि एकाच वेळी घडतात. मगाशी लिहिल्याप्रमाणे जर या व्यक्ती अशा ठिकाणी गेल्या नाहीत तरी आयुष्याला मोठा धोका असेल तर विधिलिखितानुसार त्या व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी मरण पावणारच असतात. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीचा संबंध अपघातातील अनेक व्यक्तींच्या मरणाशी लावता येणार नाही.  

आता सगळ्यांच्याच कुंडल्यात अपघाती मृत्यू असतो का? तर याचं उत्तर आहे होय. आकडेवारी पाहता ह्या क्षणी देखील अनेक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी अपघातात मरण पावल्या असतील. कुंडलीतील अशुभ मंगळ, रवी, चंद्र, अष्टम स्थानाशी संबंधित योग अशा अनेक कारणांनी अपघाती वा शस्त्राने मृत्यू होतात. स्थळ, वाहन कोणतंही असो कारण अपघात हेच असतं. आपल्याकडे विनाशकाले विपरीतबुद्धी असं म्हणतात ते उगीच नाही. अशा वेळी त्या व्यक्तीनं मरणाच्या दारात जावं याची व्यवस्था विधिलिखितातच असते. जेव्हा अशा व्यक्ती एकएकट्या मरण पावतात तेव्हा याबद्दल फारसे प्रश्न येत नाहीत. पण ह्याच दुर्दैवी व्यक्ती एकाच ठिकाणी आल्या तर मात्र असे एकत्रित मृत्यू पचवणं कठीण जातं. त्यातूनही आपण पाहतो की अशा भयंकर अपघातातून अनेक व्यक्ती अगदी तान्ही मुलंही वाचतात. कारण अपघात भयंकर असला तरी त्यांच्या विधिलिखितानुसार त्या वेळेस मृत्यू नसतो. काही वेळा असे योग नसतील तर अनेक लोक अचानक आपलं त्या ठिकाणी जाणं रद्द करतात असाही अनुभव येतो. कारण तेथील मृत्यूच्या चक्रात ती व्यक्ती अडकू नये असं विधिलिखितच असतं.    

जर प्रारब्ध कर्म आणि विधिलिखित या संज्ञा आपण समजून घेतल्या तर सामुदायिक मृत्यूची तर्कशुद्ध उत्तरं नक्कीच मिळतील. जिथे नैसर्गिक आपत्ती ओढवतात तिथे कायम वस्तीला असणाऱ्या व्यक्तींचं विधिलिखितच असं असतं की त्यांचा (पूर्वजन्मातील कर्मानुसार) जन्म आणि राहणं अशा धोकादायक ठिकाणी होतं. पण जेव्हा आयुष्ययोग चांगला असतो तेव्हा आपत्तीच्या वेळी तेथे कायम वस्तीला असणाऱ्या लोकांपैकी ज्यांच्या कुंडल्यात त्या वेळेस मृत्युयोग नाहीत ते अचानक बाहेरगावी जातात आणि वाचतात. किंवा अशा ठिकाणी भेट देण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींमध्ये काही व्यक्ती आयत्या वेळेस जाणं रद्द करतात वा  करावं लागतं आणि नेमक्या त्याच वेळी आपत्ती ओढवते पण हे लोक वाचतात. नेमक्या आपत्तीच्या वेळेस तेथे हजर नसणं हाही प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मृत्यूमुखी पडलेल्यांची आकडेवारी पाहतो. अचानकरित्या तेथे न पोहोचणाऱ्या वा तेथून बाहेर गेल्यामुळे वाचलेल्या व्यक्तींची आकडेवारी आपण पाहत नाही. दोन्हीचा समतोल राखून विचार केल्यास यामागील विधिलिखिताची कल्पना येईल.  

जेव्हा गुन्हे/हत्या/दरोडे घडतात तेव्हाही या बाजूने विचार केल्यास आपल्याला काही उत्तरं मिळतील. कोणताही खूनी ज्या व्यक्तींचा बळी घेतो त्या चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असतात किंवा विपरीत बुद्धी होऊन त्याच्या जाळ्यात अडकतात. यामागे अनेक कारणं असली तरी बळी पडलेल्या लोकांचा अभ्यास केला तर निदान ५० टक्के व्यक्ती तरी क्रियमाण कर्मांमुळे (जी मृत्यूची निमित्त मात्र असतात) बळी पडतात. पण बळी पडल्यानंतर याकडे दुर्लक्ष केलं जातं. उरलेल्या ५० टक्के व्यक्ती मात्र अपमृत्यू वा महामृत्यूच्या योगांमुळे काही गोष्टी टाळू शकत नाहीत. यात घरफोडी, अपहरण, शारीरिक अत्याचार असे अनेक गुन्हे येतात. उदा: चुकून घराची खिडकी उघडी राहिल्यानेही दरोडे/हत्या घडल्या आहेत. संपूर्ण कुंडलीचा अभ्यास केल्यास अशा होणाऱ्या चुकांचं उत्कलन होतं. मृत्यू यायचाच असेल तर अशा चुका होतात आणि निमित्त मिळतं. पण मूळ कारण विधिलिखितानुसार असलेला मृत्यू हेच असतं, कारण अशा चुका करणारी प्रत्येक व्यक्ती याचा बळी होत नाही. वेळ आली असेल तर अशा व्यक्तींनी चुका केल्या नाहीत तरी इतर कोणत्याही कारणाने मृत्यू येतोच. उदा: कोणतंही ठोस कारण नसताना तरुण धडधाकट व्यक्तीही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावतात. कारण ते प्रारब्ध असतं.   
        
