Sunday, 25 March 2018

ज्योतिष शास्त्र आणि काही अलिखित नियम (Some technical know'hows of Astrology)


ज्योतिष शास्त्र आणि त्यातील उपाय याबद्दल माझ्या आधीच्या लेखांत मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. जन्मकुंडलीचं विवेचन आणि उपाय या दोन्ही गोष्टींचा विचार करताना काही मुद्दे लक्षात ठेवले तर उपायांचा फायदा तर होतोच आणि त्याचबरोबर कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिला जात नाही. असे काही मुद्दे इथे मांडले आहेत. 

अनेकदा परीस्थितीमुळे आलेली हतबलता आणि मानसिक त्रास यामुळे लोक अडचणींच्या काळात मार्ग शोधण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा आधार घेतात. एरवी ह्या शास्त्रावर विश्वास नाही असं ठामपणे सांगणारे लोक अडचणी आल्या की ह्या शास्त्राकडे वळतात. याचं कारण असं की बऱ्याच लोकांचा ह्या शास्त्रावर किंवा देव धर्मावर विश्वास असतो पण त्यातील अवडंबर त्यांना नको असतं. ही अगदी योग्य भावना असली तरी अवडंबर नक्की कसं टाळावं? याचीही माहिती करून घेण्याची इच्छा नसते. जर आधीच ह्या शास्त्राची जुजबी माहिती करून घेतली तर खरं शास्त्र आणि अवडंबर यात फरक करता येईल. याच अनुषंगाने येणारा आणखी एक मुद्दा म्हणजे ह्या शास्त्राची जुन्या पद्धतीची मांडणी. हे शास्त्र पुरातन असल्यामुळे त्या काळातील जीवन सरणीला अनुसरूनच ज्योतिष विषयक ग्रंथ लिहिले गेले आहेत. पण काही जणांना आजच्या काळातील गोष्टी ह्या ग्रंथांमध्ये नसताना विवेचन कसं दिलं जातं? अशी शंका असते. ज्योतिष शास्त्रातील भाषेमधला प्रतीकवाद समजून घेतला तर त्याचा अर्थ आताच्या काळानुसार नक्की लावता येईल. यासाठी एक साधं उदाहरण घेऊ. शुक्र ग्रहाचं कारकत्व म्हणजे कलाकौशल्य, विषयसुख, कांति इ. आहे. त्यामुळे शुक्र ग्रह जन्मकुंडलीत शुभयोग करत असेल तर ती व्यक्ती कलाकार बनू शकते. अर्थात यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण या उदाहरणावरून ग्रहांचं कारकत्व आणि आजच्या काळातल्या काही गोष्टींची सांगड कशी घालता येईल याची कल्पना करता येऊ शकेल. यात ज्योतिषाचं कौशल्य आणि चौफेर अभ्यासही तितकाच महत्त्वाचा आहे.              

काही लोकांना वरचेवर जन्मकुंडली वेगवेगळ्या ज्योतिषांना दाखवण्याची सवय असते. जन्मकुंडलीचं विवेचन हे शक्यतो एकाच ज्योतिषाकडून करून घ्यावं. जर काही कारणानं एकाच ज्योतिषाकडे नेहमी जाता येणार नसेल तर केवळ काही अडचणी असतील तेव्हाच दुसऱ्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. भाकीत बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या ज्योतिषांकडे गेल्यास गोंधळ उडेल. तसंच ज्योतिषाकडे जाताना मनात श्रद्धा असावी. एखाद्या ज्योतिषाची तुलना दुसऱ्या ज्योतिषाशी करून वादविवाद करू नयेत. ज्योतिषाकडे जाण्याआधी त्याची माहिती नक्की असावी पण ज्योतिषाचं ज्ञान हे त्याच्या प्रसिद्धीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मोठमोठ्या जाहिराती, तंत्र शास्त्रातील उपायांबद्दलचे मजकूर इत्यादी गोष्टींना बळी पडू नये.      

प्रश्नकर्त्यानं आपल्या कुंडलीचं विवेचन तसंच दिलेल्या उपायांची चर्चा करू नये. उपायांची शक्ती त्या व्यक्तीसाठीच राखून ठेवलेली असावी. 

जन्मकुंडलीच्या विवेचनाचा हेतू अडचणी दूर करण्याचा असतो त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींची कल्पना ज्योतिषी आपल्याला देईल हा विचार करून विवेचन मागणं योग्य होणार नाही. एक ज्योतिषी म्हणून माझा अनुभव असा आहे की प्रश्नकर्त्याची अडचण काय आहे हे मी न सांगता ओळखावं असं बऱ्याच जणांना वाटतं. जन्मकुंडली समोर ठेवल्यावर एखादा मुद्दा ज्योतिषानं स्वतःहून ओळखावा ही मागणीच ज्योतिष शास्त्राला धरून नाही. जन्मकुंडली पाहिल्यावर अनेक मुद्दे ज्योतिषाच्या लक्षात येतात हे खरं असलं तरी प्रत्येक गोष्ट ज्योतिषानं अचूक ओळखावी असं घडू शकत नाही. आपली अडचण निःसंकोचपणे ज्योतिषासमोर मांडली तरच काही मार्ग निघू शकेल. अनेकदा लोक काही मुद्दे स्वाभिमानापोटी सांगत नाहीत. चुकीची किंवा अर्धवट माहिती ज्योतिषाला दिली तर मार्ग कसा काय निघू शकतो? मी मागे नमूद केलं होतं तसं उपाय ही केवळ औषधं आहेत पण त्यासाठी डॉक्टरला काय आजार आहे याची माहिती द्यावीच लागते. चुकीची औषधं आजार बरा करू शकणार नाहीत, तसंच चुकीच्या माहितीमुळे योग्य मार्गदर्शन मिळू शकणार नाही. म्हणून प्रश्नकर्त्यानं आपण ज्याच्याशी  निःसंकोचपणे बोलू शकतो अशाच ज्योतिषाकडे जावं.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही उपाय स्वतः ठरवून किंवा कोणी सांगितला म्हणून करू नये. मनःशांतीसाठी असलेले साधे मंत्र किंवा साधी स्तोत्रं म्हणायला काहीच हरकत नाही. पण विशेष उपाय मात्र योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच सुरु करावेत. याचं पाहिलं कारण म्हणजे उपाय कोणत्याही स्वरूपातला असो त्याची शक्ती आणि दोष हे जाणकार व्यक्तीलाच माहित असतात. दुसरं कारण असं की उपाय करताना असलेले विधी योग्य पद्धतीनेच केले गेले पाहिजेत. याचं गांभीर्य नसेल तर उपायांचं फळ मिळत नाही. प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्यात काही अडचणीही येऊ शकतात. अशा वेळी विधींमध्ये काही बदल करायचे असतील तर ते स्वतःहून करू नयेत. उदा: कधी कधी जपासाठी वेळ देता येत नाही. अशा वेळी जपसंख्या बदलताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. मंत्र म्हणताना स्पष्ट शब्दोच्चार हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेकदा शब्दोच्चार चुकतात ज्यामुळे मंत्राचा प्रभाव दिसत नाही. जपमाळ कोणत्या बोटांमध्ये धरावी यालाही काही नियम आहेत. तसंच कोणत्याही देवतेची आराधना करायची असेल तर त्या देवतेच्या रूप आणि गुणांची माहिती करून घ्यावी. त्यानुसार देवतेची आराधना करावी. अशा गोष्टींकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. या सगळ्या विधींची पूर्ण माहिती घेऊनच उपाय करावेत. 

काही लोकांना विधीवत उपाय केल्यानंतरही फळ मिळत नाही. यात प्रश्नकर्ता आणि ज्योतिषी दोघांचीही जबाबदारी असते. जसं प्रश्नकर्त्यानं आपण कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय करतोय याचं भान ठेवायला हवं तसंच ज्योतिषानं सुद्धा आवाक्याबाहेरील इच्छा, अटळ घटना याबाबतीत खोटी आश्वासनं देऊ नयेत. जर जन्मकुंडली नुसार एखादी गोष्ट मिळवणं अशक्यच असेल तर त्याची पूर्ण कल्पना ज्योतिषाने प्रश्नकर्त्याला द्यावी.  उपाय हे तेव्हाच प्रभाव दाखवतात जेव्हा तसे योग कुंडलीत असतात आणि काही अडथळ्यांमुळे इच्छा पूर्ण होत नसते. त्यामुळे ज्योतिषाने उपाय सांगताना किंवा भाकीत करताना प्रश्नकर्त्याला अंधारात ठेऊ नये.   

आपण अनेकदा वृत्तपत्र, दूरदर्शन वरील वाहिन्या, मासिकं अशा अनेक माध्यमांमध्ये रोजचं किंवा वार्षिक भविष्य असा एक भाग पाहतो. यातील भविष्य प्रत्येकाला तंतोतंत लागू पडेलच असं नाही. याचं कारण म्हणजे एकूण राशी फक्त बारा आहेत. प्रत्येक राशींची कोट्यावधी माणसं जगात आहेत. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य निराळं असतं. अगदी जुळ्या भावंडांच्या आयुष्यातही सगळ्या घटना एकसारख्या घडत नाहीत. मग केवळ राशींच्या आधारावर मार्गदर्शन कसं मिळू शकेल? अशा भाकितांचा उपयोग जुजबी गोष्टींत होत असेलही पण त्याचा खूप गांभीर्यानं विचार करून कोणतेही निर्णय घेणं किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे ठरवून त्या व्यक्तीला दोष देणं सर्वस्वी चूक आहे.     

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्योतिष शास्त्राच्या आहारी जाऊ नये. हे शास्त्र आणि उपाय यांचा अतिरेक कधीही करू नये. आपलं आयुष्य आपणच घडवायचं असतं. त्यात अडचणींच्या वेळी मार्गदर्शन आणि अडथळे दूर करण्यासाठी साहाय्य म्हणूनच ह्या शास्त्राचा वापर करावा. ज्योतिष शास्त्रालाही स्वतःच्या अशा मर्यादा आहेत त्या ओळखून ह्याचा अतिरेक टाळावा. योग्य प्रकारे या शास्त्राचा वापर केला गेला तरच या शास्त्राबद्दलचे गैरसमज दूर होतील. ज्योतिष शास्त्र हा प्राचीन भारतीय सांस्कृतीतला एक खजिना आहे. याचं जतन करून आधुनिक काळानुसार या शास्त्राची मांडणी केली तरच ह्या शास्त्राचं मोल पुढच्या पिढयांना कळेल.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                         ======================================================   

I elaborated on astrology and astrological remedies in my previous articles. Along with all such information some do's and don'ts should be followed while approaching any astrologer. These will not only help for getting results of the remedies but will also develop awareness regarding superstitions. Here are some technical know'hows of astrology and remedies.   


Many times due to circumstantial pressures or emotional stress people take support of astrology to get rid of their problems. Strong disbelievers also turn to this science when are under pressure. The main reason behind this is they believe in astrology and religion but they don't want any ostentation. Though this is a correct view they don't even want to know how to avoid this. If we go through some information regarding the basics of this science, we can surely differentiate between scientific aspects of astrology and ostentation. There is another misunderstanding in context with this point. The texts of Vedic astrology are ancient so obviously those are based on ancient cultures, customs and traditions. Some people are skeptical about the correlation of these texts with modern world. They usually ask 'how can anyone predict on new subjects which are not mentioned in these texts?'  Well, if we understand and interpret the symbolism in these texts then it will be very easy to relate the astrological theories with today's world. Lets take a simple example, planet Venus governs skin, art, beauty, passion and sexual pleasures etc. If Venus is well placed in one's Janm Kundli with benefic yogas then there are much higher chances that the person will become an actor/singer. Of course such a prediction needs deep study of one's Kundli, but from this example it can be understood how astrology can be related to the things in modern world. Astrologer's skill and knowledge are equally important in such interpretations.     

