मागील लेखात मी नमूद केल्याप्रमाणे जर कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेमागील का रणं शोधली तर एकूणच अंधश्रद्धा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कोणताही आकस न ठेवता विचार केल्यास या मागची कारणं समजून घेता येतील. पण विज्ञानवादी व्यक्ती असोत वा दैववादी, दुसऱ्याची बाजू समजून घेण्याआधीच आपली बाजू बरोबर आहे हे गृहीत धरून पुढे जातात. यामुळे कोणत्याही गोष्टीचा उगम व कारण समजून घेण्यापेक्षा तो गोष्ट चुकीची कशी आहे हे सिद्ध करण्याकडे कल जास्त असतो. आपण विज्ञान आणि दैववाद नीट समजून घेऊन दुसऱ्यालाही समजावून सांगितला तर कितीही अडचणीत असलेली व्यक्ती अंधश्रद्धेच्या आहारी जाणार नाही. या गोष्टी कठोर नियम बनवून नाही तर समजावून देऊनच सोडवल्या जाऊ शकतात. नाहीतर नियम बनवूनही त्याची अंमलबजावणी शक्य होत नाही. चुकीच्या गोष्टी चुकीच्या कशा आहेत हे समजावून देण्यापेक्षा एखाद्या विचारसरणीला केंद्र स्थान बनवून टीका करणं सर्वस्वी चुकीचं आहे.
व्यावहारिक अंधश्रद्धांचा विचार करायचा तर शिक्षणाचा प्रसार आणि सारासार विचार करण्याची सवय अगदी लहानपणापासून लावली गेली तर यात होणारी फसवणूकही टाळता येईल. आपण ज्या व्यक्तीकडे अडचण सोडवण्यासाठी जातो त्या व्यक्तीची पूर्ण माहिती असल्याखेरीज पुढे जाऊ नये. आणि जर ती व्यक्ती अवास्तव मागण्या करत असेल तर आपण त्या पूर्ण कराव्यात का हा सारासार विचार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा गोष्टींवर आळा घालता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीवरील अंधविश्वास त्रासदायक ठरू शकतो. सारासार विचारामुळे व्यावहारिकच नव्हे तर सर्वच अंधश्रद्धा दूर करण्यास मदत होईल. आपल्या हतबलतेचा फायदा आपणच दुसऱ्याला घेऊ देत असू तर फसवणूक होणं साहजिक आहे. श्रद्धा जेव्हा फायद्यासाठी वापरली जाते तेव्हा त्याला बऱ्याचदा अंधश्रद्धेचं स्वरूप येतं. आजच्या काळातील स्पर्धात्मक जीवनशैली, आर्थिक ओढाताण, स्वाभिमानाचा अतिरेक अशा अनेक गोष्टींमुळे हतबल झालेल्या व्यक्ती काही मार्ग शोधायला जातात आणि दुष्टचक्रात अडकतात. जर आर्थिक फसवणूक किंवा शारीरिक अत्याचार होत असतील तर ते कोणत्याही उपायात बसत नाहीत. माणसाची हतबलता आणि त्याचा घेतला जाणारा फायदा ही या फसवणुकींमागची कारणं आहेत. यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून घेतला पाहिजे.
अनेक संस्कृतींमध्ये अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. एका विशिष्ट काळात त्या योग्य असतीलही. पण आजच्या काळात त्या नष्ट करायच्या तर प्रथम मानसिकता बदलायला हवी. कोणत्याही व्यक्तीला आपला देश, धर्म, संस्कृती यांचा अभिमान असणं स्वाभाविकच आहे. मग केवळ श्रद्धेवर टीका करून अंधश्रद्धा कशी मिटवता येईल? कारण सगळ्या अंधश्रद्धा या ना त्या प्रकारे धर्म, संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत. अनेक लोकांचे खरे-खोटे अनुभव, ऐतिहासिक व धार्मिक पुस्तकं, पिढ्यानुपिढ्या सांगितले गेलेले प्रसंग अशा अनेक माध्यमातून लोकं आपली मतं तयार करतात. त्यांचा पगडा इतका घट्ट आहे की केवळ नियम बनवून किंवा दुसऱ्याला कमी लेखून काहीही साध्य होणार नाही.
यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आधी मोकळ्या मानाने सर्व बाजुंनी विचार करावा. एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या दुसऱ्यालाही पटू नयेत असा अट्टाहास धरल्याने केवळ आकस निर्माण होईल. एकतर्फी विचार करणं हा अतिरेकही एक प्रकारे अंधश्रद्धाच नाही का? अंधश्रद्धेच्या नावाखाली एखाद्याच्या श्रद्धास्थानाला धक्का लावण्यापेक्षा त्यातील केवळ वाईट गोष्टी कशा बाजूला करता येतील हे समजावून सांगता यायला हवं. निरुपद्रवी अशी श्रद्धा बाळगणं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग झाला. मात्र यात कोणाचं नुकसान, फसवणूक आणि श्रद्धेच्या नावाखाली चाललेला धंदा हे मात्र अत्यंत अयोग्य (म्हणूनच बेकायदेशीर) आहे.
अंधश्रद्धांचा उगम निश्चित माहित नसला तरी त्या जुन्या काळी लिहिल्या गेल्या आहेत हे नक्की. तो काळ, त्या काळची गरज आणि समृद्ध नसलेली मानसिकता यांचाही विचार अंधश्रद्धा नष्ट करताना व्हायला हवा. कोणतीही गोष्ट एखाद्या काळात योग्य असेल ती पुढील काळात तेवढीच योग्य असेल असे नाही. आजच्या काळातील पुढारलेले वा सुधारक विचार कदाचित पुढच्या काळात लागू होणार नाहीत. कोणत्याही श्रद्धा काळानुसार बदलल्या किंवा सुधारल्या जाणं आवश्यक आहे. तसं फारसं घडलं नसल्याने आज अनेक गैरसमज पसरले आहेत. यात काही सुधारणा करता येतील का याचाही विचार व्हायला हवा.
आज अनेक वर्ष मानल्या गेलेल्या या अंधश्रद्धा अशा चुटकीसरशी कशा नष्ट होतील? चांगल्या श्रद्धा, दैववाद, ज्योतिषशास्त्र या सगळ्याचा अनुभव आलेलेही अनेक लोक आहेत. निसर्ग, मानवी शरीर, जन्म मृत्यूचं चक्र, अवकाश अशा गोष्टी आपण अजूनही पूर्णपणे समजू शकलेलो नाही. त्यामुळे असे अनुभव खोटे आहेत असं म्हणणं किंवा त्यामागची कारणं शोधणं दरवेळी शक्य होणार नाही. जर विज्ञानातील गृहीतप्रमेय (hypothesis) आपण मोकळ्या मनाने मान्य करतो तर अशा अनुभवांमधील प्रमेय आपण गृहीत धरण्यास काहीच हरकत नाही. यातील काही गोष्टी कदाचित पुढच्या काळात सिद्ध होतीलही किंवा त्या धादांत खोट्या आहेत असेही सिद्ध होईल. पण तोपर्यंत या अनुभवांना नाकारण्यापेक्षा यातून काही अर्थबोध होतो का किंवा काही नवीन शोध लागू शकेल का याचा विचार करण्याचा मोकळेपणा आपण दाखवला तर अनेक गोष्टी बदलू शकतील. अशा वेगळ्या आणि मोकळ्या दृष्टिकोनातून जर आपण सर्व धर्म, संस्कृती अगदी अंधश्रद्धांचा देखील अभ्यास केला तर बऱ्याच अंशी अंधश्रद्धा दूर होतील आणि काही नवीन शिकायलाही मिळेल.
म्हणूनच माझ्या मते व्यक्तिस्वातंत्र्य, मनाचा मोकळेपणा, एखाद्या गोष्टीचा संपूर्ण अभ्यास आणि सर्वंकष विचार यातून अंधश्रद्धा आणि व्यावहारिक अंधविश्वास या दोन्ही गोष्टी हद्दपार होतील.
© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.
