Wednesday, 15 January 2020

मधुराष्टक (Madhurashtak)




शुद्धाद्वैताचे जनक श्री वल्लभ आचार्य यांनी पुष्टिमार्गातून श्रीकृष्ण आराधना करण्यासाठी या रचनेची निर्मिती केली. या रचनेत श्रीकृष्णाच्या मधाळ वर्णनाबरोबरच भक्तिमार्गही दाखवला आहे. संपूर्ण मधुरसात आकंठ बुडालेली ही श्रीकृष्णस्तुती आठ कडव्यांमध्ये श्रीकृष्णाची गोड पण रोखठोक रूपं दाखवते. आश्चर्य म्हणजे श्रीकृष्णाच्या सहा आवडत्या बास-यांपैकी वेणू या बासरीचा उल्लेख आढळतो. खरे तर महानंदा ही राधेनं दिलेली बासरी त्याची सगळ्यात आवडती बासरी. पण वेणू या बासरीला कृष्णानं इतकं जवळचं मानलं कि राधाही तिचा द्वेष करीत असे. पौराणिक काळात संगीताराधनेत मूलभूत तीन खांब सांगितले आहेत. आत्मा-वीणा-वेणू. संगीताचे हे त्रिदेवच जणू. त्यात स्थान मिळवलेली ही वेणू नामक गोपिशत्रू नेहमीच श्रीकृष्णाच्या ओठाचे मधुरसपान करीत असे. या सर्वांगसुंदर दैवताचे वर्णन इतक्या रसभरीत रीतीनं करून वल्लभ आचार्य यांनी भक्तीसाठी एक प्रेमाचा मार्ग आखून दिलेला आढळतो. 

ब्रह्मसंहितेतही "वेणुम् क्वणन्तारविन्द दलायताक्षम्, बार्हावतंसम् असिताम्बुद सुन्दरााङ्गम्, कन्दर्प कोटि कमनीय विशेष शोभम्, गोविंदम् आदि पुरुषम् तं अहम् भजामि" (मी त्या परमदैवत गोविंदाचे पूजन करतो जो आपले वेणू वादनाचे कौशल्य दाखवतो, ज्याचे तजेलदार डोळे कमलदला सारखे आहेत, ज्याचे कपाळ निळ्या ढगांनी आच्छादल्याप्रमाणे मोरपिसाने सजलेले आहे आणि ज्याचे शरीर अनेक कामदेवांनाही लाजवेल इतके मोहक आहे त्याचे मी भजन करतो). अशा वर्णनाने श्रीकृष्ण नटला आहे. कामरस आणि काम शास्त्रातील अनेक पद्धतींचा जनक श्रीकृष्ण फक्त शरीरसुखातच अग्रेसर नव्हता, तर सर्व बाजुंनी स्त्रीला सुखावणारा होता. मोहकपणा बरोबरच न्यायप्रियता आणि शरीर सौष्ठव यात कुठेही कमी नसणारा हा नंदकुमार मानसिक रीत्याही गोपींचा प्रियकरच होता. कोणत्याही नात्यात तो परिपूर्ण असाच होता. खऱ्या अर्थाने 'वासुदेव' या पातळीला पोचलेला हा युगंधर होता. वासुदेव म्हणजे फक्त वसुदेवाचा पुत्र नव्हे तर श्री, पूर्णत्व, अचूकता, परिपूर्णता म्हणजे वासुदेव. मात्र या उपाधी साठी कृष्णानेही भौतिक तपश्चर्या केली होती. सहजासहजी हि उपाधी त्याला मिळालेली नाही. या लीलाधर श्रीकृष्णाचे पूजन आणि भजन दोन्ही साध्य करताना श्री वल्लभ आचार्य यांनी 'मधुर' या त्याच्या रूपाचा आधार घेतला आहे. कुणासही सहज राग न यावा असंच रूप असलेला हा श्यामल गवळी किती सहज सगळ्या गोष्टी साध्य करीत असे.

श्री कृष्णाच्या ह्या मधुर स्तुतीचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे: 

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।

हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझे ओठ मधुर आहेत, तुझे मुख मधुर आहे, तुझे डोळे मधुर आहेत, तुझं हास्य मधुर आहे, तुझं हृदय मधुर आहे, तुझं चालणंही मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

जेव्हा कृष्णानं बाम्बूच्या झाडाला विचारलं "मी सर्व गोपी, प्राणी पक्षांना मोहवतो मग तू मला काय देणार आहेस?" तेव्हा बाम्बू उत्तरला "हे देवा तुला हवे ते घे" कृष्णाने त्याचा जीव मागितला आणि त्याने तो दिलाही. त्याचे शरीर कापून कृष्णाने आठ छिद्रे केली जेव्हा बाम्बू खूप तळमळला. मग त्याची मधुर सूर उमटणारी बासरी करून कृष्णाने सतत ती आपल्या जवळ ठेवली. अगदी मृत्यू जरी आला तरी युगंधराच्या साध्या फुंकर घालण्यानंही ते दुःख सुरेल होतं याचंच हे प्रतीक, म्हणजे बासरी. 


वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् ।

चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझं बोलणं मधुर आहे, तुझं चरीत्र मधुर आहे, तुझे अलंकार मधुर आहेत, तुझं बाकदार शरीर मधुर आहे, तुझं चालणं मधुर आहे, तुझं गोंधळवून टाकणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

श्रीकृष्णाच्या बोलण्यातील एक नटखट आणि राजकारणी गुण म्हणजे दुसऱ्याला गोंधळात टाकणे. स्वतःच अवतारी पुरुष असल्याने सर्वज्ञानी असलेला हा नारायण स्त्रियांना गोंधळात टाकून ते सौन्दर्य टिपत असे आणि पुरुषांना गोंधळात टाकून राजकारण खेळत असे. असा हा कावेबाजपणा कधी मादक तर कधी घातक ठरे. रंगिणी, नवमाळी, सुमाली, चमेली, जाई इत्यादी फुलांनी सजलेला मुकुट, वैजयंती नामक रानफुलांची माला (जी राधेनं त्याला स्त्रीरूप दाखवताना पहिल्या प्रणयाराधनाआधी दिली होती), बलापास्य नामक गजरा, ताडांक नामक भिकबाळी, कमल, भृंग आणि डाळिंबाच्या फुलांनी सजलेल्या कर्णिका, पुष्पी नावाचे डूल, ग्रेवेक्यक नामक छोटी फुलांची माला, अंगद नामक वाकी, मणिबंधीनी नावाचं कंकण, सिंधूवर फुलांनी सजलेला माथा, शिवाय हंसक, कंचुली इत्यादी अलंकारांनी नटलेला हा कामदेव रुपी नर खरोखर अपूर्व सुंदर होता. 

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझी वेणू मधुर आहे, तुझ्या शरीरावरील परागयुक्त फुले मधुर आहेत, तुझे नटलेले हात मधुर आहेत, तुझे पाय मधुर आहेत, तुझं नृत्य मधुर आहे, तुझं सख्य मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

वाजवायला कठीण असलेली मदनझंकृती नामक बासरी ही खरे तर या बन्सीधराची ओळख. याच बासरीने प्राणिमात्रांनाही मोहविले. पण 'वेणू'तून निघालेले सूर काही आगळेच. त्यात नुसती मधुरता नाही तर मादकपणा होता. अगदी लीलया आलेला हा सौन्दर्याविष्कार रासलीला रचवून जायचा. खरे तर त्याच्या अंगावर सांडलेल्या परागकणांची तुलना स्त्री स्तनाग्रांभोवती असलेल्या उठावदार पण नाजूक लालसर माळेशी केली गेली आहे. त्या बिंदूंची आठवण करून देणारे ते परागकण कोणत्याही स्त्रीला प्रणयच नव्हे तर बाळाच्या लुचण्याचीही आठवण देत असत. एक प्रेयसी आणि अनंतकाळची माता या दोन्हीही पर्वातील मधुर क्षणांचंच ते प्रतीक. पण कृष्णानं सगळ्या गोपीना जणू अनंतकाळची प्रेयसी म्हणूनच थोपवून धरलं होतं जणू . नखशिखांत मादकतेने भरलेला हा लीलाधर एक सखा म्हणूनही परीपूर्ण असाच होता. द्रौपदी पासून सुदामा पर्यंत साऱ्यांनी हे सुख पुरेपूर अनुभवलं. पण मधुवासी ब्रिजबलांना मिळालेला सखा काही औरच होता.

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझं गाणं मधुर आहे, तुझं पिणं मधुर आहे, तुझं खाणं मधुर आहे, तुझं झोपणं मधुर आहे, तुझं रूप मधुर आहे, तुझा टिळा मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
 
विश्वरूप दर्शन देणारा हा असामान्य योद्धा खऱ्या नावाप्रमाणेच आकर्षण होता. देवकी मातेचं सारं सौन्दर्य आणि वसुदेवांचं राजसौष्ठव एकवटलेला हा देवकी पुत्र अत्यंत देखणा आणि श्यामरंगी होता. द्रविडी सौन्दर्याची खूण असलेला श्याम रंग खरे तर आपण कृष्ण म्हणून चुकीच्या पद्धतीने घेतो. कृष्ण या शब्दाचा खरा अर्थ आहे कृषी + ण शेतीचा देव. ज्या अन्नावर आपण जगतो त्या अन्नाचा पालक आणि पर्यायानं पालक विष्णू. खरे तर विष्णू म्हणजे विश्यति प्रविष्यति इति विष्णू = जो हवे तिथे प्रवेश करू शकतो असा तो विष्णू. अन्नकणांतही प्रवेश करून जीवन देणारा असा तो कृष्ण. पण कृष्ण म्हणजे काळा हे चुकीचं समीकरण ह्या दैवताच्या रंगामुळे झाले आहे. माधुर्य काळ्या रंगातही असतं असं गोऱ्या रंगाच्या आधीन गेलेल्या आर्यवंशी जनमानसाला हा एक धडा असावा. रंगावर प्रेम करून जात, वय, कौमार्य यावर प्रेम वा विवाह ठरवणाऱ्या तमाम समाजाला कृष्णानं एक आदर्श घालून दिला आहे. विवाहित राधा आणि गांधर्व पद्धतीनं विवाह झालेली वैदर्भीय राजकन्या रुक्मिणी ह्या दोन उदाहरणातून कृष्णाचं स्वच्छंदी प्रेमच दिसून येतं. 

करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।

वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझी कृत्य मधुर आहेत, तुझं तारणं मधुर आहे, तुझं हरण करणं मधुर आहे, तुझं प्रणयमिलन मधुर आहे, तुझं भावना दर्शविणं मधुर आहे, तुझं शांत होणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस. 

वैदर्भीय राजकन्या रुक्मिणी हिचं केलेलं हरण कोण विसरेल? त्या सुरेख प्रसंगात प्रेमी जीवांना दिलेला एकरूप होण्याचा अधिकार आणि पुरुषाचं पौरुषत्व याचं दर्शन होतं. 'पु' या बीजाचा अर्थच अनंत काळ टिकणारा असा आहे. पुरुष हा पौरुषाचं म्हणजेच अनंतकाळच्या पालकत्वाचं प्रतीक आहे. या ताकदीचं दर्शन घडवून देणारा हा वासुदेव परीपूर्ण पुरुष आहे. स्त्रीच्या भावना जपणारा आणि तिला आंतरिक समाधान देणारा असा हा पुरुष आहे. भावना दर्शविताना कुठेही न संकोचणारा धीट असा हा पुरुष प्रियकर रुक्मिणीचं हरण करताना रुक्मि ला घायाळही करतो. कुठेही पौरुषत्व न लपवता रक्तपातही करणारा, कालिया मर्दन करणारा, कंसवध करणारा हा योद्धा महाभारताच्या युद्धावेळी एक सारथी होतो. ही सगळीच मधुर रूपं मोहक आहेत. रतिक्रीडेवेळी उत्कट होणारा हा मिलिंद त्यानंतरही घायाळ करणारं मादक हास्य करतो आणि मन आणि शरीर शांत करतो. ह्या अनेक रुपातला भाव मधुर असाच आहे. 

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।

सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझा प्रणयाराधनेच्या वेळचा गुंजारव मधुर आहे, तुझी वैजयंती माला मधुर आहे, तू ज्या नदीकाठी बसतोस ती यमुना मधुर आहे, त्या यमुनेच्या लाटा मधुर आहेत, त्या यमुनेचं पाणी मधुर आहे, तुझं अलंकारातलं कमळ मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

श्रीकृष्णाचा प्रणय काळातील गुंजारव बासरी सारखा मधुर असे. त्या वैजयंती फुलांची माळही त्या वेळी सुंदर दिसे. या रानटी फुलांची औषधी शक्ती अशी आहे कि ती फुले हळदी प्रमाणे जिवाणू मारू शकतात. ही फुले स्वतःच नैसर्गिकरीत्या लवकर खराब होत नाहीत. त्यातील औषधी गुणांमुळे ती रोगापासून स्वतःला दूर ठेवतात तसेच त्यापासून दारुही बनवली जाते. अशा ह्या औषधी आणि वारुणीसुगंध युक्त फुलांचा प्रभाव प्रणयकालात न पडला तरच नवल. रोगमुक्त शरीर आणि वारुणीचा आभास असे दोन्ही गुण प्रणयकालात उपयुक्त असेच होते. यमुनेप्रमाणे अथांग प्रेम, आणि प्रणय काळातील शरीराची लाटांसारखी हालचाल, शरीरावर जमलेले घर्मबिंदू जणू यमुनेच्या जलाप्रमाणेच पवित्र प्रेमाचे प्रतीक आणि नाजूक पण उठावदार शरीर अवयवांचं प्रतीक असलेलं कमळ. मूर्तिमंत प्रेमाचं प्रतीक असलेला हा बन्सीधर मधुर असाच आहे. 