I have seen some people frequently approaching different astrologers without any significant reason. One should ask for prediction of Janm Kundli to only one astrologer. If it is not possible to approach the same astrologer again then one should approach another astrologer only when a guidance is required. Cross checking the predictions with different astrologers will create confusion. Also one should approach an astrologer with full faith. Comparing two astrologers and arguing by comparison of two astrologers should be avoided. Before approaching any astrologer one should definitely know about the authenticity of the astrologer but astrologers knowledge is more important than fame. Nobody should get carried away by fancy advertisements or public display of details in Tantric remedies etc.

As far as possible querents should avoid unnecessary discussion of the Janm Kundli predictions with anybody. The remedies specially mantras or rituals should be kept confidential.   

An astrologer can predict certain events from Janm Kundli and provide guidance but expecting the astrologer to tell each and every thing in life is redundant. In my practice as an astrologer many people expected that I should come to know about their queries just by looking at their Kundli. Well, many astrologers have intuition power but to 'predict' the query is too much. Similarly if the querent  frankly talks about the problems then only the astrologer can guide correctly. Some people adamantly do not disclose personal information, such incomplete data will not help to resolve the problems. As I mentioned in my earlier article, remedies are like medicines and for getting proper medicines the patient should not hide anything from the doctor. In the same way querent should disclose all required information to the astrologer rather I should say querent should approach an astrologer to whom he/she can fully trust. 

Another important point is one should not start any remedy by own. Chanting of simple mantras or stotras for peace of mind is no harm. But specific remedies should be started with proper guidance. The first reason behind this is only a knowledgeable person will know about the powers and drawbacks of a remedy. Secondly if rituals or method of a remedy are not followed as per protocols the results will not be obtained. Some times it is not possible to follow the method of a ritual then making alterations without consultation will not give desired results. For example some times chanting specific number of mantra or japa is not possible due to lack of time. In such cases the number of chanting should be altered with proper guidance. Proper pronunciation of alphabets is very important in chanting mantra. Wrong pronunciations of mantra will make it ineffective. Technique of holding the rosary also varies with rituals. Before starting any ritual one should have proper information about  the manifestation and gunas (knowledge, quality) of the deity to be worshiped. All such things are neglected many times which can affect the results of the remedies.

Many times people don't get desired results even after following the remedies as per protocol. This is a two way stream and both the querent and the astrologer should understand the application of remedies. The querent should not ask the remedies for impossible desires,similarly the astrologer should also avoid giving false hopes to the querent. In inevitable incidences the astrologer should tactfully explain the situation to the querent without lowering his/her morale.

News papers, news channels, magazines have a separate section of daily or yearly astrological predictions. These predictions can not be applicable to everybody for obvious reasons. There are only twelve zodiac signs and billions of people have the same zodiac sign. Every single person has a different life style, even twins do not have exactly similar events in their lives. So how can everything be predicted accurately by just a zodiac sign? These kind of predictions may be helpful at superficial level but taking them seriously can be dangerous. Taking some major decisions or labeling a person on the basis of these vague predictions is absolutely unjustified. 

Well the most important point is to succumb to Astrology and Remedies is not advisable at all. We have to establish our life and reach our goals by putting efforts. In this process astrology is useful to remove the obstacles if any. Astrology being a science has its own limitations, so it should not be overused. Understanding the concept of astrology and using it in a proper way can help to reduce the misconceptions. Vedic Astrology is an ancient tradition and a treasure in Indian history. We should preserve this remarkable science and make necessary changes according to time which will help our next generations to understand the importance of astrology as a science.    

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.     
                     ================================================    

Wednesday, 21 March 2018

ज्योतिष शास्त्रातील उपायांची पार्श्वभूमी -3 (The background of Astrological Remedies -3)


तांत्रिक उपायांमध्ये  'यंत्र' हा अतिशय परीणामकारक उपाय बऱ्याचदा सांगितला जातो. यंत्र म्हणजे प्रमाणबद्ध आकृतीतील ऊर्जा अशी साधी व्याख्या करता येईल. यंत्राचा आकार किंवा मिती हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. काही यंत्रांमध्ये चौकोनांमध्ये विशिष्ट आकडे, चिन्हं किंवा अक्षरं  लिहिली जातात. यंत्र बनवण्यासाठी धातू, कागद, भूर्जपत्र, झाडांची पानं, स्फटिक अशा अनेक साहित्यांचा वापर केला जातो. यंत्रात लिहिले जाणारे आकडे किंवा अक्षरं विशिष्ट प्रकारच्या शाईने लिहिली जातात. यंत्र बनवताना लागणाऱ्या नैसर्गिक गोष्टींमधील तत्त्वं या साधनाला प्रभावी बनवतातच पण यंत्रांचं रहस्य हे त्यांच्या आकृतीमधे असतं. त्रिमितीय यंत्र बनवल्यास त्यात ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असते, त्यामुळे संपूर्ण वास्तूसाठी याचा उपयोग केला जातो. ज्या भूमितीतील सिद्धांतांवर मंदिरं, पिरॅमिड बनवले जातात त्याच धर्तीवर यंत्रांचा प्रभाव असतो. द्विमितीय यंत्रांतील प्रमाणबद्ध आकार आणि त्याबरोबर मंत्रोच्चार आणि ध्यान धारणा यामुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा यांचा वैयक्तिक पातळीवर जास्त उपयोग केला जातो. मात्र ह्या यंत्रांचा वापर कसा करावा याची योग्य माहिती मिळाली तरच यांचा उपयोग होतो. 

याचा वैद्यकीय दृष्ट्या कसा फायदा होतो ते पाहू. उदा: श्रीयंत्रावर लक्ष केंद्रित करून नियमितपणे ध्यान केल्यास मेंदूतील पिनिअल ग्रंथींना चालना मिळते. भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित झाल्याने या ग्रंथी उत्तम क्षमतेने काम करतात. या ग्रंथींच्या स्रावांमुळे शांत झोप लागते. झोपेच्या अनियमितपणामुळे उद्भवणारे अनेक त्रास कमी होतात. परीणामी स्वभावातील चिडचिड कमी होऊन निर्णय क्षमताही वाढते. इतकेच नव्हे तर या स्रावांमुळे स्मरणशक्ती आणि मेंदूतील काही भावनांशी संबंधित भागावरही रक्ताभिसरणामुळे चांगला परीणाम होतो. अत्यंत शास्त्रीय दृष्ट्या बनवलेली ही यंत्रं योग्य पद्धतीनं हाताळली तर अतिशय प्रभावी असतात. कोणतेही यंत्र वापरण्यासाठी त्याची मिती आणि अर्थ यांचा बोध घेऊन साधना करावी. यासाठी दिलेले विधी शास्त्रोक्त असतात त्यामुळे विधीवत यंत्र साधना हा नक्कीच एक चांगला उपाय ठरू शकतो.   

तांत्रिक शाखेत देवतेच्या मूर्त स्वरूपाला महत्त्व असल्याने इतर उपायांमध्ये व्रत, पूजा अशा उपायांचाही उल्लेख होतो. एखाद्या आराध्य दैवताची किंवा कुलदेवतेची विधीवत पूजा करणे हा उपाय असला तरीही माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासावरून काही मुद्दे इथे सांगावेसे वाटतात. कुलदेवता ही मातेसारखीच असते. प्रत्येक कुळाशी त्या देवतेच्या रूपाचा घनिष्ट संबंध असतो. म्हणून कोणत्याही विशेष कार्यापेक्षा नियमितपणे कुलदेवतेची आराधना करणं चांगलंच आहे. अनेक पिढ्यांनी त्या देवतेची आराधना केली असल्याने एक वलय आपल्याभोवती तयार झालेलं असतं. अशा आधीच तयार झालेल्या ऊर्जेमुळे फार कठीण साधना न करताही अशा वेळी मनःशांती मिळते. मात्र काही कारणासाठी आराध्य देवतांची तांत्रिक साधना करताना देवतेचं रूप समजून घ्यावं. देवतेच्या गुणांप्रमाणेच ही रूपं असल्यानं आपल्या इच्छित कार्याशी संबंधित रूप असलेली देवता असावी. 

तांत्रिक उपायांत 'तंत्र' हा गाभा आहे. कोणतीही देवता हे प्रचंड उर्जेचंच रूप. त्यामुळे आराधना करण्याचं तंत्र म्हणजेच विधींचे नियम पाळावेत. अगदी साधी उदाहरणं बघितली तरी ही गोष्ट लक्षात येईल. कोणताही पदार्थ स्वयंपाकघरात बनवताना त्याला लागणारं साहित्य, वेळ आणि तापमान (म्हणजेच पाककृती) याचा समन्वय नसेल तर पदार्थ बिघडतो. तसंच विधींचा समन्वय साधला गेला तरच तंत्राचं फळ मिळेल. या विधींमधील काही गोष्टी मूळ कारण माहित नसल्याने कधी कधी पटत नाहीत. त्या टाळल्या गेल्या तर समन्वय बिघडतो. म्हणूनच जे विधी बुद्धीला पटत नाहीत ते एकदम टाळण्यापेक्षा त्याची माहिती करून घ्यावी. त्याचा अर्थ समजल्यावर योग्य व्यक्तीच्या सल्ल्याने त्यात बदल नक्की करता येऊ शकेल. तसंच अर्थ माहित नसताना केलेले विधीही फलदायी होणार नाहीत. केवळ पाठांतर करून केलेल्या मंत्रोच्चारात एकाग्रता होत नाही कारण मंत्रांचा अर्थ माहित नसतो. आपण करत असलेल्या उपायावर श्रद्धा असणं हेही तितकंच महत्त्वाचं, कारण श्रद्धा हीसुद्धा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जाच आहे. मनात शंका असेल कोणत्याही उपायाचं फळ मिळत नाही. 

