Wednesday, 11 December 2019

नात्झी भस्मासुराचा अस्त (?) (The denouement (?) of the Nazi Führer) 


ऍडॉल्फ हिटलर नावाच्या वादळानं त्याच्या सत्तेच्या काळात (१९३३ - १९४५) संपूर्ण जगाला हादरवलं. १९१३ साली जर्मनीत आल्यावर राजकारणातली एक एक पायरी चढत तो जर्मनीचा सत्ताधीश बनला. ज्यू धर्माच्या लोकांबद्दल मनात कमालीचा तिरस्कार बाळगून त्यांचा जणू खात्मा करण्याचा त्यानं विडाच उचलला. दुसऱ्या महायुद्धाला कारण बनलेला हा क्रूरकर्मा अत्यंत वादग्रस्त आयुष्य जगला. अखेर ३० एप्रिल १९४५ रोजी त्यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्याबरोबर त्याची प्रेयसी इवा ब्राउन हिनंही सायनाईडची गोळी खाऊन आत्महत्या केली. त्या दोघांचेही मृतदेह नंतर जाळून टाकण्यात आले. नेमकं इथेच वादाला तोंड फुटलं. त्या दोघांचेही मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत सापडले की ते दोघे नेमके कोण होते यावर अजूनही वाद प्रतिवाद चालू आहेत. यावर थोडा प्रकाश टाकण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. आणि ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून हिटलरच्या मृत्यूचं गूढ उकलता येईल का याचाही मी माझ्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. 

मी सर्वप्रथम नमूद करू इच्छिते की राजकीय भाष्य करण्यापेक्षा हिटलरवर वैयक्तिक दृष्टिकोनातून इथे विचार मांडले आहेत. 

२० एप्रिल १८८९ रोजी ऑस्ट्रिया मध्ये ऍलॉईस आणि क्लारा हिटलर या दाम्पत्यानं ऍडॉल्फला जन्म दिला. ऍलॉईस यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. हिटलरची आई क्लारा ही ऍलॉईस यांची दुसरी पत्नी. पहिली पत्नी हयात असताना त्यांनी हा विवाह केला. त्यामुळे सख्ख्या आणि सावत्र भावंडांच्या गोतावळ्यात हिटलरचा जन्म झाला. पुढे १९१३ साली जर्मनीत आल्यावर हिटलरनं पहिल्या महायुद्धाची जर्मनी तर्फे काम केलं (१९१९). १९२१ मध्ये जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये कामाला सुरुवात करून त्यानं राजकारणात उडी घेतली. १९३३ साली एकतर्फी वर्णद्वेषाचा अवलंब करणाऱ्या नात्झी पार्टीचा तो सर्वेसर्वा बनला. त्यानंतर संपूर्ण जर्मनीचा बादशाह बनून त्यानं इतकी हुकूमशाही गाजवली की आजही हुकूमशाहीला समानार्थी शब्द म्हणून हिटलरशाही असं म्हटलं जातं. अनेक निरपराध ज्यूंचा बळी घेणाऱ्या हिटलरनं अखेर १९४५ साली आपलं आयुष्य संपवलं(?). त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा मागोवा घेतला तर केवळ राजकारण नव्हे तर इतरही काही गोष्टी त्याला घातक ठरल्या असाव्यात असं वाटतं. आणि त्यानं आत्महत्या केली ह्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्या गोष्टी कोणत्या त्याचा थोडक्यात परामर्श घेऊ. 

ऍलॉईस म्हणजे ऍडॉल्फच्या वडिलांनी पहिली पत्नी हयात असतानाच पूर्णपणे विभक्त न होताच क्लाराशी विवाह केला. त्याच्या वडिलांचं आयुष्यही वादग्रस्तच राहिलं. ऍलॉईस मारीया शिकलग्रबर ह्या कुमारी मातेचा मुलगा होता. त्याच्या आईनं १८४२ जोहान जॉर्ज हिड्लरशी विवाह केला, जो ऍलॉईस याचा खरा पिता होता असं म्हटलं जातं. पण ऍलॉईसचा सांभाळ त्याच्या काकांकडे म्हणजे जोहान नेपोमक हिल्डर यांच्याकडे झाला आणि हा सुद्धा ऍलॉईस याचा पिता असू शकतो अशी एक वदंता होती. एका ज्यू व्यक्तीचा (फ्रँकेनबर्गर) ऍलॉईस हा मुलगा होता, म्हणजे हिटलरचे आजोबा चक्क ज्यू होते, असा एक दावा केला जातो. तरीही  ऍलॉईसचे वडील कोण होते हेही अजूनही कायदेशीररीत्या सिद्ध झालेलं नाही. त्यांच्या हिड्लर या आडनावाचं ऍलॉईसनं नंतर हिटलर असं रूपांतर केलं. 

