Friday, 20 December 2019

नात्झी भस्मासुराचा अस्त (?) -२ (The denouement (?) of the Nazi Führer -2)


३० एप्रिल १९४५ रोजी ऍडॉल्फ हिटलर, एक नात्झी भस्मासूर म्हणून नक्कीच संपला असेल पण एक माणूस म्हणून तो संपला होता का हा एक प्रश्नच आहे. त्याची कुंडली पाहून यावर भाष्य जरूर करता येईल. पण याचं खरं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. ऍडॉल्फची कुंडली आणि अनेक अभ्यासकांनी दिलेले पुरावे यावरून याची उकल करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

ऍडॉल्फची कुंडली पुढील प्रमाणे आहे: 

सर्वप्रथम त्याच्या आयुष्यातील काही घटनांचा (आधीच्या लेखानुसार) कुंडलीतील ग्रहयोगांशी कसा संबंध जोडता येईल ते पाहू. 
  
दशम स्थानी म्हणजे पितृस्थानी कर्क रास असून तिथे शनि आहे जो भावचलित कुंडलीनुसारही तिथेच आहे. दशमेश चंद्र म्हणजे मातृग्रह, तृतीय स्थानी म्हणजे दशम स्थानाच्या षष्ठ स्थानी आहे. त्यामुळे ऍडॉल्फला आईचं सौख्य कमी मिळालं आणि ती आजारपणानं गेली हे दिसतं. पितृकारक रवि सप्तम स्थानी शनिने दृष्ट असा आहे. यातून त्याच्या वडिलांच्या आयुष्यातील चढ उतार दिसतात. शनि हा दशमाचा म्हणजे पितृस्थानाचा सप्तमेश असल्यानं त्याच्या वडिलांच्या आयुष्यातील अयशस्वी विवाह दर्शवतो. या शनि मुळेच त्याला अत्यंत अस्थिर स्थितीत घरी राहावं लागलं. आणि त्याच्या लहानपणीच टोकाचे विचार मूळ धरू लागले होते हे दिसतं. कुटुंबस्थानाचा स्वामी मंगळ सप्तमस्थानी शनिने दृष्ट आणि अंशात्मक दृष्टीनं वक्री शुक्राने युक्त असा आहे. यामुळे ऍडॉल्फचे वडिलांशी खटके उडणं किंवा वडिलांचा मार खाणं इत्यादी गोष्टींना पुष्टी मिळते. मंगळ हा तीव्र ग्रह असल्यानं रक्तपाताचे विचार त्याच्या मनात लहानपणीच मुख्यतः वडिलांमुळे आले असावेत असं वाटतं. पंचमेश शनि दशमात आहे आणि चंद्र कुंडलीनुसार पंचमेश मंगळ पंचमात शुक्राबरोबर असल्यानं त्याला कलेची आवड आणि त्यात कौशल्य होतं हे दिसून येतं. 
सप्तमात ४ ग्रह रवि, मंगळ, वक्री शुक्र आणि बुध एकत्र असून ते शनिने दृष्ट आहेत. सप्तमातील मेषेचा बुध वंध्यत्व दर्शवतो. त्यामुळे ऍडॉल्फला असलेलं एकच वृषण आणि त्यामुळे येऊ शकणारं वंध्यत्व यांना पुष्टी मिळताना दिसते. या वक्री शुक्रामुळे त्याचं अनैसर्गिक लैंगिक वर्तनही दिसून येतं. इतकंच काय तर त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आणि मंगळामुळे त्या स्त्रियांची हत्या / आत्महत्या किंवा छळ केला गेला असावा असं निदर्शनास येतं. दशमातील शनि आणि त्याची रविवर दृष्टी यामुळे ऍडॉल्फ राजकारणात सक्रिय झाला, नव्हे सत्ताधीश झाला. पण हाच शनि त्याच्या राजकारणातील प्रचंड अपयशाला कारण ठरला असावा. सत्तेच्या शिखरावरून तो इतका खाली फेकला गेला त्याला हे महत्त्वाचं कारण आहे. 