असो, शेवटचा मुद्दा म्हणजे अशी भाकितं आधीच का वर्तवली जात नाहीत? एक ज्योतिषी म्हणून माझा असा अनुभव आहे की अशा घटना घडायच्याच असतील तर त्याचं भाकीत करून ते थांबवणं कसं शक्य आहे? हे निसर्गाच्या विरुद्ध जाणं होईल. असं विधिलिखित टाळणं कोणाच्याही हातात नाही आणि यासाठी ज्योतिष शास्त्र बनलं नाही. स्वतःच्या महामृत्यूची कल्पना असलेले अनेक लोक आहेत. कुणी काळजी घेतं तर कुणी मृत्यूला सहज सामोरं जातं. पण कितीही खबरदारी घेतली तरी ते टाळणं अशक्य आहे. कारण विधिलिखितानुसार असलेला मृत्यू अपरिहार्य आहे. म्हणूनच अशा कोणत्याही घटनांचं भाकीत एकतर योग्य पद्धतीनं होत नाही किंवा झाल्यास त्याची खबरदारी घेऊनही उपयोग होत नाही. जे निसर्गाच्या विरुद्ध आहे ते कार्य करण्याची क्षमता कोणत्याही शास्त्रात नाही. अशा घटना घडण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी निसर्गानं (दैवानं) अशी योजना आखली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. अन्यथा अशा घटनांची पूर्वकल्पना येऊन मृत्यू टाळता आले तर निसर्ग, प्रारब्ध कर्म, संचित कर्म यांचा समतोलच राहणार नाही. जन्म मृत्यूच्या चक्रात कोणतीही ढवळाढवळ होऊ नये म्हणूनच अशी भाकितं योग्य वेळेत होत नाहीत. याचा ज्योतिष शास्त्राच्या क्षमतेशी संबंध नसून नैसर्गिक चक्रांशी संबंध आहे. आपल्याला जे हवं आहे तेच ऐकण्याची इच्छा असेल तर ज्योतिष शास्त्रावर शंका घेतली जाऊ शकते. मात्र योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात म्हणूनच अजून मनुष्य आपलं अस्तित्व टिकवून आहे हे ही लक्षात घ्यायला हवं. निसर्गचक्र भावनांवर आधारीत नाही. 

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

         ===============================================

It is obvious that every person who is born has to die at some point of life, which is known as Mrityu Yog in vedic astrology. But collective deaths definitely raise eyebrows. Many questions arise when mass deaths occur where people of different age groups die at the same time and same place viz;  Did all victims had Mrityu Yog at the same time? Did all victims have the same reason of death in their kundlis? Why are these incidences not forecasted by any astrologer? etc. I am trying to answer these questions in my article here.

The following analysis is fully based on my research work and personal opinions. Every reader may not agree with me.  

In astrology the eighth house is considered as the house of death. Peer study of a kundli, specifically eighth house, planets related to eighth house, current planetary positions and mahadasha can give an idea about the life span of a person. In spite of our obvious desire for long life, not everyone is blessed with longevity of life. I have previously explained the concepts of Mahamrutyu and Apamrutyu in my article on eighth house. Readers can refer to the article if needed. Mahamrutyu i.e. certain death may occur at any age. For some people it may be as short as 2 years, for some it is 30 years and for some it is 100 years or more. Before occurrence of Mahamrutyu of any person (even a long lived), many diminutive or Apamrutyu yogas may lead to situations where the person may have a brush with death. Sometimes we cheat death in such yogas without any help and they remain unnoticed. But some incidences leave emotional or physical scars making the life miserable. This is where we realize the importance of different astrological yogas. Lack of proper precautions in Apamrytu yog or in extreme malefic yogas is mere skating on thin ice where results can be dreadful. Death occurring in these cases is not literally untimely. We perceive it in that way because firstly we are unenlightened about the Mryutu yogas and secondly we genuinely take 70-80 years of life span for granted. Death is always destined, so it is never unforeseen. 

In mass deaths during accidents it is easy to put blame on the drivers of the crashing vehicles. Does it mean that Mrutyu yog in one person's kundli can cause so many deaths? Some times such accidents occur due to natural causes like dense fog or even other reasons like failure in signal systems causing derailment. Then what is the explanation for such events?