ऍडॉल्फ लहान असताना वडिलांच्या कडक शिस्तीमुळे त्याचं आणि वडिलांचं फारसं पटत नसे. अनेकदा त्याचे वडील त्याला इतके मारत असत की त्याची आई क्लारा, त्याला वाचवण्यासाठी त्याला तळघरातही ठेवत असे. काही अभ्यासकांच्या मते हिटलरच्या क्रूरतेचा उगम अशा रीतीनं घरातच झाला असावा. ऍडॉल्फनं कलेमध्ये शिक्षण घेऊन कलाकार बनण्याचं स्वप्न बाळगलं होतं, तरीही वडिलांच्या हट्टापायी त्याला वेगळ्या शाळेत घालण्यात आलं. त्यामुळे त्यानं शाळेत मुद्दाम चांगला अभ्यास केला नाही जेणेकरून त्याचे वडील त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील आणि त्याला त्याच्या इच्छा पूर्ण करता येतील असं त्यानं त्याच्या आत्मचरीत्रपर पुस्तकात म्हटलं आहे. त्यातच १९०० साली त्याच्या धाकट्या भावाचं एडमंडचं गोवर झाल्यामुळे निधन झालं. ज्याचा ऍडॉल्फच्या मनावर खूप परिणाम झाला. मात्र १९०३ साली वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यानं हव्या त्या शाळेत प्रवेश घेऊनही शिक्षण सोडून दिलं. १९०७ साली त्याची आई कॅन्सरमुळे वारली. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे तो बेघर लोकांसाठी असलेल्या संस्थेतही राहिला. त्यानं स्थापत्य विद्या आणि संगीत यांचं शिक्षण घेतलं अगदी गाण्याचे प्रयोगही ऑपेरामध्ये केले. स्वतः काढलेली चित्र, रंग विकून आणि कष्टाची कामं करून अर्थार्जनही केलं. पण मूळचा बंडखोर स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच्या मनात वर्णद्वेषी विचार आता चांगलेच स्थिरावले होते. ते इतके प्रभावी बनले कि १९१३ मध्ये जर्मनीत आल्यावर देखील त्यानं सर्व वर्णांची लोकं एकत्र असल्यानं हॅब्सबर्ग एम्पायर इथे काम करायला नकार दिला. 

पहिल्या महायुद्धात जर्मनीसाठी काम करताना त्याला डोळ्याला इजा झाली. तरीही त्यानं कलेचा अभ्यास, कार्टून बनवणं अशा गोष्टी चालूच ठेवल्या. १९१८ मध्ये मस्टर्ड गॅसमुळे त्याला थोडं आंधळेपण आलं. जर्मनी हरल्याची बातमी ऐकल्यावर पुन्हा त्याला तसाच त्रास झाला. त्याच्या मते पाहिलं महायुद्ध हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात उत्तम अनुभव होता. मग त्यानं राजकारणात प्रवेश केला आणि मागे वळून पाहिलं नाही. १९२१ पासून ऍडॉल्फच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात वादळं यायला सुरुवात झाली. १९२९ साली त्याच्या म्युनिच मधील घरी त्यानं त्याची भाची अँजेला ('गेली') आणि तिची आई यांना आसरा दिला. गेलीची आई १९२५ पासूनच ऍडॉल्फचं घर सांभाळून त्याला सोबत करत असे. ऍडॉल्फपेक्षा १९ वर्षांनी लहान असलेली गेली तिचं शिक्षण पूर्ण करत होती. पण ऍडॉल्फ आणि गेली मध्ये अनैतिक संबंध वाढू लागले. ऍडॉल्फ तिच्यावर इतका मालकी हक्क गाजवू लागला की तिनं आपलं वैद्यकीय शिक्षण सोडलं आणि नजरकैदेत असल्यासारखी तिथे राहू लागली. नात्झी चळवळीच्या शिखरावर असताना तो तिला इतका बंधनात ठेवू लागला की अखेर १८ सप्टेंबर १९३१ रोजी तिनं ऍडॉल्फच्याच बंदुकीनं गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ऍडॉल्फ बरोबरचे तिचे संबंध आणि होणार छळ यामुळेच तिचा जीव गेला असावा अशा बातम्याही पसरल्या.    