===============================================
As I mentioned in my previous article if we try and explore the background of the superstitions to find out their origin, it will definitely help to eradicate them. To not only know but understand the reasons behind the origin of these superstitions, we must have a equitable view. May be the devouts or people with scientific approach, both enter the debate with a prejudiced view that their belief system is flawless, without even listening to the other side. Rather than finding out the origin and reasons behind any belief system the followers focus on proving the other side wrong. If we fully understand and explain the principles behind any belief system or scientific approach to others, then it can surely stop the needy people getting victimized under the name of superstitions. This can be achieved by shedding a light upon the lesser known views of these systems and not by merely making strict laws. Just filling the law books will amount to beating the air which will not help in practical execution of the laws. In stead of correcting the faults in a system, just targeting it for tantalizing is not acceptable.
Thinking about practical life superstitions, education and developing rational thinking from childhood are the two best solutions to eradicate them. Whenever we seek help from any person, his authenticity should be verified. If that person is making impractical demands then till we do not think rationally about fulfilling them, the cases of embezzlement will continue. A blind faith on any person can be dangerous. A rational thinking will not only help in ceasing such frauds but will also help to eradicate any kind of superstition. Due to helplessness if we become gullible and give an easy ride to such bunco authorities, then trickery is hard to stop. When faith is used as a medium to take advantage then it turns out into superstition. In today's fast world many people are victimized of cozenage due to credulous behaviour caused by failures in competitive lifestyle or financial crisis or even uncontrollable ego problems. Its a matter of common sense that financial frauds or physical harassment are never a part of a remedy or solution. Sadly lack of rational thinking and gullible nature keeps the fraudulent scams alive. To stop such activities we should be able to differentiate between faith and blind faith.
Many superstitious rituals are prevalent in various cultures worldwide. They may have some validity at some point, but their eradication in today's world needs a major change in our mindset. It is very obvious that a person is proud of his/her country, religion and culture. Then how criticizing faith can eradicate blind faith? Because all kinds of blind beliefs by some or the other way are linked to religion and culture. People have made their strong belief systems on the basis of various experiences, references from historical or spiritual texts and experiences shared across generations. All belief systems hold sway over the people's minds, so it is not easy to modify them by making strict laws or tantalizing each other.
Another point to be considered is it is important to think all perspectives with open mind. Two different individuals can have different opinions on a particular point. But obstinate refusal to accept the difference of opinions will only create bitterness. This stubborn unilateral thinking is also a type of superstition or blind belief, isn't it? In lieu of tantalizing anyone's faith/belief system, we should try to explain and eliminate foul things. Following harmless belief system is a part of individual freedom. Nonetheless harming anyone, harassment or frauds under the name of faith is absolutely wrong (& therefore illegal).
It is almost impossible to find the exact origin of superstitions, but such doctrines were definitely practiced from ancient times. While eradicating superstitions we should also consider their ancient origin, different needs (than today's) at that time and then existing uncivilized form of human society. Any system which is legitimate in one era might not get the same reputation or legacy in other era. For instance today's reformist thoughts may become outdated or even nefarious in the next era. Thus any belief system, science or doctrine should get reformed and modified along with time. Today the lack of such modifications has lead to the vilification of many doctrines. The reformation of such doctrines should also be considered while eradication of superstitious practices.
The superstitions which are almost practiced as traditions for years together can not be eradicated forthwith. Many people have hard evidences for the results obtained from practicing different systems, faith in deities, astrology etc. Also scientifically speaking we haven't fully explored human body, nature, life and death cycle etc. So every time we can neither debunk these theories nor can logically find the exact cause of the obtained results. These theories might get proved or debunked in coming years. Till that we should peer these theories with open mind to find the logical explanation rather than just labeling them false or diabolical. If we explore all religions, cultures or even superstitions without any prejudice then it will definitely help in systematically eradicating wrong practices as well as might help in discovering new aspects of the doctrines.
In my opinion individual freedom, open mindedness, peer study of all theories, rational and universal thinking can help in eradicating superstitions.
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
================================================
No comments:
Post a Comment