तांत्रिक शाखेमध्ये अभिचार कर्मासाठी बरेच विधी दिले आहेत. ह्या कर्मांचा मूळ उद्देश हा स्वसंरक्षण आहे. उदा: उड्डीश तंत्रात भगवान शिवानेही मारण तंत्राचा वापर केवळ जीवाला धोका असेल तरच करावा असं सांगितलं आहे. अर्थात हे लिखाण झालं तेव्हाची समाज व्यवस्था अत्यंत वेगळी होती हा मुद्दा लक्षात घ्यावा. मात्र काही (स्वघोषित) तांत्रिक याचा वापर करून अभिचार कर्म करतात. मूळ उद्देश माहित नसताना स्वार्थासाठी केलेलं अभिचार कर्म हे वाममार्गीच असणार म्हणूनच या विधींचा गैरवापर करू नये. शाबरमंत्रांसारखे स्वयंसिद्ध मंत्र (ज्यांना सिद्ध करण्याची गरज नाही) असे मंत्र योग्य पद्धतीने वापरावे. अनेकदा अशा मंत्रांची माहिती देताना अतिशयोक्ती केली जाते. तंत्र शास्त्र ही काही जादूची कांडी नाही. अशक्य गोष्टी अथक प्रयत्नानं शक्य करणं मनुष्याच्या हाती नक्कीच आहे. त्यात अडथळे येऊ नयेत यासाठी अशा उपायांचा वापर करावा. पण महामृत्यू सारख्या अटळ गोष्टी, आवाक्याबाहेरील गोष्टी यासाठी ह्या शास्त्राचा कोणताही उपयोग होत नाही. अशा अतिशयोक्तीमुळे केवळ अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं. मानवी बुद्धीला अजूनही ज्ञात  नसलेल्या अनेक गोष्टी आहेत. अगदी निष्णात डॉक्टर, मोठे संशोधक अनेकदा निसर्गापुढे हतबल होतात. नैसर्गिक चमत्कार विज्ञानाच्या चौकटीत बसत नसले तरी ह्या चमत्कारांमागील कारणं एका अर्थानं नैसर्गिकच असतात फक्त ती आपल्या बुद्धीच्या पलीकडील असतात. अशा काही गोष्टींचा संदर्भ तंत्रशास्त्रा सारख्या शास्त्रांमध्ये आहे. अनेक धर्मांत अशा विषयांवर विविध ग्रंथ लिहिले गेले आहेत. या ग्रंथांचा प्रतीकवाद समजून घेतला तर अतिशयोक्ती नक्की टाळता येईल. तसंच हे ग्रंथ निर्माण झाले तेव्हाची समाज व्यवस्था, नियम, भौगोलिक परिस्थिती, हवामान, वनस्पती आणि प्राणी या सर्वच गोष्टी आतापेक्षा भिन्न होत्या. अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच उपायांचा अवलंब करावा.  

तंत्र शास्त्रातील काही नेहमी दिल्या जाणाऱ्या काही उपायांबद्दल मी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या शास्त्रात इतर उपायही आहेत ज्यासाठी काही गूढ विधी आहेत. मात्र सर्वच उपाय इथे सांगणं अशक्य आहे. कोणताही उपाय करताना उपायाचे विधी, नियम हा भाग महत्त्वाचा आहेच पण काही वेळा काही अलिखित नियमांचं पालनही करावं. हे अलिखित नियम कोणत्याही कसोटीत बसत नसले तरी सारासार विचार केला तर या गोष्टी नक्कीच मनाला पटतात. अशा काही गोष्टींबद्दल पुढील लेखात लिहिण्याचा प्रयत्न करेन.     

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यासshivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                                   =====================================================

'Yantra' is a very popular and effective Tantric remedy. Yantra literally means machine. So Yantra as a remedy can be simply defined as symmetrical diagram of cosmic energy. The geometry of Yantra is a very important aspect. In some Yantras specific numbers, alphabets or symbols are written in squares. Yantras can be drawn or made on different materials like metals, papers, bhojapatras, leaves, gems or crystals. The symbols, alphabets or numbers are written using specific inks. Though the natural materials used in making of Yantra make it powerful, its secret lies in its symmetrical diagram. Three dimensional Yantras have powers to attract cosmic energies so these Yantras are used for abodes. The Pythagoras theory or geometry of Temples/Pyramids can be the most relevant examples to understand the principle behind Yantra symmetry. Two dimensional Yantras drawn on specific material are mostly used for individual purposes. Mantra chanting along with mediation by concentrating on two dimensional Yantras help gaining positive energies. The specific rituals for energizing the Yantras should be followed to gain the results. 

Lets see how Yantras affect human mind from a scientific point of view. Sri Yantra for example is geometrically so precise that while meditating on it by focusing between eyebrows stimulates Pineal Glands. The secretions of these glands not only control sleep but are also linked to memory and some other emotions. Thus these scientifically designed Yantras are very effective if properly used. Any Yantra should be used as a remedy after understanding the symmetry and its meaning. The rituals recommended for energizing the Yantras are scientific. So the worship of Yantra after following all rituals can definitely be an effective remedy. 

As Tantra tradition emphasizes on manifestation of the deities, some of the other remedies includes Vrata (resolution) or Pooja. Worshiping a deity or Kula Devata (family deity or mother Goddess) by Pooja is one of the remedies, but some concepts are needed to be understood. Kula Devata is like a mother, who is closely related to the family. So rather than worshiping Kula Devata for a particular purpose, her daily worship is always fruitful. Her worship for generations together creates a protective circle of energy around the family members. This circle of energy helps to get some solutions or mental peace by simple methods of worship. If a different deity is to be worshiped for a purpose then one should understand the manifestation of the deity. These manifestations are the forms of their qualities or knowledge so the deity (quality) related to the purpose should be worshiped.   

In Tantric remedies methodology is the key factor. Any deity is a form of energy. So the method of worship i.e. rituals should be followed. Take a simple example for understanding importance of methodology. For preparing a food item, quantity of the ingredients, time, temperature (recipe) should be followed as prescribed. Any alteration can spoil the food item. In the same way if the method of rituals is followed as prescribed then only it will give results. Some people do not agree to the protocols of rituals because they don't know the principles behind the rituals. The skipping or avoiding any step in the rituals can not give the desired results. The principles behind the rituals should be understood rather than disapproving the rituals. After understanding the rituals one can definitely ask for some alteration if the procedure is not possible to perform. In the same way any ritual performed without knowing the meaning or principles can not be fruitful. Blindly chanted Mantras can not give results as one can't concentrate on them without knowing the meaning.   

In Tantra tradition various rituals are given for abhichara Karmas. The aim of such Karmas is self defense. For example in Uddish Tantra Lord Shiv stated that Maran Tantra must be used only in life threatening situations. It should be understood that when these rituals were written the system of the society was totally different than what it is today. In spite of this some Tantra experts (mostly self declared) use the rituals for abhichara Karmas. Any abhichara ritual performed for evil purposes without proper knowledge will lead to trouble. Thus misuse of these Tantric rituals must be avoided.The Sidha mantras (which don't need energizing) like Shabar Mantras must be used carefully. Many times information provided for these mantras is exaggerated. Tantra tradition is definitely powerful but not magical. Difficult or impossible goals can be achieved by putting human efforts tirelessly. And the remedies should be used to remove any obstacle if present. In inevitable incidences like Mahamrutyu or desires beyond human capacity, this science will not play any role. Any exaggeration of remedies in such cases increases superstitions. There are many secrets of nature which are still not discovered by humans. Sometimes expert doctors/surgeons, scientists or engineers throw up their hands in despondency. These 'miracles' in one sense occur due to natural reasons only; just they are still not discovered by human brain. Tantra tradition texts or texts from various religions have references for such 'miraculous' events. If we understand the symbolism in these texts any exaggeration can be avoided. We should also understand that most of these texts are ancient when rules of society, environmental and geometrical conditions, plants, animals etc was totally different than today's world. So proper interpretation of these texts is important. 

I tried to explain some common remedies from Tantra tradition. There are some other remedies where occult rituals are performed. Explaining all remedies is not possible here though. For any remedy protocols are definitely important but apart from protocols or rituals there are some unwritten laws which should be followed. These unwritten laws may not fit in any protocol per se but are some sensible ways to follow. I will try to write on such do's and don'ts in my next article.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                             =======================================================

Friday, 16 March 2018

ज्योतिष शास्त्रातील उपायांची पार्श्वभूमी - 2 (The background of Astrological Remedies - 2)



तांत्रिक शाखा वैयक्तिक पातळीवर भर देत असल्याने त्यातील उपाय कर्मांवर आधारीत आहेत. सिद्धी, साधना ही प्रमुख शुद्ध कर्म आहेत ज्यात अनेक विधी आहेत. जी कर्म संरक्षणाच्या हेतूने तंत्र शास्त्रात लिहिली गेली पण केवळ वाईट कार्यासाठी जास्त प्रमाणात वापरली गेली त्यांना अभिचार कर्म किंवा वाममार्गी कर्म म्हटलं जातं. प्रामुख्याने आकर्षण, वशीकरण, स्तंभन, विद्वेषण, उच्चाटन आणि मारण ही अभिचार कर्म आहेत. 

या कर्मांवर आधारीत उपाय वैयक्तिक पातळीवर करता येत असले तरी सोपे नक्कीच नाहीत. यामागे अनेक गूढ विधी आहेत ज्याची माहिती काही तांत्रिक शाखेतील तज्ञांनाच आहे. कुंडली विवेचनाच्या वेळी अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख झाल्यास त्याची संपूर्ण खात्री करून घ्यावी.   

मी मागे नमूद केल्याप्रमाणे वैदिक आणि तांत्रिक शाखा या संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत हा मुद्दा लक्षात घ्यावा. तांत्रिक शाखेतील अनेक उपायांपैकी सध्याच्या काळात रत्न, मंत्र, तंत्र, यंत्र अशा रूपात सांगितले जातात. त्याचबरोबर एखाद्या दैवताची आराधना करण्यासाठी स्तोत्रं दिली जातात. पण या उपायांमागे असलेले बरेचसे विधी सांगितले जात नाहीत. स्तोत्र वा मंत्र म्हणण्याची पद्धत, शब्दोच्चार, वेळ, दिशा, वापरण्याचे आसन, यंत्र बनवण्याचे नियम आणि त्यासाठी लागणारे साहित्य अशा अनेक गोष्टींत योग्य मार्गदर्शन न झाल्यानं तांत्रिक उपायांची फळं मिळत नाहीत. 'त्र' या संस्कृत शब्दाचा अर्थ (तारणारा) साधन असा आहे, या धातूवरच काही साधनांची नावे दिली गेली आहेत. 'मंत्र' हे मनाला तारणारं साधन आहे. 'यंत्र' हे एखाद्या गोष्टीला (कार्याला) साहाय्य करण्यासाठी किंवा त्यावर अंमल करण्यासाठी (यम्) बनवलेलं साधन आहे. 'तंत्र' हे विशिष्ट पद्धतीनं गुंफलेलं साधन आहे. हे उपाय ही कार्यसिद्धीसाठीची साधनं आहेत. मनुष्याचे प्रयत्न योग्य पद्धतीनं होत असतील तरच या साधनांचा उपयोग होतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की तांत्रिक उपाय करताना आपण ज्या कार्यासाठी उपाय करतो त्या कार्याच्या प्रकृती नुसार देवतेचं रूप डोळ्यासमोर आणल्यास कार्यसिद्धी लवकर होते. सात्त्विक कार्य असेल तर देवतेच्या सात्त्विक रूपाचं ध्यान करावं म्हणूनच अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना सरस्वती किंवा गणपती यांच्या सात्त्विक रूपाचं ध्यान आणि मंत्र आराधना करायला सांगावी. जेव्हा सात्त्विक कार्य नसेल तेव्हा देवतेच्या उग्र रूपाचं ध्यान करावं. उदा: एखाद्या व्यक्तीकडून काही त्रास होत असेल तर शिवाचं उग्र रूप किंवा वीर हनुमानाचं वीरासनातील रूपाचं ध्यान करायला सांगून तसे मंत्र आराधनेसाठी दिले जावेत. 