Not only human life but earth itself is affected by celestial movements. So we should also consider natural calamities predicted in Mundane astrology. Calamities like earthquake (where human error is not possible) create a negative energy at that place. If people having malefic yogas, Apamryutyu or Mahamrutyu yogas reach the place at the wrong time then it is sailing close to the wind. Astrologically speaking when malefic yogas are active, people somehow reach the exact place (attracted by the negative energy) or travel by a particular vehicle to meet their fate. And suppose these victims miss the vehicle or cannot reach the place, then they are destined to die in different incidences elsewhere. So the mass deaths can be apparently avoided but individual deaths are bound to happen which adds to same number of death toll.

It is obvious that studying each victim's kundli is impossible. Rather I should say that the questions are raised because it is not possible to study all victims' kundlis. If we refer to these deaths as a 'destiny' rather than labeling them as 'untimely', then we can get some logical answers. Why to challenge astrologers? Basically this fact is hard to accept for most of us because we take average life span for granted and call it as 'normal' life span. The concept of different life span for a different individual is not a fact which we want to know. Practically speaking horrific incidences causing deaths of a few people or even thousands are definitely sad but cannot be stopped because such mass deaths are destined. At every second many people from various age groups die at different places. As mentioned earlier the death toll ultimately remains the same as it is not possible to avoid the destiny. The thing is we get shocked because we hear the news of all deaths collectively. To explain it further many infants, young people and older people die at different hospitals each day. But every person's reason of death is apparently different which doesn't make the news as appalling as the news of mass deaths. Also in such cases we only hear the sad news about people who are related to us. Thus the number of deaths or death toll is lower (only for us). So we perceive it in a different way but hearing about collective deaths is just difficult to digest.  

Astrologically speaking in major accidents only the driver's destiny is not to be blamed for mass deaths of the travelers. Every traveler has his/her predesigned and independent destiny. So de_facto no victim dies untimely but has independent mrutyu yog. And due to Prarabdha Karma the outcome is accidental death. Due to mere unenlightenment such deaths are labeled as untimely. The fact is when a group of people with mrutyu yogas travel together (including the driver) they meet their fate. As mentioned earlier even if they don't travel by the particular vehicle they meet their fate by some or the other way. So just linking only one person to such fatal accidents is not practical. 

Now the question arises as, does every victim traveling by the vehicle has same fate? The answer is yes. If we check the statistics even at the very moment, many people must have perished in various accidents individually. Malefic Mars, Sun, Moon and eighth house yogas cause accidental deaths or killings by weapons. The place or vehicle can vary but the root cause of the deaths is accident. There is a proverb in Sanskrit "Vinaash kaale vipareet buddhi" which means when one's destruction time is soon to arrive, one thinks unintelligently. The destiny itself makes an arrangement that a person with mrutyu yog digs his own grave. When people with mrutyu yog die individually, such questions don't arise. But when such unfortunate people die in masses it raises a few eyebrows. Even so we observe that many people, even infants are miraculously saved from horrific accidents. The reason is they have no mrutyu yog even though the accident is fatal. In some instances people who have no malefic yogas, change their plan to reach such places at the 11th hour. Due to auspicious yogas the destiny itself makes an arrangement and almost drags the people out of grave danger.   

If we understand the concepts of Prarabdha karma and destiny then definitely we can get sensible answers to situations like mass death. People who stay in vulnerable places ( e.g. places where earthquakes are frequent or war prone zones) have a destiny (due to karmas in previous births) that they are born and have to reside there. When some of these residents have no malefic yogas they suddenly travel or move out of the place at the time of calamities or accidents and are saved. Even the visitors who are supposed to live longer cancel their visits suddenly at the time of danger. Their absence at exact time of the danger is also destined. The thing is that we take into account the death toll but never enumerate the number of people who had a close call. If we analyze the statistics from both sides we can realize the importance of destiny and karma.     

If we consider the same factors mentioned earlier like destiny and karma, we can get answers for the deaths in violent incidences like massacres, serial killing, robbery or burglary. The victims usually reach at the wrong place at the wrong time according to their destiny. The reasons to visit that place vary from person to person. When I analyzed many such cases I drew a conclusion that half of the victims are victimized due to their own karma (Kriyaman karma), which are apparent causes for destined death. As they are victims, these causes are usually overlooked later on. Half of the victims suffer due to inevitable mrutyu yogas. This kind of suffering also includes crimes like abduction, burglary, rape etc. For example many times burglary or abduction cases happen due to mistakenly kept open windows. The peer study of astrology reveals that of death is in near future such mistakes are ought to happen. But the root cause is mryutu yog or destiny. This is why all people who mistakenly keep windows open do not face the same fate. In other way when mrutyu yog is strong then even if these people keep house secured they have to meet their fate by some other reasons. Many times we hear the sad news of sudden deaths of young people by some disease or massive cardiac arrest. It is the Prarabdha which is not under our control.