व्ययस्थानातील वक्री हर्षल ऍडॉल्फच्या व्यसनाधीन स्वभावाला कारण ठरला असावा. हर्षल हा अत्यंत अप्रत्याशित गुण देणारा ग्रह आहे. त्यामुळे त्याचं व्यसनाधीन होणं आणि अचानक काही निर्णय घेणं किंवा विचित्र वागणं ही वक्री हर्षलचीच देणगी असावी. सप्तमस्थानातील रवि आणि बुध हे मंगळ आणि वक्री अष्टमेश शुक्राबरोबर असल्यानं त्याला दोन वेळा तात्पुरतं आंधळेपण आलं होतं हे दिसून येतं. अर्थात या ग्रहांचा त्या वेळचा माफक वाईट परीणाम आणि त्यावेळची चंद्र महादशा याचा विचार करता तो त्यातून बाहेरही पडला.     

आता मुद्दा येतो तो ऍडॉल्फच्या देखावा करण्याच्या स्वभावाचा. लग्नी तूळ ही समतोल रास असली तरी लग्नेश शुक्र सप्तमात वक्री, भरणी नक्षत्रात आहे. तो मंगळानं युक्त असल्यानं मनात तीव्र, अहंकारी विचार देतो. तिथेच बुध असल्यानं त्याचा त्याच्या वंध्यत्वाशी संबंध येताना दिसतो. नेमका तिथेच रवि (उच्चीचा) मेषेचा असल्यानं अत्यंत तीव्र भावना आणि राजकारणातही तसेच विचार दर्शवतो. या सगळ्यात बुध हा त्याच्या दिखावेपणाला कारणीभूत असावा असं माझं मत आहे. चंद्रकुंडली नुसार सप्तमातील राहूमुळे छायाचित्रकार जोडीदार लाभला असला तरी हे नातं वादग्रस्तच होतं. मेषेचा बुध अश्विनी नक्षत्रात असल्यानं चतुर स्वभाव होता पण तो दिखाव्यासाठी जास्त वापरला गेला असावा. या बुधामुळे ऍडॉल्फला वाक्चातुर्य लाभलं आणि लाखो अनुयायी मिळाले. पण ह्याच बुधामुळे असत्य बोलणं आणि बुद्धी वाईट मार्गाकडे जास्त वळणं ही फळं मिळाली. चंद्र हा मनाचा कारक ग्रह धनू राशीत असल्यामुळे बुद्धिमत्ता अफाट होती. पण त्याबरोबर गुरू आणि राहू असल्यानं अत्यंत अशुभ योग तयार झाला. यामुळेच त्याचं मन कायम स्वतःची प्रतिमा टिकवण्याच्या मागे धावत होतं. धनू राशीमुळेही त्याच्या अहंकारात भर पडली. गुरू राहू हे ग्रह तृतीय स्थानी (भावंड) असल्यानं त्याच्या धाकट्या भावंडाचा मृत्यू झाला आणि त्यातून सावरायला त्याला वेळ लागला. 

तृतीय स्थान हे पराक्रमाचंही स्थान असल्यानं ऍडॉल्फ एक यशस्वी वक्ता, राजकारणी झालाही पण त्याच्या अतिरेकी स्वभावानं त्या यशाला गालबोट लागलं. आज संपूर्ण जगात ऍडॉल्फचं नाव सगळ्यांना ठाऊक असलं तरी ती कीर्ती कमी आणि अपकीर्ती जास्त आहे हे सत्य आहे. जर गुरू आणि राहू अंशात्मक रीत्याही युक्त असते तर याची आणखी भयंकर फळं मिळाली असती.     

माझ्या लेखनातील मुख्य मुद्दा आहे तो ऍडॉल्फच्या तथाकथित मृत्यूचा. त्याच्या मृत्यूबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. त्याचा दोन्ही बाजुंनी विचार करून काही निष्कर्ष काढता येईल का याचा मी प्रयत्न करणार आहे.   


