Tuesday, 26 November 2019

वेदाङ्ग आणि ज्योतिष शास्त्र (Vedanga and Astrology)   


ज्योतिष हे वेदांचं एक अंग मानलं गेलं आहे, त्यालाच वेदाङ्ग असं म्हणतात. वेदाङ्ग या विषयाबद्दल थोडी माहिती देण्याचा या लेखात मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आधी वेद म्हणजे काय या मूळ संकल्पनेपासून सुरुवात करून आपण हे समजून घेऊ.  

'वेद' हा शब्द संस्कृतमध्ये 'विद्' धातू पासून आला आहे. ज्याचा अर्थ आहे ज्ञान (वा माहीत करून) घेणे. तमिळ भाषेत वेदांना 'मराई' म्हणजेच गुप्त वा गूढ असंही म्हणतात. पण सामान्यतः 'वेद' हाच शब्द प्रचलित आहे. वेदांमध्ये असलेलं ज्ञान एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे दिलं गेलं. पूर्वी असलेल्या काही साधनांचा वापर करून हे ज्ञान जसंच्या तसं पुढील पिढीला सोपवण्यात आलं. म्हणूनच वेदांना 'श्रुती' असंही म्हणतात. म्हणजेच जे ऐकलेलं आहे किंवा श्रावणाच्या माध्यमातून दिलं गेलं आहे ते ज्ञान. काही लोक वेद या शब्दाची फोड करताना जे वदले गेले आहेत ते वेद असंही म्हणतात पण त्याला व्याकरणात मात्र आधार नाही. मात्र 'श्रुती' आणि 'स्मृती' याचा गोंधळ वाचकांनी करू नये. 'स्मृती' म्हणजे जे ज्ञान स्मरण करून, स्मृतीच्या आधारे प्रसारित केलं गेलं आहे. पण स्मृती ह्या वेदांमध्ये येत नाहीत. 

एकूण चार वेद अस्तित्वात आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्रत्येक वेद चार पद्धतींनी मांडला गेला आहे. 

१) संहिता: ज्यात मंत्र आणि त्यापासून मिळणाऱ्या फळांचं विवेचन आहे. 
२) आरण्यक: ज्यात विधी, विधींची सखोल माहिती उदा: आहुती, प्रतीकात्मक आहुती यांची माहिती आहे.
३) ब्राह्मण: ज्यात विधींच्या माहितीबरोबर त्यावर भाष्य आहे.     
४) उपनिषद: ज्यात तत्त्वज्ञान, अध्यात्म अशा गोष्टींवर भाष्य आहे.   

वेद समजून घेण्यासाठी आणि त्याचा पुढील पिढीला वारसा देण्यासाठी वैदिक काळातील भाषा, उच्चार, मंत्रांचे विधी, पाळायचे नियम, आहार, दैवतं, आराधना इत्यादी गोष्टी आत्मसात करणं आवश्यक होतं. म्हणूनच वेदांचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी काही सहाय्यक अंगांचा समावेश केला गेला, त्यालाच वेदाङ्ग असं म्हणतात. वेदाङ्गांचा उगम निश्चित ठाऊक नसला तरी वैदिक काळाच्या शेवटी त्याची नोंद सापडते. कारण वैदिक काळाच्या शेवटी, वेदांमधील भाषा ही काळानुसार पुरातन होऊ लागली होती. वेदांचा सखोल अभ्यास आणि त्यांचा योग्य अर्थ समजावा यासाठी साहाय्याची गरज भासू लागली. अशा वेळी काही पद्धतींचा अवलंब केला गेला, जेणेकरून वेदांमधील ज्ञान पुढील पिढीला देताना वेदांची मूळ रचना आणि त्यातील गर्भितार्थ याला धक्का पोहोचणार नाही. आता ही वेदाङ्ग कोणती आहेत याची थोडी माहिती घेऊ.    

एकूण वेदाङ्ग ६ आहेत. 

१) शीक्षा: याचा शब्दशः अर्थ सूचना, शिकणं किंवा एखादं कौशल्य आत्मसात करणे असा होतो. आता वेदाभ्यासाच्या बाबतीत याचा अर्थ होतो वेदमंत्रांचे किंवा वेदांतील कोणत्याही लेखनाचे स्वर, उच्चार, ध्वनि, शब्दफेक यांचा अभ्यास आणि त्यावरील प्रभुत्व मिळवण्यासाठी सहाय्यक असलेलं अंग. वेद ज्या भाषेत आहेत ती केवळ प्राकृत संस्कृत भाषा आहे म्हणून थांबून चालत नाही. तर प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि त्यामागील शरीराचा उपयोगात आणलेला भाग यामुळे खूप फरक पडू शकतो. उदा: 'फ' चा स्पष्ट उच्चार करताना आधी ओठ मिटून मग ओठ विलग करून त्याबरोबर फुफ्फुसांतून हवा बाहेर आली तरच तो उच्चार योग्य असतो. नाहीतर 'फ' स्वर असलेल्या मंत्रांचा पूर्ण उच्चार होणार नाही. 'नमो ऽ' असा उच्चार दिला असेल तर 'मो'च्या उच्चारानंतर त्याचा दिर्घोच्चार करून मगच पुढील स्वर विचारात घ्यावा. जीभ, टाळू, जबडा, गळा, फुफ्फुस, उदर अशा अवयवांचा वापर कोणत्या उच्चारात आणि कसा करायचा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण शीक्षेत दिलं जातं. हे नियम जर पाळले गेले नाहीत किंवा दीर्घ आणि -हस्व शब्दांच्या उच्चारात फरक करता आला नाही तर शब्दांचे अर्थच बदलू शकतात. योग्य ध्वनि जर उमटला नाही तर मंत्र फलदायी ठरणार नाहीत. हे सर्व शिक्षण या प्रथम वेदाङ्गात मिळतं. 

ॐ शीक्षां व्याख्यास्यामः । वर्णः स्वरः । मात्रा बलम् । साम सन्तानः । इत्युक्तः शीक्षाध्यायः ॥ (तैत्तिरीय उपनिषद)
 (ॐ, शीक्षेची व्याख्या आम्ही सांगतो आहोत. वर्ण, स्वर, मात्र यांचे बलाबल. त्यांचा समन्वय आणि संधी (संबंध) अशा अनेक गोष्टी शीक्षेत आहेत)               

२) छन्द: आपण मराठी व्याकरणात 'छन्द' हा शब्द नक्कीच ऐकला आहे. छन्द म्हणजेच एखाद्या कवितेचं मीटर असं सोप्या शब्दात म्हणू शकतो. छन्दाचा शाब्दिक अर्थ होतो सुंदर, आकर्षक वा मोहक. संस्कृतमध्ये 'छद्' धातू पासून हा शब्द आला आहे, ज्याचा अर्थ आहे मोहवणं वा सुखावणं किंवा जे सुंदर आहे. वेदांमधील ऋचा ह्या त्यातील सौंदर्य वाढवण्यासाठी   एखाद्या छन्दात मांडल्या गेल्या आहेत. त्यानुसार त्यांचं उच्चारण होण्यासाठी छंन्दाचा अभ्यास असावा लागतो. एखादं पद एखाद्या छन्दात किंवा वृत्तात असतं. त्यातील स्वर आणि व्यंजनं यांचा उच्चार व ध्वनिचा संबंध छन्दाशी येतो. कधी कधी ह्या छंन्दांची नावंही शेवटी दिलेली असतात. उदा: अनुष्टुभ छन्द:. छन्दसूत्रामध्ये याबद्दल सखोल माहिती आहे. सर्वात लोकप्रिय अशा पिंगळा सूत्रात याचं गणितही दिलं आहे. ज्यात 'मात्रामेरू' नावाचा त्रिकोण बनवून एक गणित मांडून ०,१,१,२,३,५,८ अशा संख्या घेऊन संगीत, ताल, लय यासाठी योग्य असे छन्द तयार करता येतील. अलंकारीक किंवा लयबद्ध मंत्रात याचा वापर प्रामुख्यानं होतो. मुख्य सात  छ्न्दात  म्हणजे गायत्री, उष्णि:, बृहती, अनुष्टुभ, पंक्ती, त्रिष्टुभ आणि जगति यांत वेदांचं लयबद्ध उच्चारण केलं जात असे. त्यात अनेक छन्द नंतर आले आणि बदलही झाले. या छंन्दांचं सखोल शिक्षण या वेदाङ्गात मिळतं.                         