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।

दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझ्या गोपी मधुर आहेत, तुझ्या लीला मधुर आहेत, तुझं एकरूप होणं मधुर आहे, तुझं मुक्त करणं मधुर आहे, तुझं रोखून बघणं मधुर आहे, तुझं शिष्टाचारानं वागणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

जवळपास सर्व गोपी ह्या विवाहित होत्या. पण त्यांचा सखा मात्र कृष्णच होता. उत्कटतेनं एकरूप होऊन तेव्हढ्याच कोमलतेनं स्त्रीला दूर करणं ही कला ह्या नटवाराला छान जमली. इतक्या स्त्रियांशी शारीरिक जवळीक करूनही कुठेही शिष्टाचार न सोडणारा हा सभ्य प्रियकर स्त्रियांचा अत्यंत लाडका होता. स्त्रीचं शरीर हा तिचा खरा अहंकार असतो. स्वतःहून शरीर समर्पण करताना स्त्री फुलते पण बळजबरीनं ती कोमेजते. म्हणूनच कायम बहरलेली वैजयंती माला ह्या स्त्री मनाचंच एक प्रतीक आहे. कोणत्याही गोपीचं मन न दुखावता आकर्षून घेणारा हा कामरूपी मुकुंद स्त्रीला फुलासारखं जपायचा. आजही अशा प्रियकरांचं वर्णन कृष्ण म्हणूनच केलं जातं. प्रत्येक गोष्टीत सौन्दर्य आणि शिष्टाचार यांचा समतोल साधणारा हा मनुष्यरूपी कामदेव कोणत्याही स्त्रीला आदर्शच वाटेल. खरे तर श्रीविष्णू यांचं शेषशायी हे रूपही असंच. लक्ष्मीला प्रणय हवा असताना कुणी पाहू नये यासाठी स्त्री सुलभ लज्जेनं केलेली एकांताची मागणी शेषनागरूपी पडद्यानं विष्णूंनी पूर्ण केली. स्त्रीभावना जपण्याचं हे आणखी एक उदाहरण. अगदी निरागस भाव असणाऱ्या गायींनाही आकर्षून घेण्याची क्षमता असणारा हा संगीत प्रभू स्त्री संगात कसा कमी ठरेल?

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।

दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझे गोप मधुर आहेत, तुझ्या गायी मधुर आहेत, तुझा गोप परीवार मधुर आहे, तुझी निर्मिती मधुर आहे, तुझं पायदळी तुडवणं मधुर आहे, तुझ्या भक्तीचं फलित मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

गोविंद म्हणजेच गो = सृष्टी विंद = आनंद देणारा साऱ्या सृष्टीला आनंद देणारा असा हा गोविंद. खरे तर गोविंद याचं खरं रूप गोमांस आहे. चुकीच्या रीतीनं गायीचं मांस असा अर्थ निघतो. पण गोमांस (गो = सृष्टी माम् = मला स = परम ईश्वर) म्हणजे  जो चराचरात आहे आणि मला परम ईश्वराकडे घेऊन जातो तो गोमांस. सर्व वर्ण वरोत्तम 'ह' ने सुरु होणारे 'हरी' हेही याच रूपाचं नाव. र म्हणजे शरीरातील ईश्वरी शक्ती. ई कार म्हणजे श्वास घेण्याची शक्ती. 'हरती अविद्यम् इति हरी' जेव्हा जीवशक्ती नष्ट होते तेव्हा आत्म्याचं रूप 'हरी' होतं, ईश्वराशी एकरूप होतं. ज्याच्या हातून मृत्यू आल्यास मुक्ती मिळते असा तो. गाय हे अशा निःस्वार्थी प्रेमाचं निरागस प्रतीक. त्या गायीला आणि तिला सांभाळणाऱ्या गोपांना पालक म्हणून सांभाळणारा हा हरी. लाहिरी महाशय यांच्या नुसार कृष = वाढवणे न = नकार जे शेतीची गोपालनाची कामे करतात ते गोप त्यांना पाळणारा (कृष) तो गोपांच्या कर्माला नकार देऊन त्यांच्यातल्या ईश्वरी प्राण शक्तीचे अस्तित्व दाखवतो तो कृष्ण. सर्वच चराचर सृष्टीचं असं पालन करणारा हा कृष्ण मधुरच आहे. अध्यात्मात अनेक रीतीने पुजला गेलेला विष्णू भौतिक जगात कृष्ण म्हणूनच लोकप्रिय आहे. अशा ह्या लोकप्रिय दैवताची ही भक्ती पुष्टिमार्गाने केल्यास अद्वैतवाद साधता येईल या मताने श्री वल्लभ आचार्य यांनी या रचनेला आकार दिला. प्रेम आणि अध्यात्म यांचा हा मिलाफ पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. शिवाय माझं नाव मधुरा या श्रीकृष्ण स्तुती मध्ये इतक्यावेळा यावं यापेक्षा मोठं भाग्य ते काय असेल ? 

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
   =============================================

The Author of Shudhadvaita Shri Vallabh Acharya created this composition to worship Lord Shri Krishna, by Pushtimarga. Along with this the composition describes Shri Krishna with sweetness along with Bhaktimarga - The path to God is through love. This apprehension of Shri Krishna is completely woven in Madhu rasa (sweet emotions), which not only limns his sweetness but also his equivocal forms. Surprisingly it mentions the 'Venu' bansuri (flute) which was the most favourite of Shri Krishna amongst his six favourite bansuris. The bansuri 'Mahananda' which was gifted to Shri Krishna by Radha was best-loved by him. But, the bansuri 'Venu' was so dear to him, that even Radha had started being jealous of it. In ancient times Indian culture considered 3 basic pillars of Worship by Music. Atma - Veena - Venu, almost considered as Trinity of music. One of the Trinity and enemy of the Gopis, 'Venu' was lucky to drink the nectar of Shri Krishna's lips. Shri Vallabh Acharya described this Lord of sweetness so charmingly that it shows the path of pure love to the disciples for Bhaktimarga.  

Bramhasamhita also describes Shri Krishna in a very ornamental way saying " I worship the Supreme Lord Govind who evinces his skill of playing Venu, whose eyes are like Lotus petal, whose forehead is covered with peacock feather and looks like muffled up in blue clouds and whose body is more beautiful than Kamadeva". Shri Krishna, the creator of many variations of Kamashastra and Kamarasa, was not only a prodigy in sex but he was a real man who was able to satisfy a woman in true sense. This son of Nanda was not only attractive but was also righteous and powerful. Emotionally every Gopi was in love with him. He was a plenipotentiary master in any relationship. This almighty Lord (Yugandhar) truly attained the position of 'Vasudeva'. 'Vasudeva' is not merely the son of Vasudev but Shri, completeness, perfection, being ideal is 'Vasudeva'. Well, Lord Krishna himself has put his efforts to attain this position. He didn't get this title easily. To worship and praise this Leeladhar, Shri Vallabh Acharya chose the Madhur or sweet form (rupa) of Shri Krishna. A very sweet and dewy eyed but dark skinned milkman (Gawli) did impossible things in his life so smoothly. 

I am trying to comprehend this (sweet) praising of Shri Krishna:

adharaṃ madhuraṃ vadanaṃ madhuraṃ
nayanaṃ madhuraṃ hasitaṃ madhuram। 
hṛdayaṃ madhuraṃ gamanaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

 O Krishna, your lips are sweet, your cherubic face is sweet, your mesmerizing eyes are sweet and your laughter is sweet। Your loving heart is sweet and your enchanting gait is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness ॥
  
When Shri Krishna asked the bamboo tree " I entice the Gopis, other animals and birds, so what are you going to offer me?" The bamboo answered "Take whatever you want". Shri Krishna asked for his life and he did not hesitate. Krishna cut his body, made eight holes to it and the bamboo was agonized. After this examination Krishna made a beautiful flute out of the body of the bamboo tree, called Bansuri emanating hypnotizing tunes and he kept the flute always with him. Even if the death is near the sorrow becomes sweet due to mere whiff of Shri Krishna is the symbolic form of the Bansuri.  

vachanaṃ madhuraṃ charitaṃ madhuraṃ
vasanaṃ madhuraṃ valitaṃ madhuraṃ। 
chalitaṃ madhuraṃ bhramitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥      

O Krishna, your speech is sweet, your nature is sweet, your garments are sweet and your bent posture is sweet। Your movement is sweet and your creation of confusion is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥    

To bemuse anyone was a naughty but in a sense political efficacy of Lord Krishna. Being the incarnation of Lord Vishnu himself, the omniscient Narayana used to confuse the women around him to observe that innocent beauty and confuse the men for political purpose. This guile sometimes was intoxicating but sometimes proved to be ruinous. With the crown decorated with beautiful flowers like rangini, navamali, sumaali, chameli and jaai, gorgeous Vaijayanti Mala made from different wildflowers (offered to him by Radha during the courtship), balapaasya flower ornament, a upper earring called tadaank, earrings made from lotus, bhrunga and pomegranate, small earrings made of pushpi, small flower garland called grevekyak, upper hand ornament angada, manibandhini bracelet, forehead adorned with sindhuvar flowers and other ornaments like hansaka and kanchuli this manly beauty like Kamadeva was absolutely ecstatic and irresistible.  

veṇu-rmadhuro reṇu-rmadhuraḥ
pāṇi-rmadhuraḥ pādau madhurau। 
nṛtyaṃ madhuraṃ sakhyaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥

O Krishna, your flute 'Venu' is sweet, your flowers (with pollen) are sweet, your hands are sweet and the dust of your feet is sweet। Your dance is sweet and your friendship is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥   

'Madanajhankruti' a bansuri very difficult to play is in fact the real identity of Bansidhara - Shri Krishna. This bansuri hypnotized the animals too. But the tunes emerging from Venu bansuri were out of this world. The were not only sweet but were intoxicating. This deftly and graceful piece of art gave rhythm to Rasleela. In the poetrical sense the pollen grains scattered on Krishna's body were equated to the salient but dainty red garland around the nipples of a woman. These pollen grains not only jogged the memories of women about romance but also the feeding of the baby. It was a symbol of the golden moments in women's life both as a lover and as a mother. A woman is said to be in undying motherhood once she conceives a baby, but Shri Krishna stymied them to be undying lovers. A cap-a-pie cupid - Leeladhara was a faultless 'sakha' or lover of the Gopis. His divine friendship was deeply experienced by everyone from Draupadi to Sudama. But, being the 'sakha' of the Gopis of Brijabhumi was a totally angelic role played by Shri Krishna.     

gītaṃ madhuraṃ pītaṃ madhuraṃ
bhuktaṃ madhuraṃ suptaṃ madhuraṃ। 
rūpaṃ madhuraṃ tilakaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

O Krishna, your singing is sweet, your drinking is sweet, your eating is sweet and your sleeping is sweet। Your form is sweet and your mark (tilak) on the forehead is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥

This extraordinary warrior revealing his cosmic form was truly attractive as his real name Akarshan means. Inheriting his mother Devaki's beauty and his farther Vasudeva's handsomeness Shri Krishna was very princely looking with a dark complexion. A mark of the Dravidian beauty i.e. dark skin is absolutely misinterpreted by us as krishna (colour). In practicality krishna means krushi +N (the God of farming) The God of food on which we survive, the operator, none other than Lord Vishnu. Vishnu literally means 'vishyati pravishyati iti' (one who can enter anywhere). By entering in food particles he offers us life.But, Krishna is dark coloured is a very wrong interpretation, which was linked to the skin colour of this incarnation of Lord Vishnu. Perhaps this was a lesson to the white supremacist people and let them realize that beauty lies in any colour. Shri Krishna has indirectly taught a lesson to such people whose criteria for love depends on skin colour, age, race / caste. Krishna's pure lovemaking with already married Radha and eloping with princess of Vidarbha, Rukmini shows his boundary-less love. 
        
karaṇaṃ madhuraṃ taraṇaṃ madhuraṃ
haraṇaṃ madhuraṃ smaraṇaṃ madhuraṃ। 
vamitaṃ madhuraṃ śamitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥   

O Krishna, your acts are sweet, your carrying over is sweet, your stealing is sweet and your divine love play is sweet।Your exuberance is sweet and your relaxation is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
  
Who can forget the eloping of Shri Krishna with the princess of Vidarbha, Rukmini? The episode depicts the right of the lovers to come together and manhood of the real 'man' (Purusha). The root or beej 'pu' itself means infinitely existing. A purusha is a symbol of manhood or infinite guardian (of a female). 'Vasudeva' the form of Shri Krishna depicts this power of a complete man. This form satisfies a woman in every sense and pampers her emotions. This brave and bold lover who never hesitates to express his emotions also hurt Rukmi, the brother of Rukmini without any prejudice. With no hesitation to express his courage this brave lover never fears for bloodshed, goes on to kill the Kaliya Naga, kills his maternal uncle Kansa and becomes a charioteer in the war of Mahabharata. All these forms of his are alluring. At the time of lovemaking this Milinda becomes passionate, gives an intoxicant smile and is able to satisfy a woman's body and mind. All these forms of Shri Krishna are sweet, absolutely sweet...

guñjā madhurā mālā madhurā
yamunā madhurā vīchī madhurā।   
salilaṃ madhuraṃ kamalaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥

O Krishna, your humming is sweet, your garland is sweet, the Yamuna river is sweet and her rippling waves are sweet। The water (of Yamuna) is sweet and the lotus flowers floating in the river are sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥ 

The humming of Krishna while lovemaking was sweet as a flute. The garland of Vaijayanti mala looked very elegant at that time. The flowers used in the Vaijayanti mala are medicinal like turmeric and can kill infectious bacteria. These flowers don't get spoiled easily. Due to the medicinal properties not only these flowers remain fresh but some good quality liquor is prepared using these flowers. No wonder these medicinal but intoxicating flowers affect the mood while lovemaking. A healthy body and intoxicating smell of these flowers both were effective during lovemaking. Unfathomable love like the deep Yamuna river, wavy movements of the body during lovemaking, the sweat droplets impersonating pure water of Yamuna and lotus flowers mimicking the curves of the body.. Bansidhara, the absolute symbol of love is very sweet.

gopī madhurā līlā madhurā
yuktaṃ madhuraṃ muktaṃ madhuraṃ। 
dṛśhṭaṃ madhuraṃ śiśhṭaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

O Krishna, your Gopis (cowherd girls) are sweet, your divine play is sweet, your togetherness is sweet and your setting free is sweet। Your glance is sweet and your courtesy is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥ 

Almost all the Gopis in Brijabhumi were married, though their true love was Shri Krishna. This Natavar was the master of passionate love and a delicate separation. While close to so many women, he never forgot his etiquette and this was the reason this Natavar was so popular among them. A woman's body is her real pride. A woman blossoms if she willingly participates in lovemaking but she withers under force. So the never withering freshness of the Vaijayanti mala was the symbol of a woman's mind when Krishna was around. This cupid like Mukund would attract every Gopi without hurting her mind. Even today such lovers are called 'Krishna'. Like a  Kamadeva in human incarnation Krishna would be the ideal lover for any woman, who maintained a perfect balance between beauty and courtesy. Sheshashayi Bhagwan (reclining on the serpent-bed of Shesha) - the form of Lord Vishnu also depicts the same balance. When Shri Laxmi urged for lovemaking she demanded privacy to avoid embarrassment. Shri Vishnu fulfilled her wish by using Shesha Naga as a veil. This is another example of taking care of a woman's dainty emotions. How this perfect lover and the master of music, who attracted the innocent cows too, would fail to satisfy the desires of women?

gopā madhurā gāvo madhurā
yaśhṭi rmadhurā sṛśhṭi rmadhurā।   
dalitaṃ madhuraṃ phalitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

O Krishna, your Gopas (cowherd boys) are sweet, your cows are sweet, your herding staff is sweet and your creation is sweet। Your breaking is sweet and your making is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥ 

Govind is derived as go (nature) +vinda (happiness) i.e. the one which gives happiness to the world. Metaphorically real form of Govinda is Gomansa. Though it is mostly misinterpreted as beef. But, Gomansa is go (nature) + mam (to me) + sa (almighty Lord) which means the one who drives me to the almighty Lord and exists in every particle of nature. 'Hari' is another form of this name which includes the most exalted Varna 'ha'. 'ra' is the divine power in the body and 'i' is the power to breath. It is derived from 'harati avidyam iti Hari' which means when the mortal power of Jeeva perishes then the soul becomes 'Hari' and unites with the almighty Lord. So 'Hari' is a form of the Lord which will bless you with salvation if you die at his hands. Cow is a very innocent form of such selfless love. The guardian of the cows and the cow herds is Hari. According to Lahiri Mahashay Krishna is derived from Krish (nurture) + na (No) which means the one who denies the (negative) results of Karmas of the cowherds and shows his powerful existence to save them is Krishna. Krishna, the powerful guardian of the nature is really sweet. Though in spiritual world, Lord Vishnu is worshiped in various ways, but in mundane life his incarnation of Krishna is the most popular one. Shri Vallabh Acharya created this beautiful Madhurashtaka claiming that if this popular deity is worshiped through Pushtimarga then it will help to attain Advaitvada, spiritual realization. We are no doubt tempted to read this conciliation of love and spirituality again and again. 