ऍडॉल्फ त्याच्या तथाकथित आत्महत्येआधीच तेथून बाहेर पडल्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत. वरील कागदपत्र अमेरिकेच्या FBI या गुप्तचर संस्थेच्या लिंक वर उपलब्ध आहे. त्यानुसार २९ जून १९४५ रोजी लॉस अँजेलिस येथे एका परीक्षकाला एका खबऱ्यानं माहिती दिली कि ऍडॉल्फ अर्जेन्टिना या देशात बोटीनं उतरला आहे. पण ही माहिती प्रसिद्ध केली गेली नाही. काही आठवड्यांनंतर तो FBI या संस्थेकडे गेला. आणि त्यानं माहिती दिली की २ जर्मनीच्या पाणबुड्या ज्यात ऍडॉल्फ हिटलर व इवा ब्राऊन होते त्या व्हाल्डेझ पेनिन्सुला, गल्फ ऑफ सॅन व्हॅटिआझ, अर्जेन्टिना येथे आल्या. तेथील चार लोकांना हिटलरला अर्जेन्टिनामधे उतरल्यावर सहाय्य करण्यासाठी १५००० डॉलर इतकी रक्कम दिली होती व हा खबऱ्या त्या चार लोकांपैकी एक होता. त्यांच्याच सहाय्यानं ऍडॉल्फ आणि इवा अर्जेन्टिनामध्ये राहिले असं म्हटलं जातं. त्यानंतरही FBI कडे U- ५३० या जर्मन बनावटीच्या पाणबुड्या अर्जेन्टिनामध्ये आल्याच्या बातम्या होत्या पण त्यात लक्ष दिलं गेलं नाही. यावर इतर काही नेत्यांनी भाष्य केलं आणि या शंकेला पुष्टी मिळाली की ऍडॉल्फ आणि इवा सहीसलामत आहेत. अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डी. आईसेनहॉवर यांनी सुद्धा 'स्टार्स आणि स्ट्राइप्स' या वृत्तपत्राशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला. बर्लिनचे अधिकारी कोलोनेल हिम्लीच यांनी सुद्धा ऍडॉल्फ हिटलरच्या मृत्यूला अफवा सोडल्या तर काहीही पुरावा नाही असं वक्तव्य केलं. १९४७ मध्ये जिम्मी बायर्नेस यांनी त्यांच्या स्पीकिंग फ्रॅंकली या पुस्तकात उल्लेख केला की " स्टॅलिन यांना जेव्हा मी हिटलरच्या मृत्यूबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले कि हिटलर मेलेला नाही, तो एकतर स्पेनमध्ये आहे किंवा अर्जेन्टिनामध्ये" 




३ ऑक्टोबर १९५५ च्या CIA च्या वृत्तानुसार एका माहितगारानुसार एका फोटोमधील व्यक्ती ऍडॉल्फ हिटलर होती. जर्मनीच्या संस्थेमधील एका व्यक्तीनं, CIMELODY- ३ याला (खरं नाव गुप्त) जाहीरपणे सांगितलं होतं की हिटलर जिवंत आहे. त्याचीही काही कागदपत्रं उपलब्ध आहेत. त्यानंतर अनेक गुप्तचर संस्था आणि लोकांनी ऍडॉल्फ हिटलरला प्रत्यक्ष पाहिल्याची ग्वाही दिली. पण राजकीय कारणांमुळे यातील कोणत्याही पुराव्याचा अभ्यास केला गेला नाही किंबहुना त्यातील सत्य बाहेर आलं नाही. १९४७ नंतर अनेक सूत्रांकडून हिटलर जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदर्लंड, स्पेन आणि अर्जेन्टिना अशा देशांत दिसल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारे अनेक अधिकृत व्यक्तींकडून माहिती उपलब्ध झाली तरीही ऍडॉल्फ हिटलर जिवंत असल्याची शहानिशा कुठेच झाली नाही. 