गायत्रेण प्रति मिमीते अर्कमर्केण साम त्रैष्टुभेन वाकम् ।
वाकेन वाकं द्विपदा चतुष्पदाक्षरेण मिमते सप्त वाणीः ॥ (ऋग्वेद)

(गायत्री छन्द वापरून एक स्तुतीपर ओळ (अर्क) बनवली गेली, अशा अर्क (ऋचांच्या) समूहानं सामवेद लिहिला गेला, त्रिष्टुभ छन्दातील वाक्यांमधून यजुर्वेद निर्माण झाला, वाक म्हणजे दोन किंवा चार पदांच्या ओळींनी सात छन्दातील वाणी  प्रकट झाल्या.)

३) व्याकरण: व्याकरण हा कोणत्याही भाषेसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. व्याकरणातील नियमांशिवाय भाषेत शिस्तच राहणार नाही. कोणत्याही शब्दाचं रूप, वाक्य रचना, काळ, विराम चिन्ह याशिवाय योग्य पद्धतीनं भाषेची रचना करता येऊ शकत नाही. अशा ह्या व्याकरणाचे दोन जनक मानले गेले आहेत, ते म्हणजे पाणिनी आणि यास्क. पाणिनी यांचं अष्टाध्यायी ज्यात ४००० सूत्र आहेत, आजपर्यंत व्याकरणाची सगळ्यात जास्त अभ्यासलेला ग्रंथ आहे. पाणिनींनी वाक्य म्हणजे काय, त्याची रचना कशी असावी, शब्द कसे मांडावेत अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. आणि आपल्या भाषेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी व्याकरणाशी सर्वांना परिचित केलं. वेदाङ्गातील व्याकरण सुसंबद्ध आणि योग्य अर्थ प्रकट करणारं लिखाण समजून घेण्याच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं आहे. 

४) निरुक्त: निरुक्त याचा शाब्दिक अर्थ होतो स्पष्टीकरण वा भाषांतर. या वेदाङ्गात वेदांमधील शब्दांची व्युत्पत्ती आणि त्यांचा योग्य भावार्थ यावर भर दिला आहे. शब्दांचा कोष आणि त्यातील तपशील म्हणजे पुरातन भाषेतील शब्दांचे अर्थ, त्यांची फोड अशा प्रकारचा अभ्यास त्यात समाविष्ट केला गेला आहे. वरील व्याकरणाच्या मुद्द्यात नमूद केलेले यास्क हे निरुक्ताचे जनक मानले जातात. यास्क यांच्या मते "केवळ पाठांतर करू नका तर कोणत्याही शब्दाचा अर्थ काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्याला अर्थ नसेल तर ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं जाईल. एखाद्या सरपणातील लाकडासारखं आपलं बोलणं अर्थाच्या अग्निशिवाय प्रज्वलित होणार नाही. आपल्या बोलण्यातील भावार्थ हेच त्याचं फळ आणि फूल आहे". (-निरुक्त). केवळ व्याकरणाचे नियमच नव्हे तर योग्य ठिकाणी योग्य शब्द चपखलपणे वापरणे ही सुद्धा एक कला आहे. ज्याचं शिक्षण निरुक्त या वेदाङ्गात मिळतं.           

५) कल्प: कल्प म्हणजे यथायोग्य, वेदाभ्यासाच्या दृष्टीनं बोलायचं तर यथायोग्य विधी. वेदांच्या अभ्यासात जे विधी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वेळेत करावे लागणारे असे आहेत. त्यांनाच कर्मकांड असंही म्हटलं जातं. कल्पसूत्र कर्मकांडांचे विधी, त्यांची निश्चित प्रक्रिया आणि त्यामागील नियम व तत्त्वं यावर भाष्य करतं. उदा: आपल्याकडील सोळा संस्कार आणि आयुष्यात लागणारे अनेक विधी यांची संपूर्ण माहिती कल्पसूत्रात आहे. श्रुती आणि स्मृती दोन्हींमध्ये कल्पसूत्र दिलेली आहेत.         

६) ज्योतिष: यावरील भाष्याआधी ज्योतिष या शब्दाचे अर्थ काय आहेत ते पाहू. संस्कृत भाषेत 'ज्योति' म्हणजे प्रकाश. संस्कृत भाषेमध्ये अनेक शब्दांचा अर्थ प्रकाश असा होतो. पण 'ज्योति' म्हणजे आयुष्याचा स्रोत असणारा प्रकाश वा तेज. 'ज्योति'ला स् हा प्रत्यय लागला कि 'ज्योति' मधील इकारामुळे त्याचं ज्योतिष असं उच्चारण होतं. ज्याचा अर्थ आहे जे ग्रह तारे (आणि त्यांचा प्रकाश जो आयुष्य देतो) यांच्याशी निगडित आहे, ते ज्योतिष. 'ज्योति'च्या अनेक वचनी शब्दाचा अर्थही अवकाशातील तारे आणि ग्रह जे प्रकाश देतात, असा होतो. म्हणूनच सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की वैदिक काळातील ज्योतिष हे अवकाशातील ग्रह ताऱ्यांच्या हालचालींशी (आताचं खगोलशास्त्र) प्रामुख्यानं संबंधित आहे. त्यानंतर त्या अनुषंगानं कुंडली मांडणं, भाकीत करणं, विधी हाही भाग होताच. पण आजच्या काळासारखं केवळ कुंडली मांडून भविष्य सांगणं हे सीमित रूप मात्र तेव्हा नव्हतं.     

लगध हे वेदाङ्ग ज्योतिषाचे जनक समजले जातात. वैदिक ज्योतिष शास्त्रात, खगोल मंडळातील ग्रहांच्या हालचालींवर लक्ष ठेवून काळाचं मापन करणं हा मुख्य उद्देश होता. हे  खगोलशास्त्राचं सर्वात पुरातन रूप होतं. आजच्या काळातील ज्योतिष विद्येसारखं केवळ कुंडली मांडून भविष्य सांगणं हा या शास्त्राचा उद्देश नाही. युग, वर्ष, मास, दिवस, तिथी यांची गणितं, दिनदर्शिका, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा, खगोलीय घटनांमुळे होणारे परीणाम, सूर्याच्या सावलीवरून वेळ दाखवणारं घड्याळ, पाण्याच्या स्थिती वरून वेळ दाखवणारं, तसंच वाळूचं घड्याळ अशी अनेक गणितं ह्या शास्त्रात आहेत (कालविधान शास्त्र). या सगळ्या गणितांचा आजच्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांना विसर पडला असला तरी इतकं सखोल ज्ञान देणारं हे वेदाङ्ग निश्चितच स्तुत्य आहे यात शंका नाही. आज आपण अनेक गॅजेट्स  वापरतो, पण पूर्वी अशी कोणतीही सोय नसताना केवळ नैसर्गिक सामुग्रीच्या साहाय्यानं ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास झाला होता. आज त्यांच्या अभ्यासाचा वापर करूनच आपण अनेक यंत्र वापरत आहोत याचं भान आपण ठेवायला हवं. 

एक ज्योतिषी म्हणून खरं तर या वेदाङ्गासाठीच मी हा लेखन प्रपंच केला आहे. ज्योतिष शास्त्र केवळ भविष्य पाहण्यासाठी नाही तर अनेक खगोलीय घटनांचं गणित आणि सृष्टीची चक्रं समजून घेण्यासाठी आहे हे लोकांपर्यंत पोचावं हा माझा उद्देश आहे. वैदिक काळात याचा वापर प्रामुख्यानं मुहूर्त काढणं, खगोलीय घटनांचं भाकीत करून त्यानुसार जनतेला आणि राज्यकर्त्यांना साहाय्य करणं, वैदिक विधी करण्यासाठी उत्तम वेळ कोणती आहे हे पाहणं आणि मुख्य म्हणजे वेळेचं गणित मांडणं (घड्याळ) यासाठी केला गेला.    