'रत्न' हा प्रामुख्याने दिला जाणारा उपाय आहे. ऋग्वेदकालापासून रत्नांचा उल्लेख अनेक ग्रंथांत आढळतो. पण वैदिक काळातील आणि आधुनिक काळातील रत्नशास्त्र ह्यांचं तत्त्व एकच आहे का असा ठोस पुरावा मात्र उपलब्ध नाही. रत्नं मुख्यतः खनिजं असतात, काही रत्नं जलजन्य, वनस्पतीजन्य व प्राणिजन्यही आहेत. रत्नांचा प्रभाव हा त्यांच्या रासायनिक गुणांवर अवलंबून असतो. ढोबळ मानाने सांगायचं तर एखाद्या अनिष्ट ग्रहाची किरणं शोषून घेऊन त्यांचं निष्क्रियीकरण करणे हा रत्नांचा खरा प्रभाव असतो. रत्नांचे आणि रत्नं ज्या धातूमध्ये जडवलेली आहेत त्या धातूंचे रासायनिक गुण यांचा एकत्रित परीणाम म्हणजेच रत्नांचा प्रभाव. एखाद्या अनिष्ट ग्रहाऐवजी एखाद्या शुभ स्थितीतील ग्रहाचं रत्न देऊन त्याग्रहाची चांगली फळे मोठ्या प्रमाणावर मिळवणे हाही कधीतरी उपाय होऊ शकतो. मात्र याचं निदान करण्यासाठी माहितगार ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. ज्या कार्यासाठी रत्नं वापरायची आहेत त्यासाठी ती मंत्रोच्चार, होम अशा विशिष्ट विधींनी सिद्ध केली जातात, अर्थात दर वेळी याची गरज असतेच असं नाही. रत्नं महाग असल्यानं कधीकधी त्यांची उपरत्नं वापरण्यास सांगितली जातात. रत्नं शरीरावर कुठे परिधान करावी यामागेही काही कारणं आहेत. कोणत्याही ग्रहांच्या किरणांचं निष्क्रियीकरण करण्यासाठी ते किरण त्या रत्नांच्या संपर्कात यायला हवेत. अशा वेळी शरीरातील कोणत्या भागातून किरणांना जास्त प्रमाणावर आकर्षिलं जाऊ शकेल त्या ठिकाणी रत्न असल्यास त्याचा परीणाम अनुभवायला मिळू शकेल. यात सामुद्रिक शास्त्राचा संदर्भ येतो. हस्तसामुद्रिक शास्त्रात हातावरील बोटांना ग्रहांचं प्रतिनिधी मानून तशी नावं दिली गेली आहेत. उदा: गुरुचं बोट म्हणजेच तर्जनीमध्ये गुरुचं रत्न पुष्कराज परिधान करावं. रत्नशास्त्र आता खूप प्रगत झालं आहे. आयुर्वेद शास्त्रातही रोग बरा करण्यासाठी रत्नभस्म दिलेली आहेत. रत्नं मनुष्याच्या शरिराभोवतीच्या कोषांमधील समतोल राखण्यास मदत करतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक रोग बरे होण्यास मदत होते. जरी प्रत्येक राशीसाठी काही रत्नं नेहमी सांगितली जातात तरी जन्म कुंडलीनुसार याची गरज असतानाच याचा वापर करावा. 

पुढील उपाय म्हणजे 'मंत्र'. मंत्रोच्चारातील शक्ती हा सखोल विषय आहे. स्वरांचा मनावर होणारा प्रभाव विज्ञानाने सिद्ध झालेला आहेच. विविध स्वर अशा पद्धतीने  गुंफून 'मंत्र' लिहिले गेले आहेत की ज्याच्या पुनरुच्चारामुळे स्वरांचा ठराविक परीणाम दिसून येतो.म्हणूनच एखाद्या कार्यासाठी मंत्रसंख्या निश्चित केली आहे. कोणताही मंत्र उपाय म्हणून दिला असेल तर आधी त्या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मंत्र म्हणताना त्या अर्थानुसार भाव मनात असावेत. आपण कोणत्या कार्यासाठी मंत्र म्हणत आहोत त्यानुसार देवतेचं रूप ध्यानात असावं. तंत्र शास्त्रात मंत्रांसाठी काही वेळ, दिशा, आसन, जपमाळ, वस्त्र असे काही नियम निश्चित केले आहेत. यामागे अनेक तत्त्वं, वास्तूदेवतांच्या दिशा असे अनेक मुद्दे विचारात घेतले आहेत. वैयक्तिक पातळीवर अशी साधना करताना यामागील कारणं समजून घ्यावीत. षट्कर्मांपैकी सिद्धी किंवा साधना कर्मासाठी पहाटेची वेळ उत्तम असते. साधना हे शुद्ध कर्म आहे त्यामुळे सूर्यप्रकाश, शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न राहतं आणि शरीरातून चांगली ऊर्जा मिळत असते. दिशा पूर्व असते ज्यामुळे उगवत्या सूर्याचे कोवळे किरण अंगावर पडून कडक उन्हाचा त्रास होत नाही. इतर वैयक्तिक कामांसाठी संपूर्ण दिवस मिळतो त्यामुळे कामांचे विचार येऊन मन विचलित होत नाही. सूर्याच्या कोवळ्या उन्हातील ड जीवनसत्व शरीरास आवश्यक असतं. म्हणून अशा साधना नेहमी केल्यास शरीराला पूरकच ठरतात. कोणत्याही शुद्ध कर्मासाठी किंवा केवळ आत्मशुद्धीसाठी पहाटे जप केल्यास निश्चितच फळ चांगलं मिळतं. विशिष्ट वस्त्र व आसन यामागे ग्रहांची किरणे व नैसर्गिक शक्ती आकर्षून घेणे हे प्रमुख कारण आहे. रंगांचा भौतिकशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केल्यास याची माहिती मिळते. जपमाळ यामागील प्रमुख कारणही हेच असावं. रुद्राक्ष या फळाच्या नैसर्गिक गुणांमुळे कोणत्याही साधनेसाठी विशिष्ट जपमाळ उपलब्ध नसेल तर रुद्राक्षमाळ वापरली जाऊ शकते. म्हणून दुर्मिळ किंवा महाग असलेल्या जपमाळा घेणे शक्य नसल्यास रुद्राक्ष माळेचा वापर करावा. साधना मार्गात प्रगती करायची असेल तर मात्र माहितगार व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावं. कारण मंत्रशक्तीचा चुकीचा वापर झाल्यास याचा त्रास होऊ शकतो.    

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                    ==================================================

As Tantra tradition emphasizes on individuality, the remedies in Tantra are based on Karma. Sidhi (Achievement) and Sadhana (Meditation) are major Shanti Karmas (pacification). The Karmas originally mentioned for defense purpose which got mostly used for evil purposes are known as Abhichara Karma or Vaammargi Karmas (Left handed). Mainly Akarshan (attraction), Vashikaran (enchantment), Stambhan (immobilization), Vidweshan (creating enmity), Uchchatan (expulsion) and Maran (killing) are the abhichara Karmas. Though the remedies based on these Karmas are individualistic, they are definitely not simple. Only some masters of Tantrik tradition know the exact procedures of the occult rituals for these remedies.     

As I mentioned before Vedic and Tantric traditions are intermingled. From various Tantric remedies in the Tantra tradition, now a days mostly gemstones, mantras, yantras, tantras are recommended. Along with these some Stotras (hymns) are recommended for the worship of a deity. The key rituals for these remedies are usually not disclosed. Lack of guidance in such rituals, like method for chanting stotras, pronunciations, timings, directions, asana or rituals of making a yantra leads to unfruitful efforts. Coming to the basics of Tantra, 'Tr' is Sanskrit root which means a 'tool'. Names of many remedies are based on this root. For example Mantra is a tool guiding the mind, Yantra is a tool to control and Tantra means woven tool ( 'tan' means loom). These remedies act as a supplement to human efforts by removing obstacles if any. Another important point in Tantric remedies is the manifestation of a deity according to the nature of the desired work should be meditated in mind. When 'sattvik' achievement is desired a 'sattvik' or calm manifestation of the deity should be meditated. So for students desiring achievement in academics a 'sattvik' manifestation of Goddess Saraswati or Lord Ganesha is recommended for meditation purpose. Similarly when the desired work is not 'sattvik' then fierce manifestation of the deity should be meditated in mind. For example if one is getting harassed or threatened,  then fierce personification of Lord Shiv or Veer Hanuman etc are recommended for meditation.

'Gemstone' is a most popular remedy now a days. Though Gemstones are mentioned in the texts of Vedas, the principle of Gems as a therapy in Vedic era is not clear. These Gemstones are mostly minerals. Some Gemstones are waterborne, plant-borne or even animal borne. The effect of Gemstones depends on their chemical composition. Broadly speaking Gemstones can absorb and nullify the rays of a inauspicious planet. Gemstones and the metals in which they are carved together help to get the outcome. In some cases a Gemstone for an auspicious planet is recommended as a remedy. Though in such cases advise from a knowledgeable person is required. For their use as a remedy some times Gemstones are energized by certain rituals. If precious Gemstones are not affordable, semi precious Gemstones are recommended. The use of the Gemstones on a particular body part is important. The science of palmistry describes each finger as a representative of a planet. For example, index finger represents Jupiter and  Yellow Sapphire is recommended to be wore on index finger. Ayurveda also prescribes the ashes (bhasma) of Gemstones as a remedy for curing diseases. Gemstones also balance the human aura curing psychological and physical illnesses. Thus the effect of Gemstones is well known. In Astrology Gemstones are recommended for all twelve signs, but Gemstones should be used as a remedy only if required. 

The next remedy is 'Mantra'. The powers of Mantra is a vast topic. The effect of sound waves on our mind is proved by science. In Mantras different sound waves are woven in certain fashion and the repeated chanting of these sounds is very effective. So the number of chants is fixed for a specific Mantra. When any Mantra is recommended as a remedy one should understand the meaning of the Mantra and then should worship the personification of God while meditation during chanting. Tantra tradition has prescribed specific timings, direction, asana, rosary and clothing for specific Mantra chanting. One should learn these basics before starting Mantra sadhana as a remedy. Mantra sadhana is also a scientific ritual which benefits human body in many ways. For example, for Shanti Karmas, early morning time is recommended. At dawn the Sun rays are not harsh and the clean air keeps the mind calm. The skin absorbs the early sun rays at dawn, which provides ample vitamin D as compared to the harsh rays at noon which can be harmful. So such meditation practices always reduce the risk of health issues. Specific asana or the cloth on which one sits during meditation and one's clothing has scientific reasons. Different colours can attract different energies. Physics can explain the details of this phenomenon. The scientific reason behind the rosary is also related to absorbance of energies. Rudraksha is a fruit which has many such properties. Probably this is the reason why rudraksha bead rosary can be used for any Tantric ritual irrespective of the purpose. So when a rare or a costly rosary is not available a rudraksha rosary can be used for any remedy or even simple meditation. Apart from remedies if any one wants to make progress in spirituality, one must take proper guidance, as misuse of the Mantra powers can be harmful.

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com. 
                     ==================================================

Sunday, 11 March 2018

ज्योतिष शास्त्रातील उपायांची पार्श्वभूमी (The background of Astrological Remedies)


मागील लेखात मी 'उपाय' ही संकल्पना थोडी विस्तृत करून सांगण्याचा प्रयत्न केला. आता प्रामुख्याने जे उपाय सांगितले जातात त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. 