Well, the last point is about the forecasting of such incidences in astrology. As an astrologer I feel that if these incidences and precisely the deaths are already destined then how it is possible to stop by predicting them earlier? It will be against nature and destiny. Controlling destiny is in nobody's hands and Astrology is not meant for this. Mahamrutyu is foreseen by most of the people. Some people take precautions and some bravely face the death. Even if precautions are taken Mahamrutyu is apariharya or inevitable because it is destined. This is the reason why most of these incidences are either not predicted correctly or even if predicted they cannot be avoided. Because no science or mechanism has a power to go against nature. I can definitely say that destiny (or the Almighty Lord) has made arrangements to run these events without any hurdles. Otherwise if such incidences were avoided with the help of prophecy then the balance of nature, life, Prarabdha and Sanchita karma would be at stake. To avoid the interference in nature's cycle these kind of prophecies do not work. This should not be linked to the adeptness of astrology or prowess of an astrologer, as it is the matter of nature's power. People who want to hear what they want may become skeptical about astrology. But we should keep in mind that human race is alive because of the smooth running of life and death cycles. Emotions do not rule nature's cycle. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

         ===============================================

Wednesday, 6 March 2019

अंधश्रद्धा- (3) (Superstition- {3})


मागील लेखात मी नमूद केल्याप्रमाणे जर कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेमागील कारणं शोधली तर एकूणच अंधश्रद्धा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कोणताही आकस न ठेवता विचार केल्यास या मागची कारणं समजून घेता येतील. पण विज्ञानवादी व्यक्ती असोत वा दैववादी, दुसऱ्याची बाजू समजून घेण्याआधीच आपली बाजू बरोबर आहे हे गृहीत धरून पुढे जातात. यामुळे कोणत्याही गोष्टीचा उगम व कारण समजून घेण्यापेक्षा तो गोष्ट चुकीची कशी आहे हे सिद्ध करण्याकडे कल जास्त असतो. आपण विज्ञान आणि दैववाद नीट समजून घेऊन दुसऱ्यालाही समजावून सांगितला तर कितीही अडचणीत असलेली व्यक्ती अंधश्रद्धेच्या आहारी जाणार नाही. या गोष्टी कठोर नियम बनवून नाही तर समजावून देऊनच सोडवल्या जाऊ शकतात. नाहीतर नियम बनवूनही त्याची अंमलबजावणी शक्य होत नाही. चुकीच्या गोष्टी चुकीच्या कशा आहेत हे समजावून देण्यापेक्षा एखाद्या विचारसरणीला केंद्र स्थान बनवून टीका करणं सर्वस्वी चुकीचं आहे.   

व्यावहारिक अंधश्रद्धांचा विचार करायचा तर शिक्षणाचा प्रसार आणि सारासार विचार करण्याची सवय अगदी लहानपणापासून लावली गेली तर यात होणारी फसवणूकही टाळता येईल. आपण ज्या व्यक्तीकडे अडचण सोडवण्यासाठी जातो त्या व्यक्तीची पूर्ण माहिती असल्याखेरीज पुढे जाऊ नये. आणि जर ती व्यक्ती अवास्तव मागण्या करत असेल तर आपण त्या पूर्ण कराव्यात का हा सारासार विचार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा गोष्टींवर आळा घालता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीवरील अंधविश्वास त्रासदायक ठरू शकतो. सारासार विचारामुळे व्यावहारिकच नव्हे तर सर्वच अंधश्रद्धा दूर करण्यास मदत होईल. आपल्या हतबलतेचा फायदा आपणच दुसऱ्याला घेऊ देत असू तर फसवणूक होणं साहजिक आहे. श्रद्धा जेव्हा फायद्यासाठी वापरली जाते तेव्हा त्याला बऱ्याचदा अंधश्रद्धेचं स्वरूप येतं. आजच्या काळातील स्पर्धात्मक जीवनशैली, आर्थिक ओढाताण, स्वाभिमानाचा अतिरेक अशा अनेक गोष्टींमुळे हतबल झालेल्या व्यक्ती काही मार्ग शोधायला जातात आणि दुष्टचक्रात अडकतात. जर आर्थिक फसवणूक किंवा शारीरिक अत्याचार होत असतील तर ते कोणत्याही उपायात बसत नाहीत. माणसाची हतबलता आणि त्याचा घेतला जाणारा फायदा ही या फसवणुकींमागची कारणं आहेत. यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेतला पाहिजे.  