याचा संपूर्ण अभ्यास केवळ भारतभूमीवर झाला आहे असं मुळीच नाही. नंतर अनेक देशांत अनेक पद्धतीनं हे शास्त्र अभ्यासलं गेलं. पण वैदिक काळात इतर कोणत्याही देशात असं सर्वोत्तम ज्ञान कोणालाही नसताना वेदशास्त्रात मात्र ह्याचा वापर केलेला आढळतो ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. आता अनेक खगोल शास्त्राचे अभ्यासक, शास्त्रज्ञ परदेशातील गृहीतकांचा आधार घेतात. ज्योतिष शास्त्र हे थोतांड आहे असं मानून त्याचा गाभा काय आहे हे अभ्यासून पाहतच नाहीत. पण वेदाङ्ग ज्योतिष हे अत्यंत वैज्ञानिक शास्त्र आहे. त्यातील गणितांची अचूकता आजही आपल्याला निरुत्तर करते. मग पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीनं जर या शास्त्राचा विचार केला आणि त्याचा अर्थ समजूनच घेतला नाही तर त्याला थोतांड म्हणण्याचा कोणताही अधिकार शास्त्रज्ञांना राहत नाही. आजच्या खगोलीय गणिताचा विचार केला तर वेदाङ्ग ज्योतिषातील गणित अगदी अचूकपणे लागू पडतं. म्हणूनच वेदाङ्ग ज्योतिष ही केवळ अंधश्रद्धा आहे हे मला पटत नाही. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी आणि वाचकांनीही या शास्त्राची माहिती घेतली तर अनेक गैरसमज तर दूर होतीलच पण आज ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्यांच्या अभ्यासासाठीही मदत होईल. ज्योतिष शास्त्र हे अथांग शास्त्र आहे. याबद्दलचे गैरसमज दूर होऊन ह्या शास्त्राला योग्य मान मिळावा यासाठी मी हा लेख लिहिला आहे. वैज्ञानिकांनी देखील योग्य कसोटी लावून मोकळ्या मानाने या शास्त्राचा विचार करावा अशी माझी इच्छा आहे.       

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
     ==============================================

Jyotish is one of the auxiliary disciplines which are connected to the study of Vedas, which are known as Vedangas. I will try and explain about Vedangas in this article. Lets start with understanding the basic concept of Vedas before jumping on to Vedangas. 'Veda' is a Sanskrit word derived from the root 'vid'; which means to know or knowledge. In Southern part of India Vedas are customarily called as 'Marai' in Tamil language. 'Marai' means hidden, mystery or secret. But commonly the term 'Veda' is officially used for these texts. The knowledge in the Vedas was transferred from one generation to the next. Using the then available mediums in ancient times this knowledge was handed over to the next generation. So the term 'Sruti'  was used to denote    
the Vedas. This literally means 'what is heard' or the knowledge transferred through the aural perception. Some analysts say that the word 'Veda' is derived from the verses which are transferred through verbal medium, though the meaning is close, this derivation has no grammatical undergird. I request the readers to not get confused between 'Sruti' and 'Smruti'. 'Smruti' is the knowledge transferred by remembering. But 'Smruti' are not part of Veda scriptures. 

A total of four Vedas exist. Rigveda, Yajurveda, Samveda and Atharvaveda. Each Veda is is subclassified in four text types.

1) Samhita: This deals with the mantras and benedictions.
2) Aranyaka: This deals with text on rituals, ceremonies, sacrifices and symbolic sacrifices.
3) Brahamana: This deals with comments on rituals and sacrifices. 
4) Upanishada: This deals with philosophy and spiritual knowledge.  

To understand the Vedas and to transfer this heritage to the next generation, it was imperative to understand and assimilate various things like Vedic language, pronunciation, mantras and their rituals, rules and regulations, diet, deities and their worshiping etc. To come to the grips with these, some auxiliary disciplines were included, which are known as Vedangas. Though the origin of Vedangas is not accurately traceable, but it is believed that they were conceptualized near the end of the Vedic era. As near the end of Vedic era, the language of Vedic texts became archaic for the people at that time. The intensive study of Vedas and their proper interpretation started becoming tougher, without any ancillary system. As a result of this, this auxiliary system emerged to help and transfer the knowledge in the Vedas without affecting their connotation and structural framework. Now lets know briefly about the Vedangas. 

Total six Vedangas were developed.

1) Shiksha: The Sanskrit word 'Shiksha' literally means instructions, learning or studying a skill. In context of the study of the Vedas, it means an auxiliary limb to learn phonetics, phonology and pronunciation or accents of Vedic mantras or written text and mastering them. Vedas are written in (now) archaic Sanskrit but this can't stop future generations to study them. The accent, melody of it and the body part used in the pronunciation makes a huge difference. For instance, while pronouncing Sanskrit alphabet F (फ)lips should be locked and then opened a bit along with exhaling the air fast from the lungs to make it a proper accent. Otherwise it's pronunciation will be incomplete and any mantra including this alphabet will not be properly pronounced. 'Namo ऽ' ('नमो ऽ') should have a long pronunciation after 'mo' before uttering the next alphabet. Shiksha discipline teaches how and when to use different organs like tongue, palate, jaws, lungs abdomen etc. while pronunciation. If these rules are not followed then it may change the whole meaning of the word. If proper sound is not generated then the mantras will not work. These all basics can be learned with the help of this  Vedanga.  

 Om! We will explain the Shiksha । Sounds and accentuation, Quantity (of vowels) and the expression (of consonants)। Balancing (Saman) and connection (of sounds), So much about the study of Shiksha॥ (Taittiriya Upanishada)  

2) Chanda: All of us have heard the word 'Chanda' while learning the grammar. In simple words Chanda is the meter of a poem (Sanskrit Prosody). Chanda literally means alluring, pleasant or beautiful. It derived from the root 'chad' which means to please, something that nourishes or is celebrated.  The hymns in the Vedas are written in specific meters, to enhance their melody. Proper pronunciation of the hymns needs a study of those meters i.e. Chandas. A particular verse is composed in a Chanda or Vritta. The consonants and vowels are related to pronunciation and phonetics is related to the Chanda. Some times the names of the used Chandas are written at the end of the hymn like: 'Anushtubh Chandah'. Chandasutra (Sanskrit Prosody) explains this in detail. The most popularly used Pingala Sutra discusses a binary system to calculate Vedic meters. In this a triangle called 'Matrameru' which counts the sequences such as 0, 1, 1, 2, 3, 5, 8 in their prosody study to create pleasing sounds and perfect combinations. The major Chandas (meters) in Sanskrit Prosody include Gayatri, Ushnih, Brihati, Anushtubh, Pankti, Trishtubh and Jagati in which the hymns of Vedas were composed. In post Vedic lterature few meters were added or changed. This study of meters can be learned with the help of the Chanda Vedanga. 

 With the Gayatri, he measures a song; with the song – a chant; with the Tristubh – a recited stanza;
With the stanza of two feet and four feet – a hymn; with the syllable they measure the seven voices. (Rigveda)   

3) Vyakarana: Grammar is the integral part of any language. Without the rules in grammar no language will have a discipline. A linguistic framework needs a proper arrangement of different forms of words, sentence making, tense, signs etc. Panini and Yaska are two celebrated scholars of Vedic Vyakarana. Panini's Ashtadhyayi is the most studied Vyakarana text, which includes almost 4000 verses. Panini in his Ashtadhyayi shed a light on many grammatical rules like how to form a sentence, arrangement of words etc. He introduced the grammatical rules to create and sustain the melody of the Sanskrit language. This ancillary science is important for linguistic analysis, polishing the language and expressing the exact meaning of the words.

4) Nirukta: Nirukta literally means explained or interpreted. This Vedanga covers etymology and proper interpretation of the Vedic verses. It includes the glossary and the detailed information like interpretation of archaic words and their derivation. Yaska who was mentioned in the previous point, is supposed to be the scholar who created Nirukta. According to Yaska "Don't memorize, seek the meaning. What has been taken [from the teacher's mouth] but not understood, is uttered by mere [memory] recitation, it never flares up, like dry firewood without fire. Many a one, [although] seeing, do not see Speech, many a one, [although] hearing, do not hear Her, and many a one, She spreads out [Her] body, like a wife desiring her husband.
The meaning of Speech, is its fruit and flower."  (Nirukta). Not only the grammatical rules but using an appropriate word at appropriate place is an art. This can be learned in the Nirukta Vedanga. 