वैदिक शास्त्रातील उपाय काय आहेत हे समजण्यासाठी आधी त्यांची तत्त्वं समजून घ्यावी लागतील. वैदिक शाखेमध्ये देवतेचं रूप हा उल्लेख फारसा आढळत नाही. मुख्य देवतांमध्ये इंद्र, वरूण, अग्नी, सूर्य अशा नैसर्गिक रूपातील गुणांना महत्त्व आहे. सरस्वती, विष्णू आणि रुद्र अशा देवतांचा काही ठिकाणी उल्लेख आहे. पण देवतेला मूर्त स्वरूप देण्यापेक्षा देवतेच्या गुणांची आराधना केली जाते. उदा: 'शिव' (रुद्र) ही देवता ऋग्वेदामध्ये परमदैवत आहे. पण शिवाची व्याख्या अग्नि सोमात्मकम् अशी आहे. म्हणजे अग्नि (रुद्र) आणि सोम (शिव) या नैसर्गिक गोष्टींचं नाव शिव आहे. अशा गुणांची आराधना ही अत्यंत सात्त्विक आहे असंही नाही. काही वैदिक विधी वाममार्गीही आहेत. वैयक्तिक सुखासाठी, युद्धात अपराजित राहण्यासाठी अनेक वाममार्गी विधी आहेत. पण मुख्यतः वैदिक विधींचा भर हा परमतत्वाच्या (ज्योतिर्मय प्रकाशाच्या) आराधनेवर असल्याने आणि काळानुरूप आलेल्या बदलांमुळे वैदिक शाखा तांत्रिक शाखेपासून संपूर्णपणे वेगळी आहे असं आपल्याला भासतं. 

वैदिक शास्त्रातील उपायांपैकी 'यज्ञ' हा पूर्वीच्या काळी केला जाणारा उपाय होता, ज्याचा उल्लेख अगदी रामायणातही आहे. यज्ञ म्हणजे देवतेला काही अर्पण करून त्याची आराधना करणे. यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. पण आताच्या काळात यज्ञाचे यथासांग विधी कमी वेळा केले जातात. कारण यज्ञाचं मूळ रूप हे पूजन, अर्पण किंवा बळी देणे, दान अशा काही स्तंभांवर आधारीत आहे. काळानुसार नरबळी, प्राण्यांचे बळी यावर बंदी घालण्यात आली. आता अशा वेळी नारळ फोडून हा विधी केला जातो. हविष्य म्हणजे ज्याची आहुति द्यायची आहे त्या पदार्थांमध्येही बदल होत गेले. यज्ञामध्ये अग्नि हिच देवता असली पाहिजे असे नाही. त्या त्या आराध्य देवतेनुसार विधी संपन्न केले जातात. यज्ञ हा विधी अनेक दिवसांचा, महिन्यांचा वा वर्षांचा असू शकतो. काही यज्ञ हे संस्कार असतात उदा: विवाह (सप्तपदी), नामकरण. हे एकदाच करायचे असून यासाठी लागणारा वेळ कमी असतो.  

होम किंवा हवन म्हणजे अग्निला हविष्य अर्पण करणे किंवा आहुति देणे.  यज्ञाचा आवाका मोठा असतो पण होम हा विधी वैयक्तिक कारणांसाठीही करता येतो. कोणत्याही वास्तूमध्ये होम नियमितपणे होत असेल तर आत्मशुद्धी तर होतेच पण वातावरणातील जंतू नाश पावतात आणि शुद्ध हवा खेळती राहते. असे काही शास्त्रीय गुण आता विज्ञानानेही सिद्ध झाले आहेत. अग्निसाठी लागणारं होमकुंड, हविष्य अशा अनेक गोष्टी अत्यंत नैसर्गिक आणि काहीवेळा औषधी परीणाम करणाऱ्या असतात. यामुळेच विशिष्ट हविष्य, होमकुंड बनवण्याचं साधन आणि अग्नि प्रज्वलन करताना वापरलेली सामुग्री याचा एकत्रित परीणाम होऊन अनेक फायदे होतात. 

काही पूजा, इष्टी विधी, पुरश्चरण, सत्र, याग हे सर्व वैदिक विधींचेच भाग आहेत, प्रामुख्याने यज्ञाचे. या सर्व वैदिक विधींसाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या पुरोहितांची गरज असते. 'गृह्य' विधींमध्ये वैयक्तिक कारण असल्याने घरातील व्यक्ती पुरोहितासोबत विधी करू शकते पण बाकी विधी मात्र केवळ पुरोहितच करतात. याचं जे कारण मला समजलं ते येथे मांडण्याचा प्रयत्न करते. ह्या विधींचे नियम हे वर्णसंस्था अस्तित्वात असताना केले गेले आहेत त्यामुळे त्यात जातसंस्था नाही हे प्रथम लक्षात घेऊन गैरसमज टाळावेत. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेताना ब्राह्मण विद्यार्थी (वर्णानुसार) मंत्र, पठण, ध्यान इत्यादी पद्धतीने अध्ययन पूर्ण करून त्यावर प्रभुत्व मिळवीत असे. हे अध्ययन संसारी व्यक्तीला किंवा दुसरा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अशक्य असावं, कारण या अध्ययनाला एकाग्रतेने वेळ देणे अशा व्यक्तीला शक्य होणार नाही. तसंच प्रत्यक्ष विधी अनेक दिवस किंवा महिने चालणारा असू शकतो. अशा वेळी पूर्णवेळ पौरोहित्य करणारी व्यक्तीच हे विधी संपन्न करू शकेल. म्हणूनच वैदिक विधीसाठी (किमान एका) पुरोहिताची गरज असते. 

या वैदिक उपायांचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो? वैदिक विधींमध्ये अग्नि (ऊर्जा) आणि मंत्रोच्चार (स्वर) या दोहोंचा परीणाम दिसून येतो. होम/यज्ञासाठी तयार केलेली वेदी म्हणजेच होमकुंड/यज्ञकुंड विविध नैसर्गिक गोष्टींपासून बनवलं जातं. त्याचे विविध आकार अग्निची ऊर्जा विशिष्ट पद्धतीनं पसरवण्यास मदत करतात. यामुळे हविष्य ज्वलनासाठी योग्य वेळ मिळून वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी उपयोग होतो. तसेच कुंड बनवण्याचे साधनही अग्निमुळे तापून त्याचे रासायनिक गुणही ऊर्जेत मिसळतात. आपण जेवण बनवताना लोखंडाच्या भांड्यांचा वापर केल्यावर अन्नात जसं लोह उतरतं तसाच हा परीणाम आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या समिधा म्हणजेच लाकूड हे विशिष्ट गुणांनी युक्त असतं. उदा: चंदन, रक्तचंदन अशा विविध लाकडांचा उपयोग केला जातो. ज्वलना नंतर यातील रासायनिक गुण औषधी परीणाम करतात. हविष्य हेही अनेक प्रकारचं असून नागकेशर, शंखपुष्पी, सुंठ, तमालपत्र अशा विविध औषधी वनस्पतींमुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन हवा शुद्ध होते. हवेतील जिवाणू मारले जातात. अनेक रोगांवर याचा उपचार म्हणून वापर केला जातो (ऍरोमा थेरपी, यज्ञ थेरपी). फक्त माणसांसाठी नाही तर झाडांसाठीही याचा उपयोग केला जातो. हवेतील झाडांना लागणारी कीड अनेकदा मारली जाते आणि रसायनांचा वापर न करता झाडं उत्तम प्रकारे वाढू शकतात. तुपाच्या वापरामुळे अग्नि हळूहळू जळत राहतो व एकदम सर्व हविष्य जाळून खाक होत नाही. कारण अग्निमुळे वाढणारी प्रचंड उष्णता औषधी वनस्पती काही क्षणात भस्म करू शकेल, पण तूप वापरल्याने यास पुरेसा वेळ मिळून रासायनिक तत्त्वं वातावरणात मिसळतात. मोठ्या आकाराच्या जमिनी किंवा घरे यांच्या शुद्धीकरणासाठी हा विधी अनेक दिवस चालू शकतो. मंत्रोच्चारामुळे अनेक ऊर्जा मानसिक परीणाम करतात. स्वरांमुळे  होणारा मानसिक परीणाम आता विज्ञानाने सिद्ध झालाच आहे. वैदिक विधींमधील मंत्रोच्चार अशा पद्धतीने गुंफले गेले आहेत की त्यामुळे मानसिकच नाही तर शारीरिक रोगांवरही औषधी परीणाम होतो. मनुष्य, झाडं, प्राणी सर्वांवर स्वरांचा परीणाम होतो. यामुळेच वैदिक उपायांचा आवाका मोठा आहे असं मी नमूद केलं होतं. जिथे अग्निचा वापर करण्याची आवश्यकता नाही अशा विधींमध्ये मंत्रोच्चार, ध्यान अशा पद्धतींनी चांगली ऊर्जा आकर्षित केली जाऊन वाईट ऊर्जा दूर केली जाते. वैदिक विधींमध्ये दानालाही खूप महत्त्व आहे. एखाद्या गरजू व्यक्तीस दान केल्यानं ती व्यक्ती समाधानानं चांगली ऊर्जा दान देणाऱ्याला देत असते. यालाच आपण सोप्या शब्दात आशिर्वाद म्हणतो. अशा चांगल्या ऊर्जेमुळे आपल्या वृत्तीमध्ये  फरक पडतो, दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा होते, कुविचार कमी होतात. याचा चांगला परीणाम आयुष्यावर होतोच. 

सध्याच्या काळात शक्य असणारे वैदिक विधीच फक्त केले जातात. त्यामुळे वैदिक उपायांचा वापर करताना वैदिक ग्रंथांमध्ये लिहिलेलं फळ आपल्याला जसं च्या तसं मिळेल अशी अवाजवी अपेक्षा बाळगू नये. आणि उपाय करताना त्यामागील तत्त्वं समजून घेऊन मगच उपाय करावा.

प्रामुख्याने दिल्या जाणाऱ्या उपायांपैकी दुसरा प्रकार आहे तांत्रिक उपायांचा. तांत्रिक शाखेचा उगम हा थोडा वादाचा मुद्दा आहे. पण तांत्रिक शाखा हा वैदिक शाखेचाच भाग असून काही तात्त्विक फरकामुळे ही शाखा वेगळी मानली जाते. वैयक्तिक पातळीवरील साधना आणि देवतेचं शक्ती रूप हे दोन मुख्य फरक आहेत. तांत्रिक विधींशी साधर्म्य असणाऱ्या विधींचा उल्लेख वेदांमध्येही आढळतो. मंत्र, होम, आहुति हे विधी तंत्र शाखेतही आहेत. पण जसं वेदांचं नंतरच्या काळातील रूप म्हणजे पुराणं, तसंच गुणांची आराधना या वैदिक तत्वाचं नंतरचं रूप म्हणजे शक्ती आराधना. तांत्रिक शाखेत येणारं देवतेचं मूर्त रुप अनेक साधकांना भावलं. तसंच या शाखेत आत्मिक प्रगतीबरोबरच वैयक्तिक सुखासाठी अनेक विधी असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला. तांत्रिक शाखेतील सर्वच उपायांची माहिती देणं शक्य नाही पण काही नेहमी दिल्या जाणाऱ्या उपायांची थोडक्यात माहिती पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करेन.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                      ====================================================

In my previous article I tried to elaborate the concept of remedies. Now lets know about some commonly recommended remedies.  