मध्यंतरीच्या काळात १९२९ साली त्याची इवा ब्राउन या मॉडेल आणि छायाचित्रकार असणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी ओळख झाली. गेलीच्या मृत्यूनंतर ऍडॉल्फ आणि इवाचे संबंध वाढू लागले. ऍडॉल्फच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची छायाचित्रं आणि काही लघुपट तिनंच बनवले होते. पण अत्यंत कर्मठ विचारांच्या ऍडॉल्फच्या मते पुरुषांनी राजकारणात सक्रिय असलं तरी स्त्रियांनी घरकाम करणंच योग्य आहे. स्वतःची प्रतिमा उत्तम ठेवण्यासाठी ऍडॉल्फनं इवाशी प्रेमसंबंध असूनही चारचौघात दर्शवले नाहीत वा कधी लग्नही केलं नाही. इवानेही अनिच्छेनं का होईना याला होकार देत ऍडॉल्फला पाठिंबा दिला आणि स्वतःचं कामही चालू ठेवलं. या वादग्रस्त संबंधात तिनंही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अखेर मरणाच्या आदल्या रात्री २९ एप्रिलला दोघेही ठरवून विवाहबद्ध झाले आणि ३० एप्रिल १९४५ रोजी दोघांनी आत्महत्या केली.        
                   
या सगळ्या काळात ऍडॉल्फला इतरही बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. तो काही निरोगी आयुष्य जगला असंही नाही. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स आणि इतर अभ्यासकांच्या मते त्याला इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम, सिफिलिस, आवाजाचा भ्रम होणं, पार्किन्सन, हृदयाचे ठोके अनियमित पडणं अशा अनेक प्रकारच्या व्याधी जडल्या. काही अभ्यासकांच्या मते त्याला एकच वृषण होतं, ज्यामुळे तो वंध्यत्वाकडे झुकत होता. आपल्या शरीरातील या व्यंगामुळे त्याच्या शारीरिक संबंधावरील विचारातही एक आडमुठेपणा आला. स्वतःला कार्यासाठी वाहून घेण्यासाठी एक ब्रह्मचारी असल्याचं दाखवण्याच्या नादात तो अनेक गोष्टींना मुकला. १४ वर्ष इवाबरोबर असलेले संबंध लपवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागली. त्याखेरीज काही स्त्रियांशी विशेषतः तरुण मुलींशी त्याचे संबंध होते, त्यातूनच त्याला सिफिलिस जडला असावा. हे सर्व संबंध त्यानं खुबीने लपवले होते पण त्याची कुणकुण काही लोकांना लागली होती. समलैंगिक संबंधाचा त्याला इतका तिरस्कार होता कि त्यानं हजारो समलैंगिक लोकांना छळछावणी मध्ये धाडलं. १९४१ मध्ये त्यानं जाहीर केलं की समलैंगिकता ही प्लेग इतकीच धोकादायक आहे. असं असूनही पहिल्या महायुद्धाच्या वेळी असलेल्या अहवालात त्याच्यावर समलैंगिक संबंधाचा आरोप केला गेला, पण त्याची कागदपत्रं आता उपलब्ध नाहीत. आजही अनेक अभ्यासक ऍडॉल्फचा अभ्यास करताना त्याच्या समलैंगिक संबंधांचा पुरावा देतात. कठोर बालपण, युद्धाच्या अनुभवातून आलेलं दडपण, शारिरीक संबंधांचं दडपण अशा अनेक गोष्टींमुळे त्याला सायकॉसिस झाला असावा असाही एक दावा केला जातो. त्याच्या वागण्यातील काही विचित्र गोष्टींमुळे असा दावा केला गेला असावा. स्वतःबद्दलचा कमालीचा अहंभाव, यामुळे त्याला स्किझोफ्रेनिया असावा असाही एक निष्कर्ष काढण्यात आला. १९९८ मध्ये एका तज्ज्ञाचा असा दावा होता कि ऍडॉल्फ अलैंगिक पण विचित्र लैंगिक कल्पना असलेला असा होता. माझ्या मते केवळ पुरुषी अहंकार जपण्यासाठी आणि स्वतःच्या विचित्र लैंगिक कल्पना पूर्ण करण्यासाठी तो देखावा करत होता. काहीही असलं तरी त्याच्या मनावरील खोल जखमांचा त्याच्या लैंगिक आयुष्यावर परीणाम झाला हे नाकारता येणार नाही.             