5) Kalpa: Kalpa literally means proper or fit, in the context of Vedic studies it means ritual instructions. The rituals in the Vedas are vast and need to be performed with a specific systematic procedure. Kalpa Sutra covers these Karma kanda, rite to passage rituals, principles behind them and their exact procedures.For examples the 16 sanskaras or rituals associated with major life events are covered in Kalpa Sutra. Sruti and Smruti both have their separate Kalpa Sutras.       

6) Jyotish: Before commenting on this Vedanga lets understand the meaning of Jyotish. In Sanskrit 'Jyoti' is light. But many words in Sanskrit mean different types of light. But 'Jyoti'  is the light or radiance as the source of life. The suffix 'sa' makes Jyotisa as cerebral 'sh' due to the vowel 'i' at the end, and it is pronounced as 'Jyotish'. Jyotish means 'that which pertains to the light, or that which pertains to the radiance of the stars and planets. The plural of 'Jyoti' also means the light of the stars and the planets which are lights in the sky. So first of all I want to say that Vedic Jyotish is a science which primarily predicts the movements of the celestial bodies (today's Astronomy). Concomitantly it covers kundli making, prediction and remedies too. But it was not limited to just the prediction part based on the kundli calculation as in today's world.        

Lagadh is supposed to be the scholar who wrote Vedanga Jyotish. Vedanga Jyotish primarily focused on the celestial movements to keep time. This was the most primitive form of (today's) Astronomy. Like today's portrayed image, the objective of Vedanga Jyotish was not merely to calculate kundlis and predict future. This ancillary science had many mathematical calculations (Kalavidhan Shastra) to work on calculations of Yuga, Years, Months, Days, Tithis, calendars, Sunrise and Sunset, consequences of celestial movements, Sundials, Water clocks, Sand clocks etc. Though today's astrologers have forgotten these vast calculations, this ancillary science providing such prodigious knowledge is definitely commendable. Today we use various gadgets but in ancient era all the study was derived using naturally available sources. We should keep in mind that all the new era gadgets we are using are based on the principles derived in ancient era.     

As an astrologer I have actually written this article precisely for this Vedanga. My whole purpose of this article is to make people aware of the fact that Jyotish Shastra is not only a tool for seeking future but it is a vast science to study calculation of celestial movements and understanding nature's cycle. In Vedic era, this ancillary science was used for various purposes like Muhurta calculation, helping people and politicians by predicting celestial movements, suggest best time for Vedic rituals and mainly to keep time.

I am not claiming that this vast study was only accomplished on Indian continent. Various countries have developed their own studies by their methodologies. But in Vedic era, when no other then existing country had such remarkable knowledge, Veda Shastra used this science is definitely a matter of pride. Now many Astronomers and scholars refer to different theories from other countries. Taking it for granted that Jyotish is a myth or pretense, they do not even bother to explore the core of this vast science. But Vedanga Jyotish is a Shastra which has a scientific base. The mathematical accuracy of it makes us speechless even today. Thus if scholars have a prejudiced view and are not ready to understand the concepts behind this science, I feel they have no right to blame this science for being a myth or pretense. If we compare today's astronomical calculations to Vedic calculations we come to know how accurate the later one is. Thus I do not agree to the theory that says Vedanga Jyotish is a mere superstition. If readers and analysts study this Shastra carefully it will not only help to remove these misconceptions but will also help to improve the knowledge and get the answers of some previously unanswered questions. Jyotish is a prodigious science. I have composed this lengthy article in an attempt to reduce the misunderstandings and give this science a proper respect which it deserves. I feel even scientists should use valid criteria and rethink about the Jyotish Shastra as a science.      

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
     ===============================================       

Saturday, 16 November 2019

बालकाची जन्मवेळ आणि कुंडलीचं गणित (Baby's birth time and kundli calculation) 


अनेकदा जन्मकुंडली पाहताना ज्योतिषाकडून किंवा स्वतः प्रश्नकर्त्याकडून नक्की जन्मवेळ कोणती आहे याबाबत संभ्रम असतो. सामान्यतः जिथे स्त्रीची प्रसूती होते तेथील डॉक्टर्स जी वेळ देतात ती ग्राह्य धरून जन्मकुंडली बनवली जाते. आता डॉक्टर वा नर्स यांनी कोणत्या क्षणी जन्मवेळ नोंदवली असेल हे काही आपल्या हातात नसतं. पण अशा संभ्रमामुळे किंवा नकळत आणि माहीत नसताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळे कुंडलीचं गणित बदलू शकतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण असा अनुभव घेतो की ज्योतिषी कुंडलीवर जे काही भाष्य करत आहे त्यात आणि प्रत्यक्ष आयुष्यातील घटनांमध्ये तफावत असते. याला बव्हंशी हेच कारण असतं असा माझा अनुभव आहे. याबद्दल थोडं खोलात जाऊन सांगते. 

सर्वप्रथम लोकांनी हे लक्षात घ्यावं की आपण कुंडली ज्योतिषासमोर ठेवली की त्याला आपलं भूत, भविष्य, वर्तमान सारं काही समजतं हा एक फार मोठा गैरसमज आहे. एखाद्या  घटनेचं तंतोतंत वर्णन करणं शक्यही आहे. पण संपूर्ण आयुष्याचं चित्रच ज्योतिषापुढे उभं राहतं हे मात्र शक्य नाही. ह्याच धारणेतून लोक ज्योतिषाकडे जातात आणि "तुम्हाला पत्रिकेतून दिसलंच असेल" असं एक विधान करतात. ज्योतिष शास्त्र हे कोणाच्या आयुष्यातली प्रत्येक घटना शोधून काढण्यासाठी नाही तर एक मार्गदर्शन करण्यासाठी आहे. हे समजून घेतल्यास पुढील गोष्टी समजायला मदत होईल. 

कुंडली बनवताना जातकाची जन्मवेळ जर अचूक मिळाली असेल तरच कुंडली बरोबर बनते. पण अनेक वेळा यात फरक असतो, याबद्दल काही वादही आहेत. यात दोन्ही बाजुंनी विचार करता भाकीत का चुकतं ते ध्यानात येईल. एक तर जन्मवेळ ही प्रश्नकर्त्यालाच ठाऊक नसून किंवा डॉक्टरांनी दिलेल्या वेळेवर विसंबून राहिल्यानं चूक होते. दुसरं म्हणजे ज्योतिषाची इच्छा, ज्ञान असेल तर यात दुरुस्ती करताही येईल पण केवळ आर्थिक फायद्यासाठी ज्योतिषी काम करत असेल तर हा मुद्दा सहज डावलला जातो. ह्याबाबत ज्ञान नसलेले ज्योतिषी ह्यावर भाष्य करत नाहीत किंवा चूक मान्य करायला लागणारा मोठेपणा त्यांच्यात नसतो. कोणत्याही प्रश्नकर्त्याला मी तंतोतंत भविष्य सांगू शकेन असं वचन देण्यापूर्वी ज्योतिषानं ह्या शास्त्राच्या मर्यादाही विचारात घ्याव्यात. 

बालकाची जन्मवेळ कोणती असावी आणि का व याबद्दल तज्ज्ञांमध्ये कोणते वाद आहेत याबद्दल काही माहिती देण्याचा प्रयत्न करते.                 

काही तज्ज्ञांच्या मते बालक गर्भात असताना जेव्हा हृदयाचे पहिल्यांदा ठोके पडतात तीच जन्मवेळ धरावी. आईच्या गर्भात असताना बालक कोणतीही शारीरिक प्रक्रिया करत नाही. श्वास घेणं, पचन, मल-मूत्र विसर्जन हे सर्व अपराच्या साहाय्यानंच होतं. मल-मूत्र हे अपरा व नाभीनाडीच्या साहाय्यानं आईच्या शरीरातील प्रवाहात समाविष्ट होतं. बालकाची फुफ्फुसं तयार झाल्यावरही बंदच असतात. ऑक्सिजन वायू नाभीनाडीतूनच मिळत असतो. बालकाचं हृदय चार कप्प्यांपैकी दोनच कप्पे वापरून रक्ताभिसरण करत असतं जी प्रणाली जन्माबरोबर बदलते. अजूनही आईच्या उदरात असणाऱ्या बालकाचं स्वतःचं असं कोणतंही अस्तित्व नसतं. म्हणूनच हृदयाचे ठोके सुरु होणं ही जन्मवेळ मानणं मला तरी पटत नाही. आणि आजही ही जन्मवेळ मानणं फारसं कोणी स्वीकारत नाही. 