फ्रान्सच्या सरकारकडून ऍडॉल्फ हिटलरच्या कवटीचा आणि जबड्याच्या अवशेषांचा अभ्यास केला गेला. त्या कवटीमधील छिद्र हे बंदुकीच्या गोळीनंच पडलं आहे हे सिद्ध झालं. पण त्यावरील डागांमुळे एडॉल्फ हिटलरनं मरणाआधी सायनाईड घेतलं असावं अशी एक शंका आहे. त्यांच्या मते हिटलरच्या कवटीचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की त्यानं बंदुकीची गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. जेव्हा ऍडॉल्फच्या दातांचा एक्स रे मिळाला आणि त्याच्याबरोबर उपलब्ध कवटीमधील दातांचा अभ्यास जोडला जाण्यासाठी प्रयत्न केला गेला तेव्हा स्टॅलिन यांनी बराच हस्तक्षेप केला असं म्हटलं जातं. एका रशियन वृत्तपत्रानुसार (Pravda) हिटलरचा मृतदेह सापडला आहे, हे फॅसिस्ट लोकांचं षडयंत्र आहे असंही छापण्यात आलं. खालील फोटोमध्ये ऍडॉल्फ हिटलरच्या कवटीचा भाग दिसत आहे. ज्यात एका मोठ्या छिद्रामुळे बंदुकीची गोळी लागली आहे हे स्पष्ट होत आहे. १९६५ साली एका रशियन अभ्यासक असलेल्या रझेव्हस्कया नावाच्या स्त्रीनं सांगितलं की त्यांना १९४५ मध्ये एका साध्या दागिन्यांच्या डब्यात ऍडॉल्फ हिटलरच्या दातांचे अवशेष सोपवण्यात आले. आणि त्याची काळजी घेतली गेली नाही तर त्यांच्या जीवावर बेतेल असंही सांगण्यात आलं. त्या जेव्हा त्यांच्या २ अधिकाऱ्यांना घेऊन हिटलरच्या दंतवैद्याकडे गेल्या तेव्हा मात्र तो बव्हेरीयाला पळून गेल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर ते दातांचे अवशेष रशियाला पाठवण्यात आले. नंतर २०००च्या दशकात काही व्यक्तींनी हिटलरचे जळालेले अवशेष जर्मनी मध्येच पुरून ठेवल्याचं सांगितलं. त्यांच्या मते १९७० नंतर रशियाने त्या अवशेषांचं दहन करून ती राख एका नदीच्या काठी गर्द झाडाझुडपात विखुरली. कोणत्याही नवीन पद्धतीच्या नात्झी संस्थेला ऍडॉल्फचे पुरलेले अवशेष सापडले तर त्या ठिकाणाला खूप महत्त्व मिळेल या कारणास्तव असा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सोव्हिएत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून दिली गेली. अशा असंख्य पुराव्यांचा विचार करता ऍडॉल्फ हिटलरचं नक्की काय झालं हा वाद मिटलेला नाही. आता त्याच्या कुंडलीवरून याबद्दल काय अंदाज बांधता येईल ते पाहू. 