To know about the Vedic remedies one should understand the concept behind Vedic traditions. Vedic tradition doesn't mention much about the form or manifestation of the Gods. Major deities include natural qualities like Indra (King), Varun (Sky/Clouds/Rain), Agni (Fire), Surya (Sun) etc. Personification of some deities like Vishnu, Saraswati and Rudra (Shiv) are mentioned in some texts. But rather than the form of these deities the qualities are worshiped. For example Shiv (Rudra) is the supreme lord in Rigveda. But Shiv is defined as 'agni somatmakam', which means Fire (Rudra) part and Water (Shiv) part are the two qualities considered as manifestations of Shiv. The worship of these qualities is not fully 'Sattvik'. For example for personal gains, for victory in wars etc there are some left handed rituals mentioned in Vedic tradition. Due to emphasis on Divine energy and evolution of procedures with time it just appears that Vedic tradition is completely different than Tantric tradition.

Coming to the remedies in Vedic tradition Yajna is a major ritual of a much higher magnitude which was also mentioned in epics as old as Ramayana. Yajna is a way of worshiping a deity by oblation or sacrifice . There are different types of Yajna explained in the texts. In today's world all protocols can not be followed to the full extent. Yajna is based on different fundamentals like  Poojan (Worship),  Daan (Charity) etc. Periodically human/animal sacrifices were banned. Now this has been replaced by breaking a coconut. Havishy or substances/herbs to be sacrificed in fire also changed accordingly. Yajna is not necessarily a worship of Fire God. According to the deity the rituals are performed. Yajna can be a ceremony of a few days or months together. Some Yajnas are Sanskaras (Rights to passage) which is a one time procedure and may take less time to perform e.g. Naamkaran (Naming a child), Vivaha (Saptapadi ritual in marriage). 

Homa or Havana is sacrificing Havishy (depends on the protocol) to Fire God. Homa is evolved with time as a fire ritual for personal gain in contrast to Yajna which many times considered as public fire ritual. Homa if regularly performed in the abode not only helps in purifying the soul but also kills the aerial bacteria cleansing the environment around, which has now been scientifically proved. The material of altar for fire and substances to be sacrificed are of natural origin and mostly have medicinal properties. Thus when fire is lit it chemically affects the environment and creates a positive energy around.    

Some poojas, ishti vidhis, satra, yaag are the parts of Vedic rituals mostly of Yajnas. These rituals are performed by priests. Some 'grihya' (domestic) rituals can be performed by people with the help of a priest but other rituals meant for public are performed by a group of priests. I will try and explain my point of view behind the reason of this. To  avoid the misunderstandings it should be noted that the protocols of the rituals were made when caste system did not exist. While learning the rituals a Brahmin student (by Varna system) would achieve mastery by learning mantra, meditation and other skills. This mode of education was likely not possible for a person in other field or a worldly person. The amount of time to be spared and concentrating on time consuming rituals was probably not possible for a worldly person. Some rituals continue for days or months together, so a full time priest can only perform these rituals. This is the reason in my opinion why Vedic rituals need at least one priest.   

How these Vedic remedies affect our life? Vedic rituals include effect of both Energy (mostly Fire) and Mantras (Sound waves). The altar made for fire in Vedic rituals known as Kunda or Vedi is made up of different natural materials. Its symmetry helps the slow combustion of the materials. This helps in providing necessary time for slow burning of Havishy (the offerings) letting the fumes mix in the environment. Also the material used for making the altar slowly gets heated and its chemical constituents get absorbed in the fumes. Its like the process of making food in iron vessels where small amount of iron gets mixed in the food each time., acting as natural iron supplement. The wood used for the rituals (Samidha) is also from selected plants like sandalwood, red sandalwood etc to add the medicinal effect in the process. The heat generated extracts the phytochemical constituents from the woods which help in cleansing the air. The offerings or Havishy also has medicinal properties. Many medicinal plants like dry ginger, cobra's saffron, cinnamon etc are used as offerings. The gross effect of the process reduces carbon dioxide from the environment and also has a bactericidal effect. Many diseases are treated by the fumes of the fire sacrifice rituals (Yajna Therapy, Aroma Therapy). Further not only humans but plants and animals are also benefited by these medicinal fumes. The aerial bacteria or viruses infecting plants are killed and use of pesticides can be reduced by this effect. The marinated butter or ghee used as an offering helps slowing the process of combustion. This avoids the spontaneous combustion of the materials. For bigger lands or palaces this cleansing process may take a few days or weeks. Mantra chanting (sound waves) creates a positive energy affecting human psychology. Effect of sound waves as a therapy is proved by science now. The mantras in Vedic rituals are woven in such a fashion that those not only possess properties to heal psychological disorders but also some diseases. These sound waves affect humans, plants as well as animals. Thus I mentioned earlier that Vedic rituals have much bigger magnitude. In these rituals where Fire is not the deity, mantra chanting or meditation create positive energy. Vedic rituals also emphasize on Dana or Charity. If a needy person is provided with money or materialistic things that person is definitely going to give blessings to the giver. These 'blessings' is a simple term used for positive waves. These waves change our attitude and have positive impact on one's conscience, thus making one feel satisfied and happy. This definitely has a good effect on one's life. 

In today's world only possible forms of Vedic rituals are performed. So one should not expect the result as it is mentioned in the texts. One should also understand the fundamentals of Vedic remedies before following any remedy.

The second major type of recommended remedies is Tantric remedies. The exact origin of Tantra tradition is a bit controversial theory. But Tantra tradition evolved as a part of Vedic tradition and due to some fundamental differences it is considered as a different tradition. Individuality and personification of deities are two major differences between Vedic and Tantra Traditions. Rituals similar to Tantra tradition are mentioned in Vedic tradition. Vice a versa Homa, mantra chanting, oblation, sacrifice etc are also present in Tantra tradiition. As the Puranas are the later manifestations of Vedas, worship of Shakti is a later manifestation of worship of qualities of deities and Divine light. The personification of the Gods in Tantra tradition attracted many worshipers. Along with purification of soul and individualistic approach in protocols, this tradition also emphasized more on personal gains which increased its popularity. Providing information on all remedies in Tantra tradition is not possible, but I will try to elaborate some common remedies in my next article.        

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

                   =================================================

Wednesday, 7 March 2018

ज्योतिष शास्त्र आणि उपाय (Astrology and Remedies)


कुंडली विवेचनाचा पुढील टप्पा म्हणजे 'उपाय'. जवळपास सर्व धर्माांत ह्या शास्त्राला मान्यता आहे तसेच त्या त्या धर्मानुसार उपायही आहेत. पण 'उपाय' म्हणजे नक्की काय? आपण अनारोग्य असताना वैद्याकडे जातो आणि त्या रोगावरचं औषधं घेऊन बरे होतो तसेच 'उपाय' ही औषधं आहेत. गरज असेल तेव्हाच याचा अवलंब करावा. मी मागील लेखात लिहिल्याप्रमाणे काही ग्रहांच्या किरणांमुळे मानसिक वा शारीरिक त्रास उद्भवतात. अशा किरणांचा प्रभाव दूर किंवा कमी करण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यांनाच 'उपाय' किंवा 'ग्रहशांती' असे ज्योतिष शास्त्रीय शब्द आहेत. आयुष्यात अडचणी ह्या येतातच. पण त्या अडचणी कशामुळे आल्या आहेत, त्यामागे आपलीच कर्म आहेत का, आपला अट्टहास याला कारण आहे का असा सारासार विचार करून उपायांचा उल्लेख झाल्यास ते योग्य ठरेल. काही लोकांना अवाजवी गोष्टींचा लोभ होतो. अशा वेळी ती गोष्ट मिळवण्यासाठी वाट्टेल त्या 'उपायांच्या' आहारी जाणं निष्फळ ठरतं. आपलं वय, शिक्षण, कुवत याचा विचार करून आपण कसली अभिलाषा बाळगतोय याचं भान प्रश्नकर्त्यानं ठेवावं. दुसऱ्याशी तुलना करून, एखाद्या व्यक्तीचा द्वेष करून काही मिळवणं अयोग्यच आहे. उपाय हे जर ग्रहांचे वाईट परीणाम कमी करण्यासाठी असतील तर सारासार विचार करून ते शक्य असेल तरच उपाय करावेत. उदा: एखाद्या विद्यार्थ्याला ग्रहाच्या वाईट परीणामामुळे अभ्यासात एकाग्रता साधता येत नसेल तर उपायाने एकाग्रता नक्की साधता येईल पण चमत्कार होऊन त्याच्या कुवतीपेक्षा अधिक गुण मिळवणं शक्य नाही. त्यामुळे तो परीक्षेत पहिला येईल का? असा प्रश्न न करता तो अभ्यास नेटाने करू शकेल का? असा प्रश्न केल्यास तो योग्य ठरेल. आपल्या अडचणीचं मूळ कारण समजून घेतलं तर खरंच बाह्य उपायांची गरज आहे का? हेही लक्षात येईल.   

उपाय मुख्यतः दोन प्रकारचे असतात, वैदिक आणि तांत्रिक. वैदिक उपायांमध्ये परमतत्वाला महत्व आहे. यामुळे हे उपाय होम, हवन, यज्ञ असे असून कोणत्याही भौतिक रूपातील दैवतेची आराधना न करता देवतांच्या गुणांची आराधना केली जाते. उदा: अग्नी, वायू. यात देवळांचाही उल्लेख आढळत नाही. या वैदिक कर्मांसाठी त्याचे ज्ञान असलेल्या पुरोहितांची गरज असते. वैयक्तिक पातळीवर हे विधी केले जात नाहीत. याउलट तांत्रिक उपाय हे वैयक्तिक पातळीवर केले जातात. यात आराध्य देवतेचं शक्ती रूप हे मूर्ती किंवा चित्र रूपात समोर ठेवून अथवा देवळात विधी केले जातात. या व्यक्त स्वरूपातील शक्ती म्हणजेच गणपती, शिव, दुर्गामाता इत्यादी देवता. म्हणजेच आपण दैनंदिन जीवनात ज्या साधना वैयक्तिकरीत्या करतो त्या तांत्रिक शाखेतील असतात. मात्र काही गैरसमजांमुळे तांत्रिक शाखेला काळी जादू, अघोरी, वाममार्गी, तांत्रिक संभोग शास्त्र (Tantric Sex)  इत्यादी नावं दिली गेली. त्यामुळे काही तांत्रिक उपायांनाही सरसकट वैदिक किंवा देवाचे उपाय असं म्हटलं जातं. मात्र तंत्र शक्ती हा काही केवळ वाममार्गी भाग नाही. अशा प्रकारे दोन्ही पद्धतींपैकी एका पद्धतीनं ग्रहांमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग सांगितले जातात तेच 'उपाय' म्हणून सर्वसामान्य लोकांना माहित असतात.                
                