आयुष्यभर मद्यप्राशन, व्यसनं यांना विरोध करणाऱ्या ऍडॉल्फनं १९२३ साली तुरुंगात असताना ३१ लिटर बिअर मागवली होती. इतकंच नव्हे तर त्याच्या डॉक्टरांच्या मते तो अनेक प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन करत असे (ऑक्सिकोडोन, मेथ, मॉर्फीन आणि कोकेन इ.). कोणत्याही हल्ल्याच्या आधी तो त्याच्या सैनिकांनाही अंमली पदार्थ देत असे (परव्हिटिन). त्याच्या आयुष्याच्या अखेरीस त्याला शरीर थरथरण्याचा त्रास होत होता. काही तज्ज्ञांच्या मते विशिष्ट अंमली पदार्थ न मिळाल्यानं असं होत होतं. म्हणजे त्याच्या अहंकारी स्वाभावात स्वतःची प्रतिमा जोपासण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन लोकांची फसवणूक करण्याची तयारी होती हेच लक्षात येतं.          

बंडखोर वृत्तीच्या ऍडॉल्फ हिटलरनं जेव्हा स्वस्तिक चिन्ह आपल्या झेंड्यासाठी निवडलं तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही तज्ज्ञांच्या मते तो एक गूढशास्त्राचा अभ्यासक होता. आणि गूढशास्त्रानुसार काही गोष्टी करण्यासाठी त्यानं स्वस्तिक चिन्ह स्वीकारलं, छळछावण्या उभारल्या आणि अनेकांची हत्या केली. त्याच्या सवयीनुसार तो रात्री काम करत असे आणि दुपारपर्यंत झोपत असे. त्याचं हे रात्रीचं जागरणही अनेकांनी गूढशास्त्राशी जोडलं. त्याला सकाळी उठवलं तर तो काय शिक्षा देईल हे सांगता येत नसे. असं म्हणतात की ६ जून १९४४ रोजी पहाटे रेडिओवर शत्रूच्या घुसखोरीची बातमी ऐकूनही त्याच्या कोणत्याही सहकाऱ्याची त्याला उठवायची हिम्मत झाली नाही. जर ऍडॉल्फनं त्या वेळी उठून परीस्थितीचा आढावा घेतला असता तर आज दुसऱ्या महायुद्धाचा वेगळाच शेवट आपण ऐकला असता. इथून त्याच्या अधोगतीच्या शेवटच्या पर्वाची नांदी झाली. आणि अखेर ३० एप्रिल १९४५ रोजी हा बुलंद नेता पुरता ढासळला. 

पण वरील वर्णन वाचता इतका अहंकारी पण बुलंद, बंडखोर पण कठोर, करीश्माई पण देखावा करणारा सत्ताधीश इतक्या सहजासहजी आत्महत्या करेल हे थोडं संशयास्पद वाटतं. अहंकारी माणसाला पराभव सहन होत नसला तरी इतक्या पळवाटा काढणारा ऍडॉल्फ अजून एक देखावा नक्कीच उभारू शकत होता, आणि तो म्हणजे त्याच्या मृत्यूचा. स्वतःचा जीव वाचवून आपलं संसाराचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं राजकारणातून पळ काढलाही असेल. अथवा खरंच मोठ्या मनानं किंवा अस्थिर मनस्थितीत मृत्यूला कवटाळलं असेल. त्याच्या तथाकथित मृत्यूनंतर त्यावर संशय व्यक्त करणारे कमी नव्हते. आजतागायत त्यावर अभ्यास चालू आहे. ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या ऍडॉल्फ हिटलरच्या आयुष्यातील घटना आणि त्याचा मृत्यू(?) आणि जर तो जिवंत होता तर त्यानंतरचं त्याचं आयुष्य यावरील भाष्य पुढील लेखात सादर करेन.        


© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

     ==============================================                                        
A raging storm called Adolf Hitler vehemently shook the world in his reign of terror (1933-1945). After arrival in Germany in 1913 he stepped up the ladder to become the Führer of Germany. Due to his racially motivated ideology he planned to annihilate the Jewish race in Europe. The fractious leader, responsible for the Second World War though lived a controversial life. At last he committed suicide on 30th April 1945 by gunshot. His long time lover and wife of one day Eva Braun also killed herself by taking cyanide pill. Their remains were doused in petrol and set alight. This is where the arguments began. Their remains found were burnt to such an extent that it was impossible to identify them and the arguments still continue. I am trying to explore this matter here. I am trying to unveil some facts and trying to dig into the matter from astrological point of view.    

I would like to mention in the beginning itself that it is a study based on the personal life events of Hitler; I have not commented on any political views. 

In Austria the couple Alois and Klara Hitler gave birth to their son Adolf on 20th April 1889. The ancestry of Alois is debated. Klara was Alois's second wife. He married her while still not divorced to his first wife. So Adolf was born among the bunch of siblings. Adolf worked for Germany army after moving there in 1913. He stepped in the politics by joining German Workers' Party in 1921. He became the Chancellor and in a sense a controller of the racist Nazi party. Then he became such an outrageous leader that even today dictatorship is synonymous to word Hitler. This savage tyrant who was responsible for the deaths of millions of innocent Jews finally ended (?) his life in 1945. The analysis of his personal life shows that only political pressure was not the sole reason behind his suicide, but some other factors were equally influential. This puts a big question mark on his possible suicide. Lets have a look at the factors in detail.

Alois, Adolf's father married Klara when his first wife was not separated from him legally. Even his life was full of ups and downs. Alois was a illegitimate son of Maria Schicklgruber. She married Johann Georg Hiedler, who was supposed to be Alois's legitimate father. But Alois was raised at his uncle Johann Nepomuk Hiedler's house. Some people claim that he fathered Alois. There is one strange claim that a Jew person Leopold Frankenberger was the biological father of Alois. It means if this is correct then Adolf Hitler's paternal grandfather was a Jew!!! Still nobody has proven who fathered Alois. At some point Alois changed his surname from Hiedler to Hitler.       

Alois was a strict father who wanted his son to follow his footsteps which distanced Adolf from him. The antagonism between the duo worsened with time and he started beating Adolf, while Klara trying to protect him many times and hide him in the attic. Some psychologists claimed that the roots of Adolf Hitler's savage behaviour lied in his dysfunctional childhood. Adolf had a dream to learn art and become an artist, but ignoring his dreams his father forced him  to join another high school. Adolf Hitler stated in his autobiographical manifesto that he purposely performed poorly in that school hoping his father will one day let him pursue his dream of becoming an artist. In between sudden demise of his younger brother Edmund due to measles deeply affected him. Nonetheless after Alois's sudden death in 1903, Adolf left his education in spite of getting admission to art school. His mother died in 1907 due to cancer. Then he even lived in homeless shelter due to financial crisis. He learned architecture and music, even performed in Opera. To earn money he worked as a labourer and sold his paintings and watercolours. But his rebellious nature was not letting him settle in life of this quality. The racist thoughts spread their roots deeply in his mind. He became so racist that in 1913 he refused to serve Habsburg Empire due to mixture of races in it's army.    

During his service in First World War he was temporarily blinded in a mustard gas attack. In spite of this he pursued his artwork, drawing cartoons etc. After learning about Germany's defeat he again suffered bout of blindness. He stated that first world war was the greatest of all experiences. Then he joined politics and never looked back. The storms started to appear in his personal and political life after 1921. In 1929 he allowed his half niece Angela (Geli) and her mother to stay at his Munich apartment. Though Geli's mother was Adolf Hitler's housekeeper from 1925. His 19 year  junior half niece was pursuing her education. Allegedly Geli and Adolf had some incestuous relationships. Adolf was so possessive about her, that she left her medical education and lived in effect as a prisoner. At the peak of his Nazi movements he kept such a tight rein on her that finally she killed herself by gunshot from Hitler's gun. The rumours spread that she lost her life under pressure due to sexual relationship with Hitler and possible abuse.      