अनेक संस्कृतींमध्ये अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. एका विशिष्ट काळात त्या योग्य असतीलही. पण आजच्या काळात त्या नष्ट करायच्या तर प्रथम मानसिकता बदलायला हवी. कोणत्याही व्यक्तीला आपला देश, धर्म, संस्कृती यांचा अभिमान असणं स्वाभाविकच आहे. मग केवळ श्रद्धेवर टीका करून अंधश्रद्धा कशी मिटवता येईल? कारण सगळ्या अंधश्रद्धा या ना त्या प्रकारे धर्म, संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. अनेक लोकांचे खरे-खोटे अनुभव, ऐतिहासिक व धार्मिक पुस्तकं, पिढ्यानुपिढ्या सांगितले गेलेले प्रसंग अशा अनेक माध्यमातून लोकं आपली मतं तयार करतात. त्यांचा पगडा इतका घट्ट आहे की केवळ नियम बनवून किंवा दुसऱ्याला कमी लेखून काहीही साध्य होणार नाही. 

यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आधी मोकळ्या मानाने सर्व बाजुंनी विचार करावा. एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या दुसऱ्यालाही पटू नयेत असा अट्टाहास धरल्याने केवळ आकस निर्माण होईल. एकतर्फी विचार करणं हा अतिरेकही एक प्रकारे अंधश्रद्धाच नाही का? अंधश्रद्धेच्या नावाखाली एखाद्याच्या श्रद्धास्थानाला धक्का लावण्यापेक्षा त्यातील केवळ वाईट गोष्टी कशा बाजूला करता येतील हे समजावून सांगता यायला हवं. निरुपद्रवी अशी श्रद्धा बाळगणं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग झाला. मात्र यात कोणाचं नुकसान, फसवणूक आणि श्रद्धेच्या नावाखाली चाललेला धंदा हे मात्र अत्यंत अयोग्य (म्हणूनच बेकायदेशीर) आहे. 

अंधश्रद्धांचा उगम निश्चित माहित नसला तरी त्या जुन्या काळी लिहिल्या गेल्या आहेत हे नक्की. तो काळ, त्या काळची गरज आणि समृद्ध नसलेली मानसिकता यांचाही विचार अंधश्रद्धा नष्ट करताना व्हायला हवा. कोणतीही गोष्ट एखाद्या काळात योग्य असेल ती पुढील काळात तेवढीच योग्य असेल असे नाही. आजच्या काळातील पुढारलेले वा सुधारक विचार कदाचित पुढच्या काळात लागू होणार नाहीत. कोणत्याही श्रद्धा काळानुसार बदलल्या किंवा सुधारल्या जाणं आवश्यक आहे. तसं फारसं घडलं नसल्याने आज अनेक गैरसमज पसरले आहेत. यात काही सुधारणा करता येतील का याचाही विचार व्हायला हवा. 
आज अनेक वर्ष मानल्या गेलेल्या या अंधश्रद्धा अशा चुटकीसरशी कशा नष्ट होतील? चांगल्या श्रद्धा, दैववाद, ज्योतिषशास्त्र या सगळ्याचा अनुभव आलेलेही अनेक लोक आहेत. निसर्ग, मानवी शरीर, जन्म मृत्यूचं चक्र, अवकाश अशा गोष्टी आपण अजूनही पूर्णपणे समजू शकलेलो नाही. त्यामुळे असे अनुभव खोटे आहेत असं म्हणणं किंवा त्यामागची कारणं शोधणं दरवेळी शक्य होणार नाही. जर विज्ञानातील गृहीतप्रमेय (hypothesis) आपण मोकळ्या मनाने मान्य करतो तर अशा अनुभवांमधील प्रमेय आपण गृहीत धरण्यास काहीच हरकत नाही. यातील काही गोष्टी कदाचित पुढच्या काळात सिद्ध होतीलही किंवा त्या धादांत खोट्या आहेत असेही सिद्ध होईल. पण तोपर्यंत या अनुभवांना नाकारण्यापेक्षा यातून काही अर्थबोध होतो का किंवा काही नवीन शोध लागू शकेल का याचा विचार करण्याचा मोकळेपणा आपण दाखवला तर अनेक गोष्टी बदलू शकतील. अशा वेगळ्या आणि मोकळ्या दृष्टिकोनातून जर आपण सर्व धर्म, संस्कृती अगदी अंधश्रद्धांचा देखील अभ्यास केला तर बऱ्याच अंशी अंधश्रद्धा दूर होतील आणि काही नवीन शिकायलाही मिळेल.       

म्हणूनच माझ्या मते व्यक्तिस्वातंत्र्य, मनाचा मोकळेपणा, एखाद्या गोष्टीचा संपूर्ण अभ्यास आणि सर्वंकष विचार यातून अंधश्रद्धा आणि व्यावहारिक अंधविश्वास या दोन्ही गोष्टी हद्दपार होतील.   

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

       ===============================================

As I mentioned in my previous article if we try and explore the background of the superstitions to find out their origin, it will definitely help to eradicate them. To not only know but understand the reasons behind the origin of these superstitions, we must have a equitable view. May be the devouts or people with scientific approach, both enter the debate with a prejudiced view that their belief system is flawless, without even listening to the other side. Rather than finding out the origin and reasons behind any belief system the followers focus on proving the other side wrong. If we fully understand and explain the principles behind any belief system or scientific approach to others, then it can surely stop the needy people getting victimized under the name of superstitions. This can be achieved by shedding a light upon the lesser known views of these systems and not by merely making strict laws. Just filling the law books will amount to beating the air which will not help in practical execution of the laws. In stead of correcting the faults in a system, just targeting it for tantalizing is not acceptable. 