ग्रहांच्या किरणांमुळे होणारे मानसिक बदल फक्त एकाच व्यक्तीत होत नसतात तर प्रत्येक व्यक्तीमध्ये होतात. उदा: प्रश्नकर्त्याच्या घरातील व्यक्तीच्या झालेल्या गैरसमजामुळे काही त्रास होत असेल तर त्यासाठी आधी प्रश्नकर्त्यानं त्या घरातील व्यक्तीची मानसिकता ओळखून स्वतःत बदल केले तर अनेक गैरसमज दूर होतील. अशा कामासाठी लागणारी ऊर्जा, घरातील वातावरणातील वाईट ऊर्जा नष्ट करणे थोडक्यात त्या ग्रहाच्या किरणांना घरात किंवा शरीरात पसरू न देता त्याचं निष्क्रियीकरण करणे ह्यासाठी हे उपाय केले जातात. काही इमारतींवर चुकून वीज पडली तर ती खेचून घेऊन जमिनीत प्रवाहित केली जाते, तशा प्रकारेच हे उपाय केले जातात. उपायांचं जे 'फळ' मिळतं ते प्रश्नकर्त्यातील आणि समोरच्या व्यक्तीमधील मानसिक बदल आणि चांगल्या ऊर्जेमुळे घेतलेले निर्णय ह्याची परिणीती असते. ह्या चांगल्या ऊर्जेमुळे जेव्हा एकाच घरातील दोन व्यक्तींचे गैरसमज शांत चित्ताने विचार केल्याने हळू हळू दूर होऊन पूर्ववत संबंध जोडले जातात तेव्हा बदल दोन्ही व्यक्तींमध्ये घडतो. अशा अनेक अडचणी या उपायांमुळे दूर होतात. मात्र यासाठी प्रयत्नांची जोड आणि श्रद्धा ही हवीच. 

उपाय सांगताना ज्योतिषाकडून रत्न, मंत्र, यंत्र तंत्र, पूजा, होम हवन अशा पद्धतींचा सर्रास उल्लेख केला जातो. नेमका कोणता उपाय करावा आणि कधी याची माहिती प्रश्नकर्त्याला नसल्याने अनेक खर्चिक उपाय केले जातात. न फेडलेला नवस, गेल्या जन्मीचं पाप, करणी, भानामती, देव देवस्की असे शब्द वापरून प्रश्नकर्त्याला चिंता वाटेल असं विवेचन केलं जातं. या सर्व गोष्टींत नक्कीच तथ्य आहे पण दर वेळी असंच घडतं का? तंत्र शास्त्र हे गूढ पण अत्यंत परीणामकारक शास्त्र आहे. मात्र अशा वेळी इतर कारणं आहेत का याची संपूर्ण तपासणी करून एखाद्या शिकलेल्या व्यक्तीकडूनच याची खात्री करून घ्यावी. अशा काही उपायांचं थोडं विश्लेषण पुढील लेखात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.    

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती, किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

                        ===========================================

The next step in Horoscope prediction is Astrological Remedies. Almost all religions believe in Astrology and have recommended the remedies according to the religious fundamentals. What is exactly a Remedy? In simple words when we are ill, we see a doctor and take some medicines to get cured, just like this remedies are medicines. These should be used only when necessary. As I mentioned in my last article rays of some planets affect psychologically or physically. To reduce or nullify these effects some methods are used. These methods are referred to as the 'remedies'. Obstacles in human life are obvious. If we refer remedies in context with the reason behind these obstacles like one's abstinence or karma it will be plausible. Some people have greed for exorbitant things. In such cases falling prey to remedies provided by anyone promising to achieve such things will be fruitless.The querent should analyse factors like age, qualification, capacity etc practically while seeking the guidance for any achievement. Seeking answers by comparing with others or with malevolent approach is absolutely unethical. If the remedies are meant to reduce the ill effects of the planet(s), then these should be applied for a possible work to get done. For example if a student is not able to concentrate on studies due to ill effect of a planet then by such remedies the student can definitely increase the level of concentration, but miraculously the student cannot achieve grades beyond his/her capacity. So rather than putting a query like 'will the student stand first in the exam?' it should be put in the way'will the student study with full concentration?'. If the root cause of the problem is analysed then it can be easily found out whether a 'remedy' is required or not.

Astrological remedies are broadly of two types, Vedic and Tantric. In Vedic tradition emphasizes on Divine Light ( Jyotirmay Purush) and worship the qualities of Gods. For example Agni (Fire), Vaayu (Air) etc. There is no physical form of the God but these qualities or gyan (knowledge) is the God himself. The structures like temples or idols are not mentioned in this tradition. The Vedic remedies are  based on Yagnas, Homa/Havana where trained Brahmanas (Priests) are required to do the procedures. Individual approach is not observed here. In contrast in Tantric tradition is more individualistic. The God to be worshiped is given a physical form like idol or painting or structures like temples are built. It means in day to day life we worship a God individually is a Tantric tradition. Some misunderstandings and lack of information have defamed this tradition as a path of black magic, aghori, sexually improper (Tantric sex) etc. Due this many Tantric remedies are named as Vedic or Astrological. Tantric tradition is not just a left handed path. Well any one method from these two traditions is recommended to reduce the ill effect of planets and commonly called as a 'remedy'.

The planets affect not only a single person but everybody on the Earth. If the querent has some issues with a family member, then the querent should understand the basic nature of the member and make the changes accordingly, this can resolve simple issues. The remedies in such cases can be used to nullify the negative energies or to stop the spreading of the rays of the affecting planet in the house. It works just like lightning protection system on a building which absorbs the current of lightning strike and nullifies it. The result of a remedy is due to nullifying the unwanted energies and psychological changes in every family member because of increase in positive energy. When misunderstandings between two family members are cleared by slow but steady changes in thought process, it is due effect of the remedy on both the persons. This way remedies can be applied in normal life but without belief and proper efforts it is not possible to beat the odds. 

While recommending remedies, astrologers mostly mention about gemstones, mantras, tantras, yantras, poojas, homa and havana. If the querent is unaware of precise use of the remedies, many expensive remedies are blindly followed. Some astrologers (sometimes deliberately) mention about sins in previous births, black magic, incomplete vows etc. These things definitely do exist but is every horoscope affected by these type of ill effects? Tantric tradition is definitely powerful and effective. But while coming to any such conclusion, other possible reasons must be checked thoroughly by approaching a knowledgeable person. 

I will try and explain briefly about different kinds of remedies in my upcoming articles.
   
© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

                        ==================================================   

Tuesday, 6 March 2018

ग्रह आणि ज्योतिष शास्त्र: एक विश्लेषण (Planets and Astrology: Some more analysis)


आकाशात दूरवर असणाऱ्या ग्रहांचा आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परीणाम होतो ही रास्त शंका अनेकांच्या मनात असते. यामुळे बऱ्याचदा ज्योतिष शास्त्राची वैधता नाकारली जाते. मी आधी एका लेखात नमूद केल्याप्रमाणे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीत बसणारं हे शास्त्र नाही. त्यामुळे ह्या शास्त्राला लावल्या जाणाऱ्या कसोट्या सुद्धा ह्या शास्त्राच्या मुळाला धरूनच असायला हव्यात. ह्या शास्त्राचं मूळ आणि विज्ञान यांची सांगड घातली तर या प्रश्नाचं उत्तर मिळतं. 

एका साध्या उदाहरणापासून सुरुवात करता येईल. सूर्य किरण पृथ्वीवर पडतात ते आपण सगळेच डोळ्याने पाहू शकतो. दोन व्यक्ती दुपारच्या उन्हात एकाच जागी उभ्या असतील तर एखाद्या व्यक्तीला उन्हाने खूप तहान लागते क्वचित चक्करही येते पण दुसऱ्या व्यक्तीला घाम येण्यापलीकडे काहीच त्रास होत नाही. याचं कारण एखाद्याची प्रकृती सूर्य किरण सहन करू शकत नाही तर एखाद्याची प्रकृती सहन करू शकते. सूर्याप्रमाणेच चंद्र, बुध, गुरु, शुक्र आणि शनी, हर्षल, नेपच्यून आणि प्लूटो या ग्रहांचे किरणही आपल्यावर पडतात. सगळेच किरण काही डोळ्याला दिसत नाहीत. पण त्याचा परीणाम हा होतच असतो. प्रत्येक ग्रहाची स्वतःची अशी एक गुरुत्वाकर्षण शक्तीही असते (खगोल शास्त्राचा संदर्भ आवश्यक).        

आता हा परीणाम नक्की होतो कसा? मागील लेखात मी लिहिलं होतं की मनुष्य स्वभाव हीच गुरुकिल्ली आहे आणि ह्या भोवतीच इतर मुद्दे फिरत असतात. ह्या ग्रहांचे किरण, त्यांचं गुरुत्वाकर्षण आणि अवकाशातील काही खगोल शास्त्रीय घडामोडी यामुळे मनुष्यामध्ये कधी उत्साह तर कधी नैराश्य येतं. हे किरण शारीरिक क्षमतेवर परीणाम करतात ते दिसतं (उदा: अति उन्हामुळे थकवा येणे) पण ह्याच मुळे अदृश्य रूपात मानसिक परीणाम होतो जो मनुष्य स्वभावानुसार व्यक्त होतो. पौर्णिमेला किंवा अमावास्येला जशी भरती, ओहोटी, पाऊस या घडामोडींवर दृश्य परीणाम होतो तसंच मानसिक रोगी जास्त आक्रमक होतात हेही सिद्ध झालं आहे.  

जन्म कुंडली नुसार याचा अर्थ समजून घेऊ. जन्म कुंडलीतील ग्रहांची स्थिती ही त्या व्यक्तीसाठी कायम राहते. उदा: जन्म कुंडलीत मंगळ नीच/अशुभ राशीत आहे, ज्यात तो शुभ फळ देणार नाही. म्हणजेच जन्मभर मंगळ ग्रहाचे किरण त्या व्यक्तीच्या शरीरावर पडल्यावर शारीरिक, मानसिक परीणाम होऊन ती व्यक्ती चुकीचे निर्णय घेऊ शकते अथवा रागीट बनते. अनेक वर्षे ह्या किरणांचा प्रभाव झाल्यावर त्या किरणांच्या गुणाप्रमाणे रोगही उत्पन्न होतात, जे मंगळ शुभ स्थितीत असणाऱ्या व्यक्तीला होणार नाहीत किंवा इतर कारणांनी होतील. अशा प्रकारच्या मानसिक परीणामांचं पर्यवसान हे नंतरच्या काळातील 'घटनां'मध्ये होतं. अशा दहा ग्रहांचे किरण आणि राहू व केतू या दोन छेदन बिंदूंचे परीणाम या सर्व गणिताचं उत्तर म्हणजे भाकीत. एखाद्या व्यक्तीला 'मंगळ' आहे असं विधान जेव्हा केलं जातं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीच्या जन्म वेळी मंगळ ग्रह पृथ्वीशी निगडित अशा स्थितीत असतो की त्या व्यक्तीला त्या किरणांमुळे होणारा त्रास हा तीव्र असतो. अशा प्रकारे ग्रह हे आपल्यावर प्रभाव टाकत असतात. 

पृथ्वीचा विचार या ग्रहांत होत नाही का? तर होतो पण अप्रत्यक्षपणे. आपल्या जन्म स्थळाचे अक्षांश व रेखांश कुंडली मांडताना विचारात घेतले जातात. मनुष्य जन्म पृथ्वीवरच होणार असल्याने ह्या शास्त्राने पृथ्वीचे गुण, परीणाम हे गृहीत धरूनच इतर ग्रहांशी निगडित परीणामांचा विचार केला आहे. आणि काळानुसार पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानव निर्मित घटनांचा विचार करूनच ज्योतिषाने विवेचन सांगावं. 