Well, my name Madhura has been mentioned in every line of this beautiful creation praising Lord Krishna. What will be more prosperous than this?

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
       ==========================================

Sunday, 5 January 2020

अंतराळातील अंत (In - space fatalities) 


मृत्यू हे आपल्या सर्वांच्याच आयुष्यातलं अंतिम सत्य असतं. मृत्यूची विविध कारणं आणि जागा असू शकतात जे कोणाच्याही हाती नाही. आपल्याला माहित असलेले मृत्यू हे ठराविक कारणांनी आणि पृथ्वीवरच काही जागी, पाण्याच्या खाली असे झालेले असतात. पण आज एका वेगळ्या जागी होणाऱ्या मृत्युंबद्दल अभ्यास करून काही लिखाण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. 

अंतराळवीर संशोधनासाठी अंतराळात जातात तेव्हा ते धाडसीपणानं मृत्यूची चादर ओढूनच सर्व संकटांची कल्पना असतानाही प्रवास करत असतात. माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत अशा केवळ १८ अंतराळवीरांचा मृत्यू अवकाशात झाला आहे. त्याबद्दल ज्योतिष शास्त्रात पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण ज्योतिष शास्त्रानुसार असे कोणते योग कुंडलीत असावेत ज्यामुळे मृत्यू अवकाशात होतो? ह्याबद्दलचे माझे विचार मी इथे मांडत आहे.  

काही अंतराळवीरांच्या कुंडल्या आणि त्यांचा अवकाशात जेव्हा मृत्यू झाला तेव्हाची ग्रहस्थिती अभ्यासल्यानंतर मला ज्योतिष शास्त्रानुसार जे मुद्दे लिहावेसे वाटले ते मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

अवकाशातील मृत्यू हा थोडा वेगळा वाटला तरीही तो अपघाती मृत्यू याच सदरात येतो. कारण अवकाशयानामधील विविध तांत्रिक बिघाडांमुळे असे मृत्यू ओढवतात. आता हे बिघाड कोणते आणि याचे कोणते परीणाम झाले याचा आढावा घेऊ. 

१) २४ एप्रिल १९६७ रोजी व्लादिमिर कोमारोव्ह हे रशियाचे अंतराळवीर सोयझ १ या अवकाशयानातून जात असताना पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर अवकाशयानाचं पॅराशूट वेळीच न उघडल्यामुळे त्यांचं यान अत्यंत तीव्र गतीनं पृथ्वीवर आदळलं. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.       
                                        कोमारोव्ह यांचे अवशेष

२) ३० जून १९७१ रोजी सोयझ ११ मधील ३ अंतराळवीर जॉर्जी डेब्रोव्हस्की, व्हिक्टर पॅत्साएव्ह, व्लादिस्लाव्ह वोल्कोव्ह हे मृत अवस्थेत सापडले. प्रथमदर्शनी कोणताही जीवघेणा अपघात निदर्शनास आला नसला तरी संशोधनानंतर त्या अपघाताचं कारण समजलं. वायुविजनासाठी असलेली झडप व्यवस्थित काम करत नसल्यानं पृथ्वीच्या कक्षात आल्यानंतर त्या तिघांचा गुदमरण्यामुळे (प्राणवायू कमी पडल्यानं) मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर निळे डाग आणि कानातून व नाकातून रक्त आल्याचं दिसत होतं. जॉर्जी डेब्रोव्हस्की यांचं शरीर सापडलं तेव्हा थंड पडलेलं नव्हतं, म्हणजे हे मृत्यू पृथ्वीवर यायच्या आधी थोडा काळच झाले असावेत. 

३) २८ जानेवारी १९८६ रोजी चॅलेंजर या अंतराळयानाचा उड्डाणानंतर ७३ सेकंदांनीच अवघ्या ४९००० फुटांवर (१५ कि. मी.) स्फोट झाला. त्यातील ग्रेगरी जर्व्हिस, क्रिस्टा मॅकॉलिफ, रॉनल्ड मॅकनायर, एलिसन ओनीझुका, ज्युडिथ रेसनिक, मायकल स्मिथ आणि डिक स्कोबी या सर्व ७ वीरांचा मृत्यू झाला. त्यातील बरेचसे अंतराळवीर हे प्राणवायू न मिळाल्यामुळे गुदमरून मरण पावले असावेत अशी शंका आहे. काहींनी प्राणवायूसाठी असलेली आपात्कालीन व्यवस्था वापरण्याचा प्रयत्न केलाही. पण त्यांच्या यानाचा पृथ्वीवर आपटण्याचा वेग इतका प्रचंड होता (३२० किमी / तास) की त्या धक्क्यानंच ते मरण पावले. हे यान समुद्रात आदळलं, त्यामुळे सर्व लोकांचे अवशेष मात्र हस्तगत करता आले नाहीत.

४) १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया या अंतराळयानातून परत येत असताना त्यातील कल्पना चावला, रिक हसबंड, विल्यम मकूल, मायकल अँडरसन, डेविड ब्राउन, लॉरेल क्लार्क आणि इयान रॅमॉन या सर्व ७ अंतराळवीरांचा मृत्यू झाला. पृथ्वीच्या कक्षात आल्यावर या यानाच्या अग्निच्या नियंत्रणात बिघाड झाल्यानं तापमान प्रमाणाबाहेर वाढून यान फुटलं आणि त्याचे तुकडे विखुरले गेले. यात या वीरांचा जळून मृत्यू झाला. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या यानातील बिघाड यानाच्या उड्डाणाच्या वेळीच लक्षात आला होता पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. 

                                               कल्पना चावला

(वरील माहिती इतक्या सखोलपणे देण्याचं कारण इतकंच की सर्व अंतराळवीरांची नावं वाचकांना कळावीत. भारतीय वंशाच्या कल्पना चावला सोडल्या तर इतर अंतराळवीरांची नावं आपल्याला ठाऊक नाहीत. म्हणूनच त्यांना एक प्रकारची मानवंदना देण्यासाठी मी आदरयुक्त भावनेनं सर्व अंतराळवीरांची नावं आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखा दिल्या आहेत.)                                       

वरील सर्व माहितीचा ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता यानाच्या उड्डाणाची वेळ अतिशय महत्त्वाची आहे. पृथ्वीवरील प्रवासासाठी आपण जे निकष लावतो त्याचा इथे फारसा उपयोग होणार नाही. पण यानाच्या उड्डाणाच्या वेळची कुंडली पाहिली तर त्यातील द्रेष्काण कुंडली अति महत्त्वाची ठरेल. प्रत्येक राशीचे ३ असे ३६ द्रेष्काण आणि त्यांची ३६ रूपं आहेत. कोणत्याही प्रवासाच्या वेळी शुभ द्रेष्काण उदित असेल तर प्रवास सुखरूप होऊन विजय मिळतो. पण अशुभ द्रेष्काणात मृत्यू किंवा इतर वाईट फळं मिळू शकतात. वरील नमूद केलेल्या चारही अंतराळ यानांच्या उड्डाणाच्या वेळा लक्षात घेता द्रेष्काण कुंडली मांडल्यावर काही मुद्दे लक्षात आले. प्रत्येक यानाच्या उड्डाणाच्या वेळी द्रेष्काण कुंडलीत अष्टम स्थान, अष्टमेश किंवा चंद्र बिघडलेले होते. सोयझ १, चॅलेंजर या दोन्ही यानांच्या उड्डाणाच्या वेळी अशुभ द्रेष्काण उदित होतंच. पण अष्टम स्थानाशी असलेला शनिचा संबंध घातक ठरला. सोयझ ११ च्या उड्डाणाच्या वेळी द्रेष्काण कुंडलीत अष्टमातील बुध आणि शनि, व्ययस्थानातील मंगळ आणि राहू अत्यंत घातक ठरले. कोलंबिया यानाच्या उड्डाणाच्या वेळीही कोणतेही शुभ योग द्रेष्काण कुंडलीत नसून चंद्र अत्यंत अशुभ होता. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना जे योग असतील तेच योग कार्य पूर्ण करण्यास मदत करतात, कारण त्यांची वाईट फळं एकदा प्रवास सुरु झाला की टाळता येत नाहीत. 

अंतराळ प्रवासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या यानाने प्रवास करायचा आहे त्या यानाची बनावट कोणत्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते ते पाहणं. गुरू शुक्र हे दोनही ग्रह विमान, अंतराळयान यांच्या बनावटीच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. मंगळ आणि शनि हे यंत्राचे कारक ग्रह आणि शारीरिक दृष्टीनं विचार करता रक्त, हाडं यांचे कारक ग्रह आहेत. वरील यानांचे अपघात पाहता यान पृथ्वीवर तीव्र वेगाने आदळल्यामुळे काही मृत्यू झालेले आहेत. तर काही मृत्यू रक्तातील प्राणवायू कमी झाल्यानं गुदमरून झालेले आहेत. मंगळ व शनिची तीव्र वाईट फळं इथे पाहायला मिळतात. अशुद्ध रक्तप्रवाह आणि त्यामुळे हृदयावर होणार परीणाम हा खूप घातक ठरला आहे. तरीही जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येनं अंतराळवीर प्रवास करत असतील तर नक्की किती जणांचा मृत्यू होईल हे सांगणंही शक्य वाटत नाही. संपूर्ण यानाचा विध्वंस झाला तर सर्वच व्यक्तींचा मृत्यू होईल, त्यामुळे गुरू, शनि आणि शुक्र या प्रमुख ग्रहांचा कुयोग असेल तर यानाचा अपघात हे भाकीत करता येईल.        

अंतराळवीरांच्या कुंडलीतील नवम स्थान खूप महत्त्वाचं स्थान असतं. कारण ह्या स्थानाशी निगडित मृत्यू हा दूरवर झालेला असतो. आता ह्या सर्वांचा मृत्यू दूरवर म्हणजे अगदी काही वेळा पृथ्वीच्या कक्षेबाहेरही झालेला आढळतो. याचं कारण म्हणजे यांच्या कुंडलीतील नवमस्थानाचा अष्टमेशाशी कुयोग. असा योग असल्यानं अगदी सर्वांचा प्रत्यक्ष मृत्यू अवकाशात झाला नसला तरी त्याचं मूळ कारण म्हणजे यानातील बिघाडाची सुरुवात तेथूनच झालेली दिसते. त्याची पूर्णता पृथ्वीच्या कक्षात झाली आहे असं निदर्शनास येतं. म्हणजेच या सर्वांचा मृत्यू अप्रत्यक्षरीत्या का होईना अंतराळातच झाला. नवमस्थानाशी संबंधित हर्षल आणि प्लूटो हेही एक महत्त्वाचं कारण दिसून येतं. अत्यंत अप्रत्याशित फळं देणारे हे ग्रह जेव्हा नवमस्थानाशी कुयोग करतात तेव्हा असे विचित्र मृत्यू येऊ शकतात. याशिवाय राहू आणि केतू यांनी बनलेला कालसर्पयोग जेव्हा नवम आणि तृतीय स्थानातून होतो तेव्हाही असे योग दिसून येतात. 

अंतराळवीरांच्या कुंडलीतील दशम स्थान हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. दशमस्थान हे कर्म स्थान आहे. अंतराळवीरांचा मृत्यू जेव्हा कामाच्या ठिकाणी म्हणजे कर्म करताना होतो तेव्हा दशमस्थानाशी किंवा दशमेशाशी त्याचा संबंध येतो. उदा: कल्पना चावला यांच्या कुंडलीत दशमेश नवमस्थानी आहे. म्हणजेच कार्यरत असताना त्यांचा मृत्यू दूरवर झाला होता हे सिद्ध होतं. हाच मुद्दा आणखी समजून घेण्यासाठी अभ्यासक संशोधक स्टिव्ह आयर्विन यांच्या कुंडलीचा विचार केला तर त्यांच्या कुंडलीत दशमस्थानी चंद्र आहे जो पाण्याचा कारक आहे. दशमेश बुध मंगळ,केतू आणि शनिने युक्त असा द्वितीयस्थानी आहे. बुधाची मृत्यूस्थानावर पूर्ण दृष्टी आहे. त्यामुळे जलचर प्राण्याच्या विषाचा त्यांच्या रक्तप्रवाह आणि हृदयावर परीणाम होऊन त्यांचा मृत्यू पाण्याखाली झाला. कार्यरत असतानाच त्यांचाही मृत्यू झाला ज्याचं कारण दशमस्थान व दशमेशाचे कुयोग हे होय. असो, केवळ अंतराळवीरच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीचा कर्मस्थानी मृत्यू झाल्यास दशमस्थान हे महत्त्वाचं स्थान ठरेल. 