Thinking about practical life superstitions, education and developing rational thinking from childhood are the two best solutions to eradicate them. Whenever we seek help from any person, his authenticity should be verified. If that person is making impractical demands then till we do not think rationally about fulfilling them, the cases of embezzlement will continue. A blind faith on any person can be dangerous. A rational thinking will not only help in ceasing such frauds but will also help to eradicate any kind of superstition. Due to helplessness if we become gullible and give an easy ride to such bunco authorities, then trickery is hard to stop. When faith is used as a medium to take advantage then it turns out into superstition. In today's fast world many people are victimized of cozenage due to credulous behaviour caused by failures in competitive lifestyle or financial crisis or even uncontrollable ego problems. Its a matter of common sense that financial frauds or physical harassment are never a part of a remedy or solution. Sadly lack of rational thinking and gullible nature keeps the fraudulent scams alive. To stop such activities we should be able to differentiate between faith and blind faith.    

Many superstitious rituals are prevalent in various cultures worldwide. They may have some validity at some point, but their eradication in today's world needs a major change in our mindset. It is very obvious that a person is proud of his/her country, religion and culture. Then how criticizing faith can eradicate blind faith? Because all kinds of blind beliefs by some or the other way are linked to religion and culture. People have made their strong belief systems on the basis of various experiences, references from historical or spiritual texts and experiences shared across generations. All belief systems hold sway over the people's minds, so it is not easy to modify them by making strict laws or tantalizing each other.

Another point to be considered is it is important to think all perspectives with open mind. Two different individuals can have different opinions on a particular point. But obstinate refusal to accept the difference of opinions will only create bitterness. This stubborn unilateral thinking is also a type of superstition or blind belief, isn't it? In lieu of tantalizing anyone's faith/belief system, we should try to explain and eliminate foul things. Following harmless belief system is a part of individual freedom. Nonetheless harming anyone, harassment or frauds under the name of faith is absolutely wrong (& therefore illegal).    

It is almost impossible to find the exact origin of superstitions, but such doctrines were definitely practiced from ancient times. While eradicating superstitions we should also consider their ancient origin, different needs (than today's) at that time and then existing uncivilized form of human society. Any system which is legitimate in one era might not get the same reputation or legacy in other era. For instance today's reformist thoughts may become outdated or even nefarious in the next era. Thus any belief system, science or doctrine should get reformed and modified along with time. Today the lack of such modifications has lead to the vilification of many doctrines. The reformation of such doctrines should also be considered while eradication of superstitious practices. 

The superstitions which are almost practiced as traditions for years together can not be eradicated forthwith. Many people have hard evidences for the results obtained from practicing different systems, faith in deities, astrology etc. Also scientifically speaking we haven't fully explored human body, nature, life and death cycle etc. So every time we can neither debunk these theories nor can logically find the exact cause of the obtained results. These theories might get proved or debunked in coming years. Till that we should peer these theories with open mind to find the logical explanation rather than just labeling them false or diabolical. If we explore all religions, cultures or even superstitions without any prejudice then it will definitely help in systematically eradicating wrong practices as well as might help in discovering new aspects of the doctrines. 

In my opinion individual freedom, open mindedness, peer study of all theories, rational and universal thinking can help in eradicating superstitions.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

      ================================================

Sunday, 3 March 2019

अंधश्रद्धा- (२) (Superstition- {2})

'अंधश्रद्धा' या शब्दाची व्याप्ती केवळ तांत्रिक गोष्टींत अडकवून न ठेवता आपण मोकळ्या मानाने विचार केला तर अनेक असे अंधविश्वास पाहायला मिळतात जे अंधश्रद्धा या सदरातच येतात. याची अनेक उदाहरणे देता येतील. शिवाय या अंधविश्वासांतून बाहेर पडल्याखेरीज अंधश्रद्धा दूर करता येणार नाहीत. आता याची उदाहरणं समजून घेऊ. 