In 1929 he met his long time lover and would be wife of one day, a model and a photographer 17 years old Eva Braun. After Geli's death Eva and Adolf began their courtship. Many of Adolf's colour photographs and films were taken by her. A very pragmatic Adolf had an opinion that though males are active in politics, females should take care of the household. To maintain his public image of a celibate man without domestic life, he never admitted his relationship with Eva and never married her. Unwillingly Eva also supported Adolf but continued to work. In their tumultuous relationship Eva attempted suicide twice. At last just a day before their death Eva and Adolf got married in a small ceremony and committed suicide the next day on 30th April 1945.  

After joining the politics there was no smooth sailing for Adolf from there. Neither he lived a very healthy life. According to the psychologists, researchers and doctors who examined Adolf, he was suffering with many ailments like Syphilis, Eczema, Irregular heart beat, Irritable Bowel Syndrome, Parkinson's disease, Schizophrenia and hallucinations/ hearing voices. It has been also alleged that he had Monorchism, the medical condition of having only one testicle, which can increase the chances of infertility. Due to this condition it is believed that Adolf had uncontrolled outbursts and irrational thoughts on sexuality. To maintain his celibate image in politics he had to sacrifice many things in life. He had to constantly juggle to hide his relationship with Eva from the public eye. Apart from these women he preferred younger women who were easy preys. This is where he probably got infected with Syphilis. Though he cleverly kept a tight rein on the women, many of his adjutants had evidences to prove his sexuality. Adolf was (apparently) so much against homosexuality that he sent thousands of homosexuals to concenttration camps. In 1941 he declared that "homosexuality is actually as infectious and as dangerous as the plague." In spite of this his First World War record, finds him guilty of pederastic practices, though the evidences are not available now. Today many researchers claim about his homosexuality with various evidences. some psychologists claim that Adolf had Psychosis which was a result of his dysfunctional childhood, war trauma, sexuality, fetishes etc. Probably his weird behaviour at times may have drawn the attention of the claimers. A completely narcissistic nature of him may have resulted in transforming him to a Schizophrenic. In 1998 a scientist claimed that Adolf was actually asexual with bizarre sexual fetishes. I think Adolf was keen about his male ego and political image, so he feigned his image to fulfill his sexual fetishes. Nevertheless, it can not be denied that the deep wounds on his mind must have affected his sexual life.       

"A complete anti-alcoholic" in his own words, though Adolf was a teetotaller, he ordered almost 31 liters of Beer when he was imprisoned. According to his physician he regularly consumed drugs (including Methamphetamine, Oxycodone, Morphine and Cocaine). Evidences suggest that he made the drugs available for his army men before war, precisely Pervitin. Near the end of his life he was prone to shaking, which was probably the result of withdrawal from the drugs which were hard to obtain. This shows his behaviour was masked by a pretense all the time and he did not fear to dramatize at any level.  

The selection of Swastika as an emblem by the rebellious leader of Nazi, definitely raised a few eyebrows. Some scholars relate this to Adolf's obsession with the occult. The researchers claim that he himself was an occultist and accepted Swastika or created concentration camps to kill people according to some occult procedures. One of Adolf's weird behaviour was he was a night owl and used to sleep till afternoon. Even this was linked to occultism. If somebody disturbed his sleep, he would grant the hardest possible punishment and was totally unpredictable at that time. According to an evidence on the early morning of June 6, 1944 reports of an Allied landing were radioed. Nobody in his Headquarters dared to wake him up. If Adolf Hilter would have awaken and taken some steps that morning then we would have heard a different outcome of World War II. Well, this proved to be the beginning of his inevitable downfall. Finally this tough rebellion totally collapsed on 30th April 1945.     

By learning all these facts about him I feel very suspicious that this narcissistic but rock hard, rebellious but outrageous and charismatic but manipulative leader will so easily give up on his life. I agree that a narcissistic person can't digest his defeat, but a person who could pretense all the time could have put one more scene, that is to feign his death. Probably he would have fled to some other place and fulfilled his dream of a family. On the other side he would have embraced his death with a brave heart or under unstable psychological status. There were so many people all over the world who were suspicious about his alleged suicide. Even today people are debating on this. Well I will present some thoughts on Adolf Hitler's life, his death (?) and if he was alive, then his life after the alleged attempt from astrological point of view.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
      ===============================================     

No comments:

Post a Comment