काही तज्ज्ञांच्या मते प्रसूतीच्या वेळेआधी बालकाचं डोकं किंवा (पायाचा भाग) जेव्हा प्रथम गर्भमार्गाच्या बाहेरून दिसतं ती जन्मवेळ धरावी. यालाच 'शिरोदर्शन' असं म्हणतात. बालकाच्या शरीराचा काही भाग कधी कधी आईच्या गर्भमार्गातून थोडा बाहेर येतो. उदा: पायाचा तळवा, टाळू इ. गर्भमार्गाच्या आकुंचन आणि प्रसारणाबरोबर असे अवयव आतबाहेर होतात. पण प्रसूतीआधी केवळ असे अवयव दिसणं ही जन्मवेळ धरली जाऊ शकत नाही. कारण बालकाचा कोणताही शारीरिक अवयव दिसणं आणि बालकाचं आईच्या गर्भापासून वेगळं होणं यात कधी कधी दहा मिनिटांचं अंतरही असू शकेल. शिवाय बालकाचे अवयव असे आतबाहेर होणं ही काही निश्चित किंवा लयबद्ध प्रक्रिया नाही.     

काही तज्ज्ञांच्या मते बालक जन्म झाल्यावर पहिल्यांदा श्वास घेतं ती जन्मवेळ धरावी. हे गणितही मला पटत नाही. जन्म झाल्यानंतर एकतर प्रत्येक बालक लगेचच श्वास घेईल याची शाश्वती नसते. कधी कधी श्वास घेण्यासाठी बालकाला प्रवृत्त करावं लागतं. ह्यात बराचसा वेळ जातो. शिवाय बालकाचं रडणं हेच श्वास घेणं आहे असंही मानून चुकीची वेळ दिली जाते. ज्या स्त्रियांची प्रसूती पाण्यात केली जाते, त्यांच्या बालकांना डोळे उघडणं, स्वतःची इंद्रियं जागृत करणं आणि थोडी हालचाल यासाठी पाण्याखाली एक मिनिटभर तरी वेळ दिला जातो. श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर आणण्याआधी हा किमान एक मिनिटाचा अवधी असतो. अशा अनेक गोष्टींचा विचार करता पहिला श्वास ही जन्मवेळ अचूक नाही असं माझं मत आहे. शिवाय बालकाचा आत घेतलेला श्वास ऐकणं अत्यंत कठीण आहे पण उछ्वास मात्र समजून येतो. त्यामुळे यात अचूकता नसते. रडणं आणि श्वास घेणं यातही वेळेचं अंतर असू शकेल. यासाठीच जन्मवेळेसाठी पहिला श्वास कधी झाला हे पाहणं मला योग्य वाटत नाही.                   

या सगळ्यात मला एक सूक्ष्मजीवशास्त्र आणि ज्योतिष शास्त्राची अभ्यासक म्हणून काय योग्य वाटतं तो मुद्दा मांडते. ज्योतिष शास्त्रानुसार जन्मवेळ अशी असावी जेव्हा एक 'लग्न' म्हणजेच स्वतंत्र शरीर अस्तित्वात येतं. नाभीनाडी कापल्यावर बाळाचा आईच्या शरीराशी संपूर्णपणे संबंध तुटतो आणि एक वेगळं शरीर स्वतःची कार्यप्रणाली चालू करतं. हा नाभीनाडी कापण्याचा क्षण हीच अचूक जन्म वेळ असावी हे माझं मत. आता बहुतांशी जागरूकता आल्यावर बरेचसे डॉक्टर्सही हीच वेळ जन्मवेळ म्हणून मानत आहेत. याची कारणं अशी की नाभीनाडी कापल्यावर बालक स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकतं (ज्याची सुरुवात अगदी त्याच क्षणी होईल असं नाही), आईच्या शरीरातील कोणत्याही प्रणालीतून सहकार्य मिळू शकत नाही व फुफ्फुसं आणि हृदयाचे चारी कप्पे कार्यरत होण्यासाठी स्वतंत्र होण्याची गरज असते जी येथे पूर्ण झालेली असते. या सगळ्या कार्यप्रणाली चालू होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकेलही पण त्याचा पाया मात्र स्वतंत्र शरीरावर आधारलेला असतो. शिवाय एक महत्त्वाची पण दुर्दैवी घटना अशी असू शकते की एखादं बालक श्वास न घेताच मरण पावतं किंवा गर्भातच मरण पावतं. अशा वेळी इतर कोणत्याही कार्यप्रणालीचा अभ्यास करणं शक्य नसतं. पण नाभीनाडी पासून वेगळं होण्याची वेळ हीच जन्मवेळ धरून अशा दुर्दैवी मृत्यूचा अभ्यास करता येतो. म्हणूनच नाभीनाडी कापण्याची वेळ हीच जन्मवेळ असावी असं माझं स्पष्ट मत आहे. 

आत्ताच्या काळात घड्याळं उपलब्ध आहेत पण पूर्वीच्या काळी मात्र असं कोणतंही यंत्र नसताना अचूक जन्मवेळ कशी काढली जात असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं इथे थोडक्यात उत्तर देण्याचा मी प्रयत्न करते. अगदी पूर्वी वाळूची किंवा वेगळ्या प्रकारची घड्याळं असत, ज्यांना काटे किंवा आकडे नसत. अशावेळी सूर्योदय ते सूर्यास्त हे एका दिवसाचं मोजमाप असे. त्यातील काळ ज्याला आज आपण २४ तासांत विभागलं आहे तो किती सूक्ष्म पद्धतीनं मांडला गेला होता यासाठी त्या काळची परिमाणं देते. यावरून लक्षात येईल की नाभीनाडी कापण्याची वेळ असो वा प्रत्येक व्यक्तीच्या समजुतीनुसार घेतलेली जन्मवेळ असो, त्या कालमापन पद्धतीतील अचूकता आजही आपल्याला आश्चर्यचकित करते.                            

पूर्वीच्या काळची कालमापन पद्धत:  

आपण डोळे मिटून पुन्हा उघडतो त्याला 'निमिष' असं म्हणतो. जो इतका लहान काळ आहे की सहजासहजी त्याचं मोजमाप करता येत नाही. पण एक निमिष म्हणजे ०.२११२ सेकंद असं गणित आहे. इतक्या सूक्ष्म पातळीवरून कालमापन सुरु होत असे. यातील सगळ्यात लहान परिमाण म्हणजे परमाणू. एक परमाणू म्हणजे सेकंदाचा ६०,७५० वा भाग. त्यापासून सुरु होऊन पुढीलप्रमाणे मापन पद्धती वापरली जात असे. त्यातील महत्त्वाची परिमाणं आणि आजच्या काळातील त्याचा संदर्भ देते. 
       
लिप्ता: ०.४ सेकंद, क्षण: १ सेकंद, काष्ठ: ८ सेकंद, विघटि (पळ): २४ सेकंद, लघु: २ मिनिटं, घटिका: २४ मिनिटं, मुहूर्त: ४८ मिनिटं, अहोरात्र: १ दिवस. या सर्व परिमाणांचं गणित घटि पळांत वा अन्य पद्धतीनं मांडून कुंडली बनवली जात असे.  

असो, बालकांची जन्मवेळ कोणती असावी याबद्दलची माझी मतं मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून योग्य जन्मवेळ मिळाल्यास कुंडलीवरून अचूक भाकीत करण्यास मदत होईल.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
      ==============================================

Many times an astrologer or a querent is biased about the exact birth time taken into account. Mostly people note the birth time which is provided by the doctors at the time of delivery and the same is recorded as birth time for various purposes including calculation of the kundli. As a matter of fact we do not exactly know which time has been recorded by the doctors or nurses. This biased noting or unknowingly misconstrued act can completely change the kundli calculation. Many times we experience that the comments by the astrologer are totally discrepant or contradictory to the real life events. I think that mostly this occurs due to the misjudged birth time. Now I will try to explain this in detail. 

