Sunday, 3 March 2019

अंधश्रद्धा- (२) (Superstition- {2})

'अंधश्रद्धा' या शब्दाची व्याप्ती केवळ तांत्रिक गोष्टींत अडकवून न ठेवता आपण मोकळ्या मानाने विचार केला तर अनेक असे अंधविश्वास पाहायला मिळतात जे अंधश्रद्धा या सदरातच येतात. याची अनेक उदाहरणे देता येतील. शिवाय या अंधविश्वासांतून बाहेर पडल्याखेरीज अंधश्रद्धा दूर करता येणार नाहीत. आता याची उदाहरणं समजून घेऊ. 

व्यावहारिक आयुष्यात अनेक लोकांचा देवावर ठाम विश्वास असतो तर अनेक लोक संपूर्ण नास्तिक असतात. देव कोणीही पाहिलेला नाही मग तो नाही असंही सिद्ध करता येणार नाही किंवा आहे असंही सांगता येत नाही. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत (अंधश्रद्धेच्या नाहीत). केवळ देवच नव्हे तर आपला धर्म, संस्कृती, विज्ञान इतकंच काय तर आपल्या घराण्याच्या चालीरीती यावरही लोकांची ठाम मतं असतात. ही सुद्धा एक प्रकारे अंधश्रद्धाच नाही का? विज्ञानाचाच विचार करायचा तर सहसा कोणताही विज्ञानवादी देवाचं अस्तित्व मान्य करत नाही. पण विज्ञानातील किती गोष्टी आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो? जर विज्ञान सर्वंकष आहे तर अनेक रोगांवर आज रामबाण का उपाय नाहीत? किंबहुना मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, एड्स असे रोग पूर्ण बरे होत नाहीत. अनेकदा रोगी जेव्हा खूप आजारी असतो तेव्हा डॉक्टरही देवावर भरवसा ठेवायला सांगतात. याचे कारण आपण अजूनही पूर्णतः मानवी शरीर समजू शकलो नाही. अनेक गोष्टी अनुभव, गृहीतप्रमेय (hypothesis) यावरच चालतात. मग ही देखील एक अंधश्रद्धा नाही का? आपण पूर्ण माहित नसताना परग्रही, उडत्या तबकड्या अशा गोष्टींवर संशोधन करतो मग देव, श्रद्धा अशा बाबतीत मनाची दारं बंद का केली जातात?  ज्योतिषशास्त्रातील उपायांमुळे काही काम झालं नाही तर हे शास्त्र थोतांड असतं पण डॉक्टरी उपायांनंतरही रोगी बरा झाला नाही तरी विज्ञान मात्र खोटं नसतं. कोणत्याही गोष्टीला सिद्ध करता आलं नाही म्हणून ती गोष्ट अस्तित्वातच नाही हे एकतर्फी म्हणणं मला योग्य वाटत नाही. विज्ञान असो वा दैवी शक्ती आपल्या श्रद्धा ह्या संतुलित असाव्यात जेणेकरून त्याचं अंधश्रद्धेत परिवर्तन होऊ देऊ नये. इतर व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा तर स्वतःचा धर्म, संस्कृती श्रेष्ठ पण इतर मात्र अयोग्य असे अनेक अंधविश्वास आहेत. जर खोटे स्वयंघोषित गुरु आहेत तर खोट्या पदव्या घेऊन किंवा खोटं वागून फसवणारे डॉक्टर्स, वैज्ञानिक, इंजिनिअर्स, वकील ही आहेत. असो, या सर्व अंधविश्वासापोटी आज कितीतरी सामान्य नागरिकांचा बळी जातो आहे. मग या सर्व गोष्टी अंधश्रद्धेत का मोडत नाहीत?     

दुसऱ्या बाजूने विचार करायचा तर काही (तथाकथित) अंधश्रद्धांच्या मागे चांगली कारणं आहेत. उदा: आपण पाप केलं तर नरकात जातो. आता स्वर्ग वा नरक आहे किंवा नाही हा भाग अलाहिदा. पण वाईट न वागण्यासाठी जर अशी भीती कोणत्या काळी घातली गेली असेल तर त्यात वाईट असं काही नाही. आणखी एक उदाहरण म्हणजे दुसऱ्याच्या हातात कात्री किंवा काडेपेटी देऊ नये, भांडणे होतात. याचं सरळ साधं कारण म्हणजे कात्री देताना घाईघाईत ती समोरच्याला लागू शकते. तसंच पूर्वी ज्या काडेपेट्या बनत त्या आत्ताच्या इतक्या सुरक्षित नव्हत्या, त्यामुळे अचानक घर्षणाने काडी पेटून काही इजा होऊ नये यासाठी अशा गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. आणखी एक उदाहरण म्हणजे देवतेचा जप. कोणत्याही दैवताच्या जपात मंत्रशक्ती असते. आज वर्णोच्चार आणि त्यामुळे होणारे फायदे आपल्याला माहित झाले आहेत. हेच फायदे त्या काळी रांगड्या भाषेत सांगितले गेले आहेत इतकंच. त्यामुळे अर्थाचा अनर्थ न करता योग्य प्रकारे आपण काही गोष्टी पाळल्या तर आपल्याला होणाऱ्या इजा आपण टाळू शकतो. पण आजच्या युगात ज्याला सुरक्षेचे नियम म्हणतात त्याच गोष्टी आधीच्या काळात सांगितल्या गेल्या असल्याने त्यांना अंधश्रद्धा म्हटलं जातंय. अर्थात यात सर्वच गोष्टी येत नसल्या तरी बऱ्याचश्या गोष्टींचा विचार केल्यास त्यात सुसूत्रता दिसेल. आणि ज्या अंधश्रद्धांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत त्या एक तर पाळू नयेत किंवा त्याचं मूळ कारण शोधावं. त्यामुळे निदान योग्य गोष्टींवर तरी अंधश्रद्धेचा शिक्का निघेल आणि बरेचसे गैरसमज दूर होतील.       