मृत्यूस्थानी (अष्टम) वृषभ रास असून अष्टमेश शुक्र सप्तमस्थानी म्हणजे अष्टमाच्या व्ययस्थानी अशुभ असा आहे. तो सप्तमस्थानी असल्यानं त्याचा मृत्यू किंवा मृत्यूचा देखावा करताना त्याची जोडीदार त्याच्या सोबत असणार हे उघड आहे. चंद्र कुंडलीचा विचार करता अष्टमस्थानी शनि आहे. अष्टमेश चंद्र धनू राशीत स्वगृहीच्या गुरूसोबत आहे. त्यामुळे माझ्या मते ऍडॉल्फ छपन्न वर्षं इतकं कमी आयुष्य जगला नसावा. गुरू केतू एकत्र आल्यानं त्याला पराकोटीचा मानसिक त्रास, गूढ शास्त्र वा तंत्र शास्त्रामुळेही काही त्रास झाला असण्याची शक्यता आहे. आता हा परीणाम त्यानं स्वतः अवलंबलेल्या काही गोष्टींमुळे झाला की इतर कोणी काही वाममार्गी कार्य केली होती हे सांगणं अवघड आहे. लग्नकुंडलीनुसार अष्टमेश शुक्र, सप्तमात मंगळ आणि बुधाबरोबर आहे. म्हणजेच मगाशी नमूद केल्याप्रमाणे हा देखावा असू शकतो. अर्थात हा देखावा उभा करणं काही सोपी गोष्ट नाही. त्याची अमर्याद सत्ता आणि सहकाऱ्यांची मदत यामुळेच ते शक्य होतं. सप्तमस्थानातील उच्चीचा रवि यासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. मात्र त्यावर शनिची दृष्टी आणि भाग्यस्थानातील राहू यामुळे ऍडॉल्फला अनेक टोकाचे परीणाम भोगावे लागले असावेत. मृत्यूच्या वेळी ऍडॉल्फला राहू महादशा आणि शुक्राची अंतर्दशा सुरु होती. चलित गुरू सिंह राशीतून भ्रमण करत होता. म्हणजेच चलित गुरू ऍडॉल्फच्या कुंडलीतून एकादश स्थानावरून भ्रमण करत होता. माझ्या मते यामुळेच तो मित्र वा सहकाऱ्यांच्या मदतीनं पळून जाण्यात यशस्वी झाला असावा. लाभस्थानावरील गुरूचं भ्रमण त्याचा मृत्यू दर्शवण्यापेक्षा मित्र परीवाराचं सहकार्य दर्शवत आहे. अगदी खोलात जाऊन विचार करायचा तर कुंडलीनुसार ३० एप्रिल १९४५ रोजी त्याची राहू महादशेतील शुक्र अंतर्दशा आणि बुधाची प्रत्यंतरदशा होती. म्हणजेच बुधाने दिलेलं वाक्चातुर्य आणि असत्य बोलण्याचे गुण पाहता हा एक देखावा असू शकतो असं माझं मत आहे. अष्टमेश शुक्र मंगळाबरोबर असल्यानं त्याचा शस्त्राघातानं मृत्यू झाला असावा. ह्या दोन्ही ग्रहांबरोबर रवि - बुध असल्यानं त्याचा मृत्यू डोक्याला वा डोळ्याला गंभीर इजा होऊन झाला असावा हेही नाकारता येणार नाही. पण तो काळ बराच पुढे असणार असं दिसत आहे. मानसिक असंतुलन हे त्याच्या मृत्यूमागचं प्रमुख कारण असावं. माझ्या मते २९ एप्रिल १९४५ रोजी तो जर्मनीमधून बाहेर पडला असावा. व्ययेश बुधही सप्तमातच असल्यानं मृत्यू आणि पलायन असं अजब रसायन या कुंडलीत तयार झालेलं दिसतं. ऍडॉल्फनं जणू एका मनाला मारून पुनर्जन्म घेऊन दुसऱ्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला असावा. म्हणूनच एक नात्झी क्रूरकर्मा म्हणून त्यानं मृत्यूचं चित्र उभं केलं आणि त्याप्रमाणे तो क्रूरकर्मा मरण पावलाही होता पण एक माणूस म्हणून ऍडॉल्फ परदेशात पुढील आयुष्य जगला असावा. आयुष्याच्या पुढील पर्वात त्याला इवाची किती साथ मिळाली असेल ह्याबद्दल मात्र मला शंका आहे. एका वेगळ्या देशात, वेगळ्या नावानं आणि वेगळ्या जोडीदारासोबत तो राहिला असावा असा माझा अंदाज आहे. 