आता मुख्य मुद्दा आहे तो मृत्यूच्या स्थानाचा. अंतराळवीरांचा विचार करायचा तर त्यांच्या अवकाशातील मृत्यूचं स्थान कोणताही ग्रह नसून अवकाशाची अनंत पोकळी हे आहे, ज्याला वस्तुतः 'स्थान'ही म्हणता येणार नाही. याचे कारक ग्रह कोणते असावेत याचाही मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते नवमस्थान जितकं महत्त्वाचं आहे तितकेच अवकाशाच्या कारक ग्रहांचे नवम स्थानाशी होणारे योग महत्त्वाचे आहेत. अवकाशातील मृत्यूमुळे अशीही एक शक्यता राहते की तिथे मरण पावलेल्यांचे मृतदेह हाती लागू शकणार नाहीत कारण ते अवकाशात विखुरले जाऊ शकतात. याचा विचार करता आकाश तत्वाचा ग्रह गुरू आणि वायू तत्वाचा ग्रह शनि हे ग्रह प्रथम विचारात घेतले जावेत. गुरू हा यानाच्या बनावटीसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो आकाश तत्त्वाचा ग्रह असल्यानं अवकाशातील अस्तित्व त्याच्याच अधिपत्याखाली येईल. वायूतत्त्वाचा शनि अवकाशातील वायू, त्यांचा वेग आणि त्यातील घटक यांचा कारक होईल. तसंच शनि हा परीक्षा पाहणारा ग्रह आहे. अनेकदा अंतराळवीरांच्या मृतदेहाची वाईट अवस्था होते त्यालाही तो कारणीभूत असणार हे उघड आहे. तसंच शनि हा रूपानं काळ्या रंगाचा मानला गेलेला ग्रह आहे. यातील प्रतीकवाद समजून घेतला तर अवकाशातील अनंत काळा रंग हाही शनिचंच कारकत्व असू शकेल असं माझं मत आहे. तसंच शनि हा ग्रह अथांग, किचकट, अतर्क्य गोष्टीही दर्शवतो. त्यामुळे जर कधी दुर्दैवानं यानाचे, पर्यायानं अंतराळवीरांचे अवशेषच मिळाले नाहीत तर अशा गूढ गोष्टीही शनि (क्वचित कारकत्वानं शनिसारखेच असलेले राहू आणि केतू) मुळेच घडतील. जिथे कोणत्याही 'स्थानाचा' पत्ता लागला नसेल अशा अथांग ठिकाणी झालेला मृत्यू शनि सारख्या गूढ ग्रहांमुळे घडू शकेल असं माझं मत आहे.         

रवि म्हणजेच सूर्य, ज्याच्याभोवती परीभ्रमण करून आपली ग्रहमालिका जिवंत आहे, तो या सगळ्याचा कर्ता आहे. सूर्याच्या भोवती असलेलं  गुरुत्वाकर्षण, तापमान, हवा या सर्व गोष्टींवरही अवकाश यानांचं भ्रमण अवलंबून असतं. त्याचं गणित पाहता अवकाशातील अपघात पाहायचे असतील तर सूर्याचं कारकत्व विसरून चालणार नाही. मात्र यात एक मुद्दा खासकरून सांगावासा वाटतो. आपल्या अवकाशयानांची झेप अजूनही आपल्या ग्रहमालिकेतील काही ग्रहांपर्यंतच आहे. त्यामुळे अवकाशातील मृत्यू हा भाग आपल्या सौरमंडळातील सूर्यावरच अजून अवलंबून आहे. जर यापुढील दूरवरच्या ग्रहांवर मनुष्य जाऊ शकला तर आपल्या आकाशगंगेतील इतर सूर्यांचा विचार करता येईल. आणि त्यावेळी हवामान, पोकळी, हवेचे घटक आणि यानाचा वेग या सर्वांचीच गणितं बदलतील. तात्पर्यानं सध्यातरी रवि, गुरू आणि शनि या प्रमुख ग्रहांवर आणि दशम, अष्टम व नवमस्थानाशी संबंधित ग्रह - योगांवर अवकाशातील मृत्यूचं गणित अवलंबून राहील. कोणताही विशिष्ट एकटा ग्रहयोग याचं कारण बनू शकत नाही. मुळातच अशा फार कमी कुंडल्या असल्यानं अनुभव आणि ज्ञानाच्या सहाय्यानंच याचं भाकीत करता येईल.    
जसं आपण कुंडली बनवताना आपलं अस्तित्व पृथ्वीवर आहे हे गृहीत धरून गणित करतो तसंच हेलिओसेंट्रिक ज्योतिष पद्धती नुसार सूर्य हा ग्रह मानून त्याच्यावर अस्तित्व ग्राह्य धरलं जातं. अवकाशातील घडामोडींचा विचार करता सूर्याला मध्यस्थानी धरून कुंडली व ग्रहांचे अंश मांडले जातात. सूर्याच्या तुलनेत इतर सर्व ग्रहांची मांडणी केल्यास अनेक खगोलीय घडामोडींची गणितं सोपी झालेली पाहायला मिळतात. ही पद्धत अजून थोडी नवीन असली तरी त्याचा गणित आणि खगोल शास्त्रात निश्चितच उपयोग होतो. माझ्या मते ह्या पद्धतीचा अवलंब करून गणित मांडल्यास अवकाशातील मृत्यूचं कारण आणखी चांगल्या पद्धतीनं समजावून घेता येईल. पण ही पद्धत पूर्णपणे वेगळ्या सिद्धांतावर बनलेली असल्यानं त्याचा विचार मी इथे केलेला नाही.                          

अंतराळवीरांच्या कुंडलीतील महादशा आणि अंतर्दशांचा इथे कितपत संबंध जोडता येईल याची मला शंका आहे. त्यांच्या कुंडल्यातील महादशा ह्या त्यांचे सामुदायिक/ वैयक्तिक मृत्यू दर्शवतील. पण त्यातील गूढता मात्र महादशांमधून समजणार नाही. कारण वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे आपल्या कुंडल्यांचं गणित पृथ्वीवरील मृत्यू बाबत प्रकाश टाकू शकतील. पण अंतराळातील मृत्यू आणि त्याचं नेमकं स्थान ह्यावर मात्र भाष्य करू शकत नाहीत. मात्र ह्यावरून मृत्यूची शक्यता वर्तवता येत असल्यानं यानाच्या उड्डाणाच्या आधीच याचा विचार करून वरील सर्व परीमाणांशी (विशेषतः चलित ग्रह आणि द्रेष्काण कुंडली) यांच्याशी त्याची जोडणी करता आली तर काही ठोस भाकीत करता येईल.

मी माझ्या अभ्यासामधून मला जे मुद्दे योग्य वाटले ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या विषयावर खूप कमी माहिती उपलब्ध आहे आणि आपलं विज्ञान अजूनही खूप पुढे जाऊ शकेल, यामुळे यातील मुद्दे काळानुसार बदलू शकतात ह्याची नोंद घ्यावी. 

मृत पावलेल्या सर्व अंतराळवीरांच्या धैर्याला माझा सलाम !!! 


© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
       =============================================

Death is the ultimate truth of our lives. Death can occur at any place due to any reason which is obviously not in our hands. The usual ways of passing we know are due to some imaginable reasons and importantly in the vicinity of the earth or below water etc. Today I am trying to delve into the deaths occurring at unusual places and write about it.  

When astronauts go into the space, they wear their suits like armor with bravery and valor, which is second to none. As far as I know, there are only 18 cases of space fatalities. In vedic astrology, not much information is available regarding these fatalities. So, which are some specific yog or planetary positions which can lead to such deaths? I am trying to put up my thoughts on this topic here.    

Well, space fatalities may seem to be an odd way of passing, but it comes under the section of accidental deaths. The reason behind it is these deaths occur mostly due to the technical faults of the spacecrafts. Now lets take a look at which are these technical faults and what are the consequences of that. 

1) On 24th April 1967 Vladimir Komarov from Soviet Union was travelling through Soyuz -1.  When the capsule began its descent and the parachutes failed to open, and the spacecraft hit the earth with the force of a meteorite. This unfortunately killed Komarov. 

                                            Komarov's remains

2) On 30th June 1971 Soyuz - 11 carried 3 astronauts, Georgy Dobrovolsky, Vladislav Volkov, and Viktor Patsayev which were found dead. Chair of the State Commission, recalled "Outwardly, there was no damage whatsoever". But later on the reason of the accident was revealed. The defective ventilation valve caused this accident and all of them died due to asphyxiation. Al three men were found in their couches, motionless, with dark-blue patches on their faces and trails of blood from their noses and ears.  Dobrovolsky's body was still warm, so these deaths occurred just before entering the Earth's atmosphere.      

3) On 28th January 1986 Challenger space shuttle broke apart 73 seconds into its flight, merely at an altitude of 15 kilometers (49,000 ft). All of the crew members including Gregory Jarvis, Christa McAuliffe
Ronald McNair, Ellison Onizuka, Judith Resnik, Michael J. Smith and Dick Scobee were killed in this disaster. Most of the crew members suffered due to hypoxia. Though some tried to activate their emergency oxygen, the cockpit hit the water at 320 km/h which killed the survivors if any. As this shuttle hit the sea, the remains of the astronauts were not fully recovered. 

4) On 1st February 2003 the Space Shuttle Columbia was lost as it returned from a two-week mission killing all of its crew members including Rick D. Husband, William C. McCool, Michael P. Anderson, David M. Brown, Kalpana Chawla, Laurel Clark and Ilan Ramon. In the atmospheric entry the space shuttle disintegrated. A defect in thermal protection system caused the accident by uncontrollable rise in the temperature and the space craft was broken apart. The pieces of the space craft were disintegrated. The point to be considered here is the fault in the thermal protection system was noticed beforehand but it was neglected by some reason. 

                                           Kalpana Chawla 

( I have provided this information in detail to make all readers aware of the names of these astronauts. Most of the Indians do not know these names except Kalpana Chawla. I have respectfully mentioned their names and the dates of their deaths to salute the bravery of these astronauts.)
Taking into account all these details, the exact launching time of the space shuttles is very important from astrological point of view. The astrological criteria we use for the travelling on Earth may not be much useful here. The Dreshkana kundli at the time of the space shuttle launch will be of utmost importance. Every Rashi has 3 Dreshkanas and thus a total of 36 Dreshkanas exist with their respective forms. During any travel if auspicious Dreshkana is on the rise it gives victory and a safe journey. An inauspicious Dreshkana can result in death or any other ill effects. When I calculated the Dreshkana kundli at the time of the launching of above mentioned 4 spacecrafts, a few important points were found to be critical. In the Dreshkana kundli at the launch of each space shuttle the eighth house, eighth house lord or Moon were debilitated. At the launching time of Soyuz - 1 and Challenger inauspicious Dreshkana was on rise. Along with this Saturn related to the eighth house found to be very malefic. In the Dreshkana kundli at the launch of Soyuz - 11, Saturn and Mercury in the eighth house and Mars and Rahu in the twelfth house created malefic yog. At the launch of Columbia, there were no auspicious yogas in the Dreshkana kundli and the Moon was debilitating. The planetary yogas at the beginning of any mission will affect till the end of the mission as the malefic results of these yogas can not be avoided once the journey has begun. 

Another important point to be considered in the space travel is the making of the spacecraft and it comes under the effect of which planets. Jupiter and Venus are the two planets which rule the making of the airplanes as well as spacecrafts. Mars and Saturn are not only important for machinery but also as significations of bones and blood in the human body. Considering the accidents of the above mentioned space shuttles, it can be observed that some of the shuttles hit the earth at a very high speed which proved to be fatal for the astronauts. In some cases the astronauts died due to the asphyxiation. These all results show the ill effects of malefic Mars and Saturn. In the latter cases impure blood flow and it's effect on the human heart seemed to be the reason for the fatalities. Nonetheless, when more than one astronauts travel in the spacecraft, it looks impossible to predict the number of deaths which can occur. If the space shuttle itself is devastated then all the crew members will die, so if major planets like Jupiter, Saturn and Venus make a malefic yog then only such prediction can be made.    

In the kundlis of the astronauts, the ninth house is very intrinsic. As a death related to this house usually occurs at a distant place. Now the deaths of the astronauts are not only 'distant' but they can be in the outer space. The main reason behind this is the malefic yog of the ninth house with the eighth house lord. Due to this yog, even if the actual death doesn't occur in the space, it's root cause like the fault in the space craft shows it's effect in the space and the result may occur anywhere from the space to the Earth's vicinity. This shows that even if not directly but the deaths occur in the space. Another important reason behind these fatalities is the relation of Uranus and Pluto with the ninth house. When such unpredictable planets make malefic yogas with the ninth house, such unusual deaths can occur. Also a Kalasarpa yog occurring with Rahu or Ketu placed in the ninth or third house can result in such deaths.   

The tenth house in the kundlis of the astronauts is also a very significant point to be considered. The tenth house is the house of deeds. So when astronauts die in the space i.e. at work place, the tenth house or tenth house lord comes into action. In the kundli of Kalpana Chawla the tenth house lord is situated in the ninth house, which supports the fact that she died at the place of work. Lets understand this point with the example of Steve Irwin's kundli. The famous zoologist and scientist had Moon, which rules water, in his tenth house. The tenth house lord Mercury is in the second house along with Mars, Ketu and Saturn aspecting the eighth house. Mercury is completely aspecting the eighth house. So Steve died underwater, due to the effect of the poison from the sting of the Ray which affected his heart. The malefic yogas of the tenth house and it's lord resulted in his death at his work place. Well, not only astronauts but when any person dies at the work place, the most important house to be considered is the tenth house.  

Now the most puissant point is the place of death. The 'place' of death of the astronauts (considered here) is the outer space which can not be even noted as a 'place' of death. I studied the planets responsible or ruling such kind of death. According to my study the planets with significations of space and their yogas with the ninth house are as vital as the ninth house itself. The space fatalities have one more bitter consequence that in some cases the remnants may not be recovered as they can be disintegrated in space. Considering this point the planets Jupiter (Akash tatva) and Saturn (Vayu tatva) are to be considered on the primary basis. Jupiter is not only important for the making of the spacecraft but it is equally vital being a planet of Akash tatva, as the existence in the space is ruled by Jupiter. The pivotal role by Saturn can not be forgotten as it being a planet of Vayu tatva it rules the air, composition of air and it's speed in the space. Saturn is a planet which tests the human life. So the severe condition of astronaut's body in the space obviously would betide due to the effect of the Saturn. Also Saturn is supposed to be the planet with a black coloured form in metaphorical explanation. Understanding this symbolism, the darkness in the space can come under the effect of the Saturn. Saturn is a planet which governs mysterious, complex or unfathomable things. So if unfortunately the remnants of the space shuttle or the astronauts are not recovered due to the disintegration in space, it can be the result of the malefic effects of the Saturn (or sometimes Rahu or Ketu). I feel when such unlucky deaths occur at such an infinite place where actual 'place of death' is unknown, then Saturn is the most likely planet to govern such events.   