आता राहिला प्रश्न आकस्मिक घडणाऱ्या घटनांचा. मनुष्य स्वभाव हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असला तरी आपण जिथे राहतो, काम करतो तेथील व्यक्तींचे स्वभाव, आकस्मिक घटना ज्या आपल्या हातात नाहीत अशा गोष्टीत ह्या शास्त्राची भूमिका काय असते? याचंही उदाहरण घेऊ. काही 'अटळ' घटनांमध्ये मृत्यू सारख्या घटना येतात. जिथे मनुष्य स्वभाव कमी वेळा महत्वाचा ठरतो. महादशा (या दशा काढण्याच्या अनेक पद्धती आहेत) ह्या पुढील काळातील ग्रहांच्या भौगोलिक स्थिती वरून मनुष्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची सूचना देऊ शकतात. भविष्य काळात कोणत्या दिवशी कोणते ग्रह कोणत्या स्थितीत असतील यावरून घटना कधी घडतील याचं निदान केलं जातं. जर विधिलिखिताप्रमाणे मनुष्याचं आयुष्य संपलं असेल तर अपघात घडणाऱ्या जागी असण्याची बुद्धी त्याला होते असं सोप्या भाषेत म्हणता येईल. जन्म कुंडलीतील मूळ ग्रहांवरून आयुष्य योग किती आहे याचा अंदाज येतोच. प्रत्येकालाच काही पूर्णायुष्य लाभत नाही. अशा वेळी चुकीच्या ठिकाणी हजार असणं, चुकीच्या मार्गानं प्रवास करणं, अशा अनेक मार्गांनी मृत्यू मनुष्याला गाठतो. प्रत्यक्षपणे मनुष्य स्वभाव याला कारणीभूत नसला तरी काही वेळा असे निर्णय घेण्याची बुद्धी होणं, हा ग्रहांचाच परिणाम असतो. अनेक वेळा ती 'चूक' नसून मृत्यूनं निवडलेलं निमित्त मात्र असतं. 

अशा घटनेचा अंदाज आधी कुंडलीवरून आला नाही का ? ह्याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आणि वादग्रस्त आहे. अशा वेळी वैयक्तिक वा भावनिक पातळीवर विचार न करता निसर्गचक्राचा विचार केला तरच याचं उत्तर मिळेल. कोणत्याही व्यक्तीची मृत्यूची वेळ विधिलिखितानुसार निश्चित असते, ज्याला काही ग्रंथांत 'महामृत्यू' म्हटलं आहे. महामृत्यू आधी काही जीवावर बेतणारे रोग/प्रसंग ओढवतात, ज्यातून सुटका होऊ शकते त्याला 'अपमृत्यू' म्हटलं आहे. ह्या दोहोंचा मनुष्याच्या वयाशी संबंध नसतो. अपमृत्यू कधी कधी योग्य उपाय केल्यास टाळता येतो. पण महामृत्यू अटळ असतो, जो आधी निदान करता आला तरी त्यातून सुटका नसते. तसंच अचूक भाकीत आधीच कळल्यामुळे जर 'महामृत्यू' टाळता आले तर जन्म मृत्यूचं चक्र पूर्ण होणार नाही. हा झाला वैयक्तिक भाग. अनेकदा सामुदायिक अपघातांवर ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोन काय असा प्रश्न उपस्थित केला जातो. अपघाती मृत्यू हे बऱ्याचदा महामृत्यू असतात. ज्या जीवांचं आयुष्य विधिलिखितानुसार संपलं आहे असे जीव एकाच वाहनातून प्रवास करतात ज्याला अपघात होतो आणि हे जीव मृत्युमुखी पडतात, पण ज्यांचा महामृत्यू नसेल ते अशा अपघातातूनही बचावतात. याचंच दुसरं उदाहरण म्हणजे असाध्य रोग. अनेकदा असाध्य रोग जडलेली लहान मुलं आयुष्याची लढाई हरतात, मात्र काही वयस्कर व्यक्ती ह्या रोगांवर मात करून पूर्णायुष्य उपभोगतात. याला वैद्यकीय कसोटी लावता येणार नाही तर विधिलिखित हे समाधानकारक उत्तर आहे.

आपण हे निसर्गाचं गणित लक्षात न घेता मृत्यू हा म्हातारपणीच यावा ही अपेक्षा बाळगतो. भावनिक दृष्ट्या यात काहीच चूक नाही पण निसर्ग आणि विधिलिखित हे भावनांवर आधारीत नाही. लहान वयात आलेल्या मृत्यूला आपण अकाली मृत्यू म्हणून संबोधतो. पण जो मृत्यू आपल्या दृष्टीनं 'अकाली' असतो तो विधिलिखितानुसार अकाली नसतो. म्हणूनच जन्म कुंडली बनवताना आयुष्य योग किती आहे याचा विचार केला जातो. 'विधिलिखित' या संकल्पनेला अनेक आधार आहेत, पौराणिक संदर्भही आहेत ज्याची माहिती एका लेखात देणं शक्य नाही.     
काही वेळा वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग समोरील व्यक्तीच्या कर्मामुळेही घडतात. कारण`घर, समाज, निसर्ग हे काही एकट्या व्यक्तीचे नसतात. मग त्यात वैयक्तिक कर्म, सामाजिक कारणं आणि विधिलिखित या सगळ्याचा एकत्रित विचार करूनच ह्या शास्त्राचा वापर करावा. ज्योतिषाला प्रश्नकर्त्याने संपूर्ण माहिती न दिल्यास चुकीचं मार्गदर्शन मिळण्याची शक्यता असते. कुंडली समोर ठेवल्यावर ज्योतिषी अंतर्ज्ञानाने सगळं ओळखेल हा अत्यंत चुकीचा समज आहे. अडचणी संदर्भात पुरेशी आणि खरी माहिती देऊन मगच ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.   

वरील  विवेचनावरून हे लक्षात येईल की विज्ञान, अध्यात्म, आपल्या बुद्धीपलीकडील काही गोष्टी, श्रद्धा यांचा मोकळ्या मनाने विचार केल्यास हे शास्त्र आहे हे पटतं. मात्र आताच्या काळातील विज्ञान एवढी एकच कसोटी लावल्यास हे शास्त्र पटणार नाही.   

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                       ==============================================

How can the planets situated far away from the Earth can affect human life? is a legitimate question in many knowledge seekers' minds. Many times due to this unanswered query, the authenticity of Astrology remains debatable. As I mentioned in one of my earlier article that Astrology can not be tested on the parameters of modern science. Thus if parameters used for Astrology are relevant then only it will make sense. A combination of  base of Astrology and modern science can definitely answer such queries.   

We can start with a simple example. Sun rays reach on the Earth and are visible by naked eye. If two people are standing at the same place in the afternoon time, one of them may feel thirsty or sometimes may feel dizzy but the second person may have no other symptoms than sweating. The reason behind it in simple words is the first person can't tolerate that heat and the latter one can. Just like the Sun all selected planets in Astrology like Moon, Mars, Mercury, Jupiter, Venus, Saturn, Uranus, Neptune and Pluto emit rays and they reach on earth at different speeds. Not all rays are visible to the naked eye, but they do have an effect on human body. Every planet has its own magnetic field (Astronomical references required).

How these celestial bodies exactly affect human life? I mentioned in my previous article that human nature is the key factor. The rays of these planets, magnetic fields and other celestial movements create a emotional effects like zeal or depression. The effect on physical body can be visible (e.g. feeling more thirsty in afternoon time). Same celestial events affect the human mind invisibly, which gets reflected according to human nature. On full moon day or no moon day just as  tides, rain etc are affected visibly, psychotic patients behave more aggressively is a proven fact. 

Lets try and understand this from Janm Kundli point of view. The position of planets in Janm Kundli is fixed for that person for lifetime. So if in Janm Kundli Mars is in its inauspicious sign it will not give good results. This means rays from Mars falling on that person's body for the whole life will affect the person physically and/or psychologically and that person may take wrong decisions or may become short tempered. After constant effect of such rays some diseases may generate, depending on chemical structure of those rays. This effect can not be observed in a person with Mars at a auspicious position in Janm Kundli or can be by other reason. Such psychological effects ultimately result in some 'incidences' in life. Thus gross effect of rays from such ten planets and effect of two intersection points Rahu and Ketu is the final prediction. Thus when it is predicted that one is Manglik, it means at one's birth time Mars was at such a relative position that the rays affect him acutely. This way planets affect our lives. 

The planet Earth is not considered in twelve planets? Yes it is, but indirectly. The latitudes and longitudes of birth place are taken into consideration. Human birth obviously occurs on the Earth. Thus this science has already taken Earth's parameters into consideration in a relative manner. The Astrologer should also consider natural and man made movements while prediction.

Now sudden incidences is a point to be noted. Though human nature is the key factor, other factors like where one lives, works, nature of people around and sudden incidences like calamities are not under control of anyone. So what is the role of Astrology here? Lets take another example. Some inevitable events include death of a person, where human nature may not play a significant role (some exceptions excluded). Mahadasha- Antardasha is a method of calculation which provides position of planets in future on the basis of Astronomical Mathematics (there are some other methods too). The position of planets in future help to calculate which events can occur and when. In simple words, if one's life is over according to the destiny, then one reaches the location of accident just because one's mind operates unknowingly to make one reach there. Life span of a person can be calculated from Janm Kundli and not everybody is long lived. Thus by reaching at the wrong place at the wrong time, selecting wrong road to travel etc Death finds its way. Some times human nature is not directly responsible for this but taking such decisions which later on prove to be 'wrong', is the effect of the planets. Many times its not a 'mistake' but it is a 'reason' selected by the destiny. 

Why such fatal incidences are not predicted beforehand? The answer is complicated and debatable for some. In such cases rather than thinking personally or emotionally if we think practically about nature's cycle then only we can get the answer. 

The time of death for any person is already destined, which in some Indian texts is referred as 'Mahamrutyu' or we can call it Eternal rest. Before Mahamrutyu some fatal incidences/diseases may occur in one's life, where death can be avoided. This is referred as Apamrutyu i.e. death under inauspicious circumstances. Both of these are not related to the age of a person. Apamrutyu can be sometimes avoided by proper remedies but Mahamrutyu is inevitable. Also if Mahamrutyu is avoided then it will not complete the cycle of birth and death. Well this was at a personal level. But there rises a question that what is the view of Astrology on road accidents where many people die at a time. Accidental deaths are usually Mahamrutyus. The people who have completed their life according to destiny, travel in the same vehicle which meets the accident and they die. On the other hand if some travelers are not destined to die, they miraculously survive the fatal road accident of the same vehicle. Another example of destiny is incurable diseases. Many times fatally ill children lose the battle against the disease, but some old people with same disease get fully cured and live a long life. This cannot be every time explained on the basis of medical science, but destiny is a satisfactory answer.   

We don't consider this cycle of nature and expect the death only at the old age. Emotionally it seems correct but nature and destiny are not programmed on emotions. Death at a young age is considered as Akaal mrutyu or Untimely death. But the death 'untimely' for us is not untimely for the destiny. That is why in the calculation of a Janm Kundli, life span is calculated. Destiny is a concept based on many factors. There are explanations for this concept in various texts. Writing the detailed information in one article is not possible.   

Some personal encounters occur due to the behaviour of others. As home, community, nature all these don't belong to a single person. So personal doings or Karma, communal reasons and natural factors should be considered from various angles in the prediction part. 

By reading this analysis it can be understood that science, spirituality, belief and some things beyond the power of human brain must be considered with an open mind to understand the authenticity of Astrology. Just applying a single parameter of modernized science will not help in understanding or accepting this 'science'.

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                         ================================================