मुळात आपण अंधश्रद्धेची व्याख्याच सीमित करून ठेवली आहे. बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेच्या मुळाशी न जाता काही ठराविक गोष्टींविरुद्ध आक्रमक होऊन आपण स्वतःला पुढारलेले म्हणवून घेतो. यामुळे अंधश्रद्धा म्हणजे केवळ आणि केवळ काळी जादू असं एक समीकरण बनून गेलंय. यामुळे साध्या दैववादी व्यक्तीसुद्धा आपण श्रद्धाळू आहोत पण अंधश्रद्धाळू नाही हे सिद्ध करताना बावचळतात. खरं तर आपण दैववादी असून कोणाचं नुकसान करत नसू तर कोणापुढे स्वतःला सिद्ध करण्याची गरजही नाही. असो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्वतः नीट समजून घेतला आणि तो दुसऱ्यालाही समजावता आला तर अनेक गैरसमज दूर होतीलच पण अंधश्रद्धा नाहीश्या व्हायलाही वेळ लागणार नाही.  

अंधश्रद्धा नाहीश्या करायच्या म्हणजे नेमकं काय? आणि ते कसं आमलात आणता येईल याबद्दल पुढील लेखात माहिती घेऊ.      

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

      ===============================================

Superstition is a term which is comprehensive in scope. Thus if we think with open mind and not let this term only bound to Tantric rituals, we can certainly notice some blind beliefs or faiths in practical life, which come under the category superstition. If we can not overcome these false beliefs it is hard to eradicate superstitions. Now lets understand this by some examples.

Practically some people are God fearing and some are absolute atheists. Nobody has actually seen or can define God. So it is not rational to either outright believe or deny the presence of the deities. This is the matter of belief system and not superstition. Not only the existence of deities but the outright belief in the superiority of science, religion, culture or even family traditions hold a sway over peoples' minds. Isn't it that this radical belief system (in either way) is a superstition? For example if we consider science per se, then many hard core science persons deny the existence of the deities. Candidly how many things in science are actually visible? or have a physical evidence? If science is so comprehensive then why there are so many diseases which are hard to cure. In fact diabetes, blood pressure, cancer or AIDS are some of these which are not curable to full extent. When a patient starts losing the battle against such ailments, even doctors tell them to have faith in God. The reason is even modern science is not so superior to understand the human body completely. Even many aspects of science are based on experience and hypothesis. Then why this belief system is not superstitious? Ironically we are ready to do a research on skeptical UFO sightings or aliens, but we close all the doors for studying presence of God or religious beliefs. If astrological remedies fail, then its a fraud but when intensive medical treatments cannot save a patient's life then it is a hard fact. If anything is inexplicable or beyond our understanding, then that doesn't mean it has no existence. I abhor such one sided judgments. It can be science or God, our belief system should be balanced enough not to get converted in to superstition. If there are fraudulent cult leaders, then there are fraudulent doctors, engineers, scientists, advocates etc. Regarding other practical things there are many blind beliefs like one's religion is superior and others are inferior and the list goes on. Well due to all these irrational blind beliefs, lives of many innocent people are devastated. Then why these practices don't come under superstition?

Thinking from other perspective some (so called) superstitions come from a practical place or have benign reasons. E.g. If we commit sin, we rot in hell. Now heaven or hell exist or not is a matter of belief. But if the depiction of hell and its virtual effect tells people to have good gesture in life then there is nothing wrong about it. Another example is don't handover scissors or matchbox directly to anyone (hand to hand). The obvious reason behind this is the scissor may hurt the taker if not handed over properly or if given in a hurry. Similarly the matchboxes were not as safe as today in their earlier stages. Thus to avoid any friction and accidental ignition it was recommended not to handover the matchbox directly to anyone. To give one more example, many people are skeptical about the chanting of mantras. Any chanting including the name of a deity has a power of mantra. We are now aware of scientific benefits of chanting, more popularly known as sound therapy. Same benefits are mentioned in various texts but in a raw language. So without stretching it too far we can definitely avoid some accidents by following these beliefs. We ardently follow these unwritten laws when labelled as 'safety measures' today. But the same measures when found in old texts are ironically stamped as superstitions. Although not all such beliefs have a scientific reason but a most of them come from a practical place. The unanswered superstitions should be either unfollowed or should be studied to find their origin to get some sense while accepting or denying them. The peer study can at least help to stop the looking down upon the deserved beliefs which have a scientific reason.

Basically the problem is we have narrowed down the definition of superstition to mold it as per our convenience. With the changing times it is necessary to refine the term. Rather than studying root and branch, we become aggressive against the whole belief system by just skimming the surface to become so called advanced. This has created a phantasmal equation that superstition is just black magic. Sadly this has become a factual equation for most of us. So even a faithful devotee gets bewildered to prove him/herself as a devout and not superstitious. Ethically a real devout who is not harming anyone due to his/her belief system, has no need to 'prove' anything to anybody. Any way, if we understand the difference between faith and superstition, and can explain it to others then it will not only reduce the misunderstandings but also will help to eradicate unethical superstitions.  

What is exactly the eradication of superstitions? and how it is possible? Lets discuss these points in upcoming article.

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                =========================================================================

No comments:

Post a Comment