मगाशी मी सादर केलेल्या सर्व वैज्ञानिक पुराव्यांतही कुठेही ठोस पुरावा दोन्ही बाजुंनी उपलब्ध नाही. तो काळही असा होता की प्रसार माध्यमं, युद्धं, सरकारी कामकाज, नियम, दळणवळणाची अपुरी साधनं या सगळ्यांमुळे आजच्या काळापेक्षा खूपच तफावत होती. त्यामुळे ऍडॉल्फला त्याचा फायदा दोन्ही पद्धतीनं घेता आला असेल. एकतर त्याचा खरंच मृत्यू झाला असेल, तर त्याचे अवशेष लपवणं आणि त्याबद्दल खोटी माहिती देणं शक्य होतं. उलटपक्षी पलायन करून एका वेगळ्या नावानं आयुष्य जगणंही शक्य होतं. कोठेही पारदर्शकता नसल्याचा फायदा ह्या नात्झी भस्मासुराला नक्कीच मिळाला यात वाद नाही. मी माझ्या अभ्यासातून जे मुद्दे मांडता आले ते मांडले आहेत. माझ्या मतांशी प्रत्येकजण सहमत होईलच असं नाही. एक माहिती म्हणून या लेखाचं वाचन व्हावं एव्हढीच माझी इच्छा आहे.                       

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
       ===============================================
                            
On 30th April 1945, the infamous Nazi Führer definitely ended his life. But a person called Adolf Hitler was really finished? Now that's a big question mark. By studying his horoscope, some thoughts can be put on his death. But frankly speaking it is impossible to answer this question. I am trying to uncover some anecdotes and proofs provided by the analysts and try to get some clues to get the answer of this mystery.

Adolf Hitler's kundli is as below:


First lets try and link some of his life events (mentioned in the previous article) to the yogas in his kundli. 

The kundli shows Cancer sign in his tenth house (father) with Saturn situated there, which is also present there in Bhavachalit kundli. The tenth house lord Moon which is also the lord of his mother is situated in the third house i.e. the sixth house of the tenth. This shows how Adolf lost his mother to illness and missed a mother figure in his life. Sun the lord of father is situated in the seventh house, aspected by Saturn. This shows that the life of his father was also full of ups and downs. Saturn is also the seventh lord of the tenth house (father), which supports the fact that his father had an unsuccessful marriage. This Saturn was also responsible for his dysfunctional childhood. It also shows that the rebellious thoughts in Adolf's mind started spawning at his home in his early childhood. The second house (family) lord Mars is situated at the seventh house along with Venus in a retrograde position and aspected by Saturn. This aids to prove the fact that he had a tumultuous relationship with his father and got beaten during his childhood. Mars being a very aggressive planet, seems to be responsible for his furious behaviour predominantly due to antagonism between him and his father. The fifth house lord from the ascendant i.e. Saturn is placed in the tenth house and from the Moon chart i.e. Mars is placed in the fifth house along with Venus. This auspicious yog gave him a liking and skill in various arts.    

Four planets placed in the seventh house i.e. Sun, Mars, Venus (R) and Mercury are aspected by Saturn. Mercury in the seventh house in Aries shows inclination towards infertility. This supports the fact that he had Monorchism and his possible infertility. Venus in the retrograde position also supports his weird sexual behaviour. Also the presence of Mars in the seventh house also shows his sexual relationships with many women and their alleged torture and murder/suicide. Saturn placed in the tenth house not only made him active in politics but to become the controller. Alas!! the same Saturn was responsible for his drastic downfall. He was literally overthrown from his throne due to this Saturn.

Uranus in the twelfth house shows his addiction towards various things. Uranus always gives unpredictable results. So Adolf's addictions, erratic nature and unpredictable decisions can be the result of Uranus. Sun and Mercury along with Mars and retrograde Venus gave him temporary blindness. But limited malefic effects of these planets and his Moon Mahadasha at that time helped him to recover from the ill effects. 