Sun is the real 'star' of our planet Earth which gives life to our solar system. The gravity, temperature and atmosphere around the Sun is one of the important controlling factor of the spacecraft travel. While considering the spacecraft accidents we can not neglect these significations. I would like to highlight a point though. Our space shuttles have their leaps limited to our solar system. So the space fatalities are still contingent on the Sun of our solar system. If in future our science expands the horizons then other Suns in our galaxy can be taken into account. If it happens then the calculations of speed, air, vacuum and pressure will definitely change.  Practically at least today the calculations of space fatalities depend on the major planets like Sun, Jupiter, Saturn and the tenth, eighth and ninth house and the malefic yogas by the planets related to these houses. Any precise planetary condition can not be held responsible for the space fatalities. Basically astrologer's experience and knowledge will help to make such predictions due to the scarcity of these kind of kundlis. 

Heliocentric Astrology is a very recent development in celestial science which has a very different approach of considering Sun as the birth place in contrast to the Earth which is a common method. In this method Sun is taken as the center point for calculating the alignment of the planets. In my opinion if planetary alignments are with respect to the Sun, the calculations become more applicable. Though this is a fairly new approach, it is a very expedient method for astronomy and mathematics in astrology. I feel a calculation based on this method can help us to understand the reasons of space fatalities in a reformed way. As this method is based on a very different principle, I have not explained it in detail.       

I really doubt whether the Mahadasha and Antardasha part of astronauts' kundlis will be useful here. The calculations of Mahadasha may denote their personal or mass deaths. But the mystery of such deaths can not be revealed by the calculations. The reason behind it lies in the calculations based on the Earth as a base in our calculations which will shed light on the deaths on the Earth but not the space fatalities. I am skeptical about it's use in the prediction of space fatalities and finding the 'place' of deaths of the astronauts. Importantly it can predict the death of a particular astronaut, so it should be linked with the timing of the launch of the shuttle and other parameters (like Horary planets and Dreshkana kundli) to make any concrete prediction.  

Well, I have mentioned the points which raised through my study on this topic. As the information available for very limited and taking into consideration that the science can develop in future, these points are subject to change at any given time. I request the readers to note this point. 

I salute all the astronauts who lost their lives during such accidents and their bravery !!!

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
       ============================================== 

Friday, 20 December 2019

नात्झी भस्मासुराचा अस्त (?) -२ (The denouement (?) of the Nazi Führer -2)


३० एप्रिल १९४५ रोजी ऍडॉल्फ हिटलर, एक नात्झी भस्मासूर म्हणून नक्कीच संपला असेल पण एक माणूस म्हणून तो संपला होता का हा एक प्रश्नच आहे. त्याची कुंडली पाहून यावर भाष्य जरूर करता येईल. पण याचं खरं उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. ऍडॉल्फची कुंडली आणि अनेक अभ्यासकांनी दिलेले पुरावे यावरून याची उकल करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

ऍडॉल्फची कुंडली पुढील प्रमाणे आहे: 

सर्वप्रथम त्याच्या आयुष्यातील काही घटनांचा (आधीच्या लेखानुसार) कुंडलीतील ग्रहयोगांशी कसा संबंध जोडता येईल ते पाहू. 
  
दशम स्थानी म्हणजे पितृस्थानी कर्क रास असून तिथे शनि आहे जो भावचलित कुंडलीनुसारही तिथेच आहे. दशमेश चंद्र म्हणजे मातृग्रह, तृतीय स्थानी म्हणजे दशम स्थानाच्या षष्ठ स्थानी आहे. त्यामुळे ऍडॉल्फला आईचं सौख्य कमी मिळालं आणि ती आजारपणानं गेली हे दिसतं. पितृकारक रवि सप्तम स्थानी शनिने दृष्ट असा आहे. यातून त्याच्या वडिलांच्या आयुष्यातील चढ उतार दिसतात. शनि हा दशमाचा म्हणजे पितृस्थानाचा सप्तमेश असल्यानं त्याच्या वडिलांच्या आयुष्यातील अयशस्वी विवाह दर्शवतो. या शनि मुळेच त्याला अत्यंत अस्थिर स्थितीत घरी राहावं लागलं. आणि त्याच्या लहानपणीच टोकाचे विचार मूळ धरू लागले होते हे दिसतं. कुटुंबस्थानाचा स्वामी मंगळ सप्तमस्थानी शनिने दृष्ट आणि अंशात्मक दृष्टीनं वक्री शुक्राने युक्त असा आहे. यामुळे ऍडॉल्फचे वडिलांशी खटके उडणं किंवा वडिलांचा मार खाणं इत्यादी गोष्टींना पुष्टी मिळते. मंगळ हा तीव्र ग्रह असल्यानं रक्तपाताचे विचार त्याच्या मनात लहानपणीच मुख्यतः वडिलांमुळे आले असावेत असं वाटतं. पंचमेश शनि दशमात आहे आणि चंद्र कुंडलीनुसार पंचमेश मंगळ पंचमात शुक्राबरोबर असल्यानं त्याला कलेची आवड आणि त्यात कौशल्य होतं हे दिसून येतं. 
सप्तमात ४ ग्रह रवि, मंगळ, वक्री शुक्र आणि बुध एकत्र असून ते शनिने दृष्ट आहेत. सप्तमातील मेषेचा बुध वंध्यत्व दर्शवतो. त्यामुळे ऍडॉल्फला असलेलं एकच वृषण आणि त्यामुळे येऊ शकणारं वंध्यत्व यांना पुष्टी मिळताना दिसते. या वक्री शुक्रामुळे त्याचं अनैसर्गिक लैंगिक वर्तनही दिसून येतं. इतकंच काय तर त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आणि मंगळामुळे त्या स्त्रियांची हत्या / आत्महत्या किंवा छळ केला गेला असावा असं निदर्शनास येतं. दशमातील शनि आणि त्याची रविवर दृष्टी यामुळे ऍडॉल्फ राजकारणात सक्रिय झाला, नव्हे सत्ताधीश झाला. पण हाच शनि त्याच्या राजकारणातील प्रचंड अपयशाला कारण ठरला असावा. सत्तेच्या शिखरावरून तो इतका खाली फेकला गेला त्याला हे महत्त्वाचं कारण आहे. 

व्ययस्थानातील वक्री हर्षल ऍडॉल्फच्या व्यसनाधीन स्वभावाला कारण ठरला असावा. हर्षल हा अत्यंत अप्रत्याशित गुण देणारा ग्रह आहे. त्यामुळे त्याचं व्यसनाधीन होणं आणि अचानक काही निर्णय घेणं किंवा विचित्र वागणं ही वक्री हर्षलचीच देणगी असावी. सप्तमस्थानातील रवि आणि बुध हे मंगळ आणि वक्री अष्टमेश शुक्राबरोबर असल्यानं त्याला दोन वेळा तात्पुरतं आंधळेपण आलं होतं हे दिसून येतं. अर्थात या ग्रहांचा त्या वेळचा माफक वाईट परीणाम आणि त्यावेळची चंद्र महादशा याचा विचार करता तो त्यातून बाहेरही पडला.     

आता मुद्दा येतो तो ऍडॉल्फच्या देखावा करण्याच्या स्वभावाचा. लग्नी तूळ ही समतोल रास असली तरी लग्नेश शुक्र सप्तमात वक्री, भरणी नक्षत्रात आहे. तो मंगळानं युक्त असल्यानं मनात तीव्र, अहंकारी विचार देतो. तिथेच बुध असल्यानं त्याचा त्याच्या वंध्यत्वाशी संबंध येताना दिसतो. नेमका तिथेच रवि (उच्चीचा) मेषेचा असल्यानं अत्यंत तीव्र भावना आणि राजकारणातही तसेच विचार दर्शवतो. या सगळ्यात बुध हा त्याच्या दिखावेपणाला कारणीभूत असावा असं माझं मत आहे. चंद्रकुंडली नुसार सप्तमातील राहूमुळे छायाचित्रकार जोडीदार लाभला असला तरी हे नातं वादग्रस्तच होतं. मेषेचा बुध अश्विनी नक्षत्रात असल्यानं चतुर स्वभाव होता पण तो दिखाव्यासाठी जास्त वापरला गेला असावा. या बुधामुळे ऍडॉल्फला वाक्चातुर्य लाभलं आणि लाखो अनुयायी मिळाले. पण ह्याच बुधामुळे असत्य बोलणं आणि बुद्धी वाईट मार्गाकडे जास्त वळणं ही फळं मिळाली. चंद्र हा मनाचा कारक ग्रह धनू राशीत असल्यामुळे बुद्धिमत्ता अफाट होती. पण त्याबरोबर गुरू आणि राहू असल्यानं अत्यंत अशुभ योग तयार झाला. यामुळेच त्याचं मन कायम स्वतःची प्रतिमा टिकवण्याच्या मागे धावत होतं. धनू राशीमुळेही त्याच्या अहंकारात भर पडली. गुरू राहू हे ग्रह तृतीय स्थानी (भावंड) असल्यानं त्याच्या धाकट्या भावंडाचा मृत्यू झाला आणि त्यातून सावरायला त्याला वेळ लागला. 

तृतीय स्थान हे पराक्रमाचंही स्थान असल्यानं ऍडॉल्फ एक यशस्वी वक्ता, राजकारणी झालाही पण त्याच्या अतिरेकी स्वभावानं त्या यशाला गालबोट लागलं. आज संपूर्ण जगात ऍडॉल्फचं नाव सगळ्यांना ठाऊक असलं तरी ती कीर्ती कमी आणि अपकीर्ती जास्त आहे हे सत्य आहे. जर गुरू आणि राहू अंशात्मक रीत्याही युक्त असते तर याची आणखी भयंकर फळं मिळाली असती.     

माझ्या लेखनातील मुख्य मुद्दा आहे तो ऍडॉल्फच्या तथाकथित मृत्यूचा. त्याच्या मृत्यूबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. त्याचा दोन्ही बाजुंनी विचार करून काही निष्कर्ष काढता येईल का याचा मी प्रयत्न करणार आहे.   


ऍडॉल्फ त्याच्या तथाकथित आत्महत्येआधीच तेथून बाहेर पडल्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत. वरील कागदपत्र अमेरिकेच्या FBI या गुप्तचर संस्थेच्या लिंक वर उपलब्ध आहे. त्यानुसार २९ जून १९४५ रोजी लॉस अँजेलिस येथे एका परीक्षकाला एका खबऱ्यानं माहिती दिली कि ऍडॉल्फ अर्जेन्टिना या देशात बोटीनं उतरला आहे. पण ही माहिती प्रसिद्ध केली गेली नाही. काही आठवड्यांनंतर तो FBI या संस्थेकडे गेला. आणि त्यानं माहिती दिली की २ जर्मनीच्या पाणबुड्या ज्यात ऍडॉल्फ हिटलर व इवा ब्राऊन होते त्या व्हाल्डेझ पेनिन्सुला, गल्फ ऑफ सॅन व्हॅटिआझ, अर्जेन्टिना येथे आल्या. तेथील चार लोकांना हिटलरला अर्जेन्टिनामधे उतरल्यावर सहाय्य करण्यासाठी १५००० डॉलर इतकी रक्कम दिली होती व हा खबऱ्या त्या चार लोकांपैकी एक होता. त्यांच्याच सहाय्यानं ऍडॉल्फ आणि इवा अर्जेन्टिनामध्ये राहिले असं म्हटलं जातं. त्यानंतरही FBI कडे U- ५३० या जर्मन बनावटीच्या पाणबुड्या अर्जेन्टिनामध्ये आल्याच्या बातम्या होत्या पण त्यात लक्ष दिलं गेलं नाही. यावर इतर काही नेत्यांनी भाष्य केलं आणि या शंकेला पुष्टी मिळाली की ऍडॉल्फ आणि इवा सहीसलामत आहेत. अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डी. आईसेनहॉवर यांनी सुद्धा 'स्टार्स आणि स्ट्राइप्स' या वृत्तपत्राशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला. बर्लिनचे अधिकारी कोलोनेल हिम्लीच यांनी सुद्धा ऍडॉल्फ हिटलरच्या मृत्यूला अफवा सोडल्या तर काहीही पुरावा नाही असं वक्तव्य केलं. १९४७ मध्ये जिम्मी बायर्नेस यांनी त्यांच्या स्पीकिंग फ्रॅंकली या पुस्तकात उल्लेख केला की " स्टॅलिन यांना जेव्हा मी हिटलरच्या मृत्यूबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले कि हिटलर मेलेला नाही, तो एकतर स्पेनमध्ये आहे किंवा अर्जेन्टिनामध्ये" 




३ ऑक्टोबर १९५५ च्या CIA च्या वृत्तानुसार एका माहितगारानुसार एका फोटोमधील व्यक्ती ऍडॉल्फ हिटलर होती. जर्मनीच्या संस्थेमधील एका व्यक्तीनं, CIMELODY- ३ याला (खरं नाव गुप्त) जाहीरपणे सांगितलं होतं की हिटलर जिवंत आहे. त्याचीही काही कागदपत्रं उपलब्ध आहेत. त्यानंतर अनेक गुप्तचर संस्था आणि लोकांनी ऍडॉल्फ हिटलरला प्रत्यक्ष पाहिल्याची ग्वाही दिली. पण राजकीय कारणांमुळे यातील कोणत्याही पुराव्याचा अभ्यास केला गेला नाही किंबहुना त्यातील सत्य बाहेर आलं नाही. १९४७ नंतर अनेक सूत्रांकडून हिटलर जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदर्लंड, स्पेन आणि अर्जेन्टिना अशा देशांत दिसल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारे अनेक अधिकृत व्यक्तींकडून माहिती उपलब्ध झाली तरीही ऍडॉल्फ हिटलर जिवंत असल्याची शहानिशा कुठेच झाली नाही. 