First of all the querents should keep in mind that if any astrologer looks at the kundli then he/she will know about the past, present and future of the querent is a big misunderstanding. Probably the astrologer can describe a particular event veraciously. But a complete picture of life can be visualized by the astrologer is really a far fetched perception. Most querents approach the astrologer by taking this perception for granted as make statements like "you must have realized from the kundli" Astrology is a science not meant for unveiling personal lives but it is intended to give proper guidelines whenever needed. After accepting this fact, it will be practicable to understand the following points. 

If precise birth time is provided then only a perfectly detailed kundli can be calculated. Many times this recorded birth time is biased and also there are differences of opinions on this subject. If both sides of the coin are considered then we can know why predictions go wrong due to wrong birth time. First problem is the querent is not aware of the exact birth time or depends on the time recorded by the doctors, which can be wrong. On the flip side an astrologer, if knowledgeable and willing can make rectification of birth time but if he is working just for money purpose usually this point is neglected. A slicker will mostly avoid such discussion or will not have a broad mind to accept the mistake. Any astrologer should take into account the boundaries of astrology before promising an accurate prediction to the querent.      

Now I will try to elaborate on what should be the exact birth time of the baby and why, along with the disputes between the scholars regarding this. 

Some scholars believe that when the baby's heart starts beating for the first time in the womb, should be taken as the birth time. Well, when the unborn baby is still in the womb it doesn't have its own body mechanisms running. Breathing, digestion or waste product removal is done with the help of placenta. Waste product is delivered to the mother's system with the help of placenta and umbilical cord. Baby's lungs are in a collapsed state. Oxygen is received through umbilical cord.  Baby's heart at this stage is only using two chambers for circulation, which changes immediately after birth. The unborn baby in the mother's womb has no existence as such. So I don't agree with taking first heart beat as the birth time. Even in practice not many people accept this theory. 

Some scholars state that the sighting of the head (or leg) for the first time from outer side of vaginal canal is the birth time. It is also known as 'crowning'. Some times a part of baby's body slightly comes out of the womb. E.g. Leg, head etc may come out and immediately go inside the womb due to the stretching or compressing of the vaginal nerves. But just a sighting of the organs before delivery can't be taken as a birth time. As such sighting and actual separation from the womb may have a difference of as long as ten minutes. Also this sighting of baby's organs is not a specific or rhythmic process. 

Some scholars opine that when the baby takes it's first breath after the birth should be taken as the birth time. Well I disagree with this calculation too. First of all nobody can ensure that the baby will take a breath immediately after birth. Sometimes this breathing has to be induced. This may take some time. Also, the first cry of the baby is misunderstood as it's first breath and provided wrongly as the birth time. In cases of water birth, the baby is given some time like a minute or so to open eyes, use senses and move about. Before breathing in air the baby may be under water for at least a minute. By taking into account all these factors, I feel that the first breath can't be taken as birth time. Along with these factors, baby's inhalation of air is hard to hear but the exhalation can be clear. This it has no perfection. A cry and breathing may have some time difference too. That is why I refuse to accept the theory of first breath to be taken as birth time.  

As a microbiologist and an astrologer, I will now put the most acceptable theory of birth time. According to astrology the birth time is that moment when the independent body (Lagna) comes into existence as a separate entity. When umbilical cord is cut, the baby loses all it's physical contact with the mother and a separate body starts working with it's own system. This moment when the umbilical cord is cut should be taken as exact birth time. Now after awareness most of the doctors also provide this timing as the birth time. The reasons behind accepting this theory are, after the cutting of umbilical cord the baby can breath independently (which may not start immediately), mother's system is unable to help physically and lungs and four chambers of heart need to be independent to start functioning, which requirement is fulfilled. The time required to start these systems may differ, but their platform is provided by the separation. Another important but unfortunate event can occur due to complication. A baby may not breath for a long time and die or die in the womb itself. If cutting of umbilical cord is taken as the birth time, this forlorn event can be studied. So, I feel cutting the umbilical cord should be the time of birth.  

In today's world precise time showing clocks are available. But in older times how people were calculating exact birth time may be a question in many peoples' minds. I will briefly answer this question. In ancient times sand clocks or may different clocks were available which had no hands or numbers. At that time one day was considered as the time between sunrise and sunset. I will give some metrics based on which this period of today's 24 hours was divided very minutely. It may be the umbilical cutting time or any other step during child birth, the accuracy of the system is astonishing.   

Time units in ancient times:

We call blink of an eye as 'nimish'. This time span is so small that it can't be measured easily. But one nimish is 0.2112 seconds. The time units started with such minute details. The smallest unit is Paramanu. One paramanu is 60,750th part of a second. Starting with this small unit the system was developed and practiced. I will provide some ancient time units and in context with today's units. 
Lipta: 0.4 seconds, Kshan: 1 second, Kashth: 8 seconds, Vighati (pal): 24 seconds, Laghu: 2 minutes, Ghatika: 24 minutes, Muhurt: 48 minutes, Ahoratr: 1 day. Using this time unit system the kundli was calculated by converting the birth time into ghati and pal.    

Well, I tried to put my thoughts on what should be the birth time, which will not only help to minimize the errors but will also help to predict accurately from the kundli.   

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
       ============================================= 

Thursday, 7 November 2019

ग़ज़लकार-ज्योतिष शास्त्रानुसार विवेचन (Shayars - Astrological Analysis)  


मागील लेखात नमूद केल्यानुसार मी शायरांच्या कुंडल्या अभ्यासल्या. ह्यातील प्रत्येक शायर एक वेगळं आयुष्य जगला. भोग आणि दुःख यातल्या कुणालाही सुटली नाहीत. पण त्यातच गुरफटून न जाता यातील प्रत्येकानं दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला. मिर्झा ग़ालिब म्हणतात तसं दुःख नसलेली व्यक्ती चांगली शायर होऊ शकत नाही कारण ज्यानं दुःख अनुभवलं नाही तो ते काव्यात कसं मांडणार?     

ज्योतिष शास्त्रानुसार मला कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटले याची थोडी माहिती देते. मी आधीच्या काही लेखांत लिहिल्याप्रमाणे कलेसाठी शुक्र, नेपच्यून, चंद्र आणि पंचम व दशम स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. बाकी प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार फलादेश बदलत जातोच. त्याशिवाय इतर ग्रहांच्या प्रभावानुसार व्यक्ती आपलं क्षेत्र सोडून इतर विषयही अभ्यासतात. ते आता विस्तारानं पाहू.  

शायर ए आझम मिर्झा ग़ालिब यांच्या कुंडलीचा विचार करता कुंडलीतील उत्तम चंद्र आणि शुक्र यामुळे काव्याची आवड आणि त्यात असामान्य कौशल्य त्यांना लाभलं. वयाच्या ६ वडिलांचं निधन झाल्यामुळे ते काकांकडे वाढले पण त्यांचंही लवकरच निधन झालं. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी मिर्झा ग़ालिब विवाहबद्ध झाले. पण संसारात ते कधीच सुखी झाले नाहीत. दुर्दैवाचे दशावतार त्यांनी पाहिले. काही काळ हलाखीची परिस्थिती, त्यात पत्नीशी न पटणं आणि जन्माला आलेल्या साती मुलांचा मृत्यू इतक्या दुर्दशेतून ते गेले. संसाराला तर ते दुसरं कारागृह म्हणत. हे सर्व भोग त्यांच्या मरणानंतरच सुटतील असं त्यांचं मत. अशा ह्या परिस्थितीवरही त्यांनी जे लिहिलं ते त्यांच्या अप्रतिम शेरांपैकी एक आहे. 

"क़ैद-ए-हयात ओ बंद-ए- ग़म अस्ल में दोनों एक हैं, मौत से पहले आदमी ग़म से नजात पाये क्यूँ ?"      
(जन्मठेप आणि दुःखाचं बंधन हे दोन्ही एकच आहेत. मग मरणा आधी माणसाला दुःखापासून वेगळं का होता येईल?)