Now the next point to be considered is Adolf's nature to pretense. Though a balanced sign like Libra at the ascendant, the ascendant lord Venus in the seventh house in Bharani Nakshatra is not very auspicious. Venus (R) along with Mars in that position gave him very aggressive and conceit mentality. Mercury in the same house can also be linked to his possible infertility. Exalted Sun happens to be placed in the seventh house along with the three planets in Aries, made him furious not only in his personal life but in his political life too. I personally think that in all the above mentioned planetary positions, Mercury is precisely responsible for his feigning behaviour. Though Rahu in the seventh house according to Moon Chart contributed to his love affair with a woman with a skill of photography, this relation was highly tumultuous. Mercury in Aries and Ashwini Nakshatra must have granted him cleverness, which was sadly used more for trickery. Due to this Mercury he was a master eloquent and mounted huge followers. Nonetheless skulduggery and knavery were the ill effects of the same malefic Mercury. Moon the ruler of mind situated in Sagittarius furnished him with intelligence. But Jupiter and Rahu along with the Moon was not an auspicious combination. So Adolf's mind was always juggling to keep his public image intact whatsoever. Sagittarius as the Moon sign also added to his ego. Jupiter and Rahu in the third house (siblings) were typically malefic in their effect. As a result Adolf lost his younger brother which affected him deeply.     

Third house in the kundli, being the house of feat or bravery, made Adolf a successful eloquent and politician. But his extremist nature was a blemish on his successful career. Though everyone, even today knows the name Adolf Hitler, its an infamy rather than a fame. If Jupiter and Rahu were in conjunction in degrees, then it would definitely have been a disaster recipe. 

Now the main purpose of my article is to discuss about the alleged suicide of Adolf Hitler. There are many differences of opinions on his alleged suicide. By considering both the views I am trying to get to some conclusion here. 


There are many proofs available claiming that Adolf Hitler fled before his alleged suicide. The above mentioned papers are available on the FBI Vault website. According to the reference on 29th June 1945 an informant gave this information to the Los Angeles Examiner that Adolf Hitler landed in Argentina. But this information never came to lights. After some weeks he approached FBI and informed them that 2 German submarines with Adolf Hitler and Eva Braun on board landed on the Valdez Peninsula, in the Gulf of San Vatias in Argentina. He added that four men were paid a handsome amount of $15000 to assist Adolf Hitler after his landing in Argentina. This informant was one of them. According to him with the help of such people, Adolf and Eva safely stayed in Argentina for some time. After this FBI got another information that German U-530 submarines landed on the Argentinean coast, even this information was purposely neglected. Some notable politicians also commented on Hitler's alleged escape and it added to the suspicion that Adolf and Eva are safe at some other place. The future president of the U.S. D. Eisenhower also supported the possibility of Hitler's escape while talking to the Stars and Stripes newspaper. Colonel Hemlich, Chief of U.S. Intelligence in Berlin also said that "There is no evidence beyond that of hearsay to support the theory of Hitler’s suicide. On the basis of present evidence, no insurance company in America would pay a claim on Adolf Hitler." In 1947 Jimmy Byrnes stated in his book Speaking Frankly that "While in Potsdam at the conference of the Big Four, Stalin left his chair, came over and clicked his liquor glass with mine in a very friendly manner. I asked what was his theory about the death of Adolf Hitler and he replied – Hitler is not dead. He escaped either to Spain or Argentina."           



According to the report published by CIA in 3rd October 1955 an informant produced a photograph of Adolf Hitler. CIMELODY-3 [a code name] stated that a former German trooper told him confidentially that Adolf Hitler is still alive. Even those papers are available. After this many secret agencies and people or informants witnessed the presence of Adolf Hitler at different places. Due to mere political pressure all these evidences were either not studied or the truth was never published. After 1947 many informants witnessed to the occurrence of Adolf Hitler at Germany, Netherlands, Switzerland, Spain and Argentina. In spite of all the witnesses, a fair verdict of Adolf's sightings was never completed. 