फ्रान्सच्या सरकारकडून ऍडॉल्फ हिटलरच्या कवटीचा आणि जबड्याच्या अवशेषांचा अभ्यास केला गेला. त्या कवटीमधील छिद्र हे बंदुकीच्या गोळीनंच पडलं आहे हे सिद्ध झालं. पण त्यावरील डागांमुळे एडॉल्फ हिटलरनं मरणाआधी सायनाईड घेतलं असावं अशी एक शंका आहे. त्यांच्या मते हिटलरच्या कवटीचा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की त्यानं बंदुकीची गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. जेव्हा ऍडॉल्फच्या दातांचा एक्स रे मिळाला आणि त्याच्याबरोबर उपलब्ध कवटीमधील दातांचा अभ्यास जोडला जाण्यासाठी प्रयत्न केला गेला तेव्हा स्टॅलिन यांनी बराच हस्तक्षेप केला असं म्हटलं जातं. एका रशियन वृत्तपत्रानुसार (Pravda) हिटलरचा मृतदेह सापडला आहे, हे फॅसिस्ट लोकांचं षडयंत्र आहे असंही छापण्यात आलं. खालील फोटोमध्ये ऍडॉल्फ हिटलरच्या कवटीचा भाग दिसत आहे. ज्यात एका मोठ्या छिद्रामुळे बंदुकीची गोळी लागली आहे हे स्पष्ट होत आहे. १९६५ साली एका रशियन अभ्यासक असलेल्या रझेव्हस्कया नावाच्या स्त्रीनं सांगितलं की त्यांना १९४५ मध्ये एका साध्या दागिन्यांच्या डब्यात ऍडॉल्फ हिटलरच्या दातांचे अवशेष सोपवण्यात आले. आणि त्याची काळजी घेतली गेली नाही तर त्यांच्या जीवावर बेतेल असंही सांगण्यात आलं. त्या जेव्हा त्यांच्या २ अधिकाऱ्यांना घेऊन हिटलरच्या दंतवैद्याकडे गेल्या तेव्हा मात्र तो बव्हेरीयाला पळून गेल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर ते दातांचे अवशेष रशियाला पाठवण्यात आले. नंतर २०००च्या दशकात काही व्यक्तींनी हिटलरचे जळालेले अवशेष जर्मनी मध्येच पुरून ठेवल्याचं सांगितलं. त्यांच्या मते १९७० नंतर रशियाने त्या अवशेषांचं दहन करून ती राख एका नदीच्या काठी गर्द झाडाझुडपात विखुरली. कोणत्याही नवीन पद्धतीच्या नात्झी संस्थेला ऍडॉल्फचे पुरलेले अवशेष सापडले तर त्या ठिकाणाला खूप महत्त्व मिळेल या कारणास्तव असा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सोव्हिएत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्यांकडून दिली गेली. अशा असंख्य पुराव्यांचा विचार करता ऍडॉल्फ हिटलरचं नक्की काय झालं हा वाद मिटलेला नाही. आता त्याच्या कुंडलीवरून याबद्दल काय अंदाज बांधता येईल ते पाहू. 

मृत्यूस्थानी (अष्टम) वृषभ रास असून अष्टमेश शुक्र सप्तमस्थानी म्हणजे अष्टमाच्या व्ययस्थानी अशुभ असा आहे. तो सप्तमस्थानी असल्यानं त्याचा मृत्यू किंवा मृत्यूचा देखावा करताना त्याची जोडीदार त्याच्या सोबत असणार हे उघड आहे. चंद्र कुंडलीचा विचार करता अष्टमस्थानी शनि आहे. अष्टमेश चंद्र धनू राशीत स्वगृहीच्या गुरूसोबत आहे. त्यामुळे माझ्या मते ऍडॉल्फ छपन्न वर्षं इतकं कमी आयुष्य जगला नसावा. गुरू केतू एकत्र आल्यानं त्याला पराकोटीचा मानसिक त्रास, गूढ शास्त्र वा तंत्र शास्त्रामुळेही काही त्रास झाला असण्याची शक्यता आहे. आता हा परीणाम त्यानं स्वतः अवलंबलेल्या काही गोष्टींमुळे झाला की इतर कोणी काही वाममार्गी कार्य केली होती हे सांगणं अवघड आहे. लग्नकुंडलीनुसार अष्टमेश शुक्र, सप्तमात मंगळ आणि बुधाबरोबर आहे. म्हणजेच मगाशी नमूद केल्याप्रमाणे हा देखावा असू शकतो. अर्थात हा देखावा उभा करणं काही सोपी गोष्ट नाही. त्याची अमर्याद सत्ता आणि सहकाऱ्यांची मदत यामुळेच ते शक्य होतं. सप्तमस्थानातील उच्चीचा रवि यासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. मात्र त्यावर शनिची दृष्टी आणि भाग्यस्थानातील राहू यामुळे ऍडॉल्फला अनेक टोकाचे परीणाम भोगावे लागले असावेत. मृत्यूच्या वेळी ऍडॉल्फला राहू महादशा आणि शुक्राची अंतर्दशा सुरु होती. चलित गुरू सिंह राशीतून भ्रमण करत होता. म्हणजेच चलित गुरू ऍडॉल्फच्या कुंडलीतून एकादश स्थानावरून भ्रमण करत होता. माझ्या मते यामुळेच तो मित्र वा सहकाऱ्यांच्या मदतीनं पळून जाण्यात यशस्वी झाला असावा. लाभस्थानावरील गुरूचं भ्रमण त्याचा मृत्यू दर्शवण्यापेक्षा मित्र परीवाराचं सहकार्य दर्शवत आहे. अगदी खोलात जाऊन विचार करायचा तर कुंडलीनुसार ३० एप्रिल १९४५ रोजी त्याची राहू महादशेतील शुक्र अंतर्दशा आणि बुधाची प्रत्यंतरदशा होती. म्हणजेच बुधाने दिलेलं वाक्चातुर्य आणि असत्य बोलण्याचे गुण पाहता हा एक देखावा असू शकतो असं माझं मत आहे. अष्टमेश शुक्र मंगळाबरोबर असल्यानं त्याचा शस्त्राघातानं मृत्यू झाला असावा. ह्या दोन्ही ग्रहांबरोबर रवि - बुध असल्यानं त्याचा मृत्यू डोक्याला वा डोळ्याला गंभीर इजा होऊन झाला असावा हेही नाकारता येणार नाही. पण तो काळ बराच पुढे असणार असं दिसत आहे. मानसिक असंतुलन हे त्याच्या मृत्यूमागचं प्रमुख कारण असावं. माझ्या मते २९ एप्रिल १९४५ रोजी तो जर्मनीमधून बाहेर पडला असावा. व्ययेश बुधही सप्तमातच असल्यानं मृत्यू आणि पलायन असं अजब रसायन या कुंडलीत तयार झालेलं दिसतं. ऍडॉल्फनं जणू एका मनाला मारून पुनर्जन्म घेऊन दुसऱ्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला असावा. म्हणूनच एक नात्झी क्रूरकर्मा म्हणून त्यानं मृत्यूचं चित्र उभं केलं आणि त्याप्रमाणे तो क्रूरकर्मा मरण पावलाही होता पण एक माणूस म्हणून ऍडॉल्फ परदेशात पुढील आयुष्य जगला असावा. आयुष्याच्या पुढील पर्वात त्याला इवाची किती साथ मिळाली असेल ह्याबद्दल मात्र मला शंका आहे. एका वेगळ्या देशात, वेगळ्या नावानं आणि वेगळ्या जोडीदारासोबत तो राहिला असावा असा माझा अंदाज आहे. 

मगाशी मी सादर केलेल्या सर्व वैज्ञानिक पुराव्यांतही कुठेही ठोस पुरावा दोन्ही बाजुंनी उपलब्ध नाही. तो काळही असा होता की प्रसार माध्यमं, युद्धं, सरकारी कामकाज, नियम, दळणवळणाची अपुरी साधनं या सगळ्यांमुळे आजच्या काळापेक्षा खूपच तफावत होती. त्यामुळे ऍडॉल्फला त्याचा फायदा दोन्ही पद्धतीनं घेता आला असेल. एकतर त्याचा खरंच मृत्यू झाला असेल, तर त्याचे अवशेष लपवणं आणि त्याबद्दल खोटी माहिती देणं शक्य होतं. उलटपक्षी पलायन करून एका वेगळ्या नावानं आयुष्य जगणंही शक्य होतं. कोठेही पारदर्शकता नसल्याचा फायदा ह्या नात्झी भस्मासुराला नक्कीच मिळाला यात वाद नाही. मी माझ्या अभ्यासातून जे मुद्दे मांडता आले ते मांडले आहेत. माझ्या मतांशी प्रत्येकजण सहमत होईलच असं नाही. एक माहिती म्हणून या लेखाचं वाचन व्हावं एव्हढीच माझी इच्छा आहे.                       

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
       ===============================================
                            
On 30th April 1945, the infamous Nazi Führer definitely ended his life. But a person called Adolf Hitler was really finished? Now that's a big question mark. By studying his horoscope, some thoughts can be put on his death. But frankly speaking it is impossible to answer this question. I am trying to uncover some anecdotes and proofs provided by the analysts and try to get some clues to get the answer of this mystery.

Adolf Hitler's kundli is as below:


First lets try and link some of his life events (mentioned in the previous article) to the yogas in his kundli. 

The kundli shows Cancer sign in his tenth house (father) with Saturn situated there, which is also present there in Bhavachalit kundli. The tenth house lord Moon which is also the lord of his mother is situated in the third house i.e. the sixth house of the tenth. This shows how Adolf lost his mother to illness and missed a mother figure in his life. Sun the lord of father is situated in the seventh house, aspected by Saturn. This shows that the life of his father was also full of ups and downs. Saturn is also the seventh lord of the tenth house (father), which supports the fact that his father had an unsuccessful marriage. This Saturn was also responsible for his dysfunctional childhood. It also shows that the rebellious thoughts in Adolf's mind started spawning at his home in his early childhood. The second house (family) lord Mars is situated at the seventh house along with Venus in a retrograde position and aspected by Saturn. This aids to prove the fact that he had a tumultuous relationship with his father and got beaten during his childhood. Mars being a very aggressive planet, seems to be responsible for his furious behaviour predominantly due to antagonism between him and his father. The fifth house lord from the ascendant i.e. Saturn is placed in the tenth house and from the Moon chart i.e. Mars is placed in the fifth house along with Venus. This auspicious yog gave him a liking and skill in various arts.    

Four planets placed in the seventh house i.e. Sun, Mars, Venus (R) and Mercury are aspected by Saturn. Mercury in the seventh house in Aries shows inclination towards infertility. This supports the fact that he had Monorchism and his possible infertility. Venus in the retrograde position also supports his weird sexual behaviour. Also the presence of Mars in the seventh house also shows his sexual relationships with many women and their alleged torture and murder/suicide. Saturn placed in the tenth house not only made him active in politics but to become the controller. Alas!! the same Saturn was responsible for his drastic downfall. He was literally overthrown from his throne due to this Saturn.

Uranus in the twelfth house shows his addiction towards various things. Uranus always gives unpredictable results. So Adolf's addictions, erratic nature and unpredictable decisions can be the result of Uranus. Sun and Mercury along with Mars and retrograde Venus gave him temporary blindness. But limited malefic effects of these planets and his Moon Mahadasha at that time helped him to recover from the ill effects. 

Now the next point to be considered is Adolf's nature to pretense. Though a balanced sign like Libra at the ascendant, the ascendant lord Venus in the seventh house in Bharani Nakshatra is not very auspicious. Venus (R) along with Mars in that position gave him very aggressive and conceit mentality. Mercury in the same house can also be linked to his possible infertility. Exalted Sun happens to be placed in the seventh house along with the three planets in Aries, made him furious not only in his personal life but in his political life too. I personally think that in all the above mentioned planetary positions, Mercury is precisely responsible for his feigning behaviour. Though Rahu in the seventh house according to Moon Chart contributed to his love affair with a woman with a skill of photography, this relation was highly tumultuous. Mercury in Aries and Ashwini Nakshatra must have granted him cleverness, which was sadly used more for trickery. Due to this Mercury he was a master eloquent and mounted huge followers. Nonetheless skulduggery and knavery were the ill effects of the same malefic Mercury. Moon the ruler of mind situated in Sagittarius furnished him with intelligence. But Jupiter and Rahu along with the Moon was not an auspicious combination. So Adolf's mind was always juggling to keep his public image intact whatsoever. Sagittarius as the Moon sign also added to his ego. Jupiter and Rahu in the third house (siblings) were typically malefic in their effect. As a result Adolf lost his younger brother which affected him deeply.     

Third house in the kundli, being the house of feat or bravery, made Adolf a successful eloquent and politician. But his extremist nature was a blemish on his successful career. Though everyone, even today knows the name Adolf Hitler, its an infamy rather than a fame. If Jupiter and Rahu were in conjunction in degrees, then it would definitely have been a disaster recipe. 

Now the main purpose of my article is to discuss about the alleged suicide of Adolf Hitler. There are many differences of opinions on his alleged suicide. By considering both the views I am trying to get to some conclusion here. 


There are many proofs available claiming that Adolf Hitler fled before his alleged suicide. The above mentioned papers are available on the FBI Vault website. According to the reference on 29th June 1945 an informant gave this information to the Los Angeles Examiner that Adolf Hitler landed in Argentina. But this information never came to lights. After some weeks he approached FBI and informed them that 2 German submarines with Adolf Hitler and Eva Braun on board landed on the Valdez Peninsula, in the Gulf of San Vatias in Argentina. He added that four men were paid a handsome amount of $15000 to assist Adolf Hitler after his landing in Argentina. This informant was one of them. According to him with the help of such people, Adolf and Eva safely stayed in Argentina for some time. After this FBI got another information that German U-530 submarines landed on the Argentinean coast, even this information was purposely neglected. Some notable politicians also commented on Hitler's alleged escape and it added to the suspicion that Adolf and Eva are safe at some other place. The future president of the U.S. D. Eisenhower also supported the possibility of Hitler's escape while talking to the Stars and Stripes newspaper. Colonel Hemlich, Chief of U.S. Intelligence in Berlin also said that "There is no evidence beyond that of hearsay to support the theory of Hitler’s suicide. On the basis of present evidence, no insurance company in America would pay a claim on Adolf Hitler." In 1947 Jimmy Byrnes stated in his book Speaking Frankly that "While in Potsdam at the conference of the Big Four, Stalin left his chair, came over and clicked his liquor glass with mine in a very friendly manner. I asked what was his theory about the death of Adolf Hitler and he replied – Hitler is not dead. He escaped either to Spain or Argentina."           



According to the report published by CIA in 3rd October 1955 an informant produced a photograph of Adolf Hitler. CIMELODY-3 [a code name] stated that a former German trooper told him confidentially that Adolf Hitler is still alive. Even those papers are available. After this many secret agencies and people or informants witnessed the presence of Adolf Hitler at different places. Due to mere political pressure all these evidences were either not studied or the truth was never published. After 1947 many informants witnessed to the occurrence of Adolf Hitler at Germany, Netherlands, Switzerland, Spain and Argentina. In spite of all the witnesses, a fair verdict of Adolf's sightings was never completed. 