व्यावहारिक आयुष्यात अनेक लोकांचा देवावर ठाम विश्वास असतो तर अनेक लोक संपूर्ण नास्तिक असतात. देव कोणीही पाहिलेला नाही मग तो नाही असंही सिद्ध करता येणार नाही किंवा आहे असंही सांगता येत नाही. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत (अंधश्रद्धेच्या नाहीत). केवळ देवच नव्हे तर आपला धर्म, संस्कृती, विज्ञान इतकंच काय तर आपल्या घराण्याच्या चालीरीती यावरही लोकांची ठाम मतं असतात. ही सुद्धा एक प्रकारे अंधश्रद्धाच नाही का? विज्ञानाचाच विचार करायचा तर सहसा कोणताही विज्ञानवादी देवाचं अस्तित्व मान्य करत नाही. पण विज्ञानातील किती गोष्टी आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो? जर विज्ञान सर्वंकष आहे तर अनेक रोगांवर आज रामबाण का उपाय नाहीत? किंबहुना मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, एड्स असे रोग पूर्ण बरे होत नाहीत. अनेकदा रोगी जेव्हा खूप आजारी असतो तेव्हा डॉक्टरही देवावर भरवसा ठेवायला सांगतात. याचे कारण आपण अजूनही पूर्णतः मानवी शरीर समजू शकलो नाही. अनेक गोष्टी अनुभव, गृहीतप्रमेय (hypothesis) यावरच चालतात. मग ही देखील एक अंधश्रद्धा नाही का? आपण पूर्ण माहित नसताना परग्रही, उडत्या तबकड्या अशा गोष्टींवर संशोधन करतो मग देव, श्रद्धा अशा बाबतीत मनाची दारं बंद का केली जातात?  ज्योतिषशास्त्रातील उपायांमुळे काही काम झालं नाही तर हे शास्त्र थोतांड असतं पण डॉक्टरी उपायांनंतरही रोगी बरा झाला नाही तरी विज्ञान मात्र खोटं नसतं. कोणत्याही गोष्टीला सिद्ध करता आलं नाही म्हणून ती गोष्ट अस्तित्वातच नाही हे एकतर्फी म्हणणं मला योग्य वाटत नाही. विज्ञान असो वा दैवी शक्ती आपल्या श्रद्धा ह्या संतुलित असाव्यात जेणेकरून त्याचं अंधश्रद्धेत परिवर्तन होऊ देऊ नये. इतर व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा तर स्वतःचा धर्म, संस्कृती श्रेष्ठ पण इतर मात्र अयोग्य असे अनेक अंधविश्वास आहेत. जर खोटे स्वयंघोषित गुरु आहेत तर खोट्या पदव्या घेऊन किंवा खोटं वागून फसवणारे डॉक्टर्स, वैज्ञानिक, इंजिनिअर्स, वकील ही आहेत. असो, या सर्व अंधविश्वासापोटी आज कितीतरी सामान्य नागरिकांचा बळी जातो आहे. मग या सर्व गोष्टी अंधश्रद्धेत का मोडत नाहीत?     

दुसऱ्या बाजूने विचार करायचा तर काही (तथाकथित) अंधश्रद्धांच्या मागे चांगली कारणं आहेत. उदा: आपण पाप केलं तर नरकात जातो. आता स्वर्ग वा नरक आहे किंवा नाही हा भाग अलाहिदा. पण वाईट न वागण्यासाठी जर अशी भीती कोणत्या काळी घातली गेली असेल तर त्यात वाईट असं काही नाही. आणखी एक उदाहरण म्हणजे दुसऱ्याच्या हातात कात्री किंवा काडेपेटी देऊ नये, भांडणे होतात. याचं सरळ साधं कारण म्हणजे कात्री देताना घाईघाईत ती समोरच्याला लागू शकते. तसंच पूर्वी ज्या काडेपेट्या बनत त्या आत्ताच्या इतक्या सुरक्षित नव्हत्या, त्यामुळे अचानक घर्षणाने काडी पेटून काही इजा होऊ नये यासाठी अशा गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. आणखी एक उदाहरण म्हणजे देवतेचा जप. कोणत्याही दैवताच्या जपात मंत्रशक्ती असते. आज वर्णोच्चार आणि त्यामुळे होणारे फायदे आपल्याला माहित झाले आहेत. हेच फायदे त्या काळी रांगड्या भाषेत सांगितले गेले आहेत इतकंच. त्यामुळे अर्थाचा अनर्थ न करता योग्य प्रकारे आपण काही गोष्टी पाळल्या तर आपल्याला होणाऱ्या इजा आपण टाळू शकतो. पण आजच्या युगात ज्याला सुरक्षेचे नियम म्हणतात त्याच गोष्टी आधीच्या काळात सांगितल्या गेल्या असल्याने त्यांना अंधश्रद्धा म्हटलं जातंय. अर्थात यात सर्वच गोष्टी येत नसल्या तरी बऱ्याचश्या गोष्टींचा विचार केल्यास त्यात सुसूत्रता दिसेल. आणि ज्या अंधश्रद्धांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत त्या एक तर पाळू नयेत किंवा त्याचं मूळ कारण शोधावं. त्यामुळे निदान योग्य गोष्टींवर तरी अंधश्रद्धेचा शिक्का निघेल आणि बरेचसे गैरसमज दूर होतील.       