Government of France separately studied Adolf's jaw bone and his skull. The hole in the skull was proved to be there due to a gunshot wound. They also suggested that the bluish deposits on the dentures are probably due to cyanide consumption and reaction of it to the metal caps. They supported the fact that the skull shows signs of a gunshot wound. The X-ray of Adolf's dentures and its comparison with the available jawbone samples was interrupted by Joseph Stalin for unknown reason. According to a Russian newspaper, Pravda rumours that Hitler’s body had been found were a fascist provocation. The photograph below shows the hole in the skull of Hitler which supports the gunshot wound theory. In 1965 a Russian analyst Ms. Rzhevskaya stated that she was handed a cheap jewellery box in 1945 which had Adolf's teeth inside. She was warned by her commanding officer that " if you lose them, you’ll be answerable with your head.” When she tried to contact Adolf Hitler's dentist with her two superior officers, she was shocked to know that he has fled to Bavaria. Then the dental remains were sent to Russia. Then in the 2000's some informants stated that Adolf Hitler's remains were incinerated and scattered along a hill near a river. The reason? If the remains were found in future the place may become a pilgrimage for neo Nazis - as provided by the higher echelons of Soviet. By looking at all these allegations the question 'What exactly happened to Adolf Hilter?' is still unanswered. Now lets see can we draw any conclusion from the kundli of Adolf Hitler. 

In his kundli Taurus is the sign at the eighth house (death) with the eighth house lord Venus placed in the twelfth house from the eighth, which itself is not a favourable yog. The placement of Venus in the seventh house shows that when Adolf died or pretended his suicide, he was accompanied by his lover. In the Moon Chart, Saturn is situated in the eighth house. The eighth house lord Moon is placed with Jupiter in his own sign in Sagittarius. This is the reason I feel that Adolf Hitler did not die at the age of 56. Jupiter and Ketu placed together must have forced him to go through emotional turmoils or even he may have faced some problems due to occult practices. Frankly speaking it is hard to differentiate if the occult practices were carried out by him or any other of his adjutant. According to his Ascendant Chart, the eighth house lord Venus is placed in the seventh house with Mars and Mercury. This supports the fact that his death was merely a pretense. Well obviously pretending the death of a commander is not an easy task. Definitely his immeasurable power and his loyal auxiliary played a very important role in the shamming act. Exalted Sun in the seventh house has been a very important factor, I guess. But the Sun aspected by Saturn and Rahu in the ninth house rendered him with extreme consequences. At the time of his alleged death Adolf was undergoing Rahu Mahadasha and Venus Antardasha. Current Jupiter was transiting in Leo at the time. This means that Jupiter was transiting in the eleventh house in his kundli. I think this is the reason why he was successful in escaping with the help of his friends. The transit of Jupiter on his 11th house (Labhasthana) shows help obtained from his friends rather than his death. To dwell into his kundli, on 30th April 1945 he was going through Rahu Mahadasha, Venus Antardasha and Mercury PratyantarDasha. As I mentioned earlier, Mercury the ruler of speech and trickery in speech may have helped more to pretense his death. Eighth house lord Venus (R) along with Mars can lead to a death due to weapons. These planets placed along with Sun - Mercury may give him a serious wound to his eyes or head. But the time period for the situation to occur seems to be way to ahead. I feel this kind of death may have occurred in future basically due to his unstable mind. I strongly feel that he must have fled to other country on 29th April 1945. The twelfth house lord Mersury in the seventh house created a weird output of (pretended) death and escape situations at the same time. Adolf Hitler may have killed one of his mind and resurrected to live a new life according to his other mind. So he did put a picture in front of the world that the Nazi despot and tyrant is dead and so it was, but he definitely lived as human being with a new identity at a new place. I am really doubtful how much concomitance was obtained from Eva Braun after the escape to other country. I personally feel that Adolf changed his name and lived with a new identity with a new partner at a new place obviously keeping a low profile. 

I presented some of the scientific analysis results in this article, though not a single claim provides a full proof evidence. The period when this happened was quite different from today in the sense of media, government working style and rules, background of wars, comparatively less developed travelling sources. So I think Adolf Hitler could have taken the advantage from either of the sides. One is he might have really committed suicide and his remains were destroyed and false news were spawned. Or he may have fled to other country and lived a life with a new identity. Lack of transparency at that time would have definitely given the Nazi Führer a huge benefit. 

I presented my thoughts based on my study on Adolf Hitler. Every reader may not agree to this. I hope the readers will read this article just as a source of information.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.     
        ============================================     

No comments:

Post a Comment