Government of France separately studied Adolf's jaw bone and his skull. The hole in the skull was proved to be there due to a gunshot wound. They also suggested that the bluish deposits on the dentures are probably due to cyanide consumption and reaction of it to the metal caps. They supported the fact that the skull shows signs of a gunshot wound. The X-ray of Adolf's dentures and its comparison with the available jawbone samples was interrupted by Joseph Stalin for unknown reason. According to a Russian newspaper, Pravda rumours that Hitler’s body had been found were a fascist provocation. The photograph below shows the hole in the skull of Hitler which supports the gunshot wound theory. In 1965 a Russian analyst Ms. Rzhevskaya stated that she was handed a cheap jewellery box in 1945 which had Adolf's teeth inside. She was warned by her commanding officer that " if you lose them, you’ll be answerable with your head.” When she tried to contact Adolf Hitler's dentist with her two superior officers, she was shocked to know that he has fled to Bavaria. Then the dental remains were sent to Russia. Then in the 2000's some informants stated that Adolf Hitler's remains were incinerated and scattered along a hill near a river. The reason? If the remains were found in future the place may become a pilgrimage for neo Nazis - as provided by the higher echelons of Soviet. By looking at all these allegations the question 'What exactly happened to Adolf Hilter?' is still unanswered. Now lets see can we draw any conclusion from the kundli of Adolf Hitler. 

In his kundli Taurus is the sign at the eighth house (death) with the eighth house lord Venus placed in the twelfth house from the eighth, which itself is not a favourable yog. The placement of Venus in the seventh house shows that when Adolf died or pretended his suicide, he was accompanied by his lover. In the Moon Chart, Saturn is situated in the eighth house. The eighth house lord Moon is placed with Jupiter in his own sign in Sagittarius. This is the reason I feel that Adolf Hitler did not die at the age of 56. Jupiter and Ketu placed together must have forced him to go through emotional turmoils or even he may have faced some problems due to occult practices. Frankly speaking it is hard to differentiate if the occult practices were carried out by him or any other of his adjutant. According to his Ascendant Chart, the eighth house lord Venus is placed in the seventh house with Mars and Mercury. This supports the fact that his death was merely a pretense. Well obviously pretending the death of a commander is not an easy task. Definitely his immeasurable power and his loyal auxiliary played a very important role in the shamming act. Exalted Sun in the seventh house has been a very important factor, I guess. But the Sun aspected by Saturn and Rahu in the ninth house rendered him with extreme consequences. At the time of his alleged death Adolf was undergoing Rahu Mahadasha and Venus Antardasha. Current Jupiter was transiting in Leo at the time. This means that Jupiter was transiting in the eleventh house in his kundli. I think this is the reason why he was successful in escaping with the help of his friends. The transit of Jupiter on his 11th house (Labhasthana) shows help obtained from his friends rather than his death. To dwell into his kundli, on 30th April 1945 he was going through Rahu Mahadasha, Venus Antardasha and Mercury PratyantarDasha. As I mentioned earlier, Mercury the ruler of speech and trickery in speech may have helped more to pretense his death. Eighth house lord Venus (R) along with Mars can lead to a death due to weapons. These planets placed along with Sun - Mercury may give him a serious wound to his eyes or head. But the time period for the situation to occur seems to be way to ahead. I feel this kind of death may have occurred in future basically due to his unstable mind. I strongly feel that he must have fled to other country on 29th April 1945. The twelfth house lord Mersury in the seventh house created a weird output of (pretended) death and escape situations at the same time. Adolf Hitler may have killed one of his mind and resurrected to live a new life according to his other mind. So he did put a picture in front of the world that the Nazi despot and tyrant is dead and so it was, but he definitely lived as human being with a new identity at a new place. I am really doubtful how much concomitance was obtained from Eva Braun after the escape to other country. I personally feel that Adolf changed his name and lived with a new identity with a new partner at a new place obviously keeping a low profile. 

I presented some of the scientific analysis results in this article, though not a single claim provides a full proof evidence. The period when this happened was quite different from today in the sense of media, government working style and rules, background of wars, comparatively less developed travelling sources. So I think Adolf Hitler could have taken the advantage from either of the sides. One is he might have really committed suicide and his remains were destroyed and false news were spawned. Or he may have fled to other country and lived a life with a new identity. Lack of transparency at that time would have definitely given the Nazi Führer a huge benefit. 

I presented my thoughts based on my study on Adolf Hitler. Every reader may not agree to this. I hope the readers will read this article just as a source of information.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.     
        ============================================     

Wednesday, 11 December 2019

नात्झी भस्मासुराचा अस्त (?) (The denouement (?) of the Nazi Führer) 


ऍडॉल्फ हिटलर नावाच्या वादळानं त्याच्या सत्तेच्या काळात (१९३३ - १९४५) संपूर्ण जगाला हादरवलं. १९१३ साली जर्मनीत आल्यावर राजकारणातली एक एक पायरी चढत तो जर्मनीचा सत्ताधीश बनला. ज्यू धर्माच्या लोकांबद्दल मनात कमालीचा तिरस्कार बाळगून त्यांचा जणू खात्मा करण्याचा त्यानं विडाच उचलला. दुसऱ्या महायुद्धाला कारण बनलेला हा क्रूरकर्मा अत्यंत वादग्रस्त आयुष्य जगला. अखेर ३० एप्रिल १९४५ रोजी त्यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याच्याबरोबर त्याची प्रेयसी इवा ब्राउन हिनंही सायनाईडची गोळी खाऊन आत्महत्या केली. त्या दोघांचेही मृतदेह नंतर जाळून टाकण्यात आले. नेमकं इथेच वादाला तोंड फुटलं. त्या दोघांचेही मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत सापडले की ते दोघे नेमके कोण होते यावर अजूनही वाद प्रतिवाद चालू आहेत. यावर थोडा प्रकाश टाकण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. आणि ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून हिटलरच्या मृत्यूचं गूढ उकलता येईल का याचाही मी माझ्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. 

मी सर्वप्रथम नमूद करू इच्छिते की राजकीय भाष्य करण्यापेक्षा हिटलरवर वैयक्तिक दृष्टिकोनातून इथे विचार मांडले आहेत. 

२० एप्रिल १८८९ रोजी ऑस्ट्रिया मध्ये ऍलॉईस आणि क्लारा हिटलर या दाम्पत्यानं ऍडॉल्फला जन्म दिला. ऍलॉईस यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. हिटलरची आई क्लारा ही ऍलॉईस यांची दुसरी पत्नी. पहिली पत्नी हयात असताना त्यांनी हा विवाह केला. त्यामुळे सख्ख्या आणि सावत्र भावंडांच्या गोतावळ्यात हिटलरचा जन्म झाला. पुढे १९१३ साली जर्मनीत आल्यावर हिटलरनं पहिल्या महायुद्धाची जर्मनी तर्फे काम केलं (१९१९). १९२१ मध्ये जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये कामाला सुरुवात करून त्यानं राजकारणात उडी घेतली. १९३३ साली एकतर्फी वर्णद्वेषाचा अवलंब करणाऱ्या नात्झी पार्टीचा तो सर्वेसर्वा बनला. त्यानंतर संपूर्ण जर्मनीचा बादशाह बनून त्यानं इतकी हुकूमशाही गाजवली की आजही हुकूमशाहीला समानार्थी शब्द म्हणून हिटलरशाही असं म्हटलं जातं. अनेक निरपराध ज्यूंचा बळी घेणाऱ्या हिटलरनं अखेर १९४५ साली आपलं आयुष्य संपवलं(?). त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा मागोवा घेतला तर केवळ राजकारण नव्हे तर इतरही काही गोष्टी त्याला घातक ठरल्या असाव्यात असं वाटतं. आणि त्यानं आत्महत्या केली ह्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्या गोष्टी कोणत्या त्याचा थोडक्यात परामर्श घेऊ. 

ऍलॉईस म्हणजे ऍडॉल्फच्या वडिलांनी पहिली पत्नी हयात असतानाच पूर्णपणे विभक्त न होताच क्लाराशी विवाह केला. त्याच्या वडिलांचं आयुष्यही वादग्रस्तच राहिलं. ऍलॉईस मारीया शिकलग्रबर ह्या कुमारी मातेचा मुलगा होता. त्याच्या आईनं १८४२ जोहान जॉर्ज हिड्लरशी विवाह केला, जो ऍलॉईस याचा खरा पिता होता असं म्हटलं जातं. पण ऍलॉईसचा सांभाळ त्याच्या काकांकडे म्हणजे जोहान नेपोमक हिल्डर यांच्याकडे झाला आणि हा सुद्धा ऍलॉईस याचा पिता असू शकतो अशी एक वदंता होती. एका ज्यू व्यक्तीचा (फ्रँकेनबर्गर) ऍलॉईस हा मुलगा होता, म्हणजे हिटलरचे आजोबा चक्क ज्यू होते, असा एक दावा केला जातो. तरीही  ऍलॉईसचे वडील कोण होते हेही अजूनही कायदेशीररीत्या सिद्ध झालेलं नाही. त्यांच्या हिड्लर या आडनावाचं ऍलॉईसनं नंतर हिटलर असं रूपांतर केलं. 

ऍडॉल्फ लहान असताना वडिलांच्या कडक शिस्तीमुळे त्याचं आणि वडिलांचं फारसं पटत नसे. अनेकदा त्याचे वडील त्याला इतके मारत असत की त्याची आई क्लारा, त्याला वाचवण्यासाठी त्याला तळघरातही ठेवत असे. काही अभ्यासकांच्या मते हिटलरच्या क्रूरतेचा उगम अशा रीतीनं घरातच झाला असावा. ऍडॉल्फनं कलेमध्ये शिक्षण घेऊन कलाकार बनण्याचं स्वप्न बाळगलं होतं, तरीही वडिलांच्या हट्टापायी त्याला वेगळ्या शाळेत घालण्यात आलं. त्यामुळे त्यानं शाळेत मुद्दाम चांगला अभ्यास केला नाही जेणेकरून त्याचे वडील त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील आणि त्याला त्याच्या इच्छा पूर्ण करता येतील असं त्यानं त्याच्या आत्मचरीत्रपर पुस्तकात म्हटलं आहे. त्यातच १९०० साली त्याच्या धाकट्या भावाचं एडमंडचं गोवर झाल्यामुळे निधन झालं. ज्याचा ऍडॉल्फच्या मनावर खूप परिणाम झाला. मात्र १९०३ साली वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यानं हव्या त्या शाळेत प्रवेश घेऊनही शिक्षण सोडून दिलं. १९०७ साली त्याची आई कॅन्सरमुळे वारली. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे तो बेघर लोकांसाठी असलेल्या संस्थेतही राहिला. त्यानं स्थापत्य विद्या आणि संगीत यांचं शिक्षण घेतलं अगदी गाण्याचे प्रयोगही ऑपेरामध्ये केले. स्वतः काढलेली चित्र, रंग विकून आणि कष्टाची कामं करून अर्थार्जनही केलं. पण मूळचा बंडखोर स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच्या मनात वर्णद्वेषी विचार आता चांगलेच स्थिरावले होते. ते इतके प्रभावी बनले कि १९१३ मध्ये जर्मनीत आल्यावर देखील त्यानं सर्व वर्णांची लोकं एकत्र असल्यानं हॅब्सबर्ग एम्पायर इथे काम करायला नकार दिला. 

पहिल्या महायुद्धात जर्मनीसाठी काम करताना त्याला डोळ्याला इजा झाली. तरीही त्यानं कलेचा अभ्यास, कार्टून बनवणं अशा गोष्टी चालूच ठेवल्या. १९१८ मध्ये मस्टर्ड गॅसमुळे त्याला थोडं आंधळेपण आलं. जर्मनी हरल्याची बातमी ऐकल्यावर पुन्हा त्याला तसाच त्रास झाला. त्याच्या मते पाहिलं महायुद्ध हा त्याच्या आयुष्यातला सगळ्यात उत्तम अनुभव होता. मग त्यानं राजकारणात प्रवेश केला आणि मागे वळून पाहिलं नाही. १९२१ पासून ऍडॉल्फच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात वादळं यायला सुरुवात झाली. १९२९ साली त्याच्या म्युनिच मधील घरी त्यानं त्याची भाची अँजेला ('गेली') आणि तिची आई यांना आसरा दिला. गेलीची आई १९२५ पासूनच ऍडॉल्फचं घर सांभाळून त्याला सोबत करत असे. ऍडॉल्फपेक्षा १९ वर्षांनी लहान असलेली गेली तिचं शिक्षण पूर्ण करत होती. पण ऍडॉल्फ आणि गेली मध्ये अनैतिक संबंध वाढू लागले. ऍडॉल्फ तिच्यावर इतका मालकी हक्क गाजवू लागला की तिनं आपलं वैद्यकीय शिक्षण सोडलं आणि नजरकैदेत असल्यासारखी तिथे राहू लागली. नात्झी चळवळीच्या शिखरावर असताना तो तिला इतका बंधनात ठेवू लागला की अखेर १८ सप्टेंबर १९३१ रोजी तिनं ऍडॉल्फच्याच बंदुकीनं गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ऍडॉल्फ बरोबरचे तिचे संबंध आणि होणार छळ यामुळेच तिचा जीव गेला असावा अशा बातम्याही पसरल्या.    

मध्यंतरीच्या काळात १९२९ साली त्याची इवा ब्राउन या मॉडेल आणि छायाचित्रकार असणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी ओळख झाली. गेलीच्या मृत्यूनंतर ऍडॉल्फ आणि इवाचे संबंध वाढू लागले. ऍडॉल्फच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाची छायाचित्रं आणि काही लघुपट तिनंच बनवले होते. पण अत्यंत कर्मठ विचारांच्या ऍडॉल्फच्या मते पुरुषांनी राजकारणात सक्रिय असलं तरी स्त्रियांनी घरकाम करणंच योग्य आहे. स्वतःची प्रतिमा उत्तम ठेवण्यासाठी ऍडॉल्फनं इवाशी प्रेमसंबंध असूनही चारचौघात दर्शवले नाहीत वा कधी लग्नही केलं नाही. इवानेही अनिच्छेनं का होईना याला होकार देत ऍडॉल्फला पाठिंबा दिला आणि स्वतःचं कामही चालू ठेवलं. या वादग्रस्त संबंधात तिनंही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अखेर मरणाच्या आदल्या रात्री २९ एप्रिलला दोघेही ठरवून विवाहबद्ध झाले आणि ३० एप्रिल १९४५ रोजी दोघांनी आत्महत्या केली.        
                   