मुळात आपण अंधश्रद्धेची व्याख्याच सीमित करून ठेवली आहे. बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेच्या मुळाशी न जाता काही ठराविक गोष्टींविरुद्ध आक्रमक होऊन आपण स्वतःला पुढारलेले म्हणवून घेतो. यामुळे अंधश्रद्धा म्हणजे केवळ आणि केवळ काळी जादू असं एक समीकरण बनून गेलंय. यामुळे साध्या दैववादी व्यक्तीसुद्धा आपण श्रद्धाळू आहोत पण अंधश्रद्धाळू नाही हे सिद्ध करताना बावचळतात. खरं तर आपण दैववादी असून कोणाचं नुकसान करत नसू तर कोणापुढे स्वतःला सिद्ध करण्याची गरजही नाही. असो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्वतः नीट समजून घेतला आणि तो दुसऱ्यालाही समजावता आला तर अनेक गैरसमज दूर होतीलच पण अंधश्रद्धा नाहीश्या व्हायलाही वेळ लागणार नाही.  

अंधश्रद्धा नाहीश्या करायच्या म्हणजे नेमकं काय? आणि ते कसं आमलात आणता येईल याबद्दल पुढील लेखात माहिती घेऊ.      

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

      ===============================================

Superstition is a term which is comprehensive in scope. Thus if we think with open mind and not let this term only bound to Tantric rituals, we can certainly notice some blind beliefs or faiths in practical life, which come under the category superstition. If we can not overcome these false beliefs it is hard to eradicate superstitions. Now lets understand this by some examples.

Practically some people are God fearing and some are absolute atheists. Nobody has actually seen or can define God. So it is not rational to either outright believe or deny the presence of the deities. This is the matter of belief system and not superstition. Not only the existence of deities but the outright belief in the superiority of science, religion, culture or even family traditions hold a sway over peoples' minds. Isn't it that this radical belief system (in either way) is a superstition? For example if we consider science per se, then many hard core science persons deny the existence of the deities. Candidly how many things in science are actually visible? or have a physical evidence? If science is so comprehensive then why there are so many diseases which are hard to cure. In fact diabetes, blood pressure, cancer or AIDS are some of these which are not curable to full extent. When a patient starts losing the battle against such ailments, even doctors tell them to have faith in God. The reason is even modern science is not so superior to understand the human body completely. Even many aspects of science are based on experience and hypothesis. Then why this belief system is not superstitious? Ironically we are ready to do a research on skeptical UFO sightings or aliens, but we close all the doors for studying presence of God or religious beliefs. If astrological remedies fail, then its a fraud but when intensive medical treatments cannot save a patient's life then it is a hard fact. If anything is inexplicable or beyond our understanding, then that doesn't mean it has no existence. I abhor such one sided judgments. It can be science or God, our belief system should be balanced enough not to get converted in to superstition. If there are fraudulent cult leaders, then there are fraudulent doctors, engineers, scientists, advocates etc. Regarding other practical things there are many blind beliefs like one's religion is superior and others are inferior and the list goes on. Well due to all these irrational blind beliefs, lives of many innocent people are devastated. Then why these practices don't come under superstition?

Thinking from other perspective some (so called) superstitions come from a practical place or have benign reasons. E.g. If we commit sin, we rot in hell. Now heaven or hell exist or not is a matter of belief. But if the depiction of hell and its virtual effect tells people to have good gesture in life then there is nothing wrong about it. Another example is don't handover scissors or matchbox directly to anyone (hand to hand). The obvious reason behind this is the scissor may hurt the taker if not handed over properly or if given in a hurry. Similarly the matchboxes were not as safe as today in their earlier stages. Thus to avoid any friction and accidental ignition it was recommended not to handover the matchbox directly to anyone. To give one more example, many people are skeptical about the chanting of mantras. Any chanting including the name of a deity has a power of mantra. We are now aware of scientific benefits of chanting, more popularly known as sound therapy. Same benefits are mentioned in various texts but in a raw language. So without stretching it too far we can definitely avoid some accidents by following these beliefs. We ardently follow these unwritten laws when labelled as 'safety measures' today. But the same measures when found in old texts are ironically stamped as superstitions. Although not all such beliefs have a scientific reason but a most of them come from a practical place. The unanswered superstitions should be either unfollowed or should be studied to find their origin to get some sense while accepting or denying them. The peer study can at least help to stop the looking down upon the deserved beliefs which have a scientific reason.

Basically the problem is we have narrowed down the definition of superstition to mold it as per our convenience. With the changing times it is necessary to refine the term. Rather than studying root and branch, we become aggressive against the whole belief system by just skimming the surface to become so called advanced. This has created a phantasmal equation that superstition is just black magic. Sadly this has become a factual equation for most of us. So even a faithful devotee gets bewildered to prove him/herself as a devout and not superstitious. Ethically a real devout who is not harming anyone due to his/her belief system, has no need to 'prove' anything to anybody. Any way, if we understand the difference between faith and superstition, and can explain it to others then it will not only reduce the misunderstandings but also will help to eradicate unethical superstitions.  

What is exactly the eradication of superstitions? and how it is possible? Lets discuss these points in upcoming article.

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                =========================================================================