असो, माझ्या अभ्यासातून मला हे जाणवलं की इतक्या महान शायरालाही दुःख सुटली नाहीत. पण त्या दुखांमुळेच ते उत्तम ग़ज़ल लिहू शकले असं त्यांनी मानलं. यासाठी मनाचा फार मोठेपणा लागतो. त्यांच्या कुंडलीतील सप्तमातील राहू मुळे ते कायम वैवाहिक सुखाला मुकले. पंचमस्थान हे कलेसाठीचं स्थान असल्याने पंचमेश गुरु पंचमात स्वराशीचा खूप शुभ ठरला. तेथेच चंद्रही आहे ज्यामुळे त्यांना कल्पकता लाभली ज्याला आजही तोड नाही. पण ह्याच पंचम स्थानी गुरु असल्याने (गुरु ज्या स्थानी असतो त्या स्थानाचा नाश करतो- अभ्यास आवश्यक) व ह्या स्थानावर शनीची दृष्टी असल्याने त्यांना संतती सौख्य लाभलं नाही. सर्व संततींचे मृत्यू त्यांना पाहावे लागले यापेक्षा मोठं दुःख काय असेल? पण दशमस्थानातील हर्षल आणि चतुर्थातील शुक्र यामुळे त्यांच्या कलेचं चीज झालं. त्यांना राजदरबारीच नव्हे तर जागतिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी अनेक भाषा अवगत केल्या तर्कशास्त्र व तत्त्वज्ञानाचं ज्ञान मिळवलं. पंचमातील स्वराशीतील गुरूनं त्यांना ही उत्कृष्ट फळं दिली.     

पाकिस्तानी शायरा परवीन शाकिर यांची कुंडली मला मिळाली नाही. पण त्यांच्या जन्मदिवसाची चंद्र कुंडली पाहता त्यांची रास कुंभ आहे इतकीच माहिती मिळाली. असो, असफल वैवाहिक आयुष्य त्यांच्या वाटेला आलं असलं तरी बँकिंग क्षेत्र आणि भाषा या दोहोंचा अभ्यास करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. तसेच इंग्रजी भाषेचंही उच्च शिक्षण घेतलं. त्यांच्या ग़ज़ल लिखाणात त्यांच्या असफल वैवाहिक आयुष्यामुळे विरह, सौन्दर्य, निराशा असे भाव जास्त होते. उत्तम शायरा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. पण वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी त्यांचं अपघाती निधन झालं.     

मोमिन खाँ मोमिन हे एक उत्तम वैद्य होते (युनानी). त्यांचा पहिला विवाह दुःखदायक ठरला. मग त्यांनी दुसरा विवाह केला. आणि वयाच्या ५२व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ह्यांची कुंडली मात्र मला मिळू शकली नाही. 

दाग़ देहलवी यांच्या चंद्र कुंडलीत तूळ रास असून शुक्र मिथुन राशीत अतिशय उत्तम आहे. यामुळे त्यांना कलेचं ज्ञान आणि कॅलिग्राफी व घोडेस्वारीत प्राविण्य अशा गोष्टींत पारंगत होता आलं. पण त्यांच्याही आयुष्यात दुःख कमी नव्हती. त्यांच्या वडिलांना फाशीची शिक्षा झाली. पण त्यानंतर त्यांच्या आईनं दुसरा विवाह राजघराण्यात केल्यानं त्यांचं आयुष्य काही काळ तरी चांगलं गेलं. त्यांच्या सावत्र पित्याच्या मृत्यूनंतर पुन्हा त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांच्या कुंडलीतील गुरु केतू युतीमुळे त्यांना आयुष्यात अनेक चढ उतार पाहावे लागले. तरीही एक अत्यंत कोमल, प्रणयवादाचे शायर म्हणून आजही त्यांचं स्थान अबाधित आहे.    

ज़ैबुन्निसा ही एक राजकन्या असली तरी तिचं आयुष्य सुखी होतं असं म्हणता येणार नाही. इतिहासकारांच्या मते तिचे काही काळासाठी काही पुरुषांशी प्रेमसंबंध आले. परंतु त्यातील एकही प्रेमसंबंध यशस्वी झाला नाही. तिच्या प्रेमसंबंधांमुळे म्हणा किंवा तिच्या संगीत काव्याच्या आवडीमुळे म्हणा कर्मठ बादशाह औरंगज़ेब यांनी तिला नजरकैदेत ठेवलं. ती आयुष्यभर अविवाहित राहिली पण प्रेमासारख्या उत्कट भावनेवरच्या तिच्या काव्याला तोड नाही. तिला आपली सारी संपत्ती, वेतन आणि स्वातंत्र्य यावर पाणी सोडावं लागलं. तब्बल २० वर्षांच्या कैदेनंतर तिचा कैदेत असतानाच मृत्यू झाला. मुघल साम्राज्यातील स्त्रीशक्तीचं प्रतीक असलेली ही अनभिषिक्त सम्राज्ञी आयुष्याचं अखेरचं पर्व खूप उपेक्षेत जगली.    

माझ्या अभ्यासात ज्या शायरांच्या कुंडल्या आल्या त्यातील सर्वच माहिती इथे लिहीणं शक्य नाही. पण ज्योतिष शास्त्रीय अभ्यासानुसार ज्या गोष्टी समोर आल्या त्या पुढीलप्रमाणे आहेत. कोणत्याही कलाकाराच्या कुंडलीप्रमाणेच शायरांच्या कुंडलीतही मुख्यतः कल्पनाशक्तीला वाव मिळायला हवा. त्यामुळे चंद्र हा ग्रह एकतर उत्तम स्थितीत वा शुभ असा असतो. कलेचा कारक शुक्र बहुधा चंद्राबरोबर, शुभ योगात किंवा चंद्रावर दृष्टी टाकणारा असतो. शुक्र असा असला तरी तो वैवाहिक सौख्य देताना मात्र दिसला नाही. दुःख हे ग़ज़लेचं जणू स्फूर्तिस्थान असावं अशा पद्धतीनं ग्रहांची मांडणी होती. पंचमस्थान हे कलेचं स्थान आहे. त्यामुळे ह्या दोन ग्रहांचा पंचम स्थानाशी संबंध असतो असं दिसलं. त्याशिवाय शायरांचं कर्मस्थान हे मुख्यतः राजदरबार होतं. त्यामुळे बहुधा दशमस्थान आणि रवि यांचाही संबंध येताना दिसतो, कारण रवि ग्रह राजदरबार वा सरकारी स्थान व राजकारणात यश देतो. नवीन शायरांच्या कुंडलीत मात्र हा योग नसून दशमस्थान शुक्र वा चंद्राशीच संबंधित होतं. क्वचित नेपच्यूनचा संबंध येताना दिसला. बहुतांशी शायर हे अनेक क्षेत्रांत पारंगत असलेले दिसतात. त्यामुळे पंचम हे शिक्षणाचं स्थान अत्यंत शुभ व गुरू ग्रहाशी संबंधित होतं. पण कोणत्याही शुभ भाव (स्थान) वा ग्रहाची निखळ शुभ फळं मात्र दिसली नाहीत. आणखी एक महत्त्वाचं फळ म्हणजे आयुष्य योग थोडा कमी असणं. असा योग अनेक कलाकारांच्या कुंडलीत दिसतो. अकाली, अपघाती मृत्यू, तुरुंगवास अशी फळं आजही काही कलाकारांच्या आयुष्यात पाहायला मिळतात. बहादूर शाह जफ़र या मुघल बादशाहांनाही तुरुंगवास सुटला नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभलं पण काही भोग मात्र भोगावेच लागले. आता मुद्दा येतो तो प्रसिद्धीचा. प्रसिद्धीचं सौख्य लाभलेल्या ह्या सर्व शायरांच्या कुंडल्यात रवि, गुरू आणि धनेश, दशमेश प्रसिद्धीसाठी उत्तम स्थितीत होते. ज्यामुळे त्यांना राजदरबारी सन्मान किंवा आत्ताच्या काळात सरकारकडून मानसन्मान मिळाले. पण पैसा मिळालाच असं नाही किंवा पैसा असला तरी तो जप्त होऊन वापरता आला नाही. अशा अडचणींचा सामना करूनही हे शायर आपल्या कलेशी एकनिष्ठच राहिले. पूर्वीच्या काळी असलेली ही एकनिष्ठता आत्ताच्या काळात मात्र दिसत नाही. त्यामुळे नाविन शायर आणि जुने शायर हा फरक कायम राहतो. शिवाय पूर्वीच्या काळी शायर नियम न तोडता ग़ज़ल लिहीत असत. आताच्या काळात आलेला मुक्तछंद हा प्रकार फारसा कुणी अवलंबला नाही. अगदीच मुक्तछंद वापरला तर त्याला ते ग़ज़ल म्हणत नसत. आताच्या नवकवींसारखे हे नवीन शायर कशाही पद्धतीनं काही शेर लिहून त्याला अट्टाहासानं ग़ज़ल म्हणतात. मी यातली कोणी अधिकारी व्यक्ती नाही. पण केवळ प्रसिद्धीसाठी मुक्तछंद हा काव्यप्रकार हट्टानं एखाद्या नामचीन काव्यप्रकारात बसवणं मला आवडलं नाही. माझं हे मत सर्वांना पटेलच असं नाही. पण मूळ ग़ज़लेचं सौन्दर्य हरवत चाललं आहे. यात शंका नाही. कलेशी प्रामाणिक असणारे शायर मिळणं आता विरळाच. म्हणूनच कलेशी प्रामाणिक असणाऱ्या शायरांच्याच कुंडल्या मी तपासल्या आणि त्याबद्दल थोडक्यात का होईना लिहू शकले.       
                     
माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागते. पण मला जे खरे शायर वाटले त्यांच्याबद्दलच मी लिहिलं आहे. सर्व शायरांची यादी देणं अशक्य असल्याने मोजक्याच शायरांबद्दल मी लिहिलं आहे. ज्यांची नावं नमूद करता आली नाहीत त्यांचं स्मरण मला आहे एवढंच सांगू इच्छिते. 

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
       ==============================================

As I mentioned in my previous article I studied kundlis of Shayars. Every shayar got the share of weal and woe in life. But rather than lamenting the losses everyone of them tried to give happiness to others. As Mirza Ghalib said, one who has no experience of sorrows can not be a good shayar. Because if there is no grief, how can one express it through the poetry? 

I will briefly explain important parameters in astrology first. As I mentioned in some of my previous articles Venus, Neptune, Moon and fifth and tenth houses are important for any artist. Nevertheless a precise prediction will vary according to one's kundli. Along with this other planets do affect the kundli and the person is versed in subjects other than one's own interest. Lets see some examples to understand this.

Shayar E Azam Mirza Ghalib has auspicious Moon and Venus, which gave him a taste of poetry and he was extraordinarily talented in this. After his father's demise at the age of 6 he grew up with his uncle. Sadly his uncle also expired soon. At the tender age of 14 Ghalib got married. But he had a very tumultuous marriage. His life was full of ups and downs. Some crisis situations in life, estranged relations with wife and witnessing death of all his 7 children were a few of distressing turns of fortune for him. He described his life as confinement and marriage as second imprisonment. He thought that all his sufferings will end with himself. On such a miserable life he wrote:    

  "क़ैद-ए-हयात ओ बंद-ए- ग़म अस्ल में दोनों एक हैं, मौत से पहले आदमी ग़म से नजात पाये क्यूँ ?"        

(The prison of life and the bondage of sorrow are one and the same,
Why should man be free of sorrow before dying?)
This is one of the best shers he has penned. 

Well, I observed through my studies that even such a great, creative shayar could't escape the sorrows. He thought that he could compose best ghazals due to all peaks and troughs in his life. Such comment on life needs a very brave heart, which indeed he had. Due to the Rahu in the seventh house of his horoscope he had a tumultuous married life. Fifth house is a house for art. So fifth house lord Jupiter in the fifth house was very auspicious. Moon also in his fifth house was supportive to it and gave him an imagination power which has no comparison even today. Same Jupiter in the fifth house which is also the house of children, proved to be malefic. (Jupiter destroys the house where it is placed- reference needed). Also Saturn aspecting this house made it more negative and Ghalib couldn't enjoy his fatherhood. He witnessed death of all his children. What more can anybody face in life? Due to Uranus in the tenth house and Venus in the fourth he received great honor at higher levels. He was not only honored in India but on global level too. He was also well versed in philosophy and logistic. Jupiter in the fifth house in it's own sign gave him these best fruits. 

I could not get the kundli of great Pakistani shayara Parveen Shakir. But her Moon sign is Aquarius according to her birth date. Even though she was estranged from her husband, she studied in banking and languages and acquired a PhD degree. She also had higher education in English. Due to her marital problems her ghazals were full of beauty, romanticism, separation, sorrows etc. She was a very prominent shayara in that era. But at the age of just 42 she died in a tragic car accident. 

Mommin Khan Momin was a doctor in Unani medicine. He also separated fro his first wife. Then he remarried. But he died at the age of 52. I couldn't get his birth details.

Daagh Dehelvi has his Moon situated in Libra and Venus at a very good position in Gemini. Due to these auspicious planets he could not only become a scholar in the art of poetry but also he was well trained in horse riding and calligraphy. Sadly most part of his life was not happy. His father was executed by hanging. His mother then remarried to a Mughal crown prince. This was the best period of his life. But after the death of his step father his condition declined. Conjunction of Jupiter and Ketu in his horoscope proved to be a malefic combination forcing him to face the ebb and flow of life. Still he is one of the topmost shayars with a style of delicacy and romanticism.  

Though Zeb Un Nissa was a princess, I can not say her life was smooth going. According to historians she had many suitors, secret lovers and palace trysts. None of the relationship was successful though. May be due to her secret affairs or her liking in poetry, her precisian father Emperor Aurangzeb held her prisoner for the rest of her life. Though she never married, her ghazals and other poetry on love are par excellence. Her accumulated wealth was confiscated, her annual pension was nullified and most importantly she lost her freedom. After 20 long years in imprisonment suddenly she died. A symbol of women empowerment this uncrowned Empress of Mughal era, lived a miserable life at the end. 

It is impossible to write about the details of all the kundlis of shayars I studied. But I can expand and write about my astrological views on these kundlis as a group. Like any artist a shayar's kundli should have a scope for imagination, which is of utmost importance. So Moon is the important planet which is either auspicious or situated at most benefic position. Lord of art i.e. Venus is mostly situated in conjunction with Moon or at least aspecting Moon. Venus, though in such good position almost failed in every kundli to give marital happiness. The lay out of the planets was such that sorrow became the inspiration for ghazal writing. Fifth house in the kundli is the house of art. So these two planets were directly or indirectly related to this house. Most of the shayars worked in the Mughal courts, which became their place of work. So the tenth house and Sun were also related by some or the other means as Sun gives honor in government or politics. In shayars of new era this kind of combination was rare. Rather they have their tenth house related to Venus and Moon. Seldom Neptune was observed to be related to their art. Most of the shayars are well versed in many fields other than poetry. So the fifth house, which is also the house of education was very auspicious and mostly related to Jupiter. Nonetheless no auspicious house or planet provided fully benefic results. Another important result in these kundlis was a medium or short life span. This yog is present in many artists' kundlis in general. Untimely or accidental death, imprisonment are some of the results which can be observed in the kundlis of even today's artists. In spite of being an Emperor himself even Bahadur Shah Zafar could not avoid imprisonment. Though he was long lived, his life was a emotional roller coaster. Now the point to be considered is fame. Most of the shayars who enjoyed exuberant fame had Sun, Jupiter, Second and tenth house lords in very auspicious positions. This gave them honor at the Emperor's court or in today's world titles from the Government. This should not be confused with their accumulated wealth through honors. Because either some of them could not get enough wealth with their titles or even if they got it was somehow lost or confiscated. In spite of all these hurdles, these old shayars were absolutely loyal to their art. Sadly this loyalty observed in the earlier times was diminishing with time and has almost missing today. So the difference between old shayars and new shayars profoundly exists. The earlier shayars used to write ghazals following all complicated rules. They mostly abhorred writing in free verse style. By chance if they wrote free verses they didn't call it a ghazal. The new era shayars just like new generation of poets write in any style and have an obstinacy to call it a ghazal (new era ghazal). I know I am not any authority in ghazal writing but frankly speaking I do not like to forcefully fit free verses in a established style of poetry just for the sake of name or fame. All readers may not agree with me. But it is a sad fact that the original beauty of the ghazal is definitely vanishing. In today's world a selfless, loyal shayar is very hard to find. That is why I studied and wrote very briefly about the kundlis of only those shayars who were loyal to their art.          

If I have hurt anybody's feelings I will definitely apologize for that. I only wrote about the 'real' shayars according to me. It was not possible to mention the names of all the shayars, so I could write about a few of them. I just want to add that even if I have missed some names I do remember them as best shayars. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
     ==============================================