या सगळ्या काळात ऍडॉल्फला इतरही बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. तो काही निरोगी आयुष्य जगला असंही नाही. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स आणि इतर अभ्यासकांच्या मते त्याला इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम, सिफिलिस, आवाजाचा भ्रम होणं, पार्किन्सन, हृदयाचे ठोके अनियमित पडणं अशा अनेक प्रकारच्या व्याधी जडल्या. काही अभ्यासकांच्या मते त्याला एकच वृषण होतं, ज्यामुळे तो वंध्यत्वाकडे झुकत होता. आपल्या शरीरातील या व्यंगामुळे त्याच्या शारीरिक संबंधावरील विचारातही एक आडमुठेपणा आला. स्वतःला कार्यासाठी वाहून घेण्यासाठी एक ब्रह्मचारी असल्याचं दाखवण्याच्या नादात तो अनेक गोष्टींना मुकला. १४ वर्ष इवाबरोबर असलेले संबंध लपवताना त्याला तारेवरची कसरत करावी लागली. त्याखेरीज काही स्त्रियांशी विशेषतः तरुण मुलींशी त्याचे संबंध होते, त्यातूनच त्याला सिफिलिस जडला असावा. हे सर्व संबंध त्यानं खुबीने लपवले होते पण त्याची कुणकुण काही लोकांना लागली होती. समलैंगिक संबंधाचा त्याला इतका तिरस्कार होता कि त्यानं हजारो समलैंगिक लोकांना छळछावणी मध्ये धाडलं. १९४१ मध्ये त्यानं जाहीर केलं की समलैंगिकता ही प्लेग इतकीच धोकादायक आहे. असं असूनही पहिल्या महायुद्धाच्या वेळी असलेल्या अहवालात त्याच्यावर समलैंगिक संबंधाचा आरोप केला गेला, पण त्याची कागदपत्रं आता उपलब्ध नाहीत. आजही अनेक अभ्यासक ऍडॉल्फचा अभ्यास करताना त्याच्या समलैंगिक संबंधांचा पुरावा देतात. कठोर बालपण, युद्धाच्या अनुभवातून आलेलं दडपण, शारिरीक संबंधांचं दडपण अशा अनेक गोष्टींमुळे त्याला सायकॉसिस झाला असावा असाही एक दावा केला जातो. त्याच्या वागण्यातील काही विचित्र गोष्टींमुळे असा दावा केला गेला असावा. स्वतःबद्दलचा कमालीचा अहंभाव, यामुळे त्याला स्किझोफ्रेनिया असावा असाही एक निष्कर्ष काढण्यात आला. १९९८ मध्ये एका तज्ज्ञाचा असा दावा होता कि ऍडॉल्फ अलैंगिक पण विचित्र लैंगिक कल्पना असलेला असा होता. माझ्या मते केवळ पुरुषी अहंकार जपण्यासाठी आणि स्वतःच्या विचित्र लैंगिक कल्पना पूर्ण करण्यासाठी तो देखावा करत होता. काहीही असलं तरी त्याच्या मनावरील खोल जखमांचा त्याच्या लैंगिक आयुष्यावर परीणाम झाला हे नाकारता येणार नाही.             

आयुष्यभर मद्यप्राशन, व्यसनं यांना विरोध करणाऱ्या ऍडॉल्फनं १९२३ साली तुरुंगात असताना ३१ लिटर बिअर मागवली होती. इतकंच नव्हे तर त्याच्या डॉक्टरांच्या मते तो अनेक प्रकारच्या अंमली पदार्थांचं सेवन करत असे (ऑक्सिकोडोन, मेथ, मॉर्फीन आणि कोकेन इ.). कोणत्याही हल्ल्याच्या आधी तो त्याच्या सैनिकांनाही अंमली पदार्थ देत असे (परव्हिटिन). त्याच्या आयुष्याच्या अखेरीस त्याला शरीर थरथरण्याचा त्रास होत होता. काही तज्ज्ञांच्या मते विशिष्ट अंमली पदार्थ न मिळाल्यानं असं होत होतं. म्हणजे त्याच्या अहंकारी स्वाभावात स्वतःची प्रतिमा जोपासण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाऊन लोकांची फसवणूक करण्याची तयारी होती हेच लक्षात येतं.          

बंडखोर वृत्तीच्या ऍडॉल्फ हिटलरनं जेव्हा स्वस्तिक चिन्ह आपल्या झेंड्यासाठी निवडलं तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही तज्ज्ञांच्या मते तो एक गूढशास्त्राचा अभ्यासक होता. आणि गूढशास्त्रानुसार काही गोष्टी करण्यासाठी त्यानं स्वस्तिक चिन्ह स्वीकारलं, छळछावण्या उभारल्या आणि अनेकांची हत्या केली. त्याच्या सवयीनुसार तो रात्री काम करत असे आणि दुपारपर्यंत झोपत असे. त्याचं हे रात्रीचं जागरणही अनेकांनी गूढशास्त्राशी जोडलं. त्याला सकाळी उठवलं तर तो काय शिक्षा देईल हे सांगता येत नसे. असं म्हणतात की ६ जून १९४४ रोजी पहाटे रेडिओवर शत्रूच्या घुसखोरीची बातमी ऐकूनही त्याच्या कोणत्याही सहकाऱ्याची त्याला उठवायची हिम्मत झाली नाही. जर ऍडॉल्फनं त्या वेळी उठून परीस्थितीचा आढावा घेतला असता तर आज दुसऱ्या महायुद्धाचा वेगळाच शेवट आपण ऐकला असता. इथून त्याच्या अधोगतीच्या शेवटच्या पर्वाची नांदी झाली. आणि अखेर ३० एप्रिल १९४५ रोजी हा बुलंद नेता पुरता ढासळला. 

पण वरील वर्णन वाचता इतका अहंकारी पण बुलंद, बंडखोर पण कठोर, करीश्माई पण देखावा करणारा सत्ताधीश इतक्या सहजासहजी आत्महत्या करेल हे थोडं संशयास्पद वाटतं. अहंकारी माणसाला पराभव सहन होत नसला तरी इतक्या पळवाटा काढणारा ऍडॉल्फ अजून एक देखावा नक्कीच उभारू शकत होता, आणि तो म्हणजे त्याच्या मृत्यूचा. स्वतःचा जीव वाचवून आपलं संसाराचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं राजकारणातून पळ काढलाही असेल. अथवा खरंच मोठ्या मनानं किंवा अस्थिर मनस्थितीत मृत्यूला कवटाळलं असेल. त्याच्या तथाकथित मृत्यूनंतर त्यावर संशय व्यक्त करणारे कमी नव्हते. आजतागायत त्यावर अभ्यास चालू आहे. ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या ऍडॉल्फ हिटलरच्या आयुष्यातील घटना आणि त्याचा मृत्यू(?) आणि जर तो जिवंत होता तर त्यानंतरचं त्याचं आयुष्य यावरील भाष्य पुढील लेखात सादर करेन.        


© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

     ==============================================                                        
A raging storm called Adolf Hitler vehemently shook the world in his reign of terror (1933-1945). After arrival in Germany in 1913 he stepped up the ladder to become the Führer of Germany. Due to his racially motivated ideology he planned to annihilate the Jewish race in Europe. The fractious leader, responsible for the Second World War though lived a controversial life. At last he committed suicide on 30th April 1945 by gunshot. His long time lover and wife of one day Eva Braun also killed herself by taking cyanide pill. Their remains were doused in petrol and set alight. This is where the arguments began. Their remains found were burnt to such an extent that it was impossible to identify them and the arguments still continue. I am trying to explore this matter here. I am trying to unveil some facts and trying to dig into the matter from astrological point of view.    

I would like to mention in the beginning itself that it is a study based on the personal life events of Hitler; I have not commented on any political views. 

In Austria the couple Alois and Klara Hitler gave birth to their son Adolf on 20th April 1889. The ancestry of Alois is debated. Klara was Alois's second wife. He married her while still not divorced to his first wife. So Adolf was born among the bunch of siblings. Adolf worked for Germany army after moving there in 1913. He stepped in the politics by joining German Workers' Party in 1921. He became the Chancellor and in a sense a controller of the racist Nazi party. Then he became such an outrageous leader that even today dictatorship is synonymous to word Hitler. This savage tyrant who was responsible for the deaths of millions of innocent Jews finally ended (?) his life in 1945. The analysis of his personal life shows that only political pressure was not the sole reason behind his suicide, but some other factors were equally influential. This puts a big question mark on his possible suicide. Lets have a look at the factors in detail.

Alois, Adolf's father married Klara when his first wife was not separated from him legally. Even his life was full of ups and downs. Alois was a illegitimate son of Maria Schicklgruber. She married Johann Georg Hiedler, who was supposed to be Alois's legitimate father. But Alois was raised at his uncle Johann Nepomuk Hiedler's house. Some people claim that he fathered Alois. There is one strange claim that a Jew person Leopold Frankenberger was the biological father of Alois. It means if this is correct then Adolf Hitler's paternal grandfather was a Jew!!! Still nobody has proven who fathered Alois. At some point Alois changed his surname from Hiedler to Hitler.       

Alois was a strict father who wanted his son to follow his footsteps which distanced Adolf from him. The antagonism between the duo worsened with time and he started beating Adolf, while Klara trying to protect him many times and hide him in the attic. Some psychologists claimed that the roots of Adolf Hitler's savage behaviour lied in his dysfunctional childhood. Adolf had a dream to learn art and become an artist, but ignoring his dreams his father forced him  to join another high school. Adolf Hitler stated in his autobiographical manifesto that he purposely performed poorly in that school hoping his father will one day let him pursue his dream of becoming an artist. In between sudden demise of his younger brother Edmund due to measles deeply affected him. Nonetheless after Alois's sudden death in 1903, Adolf left his education in spite of getting admission to art school. His mother died in 1907 due to cancer. Then he even lived in homeless shelter due to financial crisis. He learned architecture and music, even performed in Opera. To earn money he worked as a labourer and sold his paintings and watercolours. But his rebellious nature was not letting him settle in life of this quality. The racist thoughts spread their roots deeply in his mind. He became so racist that in 1913 he refused to serve Habsburg Empire due to mixture of races in it's army.    

During his service in First World War he was temporarily blinded in a mustard gas attack. In spite of this he pursued his artwork, drawing cartoons etc. After learning about Germany's defeat he again suffered bout of blindness. He stated that first world war was the greatest of all experiences. Then he joined politics and never looked back. The storms started to appear in his personal and political life after 1921. In 1929 he allowed his half niece Angela (Geli) and her mother to stay at his Munich apartment. Though Geli's mother was Adolf Hitler's housekeeper from 1925. His 19 year  junior half niece was pursuing her education. Allegedly Geli and Adolf had some incestuous relationships. Adolf was so possessive about her, that she left her medical education and lived in effect as a prisoner. At the peak of his Nazi movements he kept such a tight rein on her that finally she killed herself by gunshot from Hitler's gun. The rumours spread that she lost her life under pressure due to sexual relationship with Hitler and possible abuse.      

In 1929 he met his long time lover and would be wife of one day, a model and a photographer 17 years old Eva Braun. After Geli's death Eva and Adolf began their courtship. Many of Adolf's colour photographs and films were taken by her. A very pragmatic Adolf had an opinion that though males are active in politics, females should take care of the household. To maintain his public image of a celibate man without domestic life, he never admitted his relationship with Eva and never married her. Unwillingly Eva also supported Adolf but continued to work. In their tumultuous relationship Eva attempted suicide twice. At last just a day before their death Eva and Adolf got married in a small ceremony and committed suicide the next day on 30th April 1945.  

After joining the politics there was no smooth sailing for Adolf from there. Neither he lived a very healthy life. According to the psychologists, researchers and doctors who examined Adolf, he was suffering with many ailments like Syphilis, Eczema, Irregular heart beat, Irritable Bowel Syndrome, Parkinson's disease, Schizophrenia and hallucinations/ hearing voices. It has been also alleged that he had Monorchism, the medical condition of having only one testicle, which can increase the chances of infertility. Due to this condition it is believed that Adolf had uncontrolled outbursts and irrational thoughts on sexuality. To maintain his celibate image in politics he had to sacrifice many things in life. He had to constantly juggle to hide his relationship with Eva from the public eye. Apart from these women he preferred younger women who were easy preys. This is where he probably got infected with Syphilis. Though he cleverly kept a tight rein on the women, many of his adjutants had evidences to prove his sexuality. Adolf was (apparently) so much against homosexuality that he sent thousands of homosexuals to concenttration camps. In 1941 he declared that "homosexuality is actually as infectious and as dangerous as the plague." In spite of this his First World War record, finds him guilty of pederastic practices, though the evidences are not available now. Today many researchers claim about his homosexuality with various evidences. some psychologists claim that Adolf had Psychosis which was a result of his dysfunctional childhood, war trauma, sexuality, fetishes etc. Probably his weird behaviour at times may have drawn the attention of the claimers. A completely narcissistic nature of him may have resulted in transforming him to a Schizophrenic. In 1998 a scientist claimed that Adolf was actually asexual with bizarre sexual fetishes. I think Adolf was keen about his male ego and political image, so he feigned his image to fulfill his sexual fetishes. Nevertheless, it can not be denied that the deep wounds on his mind must have affected his sexual life.       

"A complete anti-alcoholic" in his own words, though Adolf was a teetotaller, he ordered almost 31 liters of Beer when he was imprisoned. According to his physician he regularly consumed drugs (including Methamphetamine, Oxycodone, Morphine and Cocaine). Evidences suggest that he made the drugs available for his army men before war, precisely Pervitin. Near the end of his life he was prone to shaking, which was probably the result of withdrawal from the drugs which were hard to obtain. This shows his behaviour was masked by a pretense all the time and he did not fear to dramatize at any level.  

The selection of Swastika as an emblem by the rebellious leader of Nazi, definitely raised a few eyebrows. Some scholars relate this to Adolf's obsession with the occult. The researchers claim that he himself was an occultist and accepted Swastika or created concentration camps to kill people according to some occult procedures. One of Adolf's weird behaviour was he was a night owl and used to sleep till afternoon. Even this was linked to occultism. If somebody disturbed his sleep, he would grant the hardest possible punishment and was totally unpredictable at that time. According to an evidence on the early morning of June 6, 1944 reports of an Allied landing were radioed. Nobody in his Headquarters dared to wake him up. If Adolf Hilter would have awaken and taken some steps that morning then we would have heard a different outcome of World War II. Well, this proved to be the beginning of his inevitable downfall. Finally this tough rebellion totally collapsed on 30th April 1945.     

By learning all these facts about him I feel very suspicious that this narcissistic but rock hard, rebellious but outrageous and charismatic but manipulative leader will so easily give up on his life. I agree that a narcissistic person can't digest his defeat, but a person who could pretense all the time could have put one more scene, that is to feign his death. Probably he would have fled to some other place and fulfilled his dream of a family. On the other side he would have embraced his death with a brave heart or under unstable psychological status. There were so many people all over the world who were suspicious about his alleged suicide. Even today people are debating on this. Well I will present some thoughts on Adolf Hitler's life, his death (?) and if he was alive, then his life after the alleged attempt from astrological point of view.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
      ===============================================